ताज्या घडामोडी - भाग १७
यापूर्वीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा सुरू करत आहे.
💬 प्रतिसाद
(200)
B
babu b
Sat, 12/02/2017 - 09:27
नवीन
No other country in the world has used electronic voting in as large a scale as India has. Since India is currently the second largest population in the world and therefore by default becomes the largest national population to vote in a democratic process, any use of electronic voting machines on a pan Indian scale would make it the largest instance of electronic voting.
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/03/2017 - 06:58
नवीन
http://www.hindustantimes.com/mumbai-news/in-nanded-polls-maharashtra-uses-paper-trail-machine-for-first-time-25-face-technical-snag/story-Gz7FydXDYNysqg8NHPio0J.html
The State Election Commission (SEC), on Wednesday, used the Voter Verifiable Paper Audit Trail (VVPAT) mechanism for the first time in Maharashtra during the municipal elections in Nanded. Although the overall reaction of the voters was satisfactory, around 25% of the machines used developed technical snags, raising questions about the technical preparations of the system.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sun, 12/03/2017 - 08:12
नवीन
जमलं तर एक प्रश्न स्वतःला विचारून बघा - भारतात सार्वत्रिक निवडणुकांसाठी इवीएम साधारणपणे १९९९ मध्ये वापरायला सुरवात झाली. ते बरोबर आहे की नाही किंवा आता तुम्हाला त्याबद्दल जेवढा संशय वाटतो तेवढा २०१४ आधी वाटला होता का? वाटला असेल तर याच तीव्रतेने तुम्ही मांडला होतात का? याचे उत्तर नाही असेल तर तुम्ही दांभिक गणले जाऊ शकता!
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/03/2017 - 09:34
नवीन
९९ ते १४ .. १५ वर्षे .. खूपच क्षूद्र काळ आहे..
ॲस्पिरिनचे काही इफेक्ट अन काही साइड इफेक्ट १०० वर्षानी लक्षात आले.
त्यामुळे तेंव्हा असे मत का नव्हते , हा प्रश्न निरर्थक आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 12/03/2017 - 10:29
नवीन
इफेकट ठीक आहे पण कोणते साईड इफेक्ट्स 100 वर्षांनी लक्षात आले बुवा?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 12/02/2017 - 13:44
नवीन
आम्रिकावाले "बऱ्याच गोष्टींसाठी" कागदच वापरतात म्हणे )))---(((
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 12/02/2017 - 13:45
नवीन
पादऱ्याला पावट्याचे निमित्त
- Log in or register to post comments
च
चिर्कुट
Sat, 12/02/2017 - 14:10
नवीन
आयडी हॅक झाला की काय? इतके पातळी सोडलेले प्रतिसाद एकाच धाग्यावर?
तसा मी इथे वाचनमात्रच असतो, पण लिहिणार्या प्रत्येक आयडीची एक प्रतिमा मनात तयार झालेली असते. तुम्ही इतर विषयांवर खूपच चांगली माहिती देत असता, मात्र भाजपाला कुणी विरोधी लिहिलं, की बर्याच वेळेस पातळी सोडलेले प्रतिसाद दिसतात. अर्थात, राजकीय धुळवड दोन्ही बाजूने चालूच आहे.
किमान तुमच्यासारख्या लोकांनी तरी मिपावर वातावरण नीट ठेवावं अशी विनंती. प्रतिवाद साध्या शब्दांत पण करता येतो.. विनाकारण गलिच्छ भाषा वापरणे म्हणजे समोरच्याचा मुद्दा खोडता न येण्याचे लक्षण वाटते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 12/02/2017 - 14:36
नवीन
इतके
एकूण तीन प्रतिसाद आहेत
आणि त्यातील दोन तर बाबू बी (उर्फ चंपाबाई, मोगा खान, जामोप्या, हितेश) असे अनेक उडालेले आयडी घेतलेल्या बहुरूपी माणसाचे आहेत. या व्यक्तीचाय एकंदर अप्रासंगिक आणि संदर्भहीन पिचक्या वर असे प्रतिसाद देण्यात मला किंचितही वाईट वाटत नाही.
पातळी सोडलेले प्रतिसाद एकाच धाग्यावर
राहिला तिसरा प्रतिसाद जो केवळ एक मराठी "म्हण" आहे. ती तुम्हाला समजली नसेल तर किंवा आवडली नसेल तर क्षमस्व पण तो पातळी सोडून आहे असे मला तरी वाटत नाही.
बाकी आपली मर्जी.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 12/02/2017 - 15:31
नवीन
लोकहो,
आता असं बघा की, इव्हांकादीदींनी मुक्ताफळे झाडल्यावर आपले ओबामामामा मागे कसे राहतील. काय म्हणताहेत ते बघा तरी :
च्यायला, खरंतर आंतरजालामुळे सत्ताधारी लोकांच्या भानगडी चव्हाठ्यावर येऊ घातल्या आहेत. यामुळे लोकशाहीस धोका पोहोचणार नसून उलट ती सशक्त होईल, ते लोकांस चांगलं कळतं. मामांना वाटतं की लोकं बावळट आहेत. काय हा अडाणीपणा! पण पुढे तर मामांनी कहर केला आहे.
मामा म्हणतात की भारतीय आणि अमेरिकी दोन्ही राज्यघटना 'वुई द पीपल' या तीन शब्दांनी सुरू झाल्या आहेत, हे भारत व अमेरिकेतलं साधर्म्य आहे. बास. मामांनी हसवायचा विडा उचललेला दिसतोय. हेच जर साधर्म्य असेल, तर ते तेव्हढ्यापुरतंच आहे. मामांना लिहितावाचता येतं ना, अशी शंका मनी उत्पन्न होते.
इव्हांकादीदी विसरल्या तसेच ओबामामामा सुद्धा पप्पूप्रतिबंधक लस टोचून घ्यायला विसरले.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/03/2017 - 05:56
नवीन
Make in India saved Rs. 1 lakh Crore
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 12/03/2017 - 08:32
नवीन
मणिपूर च्या चुरचंदपूर ह्या डोंगराळ भागात राहणाऱ्या काही कुकी जमातीच इस्राईल च्या Bnei Menashe ह्या 10 पैकी एका हरवलेल्या जमातीशी संबध आहेत हे 1950 साली सिद्ध झाले होते. परंतु ह्या भागातील लोकांनी ज्यू धर्म स्वीकारून इसराईल मध्ये मायग्रेट होण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. ही इसराईल मध्ये मायग्रेट होणारी कम्युनिटी भारत इसराईल संबंध मध्ये मोलाची कामगिरी बजावू शकतात. ह्या पूर्ण विषयाशी रेलेटेड एक लेख the hindu मध्ये आला आहे.
The lost Jews of Churachandpur
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/03/2017 - 13:55
नवीन
देश सोडून धर्म त्यागून ते वेगळी ओळ्ख मिळवू पहाताहेत. आता ते नेमकी काय मदत करतील भारताला ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 12/03/2017 - 14:29
नवीन
अमितदादा,
हरवलेले यहुदी म्हंटलं की इस्रायली लोकांना फार उत्साह येतो. अशा प्रकारे अनेक जमाती सापडल्याचा दावे वेळोवेळी करण्यात आले आहेत. त्यापैकीच हा एक असावासं वाटतं. विशेषत: बेने मेनाश या प्रस्तुत ईशान्य भारतीय जमातींचं ख्रिस्तीकरण झाल्यावर नंतर यहुदी मूळ उघडकीस आलं हा दावा अति संशयास्पद वाटतो आहे. या जमाती जर यहुदी होत्या तर त्यांना परत औपचारिक रीत्या यहुदी पंथात समावेश करण्याचं कारण नाही.
असा प्रकार शनवारतेल्यांच्या बाबतीत झाला होता. बेणे इस्रायली म्हणजे कोकणातले मराठी भाषिक यहुदी कित्येक शतकं भारतात रहात आले आहेत. दुसरं देऊळ फुटण्यापूर्वी (म्हणजे इ.स. ७० पूर्वी) ते भारतात आले. त्यानंतर त्यांचा उर्वरित यहुद्यांशी संपर्क राहला नाही. पुढे यहुद्यांचं दुसरं देऊळ नष्ट केलं गेलं. त्या घटनेवर आधारित दोन मुख्य रीतीभाती (=रिच्युअल्स) यहुदी पंथांत समाविष्ट झाल्या. मात्र याचा पत्ता शनवारतेलींना लागणं शक्य नव्हतं.
बऱ्याच नंतर १९४८ साली इस्रायलची स्थापना झाल्यावर बरेच बेणे इस्रायली कोकण सोडून तिथे गेले. तिथे त्यांना भेदभावाची वागणूक मिळाली. रीतीभाती वेगळ्या असल्याने त्यांना यहुदी मानू नये असं काही राबींचं मत पडलं. मात्र तत्कालीन प्रमुख यहुदी रीतीभाती दुसरं देऊळ पाडल्यानंतर निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे बेणे इस्रायली हा खरंतर सर्वात जुन्या प्रकारचा यहुदी पंथ ठरतो.
अशा भेदभावी वागणुकीमुळे साठीच्या दशकात काही शनवारतेली इस्रायल सोडून परत भारतात यायला निघाले. तेव्हा कुठे तिथल्या ढुढ्ढाचार्यांना जाग आली. मग शनवारतेली पूर्ण यहुदी आहेत म्हणून जाहीर केलं गेलं. आंतरविवाहांना परवानगी देण्यात आली.
तर प्रश्न असा आहे की बेने मेनाश पूर्ण यहुदी का धरले जात नाहीयेत? बेणे इस्रायली आणि बेने मेनाश यांच्या परिस्थितीत फारसा फरक नाही. बेने मेनाश जर हरवलेले यहुदी आहेत, तर त्यांना उत्तरकालीन औपचारिक यहुदी रीती का आत्मसात कराव्या लागताहेत? गरज काय मुळातून? की ईशान्येतले बेने मेनाश ही निव्वळ धूळफेक आहे?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 12/03/2017 - 15:24
नवीन
@babu b
कोणत्याही देशात राहणारे भारतीय हे त्या देशात भारतासाठी soft power असतात. याच कारण कितीही झालं तरी त्यांचा मनात आपल्या देशाविषयी आत्मीयता राहते, त्यादेशाच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्क्षय नसेल तर अप्रत्येक्ष प्रभाव राहतो। याच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील ज्यू जे इस्राईल साठी दबाव गट तयार करून आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारतीय community समोर मी भारताचा खरा मित्र असेन अशी ग्वाही दिली होती हे आश्वासन द्यावं लागणं हे soft power च एक उदाहरण आहे.
@गामा पैलवान
यातील बहुतांश लोक हे देश आणि धर्म फक्त आपल्याला उत्तम आयुष्य मिळावे यासाठी सोडत आहेत. तसेच अनेक लोकांनी अँप्लिकेशन करून सुद्धा ठराविक लोकांना प्रवेश मिळतो आहे त्यामुळं यात खूप मोठी गडबड आहे असे मला वाटत नाही. मुळात इस्राईल हा ज्यू चा देश आहे, त्या देशाच्या विचारसरणीवर कोणत्याही ज्यू व्यक्तीच ते नैसर्गिक घर आहे. त्यामुळं सध्या ख्रिस्ती असलेल्या लोकांना परत ज्यू करून त्यांना प्रवेश दिला जात आहे, अर्थात हे योग्य आहे असं माझं मत नाही जे बातमीत आहे ते सांगण्याचा प्रयत्न आहे.
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/03/2017 - 16:04
नवीन
अमेरिकेतील भारतीय म्हणजे नेमके कोण ? अमेरिकन नागरिकत्व घेतलेले की भारतीय नागरिकत्व असून एन् आर आय असलेले ? दोघांच्या विचारकक्षा एक नसतात , ओव्हरलॅप होउ शकतात , पण दोघांच्या कक्षा भिन्न आहेत.
ह्या प्रकरणातले ज्यू हे एन् आर आय म्हणून जात नाही आहेत.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 12/03/2017 - 16:49
नवीन
माझ्या मते दोन्ही प्रकारचे लोक, दोन्ही मध्ये भारताविषयी आत्मीयता असते जरी त्यांचा विचार कक्षा वेगळ्या असल्या तरी. पहिल्या काही पिढीत तरी. वरील जे लोक इस्राईल ला जातायत त्यातील बहुतांश लोक हे मोदी इसराईल मध्ये गेल्यानंतर त्यांच्या स्वागताला आणि कार्यक्रमाला उपस्थित होते। वरील लेखात त्याचा उल्लेख आहे.
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/03/2017 - 15:40
नवीन
प्रस्थापिताना युद्धात मरायला , पालख्या उचलायला , अब्दागिर्या हलवायला अन पायखाने धुवायला माणसं कमी पडायला लागली की हरवलेल्यांचा शोध , घरवापसी , जेनेटिक्सची भाषा वगैरे प्रकार सुरु होतात.
..
अब्दागिर्या हलवायला अन पायखाने धुवायला नकार देवून स्वत: होउन हरवलेला..
बाबूराव !
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 12/03/2017 - 10:48
नवीन
https://www.loksatta.com/vishesh-news/real-estate-scams-by-ias-and-ips-officers-in-mumbai-1594905/
खरे सरकार चालवणरे हे लोक, ह्यांच्या कडुन स्वच्छ प्रशासनाची अपेक्षा ठेउ शकतो का ?
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/03/2017 - 13:50
नवीन
बातमी छापणार्यानाही आता एखादा फ्लॅट मिळेल , अन मग सगळे प्रकरण गप्प होईल.
बायदिवे , पूर्वीच्या सरकारच्या काळात सगळाच भ्रष्टाचार सरकारच्या माथ्यावर यायचा ... आता सरकारचा / अधिकार्यांचा / इतरांचा असे क्लासिफिकेशन सुरु झाले का ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/03/2017 - 13:39
नवीन
अलाहाबाद (उत्तर प्रदेश) महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आल्याने युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "करून दाखवले' असे ट्विट केले आहे. "शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात. करून दाखवलं. करून दाखवणार. ही तर सुरुवात आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर हिंदीत मतदारांचे आभारही मानले आहेत.
http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-shivsena-one-corporator-alahabad-municipal-85294
पोकळ फुशारक्या मारण्याची ठाकरे घराण्याची उच्च परंपरा आदूबाळ सुरू ठेवणार हे नक्की!
. आवाज कोणाचा! शिवसेनेचा!!
- Log in or register to post comments
M
mayu4u
Sun, 12/03/2017 - 14:30
नवीन
तो मिपाकर आदूबाळ यांचा अपमान आहे! :D
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 12/03/2017 - 17:14
नवीन
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक जिंकून सत्तेत आल्यास शिवसेना गुजरातमधील शेतकर्यांना कर्जमाफी देईल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना गुजरातमध्ये बहुमताला लागतील तितक्या जागांवर लढत तरी आहे का? आणि जरी सगळ्या जागांवर लढत असली तरी शिवसेनेचे ९२ आमदार गुजरातमधून कसे काय निवडून येणार आहेत? आणि ते ही मुंबईत आयुष्यभर गुजरात्यांना शिव्या घालायची परंपरा असताना?
- Log in or register to post comments
M
mayu4u
Mon, 12/04/2017 - 02:32
नवीन
http://m.hindustantimes.com/india-news/rahul-gandhi-to-file-nomination-for-congress-president-s-post-on-monday/story-VWqIEwOHzRhqu43NTx65PJ.html
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/04/2017 - 05:59
नवीन
राहुल गांधी यांना "कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या" बोहल्यावर चढायचा मुहुर्त शेवटी आज मिळालाच. सुरजेवाला, मनिष तिवारी व राजीव त्यांगी सारख्या कॉंग्रेजी प्रवक्त्या/भाटांचा आनंद आज अगदी ओसंडून वाहत आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/04/2017 - 09:29
नवीन
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी आज अर्ज भरला आहेच. त्यावर शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नाही असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या टिकेमुळे अध्यक्षपदासाठी कोणी डमी उमेदवार उभा केला जाऊ शकतो असे पूनावाला यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने खरोखरच डमी उमेदवार उभा केल्यास त्याचे आश्चर्य वाटणार नाही. असा डमी उमेदवार म्हणून २००० साली जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींविरूध्द अध्यक्षपदाची निवडणुक लढवली होती. गुजरात निवडणुकांपूर्वी अध्यक्ष बनणे टाळण्यासाठी डमी उमेदवार उभा केल्यास आश्चर्य वाटणार नाही असे मी मिपावर ताज्या घडामोडींच्या मागच्या भागात लिहिले पण होते. या शेहजाद पूनावालांना त्याच कारणासाठी काँग्रेसनेच प्लॅन्ट केले होते का अशीही शंका वाटत होती . कारण काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे हे अगदीच जगजाहिर आहे. त्यावर आवाज उठवून या पूनावालांनी नक्की काय मिळवले? आणि त्यातही कोणा मोठ्या नेत्याने त्यावर काहीही न बोलता पूनावालांसारख्या कनिष्ठ नेत्याने आवाज उठवणे, त्याला मिडियात प्रसिध्दी मिळणे हे आधीपासूनच ठरविलेले होते का असेही वाटत होते. पण त्यातच मोदींनी या पूनावालांच्या बोलण्याचा संदर्भ घेऊन काँग्रेसवर हल्ला केल्यामुळे अजूनच गुंतागुंत वाढली आहे असे दिसते. कारण जर डमी उमेदवार उभा करण्यासाठी कारण म्हणून कोणीतरी घराणेशाहीविरूध्द आवाज उठवायचा असा बेत असेल तर असा डमी उमेदवार उभा केला जायची शक्यता आहे हे जाहिरपणे बोलायचे कारण समजत नाही. की मोदींनी यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेतल्यामुळे पूनावालांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत हे पण समजत नाही.
असो. यात पुढे काय होते हे बघायचे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/04/2017 - 09:39
नवीन
अध्यक्ष झाल्यानंतर तरी राहुलचा पोरकटपणा जाऊन परिपक्वता व प्रगल्भता यावी ही सदिच्छा.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/04/2017 - 11:10
नवीन
अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांना टॅक्सकट (करसवलती) द्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीने अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयके मंजूर केली आहेत.
यापूर्वी रॉनाल्ड रेगन आणि जॉर्ज बुश कनिष्ठ यांनी अशाप्रकारे टॅक्सकट केले होते. पण दोघांनाही सरकारी खर्चात मात्र कपात करता आली नव्हती. बुश कनिष्ठांच्या काळात तर दोन युध्दांमुळे सरकारी खर्च वाढला होता. त्यातून रेगन आणि बुश कनिष्ठ या दोघांच्याही काळात वित्तीय तूट वाढली होती. डॉनल्डतात्यांकडून सरकारी खर्च कमी केले जायची अपेक्षा कितपत करता येईल याची कल्पना नाही. त्यातूनच वित्तीय तूट आणखी वाढली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतील.
मला स्वतःला रिपब्लिकन आर्थिक विचार पटतात (रिपब्लिकन म्हणजे रॉनाल्ड रेगनचे. डॉनल्डतात्या ट्रम्प नावापुरतेच रिपब्लिकन आहेत). त्यामुळे सरकारी खर्च कमी करणे आणि करही कमी करणे हे मला अधिक पटते. पण सरकारी खर्च कमी करणे म्हणजे अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावणे गरजेचे ठरेल. आणि कोणाही राजकारण्याला तसे करणे परवडणार्यातले नसते.त्यामुळे रॉनाल्ड रेगन यांनी अगदी शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणापासूनच सरकारी खर्च कमी करणे ही आपली प्राथमिकता असेल असे म्हटले तरी प्रत्यक्षात मात्र तसे केले नाही. याबाबतीत रेगन यांच्याविषयी "he talked better than he walked" (इंग्लिशमध्ये वॉक द टॉक या म्हणीला अनुसरून) असे म्हटले गेले होते. जर रेगनसारख्या प्रचंड लोकप्रिय अध्यक्षांना ते करणे जमले नसेल तर मोठ्या प्रमाणावर विरोध होत असलेल्या ट्रम्पतात्यांसारख्या अध्यक्षांना तसे करणे कठिणच जायची शक्यता बरीच जास्त.
या करतरतुदींमध्ये एक विचित्र तरतूद आहे असे माझ्या एका मित्राच्या फेसबुक भिंतीवर पाहिले. अमेरिकेत समजा पी.एच.डी विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजार डॉलर्स शिष्यवृत्ती मिळत असेल तर आतापर्यंत त्यांचे करपात्र उत्पन्न २५ हजार डॉलर्स इतकेच असायचे. पण या तरतुदीनुसार त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि त्याचबरोबर ट्यूशन वेव्हर या दोन्ही गोष्टींचा समावेश करपात्र उत्पन्नात करण्यात येणार आहे. अमेरिकन विद्यापीठांच्या फी वर्षाला ५० हजार डॉलर्स पर्यंत असतात. निदान चांगल्या विद्यापीठांच्या तर नक्कीच. या विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्तीचे पॅकेज मिळते त्यात वर्षाला २५ हजार शिष्यवृत्तीबरोबरच ५० हजार डॉलर्स फीमाफी पण असते. या नव्या तरतुदीप्रमाणे मग त्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न वर्षाला ७५ हजार डॉलर्स धरले जाईल असे त्या फेसबुक पोस्टमध्ये वाचले आणि त्याला काही अमेरिकनांनी दुजोराही दिला होता हे पण वाचले. याविषयी आणखी खोदाखोद केली तेव्हा https://www.cnbc.com/2017/11/16/house-gop-tax-plan-could-increase-taxes-for-grad-students-by-400-percent.html यावर हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजने पास केलेल्या बिलात ही तरतूद आहे (पण सिनेटच्या बिलात नाही) असे दिसते. हे खूपच धक्कादायक आहे. कारण करपात्र उत्पन्न ७५ हजार डॉलर्स असेल तर मुळातल्या २५ हजारांपैकी या विद्यार्थ्यांच्या हातात फार पैसे शिल्लक राहणार नाहीत. एकूणच पी.एच.डी करताना विद्यार्थ्याला आपला जेवाखायचा आणि राहायचा खर्च कसा भागवायचा ही चिंता करावी लागू नये आणि पूर्ण लक्ष संशोधनाकडेच देता यावे म्हणून या शिष्यवृत्तीच्या पॅकेजची रचना केलेली असते. मुळातल्या त्या कल्पनलेच ट्रम्पतात्यांच्या या तरतुदीमुळे सुरूंग लागू शकेल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/04/2017 - 11:55
नवीन
काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत (आज) केवळ राहुल गांधी यांचाच अर्ज दाखल करण्यात आला. डमी उमेदवार म्हणून कोणालातरी उभे केले जाईल ही शक्यता मला वाटत होती तसे काही झालेले दिसत नाही.
काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधी बिनविरोध निवडून गेल्याचे थोड्या वेळातच जाहिर केले जाईल.
https://www.ndtv.com/india-news/rahul-gandhi-could-be-congress-president-by-this-evening-1783198?pfrom=home-lateststories
राहुल गांधी यांचे अभिनंदन.
- Log in or register to post comments
B
babu b
Mon, 12/04/2017 - 12:03
नवीन
बिनविरोध निवड लोकशाहीत होउ शकत नाही का ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 12/04/2017 - 22:04
नवीन
ओ बाबुराव, हितं लोक्षाहीचा कायबी संबंद न्हाई. कशाला उगीच म्हशीला काळं फास्ताय !
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 12/06/2017 - 15:25
नवीन
कशाला उगीच म्हशीला काळं फास्ताय !
लैच झ्याक शब्दप्रयोग आहे. हा हा पु वा
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
गुरुवार, 12/07/2017 - 16:27
नवीन
कशाला उगीच म्हशीला काळं फास्ताय !
याच चालीवर " कशाला उगीच जामोप्या ला कोडगेपणा शिकवायला जाताय ?" मिपावर हि एक नवी म्हण !
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Tue, 12/05/2017 - 07:50
नवीन
कोन्ग्रेस अध्यक्ष श्री. राहूल गान्धीन्चा 'गणित' चुकला .. नुसता पक्षाध्यक्ष होऊन उपयोग नसतो.. तर आधी अभ्यास करायला लागतो ..
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/gujarat-elections-rahul-gandhis-math-gone-wrong/articleshow/61926824.cms
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 12/05/2017 - 08:58
नवीन
पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणणार्या तरूणाला अटक झाली आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/pakistan-man-arrested-for-writing-hindustan-zindabad-on-wall/articleshow/61927797.cms
आपल्या देशाचे तुकडेतुकडे व्हावेत आणि आपल्याच देशातील हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या शत्रूदेशाचे गुणगान करणे याला आपल्याकडचे बुबुडाविपुमाधवि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणतात. त्यातलेच काही बुबुडाविपुमाधवि भारतात मुख्यमंत्रीही बनतात. हे असले थर्डक्लास लोक पाकिस्तानात नसतील तर इतर कुठल्याही बाबतीत नसला तरी या बाबतीत मात्र पाकिस्तानचा हेवा वाटतो.
- Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४
Tue, 12/05/2017 - 10:17
नवीन
बुबुडाविपुमाधवि म्हन्जे काय?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 12/05/2017 - 10:48
नवीन
भारतात राहून व भारतीय नागरिकत्व असून भारताला शिव्या दिल्या नाही व पाकिस्तानचे कौतुक केले नाही तर निधर्मी, उदारमतवादी, पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी, लोकशाहीवादी, मानवतावादी आणि विचारवंत तो फाऊल धरतात.
- Log in or register to post comments
B
babu b
Tue, 12/05/2017 - 12:03
नवीन
१३० वरुन २६ दिवसात ९० वर आलात , त्याचे रहस्य (! ) हेच हो गुर्जी !!
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 12/05/2017 - 10:22
नवीन
बुध्दीवादी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंतचा शॉर्टफॉर्म
- Log in or register to post comments
M
mayu4u
Tue, 12/05/2017 - 11:21
नवीन
नाही का यात?
- Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४
Tue, 12/05/2017 - 11:46
नवीन
______/\______
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 12/06/2017 - 09:10
नवीन
सेक्युलर मुखंडांनी कसा गळा काढलाय, म्हणे बाबरी पडली : http://www.aksharnama.com/client/article_detail/1564
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/06/2017 - 15:22
नवीन
खांग्रेस आणि खांग्रेसी किती नीच आणि नालायक आहेत हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. अनेक दशकांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल ३० सप्टेंबर २०१० या दिवशी उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याविरूद्ध संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तब्बल ७ वर्षे त्यावर काहीही हालचाल झाली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न कायमचा सोडवायचा ठरविले आहे. त्यानुसार ५ डिसेंबर २०१७ पासून दररोज सुनावणी करून या प्रकरणावर निकाल द्यायचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित करून सर्व पक्षकारांना काल न्यायालयात बोलाविले होते.
परंतु सुनावणी सुरू झाल्यावर लगेचच मुस्लिम संघटनांचे वकीलपत्र घेतलेल्या कपिल सिब्बल नावाच्या अत्यंत नीच वकीलाने अनेक विचित्र प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी जुलै २०१९ पर्यंत पुढे ढकलावी अशीही मागणी त्याने केली. मुळात जे प्रकरण ५०-६० वर्षे प्रलंबित आहे त्याची सुनावणी अजून २ वर्षे का पुढे ढकलायची? आज मुस्लिम संघटनांनी हे स्पष्ट केले की त्यांनादेखील हा खटला लवकरात लवकर संपायला हवा आहे व सिब्बलने अशी विचित्र मागणी का केली हे त्यांच्या लक्षात येत नाही. हा प्रश्न कधीही सुटु नये व कायमच प्रलंबित रहावा हीच खांग्रेसची इच्छा आहे हे स्पष्ट आहे.
इतर अनेक प्रकरणांसारखे खांग्रेसी या प्रकरणातही डबलगेम खेळ्त आहे. एकीकडे पप्पू वेगवेगळ्या देवळांना भेटी देऊन मी जानवेधारी हिंदू आहे असे जाहीर सांगत आहे तर दुसरीकडे आपल्याच पक्षाच्या सिब्बलला मुस्लिम संघटनांची वकिली करायला लावून श्रीराम मंदीराला विरोध करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मुस्लिम महिलांच्या तात्काळ तिहेरी घटस्फोट खटल्यातही तिहेरी घटस्फोट देण्याची क्रूर प्रथा रद्द करायला विरोध करणार्या मुस्लिम संघटनांचा वकील सिब्बलच होता. एकीकडे आम्ही मुस्लिम महिलांच्या हक्काच्या बाजूने आहोत असे सांगत फिरायचे व दुसरीकडे आपल्याच पक्षाच्या सिब्बलला न्यायालयात पाठवून मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क मिळवून द्यायला विरोध करायचा. असा डबलगेम खेळून जनतेची फसवणूक करण्यातच इतकी वर्षे खांग्रेसींनी धन्यता मानली.
देशद्रोही घोषणा देणार्या कन्हैया कुमारचा वकील सिब्बलच, देशद्रोही चिथावणी देणार्या हार्दिक पटेलचा वकील सिब्बलच, केरळमधील अखिला लग्न व धर्मांतर करणार्या लव्हजिहाद प्रकरणातील अखिलाच्या मुस्लिम नवर्याचा वकील सिब्बलच, तिहेरी घटस्फोट रद्द करायला विरोध करणार्या मुस्लिम व्यक्तिगत मंडळाचा वकील सिब्बलच आणि आता अयोध्येतील श्रीराम मंदीर निर्माणाला विरोध करणार्या मुस्लिम संघटनांचा वकील सुद्धा सिब्बलच आहे. हा अत्यंत नीच माणूस अतिशय योग्य पक्षाचा प्रतिनिधी आहे. भारताला लागलेली ही खांग्रेसी कीड जितकी लवकर नष्ट होईल तितके ते भारतासाठी चांगले होईल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 12/06/2017 - 15:37
नवीन
गुरुजी
भाजप राज्यावर आला आणि गोवंश हत्या बंदी झाली यामुळे यांच्या घरातील पैशाचे झाड वाळून गेले आहे म्हणून एवढा भाजप द्वेष आणि दाढी कुरवाळणे आहे. http://www.livemint.com/Specials/78oG6GkaGirhxwWgBn4VvL/The-business-interests-of-Kapil-Sibal.html
https://www.pgurus.com/kapil-sibal-wife-beef-business/
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/06/2017 - 15:46
नवीन
वरच्या यादीत अजून एक भर.
गुजरातमधील २००२ च्या दंगलीतील साक्षीदारांना खोटी साक्ष द्यायला लावण्याचा आरोप असलेल्या तिस्ता सेटलवाडचा वकीलसुद्धा सिब्बलच आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 12/06/2017 - 15:50
नवीन
सुनावणीत केस हरण्याची शक्यता खूप जास्त वाटत असल्याने आणि त्याचा राजकीय फायदा भाजप ला होणार असा अंदाज आल्याने अतिशय हुशार पण धूर्त आणि पाताळयंत्री अशा कपिल सिब्बल यांनी हि सुनावणी २०१९ च्या निवडणुकी नंतर घेण्याची विनंती केली आहे असेच दिसते.
- Log in or register to post comments
B
babu b
Wed, 12/06/2017 - 18:31
नवीन
सिब्बलचा बीफ व्यवसाय वाळला.
पण मोदीच्या काळात बीफ एक्सपोर्ट वाढला म्हणे.
मग नेमका फायदा झाला तरी कुणाचा ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 12/06/2017 - 23:11
नवीन
बाबुराव, सिब्बल खेरीज इतर अनेक निर्यातदार आहेत. त्यांचा फायदा वाढलेला असू शकतो.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
B
babu b
गुरुवार, 12/07/2017 - 02:59
नवीन
https://m.timesofindia.com/india/BJP-got-Rs-2-50-cr-in-donations-from-firms-exporting-buffalo-meat/articleshow/50195323.cms
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/07/2017 - 05:38
नवीन
BJP received the highest amount of donations among national parties in 2014-2015 and declared a total of Rs 437.35 crore
या पैकी केवळ २.५ कोटी हे म्हशीचे मांस विक्रेत्याकडून आलेले आहेत.
केवळ मोदी द्वेषासाठी आपल्याला पाहिजे तेवढेच उचलून द्यायचे हि वृत्ती निम्न आहे.
मोगा खान
तुम्ही स्वतःला डॉक्टर म्हणवता मग राजकारणावर नुसत्या पिचक्या टाकण्यापेक्षा वैद्यकीय विषयावर काहीतरी विधायक लेख लिहा. चार लोकांचा फायदा तरी होईल आणि तुमचा न्यूनगंड पण कमी होईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »