Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?

अ
अनन्त्_यात्री यांनी
Mon, 08/28/2017 - 08:19  ·  लेख
लेख
[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही :) ] कायप्पा व मि.पा. वरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्‍याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते. शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, ट॑कनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभ॑ग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-स॑वेदनशील बनत जातो. सध्याच्या सोशल मिडियावरच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्‍या शब्दा॑ची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे: मि, हि, तु, हीला, तूला, खुप, दुध, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, दूध, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे च्या ऐवजी) भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सा॑गू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.

प्रतिक्रिया द्या
25142 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/28/2017 - 09:40 नवीन
आजकाल, कोशिश, चालला गेला (चला गया वरुन चालला गेला असावे बहुधा), जेवणाचे ताट लावले, लाश, दुष्मन, चाय, चाय पिली का, आलूची भाजी, औकात,वापस, वापसी, इमारतीची शिडी (पायर्‍या ). अजून बरेच आहेत. राष्ट्रभाषा या नावाखाली हिंदीचे थैमान आहे नुसते.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 08/28/2017 - 10:15 नवीन
मराठी शिकावे का ? हा प्रश्न आ वासून राहिला असताना सुद्दलेखन शिकावे का हा मुद्धा लक्ष देण्याजोबा नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 08/28/2017 - 11:11 नवीन
मताशी असहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
र
रानरेडा Mon, 08/28/2017 - 17:07 नवीन
मराठी तून शुध्ध लिहिण्याने काहीही फायदा होत नाही , खरेतर मराठी तून शिकल्याने पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
न
नाखु Sat, 07/07/2018 - 08:03 नवीन
नोकरी करावी लागते,न शिकले तर थेट राज्य करता येते. अशा गुंठा गर्दी महानगरपालिका परिसरात वास्तव्यास असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
अ
अत्रे Mon, 08/28/2017 - 11:11 नवीन
लेख वाचून पडलेला प्रश्न - मराठीतल्या लहान इ आणि मोठा ई - यातला फरक नष्ट केला तर काय होईल? उदाहरणार्थ उद्या लोक मी-मि/ होईल-होइल आलटून पालटून लिहायला लागले तर भाषेचे कोणते नुकसान होईल? शेवटी शब्द हे रॅन्डमलीच तयार झालेले असतात - मग असे रँडम बदल त्यात घडले तर वाचकाचा रसभंग सोडून इतर काय नुकसान होईल? (शब्दाचे इन्फॉर्मेशन कन्टेन्ट तेवढेच राहील, मग बदलले काय?)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 08/28/2017 - 11:28 नवीन
ह्रस्व /दीर्घ यांचा ससेमिरा कायमचा सुटावा म्हणून प्रत्येकाने मराठी लिहिताना यदृच्छया इंग्लिश शब्दांचा वापर केला तरी काय फरक पडेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Mon, 08/28/2017 - 11:58 नवीन
इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिणार का रोमन लिपीत त्यावर ते अवलंबून आहे. जर देवनागरीतच लिहिणार असू तर तोच प्रश्न पुन्हा उभा राहतो - ह्रस्व/दीर्घ यातला फरक नष्ट झाला तर नेमके काय नुकसान होणार ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
अ
अनन्त्_यात्री Mon, 08/28/2017 - 12:07 नवीन
ह्रस्व /दीर्घ यांचा ससेमिरा कायमचा सुटावा म्हणून जर लिहायचे तर इंग्रजी शब्द रोमन लिपीतच लिहावे लागणार हे स्वय॑स्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
सूड Mon, 08/28/2017 - 15:08 नवीन
ह्रस्व /दीर्घ यांचा ससेमिरा कायमचा सुटावा म्हणून
इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग चुकलेलं चालेल का कुठेही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/28/2017 - 12:19 नवीन
मग असे रँडम बदल त्यात घडले तर वाचकाचा रसभंग सोडून इतर काय नुकसान होईल? तुम्ही प्रत्येक गोष्ट फायदा तोटा, नफा नुकसान या परिभाषेतच मोजता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Mon, 08/28/2017 - 13:16 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 08:20 नवीन
ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणतात त्यांना! तुम्हाला अत्रे ऐवजी आत्रे अशी हाक मारलेली चालेल का? ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर हे उच्चारांप्रमाणे लिहिले जातात. म्हणून दिघे हे नाव दीघे असं लिहिलं तर ते चुकीचं ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Tue, 08/29/2017 - 09:31 नवीन
अ आणि आ, हा फार मोठा फरक आहे आणि यात कोणाची गफलत होत नाही. इ आणि ई मधला फरक फारसा नाही असे वाटते.
ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर हे उच्चारांप्रमाणे लिहिले जातात.
उच्चार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात, म्हणून लिखित भाषा प्रत्येकाने आपापल्या उच्चारानुसार बदलावी असे तुमचे म्हणणे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 10:43 नवीन
हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणूनच प्रमाणभाषेप्रमाणे उच्चार आणि लेखन गरजेचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Tue, 08/29/2017 - 10:59 नवीन
म्हणूनच प्रमाणभाषेप्रमाणे उच्चार आणि लेखन गरजेचं आहे.
हा आग्रह फक्त सरकारी कागदपत्रे आणि टीव्हीवरच्या बातम्या यांसाठी आहे की * रोजचं बोलणं * कविता/गाणे वाचन/लेखन यासाठी सुद्धा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 15:31 नवीन
आणि इतरांनीही तसं केलेलं मला आवडतं. अवांतर: तसं (तसे), केलेलं (केलेले), आवडतं (आवडते) ही रूपं (रूपे) प्रमाणभाषेत योग्य मानतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
सौन्दर्य Sat, 09/02/2017 - 22:58 नवीन
मला वाटतं, आलेलो, गेलेलो, खाल्लेलं हे शब्द व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर नसावेत. त्यांचे बरोबर रूप आलो होतो, गेलो होतो, खाल्ल होतं असे असावे. शाळेत आमच्या वैशंपायन गुरुजींनी "आलेलो" म्हंटल्यावर कान उपटलेले आठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
अ
अनिंद्य Mon, 08/28/2017 - 12:26 नवीन
@ अनन्त्_यात्री, फारच दुखरा विषय आहे हो हा. अगदी मराठी माध्यमातून शिकलेली मंडळी स्वतःचे नाव लिहितांना सुद्धा ज्योति, प्रगति, आंगद असे लिहितात, फार वाईट वाटते. शाळेत मराठीच्या निबंधात मी 'आणी' असे दोनदा लिहिले त्याबद्दल शिक्षिकेने १०० दा 'आणि' लिहायला लावले होते. आजही लिहितांना / टंकतांना काही चुकले तर वाईट वाटते. इतरांना मात्र शुद्धलेखनाची चूक (चुक नाही :-) ) काढलेली अजिबात आवडत नाही - भावना पोहचण्याशी कारण असे समर्थन केले जाते. मुंबईतील एका प्रसिद्ध सुवर्ण-पेढीची प्रसिद्धी करण्यासाठी शहरभर लावलेल्या मोठाल्या होर्डिंग्सवर 'सचोटि आणि शूध्दता' वाचून फेफरे येउन पडायची गत झाली होती, पण स्वतः मराठी भाषक असलेल्या मालकांना त्याबद्दल सांगितले तर 'त्यात काय मोठेसे - लोकांना समजते बरोबर' असे उत्तर मिळाले. :-) आता कोणाला याबद्दल काही बोलत नाही, उगाच चिडतात लोकं. भाषा फक्त भावना पोहचवण्याचे माध्यमच असेल तर चित्रलिपी आणि मूकबधिर लोक वापरतात तशी संकेत भाषा वापरण्यात काय वाईट ?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 08/28/2017 - 12:37 नवीन
>>भाषा फक्त भावना पोहचवण्याचे माध्यमच असेल तर चित्रलिपी आणि मूकबधिर लोक वापरतात तशी संकेत भाषा वापरण्यात काय वाईट ?>> हे मात्र पटल॑. माझे एक निरीक्षण असे आहे की मराठी शुद्धलेखनाबद्दल बेफिकीर असणारे अनेक लोक इ॑ग्लिश स्पेलि॑ग बिनचूक असावे याबाबत आग्रही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
प
पैसा गुरुवार, 08/31/2017 - 18:24 नवीन
मी माझे नाव आवर्जून ज्योति असेच लिहिते ते व्याकरणाच्या जुन्या नियमाप्रमाणे. संस्कृतमधले तत्सम शब्द तसेच लिहायचे असा तो नियम होता. मला संस्कृत येते त्यामुळे मराठीचे सोयीने बदललेले नियम मी अजूनही आत्मसात करू शकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
अ
अनिंद्य Mon, 09/04/2017 - 10:56 नवीन
@ पैसा, संस्कृतमधले तत्सम शब्द.... हिंदी, मराठी आणि संस्कृत तीनही भाषा परीक्षेला असल्यामुळे मला तर तिहेरी गोंधळ सोसावा लागलाय. म्हणजे ज्योती हे नाव मराठीत ज्योती, हिंदीत (संस्कृतोत्भव शब्द असल्यामुळे) ज्योति आणि परत संस्कृत मध्ये ज्योति :-) आताही नागरी हिंदीत राजनीति, प्रगति हेच बरोबर आहे. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह बोलतानाही हे उच्चार अगदी आग्रहाने पण विनासायास ह्रस्व करायचे हे ऐकले / बघितले आहे. जुन्या मराठीच्या नियमाप्रमाणे म्हणजे - 'का बरे ?' हे 'कां बरें' असे असते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/04/2017 - 14:05 नवीन
ते आणखी जुने झाले. आपण शिकायला सुरुवात केली त्यापूर्वीच अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले होते. त्यामुळे त्यांच्याशी कधी संबंध आला नाही. दुसरे असे की विशेषनामे, म्हणजे आपली सरकार दरबारी नोंदलेली नावे आता बदलता येणार नाहीत. मात्र नवे नियम मला तोंडपाठ नसले तरी जेव्हा मिपावर शुद्धिचिकित्सा करणारे सुधांशु नूलकर दिवाळी अंकात वगैरे एखाद्या शब्दात बदल सांगतात तेव्हा तो आम्ही कोणतीही शंका न काढता स्वीकारतो. कारण या कामाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांना याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना वेळ असता आणि या धाग्यावर त्यांनी काही लिहिले असते तर ते छान झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
अ
अनिंद्य Wed, 09/06/2017 - 07:21 नवीन
@ पैसा, माहितीबद्दल आभार. सुधांशु नूलकर यांचे मत वाचायला आवडेल, विशेषतः विशेषनामे मराठीत लिहितांना घ्यायच्या काळजीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कंजूस Mon, 08/28/2017 - 12:50 नवीन
उच्चारांतूनही बोध होतो ह्रस्व दिर्घाचा. शिवाय मराठी नंतर शिकलेल्या दिसय्रा भाषिकांना ओळखता येतं. उदा० गोष्ट(अ)। गोष्ट् कानडीत ए आणि ओ हेसुद्धा ह्रस्व-दीर्घ आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 08/28/2017 - 13:17 नवीन
अशुद्ध लेखनाने भाषेचे सौंदर्य ढासळते. अशुद्ध लिहून तसे लिहिण्याचे समर्थन करणे आणि मुद्दामहून फाटकेतुटके, गबाळे कपडे वापरणे हे सारखेच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/28/2017 - 13:24 नवीन
मनातलं बोललात अप्पा जोगळेकर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सस्नेह Mon, 08/28/2017 - 13:30 नवीन
अशुद्ध लेखन वाचताना अस्सल मराठी वाचकाला दाताखाली खडे आल्यासारखे वाटल्याशिवाय राहवणार नाही !
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 08/28/2017 - 20:37 नवीन
अगदी खरं स्नेहांकिता. मी मिपाकर व्हायच्या वेळी अगदी नवखी होते मराठी typing मध्ये. त्यामुळे नाव चुकलं माझं. त्याच दुःख अजूनही आहे. खरच अशुद्ध लेखन वाचताना खूप त्रास होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ए
एस Mon, 08/28/2017 - 20:48 नवीन
तुम्ही नीलकांत किंवा प्रशांत यांना व्यनि करून तुमचा आयडी दुरुस्त करून घेऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
क
कंजूस Mon, 08/28/2017 - 15:05 नवीन
संपादन करता येत असेल तर जुने लेख पुन्हा शुद्ध करता येतील.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 08/28/2017 - 15:18 नवीन
मिपाच्या एक्स मालकांना मनोगतचा की अजुन कोणत्यातरी मराठी संकेतस्थलाचा शुद्धलेखनाचा आग्रह मानवला नाही म्हणून ते तिथून चपला घालून बाहेर पडले आणि मिपा चालू केले. मिसळपाववरदेखील सुरुवातीला शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्‍यांना 'चपला घाला' असा संदेश मिळालेला मी या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यामुळे या संकेतस्थळावर तरी असला धागा अस्थानी आहे असे वाटते. प्रतिसाद चुकीचा वाटल्यास सगळ्यांची आगावू क्षमा मागतो. वाटल्यास संपादक प्रतिसाद उडवू शकतील.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/29/2017 - 06:53 नवीन
अहो, त्यांना स्वतःलाच चपला घालून बाहेर पदावे लागले. आता पुष्कळ वर्षे झाली. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/29/2017 - 06:53 नवीन
*पडावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
द
दशानन Mon, 08/28/2017 - 20:39 नवीन
मी काय करावे? ना मला मराठी शुद्ध लिहता येते, ना कन्नड, ना गुजराथी, ना हरयाणवी, ना तेलगू, ना इंग्लिश.. :(
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/29/2017 - 09:54 नवीन
मग सुधारा कि अजून. वस्त्र( किंवा कोणतीही नवीन वस्तू) विकत घेताना त्यावर डाग असेल तर विकत घेता का? सेकंड्स चा माल स्वस्त का असतो? तूप घेताना भेसळ चालते का? मध शुध्द असाव हा आग्रह असतो ना? जिलबी सुद्धा शुद्ध तुपातली हवी असते त्यासाठी दुप्पट किंमत देतो च ना( डालडातील जिलबीपेक्षा) औषध कमअस्सल चालते का? मग भाषा अशुद्ध असण्याबद्दल दुराग्रह कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
थ
थिटे मास्तर Tue, 08/29/2017 - 00:41 नवीन
हे अनंत यात्री असे हवे का ?
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/29/2017 - 06:56 नवीन
'विशेष नाम' शुद्धलेखनाच्या नियमांच्या कक्षेबाहेर असते बहुतेक. नक्की माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 08:24 नवीन
... हे बरोबर. मात्र, जर ते नाव एखाद्या मराठी शब्दावर बेतलं असेल, तर त्याला शुद्धलेखनाचे नियम लागू केले पाहिजेत. उदा. दिपिका/दिपीका चूक, दीपिका बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अत्रे Tue, 08/29/2017 - 09:48 नवीन
जर ते नाव एखाद्या मराठी शब्दावर बेतलं असेल, तर त्याला शुद्धलेखनाचे नियम लागू केले पाहिजेत
का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 10:44 नवीन
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Tue, 08/29/2017 - 10:56 नवीन
नाही मिळालं. म्हणजे विशेष नामांसाठी शुद्धलेखनाचे नियम का असावेत, हे नाही कळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 13:41 नवीन
स्वत:स शिणवू नका... प्रकृतीस जपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/29/2017 - 10:26 नवीन
मराठी शुद्धलेखन काळाची गरज आहे. मराठी लेखनात शुद्ध शब्द आणि शुद्ध लेखनाची गरज आहे, नसता एक दिवस प्रमाण लेखन काय असतं, त्याचं स्वरुप कसं होतं. अशा प्रकारचे लेखन मराठी भाषेच्या इतिहासात वाचावे लागेल. प्रमाण भाषा व बोली यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास मराठी संकेतस्थळावर आवश्यक आहे. सर्वच लेखन करणारे एकसारखी भाषा लिहित नाही. भाषा बोलत नाही, तरीसुद्धा भाषाव्यवहाराच्या दृष्टीने स्थानिक भेद, प्रादेशिक भेद, हे सोडून सर्वांना समजेल अशी भाषा आणि लेखन आवश्यक आहे. '' एका विस्तृत प्रदेशात बोलली जाणारी, अनेक बोली-भेदांना व स्थानिक-भेदांना समाविष्ट करुन घेणारी, राजकारण, समाजकारण, संस्कृती व शिक्षण या क्षेत्रांमधे वापरली जाणारी आणि समाजाकडून लेखनव्यवहारासाठी स्वीकारली गेलेली भाषा म्हणजे प्रमाणभाषा म्हणता येईल'' अशा प्रमाण भाषेचा वापर मराठी संकेतस्थळावर आवश्यक आहे, आणि सदस्यांना तसे लेखन करणे बंधनकारक करावे. वाट्सपवरचं लेखन वाचायचा कंटाळा येतो. वाईट वाटतं. कला शाखेच्या विद्यार्थ्यांचेही मराठी लेखन प्रचंड अशुद्ध असतं. विद्यार्थ्यांची संख्या मराठी अवघड आहे या कारणामुळे रोडावली आहे. मराठी लेखनासाठी अशा कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. पहिलीपासून ते पदवीपर्यंत मराठी लेखन गिरवण्याचे प्रशिक्षण आणि बक्षीस योजना जाहिरी केल्या पाहिजेत. एवढे बोलून प्रमाण भाषेबद्दलचे दोन शब्द संपवतो. -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (मराठी भाषेचा शिक्षक- अभ्यासक ) मराठी लेखनात शुद्ध अशुद्ध असे काही नसते. मराठी भाषेचे मारेकरी जर आपणास व्हायचे नसेल तर अशा प्रकारची कोणतीही सक्ती करु नये. भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की विचारांचे आदान प्रदान करणे. आज जगभरात सर्वत्रच निरनिराळे बोली बोलणारे लोक आपापले अनुभव सांगण्यासाठी सिद्ध व उत्सुक असल्याचे दिसून येते. लिहिण्याचा कोणताही अनुभव नसतांना अनेक लोकांनी असे प्रयत्न करुन उत्तम लेखन केल्याचे आपणास दिसून येते. र्‍हस्व, दीर्घ, उकार, काना मात्रा वेलांट्या यांच्या हट्टामुळे शब्दांचा अर्थ बदलतो असे असले तरी वाक्यानुसार त्या शब्दांचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. भाषेचा शुद्ध अशुद्ध ही एक समजूत आहे या लिपिबद्ध भाषेचा स्वीकार करावा असा आग्रह धरला जातो मला वाटतं तो चूक आहे. वास्तविक समाजाच्या दैनंदिन भाषा व्यवहारात बोलींचाच प्रत्यक्ष वापरत होतांना दिसतो. पुस्तकांसाठी अशी प्रमाण भाषा एकवेळ समजून घेतली तरी शासकीय पत्रव्यवहारातील भाषा समजून घेणे अवघड होत चालली आहे. सारांश शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पना नेहमीच प्रमाणभाषेला केंद्रस्थानी ठेवून मांडल्या जातात हेच मुळात चूक आहे, असे माझे मत आहे. एवढे बोलून इथे थांबतो. अवांतर एक आठवण : मराठी संकेतस्थळावर मला सुरुवातीला लेखन करताच येत नव्हतं, त्याकाळी सालं माझ्या जाल दोस्त लोकांनी लै बदनामी केली होती. साले, सर्कीट, संजोपराव, आजानुकर्ण, आणि अजून काही लोकांना मी कध्धी, म्हणजे कध्धी माफ करणार नाही. ;) शुद्धलेखन नियम काय बदल केले पाहिजेत, माझा एक अभ्यासपूर्ण धागा. माझा हा धागा वर कायम ठेवा राव....! :) -दिलीप बिरुटे (मिपाकर)
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 08/29/2017 - 10:59 नवीन
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सरकारी मराठी ! ते एक वेगळेच किचकट प्रकरण आहे :-) - उपरोल्लेखित अभिप्रायास अधोहस्ताक्षरित व्यक्ती त्याच्या वालीवारसासह जबाबदार :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 13:39 नवीन
आपल्या, ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या, मराठीशी काही संबंध नसावा... ती नेहरूंनी सुचवलेल्या हिंदुस्तानी भाषेची बहीण वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
अ
अनिंद्य Sun, 09/03/2017 - 14:57 नवीन
@mayu4u, हिंदुस्तानी भाषेची बहीण ? माझ्या मते तर सरकारी मराठी म्हणजे वाघिणीच्या दुधाचे खरवस :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Mon, 09/04/2017 - 13:29 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
N
Nitin Palkar Mon, 09/04/2017 - 17:46 नवीन
सर्वोत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
अ
अनिंद्य Wed, 09/06/2017 - 07:15 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा