Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १७

ग
गॅरी ट्रुमन
Tue, 11/28/2017 - 11:56
🗣 200 प्रतिसाद
यापूर्वीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा सुरू करत आहे.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
42370 वाचन

💬 प्रतिसाद (200)
B
babu b गुरुवार, 12/07/2017 - 09:19 नवीन
२.५ कोटी केवळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 05:41 नवीन
मोगा खान म्हशीच्या मासाची निर्यात वाढली गोमांस नव्हे. सिब्बल साहेबांची कंपनी गोमांस विकत असावि बहुतेक म्हणून एवढा जळफळाट होतोय. https://economictimes.indiatimes.com/news/economy/foreign-trade/india-is-worlds-third-biggest-beef-exporter-fao-report/articleshow/59820316.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/07/2017 - 05:17 नवीन
भाजप राज्यावर आला आणि गोवंश हत्या बंदी झाली यामुळे यांच्या घरातील पैशाचे झाड वाळून गेले आहे म्हणून एवढा भाजप द्वेष आणि दाढी कुरवाळणे आहे झाडाची 'काळजी ' आहे म्हटलं मायबाप सरकारला. https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/india/centre-to-withdraw-ban-on-sale-of-cattle-for-slaughter/amp_articleshow/61872220.cms तंतारल्यावर लागले दाढी कुरवळायाला. केंद्र सरकारचा नोटाबंदी, बीफ बंदी आणि GST वर चाललेला 'चाचाचा' बघताना अंमळ करमणूक होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/07/2017 - 13:36 नवीन
मार्मिक गोडसे, पहिल्याप्रथम तुमच्या करमणुकीवर पाणी फिरवल्याबद्दल क्षमा असावी. हत्येसाठी पशूविक्रीवर असलेली बंदी सरकारने आपणहून उठवली नसून सदर शासकीय अधिसूचनेस (=नोटिफिकेशन) न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासन तिची सुधारित आवृत्ती काढीत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/07/2017 - 15:29 नवीन
पशूविक्रीवर असलेली बंदी सरकारने आपणहून उठवली नसून सदर शासकीय अधिसूचनेस (=नोटिफिकेशन) न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासन तिची सुधारित आवृत्ती काढीत आहे. हे मला माहीत आहे हो, परंतू असल्या अधिसूचना काढताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती की 'चाचाचा' करायची हौस भागवून घ्यायची होती? माझी कशाला माफी मागताय? ह्या सरकारच्या मूर्खपणामुळे ज्या निरपराध लोकांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबांची माफी मागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/07/2017 - 16:20 नवीन
अरेरे मा.गो.! तुमची माफी मागितल्याचा राग आलेला दिसतोय. काही हरकत नाही. माफी मागितल्याची माफी मागतो. दिल खुश? हां तर काय म्हणंत होतो आपण ! शासनाने अक्कल गहाण ठेवली होती का? ओके. बहुतेक हो. अन्यथा तुमचं अंमळसं मनोरंजन कसं झालं असतं? म्हंजे त्याचं काये की अक्कल आहे म्हणूनंच गहाण ठेवता येतेय नाही का? जर नसती तर काय गहाण ठेवणार होतं सरकार? मग तुमचं मनोरंजन देखील झालं नसतं ना. बघा सरकार कित्ती कित्ती काळजी घेतंय तुमची. शिवाय ही करमणूक वसेकमुक्त आहे बरंका. आणि काय हो, सरकारच्या या तथाकथित मूर्खपणामुळे कुणाचे प्राण गेले? काही विदा मिळेल का? की आपलं रागाच्या ( = पप्पूच्या ≠ क्रोधाच्या ) भरात ठोकून दिलंय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
B
babu b गुरुवार, 12/07/2017 - 19:17 नवीन
https://thewire.in/200905/cattle-slaughter-ban-bjp/ Modi Government Likely to Withdraw Controversial Cattle Slaughter Ban. गोव्यातील भाजपा सरकारने गोव्यात गोमांस कधीही कमी पडू देणार नाही , असे आधीच जाहीर केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 12/06/2017 - 15:52 नवीन
व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी हे आचार्य अत्र्यांचे विडंबन "झेंडूची फुले" या काव्यसंग्रहात वाचल्याचे स्मरते
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/06/2017 - 19:54 नवीन
तुम्ही त्याचे उलट रुपांतर करा. सार्थ जन्मले मी हिंदुकुळी आले मोदी बसून कमळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 05:33 नवीन
पूर्ण कविता द्या. कविता कुठे आहे ती माहिती दिली आहे ना? मग स्वतः पहा कि. आणि कुठे ते केशव कुमार सार्थ जन्मले मी हिंदुकुळी आले मोदी बसून कमळी आणि कुठे हे केशव सुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b गुरुवार, 12/07/2017 - 09:47 नवीन
हसून हसून मुरकुंडी वळली. जेंव्हा ह्यांचे सरकार नव्हते , तेंव्हा ते बोल्ले की आमचा सत्ता नाही , नाहीतर लगेच मंदिर बांधून दाखवले असते. मग ह्यांचे सरकार आले , तर बोलले की सरकार कडबोळे आहे , आमची पूर्ण सत्ता नाही. आता पूर्ण सत्तेत आले , तर ह्यांचे मुखिया बोल्ले मंदिर नको , शौचालय बांधू. आता बोलतात की कपिल सिब्बल आडवा येतोय म्हणून ! प्रत्येक वेळी नवे रूप ! मारिचही लाजून काळा झाला असेल !!
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 12/07/2017 - 10:18 नवीन
<<<मारिचही लाजून काळा झाला असेल !!>> ==>> हसून हसून मुरकुंडी वळली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
M
mayu4u गुरुवार, 12/07/2017 - 11:34 नवीन
तरी तुमच्यासारखे लोक सेक्युलॅरिजम राहिला नाही म्हणून कोल्हेकुई चालू करतील. शिवाय एवढे पैसे असतील तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं म्हणणारे राजे असतीलच. त्यापेक्षा शौचालय बांधलेलं बरं. तुमच्यासारखे लोक मिपा वरची हाXXXदारी तरी बंद करतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
व
विशुमित गुरुवार, 12/07/2017 - 12:16 नवीन
तुम्ही कशाला पिचकाऱ्या मारत आहात??? ज्या तुम्ही कोल्हेकुई म्हणत आहात त्याला आपले लष्करप्रमुख धर्मनिरपेक्ष वातावरणात कार्यरत असताना संरक्षण दल उत्तम काम करतात असे म्हणतात. बघा पटतय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Fri, 12/08/2017 - 05:24 नवीन
लवकर बरे व्हा! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 08:51 नवीन
ते काम त्यांनी १९९२ मधेच केलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b गुरुवार, 12/07/2017 - 18:45 नवीन
पंप्र ना नीच बोलल्याबद्दल मणिशंकर काँग्रेसमधून निलंबित. भाजप आणि पंतप्रधानांकडून पातळी सोडून टीका होत असली तरी त्यावर अशा भाषेत प्रत्युत्तर देणे ही काँग्रेसची संस्कृती आणि परंपरा नाही. मणिशंकर यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशा शब्दांत राहुल यांनी मणिशंकर यांना बजावले होते. त्यानंतर मणिशंकर यांनीही माध्यमापुढे बोलताना माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणाने पक्षाचे समाधान झाले नसून मणिशंकर यांना थेट कारणे दाखवा नोटीसच बजावण्यात आली आहे. त्यासोबतच मणिशंकर यांचे प्राथमिक सदस्यत्वही काँग्रेसने निलंबित केले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/07/2017 - 19:39 नवीन
फार वाईट झालं. मणिशंकर अय्यरांना निलंबित करायला नको होतं. मोदींना शिव्या घातल्या की मोदींची मतं वाढतात. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
भ
भंकस बाबा Sun, 12/10/2017 - 13:53 नवीन
कातड्याची शिकार करून वाघ मारल्याचा अविर्भाव आणत आहेत राजकुमार, अहो मोगाखां , कोणाची शिफारस करत आहात? बाकी तुमचं एक बरं आहे, गिरा तो भी टांग उप्पर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 08:53 नवीन
चूकून "पंतप्रधानांना नावे ठेवल्याबद्दल काँग्रेस पक्ष विसर्जित" इतकं अ‍ॅक्यूरेट ऐकू आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ड
डँबिस००७ गुरुवार, 12/07/2017 - 19:42 नवीन
@@@ :: पंप्र ना नीच बोलल्याबद्दल मणिशंकर काँग्रेसमधून निलंबित. :: @@@@ कपिल सिब्बल वर कारवाई करणार का ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 12/07/2017 - 19:43 नवीन
गा पै :-)
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 12/08/2017 - 02:58 नवीन
कपिल सिब्बलने भयानक केसेस लढल्या म्हणे. जेठमलानी ज्यांच्या बाजूने केसेस लढले , त्या तर ह्यांच्यापेक्षा भयाण आहेत. साक्षात पंतप्रधाननांच्या मारेकर्याच्या केसेस , केतन पारेख , हाजी मस्तान इ इ https://en.m.wikipedia.org/wiki/Ram_Jethmalani गंमत म्हणजे या केसेस् विकिपेडियावर पोलिटिकल करियर या हेडिंगात घातल्या आहेत ! ॲज ए लॉयर हा सेक्शन फारसा भरलेला नाही. !!!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 09:07 नवीन
लढवलेल्या केसेसचे असे प्रकार केव्हापासून झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 10:32 नवीन
या मणीशंकर अय्यरना काँग्रेसने निलंबित करण्याइतके महत्वाचे प्रकार अनेकदा झाले होते. पाकिस्तानात जाऊन मोदी सरकारला हटवायला मदत मागणे, पॅरीसमध्ये चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या घृणास्पद घटनेचे समर्थन करणे वगैरे गोष्टी यापूर्वीही झाल्या होत्या. तरी त्यावेळी अय्यरना हाकलावेसे असे काही काँग्रेसला वाटले नव्हते. पण आता गुजरात निवडणुकांच्या तोंडावर हाकलले जात असेल तर अय्यर बरळले त्याचा आपल्याला नक्कीच फटका बसू शकेल हे लक्षात येऊन काहीतरी करून दाखविले पाहिजे म्हणून काँग्रेसने त्यांना हाकललेले दिसते. अन्यथा काँग्रेस 'नीच' या एका उद्गारावरून कोणाला हाकलणारा सुसंस्कृत पक्ष नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 12/08/2017 - 11:14 नवीन
सगळ्यात जास्त संताप, त्याने जेन्व्हा स्वातंत्र्यविरांचा अपमान केला होता तेंव्हा आला होता. पण तेंव्हा काहीच झाले नाही, त्यामुळे तर अजुनच उद्वीग्न व्हायला झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गामा पैलवान Fri, 12/08/2017 - 15:01 नवीन
गॅरी ट्रुमन,
अन्यथा काँग्रेस 'नीच' या एका उद्गारावरून कोणाला हाकलणारा सुसंस्कृत पक्ष नक्कीच नाही.
सहमत आहे. पप्पू किती खंबीर व सुसंस्कृत आहे हे दाखवण्याचा आटापिटा चाललाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 16:27 नवीन
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले भाजप खासदार नाना पटोले यांनी पक्षाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा अखेर राजीनामा दिला आहे. ते गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज होते आणि त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली पण होती. त्यामुळे त्यांची गच्छंती अपेक्षित होती. तरीही त्यांनी राजीनामा दाखवायचे धैर्य दाखविले. मी राजीनामा खिशात घेऊन फिरत आहे असे काही नुसते बोलत राहिले नाहीत. आता सिन्हाद्वय-- यशवंत आणि शत्रुघ्न नाना पटोलेंचा आदर्श ठेवतात का हे बघायचे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 16:28 नवीन
राजीनामा दाखवायचे धैर्य दाखविले.
राजीनामा दाखवायचे नाही तर राजीनामा द्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 16:37 नवीन
मणीशंकर अय्यर यांनी टाकलेल्या फुलटॉसवर मोदी तुटून पडले आहेत. अहमदाबादमध्ये प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले: "त्यांनी काल मला पहिल्यांदाच 'नीच' म्हटलेले नाही. सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही असे केलेले आहे. मी नीच का आहे?, कारण मी गरीब म्हणूनच जन्मलो, कारण मी खालच्या जातीतील आहे, कारण मी गुजराती आहे? ते माझा द्वेष करण्याचे हेच कारण आहे का?" ही संधी मणीशंकर अय्यर यांनी स्वतःच्या कर्माने मोदींना दिली आहे. आता तक्रार करून उपयोग होणार नाही :) हे प्रकरण काँग्रेसला महागात पडू दे ही सदिच्छा. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-modi-attacks-congress-on-neech-politics/articleshow/61985907.cms
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 12/09/2017 - 07:51 नवीन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग झाले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलेच होते. सुदैवाने ते हेलिकॉप्टर फार उंच गेले नव्हते त्यामुळे अनर्थ झाला नाही. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन भरले गेल्यामुळे हा प्रकार झाल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांसारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या हेलिकॉप्टरबाबत असा हलगर्जीपणा होणे अक्षम्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बरोबरच्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/maharashtra-cm-helicopter-emergency-landing-in-nashik/articleshow/61994797.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/09/2017 - 09:14 नवीन
श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वजन बरेच कमी केले आहे तरी असे का घडले असावे? कदाचित त्यांचे "राजकीय वजन' वाढल्यामुळे असे झाले असावे काय? )))___(((
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/09/2017 - 09:25 नवीन
'चरबीने' वजन वाढलं असेल तर हेलिकॉप्टरने सूचना दिली आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/09/2017 - 09:32 नवीन
कमी केलेलं वजन हे "चरबीचंच" असतं हे आपल्याला समजत नसेल तर काय बोलणार? https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-chief-minister-Devendra-Fadnavis-loses-18-kilos-in-three-months/articleshow/51872138.cms कुठुनही भाजपचा द्वेषच केला पाहिजे का? द्वेषाने साधा "निखळ विनोद"ही समजेनासा झाला का आता?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/09/2017 - 09:50 नवीन
चरबी वाढली होती ना? अजुन १४-१६ किलो कमी करायचे टारगेट आहे. हेलिकॉप्टरने तीच सूचना केली. आणि कसला द्वेष घेवून बसलाय. विनोदावर फक्त तुमचीच मक्तेदारी आहे का? इतका हळवेपणा बरा नाही.
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 12/09/2017 - 10:10 नवीन
त्यांच्या मते राजकीय वजन हा निखळ विनोद आहे , चरबी हा निखळ विनोद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 12/09/2017 - 12:56 नवीन
रिपब्लिक टिव्हीवर बातमी आली आहे की ६ तारखेला मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानी हायकमिशनरची आणि २६/११ च्या वेळचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी 'गुप्त' भेट घेतली. http://www.republicworld.com/s/15256/meeting-between-pak-and-congress-representatives एका माजी पंतप्रधानाने पाकिस्तानसारख्या देशाच्या हायकमिशनरची आणि माजी परराष्ट्रमंत्र्याची गुप्त भेट का घेतली असावी? समजत नाही. आणि ही भेट गुप्त ठेवायची काय गरज होती? अशा मोठ्या पदावर गेल्यावर स्वतःचे खाजगी आयुष्य असे काही राहात नाही आणि अशा लोकांचे आयुष्य हीच एक 'खुली किताब' बनते. त्यातही डोकलाम प्रकरण गरम असताना राहुल गांधींनी चीनच्या वकिलांना भेटायच्या पार्श्वभूमीवर आता मनमोहनसिंग पाकिस्तानच्या हायकमिशनरला भेटले अशी बातमी आली आहे. काय चालू काय आहे? या प्रकाराचा उलगडा झाला नाही तर मनमोहनसिंग यांच्याविषयी जो काही थोडाथोडका आदर शिल्लक होता तो पण धुळीला मिळेल हे नक्कीच. आणि मनमोहनसिंग यांच्यासारख्या विद्वानाला त्या मणीशंकर अय्यर सारख्या माणसाचे इतके प्रेम का असावे हेच समजत नाही.युपीए सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मणीशंकर अय्यर यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा यासाठी मनमोहन आग्रही होते असे त्यावेळी पेपरात आले होते.
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 12/09/2017 - 16:39 नवीन
गंमतच बुवा ! पाकिस्तानचा माणूस बिन व्हिसाचा येउन गेला का ? आणि व्हिसा जरी दिला होता तरी इतका महत्वाचा माणूस कोणत्याही सिक्युरिटीशिवाय फिरला ? आणि सरकारला पत्ताच नाही , टीव्हीवाल्याना मात्र समजले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुबोध खरे Mon, 12/11/2017 - 14:53 नवीन
मोगा खान कोणताही मागचा पुढचा विचार न करत केवळ पिचक्या टाकायचा हा तुमचा खाक्या आहेच. पण एखाद्या व्यक्तीला व्हिसा दिला म्हणजे त्याने येऊन तुमच्या राजनैतिक व्यक्तीला भेट द्यायची परवानगी दिली ती सुद्धा त्याच्या घरी असे होत नाही. कोणत्याही सिक्युरिटीशिवाय फिरला ? हा निवृत्त माणूस आहे त्याला पाकिस्तान सरकारने विनंती केली तरच सुरक्षा पुरवली जाईल. सरकारला पत्ताच नाही. हे अनुमान कसे काढले आपण ? रिकाम्या डोक्यात येईल ते लिहीत सुटता तुम्ही. लष्करात असलेला काश्मिरी अधिकारी सुद्धा सुटीवर गेला तर त्याच्यावर पाळत ठेवणारी गुप्त हेर यंत्रणा निवृत्त पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री कुठे जातो काय करतो इतक्या साध्या गोष्टीवर लक्ष ठेवणार नाही का? केवळ टीका करायची म्हणून काहीही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Sun, 12/10/2017 - 11:49 नवीन
पाकिस्तानचा कुणीतरी सर्वेसर्वा मोदींच्या कार्यकाळात दिल्लीत येउन फिरून गेला , कुणाला पत्ताच नाही. याचा जाब कुणी कुणाला विचारायचा ? मनमोहननी मोदींना की मोदींनी मनमोहनना ? भक्तो ! कोई तो जबाब दो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
समाधान राऊत Sun, 12/10/2017 - 13:59 नवीन
तटस्थ मत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Sun, 12/10/2017 - 14:04 नवीन
२०२४ ला मोदी रिटायर झाले आणि असे न सांगता चीन / पाकिस्तानच्या कुणाला भेटले तर यावर तटस्थ मत देता येईल. (माझ्यामते मोदींनी असे केले तर ती चुक असेल) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत
ग
गॅरी ट्रुमन Sun, 12/10/2017 - 14:05 नवीन
हातात कोणतेही कार्यकारी अधिकार नसलेल्या माजी पंतप्रधानाने पाकिस्तानच्या हायकमिशनरला भेटणे (आणि ते पण गुप्तपणे) आणि कार्यकारी अधिकार असलेल्या पंतप्रधानाने पाकिस्तानला भेट देणे या दोन गोष्टी सारख्याच आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत
B
babu b Sun, 12/10/2017 - 14:40 नवीन
पाकिस्तानचा कुणीही अधिकारी भारत सरकारला कोणतीही सूचना / परवानगी वगैरे न घेता भारतात येऊन कुणाला तरी भेटून जात असेल तर सत्तेत असणारे लोक नेमके काय करत आहेत ? त्याला व्हिसा भारत सरकारनेच दिला असेल ना ? तो का आला होता , हे मोदीनी मनमोहनाना विचारणे, हे म्हणजे उल्टा कोतवाल एक्स- कोतवाल को डाटे , असा प्रकार वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मार्मिक गोडसे Sun, 12/10/2017 - 15:53 नवीन
तो का आला होता , हे मोदीनी मनमोहनाना विचारणे, हे म्हणजे उल्टा कोतवाल एक्स- कोतवाल को डाटे , असा प्रकार वाटत नाही का? पॉइंटै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सुबोध खरे Mon, 12/11/2017 - 15:07 नवीन
डॉकलाम वादाच्या वेळेस काँग्रेसी मंडळी चीनच्या राजदूतांना भेटून आले होते. सुरुवातीला आम्ही भेटलोच नाही असे म्हणाले मग हळूच मान्य केले. http://www.hindustantimes.com/india-news/amid-sikkim-standoff-rahul-gandhi-met-chinese-envoy-congress-confirms/story-uy38DjacYfBCb6xkVIhyQN.html Einar Tangen, an expert from Beijing says, "It's obvious that Congress in India is looking for new friends. Trying to invigorate the party and to see what China has to offer. Obviously, Beijing is also anxious to establish contact as they are frustrated with the situation at the border." http://indiatoday.intoday.in/story/congress-admits-rahul-gandhi-met-chinese-envoy-china-deletes-press-release/1/999133.html आता पण तसंच https://www.ndtv.com/india-news/gujarat-not-discussed-say-guests-at-mani-shankar-aiyar-dinner-after-pm-narendra-modis-charge-1786258 Guests at a dinner hosted by suspended Congress leader Mani Shankar Aiyar last week have denied that domestic politics figured at all in discussions with Pakistani leaders after Prime Minister Narendra Modi's charge that Islamabad is trying to meddle in the Gujarat election. Discussions revolved around India-Pakistan ties, asserted two ex-diplomats who attended the dinner. Former Prime Minister Manmohan Singh and former Vice President Hamid Ansari were present at the dinner held last Wednesday at Mani Shankar Aiyar's home for former Pakistan Foreign Affairs Minister Khurshid Mahmud Kasuri's visit. हेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदिना हटवण्यासाठी मदत मागून आले होते. असंच आहे. बेवडा ताडाच्या झाडाखाली बसून दूधही पीत असेल तरी लोक त्याला ताडी समजणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सर टोबी Sun, 12/10/2017 - 14:43 नवीन
परदेशी आजी किंवा माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी 'दिल्लीत आलो म्हटलं भेटून जावं' अश्या प्रकारे मनमोहन सिंगांची भेट घेतली असेल असे वाटत नाही. खुलासाच करायचा असेल तर तो सध्ध्याच्या गृह मंत्रालयानेच करायला हवा. अशा भेटीगाठींचा कार्यक्रम अथवा त्याची कल्पना सरकारला दिली जात असावी आणि हे सर्व प्रोटोकॉलच्या अंतर्गत होत असावे असे सामान्य माणूस मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
B
babu b Sun, 12/10/2017 - 14:48 नवीन
व्हिसा देताना कारण विचारले असेलच ना? ( की मोठे अधिकारी बिन व्हिसाचे जाऊ शकतात ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सुबोध खरे Mon, 12/11/2017 - 15:09 नवीन
मोगा खान तुम्ही काय लिहिताय ते तुम्हाला समजतंय का? व्हिसा चा फुलफॉर्म पहिल्यांदा शोधून पहा. मग पिचक्या टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Mon, 12/11/2017 - 18:23 नवीन
माझ्या पिचक्या अन तुमचे ते ताडीमाडी रूपक कितीही खरे असले तरी , जर मनमोहन इ इ लोक देशद्रोही कृत्य करत असते तर मोदींसारख्या पोलादीपुरुष- ३ ने ( सरदार पटेल , अडवानी , मग मोदी ) एव्हाना या सगळ्याना तुरुंगात टाकले असते , परदेशी पाहुण्यालाही रावणाचा आणि औरंग्याचा खाक्या दाखवत एव्हाना जेरबंद / नजरकैद केले असते. पण तसे काहीही घडलेले नाही. त्यामुळे शांत रहा. आमच्यावर अन काँग्रेसवर नसेना का विश्वास , पण तेरा मोदी पे भरोसा नै क्या ? दिल्लीत कुठेतरी कसल्याशा भारत पाक विषयावरच्या चर्चासत्रासाठी ते आले होते म्हणे . एक रात्र डिन्नरला काँग्रेसवाल्यांच्याबरोबर बसले म्हणे . दुसर्या देशात गेले की राज्यकर्त्याच्या नव्हे तर विरोधकाच्या घरात जेवायला जावे , असा साक्षात महाभारताचाच दाखला आहे , द्वारकेचे राणे हस्तिनापुरात गेले की पांडवाघरी नैतर विदुराघरी जेवायला जायचे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा