Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Sun, 08/20/2017 - 13:10  ·  लेख
लेख
डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे. डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे. हे नक्कि काय प्रकरण आहे? गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी? प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का? एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच . तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
26798 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

अ
अभिजित - १ Sun, 08/20/2017 - 16:35 नवीन
पद्धतशीर रित्या बुडवली आहे कंपनी. २५/३० फर्म स्थापन करून. इकडचा पैसे तिकडे .. पद्धतीने. एक मराठी ब्लॉग वाचला यावर. मिळाला तर लिंक टाकेन. कसा याचा मुलगा ट्रम्प tower मध्ये राहतोय. हा कसा पुण्यातल्या पुण्यात हेलिकॉप्टर ने फिरतो. कसा ब्राह्मण लोकांना आवाहन करून लोकवर्गणी मागतोय. इ इ .. याला भीक मागायची लाज कशी वाटत नाही ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 08/20/2017 - 17:22 नवीन
http://vijaykumbhar-marathi.blogspot.in/2017/08/Madhuri-Dixit-Conspiracy-Criminal-Enterprise-DSKDL-lavish-Lifestyle-Trump-Towers-Dual-Identities-FD-Forged-Signatures-Investors-Misleading-money-siphoning-Murky-Deals-RBI-Shell-Companies-MPID.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
सुखीमाणूस Mon, 08/21/2017 - 10:57 नवीन
पण कायप्पावर असेही वाचायला मिळाले की हे कुंभार साहेब ब्राम्हण विरोधी राजकीय पक्षाच्या कळपातले आहेत म्हणे आपल्याला बुवा सगळेच खर्रे खर्रे वाटतात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पुंबा Mon, 08/21/2017 - 11:07 नवीन
सुमा, माणूस कुठल्या अक्ळपातला आहे हे महत्वाचे की तो सांगतोय ती तथ्ये? कोणीही सांगितलेल्या, लिहिलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास न ठेवणे योग्यच पण माणूस जे मांडतोय त्याची शहानिशा व्हावी की नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
प
पगला गजोधर Tue, 12/26/2017 - 03:58 नवीन
कुंभार साहेब ब्राम्हण विरोधी राजकीय पक्षाच्या कळपातले आहेत म्हणे
हो का ? डीएसकेचें मनुवादी चहाते, प्रकरणाला जातीय रंग देऊ पाहत आहे, त्यांनी बातम्या नीट वाचाव्यात..... "प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर त्यांचे जावई केदार वांजपे यांनी तब्बल १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे.  वांजपे हे डी. एस. कुलकर्णी यांची पुतणी सई यांचे पती आहेत. वांजपे हे डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत होते.  कंपनीवर सातत्याने आरोप करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनाही वांजपेच माहिती पुरवत आहेत,' असे कुलकर्णी यांना म्हटले होते. त्यामुळे बदनामी झाल्याचे सांगत वांजपे यांनी त्यांना अॅड. प्रसाद विजय कुलकर्णी यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
म
मिलिंद Sun, 08/20/2017 - 17:35 नवीन
खालील पोस्ट अजुन प्रकाश टाकू शकेल https://vijaykumbhar.blogspot.in/2017/08/DSKDL-Criminal-Enterprise-Investors-FD-RBI-Shell-Companies-Money-siphoning-Misleading-Information-Dual-Identities-Forged-Signatures-Conspiracy-Murky-Deals.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
श
शब्दबम्बाळ Sun, 08/20/2017 - 18:00 नवीन
यांनी बराच अभ्यास करून माहिती काढलेली दिसतेय! जातीचा वापर करून वर्गण्या काढणे तर कहर आहे! यावरून सहारा परिवार ने सेबी ला कसे गंडवले होते हे आठवले. या व्हिडीओमध्ये मजेशीर रित्या विस्ताराने सांगितले आहे. जरा क्वालिटी ठीक ठाक आहे पण माहिती चांगली दिलीये... हे लोक स्वतःचा फायदा बघणारे आहेत वेळप्रसंगी सामान्यांना गंडा घालून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद
अ
अभिजीत अवलिया Sun, 08/20/2017 - 18:14 नवीन
वाचले. अत्यंत संतापजनक आहे सगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद
प
पगला गजोधर Mon, 08/21/2017 - 18:19 नवीन
नोबडी किल्ड जेसिका या खुनाच्या केसमधे, बचाव पक्षाने, असे म्हणणे मांडले, तिचा खून झाला त्या रात्री उशिरा ती तिथे उपस्थित का होती. (म्हणजे सभ्य घरातल्या स्त्रियां रात्री अश्या ठिकाणी नसतात) जेठमलानी यांना अस, जानवून द्यायचे होते, की खून झाला, यामधे जेसिकाचा दोष आहे. आता सिमलरली डी एस के चे चहाते, कदाचित अस भासवतील, की लोकांचे पैसे अडकले, यात त्या लोकांचाच दोश आहे. मला वाटते लोकांनी वैधपने भांडवली बाजारात पैसा एका कॉन्ट्रेक्ट अंतर्गत गुंतवाला, हा करार लोक व डी एस के प्रवर्तक यांच्यामधे असावा. जर कराराप्रमाने होत नसेल, तर हा सरळ सरळ ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट आहे, त्याप्रमाणे करवाई का होउ नये ? कार्रवाई टाळून जर डी एस के ना बाजू मांडली देउ जात असेल, तर विजय माल्या, ललित मोदी, सुब्रतो रॉय यांना वेगळा न्याय का ? असे त्यांचा बचाव पक्ष विचारणार नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
सुबोध खरे Mon, 08/21/2017 - 19:43 नवीन
डी एस के यांनी जर घोटाळा किंवा अफरातफर केली असेल तर ते मराठी आहेत किंवा ब्राम्हण आहेत हे बाजूला ठेवून कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण जर धंद्यात खरंच मंदीमुळे खोट अली असेल तर कायद्या प्रमाणे त्यांना कर्जाचे सुसूत्रीकरण( कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग) करून द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/22/2017 - 10:36 नवीन
पण जर धंद्यात खरंच मंदीमुळे खोट अली असेल तर...
हेच म्हणायचे होते. वनसाईडेड बॅशिंग करण्यापेक्षा त्यांच्या या गुंतवणूक योजनेतून कुणाला आधी लाभ झाला आहे का हे पाहायला हवे. हि स्कीम नुकतीच सुरु झाली आणि पहिल्याच फटक्यात कुठलाही परतावा न देता ती (घोटाळ्यामुळे) बंद पडली आहे का? बाकी ते ब्राह्मण वगैरे जाणीवपूर्वक या प्रकरणात आणले जात असावे का? डिएसकेंनी जातीच्या आधारावर काही केले असेल तर ते चुकीचेच आहे पण त्यांनी तसे केले आहे हे खात्रीशीर दुव्यांनी/पुराव्यांनी सिद्ध व्हावे, उगाच कुणाच्या ब्लॉगच्या आधारावर नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 07:44 नवीन
विजय कुंभार ब्लॉग वर लिहिण्यापेक्षा पोलिसात तक्रार का करत नाहीत. जातीच्या नावाने डीएसकेने लोकवर्गणी मागितल्याची कोणती मोहीम आहे. काही पुरावा आहे का ? एखादी आवहन पर लिंक वगैरे आहे का. १. डीएस के हेलिकॉप्टर ने फिरतो याचा उल्लेख २. त्याच्या २ बायकांचा उल्लेख ३. त्याच्या विलासी जीवनशैलीचा उल्लेख ४. त्याच्या जातीचा उल्लेख ५. मधेच कोणत्यातरी फडणीस नावाच्या इसमाचा आणि त्याच्या जातीचा उल्लेख हे सगळे काय आहे. मला तर हा स्कोअर सेटलिंग चा आणि बदनामीचा प्रकार वाटतो. म्हणजे डीएसके ने पैसे बुडवले असतील तर पोलिसात तक्रार व्हावी आणि कारवाई व्हावी. बाकी खाजगी गोष्टी वगैरे वाचून कुंभारच्या हेतूबद्दलच शंका आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Mon, 08/21/2017 - 08:20 नवीन
भाजपच्या किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 08:23 नवीन
म्हणजे ? किरिट सोमैय्या यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. हे बरोबरच आहे. ब्लॉगवर खोडसाळ पणा करुन लिहिण्यापेक्षा हे चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Mon, 08/21/2017 - 08:41 नवीन
ब्लॉगवर खोडसाळ पणा करुन लिहिण्यापेक्षा हे चांगलेच आहे. >>>>खोडसाळपणा??? या डिएसकेने केलेले झोलझाल पुराव्यानिशी मांडले आहेत.नीट वाचता येत नाही का? फक्त कुलकर्णी आहे आणि ब्राह्मण आहे म्हणून या व्यक्तीचे कुणी समर्थन करु नये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 09:01 नवीन
खोडसाळपणा??? या डिएसकेने केलेले झोलझाल पुराव्यानिशी मांडले आहेत.नीट वाचता येत नाही का? तुम्हाला वाचता येत नाही सर नीट. मी आक्षेप व्यवस्थित पणे नोंदवले वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अनुप ढेरे Sun, 08/20/2017 - 17:59 नवीन
रिअल इस्टेट बूम होती तोपर्यंत झोल झाल बिनदिक्कत चालू होते असं दिसतय. रिअल इस्टेट झोपल्यावर अंगाशी आले हे प्रकार.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sun, 08/20/2017 - 18:52 नवीन
कुंभार यांनी लिहीलेले खरे असेल तर डिएसकेला पहीला विजय माल्या पुरस्कार द्यायला हरकत नाही.जातीवर पैसे मागतोय म्हणजे पुन्हा भिकारी झाला की काय हा?
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 08/20/2017 - 18:57 नवीन
अवघड आहे सगळं, सरकारी यंत्रणा, सेबी यांना फाट्यावर मारून हे उद्योजग असे कसे करू शकतात हा प्रश्न पडतो. गेल्या काही दिवस वाचतोय dsk बद्दल, ज्यांचे पैशे अडकलेत त्यांचं दुःख समजू शकतो कारण बहुतांश लोकांचा कष्टाचा पैसा आहे. विजय कुंभार यांना तुम्ही फोन किंवा ई-मेल करून एखाद्या प्रोजेक्ट बद्दल माहिती विचारू शकता. मी जेंव्हा पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार केलेला त्यावेळी त्यांचा ब्लॉग वाचलेला. त्यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर ने इंटरेस्ट फ्री लोन ची योजना काढलेली (जालावर शोधा बिल्डर च नाव सापडेल) आणि मला ती प्रथमदर्शनी छान वाटलेली. म्हणून मी अधिक माहितीसाठी जालावर शोधलं असता विजय कुंभार यांचा ब्लॉग सापडलेला त्यावर योगायोगाने त्यांनी इंटरेस्ट फ्री होम योजनेची काळी बाजू दाखवून दिलेली आणि फसवणूक कशी होऊ शकते हे सांगितलेलं. मी हे वाचून त्या स्पेसिफिक बिल्डर च्या स्पेसिफिक स्कीम मध्ये फ्लॅट बुक केला नाही, काही महिन्यापूर्वी म्हेवण्या तर्फे चौकशी केली असता असे कळले होते कि दोन वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम सुरु नाही झालेलं. आता हि इंटरेस्ट फ्री घराची योजना किती खरी किती खोटी हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे तीच लोक सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका Mon, 08/21/2017 - 06:28 नवीन
मी जेंव्हा पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार केलेला त्यावेळी त्यांचा ब्लॉग वाचलेला. त्यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर ने इंटरेस्ट फ्री लोन ची योजना काढलेली (जालावर शोधा बिल्डर च नाव सापडेल) आणि मला ती प्रथमदर्शनी छान वाटलेली. म्हणून मी अधिक माहितीसाठी जालावर शोधलं असता .....
गार्डियन डेवलपर्स का? सरळ स्पष्ट का लिहित नाही? माहिती असूनपण सांगायचे नाही आणि इतरांना कामाला लावायचे असे कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
माहितगार Mon, 08/21/2017 - 06:36 नवीन
अधिक सुस्प्ष्ट माहितीची अपेक्षा एकाबाजूने रास्त असली तरीही; नाण्याला दुसरी बाजू असू शकते तिही समजून घेतली पाहिजे; पूर्ण माहितीची खात्री नसताना आत्मविश्वास नसताना नावे घेणे, आरोप करणे बदनामी कायद्यांच्या अंतर्गतही येऊ शकते. किंवा सुरक्षेच्या दृष्टीनेनेही गोपनीयता पाळण्याची गरज असू शकते. त्यामुळे नावे घेण्यासाठी आरोप नमुद करण्यासाठी दबाव टाकणे यथोचित वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
उ
उपाशी बोका Mon, 08/21/2017 - 06:50 नवीन
विजय कुंभार यांना तुम्ही फोन किंवा ई-मेल करून एखाद्या प्रोजेक्ट बद्दल माहिती विचारू शकता. मी जेंव्हा पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार केलेला त्यावेळी त्यांचा ब्लॉग वाचलेला. त्यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर "xyz developers" ने इंटरेस्ट फ्री लोन ची योजना काढलेली आणि मला ती प्रथमदर्शनी छान वाटलेली. म्हणून मी अधिक माहितीसाठी जालावर शोधलं असता विजय कुंभार यांचा ब्लॉग सापडलेला त्यावर योगायोगाने त्यांनी इंटरेस्ट फ्री होम योजनेची काळी बाजू दाखवून दिलेली आणि फसवणूक कशी होऊ शकते हे सांगितलेलं. मी हे वाचून त्या बिल्डर च्या स्पेसिफिक स्कीम मध्ये फ्लॅट बुक केला नाही, काही महिन्यापूर्वी म्हेवण्या तर्फे चौकशी केली असता असे कळले होते कि दोन वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम सुरु नाही झालेलं. आता हि इंटरेस्ट फ्री घराची योजना किती खरी किती खोटी हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे तीच लोक सांगू शकतील. असा मजकूर लिहिला, तर यात xyz developers ची काय बदनामी होते? वरती लेखकाने फक्त स्वतःचे मत आणि स्वतःचा अनुभव लिहिला आहे, xyz developers वर काहीही टीका-टिप्पणी किंवा बदनामी केलेली नाही. उगीचच बदनामी कायदा दाखवून भिती दाखवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/21/2017 - 07:01 नवीन
काही महिन्यापूर्वी म्हेवण्या तर्फे चौकशी केली असता असे कळले होते कि दोन वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम सुरु नाही झालेलं.
हा भाग कानोकानी माहितीचा आहे प्रत्यक्ष पडताळलेला नसावा. अशा माहितीवर किती विसंबायचे आणि किती नाही किती माहिती द्यायची आणि किती नाही हे प्रत्येकाने ठरवावयास हवे. अधिकतम माहिती शेअर करण्याने एक महत्वाचे सामाजिक दायित्व पार पडते पण माहिती बद्दल शंका असेल अथ्वा ज्यांच्यात माहिती देण्याचा आत्मविश्वास नाही त्यांच्याकडून दबाव टाकून आलेल्या माहितीनेही फारसे काही हशिल होत नसावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
उ
उपाशी बोका Mon, 08/21/2017 - 07:29 नवीन
माहिती म्हेवण्याकडून कळली, हे स्पष्ट लिहिले आहे. तरी त्यातून डेवलपरची बदनामी होते असे काही वाटले नाही. असो, लेखकाने स्वतःचे मत दिले आहे, त्यामुळे अजून बोलायचे नाही. मी फक्त माझे मत सांगितले.
अधिकतम माहिती शेअर करण्याने एक महत्वाचे सामाजिक दायित्व पार पडते पण माहिती बद्दल शंका असेल अथ्वा ज्यांच्यात माहिती देण्याचा आत्मविश्वास नाही त्यांच्याकडून दबाव टाकून आलेल्या माहितीनेही फारसे काही हशिल होत नसावे.
एक विनंती: असे काही तरी क्लिष्ट लिहिण्यापेक्षा किंवा इंग्रजीचे शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा, साध्या-सरळ-सोप्या भाषेत लिहावे, जे सहज कळेल. योग्य ठिकाणी पूर्णविराम, स्वल्पविराम वापरावेत. छोटी वाक्ये लिहिली, सोपे शब्द वापरले आणि जसे बोलतो, तसे लिहिले तर समजायला सोपे पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/21/2017 - 07:04 नवीन
शिवाय एकटी दुकटी व्यक्ति व्यवसाय घटना या पेक्षा एकुण व्यवस्थे/अवस्थेबद्दल चर्चा करण्याची इच्छा असलेले लोक देखील व्यक्ति व्यवसाय घटना याचे प्रत्यक्ष उल्लेख टाळू शकतात हेही लक्षात घ्यावयास हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
अ
अमितदादा Mon, 08/21/2017 - 07:10 नवीन
लोकांना माहिती व्हावी म्हणूनच प्रतिसाद लिहला आहे, त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी म्हणूनच नाहीतर माहिती लपवून ठेवली असती. माहितीगार धन्यवाद तुम्ही अत्यंत योग्य प्रतिसाद दिलाय तो अत्यंत योग्य असून लोकांनी परत एकदा वाचवा. माझ्या मूळ प्रतिसादातील हे वाक्य वाचा, मग कळेल नाव का घेतलं नाही ते.
आता हि इंटरेस्ट फ्री घराची योजना किती खरी किती खोटी हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे तीच लोक सांगू शकतील.
इथे प्रतिसाद देणं म्हणजे योग्य जबाबदारी घेऊन बोलावं लागत, उगाच सकाळ पेपर खाली प्रतिसाद देऊन नाम निराळे होता येत नाही। आता तुम्हाला तुमचं कसं बरोबर हे लिहीत बसायचं असेल तर लिहा अजून चार पाच उप प्रतिसाद माझी काही हरकत नाही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
ए
एस Sun, 08/20/2017 - 19:27 नवीन
अवघड आहे सगळं!
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 08/20/2017 - 20:14 नवीन
रेडिओवर ह्यांचे विविध क्षेत्रातील अनुभव, माहितीचे कार्यक्रम ऐकताना कधी शंकाही आली नव्हती की ही व्यक्ती अशी वागू शकेल. तीन एक महिन्यांपूर्वी व्हा. अॅपवर त्यांच्या ऑफिसमधील आर्थिक वादाचा व्हिडीओ बघितला होता तेव्हा धक्का बसला होता. आता ही बातमी खरी असेल तर काही खरं नाही.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/20/2017 - 21:07 नवीन
आधीच मराठी माणूस धंद्यात उभा राहणे मुश्किल त्यात अश्या बातम्या कानी आल्या तर त्याच्यावर आणखी विपरीत परिणाम होणार. या संकटातून बाहेर पडण्यासाठी डीएसके ना शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळो हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना. जाजा : मानेबाई या डीएसकेंच्या बोर्डावर आहेत (किंवा होत्या) त्यांच्या कडे गुंतवणूकदारांना दाद मागता येईल काय?
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/20/2017 - 23:24 नवीन
ब्राह्मण एक आहे, एकटा नाही असे काहीतरी लिहिलेय. लबाडपणा आहे सगळा! अरे बाबा, श्रीमंत तर तू एकटाच आहेस.
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Mon, 08/21/2017 - 06:22 नवीन
'घराला घरपण देणारी माणसं' ऐवजी 'लोकांना बेघर करणारी माणसं(?)' हे स्लोगन जास्त योग्य आहे ह्यांना
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 08/21/2017 - 10:49 नवीन
घराला सरपण लावणारी माणसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत
म
माहितगार Mon, 08/21/2017 - 06:28 नवीन
डिएसकेंच्या भांडवली अडचणींचे विश्लेषणाचा प्रयत्न या लेखात झालेला दिसतो आहे. (फारच वरवरचा आहे पण व्यवसायातील भांडवली अडचंणी बाबतचा उहापोह होतो) डिएसकेंचे http://dskdl.com वेबसाईट आत्ता थातूरमातुर कारण देऊन सध्याची माहिती वापरली जाऊ नये अशा अर्थाची सुचना देणारे डिस्क्लेमर दाखवत होते त्यामुळे त्यातील माहितीवर विसंबून विश्लेषण करणे कठीण होते. मी इतर बातम्या पाहिल्या वाचलेल्या नाहीत. तो ब्लॉग आणि ते भांडवली विश्लेषण पूर्ण मत मांडण्यास पुरेसे निश्चित नाही, पण डिएसकेंचा पाय खोलात असल्यासी शक्यता असल्याचे वाटते आहे. प्रथम दर्शनी वाटणारी शक्यता म्हणजे मागणी अभावी SEZ चा निर्णय चुकला तो वाचवण्यासाठी घर बांधणी प्रकल्प केला तर त्यालाही पुरेशी मागणी आली नसावी. एकदा भांडवल घेतले ते वाचवण्यासाठी अधिक भांडवल उभारण्याचा प्रयत्नात मागणी अभावी अतिरीक्त भांडवलाचे दडपणात व्यवसाय धोक्यात आला असण्याची शक्यता तयार होतात. मुलतः भांडवलाचे जोखीम व्यवस्थापन चुकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसाय संकटात असताना व्यक्तिगत खर्चांवर आळा घालावा हि त्या ब्लॉग लेखकाची अपेक्षा चुकीची दिसत नाही. पण एकुणच कोणत्याही व्यवसायात; व्यवसाय भरभराटीस असताना बढाईखोरीतून होणारी ओव्हरऑल उधळपट्टीची सवय अशावेळी अंगाशी आल्या शिवाय रहात नाहीत. आणि व्यक्तिगत सवयी बदलणे आणि सभोवती गोळा झालेले बढाईखोर उधळपट्टे यांचा प्रभाव कमी होणे प्रत्यक्षात बर्‍याचदा कठीण जात असावे. डिएसकेंच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अशी उधळपट्टी टाळण्याच्यादृष्टीने प्रशासकीय व्यवस्थापनाच्या बाबतीत क्रॉसचेक कितपत मजबूत होते याचा डिएसके व्यवस्थापनाने विचार करण्याची गरज असावी. आधीच मूळ व्यवसायातले प्रशासन मजबूत नसताना घरातील माणसांचे वेगळ्या व्यवसायात लक्ष घालणे भांडवल आणि वेळ यांच्या गैरव्यवस्थापनास जोड देऊ शकते का . भारतातील बहुतांश कंपन्यांचे व्यवस्थापन कंपनी सेक्रेटरी इंडीपेंडंट डायरेक्टर या रोल्सना पुरेसे महत्व देणे टाळत असावे. बर्‍याच प्रशासकीय गोष्टी त्यांचे क्रॉसचेकींग मधले महत्व लक्षात न घेता सरकारी नियमांची कागदोपत्री विल्हेवाट लावण्याने भविष्यात समस्या उद्भवू शकतात हे बर्‍याच जणांच्या लेखी नसते. भारतीय कंपन्यांचे फायनान्स आधिकारी आणि विशेषतः सिए सर्व स्टेक होल्डरचे इंटरेस्ट जपण्याची नैतीक जबाबदारी कितपत जबाबदारीने पार पाडत असतात या बद्दल फारसा उहापोह आपल्या देशात होताना दिसत नाही. इन एनी केस डिएसकेंनी त्यांची वेबसाईट स्टेक होल्डर्सना विश्वासात घेण्याच्या दृष्टीने वेबसाईट अधिक वेगाने अद्ययावत करावयास हवे होते ते झालेले दिसत नाही. स्टेक होल्डर्सना विश्वासात न घेण्याने संकटे वाढतात कमी होत नसतात. स्टेकहोल्डर्ससाठी प्रार्थनेपलिकडे त्रयस्थांना फारसे करता येत नाही प्रार्थना नक्कीच करू.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 08/21/2017 - 09:13 नवीन
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .
ह्याबद्दल वाचायला आवडेल.. कामत लफंगा, झोलर, बदमाश आहे असे माझे मत आहे. त्याला पुष्टी मिळेल असे वाचायला आवडेल. बाकी, डिएस्के बद्दल: कायद्याचा बडगा दाखवून हा प्रॉब्लेम सुटायला हवाय. कुठल्याही दबावाला तपासयंत्रणांनी बळी पडु नये. लोकांनी देखिल शहाणे व्हावे कायदा मोडणार्‍या ४२० माणसाला निव्वळ जातीच्या नावाखाली सपोर्ट करू नये.(अर्थात ब्राह्मण असे करणार नाहीत असेच वाटते.)
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Mon, 08/21/2017 - 09:39 नवीन
https://www.maayboli.com/node/47097 इडलीवाल्या कामतची करामत.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 10:09 नवीन
हे प्रकरण रंजक दिसते आहे. पी. एन. गाडगीळ या ज्वेलरीवाल्यां कडे पण अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम होती / आहे. उदा. ५००० रुपये महिन्याला भरले तर तेवढ्या रकमेचे सोने तुमच्या नावे जमा होईल. असे १२ महिन्यांनी जितक्या किमतीचे सोने जमा होईल त्या किमतीच्या ८ % व्याज सोन्याच्याच स्वरुपात अधिक जमा झालेले सोने अशी योजना. या सोन्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स ते सोन्याच्याच स्वरुपात कापून घेतात. यावर मी तुम्ही सोने देणार की पैसे असे विचारल्यास सोने असे उत्तर मिळाले. जर पैसे मिळाले तरच ते इन्कम असेल मग तुम्ही टॅक्स कसला कापता असे विचारल्या उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मग मी तो नादच सोडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 10:23 नवीन
जर पैसे मिळाले तरच ते इन्कम असेल
असं नसतं. कंपनीनं पगार म्हणून (हायब्रीड) जवारीचे पोते जरी घरी आणून टाकले, आणि मोदीने दर आठवड्याला नोटबंदी, नाणेबंदी करून नोटा, नाणी बघायला मोताज केलं तरी आयकर कटणारच. ======================= उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत (तिच्या नॉमिनल मूल्यात) झालेली वाढ. या पूर्ण "वाढिवर" उत्पन्नकर लागेल. आणि पूर्ण मूल्यावरच, काही विशीष्ट प्रकारच्या संपत्तींसाठी, संपत्तीकर लागेल. आणि विकायला काढली तर महागाई अ‍ॅडजस्ट करून (मंजे रियल व्हॅल्यूवर) काही विषीष्ट प्रकारच्या संपत्तींवर संपत्तीवृद्धीकर लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 12:36 नवीन
साहेब, सरकारी मान्यताप्राप्त चलनावर कर आकारणी होते. सोने हे मान्यताप्राप्त चलन नाही. एका कारखानदाराने १० खेळणी तयार केली तर ती विकून जो नफा मिळतो त्यावर कर लागतो. खेळण्यांवर नाही. हे मी आय कराबद्द्दल बोलत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 13:18 नवीन
अप्पाजी, तुम्ही, मी आणि टफींनी इतरांचा कधिही , काहिहि संबंध येऊ न देता, एक पॅरलल बार्टर इकॉनॉमी चालवली तरीही भारत सरकार आयकर घेईल हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 12:38 नवीन
उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत (तिच्या नॉमिनल मूल्यात) झालेली वाढ. या पूर्ण "वाढिवर" उत्पन्नकर लागेल. हे काहीच्या काहीच आहे. म्हणजे माझ्या घराची किंमत २४ लाख ते ३० लाख अशी झाली तर मला त्या ६ लाखावर कर लागणार नाही. जर मी ते घर विकले आणि ३० लाख रुपये मिळाले तरच कर लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/21/2017 - 13:23 नवीन
अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम होती / आहे. उदा. ५००० रुपये महिन्याला भरले तर तेवढ्या रकमेचे सोने तुमच्या नावे जमा होईल. असे १२ महिन्यांनी जितक्या किमतीचे सोने जमा होईल त्या किमतीच्या ८ % व्याज सोन्याच्याच स्वरुपात अधिक जमा झालेले सोने अशी योजना. या सोन्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स ते सोन्याच्याच स्वरुपात कापून घेतात. अस्वीकरण (disclaimer) : खालील मजकूर केवळ वरच्या स्किमसाठी नसून सर्वसाधारण माहितीसाठी आहे. वरची स्कीम नावाने भिशी असली तरी आयकराच्या दृष्टीने एक प्रकारे "८% व्याज देणारी रिकरिंग डिपॉझिट स्कीम" दिसते आहे. १. कोणत्याही गुंतवणूकीतून मिळणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष* (पेड/रिसिव्ह्ड अँड अक्र्युड(accrued)) या दोन्ही प्रकारचे उत्पन्न "दर वर्षीच्या आयकर विवरणात दाखवणे जरूर असते. त्यानंतर, प्रत्येक गुंतवणूकीच्या स्वरूपाप्रमाणे त्या त्या दर उत्पन्नावरील कर अथवा करमाफी मोजली जाते. २. वरच्या मजकूरात या स्कीमचे पूर्ण कायदेशीर तपशील नाहीत. पण, ते कापून घेतलेले पैसे "इन्कम टॅक्स" नसून "टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (टीडीएस)" असू शकतो. =========================== * : अप्रत्यक्ष* (अक्र्युव्ह्ड) उत्पन्न म्हणजे आर्थिक वर्षात मिळालेले; पण प्रत्यक्ष हातात न मिळालेले किंवा बँकेच्या खात्यात जमा न झालेले उत्पन्न. हे उत्पन्न, देणगीदाराच्या हिशेबांत, तुमच्या नावाच्या अकाउंटमध्ये जमा होत असते. उदा: बँकेतील क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट : यावर मिळणारे उत्पन्न बँक तुमच्या हाती / तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये जमा न करता एफडीच्या मुद्दलात मिळवते. पण, तरीही, ते तुमचे त्या वर्षाचे उत्पन्नच असते. त्याचमुळे, बँक त्यावरचा टीडीएस कापू शकते/कापते व ते उत्पन्न तुम्हाला वार्षिक करविवरणात दाखवणे जरूरीचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अनुप ढेरे Mon, 08/21/2017 - 13:36 नवीन
टीडीएस कापला असेल तर तो आपल्या पॅनच्या अगेन्स्ट २६ एएस का कुठ्ल्या फॉर्ममध्ये दिसायला हवा बहुधा. तिथे दिसत असेल तर गंडवा गंडवी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/21/2017 - 14:07 नवीन
+१ १. कापलेला टिडीएस सरकारी भरणा झाला की तो करसंकलनविभागाच्या "TRACES (https://www.tdscpc.gov.in)" या संस्थळावर करदात्याच्या खात्यावर दिसू लागतो. अ) या संस्थळावरून करदाता त्याचा "Form 26AS" डाऊनलोड करू शकतो. आ) बर्‍याच बँकाच्या संस्थळांवर खातेदाराला "Form 26AS" डाऊनलोड करायचा पर्याय आहे. इ) करभरणा संस्थळावर (incometaxindiaefiling.gov.in) "Form 26AS" डाऊनलोड करायचा पर्याय आहे. २. यापैकी कोठूनही मिळवलेल्या "Form 26AS"वर "करदात्याच्या त्या वर्षीच्या सर्व टीडीएस"ची नोंद असते. कारण वरचे सर्व दुवे TRACES कडेच जातात ! २. करविवरणात केवळ Form 26AS मध्ये नोंद झालेल्या टीडीएस चा क्लेम ग्राह्य धरला जातो... नोंद नसलेला क्लेम अग्राह्य घरला जातो. त्यामुळे, कोणताही कापलेला टीडीएस जर योग्य मुदतीत (शेवटची वार्षिक मुदत बहुतेक अकाऊंटींग वर्षाचा १५ जून आहे) Form 26AS मध्ये दिसला नाही तर करविभागाकडे तक्रार करता येते. (आठवा : मल्ल्याफेम किंगफिशरने कर्मचार्‍यांचा कापलेला पण सरकारी जमा न केलेला टीडीएस !) ३. स्वानुभव असा आहे की Form 26AS मधली एखादी एंट्री करविवरणात राहिली तर करविभाग ती रक्कम स्वतः मिळवून मग करमोजणी करतो. हा करविभागाने दिलेला स्वागतार्ह धक्का होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 13:24 नवीन
हे काहीच्या काहीच आहे.
पुढची वाक्यरचना कळली नाही. कृपया रिवर्ड करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/22/2017 - 07:11 नवीन
माझी माहिती अपूर्ण होती. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/21/2017 - 13:42 नवीन
म्हणजे माझ्या घराची किंमत २४ लाख ते ३० लाख अशी झाली तर मला त्या ६ लाखावर कर लागणार नाही. जर मी ते घर विकले आणि ३० लाख रुपये मिळाले तरच कर लागेल. हे उदाहरण इथे अस्थायी आहे. कारण घर आणि वरची स्कीम यांच्या तुलना होऊ शकत नाही. १. बाजारभावाप्रमाणे घराची किंमत कमी-जास्त झाल्याचे दिसत असले तरी घराच्या किंमतीतला फरक मालकाला फायदा अथवा तोट्याच्या रुपात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मिळत नाही. मात्र, जेव्हा ते घर विकले जाईल तेव्हा तो फरक मालकाला मिळेल आणि प्रचलित कायद्यांप्रमाणे करपात्र होईल. २. हेच लॉजिक वापरून, तुमच्या मालकीच्या पण गुंतवणूकीत नसलेल्या (घरात ठेवलेले सोने, दागीने, इ) सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे कितीही वाढली तरी; त्याच्या "खरेदीची किंमत आणि आजचा बाजारभाव" यातील फरक आयकरविवरणाच्या कक्षेत येत नाही. मात्र, ते सोने विकून / गुंतवून मिळालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उत्पन्न आयकरविवरणाच्या कक्षेत येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/22/2017 - 07:10 नवीन
मात्र, ते सोने विकून / गुंतवून मिळालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उत्पन्न आयकरविवरणाच्या कक्षेत येते. या आणि आधीच्या प्रतिसादां करता धन्यवाद. बरीच नविन माहिती मिळाली. सोने किंवा इतर असेट यांचे ट्राऩ्अ‍ॅक्शन होते तेंव्हा ते उत्पन्नात (अप्रत्यक्ष) धरले जातात हे माहिती नव्हते. धन्यवाद. अरुण जोशी सर याचबद्दल म्हणत असावेत. हेच लॉजिक पुढे वाढवून जर मी एखादा अ‍ॅसेट नुकसानीत विकला किंवा नुकसानीत त्याचे ट्रान्जॅक्शन केले तर ते उत्पन्न हे ऋण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर वजावट मिळते का ? मिळत असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/23/2017 - 18:00 नवीन
हेच लॉजिक पुढे वाढवून जर मी एखादा अ‍ॅसेट नुकसानीत विकला किंवा नुकसानीत त्याचे ट्रान्जॅक्शन केले तर ते उत्पन्न हे ऋण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर वजावट मिळते का ? मिळत असावी असे वाटते. हा जरा जास्त तांत्रिक मुद्दा झाला. त्यामुळे, अशा ट्रँझॅक्शनबद्दल अधिकृत सल्लागाराचे मत घेणे योग्य होईल. पण सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असे म्हणता येईल : १) कंपन्या आपल्या नोंदणीकृत उद्योगधंद्यात असे करू शकतात. घर (किंवा इतर वस्तू) खरेदी करणे-विकणे हा व्यवसाय नसलेल्या व्यक्ती/कंपनीला असे करता येणार नाही. उदाहरणार्थ, व्यक्तीगतरित्या विकत घेतलेला टीव्ही शेजार्‍याला/मित्राला कमी किमतीत विकला म्हणून तो तोटा तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा करता येणार नाही. २) मात्र, व्यक्तीगतरित्या खरेदी-विक्री केल्या जाणार्‍या काही गोष्टी फायदा-तोटा ऑफसेट करण्यासाठी पात्र असतात. उदाहरणार्थः म्युचुअल फंड : अ) "शॉर्ट-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)"; हा "शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)" आणि "लाँग टर्म कॅपिटल गेन (डेट म्युचुअल फंड)"; यांच्याबरोबर सेट ऑफ करता येतो. आ) "लाँग-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)" : केवळ "लाँग-टर्म कॅपिटल गेन (डेट म्युचुअल फंड)" बरोबरच सेट ऑफ करता येतो. इ) "लाँग-टर्म कॅपिटल गेन (एक्विटी म्युचुअल फंड)" मुळातूनच करमुक्त असल्याने "लाँग-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी म्युचुअल फंड)" कुठल्याही प्रकारे सेट ऑफ करता येत नाही. इक्विटी (शेअर्स) : अ) "शॉर्ट-टर्म कॅपिटल लॉस", "शॉर्ट/लाँग-टर्म कॅपिटल गेन" बरोबर सेट ऑफ करता येतो व बाकी पुढील आठ वर्षे कॅरी फॉरवर्ड करून तशीच सेट ऑफ करता येते. करांचे हे व इतर बारकावे बहुतेक लोकांना जरासे किचकट वाटतात. याशिवाय, या करांचे नियम दर बजेटबरोबर (किंवा मध्यभागीही) बदलू शकतात. त्यामुळे, खात्री नसल्यास आयकरतज्ञांचा सल्ला घेणेच योग्य असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पगला गजोधर Mon, 08/21/2017 - 10:10 नवीन
कृपया जातीचे उल्लेख टाळा, अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक हेराफेरी करणारे/ गुन्हेगार यांना जात धर्म नसतो. सदर बिल्डर ने सर्वजातीय लोकांना फसलेले आहे, जात बघून नाही.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/21/2017 - 10:21 नवीन
रॉजर दॅट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा