Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?

अ
अनन्त्_यात्री यांनी
Mon, 08/28/2017 - 08:19  ·  लेख
लेख
[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही :) ] कायप्पा व मि.पा. वरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्‍याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते. शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, ट॑कनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभ॑ग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-स॑वेदनशील बनत जातो. सध्याच्या सोशल मिडियावरच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्‍या शब्दा॑ची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे: मि, हि, तु, हीला, तूला, खुप, दुध, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, दूध, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे च्या ऐवजी) भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सा॑गू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.

प्रतिक्रिया द्या
25142 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

ह
हेमंतकुमार Tue, 08/29/2017 - 13:30 नवीन
लेखनात प्रमाणभाषा पाहिजेच. एका चर्चेत एक बँक अधिकारी म्हणाले, "20 या अंकाला बोलीभाषेत वीस किंवा इस असे दोन्ही उच्चार आहेत. पण तो अंक चेकवर लिहिताना वीस असाच लिहावा. इस लिहिलेला चेक बँक वटवणार नाही"
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/01/2017 - 13:21 नवीन
तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे "इस" लिहिलेला चेक कदाचित बँकेत वटणार नाही, पण "विस" असे लिहिलेला चेकही बँकेत वटणार नाही का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 09/01/2017 - 14:21 नवीन
ते शाखा व्यवस्थापकावर अवलंबून आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सस्नेह Mon, 09/04/2017 - 12:01 नवीन
शाखा व्यवस्थापकाचे मराठी कितपत कच्चे आहे, त्यावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
म
मित्रहो गुरुवार, 08/31/2017 - 16:51 नवीन
लेखनात प्रमाण भाषा हवी पण ती नाही म्हणून लिहूच नये यासारखी घोडचूक नाही. जसे अति अशुद्ध घातक तसेच अति शुद्धतेचा आग्रह देखील घातकच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश गुरुवार, 08/31/2017 - 17:20 नवीन
लेखनाबद्दल काय म्हणणे आहे आपले ? तिथे तुम्ही तुम्हाला हवे ते स्पेलिंग लिहिता की प्रमाण भाषेचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
उ
उपयोजक Sat, 09/02/2017 - 08:27 नवीन
बरेच जण मराठीतून टाईप करताना हम्म असा शब्द वापरतात.वास्तविक हे इंग्लिशमधल्या Hmm चं मराठी रुपांतर आहे. हं = हो हम्म = हतबलता उदा : अहो ऐकलं का ? हं पाच मिनिटांनी अहो ऐकलं का ? हं 10 मिनिटांनी परत मी म्हणत्ये ऐकलं का ? वर्तमान पत्र ठेवत हम्म बोल काय म्हणालीस ? ही हतबलता ज्या उच्चारातून व्यक्त होते तो लिखित स्वरुपात हम्म लिहिणे चुकीचे नाही का? ही हतबलता अक्षरातून व्यक्त करण्यासाठी हम्म पेक्षा इतर काहीतरी शोधायला हवं! ह्मं कसं वाटतं? (आता लगेच म्हशीची आठवण होईल काहीजणांना!) तुम्हाला काय वाटतं? वापरुया हा नवीन शब्द??
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 09/02/2017 - 11:39 नवीन
आम्ही त्यावर हम्म करू. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ह
हेमंतकुमार Sat, 09/02/2017 - 09:09 नवीन
केअशु, सहमत
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 09/02/2017 - 12:11 नवीन
वाॅट्स अप वर त्र हा शब्द बिनधास्त ञ असा लिहितात , जाम डोके आऊट होते वाचुन
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 09/02/2017 - 12:12 नवीन
ञ हे अक्षर*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पैसा Mon, 09/04/2017 - 14:07 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पुंबा Fri, 09/15/2017 - 09:52 नवीन
ञ या अक्षराचा नक्की उच्चार कसा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 09/15/2017 - 10:20 नवीन
य ला जवळच पण सानुनासिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मराठी कथालेखक Sat, 09/02/2017 - 12:56 नवीन
मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी जागरुक मंडळी पाहून आनंद वाटला. अर्धशिक्षित लोक व्याकरण , शुध्दलेखनाला महत्व देत नसल्याने लेखनात अशुद्धता निर्माण होत रहाते (जसे रंगकाम करणारे, पाट्या बनविणारे ई) तर अनेक सुशिक्षित लोक मराठीला कमी लेखून केवळ इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्यातच धन्यता मानत असल्याने असे होते. आपल्या परीने जमेल तितके शुध्द लिहण्याचा प्रयत्न करावा , त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला तरी चालेल. अर्थात शुद्ध लिहिता येत नाही म्हणून लिहण्याची इच्छा मारु नये. लिहित रहावे. मराठी वाचत रहावे (रोजचे वृत्तपत्र, पुस्तके). मराठीतून लिहिण्याला प्रोत्साहन देत रहावे (घरातील वाणसामानाची यादी, आपल्या गृहनिर्माण संस्थेत प्रसारित होणार्‍या सूचना, शक्य झाल्यास व्यक्तिगत स्वरुपाचे व्हॉटस अप वा लघूसंदेश). व्याकरणातील चुका टाळण्याचा आग्रह असावा पण त्या आग्रहाचा अतिरेक नको. (माझ्या या चार-सहा वाक्यांतही काही चुका असतीलच !!)
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Sat, 09/02/2017 - 23:13 नवीन
मला 'व्हॉटस अप'वर मराठीत आलेल्या संदेशात काही व्याकरणाची चूक आढळली तर मी ती चूक सुधारून संदेश पुन्हा लिहून पुढे पाठवतो. जवळच्या मित्र मंडळीनी अथवा नातेवाइकांनी चुकीचे मराठी वापरले तर शक्य असेल तेथे सुधारणा सुचवतो. सतत चुकीचे शब्द वाचून आपणाला तेच बरोबर वाटू लागतात किंवा कधी कधी बरोबर कोणते चूक कोणते ह्यात गोंधळ उडतो. तसे होऊ नये व (शक्यतो) शुद्ध मराठी लिखित स्वरूपात लोकांना वाचायला मिळावी हा त्या मागचा उद्देश आहे. माझा मुलगा, बोलायला माझी पोस्टिंग गुजरातला असताना शिकला. शाळेत देखील गुजराती व इंग्लिश भाषा शिकवली जायची, तरी देखील तो अतिशय उत्तम मराठी बोलतो. तो बोलायला लागल्यापासून, त्याने कधीही चुकीचे शब्द उच्चारले तर मी ते लगेच सुधारित असे. (आत्ता हा 'सुधारित' शब्द बरोबर लिहिला की नाही ह्या संभ्रमात मी पडलो आहे, डिक्शनरीमध्ये देखील त्याचे उत्तर सापडले नाही) चांगली स्वच्छ मराठी ऐकायला पण छान वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Sun, 09/03/2017 - 13:15 नवीन
चांगली स्वच्छ मराठी ऐकायला पण छान वाटते.
सहमत.. पण आसपासची परिस्थिती बघा काय आहे.. कित्येक पालक मुलांशी आवर्जून इंग्लिश बोलताना दिसतात, या पालकांना स्वतःला जरी बर्‍यापैकी चांगलं मराठी बोलता येत असलं तरी ते मुलांशी मुद्दाम अनेक शब्द इंग्लिशच बोलतात. आपण मुलाला खूप सारे इंग्लिश शब्द शिकवले नाहीत तर आपलं मुल जगात मागे राहील अशी भिती त्यांना वाटत असते की काय ...? आतापर्यंत मी 'कसं बोलणार उगाच कुणाच्या मध्ये' या माझ्या स्वभावानुसार कधी कुणाला काही बोललो नाही..पण आता विचार करतोय की जवळच्या मित्रांना तरी ऐकवेन की "अरे बाबा तुझं मुल पुढे चांगलं इंग्लिश शिकेल पण मराठी बोलण्याचे संस्कार त्याला फक्त घरीच मिळतील, तेव्हा तू त्याच्याशी मराठीत बोल"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
अ
अनिंद्य Sun, 09/03/2017 - 14:27 नवीन
@ सौन्दर्य, मला 'व्हॉटस अप'वर मराठीत आलेल्या संदेशात काही व्याकरणाची चूक आढळली तर मी ती चूक सुधारून संदेश पुन्हा लिहून पुढे पाठवतो. - हे नेहेमी करतो :-) विशेषतः आर्शिवाद मागितले कोणी तर हट्टाने आशीर्वादच देतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
म
मराठी कथालेखक Sun, 09/03/2017 - 13:07 नवीन
वर कुणीतरी म्हंटले आहे की इंग्लिशमध्ये चुका होणार नाहीत याबद्दल लोक दक्ष असतात वगैरे असे काहीसे. पण तसं नाहीये... इंग्लिशमध्ये लिहिताना स्पेलचेक मुळे स्पेलिंगच्या चुका टाळल्या गेल्यात तरी बरेचदा समान उच्चार , पण वेगळे स्पेलिंग आणि अर्थ असलेले शब्द अगदी बिनधास्त घुसडलेले अनेकदा आढळतात उदा there /their , son/sun वगैरे. बाकी त्या apostrophe चा हैदोस बघून हसावे की रडावे ते कळत नाही. your आणि you're चा पण घोळ केला जातो अनेकदा.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sun, 09/03/2017 - 14:41 नवीन
@ मराठी कथालेखक, your आणि you're चा पण घोळ केला जातो अनेकदा..... खरं तर अनेकदा. हे वाचा: :-) ती : Your such an idiot मी: You’re ती : God, your so annoying! मी: You’re ती : Stop doing that. Your making me very angry मी: You’re ती : Stop it, else I’am going to slap you’re face! मी: Your* face :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Sun, 09/03/2017 - 16:10 नवीन
:) आमच्या कंपनीत कॅन्टीनला लागून असलेल्या वॉश बेसिन एरियात "Do not wash tiffin's " अशी पाटी वाचून करमणूक होते. "टिफीनची धुवू नका" असं काही म्हणायचं आहे का लिहिणार्‍याला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
ह
हेमंतकुमार Mon, 09/04/2017 - 11:17 नवीन
एका स्वच्छता गुहाच्या 2 विभागावर Ladies & Gantes असे लिहिले होते!
  • Log in or register to post comments
श
शरद Mon, 09/04/2017 - 13:22 नवीन
मी उपक्रमवर लिहावयास सुरवात केली तेव्हा शाळा सोडून पन्नास वर्षे लोटली होती. शुद्धलेखन हा मोठा अडथळाच होता. त्या वेळी मला " शुद्धलेखन ठेवा खिशात " हे पुस्तक हाती लागले. श्री.अरुण फडके यांच्या ११००० शब्दांच्या ह्या कोशात व्याकरण वगैरे न देता फक्त शुद्ध शब्द दिले आहेत. जे नेहमी व्यवहारात चुकीचे लिहले जाते तेथे बरोबर/चुकीचे दोन्ही देऊन त्या प्रमाणे खुणाही दाखविल्या आहेत. एक ते शंभर आकडे कसे लिहावेत हेही दिले आहे. त्याच बरोबर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले १४ नियमही दिले आहेत. खिशात मावेल एवढ्या आकाराच्या ह्या पुस्तकाने माझ्यावर अनंत उपकार केले. हे पुस्तक कायमचे संगणकाच्या टेबलावरच असते. बराहवरून लिहलेले लेखन वर्डपॅडवर घेऊन तेथे तपासतो. मला असे वाटते की मी किमान ९५% चुका दुरुस्त करतो. काही रहात असणारच. जर सुदैवाने आमच्या सौभाग्यवतींनी लेख वाचला तर त्यांच्या पन्नास वर्षांच्या ’नवर्‍याच्या चुका काढण्याच्या अनुभवाने " उरलेल्या चुका त्यांच्या लक्षात झटकन येतात. ते असो. घरोघरी मातीच्या चुली अंकुर प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाची (त्या वेळची) किंमत रु. ३०. माझा सल्ला हे पुस्तक आपण लिहतांना अवष्य जवळ ठेवावे. शरद
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Wed, 09/06/2017 - 07:50 नवीन
@ शरद, शुद्धलेखन ठेवा खिशात / खिशात मावेल एवढ्या आकाराच्या ह्या पुस्तकाने ...... अश्या सरळ सोप्या उपायांची गरज आहे. पूर्वी लोक नवसपूर्तीनिमित्त रामरक्षा, मनाचे श्लोक, हनुमान चालीसा वगैरे छोटी-छोटी पुस्तके वाटायचे. तसेच ह्याबाबतीत करावे आणि अशी पुस्तके वाटावीत :-) असे e -book असेल तर फारच छान. सुटसुटीत होईल, जास्त वापरले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
ओ
ओरायन Mon, 09/04/2017 - 13:56 नवीन
क्षमस्व ! प्रथमच मिपा मध्ये लिहीत असल्याकारणाने चुकून रिकामी ओळ आली. मला स्वतः ला शुद्ध मराठी टंकता येत नाही , तरी शुद्ध , दोषविरहित मराठी नेहमीच मनाला भुरळ पाडते. जरी जगाच्या, व्यवहारिक दृष्टिकोनातून , आंग्ल भाषेला महत्व असेल , तरी जे , चांगले मराठी बोलतात, लिहतात, वा तसा आग्रह धरतात त्यांचा मला नेहमी हेवा वाटतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 09/04/2017 - 14:02 नवीन
मला स्वतः ला शुद्ध मराठी टंकता येत नाही
काय म्हणता ? हे तर सगळं शुद्धच लिहिलेलं दिसतंय की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओरायन
ओ
ओरायन Mon, 09/04/2017 - 14:32 नवीन
@ मराठी कथालेखक , अहो, इथे केवळ ४ ओळी खरडल्या आहेत.यातून जरी चूक सापडली नाही तरी , त्यावरून अनुमान काढणे अवघड आहे. जेंव्हा जसे विस्ताराने लिहीन, तेंव्हा मात्र मी काही खात्री देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गामा पैलवान Fri, 09/15/2017 - 10:06 नवीन
सौरा,
ञ या अक्षराचा नक्की उच्चार कसा आहे?
यासाठी स्वत:च एक प्रयोग करून पाहता येतो. क ख ग घ ङ या क्रमाने उच्चार करतांना घशातून आवाज येतो. जिभेचा मागील भाग घशास टेकलेला असतो. आता हाच क्रम च छ ज झ यांचा उच्चार करतांना ठेवा. क ते ङ चा जसा प्रवास आहे अगदी तसाच प्रवास च ते ञ चा आहे. मात्र जिभेचा टाळूस स्पर्श झाला पाहिजे. बघा ञ चा उच्चार आपोआप उमटेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 09/15/2017 - 10:34 नवीन
अरे वा!! धन्यवाद पैसा ताई आणि गापै..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
आ
आवडाबाई Fri, 09/15/2017 - 11:41 नवीन
आयुष्यात प्रथमच ङ आणि ञ यांच्या उच्चारातला फरक कळला !! भारी वाटलं धन्यवाद दशानन बाकी, शुद्धलेखनाला फाट्यावर मारलेल्या लिखाणापेक्षा शुद्ध लिखाण जास्त फ्री-फ्लोईंग वाटते. (पण मराठी शब्द पटकन सुचत नाहीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 09/15/2017 - 13:56 नवीन
आवडाबाई, फ्री-फ्लोईंग = प्रवाही , ओघवतं फ्री म्हणजे फुकट खरं, पण 'फुकट प्रवाही' म्हणू नका! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई
ग
गामा पैलवान Fri, 09/15/2017 - 14:07 नवीन
सौरा आणि आवडाबाई, क ते म यांना वर्गीय व्यंजनं म्हणतात. क ख ग घ ङ ==> कंठ्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा घशाजवळचा भाग वर चिकटतो. च छ ज झ ञ ==> तालव्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा टाळूजवळचा भाग वर टाळूला चिकटतो. ट ठ ड ढ ण ==> मूर्धन्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा मूर्ध्नीजवळचा भाग मूर्ध्नीस चिकटतो. त थ द ध न ==> दंत्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा दातांना स्पर्श होतो. प फ ब भ म ==> औष्ठ्य वर्गीय व्यंजने, कारण केवळ ओठांनी उच्चारायची असतात. प्रत्येक वर्गातल्या पहिल्यापासून पाचव्यापर्यंतच्या जिभेची हालचाल एक सारखीच होते. पण जिभेचा स्पर्श वेगवेगळ्या ठिकाणी होतो. म्हणून यांना वर्गीय व्यंजने म्हणतात. उरलेली सगळी व्यंजने इतर व/वा मिश्र स्वरूपाची आहेत. उदा. : व हे दंतौष्ठ्य आहे, अस श ष हे सीत्कारी आहेत. एकंदरीत ज्याने कोणी ही वर्णमाला शोधून काढली आहे, त्याला मानवी मुखाचं सखोल ज्ञान आहे. हे उच्चार जणू मानवी डीएनेत वसलेले आहेत. सांगायचा मुद्दा काये की हे ज्ञान जर राखायचं असेल तर शुद्धलेखनास पर्याय नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 09/15/2017 - 14:24 नवीन
गापै, माहितीपूर्ण प्रतिसादासाठी पुन्हा एकदा आभार. मागच्या बाकावरून आणखी एक शंका: लृ असे आणखी एक अक्षर आहे ना? त्याचा उच्चार कसा?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 09/15/2017 - 16:18 नवीन
मलाही माहिती नाही! :-( लृ आणि लॄ असे दोन स्वर की काहीतरी आहेत. पिशी अबोली यांना माहित असावं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
र
रविकिरण फडके Sun, 07/08/2018 - 19:27 नवीन
Learning is not mandatory. Neither is survival. (Kindly excuse me; transliteration continues to not work.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा