मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?
मराठी माध्यमात शिकणार्या मुलांच्या पालकांचा हा धागा
http://www.misalpav.com/node/41541 वाचला.चांगला उपक्रम होतोय.शुभेच्छा!
याच विषयावर ग्रुपमधे चर्चा सुरु होती.त्या दरम्यान एक मुद्दा असा पुढे आला की विषयाचं आकलन चांगलं होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणं वगैरे ठिक आहे.पण हे चांगलं आकलन झालेले मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत?
मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत?
मराठी शाळेतल्या शिक्षणाला दर्जा असेलंच तर साधारण इ.स.२००० किंवा त्यापूर्वी होता आता नाही.असा याचा अर्थ घ्यावा का? किंवा असेल अजून तो दर्जा तर मग ही मुलं या वर दिलेल्या किंवा तशाच टॉपच्या संस्थांमधे जिथे प्रवेश सहजासहजी नाही,खुप बौध्दिक मेहनत घ्यावी लागते अशा ठिकाणी का दिसून येत नाहीयेत?
लेखनाचीही हीच अवस्था आहे.चेतन भगत किंवा असेच नावाजलेले लेखक हे इंग्रजीतून लिहितात त्यामुळेच त्यांना त्याचं मानधनही रग्गड मिळतं.प्रादेशिक भाषेत लिहिलं तर इंग्रजीतून लिहिल्यावर मिळतं तेवढं काही मिळत नसावं.(असल्यास माहिती द्यावी).ब्लॉग्जबद्दलही तेच.
मराठी पत्रकारांचे पगार हे इंग्रजीतून लिहिणार्या पत्रकारांपेक्षा कमी असतात/असावेत.
फक्त पैसाच बघणार का? मातृभाषेबद्दल अनास्था का? असे भावनिक प्रश्न गैरलागू आहेत.वर दिलेल्या संस्थांमधील शिक्षणाचा समाजासाठी सुध्दा बराच उपयोग होऊ शकतो.पण मुळात तिथे शिकलं पाहिजे.मराठी माध्यमातून शिकलेली मुलं पुढे जाऊन या संस्थांमधे शिकली पाहिजेत.पण मागच्या १० वर्षात तसं घडलेलं दिसत नाही.
याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?
मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत?हा प्रश्नच संदर्भहीन आहे. त्याचे कारण असे की मराठी माध्यमांच्या शाळा व इंग्लिश माध्यमांच्या शाळा हा निर्णय बहुतांशी पालकांच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून आहे (याला अर्थातच थोडे अपवाद आहेत). IIT/IIM, हार्वर्ड, INSEAD अशा ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. त्यासाठी प्रशिक्षण देणार्या संस्थांची फी खूप प्रचंड असते (IIT साठी शक्यतो उशीरात उशीरा ८ वी पासून तयारी करावी लागते व IIT च्या ११ वी/१२ वी च्या प्रशिक्षण वर्गाची फी किमान २ लाख आहे). नुसते प्रशिक्षण घेऊन भागत नाही तर त्याबरोबर महागडी पुस्तके, टेस्ट सीरीज असा मोठा खर्च असतो. मराठी माध्यमातून शिकणार्या विद्यार्थ्यांच्या घरची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नसते व त्यामुळे त्यांना हे महागडे प्रशिक्षण परवडत नाही. त्यामुळे तिथून IIT/IIM किंवा तत्सम संस्थांमध्ये प्रवेश मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या अर्थातच कमी असते. या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच. मराठी व इंग्लिश पत्रकारांची किंवा लेखकांची तुलना अस्थायी आहे कारण मराठी ही केवळ एका राज्याची भाषा आहे तर इंग्लिशभाषी देशात व परदेशात सर्वत्र पसरलेले आहेत. अशी तुलना करणे म्हणजे दंगल व सैराट या सिनेमांच्या गल्ल्याची तुलना केल्यासारखे आहे.याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य).दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य).वरील वाक्य थोडे चुकले आहे. ते पुढीलप्रमाणे हवे. दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या व मुलांच्या आवडीनुसार व प्राथमिकतेनुसार आपल्या मुलांसाठी माध्यम निवडावे. इंग्लिश माध्यम हवे असल्यास कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य.नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते .चुकीची माहिती आहे.place of origin.विद्यार्थी कोणत्या भाषेच्या माध्यमातून शिकला यापेक्षा तो कोणत्या गावातून आला यावर विद्यार्थ्याची कामगिरी अवलंबून आहे असे लिहिले आहे. The survey also found that every third respondent felt their academic performance nosedived because of the medium of instruction being English (for exceptions, refer to main story). The average CPI of such students is 5.47. एकंदरीत येथील एक तृतीयांश विद्यार्थी इंग्लिशमधून शिकण्यास कचरत असावेत असं दिसतंय. ते कदाचित स्थानिक भाषेतून शिकले असावेत. ___________________________________________________________________________ खालील संकेतस्थळावर रोचक आकडेवारी आहे. http://blog.askiitians.com/jee-advanced-2014-result-analysis-favor-regional-languages/ जेईई-अॅडव्हान्स्डची पूर्वपरीक्षा, जेईई मेन्स, स्थानिक भाषेतून सुद्धा देता येते. या परीक्षा इंग्लिश माध्यमातून देऊन जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १२.५% टक्के आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ३.०३% टक्के आहे. यावरून एकदम असा निष्कर्ष काढता येईल की मराठी माध्यमातून शिकल्यामुळे ते मागे पडत आहेत. परंतु इतर आकडेवारी व निष्कर्ष वेगळेच चित्र दाखविते. गुजराती माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ११.०५% टक्के व हिंदी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ९.२१% टक्के आहे. म्हणजे इंग्लिशमधून किंवा गुजराती/हिंदी भाषेतून ही परीक्षा देऊन यश मिळविणार्यांच्या टक्केवारीत फारच थोडा फरक आहे. याचे कारणही वृत्तांतात दिले आहे. - A senior CBSE official shared that most students who took JEE Main in Marathi and Urdu were from government schools and poor families. Their poor performance and weak success rate can be attributed to lack of coaching and guidance too. Most of the JEE coaching is either available in English or in Hindi (in some regions), is expensive and is concentrated in urban areas. - An IIT faculty member opines that even the JEE Main aspirants taking exams in regional languages can have a better success rate if they have adequate study material and training in the languages they choose. This trend can be seen in the case of Gujarat where even students from well-off families study in Gujarati medium. Hence, the success rate of students who took JEE Main in Gujarati is quite high. मी याआधीच एका प्रतिसादात लिहिले आहे की अशा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे व अशा प्रशिक्षण वर्गांचे शुल्क खूप जास्त असल्याने कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सर्वसाधारणपणे मराठी माध्यमातील बहुसंख्य शाळांमधून कमी उत्पन्न गटाचीच मुले असतात व त्यांना हे प्रशिक्षण परवडू शकत नसल्याने त्यांची टक्केवारी कमी दिसते. जर त्यांनासुद्धा हे विशेष प्रशिक्षण मिळाले तर ते सुद्धा या संस्थेत प्रवेश मिळवून शकतील. वरील परिच्छेद मी आधी लिहिलेलेच सिद्ध करतात. ____________________________________________________________ मराठी माध्यमातून शिकून प्रथम आयआयटी (मद्रास) व नंतर स्टॅनफोर्डमध्ये प्रवेश मिळविलेल्या सुजीत घोलपची स्फूर्तीदायक कहाणी त्याच्याच शब्दात - http://blog.sujeet.me/2014/06/let-no-one-tell-you.html तामिळ माध्यमातून शिकून आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळविणार्या व नंतर गुगलमध्ये जॉब मिळविणार्या अजून एका तामिळ विद्यार्थ्याची कहाणी - http://ajourneythatneverends.blogspot.in/2011/08/how-did-i-survive-that.html ३-४ वर्षांपूरी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून शिकणारी मृदुल थत्ते हिला ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड स्पर्धेत दुसर्या क्रमांकाचे रौप्य पदक मिळाले होते. तेव्हा ती १२ वीत शिकत होती. या स्पर्धेतील यशामुळे तिला एमआयटी पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश दिला व सध्या ती तिथेच पदवीचे शिक्षण घेत आहे. ज्ञानप्रबोधिनी ही अधिकृतरित्या इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेत प्रवेश ५ वी मध्ये मिळतो (१ ली ते ४ थी वर्ग ही संस्था चालवित नाही). ४ थी तील मुलांची प्रवेश परीक्षा घेऊन फत ८० विद्यार्थ्यांना ५ वीत प्रवेश दिला जातो. ५ वीत प्रवेश घेतलेली मुले ४ थी पर्यंत मराठी किंवा अन्य माध्यमातून शिकलेली असतात. ५ वी नंतर जरी इंग्लिश माध्यम असले तरी शाळेचे वातावरण व सर्व उपक्रम संपूर्ण मराठी आहेत. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सर्वजण मराठीतच बोलतात. इंग्लिश फक्त विषय शिकण्यापुरते आहे.