Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Sun, 08/20/2017 - 13:10  ·  लेख
लेख
डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे. डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे. हे नक्कि काय प्रकरण आहे? गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी? प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का? एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच . तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
26798 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

म
मोदक Mon, 08/21/2017 - 10:21 नवीन
जात नाही समजू शकतो.. धर्म पण नसतो का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/21/2017 - 10:23 नवीन
जात धर्म सगळं अफूच्या गोळ्या आहेत. (माझं वैयक्तिक मत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 10:25 नवीन
अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक हेराफेरी करणारे/ गुन्हेगार यांना जात धर्म नसतो.
प्रचंड टाळ्या. ===================== लोक नमकं उलटं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 10:25 नवीन
अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक हेराफेरी करणारे/ गुन्हेगार यांना जात धर्म नसतो.
प्रचंड टाळ्या. ===================== लोक नमकं उलटं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/21/2017 - 10:29 नवीन
वरील कॅटॅगरीतील लोकं , जात धर्म याचा खुबीने वापर करून, आपली उद्दिष्ठे साध्य करतात. म्हणून सामान्य लोकांना वाटते की त्यांचे (गुन्हा करणाऱ्यांचे) मोटिव्हेशन जात धर्म हे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 10:12 नवीन
म्हणून मी जातीव्यवस्थेचं समर्थन करतो. १. कंपन्या चालवायला प्रचंड दर्जाची बुद्धिमत्ता लागते. जेवढ्या कंपन्या आहेत तेवढे बुद्धीमान लोक (एकीला एकच म्हटला तरी) समाजात नसतात. २. कंपन्या नितिमत्तेने चालवाव्यात हे देखिल अभिप्रेत आहे. इतके सगळे उच्चकोटीची नितिमत्ता असणारे लोक आणणार कुठून? ===================================== मूळात कंपनीप्रणित समाजव्यवस्था हाच एक बेकार प्रकार आहे. वर भर म्हणून "कायदेशीर रित्या" अनैतिक वागणं मान्य आहे. म्हणजे कंपनीने खून केला तर कंपनीच्या मालकांना सजा होत नाही. सजा काय खटलाही होत नाही त्यांच्यावर. खटलाही जौ द्या, त्यांनी त्या घटनेचं संज्ञान नाही घेतलं तरी चालतं.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 08/21/2017 - 10:28 नवीन
१. कंपन्या चालवायला प्रचंड दर्जाची बुद्धिमत्ता लागते. जेवढ्या कंपन्या आहेत तेवढे बुद्धीमान लोक (एकीला एकच म्हटला तरी) समाजात नसतात. २. कंपन्या नितिमत्तेने चालवाव्यात हे देखिल अभिप्रेत आहे. इतके सगळे उच्चकोटीची नितिमत्ता असणारे लोक आणणार कुठून?
हे दोन्हीही प्रश्न जातीव्यवस्थेने कसे सुटणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 11:45 नवीन
धक धक गर्ल माधुरी दिक्षीत ही म्हणे एकेकाळी डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर होती. किमान या कंपनीच्या १९९७ -९८ च्या अहवालात तसा उल्लेख आहे. शासकीय कागदपत्रांध्ये मात्र माधुरी डायरेक्टर असल्याचा उल्लेख आढळून येत नाही . कदाचित गुंतवणुकरांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ती पुडी सोडली असावी.
कुंभार साहेब, अजून अभ्यास करून नक्की काय ते सांगा.
या आवाहनात त्यांनी मराठीपेक्षा आपल्या ब्राम्हण असण्यावर जास्त भर दिलेला दिसतो.
अगदी तो कंपनीचा अधिकृत संदेसा मानला तरी असं काही मला दिसत नाही.
आपली जेवढी देणी आहेत त्याच्या दहापट जास्त आपली संपत्ती आहे असे ठणकावून सांगणा-या डीएसकेंवर लोकवर्गणी मागण्याची वेळ का आली असावी?
हे विधान ज्यांना फायनान्स कळतं त्यांच्याकरिता एक जोक आहे. इतरांकरिता - हे विधान ठणकावणारांवर हीच पाळी येते.
या कंपन्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी नव्हती. तरीही त्या स्विकारल्या आणि बुडवल्याही !
ज्या डिबेंचर इश्श्यूंना एस बी आय कॅप्स लीड मॅनेजर असेल त्यांबद्दल असं म्हणत असाल तर देशाचं बाँड मार्केटच घरी पाठवलं पाहिजे.
अशी परवानगी मिळालेली असतानाही या जमिनी डीएसकेडीएलने थेट शेतक-यांकडून खरेदी केल्या नाहीत.
कोणतीही कंपनी स्वतः मोठी लँडबँक खरिदत नाही.
एकट्या ड्रीम सीटी प्रकल्पात एवढी रक्कम पळवली
अजिबात चिंता नको. रिलेटेड पार्टी ट्रँझॅक्शनची चौकशी होइल आणि जेलमधे जातील.
नंतर एसईझेड प्रकल्पाऐवजी टाउनशिप करण्यात आली. परंतू स्टॅम्प ड्युटीचे काय ?
२००६ मधे एस इ झेडची स्टँप ड्यूटी एक्झेंप्शन संपले होते. नेमके तेव्हाच यानी जमिन खरेदी केली आहे का? असेल तर ड्यूटी भरून केली असणार.
एकट्या ड्रीम सीटी प्रकल्पात एवढी रक्कम पळवली असेल तर इतर सर्व प्रकल्प लक्षात घेता किती रक्कम अशा रितीने पळवली असेल याचा विचार करा.
यासाठी कुलकर्णींची कंपनीतली मालकि वाढत आहे का (आणि किति फास्ट) हे बघायला पाहिजे.
इतकेच नव्हे तर त्यांनी एकाच वेळी दोन्ही नांवांनी शेअर्स खरेदी केल्याचेही दिसते
प्रचंड धांदली. असं इतकं उघड? दुसरी होल्डिंग ५% पेक्सा कमी असल्याने हे "मॅनेज" झालं असावं. पॅन नंबर इ इ डूप्लिकेट काढले कि काय?
डीएसकेंच्या दुस-या पत्नी ज्योती २०१२ मध्ये कालवश झाल्यांनंतर हेमंती कुलकर्णींचा मुलगा ज्योतींचा मुलगा म्हणून अधिकृतरित्या दाखवण्यात आले.
यात काय घोळ घालायचे काय लॉजिक असू शकते? सावत्र आई, जिवंत वा मृत, आईच ना?
आता सुमारे आठ हजार ठेविदार हवालदिल झाले आहेत.त्यांना मागील अनेक महिने मुद्दल सोडा साधे व्याजदेखील मिळालेले नाही.
व्याजच द्यायचं असतं, लोन मॅच्यूअर झालं तर मुद्द्ल द्यायचं असतं. कि इ एम आय टाईप प्रकार होता डीबेंचर मधे?
आश्चर्य म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये या ठेवी आहेत . त्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी रिझर्व बँकेने कधी दिलीच नव्हती.
मंजे नाकारली होति?
डीसके हे एखाद्या नटसम्राटालाही लाजवतील असे अभिनेते आहे, त्यांचं वक्तृत्व कौशल्य उत्तम आहेत आणि ते उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत.
व्यवसायासाठी हे आवश्यक कौशल्य आहे.
मात्र त्या कार्यक्रमांमूळे आकर्षित झालेल्या गुंतवणुकदारांना बेमालूमपणाने आपल्या कुंटुंबियांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडले.
बिझनेस ग्रुपच्चं रेप्यूटेशन वापरणं कायदेशीर आहे.
डीसकेंनी आता पर्यंत किती मराठी माणसांना मदत केली ?
त्यांनी केली असती तरी, अशी भीक मागणं म्हणजे कॉर्पोरेट हद्द्च आहे.
आता प्रश्न असाही आहे की जागेवर दहा टक्के कामही झालेले नसताना वित्तिय संस्थांनी एकूण कर्जाच्या ८०% रक्कम डी.एस. कुलकर्णी अँड कंपनीला वितरीत तरी कशी केली?
बँकांना फसवल्याशिवाय हे अशक्य आहे. १० आणि ८० अतिच फरक आहे.
या तरुणांची अवस्था घर ताब्यात नाही, आताच्या घराचे भाडे भरावे लागत आहे, बँका वसूलीसाठी मागे लागल्या आहेत आणि हप्ते थकल्याने सिबिल रेटींगही खराब झाले आहे.
त्यांना हे सगळं उलटं पाहिजे होतं, त्याची रिस्क भोवली.
डीएसकेंनी आता मराठी माणसाला आवाहन केले असले तरी त्यांच्या अलिशान रहाणीमानात मात्र तसूभरही फरक पडलेला नाही.
व्यक्तिगत संपत्तीवरचा अधिकार मान्य केला तरी मदतीचे आवाहान आणि अलिशान राहणि ये कुछ हजम नही होता.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 08/21/2017 - 11:52 नवीन
हा लेख (कुंभारांचा बरं) फार तर फार अत्यंत कळकळीच्या भावनेने (त्या गुंतवणूकदारांबद्दल, आणि ग्राहकांबद्दल) प्रामाणिकपणे लिहिलेला आहे. पण कागदपत्रांचा अभ्यास, संदर्भ, वापरलेली तत्त्वे इ इ च्या आधारांवर अत्यंत अत्यंत सुमार दर्जाचा आहे. किमान इथे मांडला नाही काही अभ्यास.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/21/2017 - 12:05 नवीन
पुणे भांडवली बाजारात संचालक असणार्‍या एकाने मला २००६ मध्येच सांगितले होते की डीएसके ची कंपनी विश्वासार्ह नाही. त्यामुळे त्या कंपनीत ठेवी ठेवू नका. मी कोणत्याच कंपनीत मुदतठेवी ठेवत नसल्याने मला या माहितीमुळे काहीच फरक पडला नाही. परंतु माझा एक सहकारी (त्याचे नाव सुद्धा कुलकर्णी आहे) नियमितपणे डीसके कंपनीत मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करीत होता. मी त्याला भांडवली बाजारातील संचालकाने दिलेल्या माहितीबद्दल सांगूनसुद्धा त्याचा डीएसकेवरील विश्वास कमी झाला नाही. आता हे प्रकरण बाहेर आल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्याचा संदेश आला. "डीएसके वर विश्वास ठेवून मी चूक केली" असे त्याने लिहिले होते. बहुतेक त्याचे बरेच पैसे डीएसकेमध्ये अडकले आहेत. डीएसकेने संचालक मंडळावर माधुरी दिक्षीतला केवळ प्रसिद्धीसाठी घेतले होते. अनेक कंपन्या सेलेब्रिटीजना किंवा प्रभावी राजकीय व्यक्तिंना आपल्या संचालक मंडळावर नेमतात. सहाराच्या सुब्रतो रॉयने अमरसिंग, कपिलदेव, अमिताभ बच्चन इ. संचालक मंडळावर घेतले होते. इन्फोसिसने अमेरिकेतील प्रभावी राजकीय व्यक्ती लॅरी प्रेस्लरला संचालक मंडळावर घेतले आहे (१९९० च्या दशकात गाजलेल्या प्रेस्लर अ‍ॅमेंडमेंट मधील प्रेस्लर तो हाच. या अ‍ॅमेंडमेंटमुळे क्लिंटनच्या काळात पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध आणले गेले होते.). पुण्यात बिबवेवाडी भागातील महेश सोसायटीतील बरेचसे भूगाग सेंटॉर लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या बिल्डरने विकसनासाठी घेतल्यावर भूमीपूजन नुकताच खासदार झालेल्या अमिताभ बच्चनच्या हस्ते केले होते. बहुतेक सुरवातीला अमिताभ या कंपनीच्या संचालक मंडळावर होता.
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Mon, 08/21/2017 - 13:39 नवीन
फार पूर्वी जेव्हा सिमेंट चा शोध लागला नव्हता तेव्हा बांधकामात चुना वापरायचे असं म्हणतात. DSK नीं ठेवीधारकांना 'चुना लावण्याऐवजी' बांधकामात वापरला असता तर निदान construction cost तरी कमी झाली असती.
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Mon, 08/21/2017 - 13:50 नवीन
या लिंक वर ही बरीच डिटेल माहिती आहे : http://mr.beingmarathi.in/maharashtra/dsk-बिल्डरची-वाट-कशी-लागली-ते/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/21/2017 - 17:18 नवीन
डी एस के प्रकरणात जात आणण्याचे काहीच कारण दिसत नाही. मूळ डी एस कुलकर्णीनी ब्राम्हण म्हणून आपल्या जातीकडून काही आर्थिक अपेक्षा ठेवणे चूक आहे. उद्या एखादा मराठा( किंवा कोणत्याही जातीचा बिल्डर) तुम्हाला जातीचा हवाला देऊन गंडवणार असेल तर ती तुमची चूक आहे. सर्रास सगळेच राजकारणी जाती/ धर्माच्या नावावर तरुणांना फसवत आहेत त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. आणि ज्या ठेवीदारांनी शहानिशा न करता त्यांच्या कडे ठेवी ठेवल्या आहेत( त्यांच्या भूलथापांना बळी पडून) ती त्यांची चूक आहे किंवा हि त्यांच्या लोभापायी( अतिरिक्त व्याजाचे आमिष) द्यावी लागणारी किंमत आहे. डी एस के स्वतः उत्तम नटसम्राट असतील हि पण त्यांच्या साखरेत घोळवलेल्या बोलण्याला फशी पडणे हि ठेवीदारांची चूक आहे( त्यांच्या घामाचे पैसे बुडाले याबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून) असेच म्हणावे लागेल. व्यक्तिशः एखादा माणूस माझ्या जातीचा आहे म्हणून मी (त्याच्या बद्दल माहिती नसताना) त्याच्याशी आंधळेपणाने व्यवहार करणार असें तर ते चूक आहे. डी एस के यांनी जर फसवा फसवी केली असेल तर आपल्या जातीचे म्हणून कोणाही ब्राम्हणाने ( किंवा कोणत्याही जातीच्या माणसाने) मदत करू नये. एखादा माणूस खरंच आर्थिक अडचणीत असेल आणि प्रामाणिकपणे सर्व गोष्टी उघड करुन दाखवत असेल तर त्याला मदत करणे वेगळी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/22/2017 - 07:23 नवीन
एखादा माणूस खरंच आर्थिक अडचणीत असेल आणि प्रामाणिकपणे सर्व गोष्टी उघड करुन दाखवत असेल तर त्याला मदत करणे वेगळी गोष्ट आहे. डीएसके खरोखर प्रामाणिक असेल (तसे वाटत तरी नाही) तरीसुद्धा त्याने भाषेच्या किंवा जातीच्या आधारावर मदत मागणे आक्षेपार्हच आहे. पण खरोखरच जातीच्या नावावर मदत मागितली गेली आहे का हा मुद्दा आहे. विजय कुंभार यांनी एका साध्या कागदाचा स्क्रीनशॉट टाकला आहे. ते डीएसकेचे लेटर हेड सुद्धा नाही. मग त्याने जातीच्या आधारावर मदत मागितली हे कुंभार कशाच्या आधारावर म्हणत आहेत ? शिवाय कोणत्यातरी फडणीस नावाच्या माणसाच्या जातीचा अकारण उल्लेख आणि तो तुरुंगात आहे हे लिहिणे या प्रकरणाचा डीएसके च्या आर्थिक गडबडीशी काय संबंध आहे तेसुद्धा कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वाल्मिकी Wed, 08/23/2017 - 09:21 नवीन
डी स के सध्या कंपनी चालू आहे कि बंद पडलीये ?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 08/23/2017 - 10:59 नवीन
माझ्या माहितीतील एक महिला आजही त्या कंपनीत नोकरीला आहे. त्याअर्थी कंपनी चालू असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिकी
व
वाल्मिकी Wed, 08/23/2017 - 12:49 नवीन
धन्यवाद आमचे नातेवाईक अकाऊंटिंग मध्ये आहेत तिकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पगला गजोधर Wed, 08/23/2017 - 15:59 नवीन
तुमचे जे कोणी नातेवाईक अकाऊंटिंगमध्ये आहेत न सध्या तिकडे, त्यांच्याकडूनच तुम्हाला कळलं असतं ना ? D S K चालू आहे का बंद .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिकी
व
वाल्मिकी Wed, 08/23/2017 - 20:38 नवीन
अहो ते नातेवाईक आहेत नुसता विचारायला गेले तरी.... असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान Wed, 08/23/2017 - 18:31 नवीन
वाल्मिकी, त्यांचं संकेतस्थळ तरी चालू आहे. मात्र संकेतस्थळावरून आस्थापनाने ग्राहकांशी व्यवहार करणे थांबवले आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिकी
व
वाल्मिकी Wed, 08/23/2017 - 20:44 नवीन
DISCLAIMER Thank you for visiting our website. We are currently updating our website towards compliance of the newly introduced housing law for the State of Maharashtra i.e. the Real Estate (Regulation and Development) Act, 2016 and the rules and regulations notified there under. In the interim, no information, images or material which is currently available / displayed on the website shall be deemed to constitute any advertisement, invitation, solicitation, offer or sale of any of our product offerings and we shall not accept any such bookings based on reliance of such currently available information, images and material on the website and further shall not be responsible for any consequences of any action taken by any person or authority relying on material/information or otherwise. We shall be back shortly with an updated website. Thank you for your patience. 6899 I Agree to Visit
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
वाल्मिकी Wed, 08/23/2017 - 20:46 नवीन
Workers have not paid for the last three months and now, with the service centre closed, any hope of retrieving their arrears is gone. http://punemirror.indiatimes.com/pune/civic/dsk-service-centre-downs-shutters-car-owners-in-dilemma/articleshow/59813666.cms
  • Log in or register to post comments
व
वाल्मिकी Mon, 11/06/2017 - 09:35 नवीन
चालू आहे कि बंद मग ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 12/26/2017 - 13:49 नवीन
डीएसके कोसळा-कोसळी संदर्भात रवि करंदीकर यांनी केदार वांजपे (माजी संचालक, डीएसके गृप) यांच्याशी केलेली चर्चा! मुलाखत २८ मिनिटांची आहे, त्यातले शेवटीची ७ मिनिटे तर जरूर बघा. केदार वांजपे हिच मुलाखत कायप्पावर देखील फिरत आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 12/27/2017 - 03:09 नवीन
ही संपुर्ण मुलाखत बघितल्यावर माझी निरीक्षणे अशी १- मुलाखत घेणारे करंदीकर हे इन्टरेस्टेड पार्टी आहेत व डिएसके विरोधात आहे काय कसा ते माहीत नाही. २- वांजपे चा आत्मविश्वास साहीत्यीक शैली उदाहरणे बघुन ते डीएसकेंचे जावई शोभतात. सासरे से जावई सवाई असे म्हणावेसे वाटते. ३- वांजपे च्या मुलाखतीतली गर्भित धमकी मी ब्लॅक बॉक्स आहे व ती धमकी देण्याची शैली मनोहर आहे तसेच एके ठीकाणी ते म्हणतात मी सरकार दरबारात त्यांच्या मुला व इतरांच्या ओळखी करुन दिल्या ( चार्ज देतांना ) त्यावरुन म्हणजे या दोन गोष्टींवरुन वांजपे हे तात्वीक साहीत्यीक या द्वैताला भेदुन अधिक खोलवरही काहीतरी आहेत. ४-करंदीकराचे हसणे अनुमोदन एकंदर मुलाखत घेण्याची शैली फारच डोक्यात जाते. करंदीकर हे हनुमान आहेत व रामाचा इंटरव्यु घेताय असे ही काही क्षण वाटुन गेले.किंवा कोणी जोकर कोणा फिलॉसॉफर चा इंटरव्ह्यु घेतोय असेही वाटले. ५-वांजपे चा शर्ट व त्यावरील डिझाइन यावर मी फिदा झालो. ६-वांजपे हे व्यासंगी व्यावसायिक आहेत. मारवाडी व्यावसायिक इतका वेळ घालवत नाहीत ही किमया केवळ मराठी व्यावसायिकच करु शकतो म्हणजे पर्सनल ट्रॅजॅडी मागील एकुण कारणे व त्यांची सखोल मांडणी करणे त्या व्यवसायावरही एकुण मार्मिक भाष्य करणे, उदाहरणे , उपमा वा वा हे सिंधी व्यावसायिक करुच शकत नाही.' ७- एकुण भलेही आकड्यात वाढला नाही तरी पण मराठी माणुस धंद्यात पडला तरी आपल्या सारख्या मराठी बांधवांची चर्चा विश्लेषणाची सोय करुन जांतो ८- टंकाळा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/31/2017 - 05:50 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video
  • Log in or register to post comments
ए
एमी Sat, 01/06/2018 - 04:04 नवीन
*DSK Flat Buyers, Approach MahaRERA to get compensation for delayed possession.......Good news for those who booked flats under "Aadhi Ghar Paise Nantar" Offer: - DSK is legally responsible to pay Pre-EMI till possession! - Bank can not harass you!!* By blogging MahaRERA's order about compensation for delayed possession of flat in DSK Mayurban at Pirangut, Vijay Kumbhar has given good news to all flat buyers in all DSK Group's stalled projects - DSK Dream City, DSK Anandghan, DSK Nabhangan, DSK Sadaphuli, DSK Mayurban, DSK Nandanvan, DSK Pushpaban, DSK Chaitraban, DSK Gold Leaf, DSK Vedant, DSK Madhukosh etc. 1) Now, every month - everyone of you can get interest - at the rate of 10.05% - on your own contribution - from the date of possession mentioned in the agreement - till the actual possession of flat. Yes! From the date of possession mentioned in the agreement!! MahaRERA has refused to consider the 6 months grace period for possession mentioned in the agreement. 2) This MahaRERA order gives a big relief to those who have booked flats under "Aadhi Ghar Paise Nantar" & "DSK Master Plan". Now, banks can not harass you for Pre-EMI. By referring to this order you can tell your bank to go and collect Pre-EMI from DSK. Till you get the flat possession - it is DSK's legal responsibility to pay the Pre-EMI. DSK can not avoid it. Banks can not force you to pay. 3) Don't worry about expenses to file the complaint! As per this order - DSK will pay you Rs. 20,000 as the cost of complaint!! 4) Don't worry about that clause about 'Arbitrator' - according to the order - RERA Act overrides it. It means that - DSK can not stop you from getting justice. All crooked tactics of DSK have completely failed with MahaRERA. So, don't waste time. Visit MahaRERA website today. File complaint. Get compensation for delayed possession. If you need any help, call Vijay Kumbhar on 91 99232 99199 to fix an appointment. Pay him Rs. 1,000 per flat and file foolproof complaint with MahaRERA! *Please, share this message & help to reach thousands of flat buyers who have become victims of DSK & other builders in Pune - Ravi Karandeekar, 919860044110*
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Mon, 02/19/2018 - 14:37 नवीन
डीएसकेंच्या अधोगतीस नोटाबंदीच कारणीभूत : शिवसेना https://www.majhapaper.com/2018/02/19/shiv-sena-samna-statement-on-dsk-controversy/
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 02/22/2018 - 16:26 नवीन
शिवसेना अत्यंत थिल्लर लोकांचा सुमार पक्ष आहे हे पुनःपुन्हा अधोरेखित होत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 02/22/2018 - 17:18 नवीन
मी शिव सेनेचा समर्थक नाहीये पण ह्यात थिल्लर पणा काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा