Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार

म
मिल्टन
Tue, 10/24/2017 - 17:02
🗣 98 प्रतिसाद
साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो आणि कुर्ला स्टेशनवर नव्या मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेनची वाट बघत होतो. बर्‍याचदा संध्याकाळी भूक लागली की मी स्टेशनवरून खायला एखादा बिस्किटाचा पुडा घेतो.त्याप्रमाणे त्या दिवशी मी एक बिस्किटाचा एक पुडा घेतला. तो पुडा होता १० रूपयाचा. मी त्या स्टॉलवाल्याला १०० ची नोट दिली. वरचे पैसे परत देताना त्याने ५० ची एक नोट दिली आणि २० रूपयाच्या दोन नोटा दिल्या. तेवढ्यात माझी गाडी आली त्यामुळे त्या नोटा घेऊन घाईघाईतच मी गाडीत चढलो. नंतर लक्षात आले की त्या ५० रूपयाच्या नोटेला एका बाजूला पूर्ण भागावर लाल रंग लागला होता आणि त्यामुळे कोणीही ती नोट घेणे शक्य नव्हते. दुसर्‍या दिवशी मी त्या स्टॉलवाल्याला त्या नोटेविषयी विचारले असता त्याने अपेक्षेप्रमाणे ती नोट दिल्याचेच नाकारले. विनाकारण ५० रूपयाचा खड्डा पडला. हा प्रकार म्हणजे माझी झालेली फसवणूकच होती. त्याची चांगली ४ दिवस चुटपुट लागून राहिली होती. वास्तविकपणे ५० रूपये ही ४ दिवस चुटपूट लागावी इतकी मोठी रक्कम होती का? नक्कीच नाही. तरीही चुटपूट लागायची ती लागलीच. आपल्या चुकीने पैसे गमाविण्यापेक्षा दुसर्‍या कोणी फसविल्यामुळे पैसे गमावायला लागले त्याचे दु:ख कितीतरी जास्त असते. ते कारण होते का? तर तसेही वाटत नाही. कारण अशाप्रकारे इतर कोणी फसविल्यामुळे यापूर्वीही असे पैसे गमावले होते आणि त्यावेळी इतकी चुटपूट लागली नव्हती. अशाप्रकारची दोन उदाहरणे पटकन लक्षात आली. पहिले उदाहरण होते २००८ मधील. माझ्या आईच्या फोनवरील प्रिपेड कार्ड रिचार्ज करायला मी आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यातून १०० रूपये ऑनलाईन बँकिंगद्वारे भरले होते. माझ्या खात्यातून पैसे तर गेले पण रिचार्ज शेवटपर्यंत झालेच नाही. बँकेत विचारले तर ते म्हणत होते की फोन कंपनीला विचारा आणि फोन कंपनी म्हणत होती बँकेला विचारा. मधल्यामध्ये माझे मात्र नुकसान झाले. २००८ मधील माझी एकूण परिस्थिती आणि उत्पन्न लक्षात घेता त्यावेळच्या १०० रूपयांचे मला २०१७ मधील ५० रूपयांपेक्षा कितीतरी जास्त महत्व होते. तरीही त्या फसवणुकीची मला ४ दिवस चुटपूट लागल्याचे लक्षात नाही. दुसरे उदाहरण म्हणजे २०१५ मधील. फोनवर मी यु.टी.एस म्हणून एक अ‍ॅप डाऊनलोड केले होते. त्या अ‍ॅपद्वारे फोनवर मुंबईतील लोकल ट्रेनची तिकिटे काढता येतात. फोनवरील जी.पी.एस वरून आपण नक्की कुठे आहोत हे ट्रॅक करून आपण जर स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असू तर तिकिट फोनवर काढता येईल असे त्या अ‍ॅपविषयी ऐकले होते. त्या अ‍ॅपवरील वॉलेटमध्ये मी २०० रूपये टाकले. माझे घरही स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असल्यामुळे माझी कल्पना होती की मला घरूनही तिकिट काढता येईल. अगदी घरून नाही तरी स्टेशनला जात असताना तरी तिकिट नक्कीच काढता येईल अशी माझी अपेक्षा होती. पण कुठचे काय. कुठेही असले तरी 'स्टेशनच्या जवळ जा आणि मग तिकिट काढा' हेच पालुपद त्या अ‍ॅपने चालू ठेवले. शेवटी वैतागून मी ते अ‍ॅप अन-इन्स्टॉल करून टाकले. अर्थातच त्या अ‍ॅपच्या वॉलेटमधील २०० रूपयेही गेले. या गोष्टीची मला किती वेळ चुटपूट लागली होती? तर फार वेळ नाही. या तीन उदाहरणात झालेली फसवणुक हा एक समान घटक असला तरी एक महत्वाचा फरक आहे. पहिल्या उदाहरणात मी रोख पैसे दिले होते आणि मला फटका बसला होता तो रोख स्वरूपात बसला होता. तर उरलेल्या दोन उदाहरणात बसलेला फटका कॅशलेस होता. हा फरक वगळता तीनही उदाहरणात फार फरक नव्हता. उलट बसलेल्या फटक्याची रक्कम पहिल्या उदाहरणात बरीच कमी होती तरीही त्याची चुटपूट मला कितीतरी जास्त प्रमाणात लागली होती. हे का होत असावे? कुर्ला स्टेशनवर फटका बसण्यापूर्वी मी एम.आय.टी चे प्राध्यापक डॅन एरिअली यांचे Predictably Irrational हे एक नितांतसुंदर पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात त्यांनी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यांनी एम.आय.टी च्या विद्यार्थ्यांच्या डॉर्ममधील फ्रिजमध्ये एक डॉलर किंमतीच्या दहा कोकच्या बाटल्या ठेवल्या. आठवड्याभराने त्यांनी त्या बाटल्या तिथे आहेत का हे तपासले असताना एकही बाटली तिथे राहिली नव्हती. याचाच अर्थ कोणीतरी त्या बाटल्या लंपास केल्या होत्या. दुसर्‍या प्रयोगात त्याच फ्रिजमध्ये त्यांनी एक डॉलरच्या दहा नोटा ठेवल्या. आठवड्याभराने परत तपासले असताना त्यांना आढळले की सगळ्या नोटा जिथल्या तिथे होत्या. एकही नोट लंपास झाली नव्हती. म्हणजेच एक डॉलर किंमतीच्या कोकच्या बाटल्या हातोहात लंपास झाल्या पण नोटा मात्र जशाच्या तशा राहिल्या. एक डॉलरच्या कोकच्या बाटलीची चोरी करण्यात संबंधित व्यक्तींना आपण फार काही वावगे करत आहोत असे वाटलेही नसावे पण एक डॉलरच्या नोटेची चोरी करताना मात्र ती नोट घेऊन आपण काहीतरी चुकीचे करू असे त्यांना नक्कीच वाटले असणार. अन्यथा त्या नोटा तशाच तिथे राहिल्या याची कारणमिमांसा देता येणार नाही. याचा अर्थ काय?प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात की रोख रक्कम आणि तितक्याच किंमतीची वस्तू या दोन गोष्टींविषयी आपली मानसिकता वेगळी असते. जेव्हा रोख रकमेचा संबंध असतो तेव्हा आपल्या विवेकाची अधिक टोचणी आपल्याला लागते. पण एखादी गोष्ट जितक्या प्रमाणात रोख स्वरूपापासून दूर जाते तेवढ्या प्रमाणात आपल्या विवेकाचे आपल्यावरील नियंत्रण कमी होत जाते. कुर्ला स्टेशनवरील त्या घटनेनंतर मला जाणवले की नुसत्या चोरीच्या बाबतीत नाही तर नुकसानीच्या बाबतीतही नेमके असेच घडत असावे. म्हणजे रोख नुकसान झाल्याची चुटपूट आपल्याला कॅशलेस नुकसान झाल्यापेक्षा जास्त लागते का? बहुतेक तसेच असावे. अर्थात माझ्या या लेखाचा विषय नुकसान हा नाही तर भ्रष्टाचार (म्हणजे चोरीच) हा आहे. ही घटना त्या दृष्टीने विचार करायला लावणारा केवळ एक ट्रिगर होता. मी त्या पुस्तकातील संबंधित भाग परत एकदा वाचून काढला. कुर्ला स्टेशनवरील घटना घडण्यापूर्वी केवळ एक चांगला (आणि मनोरंजक) अभ्यास यापेक्षा जास्त महत्व मी त्या भागाला देत नव्हतो. त्यातील अनेक गोष्टी नंतर अधिक प्रमाणात पटायला लागल्या. प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात त्याप्रमाणे आपण ऑफिसच्या स्टेशनेरीमधून पेन घेतले आणि आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले असे किती वेळा होते? ऑफिसचे पेन घेऊन ते आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले तरी ती कंपनीमधून केलेली चोरीच असते. तरीही आपण तसे करताना काही चुकीचे करत आहोत हा विचारही आपल्या मनाला बर्‍याचदा शिवत नाही. समजा आपण घेतलेले पेन १० रूपयांचे आहे असे धरून चालू. आपल्यापैकी किती जण कंपनीमधील पेटी कॅशमधून १० रूपयाची नोट उचलून ती आपल्या खिशात घालतील? मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही तसे करेल. म्हणजेच काय तर रक्कम सारखीच असली तरी तेवढ्याच रकमेच्या नोटेची चोरी करायचा आपण विचारही करू शकणार नाही. याचे कारण आपली विवेकबुद्धी रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेली गोष्ट यांच्यात फरक करते. मी नक्की कोणत्या रोखाने बोलत आहे हे एव्हाना मिपाकरांच्या लक्षात आलेच असेल. एखादी गोष्ट जेवढी रोख रकमेपेक्षा दूर जाते तितक्या प्रमाणात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण कमी होते. बरं आतापर्यंत मी जी उदाहरणे दिली आहेत त्यातील रक्कम किरकोळ होती (५० रूपये, १० रूपये इत्यादी). मोठ्या रकमेचा संबंध असेल तर आपली (आपली म्हणण्यापेक्षा माणसाची) विवेकबुध्दीची टोचणी जास्त लागून ती चोरी टाळण्याकडे कल असेल का? असेलही कदाचित. प्राध्यापक डॅन एरिअलींनी आणखी एक प्रयोग केला होता आणि त्यात निष्कर्ष निघाला की संधी मिळाल्यास आणि पकडले जाणार नाही याची बर्‍यापैकी खात्री असेल तर बहुतांश लोकांचा फसविण्याकडे कल असतो. पण असे फसविणे अमर्याद नसते. म्हणजे बहुसंख्य लोकांचा फसविण्याकडे कल जरी असला तरी ते मऊ लागले म्हणून कोपरापासून खणत नाहीत आणि थोडेसेच फसवितात. याचे कारण काय---तर एका मर्यादेपेक्षा जास्त फसवणुक करताना माणसाच्याच विवेकबुध्दीची टोचणी लागते असे म्हणायला हरकत नसावी. म्हणजे हा निष्कर्ष म्हणजे मी म्हणत आहे त्याचा विरोधाभास झाला का? वरकरणी तसे वाटू शकेल. पण यातही काही गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'एका मर्यादेपेक्षा कमी' ही बरीच फसवी संकल्पना आहे. समजा ५ रूपयांची चोरी ही ती मर्यादा असेल आणि ती एकदा गाठल्यावर ५ रूपयांची मर्यादा वाढून १० मग २० मग ५० मग १०० रूपये व्हायची शक्यता आहेच. आपल्यासारख्यांना (किमान माझ्यासारख्यांना) चोरी करायचीच असेल तर फार तर एखादे पेन चोरणे किंवा गेलाबाजार खोट्या रिसीट्स देणे, इकॉनॉमी क्लासने जाऊन बिझनेस क्लासचे तिकिट घेणे यापेक्षा फार मोठी उडी सध्या तरी मारता येणार नाही. पण मोठ्या अधिकाराच्या व्यक्तींकडे चोरी करायच्या बर्‍याच जास्त संधी उपलब्ध असतात. आणि जर का 'एका मर्यादेपेक्षा जास्त' चोरी करायची नसेल तरी ती मर्यादा अमर्याद वाढू शकेल इतके अधिकार आणि संधी त्यांच्याकडे असतात. याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणजे एनरॉनचा घोटाळा.कॉर्पोरेट अमेरिकेमधील २००१ मधील तोपर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा होता. हा घोटाळा काही शे बिलिअन डॉलर्सचा होता. अर्थातच इतका घोटाळा काही एका रात्री झालेला नाही. अकाऊंटिंगमधील घोटाळे त्यापूर्वी कित्येक वर्षे सुरू झाले होते. आपली चोरी पकडली जात नाही म्हटल्यावर हळूहळू धीर चेपून आधीचे घोटाळे पचवून केनेथ ले आणि इतरांनी अधिकाधिक मोठे घोटाळे केले असतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे. भारतातही रामलिंग राजूने सत्यममध्ये प्रत्यक्षात कंपनीत कामाला नसलेले १२ हजार कर्मचारी दाखवून त्यांचे खोटे सॅलरी अकाऊंट तयार करून त्या खात्यांमध्ये येणारे पैसे स्वतःच्या खिशात घातले होते असे म्हणतात. आता रामलिंग राजूने अशी चोरी एका रात्रीत सुरू केली का? तसे वाटत नाही. सुरवात कदाचित १०० खोट्या सॅलरी अकाऊंटमधून झाली असेल. मग हळूहळू धीर चेपून आणखी खोटे अकाऊंट त्याने तयार केले असतील हे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते. तेव्हा 'एका मर्यादेपेक्षा' जास्त मोठी चोरी करताना विवेकबुध्दीची टोचणी लागते हे म्हणणे 'त्या मर्यादेपर्यंतच' लागू ठरेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ती मर्यादा अधिकाधिक वाढत जायची शक्यता आहेच. आपल्यापैकी कोणी मोठा रामलिंग राजू होईल याची शक्यता फारच थोडी. पण माझा मुद्दा हा आहे की असे छोटे रामलिंग राजू आपल्या अवतीभोवती (कदाचित आपल्यातच) लपलेले असतात. मी अमेरिकेत असताना (२००३ मध्ये) मी ज्या विद्यापीठात होतो त्या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना डॉट. कॉम क्रॅशमधून नुकत्याच सावरणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतातील पूर्वीचा आय.टी अनुभव नसेल तर नोकरी मिळणे कठिणच होते. खोटे सी.व्ही बनविणार्‍या एजंटांचे प्रस्थ त्यावेळी तितक्या प्रमाणात आमच्या विद्यापीठात आलेले नव्हते. अशावेळी अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरी न मिळाल्यामुळे भारतात परत जावे लागले होते. जाताना अशा अनेकांनी क्रेडिट कार्डावरील बिले न भरताच भारतात प्रयाण केले होते (काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही रक्कम एकापेक्षा जास्त कार्डांवर मिळून १० हजार ते १५ हजार डॉलर्सपर्यंत होती) हे भारतीय विद्यार्थ्यांच्या कम्युनिटीमध्ये अगदी उघडे गुपित होते. अशा काही विद्यार्थ्यांना मी स्वतः ओळखतो. त्यांनी १० ते १५ हजार डॉलर्स काय तर इतरांचे १० रूपयेसुध्दा रोखीमध्ये चोरले नसते. तरीही असे काही हजार डॉलर्स चोरण्यात आपण काही चुकीचे करत आहोत ही जाणीव त्यांच्याकडे असली तरी ती जाणीव ती कृती करण्यापासून रोखण्याइतकी प्रबळ नव्हती. वॉलमार्टमध्ये एखादी वस्तू वापरायची आणि मग ती परत करायची असे करणारे लोक आपणही आजूबाजूला बघितले असतीलच. ती पण एका अर्थी चोरी झाली नाही का? पण तरीही असे लोक २०-५० डॉलरची रोखीत चोरी कधीच करणार नाहीत हे आपल्यालाही जाणवेलच. एनरॉन घोटाळ्यात समजा अमेरिकेतील प्रत्येक माणसामागे सरासरी १०० डॉलर्सचे नुकसान झाले असे समजू. केनेथ ले आणि इतरांनी रस्त्यात दिसलेल्या कोणाही माणसाचे पाकिट मारून त्यातील १०० डॉलर्स चोरले असते हे जरा असंभवनीयच वाटते. आता वळू कॅशलेस जगताकडे. मागच्या वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहिर केली आणि त्यामागे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देऊन भ्रष्टाचार कमी करणे हे एक कारण आहे असे म्हटले गेले होते. पण माझा दावा असा आहे की वर दिलेल्या उदाहरणांवरून आपल्याला दिसते की रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेल्या गोष्टी (वस्तू किंवा ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे केलेले व्यवहार) यांच्यात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील असलेल्या नियंत्रणाचे प्रमाण वेगळे असते. अशावेळी समजा सगळे व्यवहार कॅशलेस झाले (भारतात सध्या तरी तसे होणे कठिणच आहे पण समजा अजून ५० वर्षांनी ते शक्य झाले) तर भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढू शकेल का? आपण अगदी लहानपणापासून रोख रकमेला पैसा म्हणूनच ओळखतो आणि वर दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल की ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारांमध्ये आपल्या विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण रोख रकम हाताळताना असते तितक्या प्रमाणात नसते. तरीही आपल्यावर ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारात विवेकबुध्दीचे जितके कितके नियंत्रण असते त्यात 'हा पण पैसाच आहे' ही भावना असेल का? आणि जर मुळात रोख रक्कम हाताळलीच नाही तर 'हा पण पैसाच आहे' ही भावना आणखी कमी होऊ शकेल का? सुरवातीला जर लहान कॅशलेस चोरी केलेली पकडली गेली नाही म्हणून धीर चेपत मोठ्या चोर्‍या व्हायला लागल्या आणि मुख्य म्हणजे रोख रक्कमेचा संबंध नसेल तर अजून जास्त मोठे घोटाळे केले जायची शक्यता आहे का? कोणी म्हणेल की अकाऊंटिंग मधील घोटाळे पहिल्यापासूनच 'कॅशलेस' होते. मग कॅशलेस अर्थव्यवस्था आणल्यामुळे त्यात होणार्‍या भ्रष्टाचारात काय मोठा फरक पडेल? त्यावर माझे म्हणणे असे की जर पूर्ण कॅशलेस व्यवहार झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक लोकांना असे घोटाळे करायची संधी मिळेल कारण पूर्वी असे मार्ग मोठ्या पदांवरील लोकांनाच खुले होते पण सगळे कॅशलेस झाल्यास नेटवर्क आणि आय.टी यामुळे जास्त लोकांना तो मार्ग खुला होईल. त्यातच रोखीत व्यवहार नसतील तर अनेक लोकांच्या विवेकबुद्धीचे नियंत्रण ढिले पडेल. हे करता येणे कसे शक्य होईल? मी काही चोर नाही त्यामुळे असे करता येणे कसे शक्य होईल याविषयी माझ्या कल्पनाशक्तीची उडी मर्यादितच असेल. तरीही आपण जिथेजिथे पैसे भरतो (स्टोअरमधून सामान विकत घेताना किंवा अन्य कुठेही) तिथेतिथे संबंधीत व्यवसाय करणार्‍या कंपनीला आपल्याला गंडा घालायची संधी अधिक प्रमाणात मिळेल ही भिती आहे.आपण महिन्याभरात कित्येक व्यवहार करत असतो. समजा हे सगळेच व्यवहार कॅशलेस असतील तर त्याचे कुठेतरी (बँक खात्यात किंवा क्रेडिट/डेबिट कार्डात) स्टेटमेन्ट येईल. असे कित्येक व्यवहार असतील तर काही व्यवहारात आपल्याला गंडा घातला गेला तरी तो आपल्याला लक्षातही येणार नाही. आणि त्यातून सगळे कॅशलेस असेल तर गंडा घालणार्‍यावर त्याच्या विवेकबुध्दीचे नियंत्रण काही प्रमाणावर ढिले पडलेले असेल ही शक्यता आहे आणि कॅशलेस गंडा पडल्यास आपल्यालाही त्याविषयी तितक्या प्रमाणावर दु:ख न वाटल्यास आपणही ते प्रकरण तडीस न्यायचा प्रयत्न करूच असेही नाही. असा गंडा घालण्यासाठी फार काही करायला लागेल का? कदाचित आय.टी सिस्टिममध्ये बॅक-एन्डला थोडे फेरफार केले तरी तसा गंडा घालता येऊ शकेल. आतापर्यंत असे घोटाळे करणार्‍यांनी घोटाळे करायचे नवेनवे मार्ग शोधून काढले आहेतच. १९९५ मध्ये नीक लिसन या एकट्या ट्रेडरने २३० वर्षे जुनी बेरिंग्ज बँक बुडवली. ज्या ट्रेडमध्ये तोटा होईल असे ट्रेड तो ८८८८८८८८ या खोट्या खाते क्रमांकात तो पोस्ट करत असे आणि ज्या ट्रेडमध्ये फायदा होईल असे ट्रेड तो कंपनीच्या अकाऊंटमध्ये पोस्ट करून कंपनीला मोठा फायदा करून दिल्याचे श्रेय घेऊन स्वतः गलेलठ्ठ बोनस घेत असे. जोसेफ जेट या ट्रेडरने किडर पीबॉडी कंपनीतील सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बगचा गैरफायदा उठवून कंपनीने न केलेला फायदा दाखवून त्यानेही त्याचे श्रेय स्वतःकडे घेऊन असाच गलेलठ्ठ बोनस घेतला होता. नीक लिसन आणि जोसेफ जेट यांचे ग्रह फिरले म्हणून त्यांचे कृत्य उघडकीस आले. पण कदाचित त्यांच्या नंतरच्या ट्रेडमध्ये फायदा झाला असता तर ते आपले चोरीचे कृत्य लपवूही शकले असते आणि ते कोणाला समजलेही नसते. आजही असे किती नीक लिसन आणि जोसेफ जेट आहेत कुणास ठाऊक. माझी भिती ही आहे की सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्यास पूर्वी मूठभर ठिकाणी अशा फसवणुक करायच्या संधी उपलब्ध होत्या त्या इतर अनेकांना उपलब्ध होतील. त्यातून रोखीत व्यवहार कधी केलेच नसतील आणि त्यामुळे विवेकबुध्दीचे नियंत्रण ढिले पडले तर त्यामुळे अधिक प्रमाणावर आणि वेगवेगळ्या पध्दतीने भ्रष्टाचार होऊ शकेल ही भिती वाटते. घोटाळे करणारे प्रत्येकवेळी नवीन नवीन मार्ग शोधून काढतीलच. तो मार्ग आजही उपलब्ध असला तरी सध्या रोखीत व्यवहार केल्यामुळे काही प्रमाणात तरी विवेकाची टोचणी असते. तीच जर का कमी झाली तर मात्र मोठ्या समस्या निर्माण होतील ही भिती वाटते. कदाचित हे सगळे स्वप्नरंजन असेलही.कदाचित यापैकी काहीही प्रत्यक्षात उतरणारही नाही. तसे झाल्यास फारच उत्तम. पण असे व्हायची शक्यता आहे का? याविषयी आपले मत काय?
वर्गीकरण
अर्थकारण
नितीमत्ता

प्रतिक्रिया द्या
24491 वाचन

💬 प्रतिसाद (98)
म
मिल्टन Tue, 10/24/2017 - 17:03 नवीन
हा लेख नोटबंदीच्या पहिल्या वर्धापनदिनी (८ नोव्हेंबरला) प्रसिध्द करणार होतो. पण ८ नोव्हेंबरनंतर २-३ दिवस बाहेरगावी जाणार आहे. त्यामुळे त्यावेळी चर्चेत भाग घ्यायला मिळणार नाही. तेव्हा हा लेख तयार झाल्यावर आजच प्रसिध्द केला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 10/24/2017 - 17:30 नवीन
विवेकबुद्धी चे नियंत्रण सुटणे म्हणजे काय हे कळलं नाही. रोख पैसे दिसतो, तो जाताना येताना कळतो, म्हणून त्याचा आनंद आणि दुःख जास्त असते असे माझे मत आहे. माझ्या पाकिटातून पैसे गेले की त्याचा आकार बारीक होतो, अकौंटमधून गेल्यावर तसे होत नाही. त्यामुळे त्याचा भ्रष्टाचाराशी असलेला संबंध कळला नाही. सामान्य माणूस कुठे फसवणार, जिथे नजरबंदी करता येते तिथेच. दुर्दैवाने कॅशलेसमध्ये नजरबंदी जमत नाही, तिथे सगळे लिखित असते, त्यामुळे फसवणे अधिक कठीण होणार आहे असे माझे मत आहे. बाकी विवेकाची टोचणी ही कॅशलेसमध्ये देखील काही प्रमाणात असेलच नाही का?
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 10:42 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 10:43 नवीन
या सर्व मुद्द्यांविषयी काही वेळापूर्वी लिहिलेल्या प्रतिसादात लिहिले आहे.
बाकी विवेकाची टोचणी ही कॅशलेसमध्ये देखील काही प्रमाणात असेलच नाही का?
नक्कीच. फक्त माझा दावा असा आहे की ही टोचणी रोख रकमेशी डिल करताना असते त्यापेक्षा कमी असते. त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्या तर घोटाळे पूर्वी उच्चपदस्थ करू शकायचे ते करायची संधी इतरांनाही मिळेल म्हणून कॅशलेस अर्थव्यवस्थेत घोटाळे वाढू शकतील . कदाचित हजार कोटींच्या एका घोटाळ्याऐवजी एक लाख रूपयांचे लाखो घोटाळे असे स्वरूप येऊन एकूण होणारे नुकसान तेवढेच किंवा जास्तही असू शकेल अशी भिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 10:44 नवीन
या सर्व मुद्द्यांविषयी काही वेळापूर्वी लिहिलेल्या प्रतिसादात लिहिले आहे.
बाकी विवेकाची टोचणी ही कॅशलेसमध्ये देखील काही प्रमाणात असेलच नाही का?
नक्कीच. फक्त माझा दावा असा आहे की ही टोचणी रोख रकमेशी डिल करताना असते त्यापेक्षा कमी असते. त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्या तर घोटाळे पूर्वी उच्चपदस्थ करू शकायचे ते करायची संधी इतरांनाही मिळेल म्हणून कॅशलेस अर्थव्यवस्थेत घोटाळे वाढू शकतील . कदाचित हजार कोटींच्या एका घोटाळ्याऐवजी एक लाख रूपयांचे लाखो घोटाळे असे स्वरूप येऊन एकूण होणारे नुकसान तेवढेच किंवा जास्तही असू शकेल अशी भिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
द
दीपक११७७ Tue, 10/24/2017 - 17:42 नवीन
नेमका घोटाळा कसा होईल cash less मध्ये आजच्या high technology मध्ये हे सांगितले असते तर उहा पोह करता येईल. कारण fake a/c उघडायचे म्हणजे तेवढे आधार कार्ड पण लागतील ई. ई.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 10:54 नवीन
घोटाळा करायचा खोटे अकाऊंट उघडणे हा एकच मार्ग नाही तर खालील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे अगदी अ‍ॅप बनवूनही घोटाळे करता येऊ शकतील. आतापर्यंत घोटाळेबाजांनी नवेनवे मार्ग अवलंबलेच आहेत. ते पूर्वीही होते आणि कॅशलेस झाल्यावरही तसेच राहणार आहे. फक्त फरक हा की रोख रकमेशी संबंध नसेल तर स्वतःच्याच विवेकाचे नियंत्रण ढिले पडणे आणि असे घोटाळे करायची संधी अधिक लोकांना मिळणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
श
श्रीगुरुजी Tue, 10/24/2017 - 18:20 नवीन
लेख बराचसा गंडलेला आहे. सध्या सहलीवर असल्याने पुढील आठवड्यात सविस्तर प्रतिसाद देईन.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 10/26/2017 - 14:01 नवीन
<<<लेख बराचसा गंडलेला आहे.>>> ==>> सहमत आहे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Tue, 10/24/2017 - 19:01 नवीन
आपल्यापैकी किती जण कंपनीमधील पेटी कॅशमधून १० रूपयाची नोट उचलून ती आपल्या खिशात घालतील? मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही तसे करेल. म्हणजेच काय तर रक्कम सारखीच असली तरी तेवढ्याच रकमेच्या नोटेची चोरी करायचा आपण विचारही करू शकणार नाही. याचे कारण आपली विवेकबुद्धी रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेली गोष्ट यांच्यात फरक करते. हा मूलभूत फरक आहे. आपल्याकडे( भारतात) रोख रक्कम सहज पळवली जाईल. ज्या नोटांचा हिशेब नाही अशी एकदा नोट खिशात घातली कि ती माझी झाली हि वृत्ती असलेल्या देशात आपण म्हणता तशी सद्सद्विवेक बुद्धी हि शेकडा १० % लोकांमध्ये दिसते. बाकी ९० % लोकांना निरोखीकरण( कॅशलेस) झाल्यामुळे जोवर पकडले जाऊ याची भीती आहे तोवरच आपण लोक प्रामाणिक आहोत. म्हणूनच एखाद्या रिक्शा टॅक्सी वाल्याने रोख रक्कम लॅपटॉप परत केला तर त्याची बातमी होते. अन्यथा लोकल गाडी बंद पडली तर रिक्षावाले एक स्टेशन ला जिथे २५ रुपये मीटरवर होतील तिथे ३००-४०० रुपये घेताना आढळतात. आपण दिलेली सर्वच्या सर्व उदाहरणे हि संगणकीकरणाच्या सुरुवातीची आहेत. सगळ्या लोकांनी क्रेडिट कार्डाचे घोटाळे केले ते सर्व देश सोडून जाणारे होते. आता एका क्लिक वर आपली सगळी कुंडली कॉम्प्युटर आपल्या समोर मांडू शकतो. तेंव्हा इतके साधे घोटाळे करणे कठीण आहे. आज जर आपल्या अंगठ्याचा ठसा प्रत्येक व्यवहाराशी जोडला गेला तर उद्या अमेरिकन कंपन्यांनी ( व्हिसा आणि मास्टर कार्ड) तर या पैसे बुडवणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात सुद्धा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मिळने मुश्किल करू शकतील. आज सिबिल सारख्या सरकारी आस्थापना कडे आपला क्रेडिट स्कोअर जातो आणि सर्वच्या सर्व बँका वित्त संस्था कर्ज देण्यापूर्वी त्याचा हिशेब घेतात. त्यामुळे १० वर्षांपूर्वी केलेला क्रेडिट कार्डाचा घोटाळा आज सुद्धा आपल्याला खड्ड्यात टाकू शकेल. निरोखीकरण हे सर्व प्रश्नांना उत्तर नाही. कारण माणूस नव्या नव्या युक्त्या शोधून काढणारच. स्वार्थी वृत्ती हि प्राणिमात्राची नैसर्गिक उर्मी(इन्स्टिंक्ट) आहे. कोल्हे कुत्रेच काय वाघ सिंह सुद्धा जेव्हा आणि जिथे मिळेल तिथे दुसऱ्या प्राण्यांची शिकार चोरत असतात. तेंव्हा तुम्ही सर्व व्यवहार डिजिटल केलेत म्हणून मानवी वृत्ती बदलणार नाही. गुन्हे करण्याची प्रवृत्ती हि सज्जड शिक्षा मिळण्याची खात्री असले तर कमी होतात. ( शून्य होत नाही कारण भावनेच्या भरात केलेले गुन्हे उदा खून बलात्कार इ होताच राहतात) सिंगापूर आखाती देशात कठोर कायदे असल्यामुळे भीतीमुळे गुन्हे कमी होतात. आजही रोखीच्या व्यवहारापेक्षा चेक चा व्यवहार सुरक्षित समजला जातो. जर चेक बाउंस होणे याविरुद्ध खटले चालवून दोन महिन्यात शिक्षा झाली असती तर चेक बाउंस होण्याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले असते. आज बिल्डर चेक देतो आणि तो बाउंस झाला तरी खटला वर्षानुवर्षे चालू राहतो म्हणून खोटे चेक देण्याचे प्रमाण इतके आहे. आज सर्वात मोठे काम काय असेल तर बेनामी मालमत्ता जप्त करण्याचा सरकारला अधिकार असलेला कायदा आहे. १९७३ साली कायदा आयोगाने शिफारस केलेला आणि १९ मे १९८८ साली पास झालेला कायदा हा त्यातील तरतुदींचे नोटिफिकेशन ना जरी झाल्याने प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकला नव्हता. ४३ वर्षांनी २०१६ साली त्यातील बऱ्याच तरतुदी सुधारून तो प्रत्यक्षात आणला गेला. इतकी वर्षे काँग्रेसच्या राज्यात हा कायदा का पस झाला नाही याचे उत्तर रोचक ठरावे. या कायद्यामुळे आता बेनामी मालमत्ता विकणे अशक्य झाले आहे आणि या सर्वच मालमत्ता रोखीच्या व्यवहारातून झालेल्या होत्या आपण पकडले जाणार नाही आणि पकडले गेलो तरी शिक्षा होईलच याची खात्री नाही ( किंबहुना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे) हि स्थिती आहे. १९८५ साली उघडकीस आलेल्या चारा घोटाळ्यात दोषी ठरवूनही लालू प्रसाद यादव आज ३२ वर्षांनी उजळ माथ्याने जामिनावर सुटून फिरत आहेत. तात्पर्य काय कॅशलेस व्यवस्था आल्याने घोटाळे कमी होणार नाहीत. फरक एवढाच आहे कि घोटाळा २० वर्षांनी सुद्धा उघडकीस आणणे शक्य होईल.रोखीचा व्यवहार हा वाळूवर ओतलेल्या पाण्यासारखा सहज जिरून जाणारा आहे तर कॅशलेस व्यवहारात त्याची पावले दिसून येतात आणि त्याचा माग काढल्यास घोटाळा सिद्ध करणे जास्त सोपे आहे. प्रत्यक्षात घोटाळा उघडकीस आल्यावर त्याला शिक्षा होण्यासाठी न्यायव्यवस्था तितकी सक्षम होणे आवश्यक आहे. निरोखीकरणानंतर न्यायव्यवस्था सक्षम होण्यासाठी सरकार पाऊले उचलेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 10/24/2017 - 19:09 नवीन
असेच म्हणतो, पूर्ण प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकटराजा Wed, 10/25/2017 - 11:32 नवीन
मला स्वतः मधील वाईट विचारांचे चिन्तन करण्याची संवय आहे. मी स्वतः ला आजिबात सभ्य मानत नाही. मानवाची सभ्यता या विषयी प्रयोगात्म संशोधन पूर्वी झालेले आहे. माझ्या आठवणी प्रमाणे " मनाच्या संशोधनाची सुरस कथा" ही मालिका नवल या अंकात येतही असे पूर्वी. आपण देवळात गेल्यावर आपल्या पेक्षा उत्तम असलेले शूज चोरत नाही याचे पूर्णपणे नाही पण बर्‍याच अंशी कारण' पकडले जाउ' हेच असते. फारच थोडे म्हणतील चोरी माझ्या रक्तातच नाही मी नाही करणार. आपल्या मधील वाईट प्रवृत्तींचा पुरावा म्हणजे पोलीस , न्यायालये ,वकील, सह्या, कुलूपे, पासवर्ड ई शब्दच सांगून जातील. आता वर एका ठिकाणी असा प्रयोग आहे की बाटल्या गेल्या नोटा नाहीत. याचे कारण असेही असू शकते की नोट ही मार्क केलेली असते. तिला आयडेन्टीटी असते. त्यामुळे बाटली पेक्षा नोटेची चोरी (नोटेला विनिमयमूल्य असूनही ) चोराला नकोशी वाटली असावी. मला स्वतः ला विचाराल तर मला नोट देताना दु:ख होते. कार्ड स्वाईप करताना नाही. याच अनुभवाचा व्यत्यास असा की मला नोटेची चोरी प्राधान्याने करावीशी वाटेल. अर्थात मी अशिक्षित चोर असेन तर नोटेवरचा नंबर, सर्वेलन्स कॉमेरा ई ई चा विसर मला पडलेला असेलच. जाता जाता एकच असंबद्ध गोष्ट लिहून जातो. ती अशी की सिग्नल मोडला तर आय टी वाला कचकन दंडाचे पैसे भरेल. त्याच्या गाडीच्या मागच्या टायरला गॅस कटरने कापण्याची शिक्षा व्हावी. तिथेच. मग वेळ या अमूल्य गोष्टीचे भान समाजाला येईल. अबू नुकसानी पैशाचे नुकसान या पेक्षा वेळेचे नुकसान हीच आज खरी शिक्षा आहे. जामीन हा नियम व कैद हा अपवाद हे फक्त उलटे केले तर सार्‍या सभ्य पोशाखातील जनावराना चाप बसेल त्यात मीही आलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हेमंतकुमार Wed, 10/25/2017 - 12:05 नवीन
चांगला लेख मला स्वतः ला विचाराल तर मला नोट देताना दु:ख होते. कार्ड स्वाईप करताना नाही. >>> +१ पण ....... मला नोटेची चोरी नाही करावी वाटत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 11:49 नवीन
क्रेडिट कार्डावरील बिले बुडवून भारतात पळून येणार्‍यांचे उदाहरण दिले याचे कारण जेव्हा रोखीत व्यवहार असतात त्यापेक्षा कॅशलेस व्यवहारांमध्ये आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण कमी असते. घोटाळा करणारे लोक नवेनवे मार्ग शोधून काढतातच. मुद्दा हा की जास्त लोकांना घोटाळे करायची संधी मिळणे घातक ठरेल. असे कार्ड कंपन्यांना बुडविणारे लोक मुळात वाईट असतात का?बँकेत जाऊन तिथले ए.टी.एम फोडून १० हजार डॉलर्स लुटणारी व्यक्ती कशी असेल याची क्षणभर कल्पना करू. बहुदा असे करणारी व्यक्ती एक नंबरची बेरड, निर्ढावलेली, गुंड असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिल. पण बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन ते थकविणारी व्यक्ती मात्र अगदी आपल्यासारख्या घरातील असते. अगदी कोणीही बघत नसेल तरी अशी व्यक्ती बँकेत अशी चोरी करेल असे नाही. पण कार्डावरील बिले मात्र थकविताना आपण काही फार चुकीचे करत आहोत हा विचारच त्या व्यक्तीच्या मनात येत नसेल किंवा येत असला तरी ती कृती रोखावी इतका प्रबळ विचार तो नसेल. म्हणजे ए.टी.एम फोडणारा आणि कार्डावरील बिले बुडविणारा माणूस सारखेच नुकसान करत असला तरी बिले बुडविणारा माणूस हा सभ्य, सुशिक्षित इत्यादी इत्यादी असतो तर ए.टी.एम फोडणारा माणूस मात्र गुंड असतो. नेमका हा फरकच माझ्या म्हणण्याचा पाया आहे. की कॅशलेस व्यवहारात असे विवेकबुध्दीचे नियंत्रण कमी झाल्यास घोटाळे करायची प्रवृत्ती अधिक वाढेल ही भिती आहे आणि घोटाळे करणारे नवे नवे मार्ग शोधून काढतच असतात. बाकी तुम्ही मांडलेले न्यायव्यवस्थेविषयीचे सर्व मुद्दे मान्य. पण अन्य एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जर स्मॉल टिकेटचे ढिगभर घोटाळे व्हायला लागले आणि त्यात ठकविल्या गेलेल्या लोकांपैकी कोणालाच ही झालेली फसवणुक तडीस न्यायचा इन्सेन्टिव्ह नसेल (रक्कम कमी असल्यामुळे) पण असे ठकविले गेलेले लोक मात्र मोठ्या प्रमाणात असतील तर न्यायव्यवस्था कितीही सक्षम झाली तरी त्याचा कितपत उपयोग होईल? कारण मुळात अशी स्मॉल टिकेट प्रकरणे न्यायालयापुढे यायचीच शक्यता कमी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असंका Tue, 10/24/2017 - 20:09 नवीन
मुलभूत विचार आणि त्याची परिस्थितीशी घातलेली सांगड थक्क करणारी आहे!!! अभिनंदन!!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 10/24/2017 - 20:42 नवीन
Cash वापरताना लोक बरीच काळजीपूर्वक वापरतात , पण sodexo कूपन झटपट खर्च करतात , फार विचार करताना दिसत नाहीत .
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 10/25/2017 - 07:13 नवीन
त्यामुळे GDP कमी होतो :P हघ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/25/2017 - 03:15 नवीन
लेख आवडला. पण एक मुद्दा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमधे स्वतंत्रपणे लागु होईल. तो प्रत्येकाच्या सारासार विवेकबुद्धीवर अवलंबुन असेल.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/25/2017 - 04:22 नवीन
नैतिकतेमध्ये अजून एक गंमत आहे. माणूस एखाद्या व्यक्तीचे नुकसान करताना कचरतो. उदा, मी एखाद्याच्या पाकिटात हात घालून नोट काढणार नाही, पण जर रस्त्यावर पडलेली मिळाली तर उचलेन. कारण यात मी माझ्या हाताने कोणाचे नुकसान करत नाहीये संस्थात्मक भ्रष्टाचार जास्त होतो याचे कारण देखील हेच असावे. सरकारचा पैसा म्हणजे कोणाचाच नाही अशी भावना याला कारणीभूत होत असेल असे वाटते. व्यक्तिशः मी एखाद्या कंपनीच्या कॅश मधून काही उचलणार नाही कारण कोणी पाहिले तर काय अशी भीती माझ्या मनात असेल. डिजिटल व्यवहारात कदाचित पहिले पहिले भ्रष्टाचार वाढेल करण कोणीतरी पाहतेय हेच लोकांना पटकन कळणार नाही. पण एकदा कोण पाहतेय हे कळले की आपोआप भ्रष्टाचाराला पायबंद बसेल
  • Log in or register to post comments
म
मामाजी Wed, 10/25/2017 - 07:30 नवीन
दुसरे उदाहरण म्हणजे २०१५ मधील. फोनवर मी यु.टी.एस म्हणून एक अ‍ॅप डाऊनलोड केले होते. त्या अ‍ॅपद्वारे फोनवर मुंबईतील लोकल ट्रेनची तिकिटे काढता येतात. फोनवरील जी.पी.एस वरून आपण नक्की कुठे आहोत हे ट्रॅक करून आपण जर स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असू तर तिकिट फोनवर काढता येईल असे त्या अ‍ॅपविषयी ऐकले होते. त्या अ‍ॅपवरील वॉलेटमध्ये मी २०० रूपये टाकले. माझे घरही स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असल्यामुळे माझी कल्पना होती की मला घरूनही तिकिट काढता येईल. अगदी घरून नाही तरी स्टेशनला जात असताना तरी तिकिट नक्कीच काढता येईल अशी माझी अपेक्षा होती. पण कुठचे काय. कुठेही असले तरी 'स्टेशनच्या जवळ जा आणि मग तिकिट काढा' हेच पालुपद त्या अ‍ॅपने चालू ठेवले. शेवटी वैतागून मी ते अ‍ॅप अन-इन्स्टॉल करून टाकले. अर्थातच त्या अ‍ॅपच्या वॉलेटमधील २०० रूपयेही गेले. या गोष्टीची मला किती वेळ चुटपूट लागली होती? तर फार वेळ नाही. यु.टी.एस. ही अॅप उत्तम आहे. गेली 2 वर्षे मी सातत्याने मुंबई व चेन्नई लोकल साठी विंडोज फोनवरून वापरत आहे. एकदा मला सूद्धा वर उल्लेख केलेला प्राॅब्लेम आला होता त्यावेळी मी फोन आॅफ करून परत चालू केला. नंतर लगेच तिकीट काढता आले. माझ्या अंदाजा प्रमाणे 200 रूपये आपल्या वाॅलेट मध्ये अजूनही असतील. आपण परत एकदा अॅप लोड करून बघा.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 16:37 नवीन
धन्यवाद मामाजी. परत एकदा अ‍ॅप इन्स्टॉल करून बघतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 07:35 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काही मुद्दे: एकूणच सगळ्यांचा कल असा दिसत आहे कॅशलेस व्यवहार झाल्यास भ्रष्टाचार/चोरी करायचे लोक थांबविणार नाहीत पण तो भ्रष्टाचार/चोरी पकडणे अधिक सोपे जाईल. वरकरणी हे लॉजिक भारदस्त वाटते. पण यात काही गोष्टींचा विसर पडत आहे असे वाटते. दररोज अगदी अब्जावधी व्यवहार होत असतात. सगळे कॅशलेस झाले तर तितक्या अब्जावधी एन्ट्री कुठेतरी होतील. हा सगळा महाप्रचंड विदा असेल. त्यात कोणी कुठे घोटाळा केला आहे हे शोधून काढता येणे तितके सोपे आहे का? त्यातही जर बिग टिकेट घोटाळे असतील तर ते नक्कीच पकडले जातील. पण माझा मुद्दा आहे की स्मॉल टिकेट घोटाळे करायला कॅशलेस अर्थव्यवस्थेत अधिक वाव मिळेल. अनेकदा बिग टिकेट घोटाळ्यांइतकेच नुकसान अनेक स्मॉल टिकिट घोटाळे मिळून करत असतात. पण ते आपल्या लक्षातही येत नाही. कॅशलेस अर्थव्यवस्थेत असे घोटाळे करायला कसा वाव मिळेल? काही उदाहरणे बघू. १. मध्यंतरी लिटल नावाच्या अ‍ॅपवरून मी पिझ्झा हटची ५०० रूपयाचे एक आणि ३०० रूपयांची दोन अशी ११०० रूपयांची कुपने विकत घेतली. या कूपनची फेस व्हॅल्यू ११०० रूपये असली तरी ती विकत घ्यायला पैसे त्यापेक्षा कमी भरायला लागणार होते आणि साधारण १४-१५% सूट मला मिळणार होती. मागच्याच आठवड्यात पिझ्झा हटमध्ये गेल्यावर 'सर्व्हर चालू नाही' हे गोंडस कारण देऊन पिझ्झा हटने ती कुपने स्विकारण्यास नकार दिला. मी त्या अ‍ॅपकडे तक्रार केली पण त्यांनी एका फाईन प्रिंटमधील अट दाखवली--- "जर का व्हेंडरने कोणत्याही कारणाने कुपन स्विकारण्यास नकार दिला तर त्यासाठी हे अ‍ॅप जबाबदार नाही" आणि ती कुपने कॅन्सल करून माझे पैसे परत करायला नकार दिला. या कुपनची वैधता २० डिसेंबर पर्यंत आहे. म्हणजे ते पैसे फुकट जाऊ नयेत असे वाटत असेल तर मला २० डिसेंबर पूर्वी परत पिझ्झा हटमध्ये जाणे आले. मी त्या मानाने हेल्थ कॉन्शस असल्यामुळे सहा महिन्यांतून एकदाच पिझ्झा हटमध्ये जातो. पण आता २० डिसेंबरपूर्वी परत जाणे आले. त्यातही ज्या पिझ्झा हटमध्ये जाईन तिथे सर्व्हर चालू आहे की नाही याची आधी पडताळणी करणे आले आणि तिथला सर्व्हर चालू नसल्यास दुसर्‍या दिवशी किंवा दुसर्‍या स्टोअरमध्ये जाणे आले. समजा २० डिसेंबरपूर्वी हे करणे मला शक्य झाले नाही तर त्या अ‍ॅपने फुकटचे पैसे कमावले की नाही? त्या अ‍ॅपचा फसवायचा उद्देश असेल असे मी म्हणत नाही. पण अशाप्रकारे फसवाफसवी करायचा अधिक वाव मिळू शकेल. कुठल्याही अ‍ॅपवर किती रेटिंग आली आहेत यावरून आपण त्या अ‍ॅपची विश्वासार्हता ठरवत असतो. आणि कालपरवाच बातम्यांवरून कळले की बॉट वापरून अशी रेटिंग कृत्रिमपणे वाढवताही येतातच. समजा त्या अ‍ॅपने २० डिसेंबरपर्यंत म्हणजे जवळपास २ महिन्यांची मुदत न ठेवता ४ दिवसांचीच मुदत ठेवली तर त्याला आपण काय करू शकणार आहोत? समजा तो अ‍ॅप तयार करणारी कंपनी बंगलोरमधील/ हैद्राबादमधील असेल. माझ्यासारख्या अनोळखी लोकांच्या संपर्कात यायचे या कंपनीचे एकच माध्यम म्हणजे ते अ‍ॅप. समजा फसवणूक करायचीच असेल तर अशाप्रकारे करता येऊ शकेल. त्यातही फाईन प्रिंटमध्ये जर एखादी अट लिहिली असेल तर ग्राहकांचे झालेले नुकसान भरून देण्यास ती कंपनी बांधीलही नाही. २. २००० च्या दशकाच्या मध्यात भारतात मोबाईल फोनचे प्रस्थ वाढले तेव्हा फोन कंपन्यांनी किती प्रकारे फसवणुक केली होती हे आपल्या लक्षात असेलच. दररोज एक जोक एस.एम.एस वर येणार आणि त्यासाठी महिन्याला ३० रूपये (दररोज १ रूपया) आपल्या प्री-पेड बॅलन्समधून कापले जाणार अशाप्रकारच्या गोष्टी झालेल्या आपल्या लक्षात असतीलच. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर असे पैसे कापले जाऊ नयेत अशी आपली इच्छा असेल तर आपण त्यांना फोन करून त्यांच्याव्र आरडाओरडा करायचा अन्यथा बाय डिफॉल्ट दररोज असा एक एक रूपया कापला जाणारच. आणि फोन कंपन्या हुषार होत्या. त्यांनी अशा 'ऑफर' कायमस्वरूपी नाही तर एक महिन्यासाठीच वेगवेगळ्या ग्राहकांसाठी चालविल्या होत्या. ज्या लोकांना दररोजचा एक रूपया विनाकारण खर्च करणे जास्त वाटत होते त्यांनी तक्रार करून हा प्रकार बंद करून घेतलाच. पण ज्यांना एका रूपयाचे फार काही नव्हते अशा कित्येक (कित्येक म्हणजे काही कोटी) ग्राहकांना अशा कंपन्यांनी गंडा घातलाच ना? मग टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटीने आसूड ओढल्यावर असे प्रकार बर्‍यापैकी बंद झाले. कदाचित अगदी अलीकडल्या काळापर्यंत या कंपन्या डेटामध्ये फसवत असतील. म्हणजे आपले अमुक इतक्या एम.बी चा पॅक संपला असा एस.एम.एस आपल्याला येतो तेव्हा आपल्यापैकी किती जण आपण खरोखरच तितका डेटा वापरला होता की नाही हे बघतात? रिलायन्स जिओच्या बडग्यामुळे या कंपन्या बराच डेटा फुकटात द्यायला लागल्या आहेत. तेव्हा ग्राहकांना गंडा घालायचे इतर काहीतरी मार्ग शोधले जात नसतीलच असे यांचा पूर्वेतिहास बघता म्हणता येईल असे वाटत नाही. ३. २००५ पासून तीन चार वर्षे युलिपवर विमा कंपन्या पहिले तीन वर्षे अगदी ४०-५०% इतके चार्जेस लावत असत. यातून ग्राहकांचे किती नुकसान झाले हा आकडा थक्क करणारा आहे. मिंटमधील या लेखात म्हटले आहे की त्यातून ग्राहकांचे १.५ ट्रिलिअन रूपयांचे नुकसान झाले. हा आकडा किती मोठा आहे याची कल्पना येणार नाही तेव्हा ते गणितच करून बघू. १ बिलिअन रूपये म्हणजे १०० कोटी रूपये. १ ट्रिलिअन म्हणजे १००० बिलिअन म्हणजेच १ ट्रिलिअन रूपये म्हणजे १ लाख कोटी रूपये. १.५ ट्रिलिअन रूपयांचे नुकसान म्हणजे १.५ लाख कोटी रूपयांचे नुकसान. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा कितीचा होता? १.७६ लाख कोटी रूपयांचा. पण २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर झाली त्याच्या एक लक्षांश चर्चाही विमा कंपन्यांनी अशाप्रकारे केलेल्या फसवणुकीवर झाली नव्हती. त्याचे कारण प्रत्येक ग्राहकाचे यात काही हजारांचेच नुकसान झाले असले तरी असे गंडवले गेलेले ग्राहक काही लाखांमध्ये होते. तेव्हा हा स्मॉल टिकेट फसवणुकीचा प्रकार होता पण झालेले एकूण नुकसान २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापेक्षा फार कमी नव्हते. त्यातही त्या कंपन्यांच्या पॉलिसी डॉक्युमेन्टमध्ये या चार्जेसचा फाईन प्रिंटमध्ये उल्लेख असल्यामुळे 'आम्ही या चार्जेसविषयी ग्राहकांना आधीच सांगितले होते' असे म्हणत या विमा कंपन्या कधीही हात वर करू शकतच होत्या. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बिग टिकेट घोटाळे लक्षात येतात पण स्मॉल टिकेट घोटाळे लक्षात येत नाहीत पण नुकसान तेवढेच करतात. त्यातही सगळे बिग टिकेट घोटाळे लक्षात येतात का? मूळ लेखात नीक लिसनने १९९५ मध्ये बेरिंग्ज बँक बुडवली हा उल्लेख आहे. त्यालाच १९९३ आणि १९९४ मध्ये चांगले मिलिअन डॉलर रकमेइतके (ब्रिटिश पाऊंडमध्ये) बोनसही मिळाले होते. जानेवारी १९९५ मध्ये जपानमध्ये कोबे येथे झालेल्या भूकंपामुळे शेअरबाजार कोसळला आणि नीक लिसनचे ट्रेड अधिकाधिक तोट्यात जाऊ लागले. एक वेळ अशी आली की त्याला तो प्रकार लपविणे शक्य झाले नाही. पण समजा त्याने १९९४ मध्येच हे प्रकार करायचे थांबविले असते तर तो बहुदा तो घोटाळा लपवूही शकला असता. माझा मुद्दा आहे की सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्या तर पूर्वी ही फसवाफसवी करणे केवळ उच्चपदस्थांनाच शक्य होते ते अगदी सामान्य माणसाच्या पातळीवर येऊन पोहोचेल. अगदी साधे उदाहरण म्हणजे रिक्षात १२६ ऐवजी १६२ रूपये इतके कार्ड स्वाईप केले गेले तर घाईत ते आपल्या लक्षात येईलच असेही नाही. आपण एकदा त्यावर सही केली किंवा अंगठा लावला की मग रिक्षावाल्याकडे 'ग्राहकानेच मान्य केले' ही पळवाट असेलच. तसेच आपणही असे कित्येक व्यवहार करत असल्यामुळे महिन्यात २००-४०० व्यवहारांच्या स्टेटमेन्टमध्ये काही व्यवहारांत असा फटका आपल्याला बसला तरी तो आपल्या लक्षातही येणार नाही. आणि जरी आला तरी रक्कम फार नसल्यामुळे ते प्रकरण तडीस आपण नेऊ असेही नाही. त्यातही गंडा घालणारा माणूस रोखीत ज्या रकमेचा गंडा दुसर्‍याला घालू शकणार नाही तेवढ्याच (किंवा जास्त) रकमेचा गंडा घालू शकेल हे वर दिलेल्या उदाहरणांवरून स्पष्ट होईलच. या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एखाद्या अ‍ॅपला अशी फसवणुक करायची असेल तर कुठेतरी बंगलोर किंवा हैद्राबादमध्ये बसलेली मंडळी (जी अन्यथा माझ्या संपर्कात कधी यायची शक्यता जवळपास शून्य होती) ती पण माझ्यासारख्याला 'कॅशलेस' फसवू शकतील.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/25/2017 - 08:02 नवीन
थोडं थोडं पटतंय खरं.. फक्त आता एक प्रश्न शिल्लक राहतो यात सामान्य माणसाचा घोटाळा करणारा म्हणून संबंध कुठे येतो? घोटाळे करण्यासाठी मुळातच एक mindset लागतो, तो सामान्यांकडे असेल का? का तुम्हाला असे म्हणायचंय की पकडले जाण्याची शक्यता कमी असल्यामुळे सामान्य माणसे जास्त घोटाळे करायला provoke होतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 16:36 नवीन
घोटाळे करण्यासाठी मुळातच एक mindset लागतो, तो सामान्यांकडे असेल का?
असा माईन्डसेट सुरवातीपासूनच नक्कीच नसतो पण क्रेडिट कार्डाच्या उदाहरणात लिहिल्याप्रमाणे रोखीत व्यवहार करण्यापेक्षा कॅशलेस व्यवहार असतील तर तो निर्माण व्हायची शक्यता अधिक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
S
sagarpdy गुरुवार, 10/26/2017 - 08:13 नवीन
यात कॅशलेस / रोख व्यवहाराशी काही संबंध आहे असे वाटत नाही. आपण पैसे व्यक्तीचे उचलतोय कि संस्थेचे हा माइण्डसेट देखील (माझ्या मते फक्त हा) येतो. बँक काढून या लोकांनी क्रेडिट कार्ड न घेता पर्सनल लोन एका ओव्हरद्राफ्ट अकाउंट मध्ये घेतलं असत, त्यातून रोखीने पैसे काढून वापरले असते आणि तरी नंतर हे लोक अकाउंट सेटल न करता परतले असते. (अर्थात काही गॅरेंटी / गहाण नसताना) - क्रेडिट कार्डला गॅरेंटी लागत असती तर यांनी बहुतकरून बिल सेटल केलं असत. व्यक्तीला बुडवत असल्याची जाणीव अधिक बोचरी असते संस्थेला फसवण्यापेक्षा. रोख व्यवहारात पैसे हातून जात असल्याची जाणीव अधिक असते, त्यामुळे प्रत्येक पै बद्दल विचार होतो एवढेच. कदाचित अकाउंट बॅलन्स / कार्ड बिल चे sms पाहण्याची सवय झाली, कि त्या खर्चाची जाणीवही व्हायला सुरुवात होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
आ
आनन्दा गुरुवार, 10/26/2017 - 09:59 नवीन
अगदी, ×1000 फक्त ही उत्क्रांती आहे, आणि ती व्हायला आजूबा एक पिढी लागेल बहूतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 11:24 नवीन
व्यक्तीकडून पैसे घेत आहोत की संस्थेकडून हा आणखी एक महत्वाचा पर्स्पेक्टिव्ह झाला. पण तोच असतो का? क्रेडिट कार्डावर कॅश अ‍ॅडव्हान्स जरी घेता येत असला तरी एकूण क्रेडिट लिमिटच्या तो काही टक्के इतकाच असतो. तेव्हा क्रेडिट कार्डाचे बिल भरले नाही तर त्याचा अर्थ मुख्यत्वे क्रेडिट कार्डावर खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे दिले नाहीत (म्हणजे त्या वस्तू चोरल्या) असा त्याचा अर्थ होईल. अशा चोरण्यामुळे नुकसान वॉलमार्टचे न होता कार्ड देणार्‍या बँकेचे होईल हा एवढा फरक. पण बाकी स्वरूप तेच. पण असे करणार्‍या लोकांपैकी बरेचसे लोक बँकेचे ए.टी.एम फोडून किंवा अन्य मार्गाने बॅंकेचीच काय तर पाकिट मारून इतर कोणत्या व्यक्तीचीही फसवणूक करणार नाहीत (अगदी कोणीही बघत नसले तरी-- कोणीही पकडायची शक्यता नसेल तरी) हाच मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
S
sagarpdy गुरुवार, 10/26/2017 - 12:18 नवीन
परत : यात रोख पैसे आणि इलेकट्रोनिक पैसे हा मुद्दा आहे असे वाटत नाही. पकडले जाण्याची शक्यता, अनुषंगाने होणारी बदनामी व शिक्षा याबद्दल विचार - हि प्राथमिक व फिजिकल चोरी यशस्वी करायला लागणारे कसब हि दुय्यम गोष्ट आहे (असे वाटते). एटीम मशीन बिघडले असून डेबिट होणाऱ्या रकमेच्या दुप्पट पैसे देतय आणि बूथ चा cctv कॅमेरा चालत नाहीये हे समजल्यास वरील लोक रोख पैसे काढून फायदा नक्की करून घेतील. वर वेळ असेल त्या प्रमाणे हे पैसे बँकेत भरून परत त्या एटीम ला जातील. अर्थात हा मुद्दा बाकी प्रतिसादात उल्लेखलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:48 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
त
तेजस आठवले Sun, 11/05/2017 - 18:11 नवीन
विचारप्रवर्तक लेख. माझ्या मते प्रत्येक एटीम मध्ये भरलेल्या नोटांची सर्व माहिती बँक नोंदवून ठेवत असते, अगदी नोटांचे क्रमांक सुद्धा. जर १ ते ४ अश्या १०० च्या चार नोटांऐवजी १ते ८ अश्या नोटा बाहेर पडल्या(४०० काढतोय पण ८०० मिळतायत), तर एटीएम मधल्या नोंदी आणि बँकेतल्या खात्यातल्या नोंदी जुळणार नाहीत आणि जास्त नोटा बाहेर पडल्या हे बँकेला समजेल. पण कॅमेरा चालू नसल्याने बँक हे कदाचित सिद्ध करू शकणार नाही कि अमुक माणसाला जास्त पैसे मिळाले होते त्यामुळे त्याने ते परत केले पाहिजेत. आता कॅमेरा चालू नाहीये हे ग्राहकाला माहित असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने तो असे करणार नाही. पण एखाद्या आतल्या गोटातल्या माणसाला खात्रीने माहित असेल कि कॅमेरा चालत नाहीये तर तो किंवा त्याचा साथीदार हे काम राजरोसपणे करू शकतात. कॅमेरा चालू असल्यास बँक ते पैसे नक्की वसूल करतील आणि त्यासाठी कुठच्याही थराला जातील. तुमच्या लेखाचा विषय माणूस कसा विचार करतो हा आहे."पकडले जाण्याची शक्यता/भीती" हा मूळ मुद्दा आहे आणि त्याच्या शक्यतेवर माणसाचे वर्तन ठरते.अमेरिकेतून मूळ देशात परतताना क्रेडिट कार्डाची बिले बुडवणे ह्याचे कारण एकदा आपण त्या देशाबाहेर पडलो की बँक आपल्याला काहीही करू शकत नाही हे आहे.२००३ साली त्या विद्यार्थ्याने पैसे बुडवले असे मानू. समजा २०२३ साली त्यांना परत अमेरिकेत जावेच लागेल अशी परिस्थिती आली तर त्यांची काय स्थिती होईल?(अमेरिकेत क्रेडिट हिस्टरी किती वर्षे ठेवतात हे मला माहित नाही) पण ह्या केस मध्ये पकडली जाण्याची शक्यता १००% टक्के आहे.पोर्ट ऑफ एंट्रीलाच तो पकडला जाईल. कारण अमेरिकेत कायदा कठोरपणे पाळला जातो आणि दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण भरपूर आहे.हीच गोष्ट जर भारतात जिथे कायदे पाळण्याचे प्रमाण नगण्य आहे तिकडे झाली असती तर गुन्हेगाराची मानसिकता पूर्णपणे वेगळी असती. म्हणजेच काय की परिस्थिती पाहून माणसाचे मन निर्णय घेते. तसेच तुम्ही म्हणत असलेला डेटा वोल्युम इकडे दिसतो. सगळेच व्यवहार डिजिटल झाले की खूप साऱ्या नोंदी निर्माण होतील आणि हा सगळा डेटा साठवण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो(असे आपल्याला आत्ता वाटते). पण भविष्यातली मशिन्स आपल्या कल्पनेपेक्षाही पुढची असतील.ज्या वेगाने तंत्रज्ञान वाढते आहे आणि त्याने आपले आयुष्य पूर्णपणे कवेत घेतलेले आहे, त्यावरून हे व्हायची शक्यता खूप जास्त आहे.भविष्यात काही हजार कोटी रेकॉर्डस् मधून एखादा रेकॉर्ड क्षणात शोधून देणारी अल्गोरिथम्स नक्कीच असणारेत की जी एखाद्या राज्याचा डेटा अगदी छोट्या आकाराच्या चिप मध्ये साठवून ठेवू शकतील.नॅनोटेकनॉलॉजी हि एकच गोष्ट सगळ्या गोष्टी आमूलाग्र बदलून टाकेल. भ्रष्टाचाराचा मुद्दा विचारात घेतला तर तो कमी होणार नाही. ह्या ना त्या मार्गाने चालूच राहणार. डिजिटल व्यवहाराचा फायदा म्हणजे प्रत्येक गोष्टीची नोंद राहते.पण अश्या भरपूर नोंदी असल्या की आपण त्या तपासण्याचा कंटाळा करणार हे ही तितकेच खरे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे नको त्या नोंदी घुसडून पैसे लांबवण्याची शक्यता वाढू शकेल. पण कॅशलेस करण्याचा फायदा हा की पैसे कुठून कुठे जातात हे सरकारला(किंवा एखाद्या संस्थेला) कळेल. म्हणजे मी कमावलेले पैसे मी कुठे खर्च करतोय (जे रोखीत खर्चताना फक्त मलाच माहित होते) ते आता सरकारला पण कळेल.(आता ती संस्था / सरकार त्या माहितीचा वापर कसा करते (उदा. मला त्रास द्यायला का चांगला वापर )हा पूर्णपणे वेगळा विषय आहे.)"you are being watched" हे सतत लोकांच्या लक्षात आणून देणे आणि त्याद्वारे भ्रष्टाचार कमी होईल अशी आशा ठेवणे ही त्या मागची मूळ संकल्पना असावी(अगदी १००% तोच उद्देश नसला तरी). लोकसंख्या हा पण एक मुद्दा विचारात घ्यावा लागेल, कारण माणसाची वर्तणूक काही प्रमाणात त्याच्याशी पण निगडित आहे.आज अमेरिकेत आपल्याला कायद्याचे राज्य दिसते त्याचे कारण कायद्याचे कठोर पालन आहे. पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा चोऱ्यामाऱ्या करण्याकडे त्या लोकांची प्रवृत्ती नाही असे नाही. उद्या अमेरिकेत पण भारतासारखा प्रचंड लोकसंख्या झाली तर आज जी अमेरिका आपल्याला दिसते त्याच्या निम्मे अमेरिकीपण तीच्यात राहणार नाही. रोख पैसे काय किंवा डिजिटल चलन काय. डल्ला मारण्याचा निर्णय झाला आणि तो मारण्याची आणि पचवण्याची परिस्थिती असली की रोख पैसे काय किंवा डिजिटल स्वरूपातील पैसे काय, चोरणाऱ्याला काहीच फरक पडत नाही.धास्ती किती प्रमाणात चोराच्या मनात आहे त्यावरून हे सगळे ठरते. नोटबंदीच्या निर्णयानंतर चालू नोटा रद्द करून सरकारने नवीन दुप्पट रकमेची २००० ची नोट चलनात आणली.कोणी कितीही आव आणला तरी २००० च्या नोटा काळे धन स्वरूपात लपवून ठेवताना लोकांच्या मनात धास्ती असणार आहेच. कारण सरकार कधीही ह्या नोटा रद्द करू शकेल आणि आपण अडचणीत येऊ ही भीती काही प्रमाणात तरी लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे काही लोकांचा तरी भ्रष्टाचार करण्याबाबतचा दृष्टिकोन बदलू शकतो. मला माहित नाही की माझे विचार मी व्यवस्थित मांडू शकलो आहे की नाही. प्रतिसाद विस्कळीत झाला आहे.अजून काही सुचले तर लिहीन. -तेजस आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
द
दीपक११७७ Wed, 10/25/2017 - 08:40 नवीन
तुम्हाला असे सुचवायचे आहे का, एखाद्या विशिष्ट अ‍ॅप (cash less) मध्ये रक्कम टाकली की ती संबंधीतांना माहीत पडते (एक प्रकारे ती त्याच प्रयोजनार्थ ठेवलेली असते) व ती रक्कम ते (अ‍ॅप वाले) त्यांच्या कडे खेचुन घेण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवतात, तीच जर कॅश असेल तर त्यांना माहीत पडत नाही परीणामी खीश्यातुन काढायला आवघड होते. अंशतः बरोबर आहे रेल्वे च्या smart card विषयी पण असेच झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
स
स्वधर्म Wed, 10/25/2017 - 09:45 नवीन
रोखीने खर्च करताना जास्त सावधगिरी बाळगली जाते, त्या मानाने, कॅशलेस व्यवहार करताना फारसे मनाला जाणवत नाही, हे मान्य. माझेच उदाहरण द्यायचे, तर मागच्या महिन्यात स्टेट बॅंकेच्या स्टेटमेंटमध्ये मला रु. ११.८० च्या अनेक डेबिट एंट्रीज दिसल्या, ज्या मी काहीतरी डेबिट कार्ड वापरल्यानंतर दाखविल्या गेल्या होत्या. हे कसले चार्जेस अाहेत, अशी विचारणा करणारी इमेल बॅंकेला पाठवून महिना झाला. अर्थातच उत्तर अाले नाही. सगळा मिळून व्यवहार ५०-६० रूच्या डेबिटचा अाहे, म्हणून मीही गप्प अाहे. किती फाॅलो अप करणार? पण हेच जर मला १० रू कॅशिअरकडून कमी अाले असते, तर मी व बॅंकेनेही अत्यंत त्वरीत व गांभिर्याने त्यावर कार्यवाही केली असती, यात शंका नाही. अत्यंत चांगला लेख लिहील्याबद्दल धन्यवाद मिल्टन साहेब.
  • Log in or register to post comments
म
मामाजी Wed, 10/25/2017 - 11:11 नवीन
इंटरनेट अथवा डेबिट/क्रेडिट कार्डने आरक्षित केलेल्या रेल्वेच्या प्रत्येक तिकीटा मागे स्टेट बॅंक रु. ११.८० आकारते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
च
चौकटराजा Wed, 10/25/2017 - 11:43 नवीन
आपणासमोर कॅश देणारी वा घेणारी व्यक्ती प्रत्यक्ष असते. कॅशलेस मधे असते भावना शून्य मशीन. आजकाल बॅकेतले अधिकारी व लेखनिक धीरे धीरे मशीन सारखे वागायला लागले आहेत नको तिथे. हेच आपण प्रत्यक्ष बॅकेच्या कार्यलयात असतात तर व्यवस्थापकाचे डोके खाउन त्याकडून हे ११:८० चे स्पश्टीकरण मागीतले असतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Wed, 10/25/2017 - 15:15 नवीन
पटलं. कॅशलेस हा अप्रत्यक्ष व्यवहार असल्याने, त्यात होणार्या मोहाला माणूस अाधिक सहजतेने बळी पडू शकतो (कोण बघणार अाहे? किंवा पकडलंच, तर तांत्रिक चूक झाली असे म्हणू). त्या अर्थाने विवेकबुध्दीची टोचणी हा लेखकांचा मुद्दा पटण्यासारखा अाहे. @ मामाजी, नाही हो, रेल्वे तिकीटाचे सर्व्हिस चार्जेस वेगळे दाखवतात. बहुधा हे पेट्रोलचे असावेत असे वाटले, पण सरळसरळ लिंक करता अाले नाही. अजून एक अवांतर मुद्दा म्हणजे कॅशलेस व्यवस्था चोवीस तास उपलब्ध ठेवण्यासाठी नोटा छपाईपेक्षा मोठा खर्च येत असणार. कल्पना करा, किती कंपन्यांचे किती सर्व्हर्स चोविस तास सुरू ठेवावे लागत असतील. शिवाय तो सदैव वाढतच जाणारा सर्व डेटा सुरक्षित, डुप्लीकेटेड ई. ठेवण्याचा खर्च केवढा असेल? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हणतात की हा सर्व अमेरिकन कार्ड कंपन्यांच्या भल्यासाठी घातलेला घाट अाहे, ते अाठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
आ
आदिजोशी Wed, 10/25/2017 - 12:50 नवीन
आयुष्यभर इमानदारीत नोकरी केलेले मध्यमवर्गीय लोक बिल्डर कॅश मागत असल्याने आपलेच पांढरे पैसे काळे करून त्याला देत होते. सद्ध्य बर्‍याच जणांना इतकी मोठी कॅश अकाउंटमधून काढली तर त्याची लिंक राहणार / चौकशी होणार हे माहिती असल्याने असले व्यवहार आता बरेच कमी झालेत. ३-४ ओळखीच्या एजंट्सनी ही माहिती दिली. तुमच्या उदाहरणातले व्यवहार - कुपन्स, मोबाईल रिचार्ज आणि अ‍ॅपमधला बॅलन्स, हे भ्रष्टाचार ह्या संज्ञेखाली येत नाहीत. ते टेक्निकल एरर ह्या सदरात येतात. कॅशलेस व्यवहार हे भ्रष्टाचाराचे उच्चाटन करणार नाहीत, पण त्याचा मागोवा ठेवणं कॅशच्या मानाने नक्कीच सोप आहे. ज्यांना चोरी करायची आहे ते ती कशीही करू शकतात. पूर्णपणे इ व्यवहार करून नंतर पिडिएफ मधे बिलाची रक्कम बदलणारे महाभागही माहिती आहेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 10/25/2017 - 15:00 नवीन
पण एखादी गोष्ट जितक्या प्रमाणात रोख स्वरूपापासून दूर जाते तेवढ्या प्रमाणात आपल्या विवेकाचे आपल्यावरील नियंत्रण कमी होत जाते.
नेहमीच असं होत नाही कल्पना करा तुम्ही तुमच्या २००-३०० घरे असलेल्या सोसायटीच्या आवारात रात्री फेरफटका मारत असताना १) तुम्हाला पाचशेची एक नोट सापडली २) पाचशे रुपये किमतीची वस्तू (चांदीचा दागिना, सोडेक्सो कुपन वा इतर काही वस्तू) तुम्हाला जवळपास कुणीच दिसत नाहीये म्हणजे ती नोट वा वस्तू तिथे पडून बराच वेळ झालाय. त्याच्या मालकाचा शोध घेणं सोप नाहीये पण अशक्यही नाहीये. सीसीटीव्ही फूटेज तपासणे, सूचना फलकावर सूचना लिहिणे ई उपायांनी तुम्ही हा शोध पुढील दोन-तीन दिवसात तरी घेवू शकता. तर सांगा कोणत्या बाबतीत तुम्ही असा शोध घेवून मालकाला संबंधित वस्तू (१ वा २ बाबत) परत करण्याकरिता जास्त धडपड कराल ?
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Wed, 10/25/2017 - 16:33 नवीन
यात दागिन्याऐवजी समजा ५०० रूपये किंमतीचा कॉम्पुटरचा माऊस मिळाला तर त्या माऊसचा मालक कोण हे शोधून पडायच्या भानगडीत फार कोणी पडेल असे नाही. पण दागिना असेल तर तो प्रयत्न अधिक केला जाईल. ते का? कारण एक तर सोने-चांदी वगैरे गोष्टी एक गुंतवणुक म्हणून वापरल्या जातात म्हणजेच आज जरी त्या दागिन्याची किंमत ५०० असली तरी भविष्यातली किंमत त्यापेक्षा जास्त असू शकेल. दुसरे म्हणजे अशा दागिन्यांशी अनेकदा भावना निगडीत असतात (उदाहरणार्थ आईची आठवण वगैरे). तिसरे म्हणजे दागिन्याचे डिझाईन वगैरे वेगळे असते त्यामुळे दागिन्याचा मालक शोधणे नोटेचा मालक शोधण्यापेक्षा सोपे असते. तसेच पहिल्या दोन कारणांमुळे आपल्यालाही त्या दागिन्याचा मालक शोधावा असे वाटायची शक्यता जास्त असेल. त्यामुळे रस्त्यावर दागिना सापडल्यास त्याचा मालक शोधून काढावा आणि त्याला ती वस्तू परत करावी हे वाटायची शक्यता जास्त. पण त्याच जागी कॉम्प्युटरचा माऊस सापडला तर त्याचा परिणाम फार होणार नाही. तेव्हा दागिन्याच्या केसमध्ये हे इतर घटक निर्णयप्रक्रीयेत येतात. त्यामुळे ही सफरचंद-सफरचंद तुलना नाही आणि आपण दागिना परत करायला धडपडलो म्हणजे इतर सगळ्याच वस्तू परत करायला धडपडू असे त्याचे जनरलायझेशन करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 10/26/2017 - 10:20 नवीन
मला वाटतंय माऊस आणि दागिना फार फरक पडणार नाही. जर माऊस पाचशे रुपयाचा (पक्षी - महागडा) आणि नवीन असेल आणि तो सापडणार्‍याला जर ते समजत असेल म्हणजे माऊसची अंदाजे किंमत त्याला कळत असेल तर तो नक्कीच म्हणेल की "अरेरे.. कुणाचा तरी महागडा माऊस इथे पडलाय, चला त्याचा मालक शोधून त्याला देवूयात" निदान नोटेचा मालक शोधण्यापेक्षा तो नक्कीच जास्त कष्ट माऊसचा मालक शोधण्यास घेईल. मी केलेली तुलना सफरचंद-सफरचंद वगैरे प्रकारातलीच होती. म्हणूनच मी फक्त दागिना शब्द न वापरता
चांदीचा दागिना, सोडेक्सो कुपन वा इतर काही वस्तू
असं म्हंटलं होतं तर ते एक असो. तुमच्या लेखात तुम्ही कुणा संशोधकाने केलेले कोक आणि डॉलरचे उदाहरण लिहिले आहेत. खरं तर ती सफरचंद-सफरचंद तुलना नक्कीच नाही. खाण्या(वा पिण्याच्या) वस्तुबाबत एक भावना अशी असते की "ही खाण्याचीच जिन्नस आहे, याबाबत कशाला उगाच संकोच". समजा माझा एक जवळचा मित्र माझ्या घरी आला आणि समोर त्याला आवडणारे फळ वा चॉकलेट दिसले तर तो मला न विचारता/हक्काने उचलून खावू लागेल , त्या फळाची किंमत दहा /वीस रुपये असली तरी. पण तेच त्याला एखादी वस्तू (उदा: पेन , शोभेची वस्तू ई) आवडलं तरी तो ते त्याच हक्काने खिशात घालणार नाही... फारच मोह झाला तरी तो ते पेन माझ्याकडे मागेल, पण न विचारता खिशात टाकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 11:29 नवीन
निदान नोटेचा मालक शोधण्यापेक्षा तो नक्कीच जास्त कष्ट माऊसचा मालक शोधण्यास घेईल.
माऊस सापडला तर कोणी असे कष्ट घेईल असे वाटत नाही. निदान दागिना सापडल्यावर कष्ट घेईल त्यापेक्षा कमीच. तरीही नोटेचा मालक शोधण्यापेक्षा कोणत्याही वस्तूचा मालक शोधणे नक्कीच जास्त सोपे.
समजा माझा एक जवळचा मित्र माझ्या घरी आला आणि समोर त्याला आवडणारे फळ वा चॉकलेट दिसले तर तो मला न विचारता/हक्काने उचलून खावू लागेल , त्या फळाची किंमत दहा /वीस रुपये असली तरी. पण तेच त्याला एखादी वस्तू (उदा: पेन , शोभेची वस्तू ई) आवडलं तरी तो ते त्याच हक्काने खिशात घालणार नाही
आणि १०-२० रूपयाची नोट तर अजिबातच खिशात घालणार नाही. हाच तर मूळ मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 10/26/2017 - 16:24 नवीन
आणि १०-२० रूपयाची नोट तर अजिबातच खिशात घालणार नाही. हाच तर मूळ मुद्दा आहे.
तुम्ही consumable वस्तूची पैशाशी तुलना करताय , आणि पुढे जावून वस्तू आणि कॅशलेस यांना एका तराजूत तोलताय हे जरा विचित्र वाटतंय. कॅशलेस हा ही पैसाच असतो, त्याला वस्तूसारखं कुणी समजणार नाही. मित्राची पन्नास रुपयाची कोक मी सहज पीईन (अगदी त्याला न विचारताही), पण त्याच्या पाकिटातली पन्नासची नोट कधीच घेणार नाही हे खरंच...पण त्याचप्रमाणे त्याच्या क्रेडिटकार्डाचा तपशील आणि त्याचा मोबाईल जवळ असला तरी त्यावरुन पन्नास रुपयांची खरेदी मी करणार नाही हे ही तितकंच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 17:31 नवीन
मित्राची पन्नास रुपयाची कोक मी सहज पीईन (अगदी त्याला न विचारताही), पण त्याच्या पाकिटातली पन्नासची नोट कधीच घेणार नाही हे खरंच...पण त्याचप्रमाणे त्याच्या क्रेडिटकार्डाचा तपशील आणि त्याचा मोबाईल जवळ असला तरी त्यावरुन पन्नास रुपयांची खरेदी मी करणार नाही हे ही तितकंच खरं.
हो बरोबर. आपल्या ओळखीच्या लोकांना शक्यतो कोणी फसवायला जाणार नाही (ऑनलाईन/ऑफलाईन). प्रश्न हा की इन जनरल (बहुतांशी अनोळखी लोकांना-- वर अ‍ॅपचे उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे) रोखीत फसविण्यापेक्षा कॅशलेस फसविले जायचे प्रमाण जास्त असेल का? आणि रोखीत अगदी ०% फसवणुक होईल आणि कॅशलेसमध्ये १००% फसवणुक होईल असे नक्कीच नाही. प्रश्न हा की रोखीपेक्षा कॅशलेसमध्ये फसवणुकीचे प्रमाण जास्त असेल का हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गंम्बा गुरुवार, 10/26/2017 - 13:06 नवीन
तुमच्या लेखात तुम्ही कुणा संशोधकाने केलेले कोक आणि डॉलरचे उदाहरण लिहिले आहेत. खरं तर ती सफरचंद-सफरचंद तुलना नक्कीच नाही. खाण्या(वा पिण्याच्या) वस्तुबाबत एक भावना अशी असते की "ही खाण्याचीच जिन्नस आहे, याबाबत कशाला उगाच संकोच"
आणि फ्रीज मधे नोटा बघितल्यावर कोणालाही ही काहीतरी गेम आहे असेच वाटेल त्यामुळे फ्रीज मधल्या नोटा तर नक्कीच कोणी घेणार नाही. नोटा ठेवायची फ्रिज जागा कधीच नसते. तिजोरीत कोक चे कॅन सापडले तरी लोकांना ते घ्यायची भिती वाटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 10/26/2017 - 16:25 नवीन
तिजोरीत कोक चे कॅन सापडले तरी लोकांना ते घ्यायची भिती वाटेल
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:46 नवीन
हे उदाहरण मुळातच चुकीचे आहे कारण यात प्रामाणिक माणसाचा उल्लेख आहे. माउस ची किंमत यःकश्चित (३००-४००) असल्याने ( शिवाय तो रस्त्यावर पडला असल्याने तो चालू असण्याची शक्यता कमी असल्याने) माणूस त्याबद्दल फार कष्ट घेणार नाही पण दागिना १० ग्रामचा असेल तरीही त्याची किंमत ३०००० होते (मग तो मोटारखाली येऊन चेपला गेला असेल तरीही) तेंव्हा प्रामाणिक माणूस दागिन्यांबाबत मालकाचा शोध घेण्याचा जास्त प्रयत्न करेल तिथेच चोर दागिना चोरण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. आणि माऊसला तर हातपण लावणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 18:04 नवीन
हे उदाहरण मुळातच चुकीचे आहे
http://www.misalpav.com/comment/967534#comment-967534 या प्रतिसादात मराठी कथालेखकांनी ५०० रूपयांच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे तो वाचला नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रंगीला रतन Wed, 10/25/2017 - 15:02 नवीन
आपण कृपया गोळ्या, बिस्किटे अशा किरकोळ किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुट्टे पैसे खिशात बाळ्गावेत. म्हणजे उगाच आपण अखिल भारतीय किंवा आखिल विश्व पाकीटमार, भ्रष्टाचारी व भुरटे चोर संघटनेचे अध्यक्ष/सरचिटणीस गेला बाजार कार्यकर्ते असून, कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे आता ह्या व्यवसायात कार्यरत असलेल्या बऱ्याच मोठ्या वर्गाची उपजीविका धोक्यात आल्याच्या चिंतेने ग्रस्त असल्याच्या मानसिकतेतून "कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार" असल्या शीर्षकाचे लेख लिहिण्याचे टाळून आपल्या व वाचकांच्या बहुमूल्य वेळेची बचत करू शकता. एकतर लेखातली आणि प्रतिसादातली तुमची अनेक उदाहरणे (काही अपवाद वगळता) हि जवळपास १० वर्षे किंवा त्याहूनही जुनी आहेत तर काही हास्यास्पद व परस्परविरोधी आहेत. ह्या लेखाचं शीर्षक जर डिजिटल पेमेंट किंवा ई-पेमेंट आणि चोरी/भ्रष्टाचार अशा प्रकारचं असतं तर काही गोष्टी पटण्या सारख्या आहेत. आपला, रंगीला रतन
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 10/25/2017 - 15:39 नवीन
आपण काही काळजी घेवू शकता. मी पेटीएम हे अ‍ॅप नियमित वापरतो, गरजेप्रमाणे त्यात क्रेडिट कार्डावरुन पैसे टाकत असतो. एकदा क्रेडिट कार्डाचे स्टेटमेंट बघताना लक्षात आले की मी अनेकदा १००-२०० वा कधी जास्त रक्कम पेटीएम तसेच ओला मनी यामध्ये टाकली आहे. पण मी खरेच अशी रक्कम टाकली आहे का हे तपासणं कठीण आहे. कदाचित माझ्या या सवयीमुळे पुढे कधी माझी फसवणूक होवू शकते. मग त्यानंतर मी एक युक्ती अमलात आणली. जर मला आज म्हणजे २५ तारखेला पेटीएम वा ओलामनीमध्ये कमीत कमी २०० रुपये टाकण्याची गरज असेल तर मी २२५ रुपये टाकेन. २८ तारखेला ३०० रुपये टाकायची गरज असल्यास ३२८ उपये टाकेन.. असे केल्याने मला माझं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट सहज तपासता येतं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:42 नवीन
पेटीएमचा प्रत्येक व्यवहार आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतो. मी गेले ११ महिने हजारांनी( आतापर्यंत लाखाच्या पलीकडे गेला आहे) रुपयांचा व्यवहार करत आहे. एकही पैसा इकडचा तिकडे झालेला नाही ओला मनीचा माझा अनुभव वाईट आहे कारण मला न विचारताच ते पैसे माझ्या खात्यातून वजा झाले. ( त्यांच्याशी संपर्क केला असतात ते म्हणाले आपल्या अटींमध्ये हे नमूद केलेले आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 18:17 नवीन
ओला मनीचा माझा अनुभव वाईट आहे कारण मला न विचारताच ते पैसे माझ्या खात्यातून वजा झाले. ( त्यांच्याशी संपर्क केला असतात ते म्हणाले आपल्या अटींमध्ये हे नमूद केलेले आहे).
एक्झॅटली. हाच मुद्दा आहे. ओला मनी कोण चालविते मला माहित नाही. जे कोणी चालवत असेल ती माणसे तुमच्या संपर्कात आली, त्यांनी तुम्हाला फसविले (कॅशलेस), आणि फसविले ते त्यांच्या अटींमध्ये नमूद केले आहे असे म्हटले आणि ती रक्कम फार नाही त्यामुळे तुम्ही त्याविषयी फार काही करायचा प्रयत्न केला नसावा (हा अंदाज). थोडाफार असाच प्रकार माझ्याबरोबर त्या लिटल अ‍ॅपमुळे झाला आहे. २० डिसेंबरपर्यंत मला ती कुपने ग्राह्य धरणार्‍या पिझ्झा हटच्या स्टोअरमध्ये जायला मिळाले नाही तर माझे पैसे गेलेच. आता त्यांनी २० डिसेंबरपर्यंत मुदत दिली हा एका अर्थी त्यांचा चांगुलपणाच झाला. समजा त्यांनी ४ दिवसच मुदत दिली असती तर मी एकदा पिझ्झा हटमध्ये गेल्यानंतर परत चार दिवसात थोडीच जाणार होतो? आणि 'तुम्ही चारच दिवस मुदत कशी देता' असा प्रश्न थोडीच विचारू शकणार होतो? म्हणजे गेलेच की नाही माझे पैसे? आणि त्यांनी म्हटले की आमच्या अटींमध्ये रिफंड देणार नाही, कुपनची वैधता एक्स्टेन्ड करणार नाही असे म्हटले असेल तर बसणार ना ग्राहक बोंबा मारत? आणि हजार रूपयांसाठी मी काही पोलिस तक्रार नाही की त्याची बातमी होणार नाही. हे प्रकार पूर्वी होत होते का? होत होते ना. पण अशी कुपने मी माझ्या घराच्या जवळच्या दुकानातून विकत घेतली असती.पण आता पहुच वाढल्यामुळे बंगलोर्/हैद्राबाद किंवा अन्य कुठे बसलेल्यांकडून विकत घेत आहे. तसेच पूर्वी ती कुपने घेऊन मी त्या दुकानदारापुढे जाऊन आरडाओरडा करू शकत होतो. त्यातून नुकसान झाले तरी ते भरून निघायची शक्यता जास्त होती. आता ते शक्य नाही. अशाप्रकारची अनेक अ‍ॅप्/वेबसाईट्स मुळे अशी फसवणुक करायची संधी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे.तुम्ही एका अर्थी माझाच मुद्दा मान्य करत आहात. अर्थातच 'गुड ओल्ड डेज' म्हणून नोस्टाल्जियाचे अश्रू ढाळणारा मी नाही आणि तो प्रकार मला आवडतही नाही. फक्त मुद्दा हा की कॅशलेसवर भर देताना ही दुसरी बाजूही लक्षात घेतली जावी आणि कॅशलेस म्हणजे गैरप्रकारांवर रामबाण उपाय वगैरे समजू नये इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा