Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपावर अजून काय हवे?

द
दशानन
Mon, 08/28/2017 - 20:35
🗣 62 प्रतिसाद
काही अनुभव पाठीशी आहेत संकेतस्थळ चालवायचे. त्याचा उपयोग करून काही गोष्टी / चर्चा आपण करू या उद्देशाने हा धागा आहे. १. लेखन विभागाची मुद्देसूद मांडणी. अनेकगोष्टीची सरळमिसळ झाली आहे, त्याला व्यवस्थित नीट फाटे फोडावेत. २. नवीन प्रतिसाद अनेकवेळा १-२-३ अनुक्रमणिका असलेले धागे मिपाला नवे नाही आहेत, पण कोणीतरी अश्याच धाग्यावर पहिल्या पानावरील धाग्यावर प्रतिसाद दिला, आणि त्याच धाग्यावर शेवटी नवे १०-२० नवे प्रतिसाद असतील... तेव्हा जर सदस्य नव्या प्रतिसादावर टिचकी मारेल तो सरळ पहिल्या पानावरील नवीन उप प्रतिसादाकडे जाईल. आणि पुढील नवीन प्रतिसाद पुढील पानावर असतील तर ? त्यांचा नवीन हा टॅग निघून गेलेला असतो.. ३. एडिटर बार खूप वर्षे झाली, आता यात नवीन काहीतरी बदल हवेत... अगदी बेसिक गोष्टी देखील नाही आहेत, उदा. शब्द रंग! ४. थर्ड पार्टी लॉगिन ५. शुद्धलेखन तपासणी ६. परिपूर्ण मोबाईल अँप ७. अपडेटेड नोटिफिकेशन ८. ब्राउझर टायपो एरर.. (बॅक स्पेस इश्यू ) ९. स्मायली १०. वैरिफाईड सदस्य सारखी सुविधा.. ११. मिपा सर्च १२. आता तुम्ही सांगा / तुम्ही लिहा तुम्हाला काय बदल हवेत.... (स्वारीं व्यवस्थापन, डायरेकट धागा काढला आहे... क्षमा.)
वर्गीकरण
चर्चा
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
13450 वाचन

💬 प्रतिसाद (62)
द
दशानन Mon, 08/28/2017 - 20:37 नवीन
मिपाचा वाढदिवस (आठवडा) सुरु आहे, तेव्हा मागायला लाजू नका ;) शक्य असेल तर मिपा आवर्जून हे बद्दल करेल याची खात्री आहे म्हणून धागा टाकला आहे, तुम्ही हि सामील व्हा... व आपल्या मागण्या येथे द्या ;)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 08/28/2017 - 20:46 नवीन
व्हेरिफाईड सदस्य म्हणजे? तसं करण्याचे फायदे काय आहेत?
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 08/28/2017 - 20:51 नवीन
>>व्हेरिफाईड सदस्य म्हणजे, त्याचे असणे कोणी ना कोणी (येथे कॉज आहेत) मान्य केले आहे कि मी या "आयडीला" व्यक्तिगत स्वरुपात ओळखतो. याचा फायदा सदस्यांना नसून संकेतस्थळाला आहे, व असावा. कारण लिहणारा व्यक्ती "जबाबदारी" टाळू शकणार नाही व "संभाव्य" कायदे / नियम यांच्या कचाट्यातून हे स्थळ म्हणजे मिपा सुरक्षित राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कपिलमुनी Mon, 08/28/2017 - 21:32 नवीन
मिपाच्या मुख्य पानावर अभिप्राय द्यायची सोया आहे त्यामुळे या धाग्याचे वेगळे काय प्रयोजन आहे ? बाकी मिपा मालक समर्थ आणि सदैव अभिप्रायासाठी उपलब्ध आहेतच
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Mon, 08/28/2017 - 22:16 नवीन
अनेक वर्षे वाचक आणि नंतर सदस्य असा माझा मिसळपाव वरचा प्रवास आहे, तरी अजूनही लेखक होऊन धागा लिहीण्याचा टप्पा पार केलेला नाही, असो. :) हे संस्थळ अनेक वर्षे उत्तमरीत्या चालू आहे, त्याबद्दल प्रथम मालक/चालक/वाहक सगळ्यांचेच आभार. नाहीतर अचानक उगवणारी आणि गायब होणारी किंवा अगदी चालू अवस्थेतून अचानक गायब झालेली उदाहरणे देखील आहेत. त्यामुळे सुधारणा होणे चांगले असले तरी मालकांनी बदल करणार नाही पण संस्थळ मात्र चालू राहील असे सांगीतले तरी आनंदच होईल.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 08/29/2017 - 02:58 नवीन
महत्वाचे मुद्दे मांडलेत
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/29/2017 - 05:43 नवीन
मिपासर्चबद्दल - गुगलवर अवलंबून राहाण्यापेक्षा एक टॅग्ज आधारित लिस्ट दाखवता येऊ शकेल. लेखक जे काही टॅग्ज देतात त्याशिवाय एक रेडिमेड ड्रॅापडाउन मेनू करायचा आणि त्यातले निवडण्याचे आवश्यक करायचे. सर्चमध्ये ते टॅग्ज दाखवले की फक्त एक निवडायचा, काही शब्दवगैरे लिहायचे नाहीत. आणि एकदा पाचसहा जणांनी सर्व लेखांना योग्य टॅग्ज दिले की झाले काम. ही पद्धत आणल्यावर मात्र पुढचे लेख सिद्ध केलेल्या टॅग्जमधून एकतरी निवडल्याशिवाय प्रकाशित होणार नाही असा जॅमर ठेवायचा. डेटाबेसमधून फक्त त्या प्रकारातलेच लेख दाखवले जा
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/29/2017 - 06:00 नवीन
तुम्ही संपादक मंडळात कधी गेलात?
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Tue, 08/29/2017 - 06:41 नवीन
सहज लिहिता येणे सहज फोटो अपलोड करता येणे वरिजनल मेंबर आहे कि नाही याच वेरीफिकेशन होणे हे सगळ जमल म्हणजे मज्जा येईल
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 08/29/2017 - 07:56 नवीन
उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे. मलाही मि.पा.वर अनेक बदल व्हावेसे वाटतात सध्याचा ईंटरफेस अनेकांना आवडलेला नाही, तरी मला तरी तोच सुटसूटीत वाटतोय. एक तर वर्गवार विभागणी असल्यामुळे आपल्याला हव्या त्याच विभागात चटकन जाता येत. जुना ईंटरफेस ज्यात सगळे धागे एकाखाली एक स्वरुपात दिसायचे त्यामधे अडचण अशी होती कि समजा कोणी खरोखरच दोनशे कविता टाकल्यातर ( ;-) )अनेक धागे कारण नसताना खाली जातील. तेव्हा आता आहे हाच ईंटरफेस कायम रहावा असे वाटते. मायबोलीवर आहे तश्या किमान तीन सुविधा मि.पा.वर हव्यात असे माझे मत आहे. १ ) धागा शोधण्याची सोय, हि फारच आवश्यक आहे. २ ) एखादा धागा आवडला तर तो व्हॉटसअ‍ॅपवर थेट शेअर करणारे बटन. ३ ) तिसरी सोय म्हणजे फोटो अपलोडींग. अनेक नव्याने लिहीणार्‍यांना हिच फार मोठी अडचण होते. अगदी मलासुध्दा हिच अडचण जाणवली होती, म्हणून बराच काळ लिहिण्याचे थांबविले होते. ४ ) फोटो प्रत्येकवेळी अल्बमवरुन लोड करणे त्रासदायक होते. मायबोलीवर थेट हार्ड डिस्कवरचे फोटो लोड करण्याची सोय आहे. खरेतर एखादी एच.टी.एम.एल. फाईलमधले कंटेंट आहे तसे पेस्ट करण्याची सोय आहे. माझ्यासारख्या भटकंतीचे धागे लिहीणार्‍याला या फोटो अपलोड करण्याच्या गैरसोयीमुळे फार वेळ जातो. या प्रकारामुळे मी माझे धागे आधी ब्लॉगवर लिहून ठेवले आहेत, पण धागा टाकताना फोटो अपलोडींगमधे वेळ जातोच. यावर काही उपाय निघाला तर फारच बरे होईल. ५) एखाद्याचा आय्,डी.काही कारणाने थेट उडण्यापेक्षा त्याला आधी वॉर्निंग देण्यात आले तर बरेच होईल. निदान ती व्य्क्ती शक्य झाल्यास सुधारणा करेल. अर्थात सुधारणा दिसली नाही तर कारवाई आहेच. ६ ) आय.डी. व्हेरीफाईड करुन घ्यावा याच्याशी सहमत. या अश्याच चर्चा आम्ही फक्त मि.पा.कर असलेल्या "मिळून मिसळून" या टेलिग्राम ग्रुपवर करीत असतो. त्या चर्चेतून ज्या सुधारणा मला व्हाव्या असे वाटले त्या लिहील्या.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 08:13 नवीन
... अग्रक्रमाने लागू व्हाव्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
उ
उपयोजक Tue, 08/29/2017 - 09:03 नवीन
नेहमीप्रमाणेच सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार दुर्गविहारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
ब
बाजीप्रभू Wed, 08/30/2017 - 04:23 नवीन
मला हे बदल झाले तर मिपा अजून आवडेल. १) प्रतिसादांचा क्रम नवा ते जुना असा असायला हवा... "खफ" मधे आहे तसा. उदा. ताज्या घडामोडी - १,२..... ९, हा धागा मोबाईलवर वाचायचा झाला तर तोंडाला फेस येतो.... स्क्रोल करत करत आजच्या तारखेला येईल पर्यंत धीर सुटतो. २) कि-वर्ड वरून संबंधीत लेख शोधण्याची सुविधा PC वरही चालवता आली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
M
mayu4u Wed, 08/30/2017 - 09:17 नवीन
toggle हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
ऋ
ऋतु हिरवा Wed, 08/30/2017 - 15:46 नवीन
मी मिपावर नवीन आहे. मलाही फोटो टाकायला खूप अडचणी येतात. त्यामुळे फोटो टाकणे सोपे झाले तर बरे होईल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
उ
उपयोजक Tue, 08/29/2017 - 09:09 नवीन
अॅपचा मुद्दा पटला! २०१४ नंतर या अॅपमधे काहीच बदल झालेले नाहीत.याअॅपमधे नोटीफिकेशनचीही सोय हवी.म्हणजे कोण प्रतिसाद देतंय तेही कळेल.मुख्य म्हणजे उपप्रतिसाद वेळेत देता येईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/29/2017 - 11:02 नवीन
फोटोंसाठी फेसबुकचा एक क्लोझ्ट ग्रुप बनवावा आणि तिथे आपल्या आइडीनावाला मिपाकर आडनाव लावून( उदा माझे kanjoos mipakar) लॅागिन व्हावे म्हणजे हा कोण हे कळायला सोपे जाईल. तिथे फोटो अपलोड करावा. तिथून इथे सहज आणता येतो. ज्यांना खरी ओळख लपवायची असेल तेही साध्य होईल. फेसबुकच्या मोठ्य सर्वरचा उपयोग करून घेता येईल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 08/30/2017 - 06:17 नवीन
म्या बी अशेच म्हन्तो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ऋ
ऋतु हिरवा Wed, 08/30/2017 - 15:48 नवीन
चांगली कल्पना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 08/29/2017 - 11:08 नवीन
नोटीफिकेशनचीही सोय आपोआपच होईल. असे हे समांतर मिपा करण्याचा/चालवण्याचा उद्देश नाही परंतू काही प्रश्न लगेच सुटतील. एक वेगळे फेसबुक अकाउंट उघडावे लागेल इतकेच. तेसुद्धा वेगळ्या ब्राउजरात ठेवले तर तेही चालू राहील एकाचवेळी. मोबाइलचा स्क्रीन लॅाक असतोच. लॅागआउट करायचेच नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/29/2017 - 12:13 नवीन
कंकाका तुम्ही जेवढे प्रयोग आंतरजालावर करता ना त्याच्या निम्मे जरी मी माझ्या व्यवसायात केले असते तरी डबल प्रॉफिट काढला असता. बाकी काई नाही ओ, आळस आणि सगळे काही आयते मिळवायचा सोस नडतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ख
खेडूत Wed, 08/30/2017 - 06:14 नवीन
+१ अगदी मनातलं बोलला बघ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
राघवेंद्र Tue, 08/29/2017 - 22:49 नवीन
धन्यवाद कंजूस काका !!! खूपच सोपी पद्धत सांगितली. फेसबुक वापरायची आयडिया मस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सानझरी Tue, 08/29/2017 - 12:54 नवीन
वरच्या काळ्या पट्टीत ठळक अक्षरात "मिसळपाव" लिहीलंय ते काढलं तर फार बरं होईल. ऑफिसमधे दुरुनसुद्धा कोणालाही ते वाचता येतं. हे काय बघतेयस असं विचारलं तर मिसळपावची रेसिपी बघतेय हे कारण सांगुन कलिग्ज लोकांना टोलवलंय.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/29/2017 - 13:04 नवीन
मुळ लेखातील मुद्दा क्रं. दोन बाबत काही करता आले तर पाहा. प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेल्यास नवीन प्रतिसाद शोधणे अतिशय कठिण होऊन जाते.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 08/29/2017 - 13:06 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच स्लो आणि बेभरवशाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधायचा लेआउट मध्ये लेख "डिस्कवर" करणे मुश्किल जाते. नवीन पांच लेख आले कि सहावा गायब होतो. माझ्या मते जुना लेआऊट चांगला होता. पाहिजे तर तिथे "pinned" पोस्ट चा कन्सेप्ट आणावा पण सध्याचे मुखपृष्ठ अतिशय वाईट आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/29/2017 - 23:58 नवीन
>>>पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच स्लो आणि बेभरवशाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधायचा लेआउट मध्ये लेख "डिस्कवर" करणे मुश्किल जाते. नवीन पांच लेख आले कि सहावा गायब होतो.>>> *असं होत असेल -फारच स्लो - तर दोष हा डिवाइसचा वाटतोय. * लेख "डिस्कवर" करणे - यासाठी दोन वेगळे बुकमार्क वापरून प्रश्न सुटतो. १) Link:http://www.misalpav.com/content/all आणि दुसरा २) link:http://www.misalpav.com/ * ब्राउजरचे सेटिंग्ज फुल व्ह्यु/ रीडिंग व्ह्यु/ कॅालम व्ह्यु केल्यानेही लेआउट बदलता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 08/29/2017 - 13:12 नवीन
फक्त एक दिवस मला मिपाचा मालक करा,बघा कसा विकास करतो ते.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/29/2017 - 13:19 नवीन
ऑलरेडी भकास केलायत की ओ, मी काय म्हणतो टफिमामा, एक नवीन संस्थळाच बघा राव, हाय तुमच्यात ते पोटेन्शल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 13:23 नवीन
त्याची गरज जास्त वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
M
mayu4u Tue, 08/29/2017 - 13:22 नवीन
... ती आणा मिपा वर सर्वप्रथम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
य
यशोधरा Tue, 08/29/2017 - 16:51 नवीन
हे सगळे मी मराठीवर लागू केले होते का?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/29/2017 - 17:19 नवीन
अनुभवाचे बोल आहेत म्हणताहेत की ते. ;) . . (व्हेरीफाईड सदस्य) अभ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 08/30/2017 - 06:32 नवीन
हो, हो, अगदी बरोबर! ते निसटलेच होते माझ्या नजरेतून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दशानन गुरुवार, 08/31/2017 - 19:19 नवीन
हो, अगदी पूर्णपणे. शक्यतो हाच मोठा गाढवपणा माझा होता मी हवे किंवा असावे ते ते उपलब्ध करत गेलो.. व पुढील सगळा इतिहास आहे. पण त्या चुका दुसरा कोणी करु नये यासाठी देखील मी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. परत एकदा पण, अपडेटेड होणे ही काळाची गरज आहे, व पूर्ण अपडेटेड असे काही या फिल्डमध्ये नसते ही, पण 5-7 वर्षाने ना का होईना बेसिक चेंज हा साईटला नव्हे तर सदस्यांना हवा असतो व तो करावा लागेल. परत.. पण, आपली भूमिका आणि बेसिक गरजच (साईट रिसोर्स) यात नेहमी तफावत असते हे लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/29/2017 - 17:46 नवीन
मला विचाराल तर मिपा वापरायला सर्वात सोपे व सुटसुटीत आहे. बाकी ठीकाणी तर माठ डोकच काम नाही करत.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 08/29/2017 - 21:25 नवीन
सहमत. मला मिपा वाचायला आणि लेख लिहायला अगदी सोपं वाटतं. मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून कसही वापरलं तरी मस्त जमत. माझ्या दृष्टीने तर आहे हे झक्कास चालू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/29/2017 - 17:47 नवीन
मला विचाराल तर मिपा वापरायला सर्वात सोपे व सुटसुटीत आहे. बाकी ठीकाणी तर माझं डोकच काम नाही करत.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/29/2017 - 17:49 नवीन
सगळ्या मागण्यांना +१! फक्त ८ क्रमांक बॅकस्पेस बद्दल माझा अनुभव असा की हा प्रॉब्लेम क्रोम ब्राउझरातच येतो. फायरफॉक्सला हा प्रॉब्लेम नाही. एकूण गमभन आणि अपडेटेड क्रोम ब्राउझरचे काहीतरी वाकडे आहे. अँड्रॉईड मोबाईल क्रोमचे तर अगदीच!
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 08/30/2017 - 16:52 नवीन
बॅकस्पेस चा प्रयोग लगेच फायरफॉक्स मधे करुन पाहिला तर तिथे हे चालतय. पण पल्याडच्या साईट वर क्रोम वर पण गमभन चालतय बॅकस्पेस ने सुद्धा. हे कसं काय? असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 08/30/2017 - 17:11 नवीन
ते आता अपडेटनंतर गमभन वापरत नाहीत बहुतेक. दुसरी कोणतीतरी पद्धत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
स
सही रे सई Fri, 09/01/2017 - 00:26 नवीन
तसं काही आपल्याला पण इथे करता येईल का सहज शक्य असेल तर? नसेल सहज होण्यासारखे तर मग वेळ मिळेल तसा आणि प्राधान्यक्रमानुसार करावे. पण हे फा.फॉ. चे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 09/01/2017 - 03:47 नवीन
ते नीलकांत बघेल. पण बहुतेक लेटेस्ट द्रुपल वर गमभन नीट चालत नाहीये, त्यामुळे पुढच्या upgrade ला बदलावे लागणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 08/31/2017 - 04:12 नवीन
माझाही हाच अनुभव आहे. बाकी नवीन लेआऊट जास्त सुटसुटीत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
उ
उपयोजक Wed, 08/30/2017 - 04:16 नवीन
आपण सगळे मिपाकडून एवढ्या अपेक्षा करतोय पण मिपा हा मोफत चालणारा उपक्रम आहे याचा विसर पडू नये. माबोसारख्या मिपानंदेखील जाहिराती स्विकाराव्यात का? यामुळे अपेक्षित सोयींसाठी आवश्यक निधी मिळेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Wed, 08/30/2017 - 05:18 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
M
mayu4u Wed, 08/30/2017 - 09:17 नवीन
जाहिराती चालतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
क
कंजूस Wed, 08/30/2017 - 09:19 नवीन
>>मिपा हा मोफत चालणारा उपक्रम आहे याचा विसर पडू नये.>> म्हणूनच आहे त्या चौकटीला बाहेरून आधार देण्याचा फुकटचा उपाय सुचवला.आपली सोय आपल्या उपलब्ध साधनांतून बघायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ऋ
ऋतु हिरवा Wed, 08/30/2017 - 15:53 नवीन
हरकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
अ
अत्रे Wed, 08/30/2017 - 05:20 नवीन
आपल्या प्रतिसादाला कोणी रिप्लाय केला की आपल्याला नोटोफिकेशन आले तर बरे होईल. यातल्या तांत्रिक बाबी माहित नाहीत पण https://www.discourse.org या फोरम सॉफ्टवेअर चा उपयोग होईल का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा