Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवेंद्र फडणवीस ख्रिस्ती शाळांची इतकी पाठराखण का करत आहेत ?

स
साहना
गुरुवार, 10/05/2017 - 15:08
🗣 136 प्रतिसाद
फडणवीस ह्यांच्या राज्यांत काय चाललेय हे समजणे थोडे अवघड आहे. मागील ४ वर्षांची RTE थकबाकी भाजप सरकारने हिंदू शाळांना दिलेली तर नाहीच पण ती देण्याची हालचाल सुद्धा सरकार करताना दिसत नाही. ह्यामुळे हिंदी शाळांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला असून त्यामुळे प्राणगी कायदा तोडून सुद्धा बंडाचा झेंडा काही हिंदू शाळांनी उभारलेला आहे. [१] RTE थकबाकी ना देणे म्हणजे शाळांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासारखे आहे कारण जितका उशीर सरकार करेल तितके जास्त नुकसान ह्या शाळांचे होते. हे सर्व कमी पडतेय म्हणून कि काय सरकारने सुमारे ७००० हिंदू शाळांना बंद करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. [२] अर्थांत RTE कायदा ख्रिस्ती शाळांना लागू नसल्याने त्यांची इथे बरीच चांदी होत आहे. २०१६ मध्ये मुंबईतील सर्वोकृष्ट शाळामध्ये १० पैकी ९ शाळा ख्रिस्ती होत्या तर १ शाळाने हिंदू असून सुद्धा RTE कायदा धुडकावून लावला होता. त्यशाळेला सरकारने नोटीस पाठवली होती. फडणवीस ह्यांची स्वतःची मुलगी ख्रिस्ती शाळेंत जाते त्यामुळे त्यांना स्वतःला विशेष फरक पडत नाही. "प्रे फॉर इंडिया" ह्या ख्रिस्तीशाळांच्या धार्मिक कर्यक्रमांत मुखमंत्रानी हजेरी लावली. त्यांच्या बाजूला पिंटो फॅमिली आणि इतर मिशनरी लोक दिसत आहेत. ह्या लोकांनी धर्मांतराचे अनेक कार्यक्रम देशांत घडवून आणले आहेत. [३] Devendra Christian Closure of Hindu schools under RTE [१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no-admission-schools-association-to-govt/articleshow/60383160.cms [२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-closure-notice-due-to-non-compliance-of-rte-norms-2293511 [३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-schools/

प्रतिक्रिया द्या
45739 वाचन

💬 प्रतिसाद (136)
स
साहना Tue, 10/10/2017 - 15:10 नवीन
> आता माझे म्हणणे, आरटीआय कायद्यातल्या फालतू तरतूदी दूर करून तो गैर हिंदू शाळांना सुद्धा लागू करावा. पाठ्यक्रम, शिक्षकांची निवड, त्याचे क्वालिफिकेशन, परिक्षेचे मानके यांसंबंधात एक समान धोरण अंमलात आणावे. ह्या मुद्याला माझी पूर्ण सहमती आहे ! > १. गरीब मुलांनी(हिंदू) खाजगी हिंदू शाळांत प्रवेश घेऊ नये काय? नसल्यास कुठे घ्यावा? की त्यांनी शिकूच नये? - ज्याला जिथे ऍडमिशन मिळत आहे तिथे त्याने खुशाल घ्यावे. - जो माणूस आपल्या पैश्यांची शाळा चालवत आहे (अन-एडेड) त्याने कुणाला प्रवेश द्यावा ना द्यावा हे त्याने ठरवावे. आणि समाज सरकार त्याच्यावर जबरदस्ती करणारच आहे तर धार्मिक भेदभाव नसताना ती जबरदस्ती करावी. - RTE अंतर्गत "गरीब" ह्या शब्दाची व्याख्या केलेली नाही. प्रत्यक्षांत २५% कोटा हा दोन प्रकारच्या लोकांना मिळतो. "आयडेंटिटी बेस्ड" (जात इत्यादी) आणि "इन्कम बेस्ड". केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश नियमाप्रमाणे पहा : From Sec 5-A Step 2: Out of 41 Seats in Std 1, 10 seats are reserved as per the following rules. 6 Seats to SC + 3 Seats to ST + 1 Seat to economically disadvantaged (poor) + disabled from all categories including SC/ST + all other social classes. [१] थोड्क्यात १० पैकी १ सीट इथे खरोखर गरीब मुलाला मिळत आहे. - पण असे समजून चालूय कि SC ST हे सुद्धा नेहमी गरीबच असतात. ह्यांच्या शिक्षणाचा भार संपूर्ण समाजाने उचलला पाहिजे. त्या ७५% मुलांनी असा काय गुन्हा केलाय ? ती मुले थोडीच श्रीमंत आहेत? > ते तर रिइंबर्स होणार ना शाळांना? मागील चार वर्षांपासून फडणवीस सरकारने कोणालाही एक दमडी सुद्धा दिलेली नाही. माझ्या माहिती प्रमाणे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री ह्यांची अनेकदा भेट घेऊन सुद्धा पैसे शाळांना देण्याची त्यांची इच्छाच नाही आहे असे समजते. हे पैसे न मिळाल्याने महाराष्ट्रात आज ३४०० शाळा बंद झाल्या आहेत ज्याच्या विरोधांत पुण्यात काळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. ह्या शाळा बंद झाल्याने त्या २५% मुलांचे नुकसान झालेच पण इतर ७५% मुलांचे सुद्धा नुकसान झाले. http://punemirror.indiatimes.com/pune/civic/rtes-interference-instigates-schools-to-celebrate-black-day/articleshow/60998357.cms > मुळात गरीब लोकांमधून कधीच म्हणजे कधीच समाजावर नियंत्रण राखू शकणारा इलिट वर्ग निर्माण होऊ शकणार नसल्याने त्यांचा विचार करायचा नाही हेच मुळात अती अनैतिक आहे मॅडम. मी असे कधीही म्हटले नाही. गरीब मुलांचे शिक्षण हा महत्वाचा प्रश्न आहे पण धर्माधारित RTE गरीब मुलांचे नुकसान जास्त होत आहे. NISA च्या आकड्याप्रमाणे आज पर्यंत महाराष्ट्र राज्यांत RTE मुळे १०,००० शाळा बंद पडल्या आहेत. ह्या बंद पडलेल्या शाळांत मिनिस्टर, आमदार, इत्यादी मोठ्या लोकांची मुले जात नाहीत तर गरीब लोकांची जातात. शाळा बंद पडल्याने ह्या गरीब मुलांचा नक्की कसा फायदा होतो ? ह्या शाळा चालू असत्या तर कदाचित RTE नसताना सुद्धा जास्त सीट्स उपलब्ध राहिल्या असत्या आणि गरीब मुलांना जास्त चांगले शिक्षण मिळाले असते. [१] http://kvsangathan.nic.in/Generaldocuments/admission-guide-lines.doc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अगम्य Tue, 10/10/2017 - 08:19 नवीन
अॅमी, १) तुम्हीच म्हटले आहे : "हिंदू संचलित शाळांत Rte असुनदेखील हिंदूच शिकतायत, ख्रिस्ती शाळांत Rte नसुनदेखील हिंदूच शिकतायत. प्रॉब्लेम काय आहे नक्की??" म्हणजे हिंदू संचलित शाळांत RTE असणे व ख्रिस्ती शाळांत RTE नसणे अश्या तुम्हीच वर लिहिलेल्या परिस्थितीत तुम्हाला प्रॉब्लेम दिसत नाही. मला मात्र ह्या धार्मिक भेदभावाबद्दल प्रॉब्लेम आहे. २) म्हणून तुम्हाला पुनः एकदा विचारले : "ख्रिस्ती शाळांमध्ये RTE लावून हिंदू (आणि इतर धर्मीय सुद्धा) मुलांनी शिकणे ह्यात काय प्रॉब्लेम आहे नक्की?" जर ख्रिस्ती शाळांमध्ये RTE लावायला तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर ह्याचे सरळ उत्तर, "प्रॉब्लेम नाही" असे असेल. परंतु तुम्ही त्याला बगल देऊन "ख्रिस्ती शाळांमधे हिंदू मुले शिकत नाहीत सध्या?? मला तर वाटत तीच जास्त असतात :-)" असा tangential प्रतिसाद दिला. ख्रिस्ती शाळांना RTE लावण्याबद्दल चकार शब्द नाही. ३) त्याच प्रतिसादात आणखी एक प्रश्न विचारला, "फक्त हे नियम सर्व शाळांना लागू करावे. त्यातून धार्मिक आधारावर सूट देऊ नये. हे तुम्हाला पटते की नाही?" तर त्यावर उत्तर नाही. ४) आणखी एक प्रश्न विचारला, "ख्रिस्ती शाळांत RTE नसल्यामुळे दुर्बल घटकातील मुलांना २५% जागांवर शिकण्याची संधी मिळत नाही. हा प्रॉब्लेम नाही का?" तर त्यावर उत्तर नाही. इतर अनेक मुद्द्यांवर तुम्ही प्रतिसाद दिलेत, परंतु ह्या सरळ प्रश्नांना नाही. ५) तुम्हाला प्रतिसाद देऊन सरळ प्रश्न विचारला, "RTE फक्त हिंदू संचालित शाळांना बंधनकारक करून अल्पसंख्य संचालित शाळांना त्यातून सूट देणे हे अन्याय्य आहे. सबब अल्पसंख्य संचालित शाळांना सुद्धा RTE खाली आणले पाहिजे असे तुमचे मत आहे का ? असल्यास ह्या चर्चेत कुठे व्यक्त झालेले दिसले नाही. तसे असेल तर सांगा. मग आपण एकमेकांशी ह्या मुद्द्यावर सहमत आहोत." इतका सरळ आणि clear प्रश्न विचारला असून सुद्धा त्यावर उत्तर नाही. तुमचे मत काय हे जाणून घेण्यासाठीच इतक्या वेळा प्रश्न विचारले. पुनः एकदा विचारतो "धार्मिक भेदभाव न करता सर्व धर्मियांनी चालवलेल्या शाळांना RTE खाली आणले पाहिजे" असे तुमचे मत आहे का? Simple Yes किंवा No असे उत्तर दिले तर सगळे क्लिअर होऊन जाईल. जर तुमचे मत Yes असेल तर आपली सहमतीच आहे. इतर आणखी काथ्याकूट करायची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पगला गजोधर Tue, 10/10/2017 - 09:04 नवीन
फार फार वर्ष्यापूर्वीची गोष्ट आहे. मिल्कीवे गॅलक्सी मधील नाबु नावाचा ग्रह होता. तिथे डुंगूस्थान नावाचा देश होता. त्याबाद्दल जास्त खोल माहिती उपलब्ध नाहीये पण, काही माहती आहे. तर त्या देशात क्सोक्सो (XOXO) व योयो (YOYO ) नावाच्या धर्माचे लोक राहत होते. त्यांचं लाइफस्टाइल / श्रद्धा वेगवेगळ्या होत्या. लोकसंख्येतील XOXO व YOYO यांचे प्रमाण अनुक्रमे ८५% आणि १५% होते. उदा. संख्याशात्रीय सॅम्पल नुसार प्रत्येक १०० लोकात ८५ XOXO व १५ YOYO लोकं आढळायचे. म्हणजे X = ८५ , Y = १५ आपण असं समजूया की XOXO व YOYO परस्परात लग्न करत नसतील, त्यामुळे एक पालक X , दुसरा Y अशी परिस्थिती नाही. आपण असंही समजून चालूया की XOXO धर्मात परत पोटविभाग जसकी वर्ण आधारित विभागणी नव्हती. XOXO धर्मतील लोकसंख्या एकजिनसी होमोजिनिअस अशी होती व त्यामुळे अंतर्गत भेदभाव उच्चंनीच असं काही नव्हतं. त्याचप्रमाणे YOYO हासुद्धा एकच होमोजिनिअस गट मानूया. देशात लोकशाही होती, आणि सर्व लोकसंख्या, देशभरातील भौगोलिक प्रदेशामध्ये, सरमिसळ विखुरलेली होती. त्यामुळे काय व्हायचं की निवडून येण्यासाठी जास्तीतजास्त ५१% मत मिळाली (जरी १००% मतदान झालं तरीही) तरी निवडून येन शक्य होत. त्यामुळे शक्यतो XOXO चेच राज्यकर्ते / सरकारी अधिकारी असायचे... असो त्यामुळे सरकारने, निदान शिक्षणात तरी योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून, लोकसंख्येच्या प्रमाणात शाळा उघडायला परवानगी दिलेली. म्हणून असं समजूया कि शाळांचे प्रमाण XOXO डॉमिनेटेड व YOYO डॉमिनेटेड शिक्षण संस्थात लोकसंख्येच्या प्रमाणात झालं. उदा. X१ डॉमिनेटेड शिक्षण संस्था = ८५ , Y१ डॉमिनेटेड शिक्षण संस्था = १५ XOXO लोकसंख्येची अथवा YOYO लोकसंख्येची लोक कुठल्याही संस्थेतील शाळेत प्रवेश घेऊ शकत होती. फक्त एक पोटकलंम होत की सरकारी नियमानुसार गरीब विद्यार्थ्यांना काही ठरविक जागा प्रवेश देणे फक्त XOXO डॉमिनेटेड शाळांना बंधनकारक होत. फी घेण्याच्या स्वातंत्र्यावर सुद्धा मर्यादा होत्या. YOYO डॉमिनेटेड शिक्षण संस्था मात्र असे बंधन नव्हते. XOXO धर्माच्या निःष्पक्ष स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्याला असा प्रश्न पडला की आपण हायपोथेसिस मानू व त्याची परीक्षा घेऊन सिद्ध करू कि तो खरा की खोटा. हायपोथेसिस असा YOYO डॉमिनेटेड शिक्षण संस्थाना बंधन नसल्यामुळे, व YOYO शिक्षण संस्थानात (लोकसंख्येच्या विपरीत म्हणजे) ६६ % YOYO विद्यार्थी व ३४% XOXO विद्यार्थी असल्याने, XOXO धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. हा अन्याय कधी संपुष्टात येईल असा समजायचं तर, जेव्हा लोकसंख्येच्या प्रमानाजवळ विध्यार्थी हवे (YOYO डॉमिनेटेड शिक्षणसंस्थामध्ये). सोप्या शब्दात जर YOYO डॉमिनेटेड शिक्षणसंस्था शाळेमध्ये विद्यार्थी प्रमाण जर X = ८५ , Y = १५ असे किंवा याजवळ असेल तर XOXO धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही, असे मानायला हरकत नाही. कोणी मिपाकर करू शकता का मदत ?? नाबु ग्रहातावरील डुंगूस्थान देशाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 10/10/2017 - 13:52 नवीन
है इतकं लिहिण्यापेक्षा वरील रेस्टोरंटचं उदाहरण वाचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 10/10/2017 - 16:22 नवीन
Please also consider, "Whats not being said"...
सोप्या शब्दात जर YOYO डॉमिनेटेड शिक्षणसंस्था शाळेमध्ये विद्यार्थी प्रमाण जर X = ८५ , Y = १५ असे किंवा याजवळ असेल तर XOXO धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही, असे मानायला हरकत नाही.
Whats not being said here: सोप्या शब्दात जर YOYO डॉमिनेटेड शिक्षणसंस्था शाळेमध्ये विद्यार्थी प्रमाण जर X = ८५ , Y = १५ असे किंवा याजवळ असेल तर YOYO धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, असेही म्हणता येईल. कारण जर XOXO डॉमिनेटेड शिक्षणसंस्था शाळेमध्ये विद्यार्थी प्रमाण जर X = ८५ , Y = १५ असे किंवा याजवळ असेल तरंच YOYO धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही, असे म्हणता येईल, व त्यासाठी XOXO डॉमिनेटेड शिक्षणसंस्था शाळेमध्ये विद्यार्थी प्रमाण जर X = ८५ , Y = १५ असे किंवा याजवळ आहे, हे आधी निर्विवादपणे सिद्ध व्हायला हवंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
ए
एमी Wed, 10/11/2017 - 03:01 नवीन
Like!!! (६६ % YOYO विद्यार्थी व ३४% XOXO विद्यार्थी असल्याने >> खरंतर आमच्याकाळी म्हणजे २०+ वर्षांपूर्वी ते प्रमाण ७५% xoxo आणि २५% yoyo असेच होते. इतर शाळांपेक्षा या शाळांत yoyo थोडे जास्त असायचे.... उगाच कुठलातरी बागुलबुआ उभा करायचा आणि स्वतःचे अजेंडे राबवायचे.....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अगम्य Wed, 10/11/2017 - 07:40 नवीन
गजोधर साहेब, तुम्ही मेहनत घेऊन प्रतिसाद टाकत आहात.ह्यावर खुल्या दिलाने चर्चा करू या. तुमच्या उदाहरणातून तुम्हाला असे दाखवायचे आहे की ख्रिस्ती संचालित आणि हिंदू संचालित काय, सर्व शाळांमध्ये बहुसंख्य हिंदू विद्यार्थी असतात. खाली खरे साहेबांनी दिलेली ८५% राखीव जागांवाली उदाहरणे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू या. तर तुमच्या ह्या दाव्याशी बव्हंशी सहमत होण्यास प्रत्यवाय नसावा. ठीक आहे, सर्व शाळांमध्ये बहुसंख्य हिंदू विद्यार्थी असतात असे मान्य करू या. माझ्या मते हा वादाचा मुद्दा नाहीच. आता तुमच्या उदाहरणात तुम्ही म्हटले आहे "सरकारी नियमानुसार गरीब विद्यार्थ्यांना काही ठरविक जागा प्रवेश देणे फक्त XOXO डॉमिनेटेड शाळांना बंधनकारक होत. फी घेण्याच्या स्वातंत्र्यावर सुद्धा मर्यादा होत्या. YOYO डॉमिनेटेड शिक्षण संस्था मात्र असे बंधन नव्हते." शाळा चालवण्याच्या नियमांमधला हा धर्माधारित भेदभाव तुम्हाला मान्य आहे का? की XOXO (हिंदू)आणि YOYO (ख्रिस्ती) संचालित संस्थांना शाळा चालवण्यासाठी सारखीच बंधने व मर्यादा असाव्यात असे तुमचे मत आहे? माझ्या मते मुद्दा हा इतकाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 10/11/2017 - 08:53 नवीन
(ख्रिस्ती) संचालित संस्थांना शाळा चालवण्यासाठी सारखीच बंधने व मर्यादा असाव्यात असे तुमचे मत आहे? माझ्या मते मुद्दा हा इतकाच आहे.
मी अजून मागच्याच पानावर आहे हो सर.
ठीक आहे, सर्व शाळांमध्ये बहुसंख्य हिंदू विद्यार्थी असतात असे मान्य करू या. माझ्या मते हा वादाचा मुद्दा नाहीच.
सर्व शाळांमधे जर हिंदू धर्माच्या विद्यार्थ्यांची मेजॉरिटी आहे, तर हिंदू धर्म धोक्यात आहे अशी कांगवी आवई उठवली का जात आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
स
साहना Wed, 10/11/2017 - 10:02 नवीन
> सर्व शाळांमधे जर हिंदू धर्माच्या विद्यार्थ्यांची मेजॉरिटी आहे, > तर हिंदू धर्म धोक्यात आहे अशी कांगवी आवई उठवली का जात आहे ? कारण consumer कोण आहे ह्या पेक्षा प्रॉडक्ट कोण बनवतो हे महत्वाचे आहे ! रेस्टोरंट चे उदाहरण पहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 10/11/2017 - 11:18 नवीन
कारण consumer कोण आहे ह्या पेक्षा प्रॉडक्ट कोण बनवतो हे महत्वाचे आहे !
परत तेच, पहिली गोष्ट मला कळत नाहीये की, बहुसंख्यात /अल्पसंख्याता हे तुम्ही "प्रॉडक्ट/सर्व्हिस प्रोव्हायडर" यांच्या बेसिसवर कसं काय ठरवू शकता ? तुम्ही हिंदू धर्म धोक्यात कसा आला ? याचं लॉजिक द्या नं आधी प्लिज ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
साहना Wed, 10/11/2017 - 15:04 नवीन
समजा दोन शाळा आहेत : शारदा विद्यामंदिर - जे हिंदू मॅनेजमेन्ट चालवते. सेंट मेरी - जे ख्रिस्ती मॅनेजमेंट चालवते. आपले उदाहरण मी आणखीन सोपे करते. समजा दोन्ही शाळेंतील मुले १००% हिंदू आहेत. एकही ख्रिस्ती मुलगा ह्या दोन्ही शाळेंत शिकत नाही. आपले गृहीतक : १००% ग्राहक हिंदू मुले असल्याने हिंदू समाजाचे नुकसान होत नाही. [ गृहीतक चुकिचे असल्यास सांगावे] ह्या गृहीतकांत कदाचित खालील गोष्टी आपल्या नजरेतून सुटल्या असाव्यात १. दोन्ही शाळेंतील वातावरण सामान नाही. "शिक्षण" हि गोष्ट दोन्ही शाळेंत समान नाही. शारदा विद्यामंदिर हे सरकारी निर्बंधा खाली चालते तर सेंट मेरी ला अनिर्बंध स्वातंत्र्य आहे. सेंट मेरी मध्ये सरस्वती वंदना होणार नाही पण त्याच वेळी तिलक, मेहंदी, इत्यादी गोष्टीवर बंदी असेल. शारदा विद्यामंदिर अश्या प्रकारचे नियम करू शकत नाही. २. सेंट मेरी मध्ये प्रवेश कुणाला मिळेल हे सेंट मेरी ठरवते. इथे ज्याला प्रवेश पाहिजे त्यांनी सेंट मेरी च्या मॅनेजमेंटला खुश करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सेंट मेरी IQ test घेऊन प्रवेश देऊ शकते. हे स्वातंत्र्य शारदा विद्यामंदिर ला नाही. त्यामुळे सेंट मेरी प्लॅन करून आपले सोशल कॅपिटल वाढवू शकते. ह्या उलट शारदा विद्यामंदिर ला सरकारी नियमानुसार आपले ग्राहक ठरवावे लागतात. (उदा उच्च बुद्धयांक असलेली मुले जास्त उच्च शिक्षण घेतील आणि महत्वाच्या पदावर पोचतील) ३. शाळेंत फक्त सिलॅबस शिकवला जात नाही. इथे मुलांची विचार पद्धती सुद्धा घडवली जाते. दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी, अंतिम क्रियेत लाकडाच्या वापरावर बंदी, होळींत पाण्यावर बंदी, गणेश विसर्जनावर बंदी इत्यादी इत्यादी महत्वाच्या विषयांवर हि मुले भविष्यांत कोणती भूमिका घेतील हे त्याच्या लहान वयांत त्यांची विचारपद्धती काय होती ह्यावर अवलंबून आहे. ४. शाळेंत शिक्षक कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार सेंट मेरी ला आहे पण शारदा विद्यामंदिर ला नाही. बहुतेक ख्रिस्ती शाळेंत शिक्षकांच्या जागा त्यांच्या नन्स साठी राखीव ठेवल्या जातात. शिक्षक दिवसाला ६ तास मुलांशी बोलतात. ह्यांत फक्त अभ्यास शिकवलं जात नाही तर इतर व्हॅल्यू सुद्धा शिक्षकांकडून मुलांना प्राप्त होतात. आता खालील प्रश्नाची उत्तरे पाहूया : संघाच्या शाखेवर जाण्याची ह्या दोन्ही मुलांची प्रॉबेबिलिटी काय आहे ? - शारदा विद्यामंदिर मध्ये जाणारा मुलगा - सेंट मेरी मध्ये जाणारा मुलगा ? दही हंडी मघ्ये सहभाग घेण्याची ह्या दोन्ही मुलांची प्रॉबेबिलिटी काय आहे ? - शारदा विद्यामंदिर मध्ये जाणारा मुलगा - सेंट मेरी मध्ये जाणारा मुलगा ? अवांतर वाचना साठी संदर्भ द्या असे एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला सांगितले तर त्याला शिवचरित्र किंवा छावा हे पुस्तक सुचविण्याची प्रोबॅबिलिटी दोन्ही शाळेंत किती आहे ? - शारदा विद्यामंदिर मध्ये ? - सेंट मेरी मध्ये ? सहली साठी एख्याद्या गड किल्ल्यावर जाण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ? - शारदा विद्यामंदिर मध्ये ? - सेंट मेरी मध्ये ? ------ अर्थांत कदाचित संघाच्या शाखेवर जाणे, दही हंडी मध्ये सहभागी होणे, शिवचरित्र इत्यादी गोष्टी महत्वाच्या नसतील सुद्धा पण एखाद्या समाजाला त्या महत्वाच्या वाटत असतील तर अल्पसंख्यांक लोकांना कायद्याचे जे संरक्षण मिळते ते त्या समाजाला सुद्धा मिळणे आवश्यक आहे. --------- आता वेगळे उदाहरण पाहूया. समजा RTE थोडा बदलून आम्ही अल्पसंख्यांकांना जे अधिकार आहेत तेच अधिकार फक्त ब्राह्मण ह्या जातीला दिले. पण इतर बहुजन समाजाला नाही दिले तर चालेल का ? केवळ आकडेवारीच्या दृष्टिकोनातून ब्राह्मणांच्या सर्व शाळांत बहुतेक करून बहुजन समाजाच शिकतो असे जरी दाखवून दिले तर बहुजन समाजाला त्यांच्या शाळा चालविण्याचा अधिकार ब्राह्मण लोकांच्या बरोबरीने नाही हे तात्विक लेव्हल वर तरी कुणालाही मान्य होऊ शकते का ? अश्या कायद्याने ब्राह्मणेतर लोकांचे काहीही नुकसान होत नाही असे आपण म्हणू शकतो का ? -------- पण समजा आपले सर्व मुद्दे मी मान्य केले तर निव्वळ "principles" ह्या दृष्टिकोनातून कायदा सर्व लोकांना समान असावा आणि जात धर्म ना पाहता समान पणे लागू व्हावा असे आपणाला वाटते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
भ
भंकस बाबा Wed, 10/11/2017 - 15:22 नवीन
1++++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
साहना Wed, 10/11/2017 - 16:34 नवीन
शाळा कोण चालवतो किती महत्वाचे आहे आणि त्याचे परिणाम किती दूरगामी आहेत हे कालच्या फटाके बंदीच्या SC ऑर्डर वरून समजते. जज महोदयांनी दोन गोष्टी लिहिल्यात : - campaigns are held in schools to discourage crackers - there is virtually a consensus in society ह्या दोन स्टेटमेंट मध्ये लिंक आहे कि नाही ? भविष्यांत शाळा कोण चालवतो ह्यावरून समाजांत consensus कुठल्या दिशेने आहे हे ठरवेल आणि त्यादिशेने आपले जज, राजकारणी इत्यादी मंडळी सूप धरतील Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
प
पगला गजोधर गुरुवार, 10/12/2017 - 20:08 नवीन
लेखातील एकूण वाक्ये = १२ लेखातील एकूण धर्मवाचक /सूचक शब्द उल्लेख = १२ वेळा (हिंदू, ख्रिस्ती, धर्मांतर, मिशनरी, धार्मिक) लेखातील एकूण वाक्ये ज्यात धर्मवाचक /सूचक शब्द उल्लेख = ९ % उल्लेख (धर्म / सर्वसाधारण ) वाक्ये = (९/११) * १०० = ८१. ८१ = ८२% ================================================================== धाग्याचा हेतू प्रथम दर्शनी मला धार्मिक वाटला (कारण ८२% भर), त्यांनी धर्माचा बहुसंख्य / अल्पसंख्यांक स्टॅंडर्ड गेज वापरला असं म्हणूया. आम्ही विचारलं की धर्मावर अन्याय कसा ? उत्तर मिळाले नाही. नंतर त्यांनी अखिल भारतीय गरीब हिंदू विद्यार्थी अन्यायाचा ब्रॉड गेज घेतला. आम्ही विचारलं की धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय कसा ? उत्तर मिळाले नाही. आता त्यांनी ब्राम्हणांना जातीला धार्मिक अल्पसंख्यांकपणाचा नॅरोगेज घेतलाय , आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही. आता पहिली गोष्ट धार्मिक अल्पसंख्यांक विषय असताना जातीनिहाय अल्पसंख्यांकाचा खोडसाळपणा करण्याची गरज नव्हती..... पण अजेंडा असेल तर करावं लागतं नं ... हायपोथेटिकल प्रश्न विचारायचा तर कोणी असं विचारू शकेल की भारताच्या स्वतंत्रदिनापासूनचा इतिहासात... कशाला अगदी पुष्यमित्र शृंगापासून व्हाया दुसरा बाजीराव ते आज पर्यंत, ब्राम्हणांनी कधी हिंदू धर्मापासून वेगळं धर्म म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी करण्याची वेळ आली का ? तर अजिबात नाही, हजारो वर्ष्यांपासून, ब्राम्हण समाजाला जन्मजात मिळालेलं कॉकपीट कंट्रोल अबसोल्यूट धार्मिक सत्ता व सामाजिक मानसन्मान आणि हिंदू धर्म म्हणजे, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू... त्यामुळे तुमचा मुद्दाच चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. एका व्यक्तीची काही वाक्य मी इथे उधार घेऊन उद्धृत करतो, वाक्य वाचल्यावर ती व्यक्ती कोण हे तुम्हाला आपोआप कळेल. ती व्यक्ती म्हणते.... जेव्हा जेव्हा मनुवादी मनोवृत्ती दुसऱ्याच्या हित जपण्याचा दावा करते, तेव्हा तेव्हा निशंकपणे समजून जावं की ती स्वतःच्या स्वार्थाची गोष्ट करत आहे. जेव्हा जेव्हा मनुवादी मनोवृत्ती म्हणते, अमुक अमुक हिंदू धर्मासाठी ठीक नाही, समजून जावं की ती अमुक अमुक गोष्ट तिच्यासाठी ठीक नाही. जेव्हा जेव्हा मनुवादी मनोवृत्ती म्हणते, 'यह राष्ट्रहितमें नही है', समजून जावं की ती गोष्ट तिच्या हिताची नाही. "
consumer कोण आहे ह्या पेक्षा प्रॉडक्ट कोण बनवतो हे महत्वाचे आहे !
" असे असेल तर, ज्या RTE मध्ये येतात त्या शाळांचे कार्यकारी संचालक यांची जातीनिहाय माहिती जमा केली पाहिजे. हिंदू धर्माची जातीनिहाय माहितीची जर नॉर्मल डिस्ट्रिब्युशन प्रोफाइल काढली, व ती वरील कार्यकारी संचालक यांच्या जातीनिहाय डिस्ट्रिब्युशनशी ताडून पहिली, तर तुमच्या मते या "प्रॉडक्ट कोण बनवतो" डिस्ट्रिब्युशनचा, नॉर्मल डिस्ट्रिब्युशनशी मेळ बसेल का ? माझ्यामते कार्यकारी संचालक यांच्या जातीनिहाय डिस्ट्रिब्युशन हे स्कीवङ SKEWED असेल, आणि ते कुठे झुकलेलं असेल हे ओळखायला आपल्याला तज्ज्ञाची गरज नाही पडणार. हे संचालकीय स्कीवङ डिस्ट्रिब्युशन, एका रात्रीत तयार झालं नाही तर शतकानुशतके ते होत होत, आणि हा स्कीवङनेस एका रात्रीत, काही वर्ष्यात लगेच जाणार नाही. "
संघाच्या शाखेवर जाण्याची ह्या दोन्ही मुलांची प्रॉबेबिलिटी काय आहे ?. . अर्थांत कदाचित संघाच्या शाखेवर जाणे, दही हंडी मध्ये सहभागी होणे, शिवचरित्र इत्यादी गोष्टी महत्वाच्या नसतील सुद्धा पण एखाद्या समाजाला त्या महत्वाच्या वाटत असतील "
तुमच्या मनाप्रमाणे झालं तर, हल्दीघाटीच्या लढाईत अकबर हरला. किंवा विमानाचा शोध भारतात लागला व पुष्पक हे पहिलं विमान वै बिंबवले जाण्याची प्रॉबाबिलिटी काय ? तीच प्रोबॅबिलिटी... जी तुम्ही सेंट मेरीतुन आपेक्षीतता . तुम्हाला म्हणायचंय संचालकीय स्कीवङ डिस्ट्रिब्युशन शाळांना RTE बाहेर ठेवलं तर इथे मुलांची मनुवादी विचार पद्धती सुद्धा घडवली जाणार नाही का ?. गांधी हत्या, विचारवंताच्या हत्या, सविनय कायदेभंग, साहिष्णूतता इत्यादी इत्यादी महत्वाच्या विषयांवर हि मुले भविष्यांत कोणती भूमिका घेतील हे त्याच्या लहान वयांत त्यांची विचारपद्धती काय होती ह्यावर अवलंबून आहे, तर हे मनुवादी काय लहान मुलांना तसंच सोडून देतील का ? थोडक्यात काय मूठभरांच्या हितसंबंधासाठी, आख्या धर्मावर संकट आलंय असा कांगावा करण्याचा हेतू स्पष्ट दिसतोय. "
निव्वळ "principles" ह्या दृष्टिकोनातून कायदा सर्व लोकांना समान असावा आणि जात धर्म ना पाहता समान पणे लागू व्हावा असे आपणाला वाटते का ?
" जोपर्यंत सामाजिक समता निर्विवादपणे स्थापित होत नाही व काहींचा काहींबद्दल सामाजिक स्टिग्मा नाहीसा होत नाही. तोपर्यंत RTE हे कमीतकमी आहे त्या स्वरूपात राहावे, जमल्यास अजून कठोर व्हावा, असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
अ
अगम्य Fri, 10/13/2017 - 06:06 नवीन
गजोधर साहेब, साहना ह्यांचा प्रतिसाद सोडा. मी खाली दिलेल्या प्रतिसादातले मुद्दे नीट वाचा आणि मग सांगा, अल्पसंख्य संचालित शाळांना सुद्धा RTE खाली आणले पाहिजे हे तुम्हाला पटते की नाही. कृपया आधी तो प्रतिसाद पूर्ण वाचा. मी सारे मुद्दे स्पष्ट केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Fri, 10/13/2017 - 07:51 नवीन
आपल्या प्रश्नाचा परत परत कात्रज करण्यात येत आहे यावरून काय तो बोध घ्यावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
स
साहना Fri, 10/13/2017 - 11:32 नवीन
++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अगम्य Sat, 10/14/2017 - 09:47 नवीन
शाळांमधील विद्यार्थ्यांचे धर्म आणि त्यांचे प्रमाण ह्याबद्दल arguments पाहून मला अशी शंका आली की माहिती आणि कळीचे मुद्दे ह्या लेखातून नीट पोहोचले गेले नाहीत. सगळ्यांनीच साहना ह्यांचे आधीचे लेख वाचले असतील असे नाही. म्हणून मी मुद्देसूद मांडणी केली. जेणेकरून विषय नीट माहीतच नाही किंवा मुद्दे नीट स्पष्ट झालेले नाहीत असे कुणाचे व्हायला नको. आता ह्याउप्पर ते वाचून किंवा न वाचता आपापले मत बनवायला किंवा आपल्या आधीच तयार झालेल्या मताला चिकटून राहायला प्रत्येक जण स्वतंत्र आहे. माझे त्यावर काही म्हणणे नाही. इथे कुणाचे मतपरिवर्तन केल्यावर मेडल मिळत नाही की दुसऱ्याचे मत मान्य केल्यावर तुरुंगात जावे लागत नाही. मी फक्त माझ्या परीने मुद्दे मांडले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ए
एमी Sat, 10/14/2017 - 01:24 नवीन
चिगोनी जर याविषयावर लेख लिहिला तर त्या धाग्यावर या मुद्याबद्दलची माझी मतं लिहीन. इथे वर्थ इट वाटत नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
अ
अगम्य Sat, 10/14/2017 - 09:48 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
अ
अगम्य Sat, 10/14/2017 - 09:48 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sat, 10/14/2017 - 10:57 नवीन
हा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
ग
गामा पैलवान Tue, 10/10/2017 - 14:30 नवीन
mayu4u,
हा अपमान नसून मूर्खपणा आहे. कारण हिंदूच आपल्या मुलांना ख्रिस्ती शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपडत असतात.
जे हिंदू आपली बालके ख्रिस्ती शाळांत पाठवंत नाहीत त्यांच्यासाठी देखील हा अपमान आहे. मी हे मुद्दाम स्पष्टपणे लिहितोय. कारण की अत्याचार करणाऱ्याचा खास सन्मान राखणे यांस झिम्मीगिरी म्हणतात. या मनोवृत्तीस चपखल संज्ञा अस्तित्वात आहे. आम्ही हिंदू वैदिक परंपरांचे अभिमानी आहोत. कोण्या तेरेसा, लोयोला किंवा झेव्हियर ची आम्हांस गरज नाही. ज्यांना गरज वाटते ते झिम्मी आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 12/16/2017 - 07:00 नवीन
लंडनमध्ये तुम्हाला समता आहे की झिम्मीगिरी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 12/16/2017 - 09:06 नवीन
ओ बाबुराव, लंडनमध्ये काय आहे ते तुम्हीच ओळख पाहू! बघूया तुमच्या अकलेचा कितपत कस लागतोय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सुबोध खरे Tue, 10/10/2017 - 15:49 नवीन
अल्प संख्यांकाना झुकते मॅप मिळते हि संतापाची गोष्ट आहे. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर या वैद्यकीय महाविद्यालयात १०० पैकी ८५ जागा ख्रिश्चनांसाठी राखीव आहेत आणि त्या जागा विविध चर्चेस च्या शिफारशीने भरल्या जातात. या संस्थेला "बाहेरून" मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो येथे एम बी बी एस केल्यावर चर्चने चालवलेल्या धर्मादाय संस्थांमध्ये दोन वर्षे काम करण्याचा बॉण्ड द्यावा लागतो.या मध्ये त्या विद्यार्थ्याला ख्रिस्ती धर्माचा प्रचारक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. ( हि माहिती ऐकीव नाही तर प्रत्यक्ष काही अशा मिशन रुग्णालयात जाऊन पाहिलेली वस्तुस्थिती आहे) यात पुण्यातील वाडिया रुग्णालय सुद्धा येते. ( हि गोष्ट फारच कमी लोकांना माहित असेल)https://issuu.com/cmai/docs/life-for-all-155/10 The petitioner was sponsored for the M.B.B.S. seat in the third respondent College by M/s.N.M.Wadia Hospital, Pune, which is a private Mission Hospital, being a part of the Pune Christian Medical Association. The Pune Christian Medical Association is a part of the Church of North India, which is a member of the governing council of the third respondent College. http://www.rishabhdara.com/sc/view.php?case=77185 असेच धमतरी ख्रिश्चन रुग्णालय हि मी पाहिले आहे. यांनतर त्यांना परत याच संस्थे मध्ये एम डी ला सुद्धा धार्मिक कोट्यातून प्रवेश मिळतो. हे महाविद्यालय भारतात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. या वर्षी neet न दिलेल्या ख्रिस्ती विद्यार्थ्यांनाप्रवेश घेता आला नाही म्हणून न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे Out of the 100 seats available for the MBBS course, 85 seats are reserved for the minority community, in this case, Christians and 15 seats are in the open category. Students admitted under the minority category are required to serve in one of the mission hospitals run by the society for two years after completing the course. http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/cmc-halts-admissions-over-neet/article19626446.ece संतापजनक गोष्ट अशी आहे कि कित्येक हिंदू लोक ती संस्था दर्जेदार शिक्षण पुरवते असे समर्थन करताना आढळतात. त्यांना मी एकच प्रश्न विचारला कि उद्या समजा तिरुपती देवस्थानाने किंवा सत्य साई संस्थेने फक्त हिंदू मुलांना प्रवेश देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय काढले तर त्याला परवानगी असावी कि नाही. यावर लोक गप्प बसतात. भारतीय लष्कराने दिल्लीतील लष्करी रुग्णालयाला संलग्न असे वैद्यकीय महाविद्यालय काढले ज्यात लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने प्रवेश देण्याचे ठरले होते. हे न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. थोडक्यात काय अल्पसंख्यांकांचे लाड भारतात जितके होतात तितके जगात कोणत्याही देशात होत नाहीत आणि दुर्दैवाने याला आपण हिंदू लोकच जबाबदार आहोत. अल्पसंख्यांकानी संस्था काढाव्या पण त्याना बहुसंख्यांकांचेच नियम लावा.
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 12/16/2017 - 07:20 नवीन
बहुसंख्यांकांच्या शाळेत बहुसंख्याकाच ॲडमिशन द्या , असे सांगावे लागत नाही. कारण एका कॉमन फिल्टरने वेटिंग लिस्ट लावली की त्यात बहुसंख्यांकच असतील. पण अल्पसंख्यांकांच्या शाळेत भांडवल अल्पसंख्यांकांचे आणि ते जर त्यानी त्यांच्या समाजातल्य मुलाना स्पॉन्सर्ड करुन चालवले असेल , तर कायदा फारसे काही करू शकणार नाही. कारण आम्ही आमच्या समाजासाठी आमच्या पैशातून करतो , असा ते स्टॅंड घेतील. शंकराचार्य , तिरुपती , साहना इ हिंदूप्रेमीना इतकी चिंताच असेल हिंदू कॅंडिडेट्सची , तर ज्या स्पॉन्सर्ड सीट्स इतर कॉलेजात वेकंट रहातात , तिथे ते हिंदू कॅंडिडेट् स्पॉन्सर्ड करून पाठवू शकतातच की. त्यासाठी स्वतंत्र महाविद्यालयच कशाला हवे ? हे म्हणजे लेडीज स्पेशल लोकलमध्ये पुरुषाना का जाऊ दिले जात नाही , किंवा मग फक्त पुरुषानाही स्वतंत्र लोकल का नाही , असा वाद असल्यागत वाटते आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Sat, 12/16/2017 - 09:07 नवीन
ओ बाबुराव, भेदभावजनक कायदा कसा गुंडाळून ठेवायला पाहिजे यावर बोला. विषयांतर नको. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ग
गामा पैलवान Wed, 10/11/2017 - 09:18 नवीन
पगला गजोधर,
सर्व शाळांमधे जर हिंदू धर्माच्या विद्यार्थ्यांची मेजॉरिटी आहे, तर हिंदू धर्म धोक्यात आहे अशी कांगवी आवई उठवली का जात आहे ?
गुड क्वेश्चन. ईशान्य भारतातही कोणे एके काळी स्थानिक मुलांची ख्रिस्ती शाळांत अशीच बहुसंख्या होती. आज काही दशकांनी ते लोकं स्वत:ला ख्रिस्ती मानतात. चला तेही चालवून घेऊ. पण आम्हा ख्रिस्त्यांना आमचा प्रदेश भारतापासून स्वतंत्र करून हवा आहे, ही मागणी का म्हणून खपवून घ्यायची? ख्रिस्ती शिक्षण म्हणजे हिंदू धर्माचा आणि पर्यायाने भारताचा विनाश. तो थांबवलाच पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Wed, 10/11/2017 - 13:58 नवीन
गजोधर साहेब, हिंदू धर्म धोक्यात असणे हे बरेच sweeping statement आहे. मी त्यात न पडता objective मुद्द्यांवर बोलत आहे . इथे ३ मुद्दे आहेत. मी फोड करून सांगत आहे. कृपया प्रत्येक ठिकाणी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्या. इथे काही वाद विवाद जिंकणे /हरणे असे नाही तर माहिती आणि विचारांची देवाणघेवाण आहे. आणि फक्त मी जे लिहिले आहे त्यावरच मला प्रामाणिकपणे प्रतिसाद द्या. अल्पसंख्य संचालित शाळांना सुद्धा धार्मिक भेदभाव न करता हिंदू शाळांप्रमाणे RTE खाली आणण्याची कारणे: १) धर्माधिष्ठित भेदभाव (fairness/religious discrimination ) २) शाळा चालवण्याचा उद्योग ३) विद्यार्थ्यांचे कल्याण १) धर्माधिष्ठित भेदभाव : एका धर्माच्या लोकांना शाळा चालवण्याचे वेगळे नियम, आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना वेगळे नियम हा धार्मिक भेदभाव as a principle योग्य आहे का? सगळ्या शाळांमध्ये irrespective of management's religion सारखे operating नियम असावे हे तुम्हाला पटते का? कृपया प्रामाणिकपणे उत्तर द्या. २) शाळा चालवण्याचा उद्योग: शाळा चालवणे हा competitive उद्योग आहे. ह्यात level field सर्वांना असणे आवश्यक आहे. RTE चे निर्बंध (२५% दुर्बल घटकांकडून फी घ्यायची नाही - त्याची reimbursement सरकार देईल म्हणते पण गेली चार वर्षे दिली नाही). देणग्या घेण्यावर निर्बंध (पण competing ख्रिस्ती शाळा देणग्या घेऊन शकतात), फी किती त्यावर निर्बंध (पण ख्रिस्ती शाळांना हे निर्बंध नाहीत) . अशा प्रकारे income वर निर्बंध आणि toilets वगैरेची संख्या काटेकोरपणे पाळणे ह्यासाठीचा खर्च मात्र जास्त (competing ख्रिस्ती शाळांना हे निकष नाहीत). अशा प्रकारे ह्या निर्बंधांमुळे शाळा चालवणे कठीण होते. पण competing ख्रिस्ती शाळांना हे निर्बंध नसल्यामुळे हिंदू शाळा economically compete करू शकणार नाहीत. त्यामुळे हिंदू लोक शाळा चालवणे ह्या व्यवसायातून हद्दपार होतील. भलेही शाळांमधील विद्यार्थी हिंदू असतील, पण बहुसंख्य शाळा ह्या अल्पसंख्य संचालित असतील. आपल्याला शाळा चालवता न येणे, शिक्षणासाठी अल्पसंख्यांकांवर अवलंबून राहणे हे हिंदूंसाठी वाईट नाही का? साहाना ह्यांच्या उदाहरणाप्रमाणे जर हिंदूं हॉटेल चालकांवर जास्तीचा कर लावून त्यांना हॉटेल उद्योगातून हद्दपार केले, तर हिंदू लोक हॉटेलांत जाऊन जेवू तर शकतील पण हॉटेल चालवणारे अगदी मक्तेदारीने अहिंदू असतील. तर ते योग्य आहे का? उद्या कोणी म्हटले की दलित डॉक्टर होऊ शकणार नाहीत. त्यांना रुग्ण म्हणून उपचार मिळतील पण उपचार करणारे नॉन -दलितच असतील तर ते योग्य आहे का? आता कुणी म्हणेल की RTE चे निर्बंध चांगलेच आहेत, त्यांच्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे econommic disadvantage होत नाही. जर तसे असेल, तरीही मग ख्रिस्ती शाळांना सुद्धा हे नियम लावायला काही हरकत नसावी. त्यामुळे ह्या मुद्द्यावर सुद्धा RTE हा सर्व धर्मिय संचालित शाळांना लागू केला पाहिजे हे तुम्हाला पटते का? कृपया उत्तर द्या. ३) विद्यार्थ्यांचे कल्याण: हा मुद्दा गंबा ह्यांनी चांगला सांगितलं आहे. अ ) ख्रिस्ती शाळा RTE खाली येत नाहीत त्यामुळे दुर्बल घटकातील लोकांना त्या शाळांतील २५% जागांवर शिकण्याची संधी मिळत नाही. भलेही त्या शाळांमध्ये शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू असतील पण दुर्बल घटक दूरच ठेवले जातात. वर दिलेल्या मुंबईतील टॉप १० पैकी ९ शाळा ख्रिस्ती असल्याने त्यात दुर्बल घटकातील मुले शिकू शकत नाहीत. म्हणून ख्रिस्ती शाळांना सुद्धा RTE खाली आणले तर वंचितांना त्याचा लाभ होईल. हे तुम्हाला पटते का?कृपया उत्तर द्या. ब ) RTE खाली शाळा चालवण्याच्या निर्बंधांमुळे हिंदू शाळा चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे बऱ्याच हिंदू संचालित शाळा बंद पडत आहेत. असे झाले तर त्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे (including poor students under RTE) नुकसान होईल. आणि ख्रिस्ती शाळांमध्ये RTE नसल्याने त्या शाळा चालवणे संचालकांना परवडेल. म्हणजे ह्या बंद पडलेल्या हिंदू शाळांना ख्रिस्ती शाळा replace करतील. (बहुतेक वेळा ख्रिस्ती लोक ह्या शाळा विकत घेतील किंवा काही करून managementvar सर्व ख्रिस्ती/अल्पसंख्य आणले जातील). थोडक्यात हिंदू संचालित शाळेला ख्रिस्ती संचालित शाळेत convert करून RTE मधून पळवाट काढली जाईल आणि बऱ्याच शाळा ख्रिस्ती शाळा होतील. म्हणजे मुलांच्या नशिबी RTE नाहीच. जर ख्रिस्ती शाळांना RTE लागू केला तर ही पळवाट बंद होऊन मुलांचे कल्याण होईल. हे तुम्हाला पटते का? कृपया उत्तर द्या. वरील मुद्द्यांवरून असे स्पष्ट होते की अल्पसंख्य शाळांना RTE खाली न आणल्याने समाजातील दुर्बल घटकांचे (ज्यातील बहुसंख्य हिंदू आहेत ) शिक्षण घेण्याच्या दृष्टीने नुकसान होते. तसेच शाळा चालवण्याच्या उद्योगात हिंदू समाजाची पीछेहाट होते. मी यथा शक्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही जर तुम्हाला असे वाटत असेल की अल्पसंख्य संचालित शाळांना RTE खाली आणू नये, तर तसे का असावे ह्याचे स्पष्टीकरण तुमच्याकडून वाचायला आवडेल. (पण मला असं वाटतं की वर दिलेले मुद्दे sensible आहेत, आणि तुम्हाला पटतील).
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 10/11/2017 - 15:29 नवीन
एकतर सरकारने पूर्ण लक्ष घालावे नैतर बिल्कुल घालू नये.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/12/2017 - 22:01 नवीन
पगला गजोधर,
RTE हे कमीतकमी आहे त्या स्वरूपात राहावे, जमल्यास अजून कठोर व्हावा, असे माझे मत आहे.
त्याचं काय आहे की RTE लावण्याबद्दल आक्षेप नसून त्यातनं सूट मिळण्याबद्दल आहे. एव्हढं कळलं तरी पुरे. एतद्देशीय (म्हणजे हिंदू बरंका) शिक्षण न दिल्याचा परिणाम म्हणून आरटीइ सारख्या भ्रामक आणि भंपक संकल्पना भारतास आयात कराव्या लागल्या आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 10/13/2017 - 10:36 नवीन
Indian private sector job: भारतात जात पाहून नोकरी देतात: प्रा. हॅन्सन - indian private sector gives jobs after seeing cast - Maharashtra Times - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/indian-private-sector-gives-jobs-after-seeing-cast/articleshow/61055412.cms?utm_source=whatsapp
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 12/16/2017 - 06:44 नवीन
ख्रिस्ती शाळा सेक्युलर , अहिंदू संस्कृती शिकवतात , हाही आरडाओरड सुरु आहे. अन सामान्य हिंदू मुलाना , मागासवर्गियाना तिथे शिकायला मिळत नाही , असाही आक्रोश् सुरु आहे. ख्र्स्चन शाळांचे पदाधिकारी हिंदू मुलाना बांधून नेतात का ? इथेच शिका म्हणून ? ७५ % लोकसंख्या हिंदुंची , रिसोर्सेस् हिंदुंच्याच ताब्यात , मग तुम्हाला हव्या तशा शाळा काढा. कायद्यासमोर सर्व सारखे असले तरी आपले रेपुटेशन आपणच वाढवावे लागते. अन्यथा शाहरुख् खानच्या सिनेमाला भर्पूर मल्टिप्लेक्स मिळतात , मग मला का नाही , असे गोपीकिशनने म्हणावे , असा प्रकार होइल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 12/16/2017 - 09:05 नवीन
ओ बाबुराव, इथे कायद्यातून सूट का दिली जाते असा प्रश्न आहे. कायदा भेदभावजनक असल्याने तो गुंडाळून ठेवायला हवाय याविषयी चर्चा चालू आहे. कृपया विषयाला धरून बोलावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
व
वामन देशमुख Sat, 12/16/2017 - 09:19 नवीन
कायद्यासमोर सर्व सारखे असले तरी आपले रेपुटेशन आपणच वाढवावे लागते.
हितंच समदा घोळ हाय बगा. या कायद्यासमोर सर्वजण समान नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा