Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोलशील तर मरशील...

श — शिव कन्या, Tue, 09/05/2017 - 21:24
बंदुकीची गोळी कशी गोल गोल गोल गोल रक्ताचा रंग कसा लाल लाल लाल लाल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.... पैशाचा झोल कसा गोल गोल गोल गोल सत्तेचा माज कसा खोल खोल खोल खोल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.. सोनूची केस कशी वायलंट वायलंट सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट सोनू, बोलशील तर मरशील मरशील..... सोssssनूssss शिवकन्या #GauriLankesh etc....

प्रतिक्रिया द्या
46802 वाचन

💬 प्रतिसाद (79)
ए
एस Wed, 09/06/2017 - 02:31 नवीन
नीट बोल नाही, अजिबात ब्र देखील उच्चारायचा नाही कोणी. प्रचंड संतापजनक प्रकार सुरू आहे आपल्या देशात.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/06/2017 - 03:35 नवीन
अगदी हेच म्हणते. अजून कोणीच सापडत नाही वगैरे गोष्तींवर विश्वास नाही. जे सापडलेयत त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील हे देवजाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पगला गजोधर गुरुवार, 09/07/2017 - 05:59 नवीन
त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील फेकू न्यूज चे मालक, फेक न्यूजचा बुरखा फाडनारी ला सोडून देतील का तसंच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 11:42 नवीन
भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला
लोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 8, 2017 11:50 AM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गामा पैलवान Wed, 09/06/2017 - 15:04 नवीन
एस, तुमच्याशी सखेदरीत्या सहमत आहे. केरळात कम्युनिस्ट गुंडांकरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या राजरोस हत्या घडताहेत. यावर मणी नामक कम्युनिस्ट नेत्याने जाहीर सभेत कबुलीही दिलेली आहे. हा प्रचंड संतापजनक प्रकार आपल्या देशात सुरू आहे. कशावरून कम्युनिस्टांनी गौरींची हत्या केली नसेल? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 09/06/2017 - 20:45 नवीन
गामा पैलवान, हत्त्या कम्युनिस्टांच्या गुंडांनी केलेल्या असोत वा सनातनच्या. दोषींना कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे यावर आपले एकमत दिसते आहे. हे गुन्हे पुराव्यानिशी शाबीत करून अशा संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करायला हवे, तसेच अशा संघटनांच्या सहानुभूतीदारांविरुद्ध सेडिशन चार्जेस लावायला हवेत. देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अशा हिंसक संघटनांना थारा द्यायचा कशाला? नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक Wed, 09/06/2017 - 21:00 नवीन
कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या सुमडीत तिसर्‍या / सातव्या पानावर जातात आणि कम्युनिस्टांपैकी कुणाची हत्या झाली तर विशेष पुरवण्या निघतात.. अशा दांभीकपणाचे काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 09/07/2017 - 08:19 नवीन
दांभिकता कुठल्याही बाजूची असो, तिचा विरोध केलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पुंबा गुरुवार, 09/07/2017 - 08:37 नवीन
मोदकभौ, मला वाटते आता तसे होत नाहीये. केवळ झी न्युजच नव्हे तर इंडियन एक्स्प्रेसने देखिल कम्युनिस्टांनी केलेल्या हत्यांची दखल घेतलीये, एक सेपरेट सिरीज काढून या हत्यांचा आढावा घेतलाय. ह्यातल्या बर्‍याच मारेकर्‍यांना पकडले देखिल गेलेय. तसे कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर ह्यांच्याबाबतीत नाही ना. तेव्हा पोलिसांनी व्यवस्थित तपास काढून पाळेमुळे खणून काढायला पाहिजेत. सर्वोच्च प्राथमिकता त्याला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 09/07/2017 - 22:13 नवीन
तीव्रतेत फरक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
थ
थिटे मास्तर गुरुवार, 09/07/2017 - 22:33 नवीन
कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर आणि आता लंकेश ह्या हत्या एक दुसर्या बरोबर कनेक्ट का कराव्यात ? कनेक्ट कश्या होतात ? का होतात? कुठल्याहि पक्षाचा, कुठल्याहि राज्य किंवा केंद्र सरकारचा ह्यात काय फायदा ? चारहि म्रुत व्यक्ति असे होते की त्यांच्या असण्या किंवा नसण्याने कुठल्याहि राजकिय पक्षाचे कुठलेहि फार फायदा किंवा नुकसान नव्हते, मग त्यांना मारण्याचा मोटिव्ह काय असावा ? ईनव्हेस्टीगेशन च्या हिशोबाने हे खुपच साधे प्रश्न आहेत् नंतर पुढे बोलुया. @ पगलैट Don't talk about the similar weapon or cartridge, ballistic because Karnataka CID says it's the same weapon used in pansare and kalburgi killings whereas Maharashtra SIT and the CBI don't think the same.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पगला गजोधर गुरुवार, 09/14/2017 - 10:58 नवीन
‘Gory Murder of Hindu Woman By Muslims’ in Kerala is From a Street Play In the video, two men drag the woman out of her car and when she resists, they shoot her. The video has since then been tweeted hundreds of times. But is this what really happened? Neethu Reghukumar | CNN-News18 Updated: September 13, 2017, 7:43 PM IST Thiruvananthapuram: A video circulated widely on social media as the "murder of a Hindu woman by communists and jihadis" in Kerala has turned out to be fake - in fact it was a scene from a street play. ..…... http://www.news18.com/news/india/gory-murder-of-hindu-woman-by-muslims-in-kerala-is-from-a-street-play-1517487.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
वेल्लाभट Fri, 09/08/2017 - 06:42 नवीन
पुढच्या पंधरा वर्षात देशात अनार्कीची परिसीमा झालेली असेल. आणि आज किमान सरकारला नावं तरी ठेवण्याची सोय आहे, पुढे तेही राहणार नाही. असं मला स्ट्राँगली वाटायला लागलंय. सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 07:17 नवीन
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद
तसा प्रयत्न ७० च्या दशकात झालेला, त्यावेळेस विरोध करणाऱ्याना मधल्या काही लोकांच्या गटाला, आताशा बाइंची भूमिका पटालेली दिसते .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 07:47 नवीन
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय. काहीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मोदक Fri, 09/08/2017 - 07:50 नवीन
लोकशाहीवर विश्वास ठेवा साहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मामाजी Fri, 09/08/2017 - 08:01 नवीन
माफ करा पण उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार करू नका. जरा गेल्या 3 वर्षा झालेल्या हत्यांची नीट पडताळणी करा. जी परिस्थिती 15 वर्षानी येणार असल्याचे भाकीत आपण करत आहात जवळपास तशीच परिस्थिती वर्तमानात बंगाल, केरळ व कर्नाटकात आहे. त्यावर आपण (सोयीस्करपणे) मुग गिळुन गप्प आहात आणि 15 वर्षानंतर येवू घातलेल्या काल्पनिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आपल्याला अधिक स्वारस्य आहे. धन्य आहे तुमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
पगला गजोधर Wed, 09/06/2017 - 03:13 नवीन
#परिंदा चित्रपटाचा एक डायलॉग जो गोलियां तुम आज दूसरोंपे बरसा रहे हों, वो जब कल तुम्हारे किसी अपनोंपर बरसेगी, तब शायद तुम्हे पता लगे......
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/06/2017 - 03:39 नवीन
नाही हो, असं होण्याची शक्यता दृष्टिपथात तरी नसते. कधीच होणार नाही असे नाही पण किती पिढ्या जातील आणि मागचे विसरले जाईल हे काळ सांगेल. अपनोंपे गोलिया बरसतील तेंव्हा ज्यांनी आधी बरसवल्यात ते बघायला कश्याला राहतायत! आपणही असू की नाही कोणास ठाऊक हा न्याय बघायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 09/06/2017 - 05:00 नवीन
ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आणि मला कळतय.... उद्विग्न मनाने मी वरील प्रतिक्रिया दिलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ध
धनावडे Wed, 09/06/2017 - 13:04 नवीन
केरळमध्ये होणाऱ्या हत्यानी पण अशीच मनस्थिती होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान Wed, 09/06/2017 - 15:11 नवीन
नाही होत. होत असती तर निषेध केला असता की. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
म
मोदक Wed, 09/06/2017 - 21:29 नवीन
निधर्मांधांचा एकतर्फी आणि सोयीस्कर तटस्थपणा असा लगेच वेशीवर टांगू नये गापै. तुम्ही असहिष्णु असल्याचा साक्षात्कार होईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Wed, 09/06/2017 - 12:27 नवीन
गौरी लंकेश यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला मोदी करतात फॉलो!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/06/2017 - 15:14 नवीन
शब्दांकन चुकीचं आहे. मोदी अनुसरत असलेल्या कोणीतरी गौरी लंकेश यांच्यावर आक्षेपार्ह किलबिलभाष्य केलं आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सस्नेह Wed, 09/06/2017 - 13:07 नवीन
अचूक आणि मार्मिक ! ...तितकंच खेदजनक.
  • Log in or register to post comments
म
मामाजी Wed, 09/06/2017 - 17:45 नवीन
बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो. कसलेले खेळाडू अचूक पणे ओळखतात कोणत्या वेळी कुठच्या मोहोर्याचा बळी द्यायचा.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 09/07/2017 - 20:31 नवीन
होय, बरोबर आहे, गोपीनाथजिंच्या निधाना चे आम्हासही अतीव दुःख जाहले होते ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
थ
थिटे मास्तर गुरुवार, 09/07/2017 - 21:35 नवीन
शेम हिअर. अतीव दुःख. सुभाषचंद्र बोस, लालबहाद्दुर शास्त्रि, फिरोज जहॉंगीर गांधि, संजय गांधि......ते........सुनंदा पुष्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 04:04 नवीन
दिन दयाल उपाध्याय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 04:10 नवीन
प्रमोदजी महाजन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 06:12 नवीन
. बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो.
तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मामाजी Fri, 09/08/2017 - 09:13 नवीन
पग साहेब, वडाची साल पिंपळाला लावणे, बादरायण संबध जोडणे वगैरे प्रकार वापरून आपण खूप मोठे विचारवंत, सखोल अभ्यासक वगैरे आहोत हे दाखवण्याचा आपला उपक्रम ( केविलवाणा असला तरी) स्तुत्य आहे. परंतू या प्रयत्नात आपण आपल्या विचारांची उथळता सर्वांच्या निदर्शनास आणून देत आहोत याची जाणिव आपल्या आहे असे वाटत नाही. केरळमधे होणार्या हत्या व "बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो" या माझ्या विधानाचा बादरायण संबध जोडल्या बद्दल धन्यवाद. या संदर्भानुसार केरळमधे होणार्या हत्या संघ कार्यकर्ते स्वत: घडवून आणतात आणि त्याचे खापर राज्य सरकार वर फोडतात असा निष्कर्ष काढल्याबद्दल आपल्या विद्वत्तेची तारिफ करावी तितकी कमीच आहे. आपला हा उपक्रम आपण असाच नेटाने चालु ठेवावा अशी आपल्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 10:24 नवीन
धागा "गौरी लंकेश हत्याविषय" असता,
"बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो"
अशी आपली प्रतिक्रिया, ही तुमचीही "वैचारिक खोली" आणि "विदवत्ता" अधोरेखित करत नाही काय ? असो भक्तांकडून अजून काय आपेक्षावें ? मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मामाजी Fri, 09/08/2017 - 20:20 नवीन
पग साहेब, धन्यवाद, “बोलशील तर मरशील...” ही कविता मला एकांगी वटली म्हणून मी ही प्रतिक्रीया दिली, “बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो. कसलेले खेळाडू अचूक पणे ओळखतात कोणत्या वेळी कुठच्या मोहोर्याचा बळी द्यायचा.” बरोबर... यावर प्रतिक्रीया म्हणून आपण गोपिनाथ मुंडे, दीनदयाळ उपाध्याय, प्रमोद महाजन ही नावे जाहीर केलीत की ज्यांच्या निधनाने आपणास अतीव दुःख जाहले होते. या उदाहरणांवरून आपला रोख लक्षात येतो की या हत्या भाजप व जनसंघ वाल्यांनी घडवून आणल्याची शक्यता जास्ती आहे. त्या नंतर लगेच आपण “बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो.” हे माझे वाक्य अधोरखित करून आपण पुढिल प्रतिसाद दिलात. “तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.” आणि याला उत्तर म्हणून माझ्या पुढच्या प्रतिसादात “वडाची साल पिंपळाला लावणे, बादरायण संबध जोडणे वगैरे प्रकार वापरून आपण खूप मोठे विचारवंत, सखोल अभ्यासक वगैरे आहोत हे दाखवण्याचा आपला उपक्रम ( केविलवाणा असला तरी) स्तुत्य आहे. परंतू या प्रयत्नात आपण आपल्या विचारांची उथळता सर्वांच्या निदर्शनास आणून देत आहोत याची जाणिव आपल्या आहे असे वाटत नाही.” हे वाक्य का वापरले याचे स्पष्टीकरण आता देत आहे. आपण दिलेल्या यादीतील व्यक्ति या सक्रिय राजकारणी होत्या त्यामूळे त्यांच्या हत्या ह्या Assassination (राजकिय हत्या) स्वरूपाच्या आहेत. Assassination (राजकिय हत्या) करून आपल्या मार्गातील सर्व (आपल्या व विरोधी पक्षाकडून येउ शकणार्या ) संभाव्य धोक्यांचा समूळ नायनाट करणे हा सुद्धा राजकारणाचाच एक भाग आहे. अगदी रामायणातील मंथरा व कैकयी, महाभारतातील शकुनी, चाणक्य, सर्व मुघल राजे, नारायणराव पेशवे ते अलीकडील श्यामाप्रसाद मुखर्जी, लाल बहादुर शास्त्री व राजीव गांधींपर्यत याचा वापर झालेला आहे. मला आकलन झालेले अगदी अलिकडचे ऊदाहरण देतो. वाजपेयींचे सरकार असताना याची सुरूवात झाली. सोनिया व राहुल गांधींना पर्याय म्हणून ऊभे राहू शकणारे काँग्रेसचे दोन मातब्बर नेते माधवराव सिंदीया व राजेश पायलट यांचे अपघाती मृत्यु झाले. माझ्या अंदाजाप्रमाणे यात आंतरराष्ट्रीय संघटनांचासुद्धा सहभाग असू शकतो. कारण याची दहशत इतकी प्रचंड आहे की या घटनां नंतर जवळपास 15 वर्षांनी सुद्धा सोनिया व राहुल गांधींना पर्याय म्हणून काँग्रेस मधुन कोणी पुढे यायला तयार नाही. त्याचप्रमाणे त्यांना आव्हान म्हणून भाजप मधून पुढे येउ शकणारे त्यावेळचे दोन मातब्बर नेते म्हणजे अडवाणी व प्रमोद महाजन. अडवाणींची राजकीय कारकिर्द संपवणे हे जास्त सोयीचे असल्याने सुधींद्र कुलकर्णी यांचा वापर करून ते काम साध्य करण्यात आले. प्रमोद महाजनांची हत्या त्यांच्या भावाने केली. आता मूळ मुद्याकडे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गि व गौरी लंकेश यांच्या पैकी कोणीही सक्रिय राजकारणी नव्हते व राजकारण्यांना त्यांच्या पासुन धोका नव्हता. त्यामूळे त्यांच्या हत्या Assassination (राजकिय हत्या) ह्या स्वरूपाच्या नाहीत. आपल्या वेगळ्या विचारसरणी मुळे त्यांना समाजात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले होते. यांची अशी विचारसरणी ही सत्ताधार्यांच्या फायद्याची असते तशीच तोट्याची पण असते. यांचा मोहोर्यांसाखा उपयोग करून समाजात तेढ निर्माण करायची व आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा सत्ताधार्यांच्या मूळ हेतु. या सर्व हत्या निवडणुकांच्या तोंडावर झाल्या आहेत हे लक्षात घतले पाहीजे. या व्यक्तिंच्या पुढे होणार्या हालचालींमूळे आपल्याला परत सत्ता मिळवणे कठिण होउ शकते त्या मुळे अशा व्यक्तिंना आपल्या मार्गातून दूर करणे हाच साधा व सरळ मार्ग अवलंबला जातो. तपास यंत्रणेवर नियंत्रण असल्यामूळे पूरावे नष्ट करणे, तपासाची दिशा बदलणे ईत्यादी गोष्टी करणे सहज शक्य असते. तसेच माध्यमां द्वारे हा मुद्दा सतत चर्चेत ठेउन जनमत आपल्या बाजूने वळण्याची संभावना असते. थोडक्यात “साप भी मरे और लाठी भी न टूटे ‍” Assassination (राजकिय हत्या) आणि Murder (खुन) या दोन वेगळ्या घटनांची बेमालुम पणे सरमिसळ करून दिशाभूल करण्याचा आपला प्रयत्न लक्षात आल्याने मी वरील वाक्यप्रयोग केला. त्याला आपल्या कडून प्रतिसाद आला तो असा... धागा "गौरी लंकेश हत्याविषय" असता, "बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो" अशी आपली प्रतिक्रिया, ही तुमचीही "वैचारिक खोली" आणि "विदवत्ता" अधोरेखित करत नाही काय ? असो भक्तांकडून अजून काय आपेक्षावें ? मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा. या प्रतिसादातील आपल्या पहिल्या वाक्यानुसार “धागा "गौरी लंकेश हत्याविषय" असता,” हे माहीत असुन सुद्धा आपण हा प्रतिसाद दिलात “तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.” व केरळ मधील हत्यांशी बादरायण संबध जोडलात बरोबर आणि वर माझ्यावरच आरोप करता की “ मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा.” . आपल्याला माझ्याकडून कोणत्या बिंदुवर मुद्देसूद उत्तर अपेक्षित होते हे न सांगता सरसकट केजरीवाल टाइप बिनबुडाचा आरोप करायचा की मुद्देसूद उत्तर देत नाही. हे बरोबर नाही. मी कुठेही आपल्या व्याकरणावर टीका टीप्पणी केलेली नाही. आपल्या एक विनंती आहे की
नथीतून तीर मारणे
याचा अर्थ तपासून बघा. कारण मला जे काही लिहायचे होते ते मी सरळ व स्पष्ट शब्दांत मांडले आहे. असो, शेवटी आपल्या ईच्छेनुसार "बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो" या प्रतिसादा मागील माझी वैचारिक खोली उलगडुन (अथवा उघडून) दाखवायचा प्रयत्न केला आहे परंतू मला आधिच भक्त बनवल्यामूळे आपल्या कडून प्रतिसादाची अपेक्षा नही.धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान Wed, 09/06/2017 - 21:09 नवीन
गौरी लंकेश यांच्याबद्दल माहिती असलेला इंग्रजी लेख : http://www.oneindia.com/india/who-is-gauri-lankesh-2537310.html बाई नक्षल्यांच्या सहानुभूतीदार असाव्यात. हे लक्षण ठीक नव्हे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 09/07/2017 - 08:51 नवीन
http://www.bigul.co.in/bigul/1478/sec/11/edit%20by%20gauri
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विशुमित गुरुवार, 09/07/2017 - 11:32 नवीन
या लेखामध्ये फेक न्यूजवाल्यांचा चांगलाच बुरखा फाडला आहे . पण "बिगुल' वाल्यानी लिहले म्हणून विश्वास ठेवणार नाही. खातरजमा करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अनुप ढेरे Fri, 09/08/2017 - 10:27 नवीन

Ok some of us commit mistakes like sharing fake posts. let us warn each other then. and not try to expose each other. peace... comrades

— Gauri Lankesh (@gaurilankesh) September 4, 2017
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 11:28 नवीन
ट्वीट मागचा कॉन्टेक्सट "She was particularly concerned about polarization among journalists:"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 11:30 नवीन
As a journalist, Ms Lankesh cast a critical eye on right-wing politics and fiercely opposed the caste system, which led her critics to brand her as a "Hindu hater". She was outspoken about what she saw as a stifling of a certain kind of journalism in India, especially that which expressed left-leaning views, she said in an interview last year. "When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense." In June, Ms Lankesh wrote about Karnataka's history of "attacks on the freedom of the press".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 12:01 नवीन
"When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense." तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं, इतरांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं तर मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी वाटते. हा दुटप्पीपणा नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 13:08 नवीन
the kind of comments that were made about me
(
परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं
) मुद्देसूद प्रतिवादा बद्दल तिच्या मनात भय नसावे . इथं कुठल्या स्त्रीने जरा जर ब्र काढला, तर काही लोक प्रतिक्रियेतुन, "तुझ्यावर बलात्कार करू" अशी धमकी देतात किंवा "मॉर्निंग वॉक घेत चला" असा प्रेमळ सल्ला देतात ..... (ती लोकं* कोण, तुम्हाला चांगलीच कल्पना असावी), अश्या तिच्या जीवाविषयी बरेवाईट होण्याच्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर, ती लोकशाही मतस्वातंत्राबाद्दल जास्त काळजीत होती, अस आहे ते. * भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला लोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 8, 2017 11:50 AM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 14:04 नवीन
जर तिच्याविरुद्ध कोणी काही आक्षेपार्ह लिहिले असेल तर त्याविरूद्ध न्यायालयात जाता आले असते. परंतु त्याविरूद्ध बोलताना 'चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे' असा कांगावा करणे कितपत योग्य? म्हणजे तिने इतरांविरूद्ध काहीही लिहायचं, पण इतरांनी तिच्याविरूद्ध काही बोलायचं नाही. तिच्याविरूद्ध भाजप नेत्याने न्यायालयात जाऊन कायदेशीर मार्गाने तिला शिक्षा द्यायला लावली होती. ज्याअर्थी तिला ६ महिन्यांंची शिक्षा झाली होती त्याअर्थी तिने नक्कीच काहीतरी आक्षेपार्ह आरोप करून बदनामी केली होती हे नक्की. तिच्याविरूद्ध अनेक खटले सुरू होते. अशा व्यक्तीला इतरांच्या भाषेविरूद्ध बोलण्याचा काय हक्क आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 14:25 नवीन
अशा व्यक्तीला इतरांच्या भाषेविरूद्ध बोलण्याचा काय हक्क आहे?
कोणाला बोलण्याचा हक्क आहे की नाही, हे कोण ठरवणार या देशात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 15:02 नवीन
हा जसा मला हक्क नाही, तसा तिला पण हा हक्क नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 15:28 नवीन
प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Fri, 09/08/2017 - 18:17 नवीन
..आणि याच हक्काचा दुरूपयोग केल्यामुळे त्यांना भारतीय न्यायालयाने* शिक्षाही सुनावली होती आणि या बाई जामीनावर बाहेर होत्या. * अफझल गुरूला फाशी सुनावणारी हीच ती न्याययंत्रणा. अर्थात त्यामुळे शर्मिंदा वगैरे वाटत असले तरी भारतात रहायचे म्हणजे न्यायालय, सत्य, वगैरे गोष्टी तुम्हाला नाईलाजाने सहन कराव्या लागणार.. त्याला सध्या तरी पर्याय नाही. (बादवे - मी लिहिलेले वरील वाक्य हक्काच्या दुरूपयोगासंदर्भात असून त्यातून हत्येचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले नाहीये. मुद्दाम डिस्क्लेमर दिले अन्यथा तुम्हाला तुमच्या चष्म्यातून न लिहिलेल्या ओळी दिसतात तसे तुम्हाला इथेही काहीतरी दिसायचे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 19:52 नवीन
प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता .... बरोबर. अगदी तसाच हक्क तिच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यार्‍यांना पण आहे. असे असताना त्यांनी हा हक्क वापरला तर लगेच "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी भीति वाटते" असा कांगावा करणे ही विसंगती नाही का? म्हणजे पत्रकार हे जणूकाही "मोअर इक्वल" गटातले असल्याने त्यांच्यावर कोणीही टीका करायची नाही किंवा टीका केल्यास सभ्य भाषेत करायची, परंतु पत्रकारांनी कोणावर कितीही वाईट शब्दात टीका केली तरी ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या बाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून दुसर्‍यावर वाटेल ते आरोप करायचे पण इतरांनी तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले तर मात्र कांगावा? समजा उद्या असे कोणी म्हणाले की मुस्लिम एमआयएमला मत देत असल्याने भारतातील धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होत आहे, तर असे बोलणे योग्य ठरेल का? कारण मत देणे व कोणाला मत देणे हा मुस्लिमांचा हक्क आहे. तुम्हाला एमआयएम वाईट किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर कृत्ये करणारा पक्ष वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन किंवा निवडणुक आयोगाकडे जाऊन त्यावर बंदी घालावी अशी मागणी करू शकता. परंतु जोपर्यंत त्या पक्षावर बंदी नाही तोपर्यंत त्याला कोणीही मत दिले तर तुम्ही आक्षेप घेणे योग्य नाही. तसेच, जर या बाईंना वाईट किंवा धमकीची ट्विट्स येत असतील तर त्यांनी कायदेशीर कारवाई करायला हवी होती. त्याऐवजी "पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले" अशा स्वरूपाचा कांगावा कशासाठी? समजा या बाईंना असे वाटत असेल की त्यांच्याविरूद्ध वाईट ट्विट करणार्‍यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला आहे, तर त्यांनी व इतर पत्रकारांनी सुद्धा या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलेला नाही का? या बाईंनी स्वतःला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्यामुळेच त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली आहे. अशा व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल किंवा दुरूपयोगाबद्दल बोलणे म्हणजे लालू यादवने भ्रष्टाचाराविरूद्ध बोलण्यासारखे आहे. निधर्मांधांचे दुटप्पी वर्तन अर्थातच नवीन नाही. जी माणसे मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघून नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किंचाळून कांगावा करायचा का डोळ्यांवर पट्टी बांधून मौन पाळायचे, अशांबद्दल कायमच मनात चीड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
थ
थिटे मास्तर Fri, 09/08/2017 - 20:08 नवीन
पण """अभिव्यक्ती स्वातंत्र्य """ """ घटना आणि तिने दिलेले अधिकार"""" हे घोटुन घोटुन बासुंदि झालेले शब्द दिसले म्हणुन आठवले कि मिपावर असे हि सरनौबत आहेत जे खुद्द श्रीनगर मध्ये भारतिय सैनिकाला हे ऐकवुन आलेत कि हे जे कपडे, बुट तु घालतोयस ना ते माझ्या टँक्स च्या पैशातुन आले आहेत. तसल्या कडाक्याच्या थंडित सैनिकाला घाम आणला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा