ताज्या घडामोडी - भाग १९
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html
जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?बैलाचा डोळा ! खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर...विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६.दुरूस्ती - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/५) + १ = २९. यासाठी असलेले सूत्र - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = { (एकूण आमदार / (निवडणुकीच्या जागा + १) } + १