Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपावर अजून काय हवे?

द
दशानन
Mon, 08/28/2017 - 20:35
🗣 62 प्रतिसाद
काही अनुभव पाठीशी आहेत संकेतस्थळ चालवायचे. त्याचा उपयोग करून काही गोष्टी / चर्चा आपण करू या उद्देशाने हा धागा आहे. १. लेखन विभागाची मुद्देसूद मांडणी. अनेकगोष्टीची सरळमिसळ झाली आहे, त्याला व्यवस्थित नीट फाटे फोडावेत. २. नवीन प्रतिसाद अनेकवेळा १-२-३ अनुक्रमणिका असलेले धागे मिपाला नवे नाही आहेत, पण कोणीतरी अश्याच धाग्यावर पहिल्या पानावरील धाग्यावर प्रतिसाद दिला, आणि त्याच धाग्यावर शेवटी नवे १०-२० नवे प्रतिसाद असतील... तेव्हा जर सदस्य नव्या प्रतिसादावर टिचकी मारेल तो सरळ पहिल्या पानावरील नवीन उप प्रतिसादाकडे जाईल. आणि पुढील नवीन प्रतिसाद पुढील पानावर असतील तर ? त्यांचा नवीन हा टॅग निघून गेलेला असतो.. ३. एडिटर बार खूप वर्षे झाली, आता यात नवीन काहीतरी बदल हवेत... अगदी बेसिक गोष्टी देखील नाही आहेत, उदा. शब्द रंग! ४. थर्ड पार्टी लॉगिन ५. शुद्धलेखन तपासणी ६. परिपूर्ण मोबाईल अँप ७. अपडेटेड नोटिफिकेशन ८. ब्राउझर टायपो एरर.. (बॅक स्पेस इश्यू ) ९. स्मायली १०. वैरिफाईड सदस्य सारखी सुविधा.. ११. मिपा सर्च १२. आता तुम्ही सांगा / तुम्ही लिहा तुम्हाला काय बदल हवेत.... (स्वारीं व्यवस्थापन, डायरेकट धागा काढला आहे... क्षमा.)
वर्गीकरण
चर्चा
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
13450 वाचन

💬 प्रतिसाद (62)
M
mayu4u Wed, 08/30/2017 - 09:18 नवीन
खूप सोय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
ट
टर्मीनेटर गुरुवार, 08/31/2017 - 05:16 नवीन
फोरम सॉफ्टवेअरपेक्षा फेसबुक कॉमेंट सिस्टीम चा वापर केला तर जास्ती छान होईल. माझ्या अंदाजे मिपा हे जुमला ह्या सीएमएस वर आधारित आहे, आणि त्यासाठी जुमला चं एक्सटेंशन पण उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
प
पुंबा Wed, 08/30/2017 - 13:16 नवीन
सर्व मागण्यांना ++११ टॅगिंगची सोय असावी..
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 08/30/2017 - 16:49 नवीन
पेजिनेशन ही अनावश्यक गोष्ट आहे असे मला वाटते. सगळे प्रतिसाद एकाच पानावर आले तर काय फरक पडतो? पेज लोड व्हायला वेळ लागेल थोडा इतकेच. फोटो थेट मिपाच्या सर्व्हरवर चढविण्याची सोया झाली तर खूप बरे होईल. अर्थात आर्थिकदृष्टीने ते परवडायला हवं. तांत्रिक माहिती नसल्याने पास.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 08/31/2017 - 08:21 नवीन
सही आपोआप यायला हवी पुर्वीसारखी. ## सही सुरु ## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. ## सही समाप्त ##
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 08/31/2017 - 15:09 नवीन
# सही पुन्हा सुरु करा! चळवळ!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
न
नाखु Sat, 09/16/2017 - 12:44 नवीन
सही असेल तर प्रतिसाद देण्यात अर्थ आहे, नाहितर धागा सुद्धा व्यर्थ आहे ! मिपा "खोकले" यांच्या मिपा माझा तर मी (नक्की)कुणाचा या धुराळा संग्रहातुन साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/31/2017 - 11:56 नवीन
मला मिपावर 'दुत्त दुत्त' आणी 'ल्लूल्लूल्लूल्लूल्लू' आणी 'गैगैगैगै' याच्या स्मायली हव्या! =))
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी गुरुवार, 08/31/2017 - 13:47 नवीन
अगदी सुरुवातीला काही ठरवुन मिपा वर लॉगिन केलं होत तेंव्हा जे बाकी कुठे लिहिणे शक्य नाही ते इथे लिहिता येईल असा विचार होता पण मिपा वर लॉगिन करायला सुद्धा (लॉगिन name साठीही ) मला google मराठी typing उघडावे लागते. मग मराठीत type करून तिथून इथे कॉपी पेस्ट करावे लागते. इथे फोटो / लिंक अपलोड करणे फबी सारखे सोपे नाही. त्यामुळे इच्छा असूनही लिहिणे होत नाही. इथे असलेले सगळेच लेख फार उत्तम आहेत असे वाटत नाही, वैचारिक -creative लेखांची कमी जाणवते. जे असते ते तसे हलके-फुलके असते. खूप दिवसांनी इथे आले तरी फार काही मिस केले आहे असे वाटत नाही. इथे बरेच लोक एकमेकांना ओळखत असावेत आणि त्यानुसार एकमेकांच्या पोस्ट वर comment करतात, म्हणजे काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे त्यावर त्यांचे रिप्लाय अवलंबून असतात त्यामुळे जरा उपरे हि वाटते. त्यामुळेही मी तरी कविता-लेख इथे share करायची फारशी हिम्मत केली नाही. आणि मी उगीच वेळ घालवते आहे का असे वाटून त्याचीही गरजही वाटेनाशी झाली. यात मिपा या संस्थळाचा दोष नाहीच पण मिपाकरांचा असूच शकतो. आजकाल फार rarely लॉगिन करते पण एखादा लेख आवडला तर पटकन shareहि करता येत नाही. like, unlike, love सारखे काही साधे सोपे पर्याय असतील जे लॉगिन न करताही येऊ शकेल तरी बरे. बाकी अजूनही लोकांनी सांगितले आहेच तेही लक्षात घ्यावे. may be जे मी लिहिले आहे ते तुम्हाला अपेक्षित नसावे कारण यात फारश्या technical गोष्टी सुचवलेल्या नाही तरीही लिहिले.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 08/31/2017 - 20:49 नवीन
सप्तरंगीताई, येथे अगदी नवीन लोकांच्याही उत्तम लेखनाचे कौतुक होते आणि प्रोत्साहनदेखील दिले जाते. यातला 'उत्तम लेखन' हा भाग महत्त्वाचा आहे. आणि उपरेपणा म्हणाल तर तो बहुतांशी आपल्या मानण्या-न मानण्यावर अवलंबून असतो. तांत्रिक अडचणी आणि सोयीसुविधांची सूचना लक्षात घेण्याजोगी आहे. लेखनासंबंधी काही मदत लागल्यास साहित्य संपादक असतातच. इतरही जुने लोक मदत करतात. तेव्हा बिनधास्त येथे लिहा, लेख-कविता टाका. मिपा आपलांच असां. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
संग्राम Wed, 09/13/2017 - 10:43 नवीन
काही लेखांवर शेयर लिंक दिसत आहे .... धन्यवाद !
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 09/13/2017 - 11:21 नवीन
मिपावर काळापासून एक अडचण जाणवत आहे, नवीन प्रतिसाद संख्येवर क्लिक केल्यावर देखील केवळ मुख्य धाग्यावर पोचत आहे मी, खरं तर नवीन प्रतिसादावर जायला हवे. ही अडचण मला मोबाईल क्रोम मध्ये येत आहे. लॅपटॉपवर पाहिले नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा