बोलशील तर मरशील...
बंदुकीची गोळी कशी गोल गोल
गोल गोल
रक्ताचा रंग कसा लाल लाल
लाल लाल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल....
पैशाचा झोल कसा गोल गोल
गोल गोल
सत्तेचा माज कसा खोल खोल
खोल खोल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल..
सोनूची केस कशी वायलंट वायलंट
सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट
सोनू, बोलशील तर मरशील
मरशील.....
सोssssनूssss
शिवकन्या
#GauriLankesh etc....
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय.काहीही"When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense."तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं, इतरांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं तर मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी वाटते. हा दुटप्पीपणा नाही का?प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता ....बरोबर. अगदी तसाच हक्क तिच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यार्यांना पण आहे. असे असताना त्यांनी हा हक्क वापरला तर लगेच "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी भीति वाटते" असा कांगावा करणे ही विसंगती नाही का? म्हणजे पत्रकार हे जणूकाही "मोअर इक्वल" गटातले असल्याने त्यांच्यावर कोणीही टीका करायची नाही किंवा टीका केल्यास सभ्य भाषेत करायची, परंतु पत्रकारांनी कोणावर कितीही वाईट शब्दात टीका केली तरी ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या बाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून दुसर्यावर वाटेल ते आरोप करायचे पण इतरांनी तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले तर मात्र कांगावा? समजा उद्या असे कोणी म्हणाले की मुस्लिम एमआयएमला मत देत असल्याने भारतातील धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होत आहे, तर असे बोलणे योग्य ठरेल का? कारण मत देणे व कोणाला मत देणे हा मुस्लिमांचा हक्क आहे. तुम्हाला एमआयएम वाईट किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर कृत्ये करणारा पक्ष वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन किंवा निवडणुक आयोगाकडे जाऊन त्यावर बंदी घालावी अशी मागणी करू शकता. परंतु जोपर्यंत त्या पक्षावर बंदी नाही तोपर्यंत त्याला कोणीही मत दिले तर तुम्ही आक्षेप घेणे योग्य नाही. तसेच, जर या बाईंना वाईट किंवा धमकीची ट्विट्स येत असतील तर त्यांनी कायदेशीर कारवाई करायला हवी होती. त्याऐवजी "पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले" अशा स्वरूपाचा कांगावा कशासाठी? समजा या बाईंना असे वाटत असेल की त्यांच्याविरूद्ध वाईट ट्विट करणार्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला आहे, तर त्यांनी व इतर पत्रकारांनी सुद्धा या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलेला नाही का? या बाईंनी स्वतःला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्यामुळेच त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली आहे. अशा व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल किंवा दुरूपयोगाबद्दल बोलणे म्हणजे लालू यादवने भ्रष्टाचाराविरूद्ध बोलण्यासारखे आहे. निधर्मांधांचे दुटप्पी वर्तन अर्थातच नवीन नाही. जी माणसे मरणार्याचा व मारणार्याचा धर्म बघून नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किंचाळून कांगावा करायचा का डोळ्यांवर पट्टी बांधून मौन पाळायचे, अशांबद्दल कायमच मनात चीड आहे.