पुढील लोकसभेसाठी काँग्रेसकडे असलेले पर्याय..
राजकारणातला माझा अभ्यास दांडगा नाही.
पण सध्या देशातले उलट सुलट मतप्रवाह बघितल्यास निदान काही प्रमाणात तरी मोदी सरकार विरोधात जनमत तयार होत आहे असे दिसते आहे (मुद्दे: नोटाबंदी , GST ई).
पण या विरोधी जनमताचा फायदा पुढील लोकसभेत पदरात पाडून घ्यायचा असल्यास काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार द्यावा लागेल (म्हणजे लगेच काँग्रेसला बहूमत मिळेल असे मला म्हणायचे नाही, पण निदान असलेल्या जागा टिकवता येतील वा काही प्रमाणात वाढवता येतील ) राहूल गांधींची लोकप्रियता फारशी नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने कोणत्या नेत्याला समोर आणावे असे तुम्हाला वाटते ?
[मी मोदीभक्ती वा मोदीप्रेम यापैकी कशानेही प्रेरित न होता तटस्थपणे हा धागा काढत आहे, फक्त कॉंग्रेसकडे असलेल्या पर्यांयाचा उहापोह करणे इतकाच माफक उद्देश]
आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं तर " तूर घोटाळा, चिक्की घोटाळा, भोसरी घोटाळा, लोकमंगल घोटाळा'. पचवायला जमलंच नाही. लगेच उघडे पडले. म्हणून तर मिस्टर क्लीन आहेत.हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब मलिक, धन्या मुंडे, अजित पवार असल्या असंतुष्ट निरूद्योग्यांनी पत्रकार परीषदेत केलेले बिनबुडाचे फुसके आरोप होते. आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते.त्यामुळे ते "हाणून मारून इमानदार झाले आहेत"... असो.!!कॉंंग्रेस-राष्ट्रवादीवाले फासावर चढवले किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले तरी ते इमानदार होणार नाहीत.दाऊदचे कथित मित्रआआपची अंजली दमानिया ही केजरीवालांप्रमाणेच एक वाचाळ महिला आहे. बेफाट निराधार आरोप करायचे एवढेच आआपवाल्यांना चांगले जमते. मागील वर्षी आआपच्या गुजरातस्थित मनीष भंगाळे नामक व्यक्तीने असा आरोप केला होता की त्याने पाकिस्तानी फोन कंपनीचे संकेतस्थळ हॅक केले व त्यातून त्याने दाऊदचा क्रमांक मिळविला. त्या क्रमांकावरून केलेल्या कॉल्सच्या यादीत एकनाथ खडसेंचा क्रमांक आहे. या आरोपानंतर लगेचच दमानिया बाईंनी पत्रकार परीषद घेऊन खडसेंचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून त्या मोकळ्या झाल्या. वास्तविक हे प्रकरण व हा आरोप अत्यंत हास्यास्पद होता. दाऊदला पाकिस्तानने संपूर्ण संरक्षण दिले आहे. तो २४ तास आयएसआयच्या संरक्षणात असतो. असल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक रित्या त्याच्या नावावर नोंदलेला असणे अशक्य आहे. हा आरोप करणार्या भंगाळेने आपण हॅक करून मिळविलेल्या पाकिस्तानमधील दूरध्वनी क्रमांकाची यादी ( ज्यात खडसेंचा क्रमांक आहे असा त्याचा दावा आहे) कोणालाही दिलेली नाही अथवा दाखविलेली नाही. सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! या आरोपानंतर खडसेंनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले ही तो क्रमांक एक वर्षापासून वापरात नसल्याने बंद आहे व मला त्या क्रमांकावर पाकिस्तानमधून कधीही फोन आलेला नव्हता. पण हे ऐकण्याच्या मनःस्थितीत दमानिया बाई नव्हत्या. त्यांचे बेलगाम आरोप सुरूच होते. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन भंगाळेला आपले पुरावे घेऊन चौकशीसाठी बोलाविले. दोन वेळा बोलावून सुद्धा तो हजर झाला नाही. शेवटी तिसर्या वेळी समन्स पाठविल्यानंतर तो नाईलाजाने पोलिसांसमोर हजर झाला. पुराव्यांविषयी विचारल्यानंतर त्याने कानावर हात ठेवले व असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले की कोणीतरी त्याचा संगणक हॅक करून ते पुरावे नष्ट केले. जो माणूस स्वतः हॅकर आहे त्याने आपल्या संगणकाला इतरांच्या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण व्यवस्था उभारली नसेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. समजा त्याचा संगणक कोणीतरी हॅक केला यावर क्षणभर विश्वास ठेवला तरी त्याने जे पुरावे गोळा केल्याचा दावा केला होता त्या पुराव्यांचा एखादा बॅकअप ठेवला नसेल यावर विश्वास ठेवणेही अशक्य आहे. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व कोणतेही पुरावे समोर न आल्याने पोलिसांनी बदनामीच्या आरोपावरून त्याला अटक केली. कालांतराने तो जामिनावर सुटला. त्यानंतर दमानिया बाईंचा आवाज गप्प झाला होता. आता जवळपास सव्वा वर्षानंतर दमानिया बाईंनी तेच नाटक परत सुरू केले आहे. मागील आठवड्यात त्यांनी आरोप केला की त्यांना पाकिस्तानहून एक फोन आला होता व फोनवरील माणसाने त्यांना खडसेंवरील खटले मागे घेण्यासाठी धमकी दिली. त्यांनी तो क्रमांक कॉलरआयडीवर तपासल्यावर त्यावर दाऊद-२ असे नाव आले. हा आरोप सुद्धा अत्यंत हास्यास्पद आहे. दाऊद-२ या नावाने दाऊदच्या नावावर दूरध्वनी नोंदलेला आहे या कल्पनेने सुद्धा हसू येते. दमानिया बाईंचा हा बार सुद्धा फुसकाच ठरला. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी व चर्चेत राहण्यासाठी असे हास्यास्पद बिनबुडाचे आरोप करीत राहण्याचे काही व्यक्तींना व्यसन लागलेले आहे.ह्म्म.. या न्यायाने शरद पवार महाराष्ट्रातील निर्विवाद स्वच्छ असे नेते आहेत, असे तुम्ही म्हणावे अशी आशा. ;)पवारांवर न्यायालयात खालील खटले दाखल आहेत. http://indiatoday.intoday.in/story/hazare-files-pil-alleging-25000-crore-scam-names-sharad-pawar/1/849047.html http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/Case-against-Sharad-Pawar/article14872167.ece