Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १९

श
श्रीगुरुजी
Tue, 01/02/2018 - 05:55
🗣 151 प्रतिसाद
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे. http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html

प्रतिक्रिया द्या
40076 वाचन

💬 प्रतिसाद (151)
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 09:38 नवीन
HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधाने १. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,” २. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,” ३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,” असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे. Stop Teaching Darwin’s Theory as It Is Scientifically Wrong: Union Minister Satyapal Singh
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sun, 01/21/2018 - 10:20 नवीन
हे तेच ना ? स्त्रिया प्रदूषणापासून संरक्षण म्हणून चेहरा ओढणी किंवा रुमालाने झाकतात पण प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही म्हणणारे आणि त्यावर बंदी आणणारे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 15:39 नवीन
ते असे म्हणाले होते का याची मला कल्पना नाही. परंतु ओढणी किंवा रूमालाने चेहरा झाकल्याने प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही हे वाक्य बरोबर आहे. फारतर धुळीपासून थोडेसे संरक्षण मिळत असू शकेल, परंतु रूमाल किंवा ओढणीने चेहरा झाकल्याने प्रदूषणापासून संरक्षण होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 16:33 नवीन
असे काही ते म्हणाले याची मला हि कल्पना नाही. धूळ हा वायू प्रदूषणाचा एक भाग आहे त्यापासून संरक्षण मिळाले तरी खूप झाले असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Sun, 01/21/2018 - 10:20 नवीन
हे तेच ना ? स्त्रिया प्रदूषणापासून संरक्षण म्हणून चेहरा ओढणी किंवा रुमालाने झाकतात पण प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही म्हणणारे आणि त्यावर बंदी आणणारे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 15:36 नवीन
१. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,” यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का? २. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,” यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का? ३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,” डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे. हा सिद्धांत वादग्रस्त असून जगन्मान्य नाही. त्यामुळे वरील वाक्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. (बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?) असो. असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे. जे सत्य आहे तेच सत्यपाल सिंह यांनी बोलून दाखविले आहे. त्यांच्या बोलण्यामुळे शिक्षणाची दुर्दशा कशी होईल? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले नव्हते आणि तेच त्यांनी सांगितले आहे. डार्विन सिद्धांत वादग्रस्त आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यावर बोलणे हेसुद्धा चुकीचे नाही. ते केवळ मोदी मंत्रीमंडळात आहेत व आपल्याला न आवडणारे ते बोलले आहेत म्हणून लगेच त्यांना काढून टाकण्याची मागणी करणे हे असहिष्णुतेचेच लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अनुप ढेरे Sun, 01/21/2018 - 16:09 नवीन
(बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)
सिरियसली हा प्रश्न विचारला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 16:27 नवीन
अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे. त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहे Since the man is seen on Earth he has always been a man
(बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)
ना त्या मंत्र्याला डार्विन काय बोला माहित आहे ना तुम्हाला. इथे वाचा डार्विन नक्की काय म्हणतो ते मग डार्विन विषयी लिहा What Darwin actually said about man and apes In his book ‘The Descent of Man’ published in 1871, English naturalist Charles Darwin presented the idea that human beings and apes have a common ancestor. Contrary to common perception, which is reflected in Mr. Singh's statement, Darwin did not say that humans directly evolved from apes. He merely pointed out the similarities between birds, fishes, mammals and reptiles and suggested that all life is related. This, in turn, means that all complex life forms evolved from simpler ones through various genetic mutations. डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल.
डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे.
नक्कीच, परंतु आजून हि बहुतांश शास्त्रज्ञ हा सिद्धांत मानतात जरी त्यात loopholes असले तरी, आणि सत्यपालसिंह यांनी वैज्ञानिक आक्षेप घेतले नसून त्यांचा रोख स्वदेश ज्ञान आणि परदेशी ज्ञान या अनुषंगाने आहे. However, as zoologist Jules Howard argued in an article in The Guardian, as of now, “Darwin’s ideas still seem capable of explaining much, if not all, of what we see in nature.” Additionally, he says, “if a more scientifically accurate way of explaining the diversity of life on Earth comes along, Darwin would be ousted.” त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Sun, 01/21/2018 - 16:38 नवीन
सत्यापालसिंह जे काही बोलले किंवा ज्या पद्धतीने बोलले ते मला वैयक्तिकरित्या पटले नाही. ************** पण त्यांच्या वक्तव्यावर एवढी असहिष्णुता का? असे आक्षेप अनेक नामांकित संशोधकांनीही घेतले आहेत. यावरून ते त्यांचे खाते सांभाळू शकतील का हा निष्कर्ष काढणे योग्य आहे का? ************** कपिल सिब्बल मनुष्यबळ विकासमंत्री असताना कारभार कसा झाला यावर आपले मत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 16:53 नवीन
अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे. त्यांची विधाने चुकीची आहेत हे कधी सिद्ध झाले किंवा हे कोणी ठरविले? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धात हा वादग्रस्त असून त्यावर मतभेद आहेत व त्याला जगन्मान्यता नाही. ज्या विषयाला एकापेक्षा जास्त बाजू आहेत त्यावर कोणत्यातरी एका बाजूने बोलणे हे चुकीचे विधान कसे? त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहे आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे असे ते म्हणालेले नाहीत. त्यांनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी याबद्दल सांगितलेले किंवा लिहिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे व तीच त्यांनी सांगितली आहे. Since the man is seen on Earth he has always been a man यात काय चुकीचे आहे? डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल. डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे. समजा मंत्रीमहोदयांनी डार्विन काय म्हणतोय हे वाचलेही नसेल, परंतु जगातील ज्या अनेक शास्त्रज्ञांनी डार्विनचा सिद्धांत मान्य न करता त्यावर आक्षेप घेतले आहेत त्यांनी तरी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी डार्विनचा सिद्धांत नक्कीच नीट वाचला असेल. त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते. डार्विनविरूद्ध बोलले म्हणजे लगेच त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका अशा मागणीतही काही अर्थ नाही. एकतर त्यांना स्वतःचे विचार सार्वजनिक करण्याचे विचारस्वातंत्र्य आहे, दुसरं म्हणजे त्यांचे हे विचार प्रक्षोभक, बेकायदेशीर इ. नाहीत आणि तिसरं ज्याला एकापेक्षा जास्त बाजू आहेत अशा विषयावर त्यांनी एका बाजूने मत मांडले आहे. त्यांनी स्वतःचे मत मांडले आहे व स्वतःच्या मतामागील कारणमीमांसाही सांगितली आहे. त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/satyapal-singh-opposed-for-claiming-darwins-theory/articleshow/62589415.cms वरील बातमीत लिहिलंय की "उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे. " ही तर शुद्ध गुंडगिरी आणि झुंडशाही झाली. एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आता मत मांडायचीही चोरी आहे कारण शास्त्रज्ञांना न आवडणारे मत कोणी व्यक्त केले तर लगेच ते अशी मोहीम सुरू करणार. भारतीय वैज्ञानिक इतके बंदिस्त व कोत्या मनोवृत्तीचे असतील असे वाटले नव्हते. सत्यपाल सिंह यांच्यासारख्या सॉफ्ट टारगेट विरूद्ध अशी सवंग मोहीम सुरू करता येईल, परंतु जगातील ज्या शास्त्रज्ञांनी डार्विनच्या सिद्धांताविरूद्ध मत व्यक्त केले आहे त्यांच्याविरूद्ध भारतातील वैज्ञानिक काय करणार? त्यांच्याविरूद्ध अशी मोहीम सुरू करण्याची यांच्यात हिंमत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 17:17 नवीन
यात काय चुकीचे आहे?
सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे.
डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे.
डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे.
त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही.
मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे. @बिटकाका आणि @ गामा पैलवान सत्यपाल सिंह हे एक वेदाच्या परिषदेत बोलत होते त्यांचं वैज्ञानिक विरोध दिसून येत नाही ते असे म्हणतात ती गोष्ट वेदात नाही आपल्या पूर्वजांनी सांगितली नाही म्हणून चुकीची. हा मुद्दा समजावून घेतला तर आपल्याला कळेल की त्यांना होणारा विरोध बरोबर आहे ते. आणि जर कपिल सिब्बल असे म्हणाले असते तर मी असाच विरोध केला असता. त्यामुळं कोण म्हणाले हे महत्वपूर्ण नाही कोणत्या अनुषंगाने काय म्हणाले ते महत्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 17:33 नवीन
सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे. ते कसं काय? डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे. जो सिद्धांत सर्वमान्य नाही व ज्याच्या सत्यतेविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत तो पुस्तकात असावा का? हा सिद्धांत आपल्या पूर्वजांनी सांगितलेला नाही हे बरोबरच आहे. अशा वादग्रस्त सिद्धांताविषयी आपले मत व्यक्त केले म्हणून लगेच त्यांना काढून टाकायचे किंवा खाते बदलायचे? मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे. हटविण्याची मागणी सनदशीर आहे तसेच त्यांचे मतसुद्धा सनदशीर आहे. आपले मत व्यक्त केल्यानंतर लगेच "तुमची विधाने मागे घ्या" म्हणून ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे व दबास आणणे हे माझ्या दृष्टीने गुंडगिरी व झुंडशाहीचे लक्षण आहे. इतर देशातील अनेक वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्याविषयी भारतातील वैज्ञानिकांची काय भूमिका आहे? वैज्ञानिकांनी बंदिस्त विचार न करता प्रत्येक शक्यतेचा विचार खुल्या मनाने केला पाहिजे. मुळातच जो सिद्धांत वादग्रस्त आहे त्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त केल्यानंतर लगेच ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे याला माझा आक्षेप आहे. असे करण्याऐवजी वैज्ञानिकांनी त्यांचे म्हणणे वैज्ञानिक आधारावर खोडून काढावे. ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात असहिष्णुतेचा नसलेला बागुलबुवा उभा करून भाजप सरकारविरूद्ध कांगावा केला जात आहे त्यात आता हे वैज्ञानिकही सामील होत आहेत असे चित्र दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ब
बिटाकाका Sun, 01/21/2018 - 17:40 नवीन
अमितदादा, पुस्तकातून काढून टाकणे? हे कधी झालं? त्यांनी आपल्याला माहित असलेल्या गोष्टी शिकवाव्यात असं म्हटलं आहे. तुमच्याकडे काही दुवा असेल तर द्याल का? ******************** तुम्ही सत्यपालसिंहांच्या एका मतावर त्यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल बोलत आहात. इतकेच नाही तर त्याबद्दल निराशावाद व्यक्त करत आहात. अशी अनेक वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांच्या काळातील कारभाराबद्दल आपले मत काय असे मला म्हणायचे होते. मला असे वाटते अगदीच निर्विवाद अशा कुठल्या गोष्टीवर ते बोलले नाहीयेत तर ज्याबाबतीत बरीच त्या विषयाशी संबंधित मंडळीही साशंक आहेत अशा विषयाबद्दल ते बोलले आहेत. त्यांनी त्यासाठी त्या संबंधित मंडळींच्या ऐवजी पूर्वजांचा संदर्भ देणे मला पटत नसले तरी अयोग्य अजिबात नाही. एवढी असहिष्णुता दाखववून त्यांच्या खात्याच्या कारभारावर (या वक्तव्यामुळे) टीका करणे पूर्वग्रहदूषित असल्याचे जाणवते. ******************** पृथ्वी गोल नसून सपाट आहे असा देखील काही लोकांचा दावा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 18:37 नवीन
@श्रीगुरुजी मी किंवा अनेक लोकांनी त्यांच्या मताला केलेला विरोध हा सनदशीर, कायदेशीर आणि न्याय आहे. त्यांना कोणतीही धमकी दिली नसून त्यांचं विधान कसे चुकीचे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. (तुम्हला अजून ते दिसत नसेल तर माझा नाईलाज आहे) त्यामुळे ही गुंडगिरी आणि झुडशासी अजिबात नाही, मुळात जर त्या मंत्र्यांचा विधान तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र वाटत मात्र अनेक वैज्ञानिकच विधान व्यक्तिस्वातंत्र न वाटता झुंडशाही आणि गुंडगिरी वाटते हेच मुळात हास्यास्पद आहे. @बिटकाका मुळात ते मंत्री फक्त विधान करून न थांबता हे पाठपुस्तकातून काढावे असे म्हणतात असे करणारा जगात फक्त एक देश आहे तो म्हणजे तुर्कस्तान आपल्याला त्या कॅटगारी मधे बसायचं आहे का? तेंव्हा यात कोणताही राजकीय angle न पाहता आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे. अनेक मंत्रांनी विज्ञान विरोधी विधाने केली आहेत यांची विज्ञान विरोधी असहिकष्णूता पाहता मी ही यांच्याबद्दल असहिष्ण झालो आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 18:39 नवीन
पाठ्यपुस्तकातून काढायला हवे असे ते म्हणालेत मूळ प्रतिसादातील लिंक आणि वाक्ये पाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ब
बिटाकाका Mon, 01/22/2018 - 03:08 नवीन
हो तेच म्हणतोय, अजून काढले नाही. त्यांनी काढायला हवे असे त्यांचे मत व्यक्त केले आहे. तसे ते पुस्तकातून काढणे हे भारताततरी फक्त मंत्र्यांच्या मतावर अवलंबून नसावे. त्यांनी फक्त मत केले म्हणून एवढ्या टोकाची टीका करणे हीच खरी असहिष्णुता आहे. खरंतर तुम्हीच या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पहात आहात असे मला वाटते. राहता राहिला प्रश्न विरोध करण्याचा, कशाला करायला हवा तो विरोध आत्ता? नेमके काय घडले आहे? ते मत मलाही पटले नाही असे वर म्हटले आहेच. याच्यापुढचा विरोध आता या क्षणालातरी माझ्या दृष्टिकोनातून राजकीयच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Mon, 01/22/2018 - 03:50 नवीन
>>> त्यांनी फक्त मत केले म्हणून एवढ्या टोकाची टीका करणे हीच खरी असहिष्णुता आहे. खरंतर तुम्हीच या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पहात आहात असे मला वाटते. + १ विरोधा मागील मुख्य कारण राजकीयच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 19:02 नवीन
एका सर्वमान्य नसलेल्या, वादग्रस्त मुद्द्यावर व्यक्त केल्यानंतर त्याला शास्त्रीय मार्गाने उत्तर देण्याऐवजी लगेच हे विधान मागे घेण्यासाठी ऑनलाईन पिटिशन करून इतरांचे समर्थन मागणे ही झुंडशाही व गुंडगिरीच आहे. जरा थांबा. काही काळातच भगवा अजेंडा, हिंदू अजेंडा अससे शब्द वापरून यात पुरस्कार-परती टोळी उतरेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
S
sagarpdy Mon, 01/22/2018 - 09:56 नवीन
सिंग म्हणाले म्हणून कोणी पुस्तक बदलणार नाहीये. पण ते म्हणाले आणि कोणीच काही आक्षेप घेतला नाही हे पण व्हायला नको. उलट थेअरी बहुमान्य आहे हेच सोशल मीडिया मधून दिसते. हे फक्त वैयक्तिक मत असेल तर त्रास फार नाही, पण HRD मध्ये असताना सार्वजनिक भाषणांत असे मत "व्यक्त" करणे हे चुकीचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जर वाटलेच तर एखादा शोधनिबंध लिहून माणूस कसा होमिनाईड नाही हे सिद्ध करावे अथवा उत्क्रांतीशास्त्राला पर्याय असणारी दुसरी थेरी मांडावी सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?) बाकी हुच्च्चभ्रू सीरिअल वाल्या लोकांसाठी :P https://scroll.in/video/865884/satyapal-singh-can-take-comfort-from-f-r-i-e-n-d-s-phoebe-doesnt-believe-in-evolution-either .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/22/2018 - 10:34 नवीन
सिंग यांच्या विधानाविरूद्ध आक्षेप घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे यासाठी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून त्यासाठी इतरांचे समर्थन मागणे किंवा लगेच त्यांना मंत्रीपदावरून काढा अशी मागणी करणे हे अयोग्य आहे, एवढाच मुद्दा आहे. सत्यपाल सिंग म्हणजे लालू, मुलायम सारखे रस्टिक नाहीत. ते M.Sc. (Chemistry), M.Phil. (Chemistry), MBA आणि P.H.D. आहेत. त्यांनी जर एखाद्या वैज्ञानिक सिद्धांतावर आक्षेप घेतला असेल तर विज्ञानाच्या मार्गाने त्यांच्या आक्षेपाचे खंडन करणे हाच योग्य मार्ग आहे व वैज्ञानिकांनी राजकारणी मार्गाने न जाता वैज्ञानिक मार्गाने विरोध करायला हवा होता. HRD मध्ये असताना सार्वजनिक भाषणांत असे मत "व्यक्त" करणे अजिबात चूक नाही. मुळात जो सिद्धांत अजून निर्विवाद सिद्ध झालेला नाही व एकमताने निर्विवाद मान्य झालेला नाही त्याविरूद्ध बोलणे अजिबात चूक नाही. सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?) सत्तापक्षातील माणसे वाद निर्माण करतात यापेक्षा सत्ताधार्‍यांच्या विधानामधून विनाकारण नसलेला वाद निर्माण करून राजकीय अजेंडा राबविला जातो असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ग
गामा पैलवान Sun, 01/21/2018 - 16:43 नवीन
अमितदादा, मूळ मुद्दा असा आहे की माकडापासून माणूस उत्पन्न झाला याला कुठलाही पुरावा नाही. सत्यपाल सिंगांची भाषा अपरिचित वा आक्षेपार्ह असू शकते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 17:14 नवीन
HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधाने आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 01/21/2018 - 18:49 नवीन
आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.
मग वैज्ञानिक किंवा मी सुधा कोणतीही दंगल देशद्रोह घटनाद्रोह करत नाही. तसेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी मला तरी योग्य वाटते कोणतही सभ्येतेच उल्लंघन वाटत नाही. तुम्ही शिवसेनेला शिटसेना, कॉंग्रेस ला खान्ग्रेस, राहुल ला पप्पू, हत्येला वध म्हणन्याच सोडून देवून सभ्यतेचा आदर्श घालून द्यावा मी त्याच पालन करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 19:08 नवीन
वरील प्रतिसाद वाचून "दीवार" मधील संवाद स्मरला. या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध नाही. एकीकडे समाजविघातक गोष्टी आहेत तर दुसरीकडे एका सर्वमान्य नसलेल्या निरूपद्रवी सिद्धांतावरील व्यक्तिगत मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/21/2018 - 18:18 नवीन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आआपच्या २० आमदारांना अपात्र ठरवायच्या निवडणुक आयोगाच्या शिफारसीला मान्यता दिली आहे. https://www.thenewsminute.com/article/setback-arvind-kejriwal-president-kovind-approves-disqualification-20-aap-mlas-75096 त्यावर यशवंत सिन्हांनी ही तुघलकशाही आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर हा दिवस येणार हे माहित होते म्हणून देवाने आम्हाला ७० पैकी ६७ जागा दिल्या असे स्वतः केजरीवालांनी म्हटले. यशवंत सिन्हांना पक्षातील किंवा सरकारमधील कोणीही गांभीर्याने घेत नाही यामुळे त्यांची तडफड खूपच वाढलेली दिसते. अडवाणीही सुरवातीला अशी तडफड होऊन असे काहीसे बडबडत होते पण त्याचा काही उपयोग होत नाही हे बघून ते सध्या गप्प बसले आहेत. यशवंत सिन्हांना मात्र ही गोष्ट अजून समजलेली दिसत नाही. दुसरे म्हणजे सगळ्या पुरोगाम्यांचा केजरीवालांना पाठिंबा असतो. आणि यातीलच बरेच 'देव' किंवा 'श्रध्दा' असे काही शब्द ऐकले की अंगावर पाल पडल्यासारखे करतात. अशा लोकांची केजरीवालांच्या 'देवाने आम्हाला ६७ जागा दिल्या' या विधानावर काय प्रतिक्रिया असेल बरे? असो. आता आआप या 'असंवैधानिक' निर्णयाविरूध्द उच्च न्यायालयात आणि गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे असे केजरीवालांनी जाहिर केले आहे. हा निर्णय पुढील दोन वर्षात यायची शक्यता जवळपास शून्य. त्यामुळे दिल्लीत २० जागांवर पोटनिवडणुक होणार नाही. वाटले होते त्याप्रमाणे आआपवाले टोलवाटोलवी करून विधानसभेचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पोटनिवडणुक होऊ देणार नाही असेच दिसते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/22/2018 - 06:58 नवीन
अभिराम दीक्षित यांच्या चेपु भिंतीवरून साभार .वैदिक संमेलनात जाऊन सत्यपाल नावाचा मंत्री जे काही माकडी बोलला ते ऐकून - सावरकरांचा एक जुना लेख आठवला . हिंदुत्व वाद्यानी तो लेख मुळातूनच वाचावा . तात्यारावाचा लेख १०० वर्ष जुना असला तरी सध्याच्या टनातनी लोक्स ना परफेक्ट लागू आहे . २००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर सावरकरांचा एक विनोदी लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन . काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते . त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे . तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे "" नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.…… तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित -- भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना शेपटी लागल्यावर विजेचे झटके आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही. शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि - परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे……………………… त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडत… गिल्ला करत … असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !" - विनायक दामोदर सावरकर
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 01/22/2018 - 08:26 नवीन
कपिलमुनी, सावरकरांबद्दल प्रगाढ आदर असूनही एक सांगावंसं वाटतं. ते म्हणजे जरी ते विज्ञानवादी असले, तरी विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. त्यांची विज्ञानविषयक मते सर्वसामान्य माणसाची ( = layman view) धरायला हवीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 01/22/2018 - 11:17 नवीन
टनाटनी विधाने करायची जुनीच परंपरा आहे. पूर्वीसुद्धा मा. पंप्र यांनी कर्णाचे ( Karna was not born from his mother’s womb )आणि गणपतीचे ( There must have been some plastic surgeon at that time who got an elephant’s head on the body of a human being and began the practice of plastic surgery.) उदाहरण दिले आहे. एकेकाच्या अंधश्रद्धा !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/22/2018 - 14:28 नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/vhp-and-bajrang-dal-volunteers-will-protest-against-release-of-padmavat-dr-pravin-togadia/articleshow/62605688.cms तोगडियांच्या प्रेमात पडलेले फुरोगामी आता काय करतील?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/22/2018 - 18:37 नवीन
Indians are worse off under Modi
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Mon, 01/22/2018 - 22:09 नवीन
Scientists respond to MoS HRD Satyapal Singh’s remarks on human evolution. 1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights. 2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution. 3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers. पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोला
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 01/22/2018 - 23:21 नवीन
अमितदादा, डार्विन म्हणाला तो उत्क्रांतीचा वगैरे सिद्धांत नाहीच्चे मुळी. ते केवळ एक मत ( = ओपिनियन) आहे. काहीही कारण व/वा पुरावा नसतांना त्या मतास सिद्धांत म्हणून चढवले जात आहे. 'मानव व माकडाचा पूर्वज एक असू शकतो' हे विधान वैज्ञानिक सिद्धांत मानण्याच्या लायकीचं नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Tue, 01/23/2018 - 10:35 नवीन
1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights. जगातील अनेक वैज्ञानिकांनी डार्विनचा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्यामुळे सत्यपाल सिंहांनी केलेलं विधान factually correct आहे. विज्ञानात अनेक नवीन सिद्धांत शोधले जातात, काही जुन्या सिद्धांतांना आव्हान देऊन ते अंशतः किंवा पूर्ण चुकीचे ठरविले जाऊ शकतात, काही जुन्या सिद्धांतात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे जो सिद्धांत वैज्ञानिकांनी अजून निर्विवाद मान्य केलेला नाही त्या सिद्धांतावर कोणी आक्षेप घेतला असेल तर त्यामुळे deeply pained होण्याची गरज नाही. इतका मेलोड्रामा करण्यापेक्षा, डार्विनचा सिद्धांत पूर्ण सत्य असून सत्यपाल सिंहांचे विधान चुकीचे आहे हे विज्ञानाच्या भाषेत सांगितले असते तर ते जास्त योग्य झाले असते. 2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution. असू शकेल. परंतु शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताची माहिती देताना जे चित्र दाखविले जाते त्यात आधी एका माकडाचे चित्र दाखवून ते हळूहळू उत्क्रांत होऊन त्याचे माणसात रूपांतर झाले असे दाखविले जाते. त्यामुळे माकडापासून माणूस झाला असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबले गेल्यास आश्चर्य नाही. सत्यपाल सिंहांना दोष देण्यापेक्षा पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धांत कशा प्रकारे शिकविला जातो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers. आक्षेप घेणारा एखादा मंत्री असला तरी, एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आक्षेप घेतल्याने वैज्ञानिक संशोधनाची व विज्ञानाची हानी कशी होईल? आक्षेप घेणारा मंत्री उच्चविद्याविभूषित आहे. ते रसायनशास्त्रात एम.एस.सी व एम.फिल. असून वेगळ्या विषयात एमबीए व पीएचडी आहेत. त्यांना विज्ञानाची थोडीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा जगातील इतर वैज्ञानिक सुद्धा हा सिद्धांत अजून जसाच्या तसा मान्य करीत नाहीत, तेव्हा एखाद्याने (तो मंत्री असला तरी) तसाच आक्षेप घेणे यामुळे विज्ञानाची हानी कशी होणार? इतर वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले होते तेव्हा विज्ञानाची हानी झाली नव्हती का? या आक्षेपामुळे जगात भारताची प्रतिमा खालावेल हा दावा तर अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीय वैज्ञानिकांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याप्रमाणे एका ठराविक वर्गाने पुरस्कार-परतीच्या मार्गाने आपले राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न काही वैज्ञानिक करीत आहेत असा संशय येऊ लागला आहे. मागील वर्षी काही वैज्ञानिकांनी सरकारविरूद्ध मोर्चा वगैरे काढला होताच. आता ही पुढची पायरी दिसते. पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोला एखाद्या वादग्रस्त, सर्वमान्य सिद्धांतावर आक्षेप घेण्यामुळे आपण मागे कसे जाणार? न्यूटनच्या काही प्रमेयांवर आइनस्टाईनने आक्षेप घेतले होते तेव्हा जग पुढे गेले होते का मागे? नंतर आईनस्टाईनच्या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले तेव्हाही जग पुढे गेले का मागे? विज्ञान हे कायम प्रवाही असते. ते कायमच पुढे जात असते. पुढे जात असताना नवीन शोध लागणे व मागील शोधात सुधारणा करणे हे स्वाभाविक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
S
sagarpdy Tue, 01/23/2018 - 14:12 नवीन
न्यूटन च्या सिद्धांताच्या त्रुटी आधीच माहित होत्या. त्या न सांगताच शालेय अभ्यासक्रमात तो शिकवला जातो (आजही, तेव्हाही शिकवला जात असणारच आहे) आईन्स्टाईन च्या सिद्धांताने या त्रुटींना सुद्धा सोडवून दाखवले. पण तो सिद्धांत कॉलेज ला शिकवतात. सिद्धांताचे सर्व डिटेल शालेय विद्यार्थी समजू शकतील असे नसतेच, तात्पर्य सोपा आणि बऱ्याचशा केसेस सोडवणारा सिद्धांत शिकवला जातो. कॉलेज मध्ये पूर्ण डिटेल सांगता येऊ शकतात. ====== सिंगांच्या बाबतीत त्यांनी आधीच माहित असणाऱ्या आक्षेपांचा आधारे डार्विन चा सिद्धांत चूक आहे सांगितलं आणि आईन्स्टाईन ने दिला तसा नवा सिद्धांत/थेरी देखील दिली नाहीये. त्यामुळे हे सर्व विज्ञानासाठी काय मदतीचं आहे असे वाटत नाही. ====== सिंगांनी डार्विनच्या सिद्धांतात त्रुटी आढळतात एवढे म्हणून सोडून दिले असते तरी चालले असते. आणि वैज्ञानिकांनी या स्टेटमेन्टला आक्षेप नोंदवून फाट्यावर मारले असते तरी चालले असते, उगाच पिळून काय साध्य होणार नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमितदादा Tue, 01/23/2018 - 15:42 नवीन
प्रकाश जावडेकर याचं अभिनंदन आणि आभार... Darwin theory row: Union Minister Prakash Javadekar asks Satyapal Singh to refrain from ‘such comments’ “I have discussed the matter with my MoS and I have asked him to refrain from making such comments. We should not dilute science. This is the advice I have given him,” Javadekar was quoted as saying by PTI. “We are not going to fund any event or don’t have any plan for a national seminar to prove Darwin wrong. It is the domain of scientists and we should let them free to continue their efforts for progress of the country,” he added.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गामा पैलवान Tue, 01/23/2018 - 15:53 नवीन
प्रकाश जावडेकरांचा आक्षेप नक्की कशाला आहे? विज्ञान पातळ केल्याबद्दल की सत्यपाल सिंगांचे उद्गार उचित नाहीत म्हणून? सिंगांच्या उद्गारांनी विज्ञान निश्चितंच पातळ झालेलं नाहीये. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गॅरी ट्रुमन Tue, 01/23/2018 - 08:30 नवीन
शिवसेना २०१९ च्या निवडणुका स्वतंत्रपणे भाजपशी युती न करता लढवणार अशी घोषणा आज पक्षातर्फे करण्यात आली. हे होणार हे माहितच होते. आज अधिकृत घोषणा करण्यात आली इतकेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/23/2018 - 10:09 नवीन
उद्धटरावांचा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. ते आज बरेच काही बरळले आहेत. म्हणे भाजपचे यश ही बाळासाहेबांची पुण्याई. म्हणजे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या पक्षाला अपयश आले आणि दुसर्‍याच पक्षाला यश आले. फेब्रुवारीत म्हणत होते की आम्ही राजीनामे खिशात ठेवले आहेत. ते राजीनामे केव्हाच भिजून सर्द झाले. नंतर म्हणाले की एप्रिलमध्ये भूकंप होईल. यांच्या भूकंपामुळे कणभरही थरथर झाली नाही. नंतर दसरा मेळाव्यात म्हणाले की आम्ही निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत. त्यानंतरही आता जवळपास पावणेचार महिने उलटले. अजून हे निर्णयाच्या जवळ पोहोचले नाहीत. आज म्हणतात की "सध्या चुकीची लोकं सत्तेत आली असून हे भेकड राज्यकर्ते आम्हाला मान्य नाहीत. ". मान्य नाहीत तर पडा ना सत्तेबाहेर. वाट कोणाची बघता. अत्यंत निर्लज्जासारखे सत्तेत बसून सत्तेचे सर्व फायदे उपभोगून जेवलेल्या ताटातच अजून किती दिवस विष्ठा करत राहणार? प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना नेते भाजपपुढे अत्यंत लाचार असून सत्तेसाठी अतिशय कासावीस झाले आहेत. त्यामुळे सर्व तर्‍हेच अपमान गिळून लाळघोटेपणा करीत सत्तेला चिकटून आहेत. २०१९ मध्ये भाजप आपल्याशी युती करणार नाही. भाजपने युती केली तरी भाजप त्यांना वाटेल तेवढ्याच जागा शिवसेनेला सोडेल. हे उद्धटरावांना माहित असल्याने आता स्वतःच बेटकुळी फुगवून स्वबळाचा नारा दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
राघव Tue, 01/23/2018 - 15:15 नवीन
अंशतः सहमत. इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेचा विरोध आणि विरोधी पक्षीयांचा विरोध यात बराच फरक आहे. काही मुख्य मुद्दे - - शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे युती तोडून त्यांना नुकसान झालंय, जे त्यांना पचनी पडत नाही. सोबत असतेत तर कितीतरी जास्त जागा त्यांना घेता आल्या असत्या.. हे ते नुकसान. - सत्तेत राहूनही हवं ते खाते ना लोकसभेत मिळाले.. ना विधानसभेत. त्यामुळं राग असण्याचा भाग वेगळा, पण झालेली नाचक्की शिवसेनेच्या नेत्यांनाही झोंबणारी आहे. त्यामुळे सत्तेसाठीची लाचारी विशेष जाणवते. तिची झळ कमी व्हावी आणि लोकांत थोडी साख राखावी यासाठी हे विरोध करण्याचे नाटक. - राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी म्हणून शिवसेना सत्तेत राहिली हे पूर्ण सत्य नसले तरी त्यात थोडा तथ्यांश आहे. आता खरंच जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत तर भाजपचा पारंपारिक मतदार नाराज होईल. हे भाजपलाही माहित आहे आणि शिवसेनेलाही. पण तरीही सत्तेत राहण्याचे, सत्तेच्या हव्यासाव्यतिरिक्त, आणखी दुसरं संयुक्तीक कारण काय असणार? - पुढील गणितं खेळतांना शेवटी स्वपक्षाची वाढ हा मुख्य मुद्दा प्रत्येकच राजकीय पक्षाचा मुख्य कार्यभाग असतो, पण अशा अर्धवट सत्तेमुळे फायदा विशेष नाही हे कळूनही ४ वर्षे घालवलीच ना.. शिवसेनेच्या कट्टर समर्थकालाही बचाव करतांना लाज वाटत असेल. कोणत्या तोंडानं मतं मागायला जायचं लोकांपुढे? जाता जाता: मुख्यमंत्रीसाहेबांनी "काही" बाबतीत गोंधळ ठेवून / माजवून ४ वर्षे सत्तेत काढली हे मात्र खरे. पुढचेही विशेष वेगळे असण्याचे काही कारण वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Tue, 01/23/2018 - 16:10 नवीन
कदाचित २०१९ नंतर सत्तेत येणार नाही हे माहित असल्याने विद्यमान खासदार/ आमदार यांची सत्ता सोडण्याची तयारी नव्हती हि वस्तुस्थिती. त्यातून हटवादी पणा केला आणि सत्ता सोडली आणि फेर निवडणूक झाल्या तर हे लोक शिवसेना सोडून भाजप मध्ये जातील आणि तेथे निवडून येतील अशी (सार्थ) भीती वाटत असल्याने श्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका चालू ठेवली असावी. बाकी शरद पवारांशी हात मिळवणी केली तर जुन्या प्रकरणाचे चौकशीचे लचांड मागे लागेल या भेटीने शरद पवार आणि श्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबरोबर जाणे टाळले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Wed, 01/24/2018 - 10:25 नवीन
राष्ट्रवादीवर राळ उठवूनच दोन्ही पक्षांनी फायदा उठवला होता. कोणत्या तोंडानं जाऊन सरळ हातमिळवणी करतील? हां आतून जे काही चालतं त्यात काही फरक पडणार नाही कधी. पण पब्लिकली असं करणं दोघांनाही शक्य नाही. यात सगळ्यात जास्त गोची राष्ट्रवादीची होते. त्यांना रालोआ मधे येण्यासाठी कधीचं बाशिंग बांधून बसलेत.. पण भाजपाच त्यांना घेऊ शकत नाही [संघाचा विरोध हे आणिक एक कारण]. एक प्रादेशिक पक्ष म्हणून तरी बळकट व्हायला हवं ना.. उत्तरप्रदेशात वगैरे काय चाललंय ते दिसूनही दूधखुळं राहणं कोणताच राजकीय पक्ष करणार नाही. ४ वर्षात शिवसेनेनं सत्तेत राहून विरोध करण्याव्यतिरिक्त काय केलं हा एक जनरल प्रश्न जनतेत फिरू लागलाय लगेच. सरकार जे काही थोडं-बहुत काम करतंय, त्याचं सगळं क्रेडीट स्वतःकडे राहील अशीच पद्धतशीर आखणी भाजपानं केलेली होती. ती कळूनही साथ वेळेत न सोडण्याचा परिणाम कमी व्हावा म्हणूनच एक वर्ष आधी अशी घोषणा करण्यात आलेली आहे, असं माझं मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Wed, 01/24/2018 - 09:45 नवीन
पवार काकांनी भाजपा राज्यसरकारला न मागता पाठिंबा देऊन जो बाण मारला त्याचे असली परिणाम आता दिसायला लागले आहेत. रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली. केंद्रात काँग्रेस जर १०० खासदार आणु शकला तर तिसर्‍या आघाडीचे पं.प्र. उमेदवार पवारसाहेब असतील. त्याला बाहेरुन शिवसेनेची रसद मिळेल. महाराष्ट्रात चौरंगी लढत होण्याची शक्यता फार कमि आहे. शिवसेना बर्‍याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Wed, 01/24/2018 - 10:22 नवीन
रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली. कधीपासून झालं हे? उद्धटरावांनी काल जाहीर केलं की आम्ही २०१९ ची निवडणुक स्वतंत्र लढणार. पण हेच त्यांनी बरोबर एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्येही सांगितलं होतं. आम्ही २५ वर्षे युतीत सडलो असे सांगून मी भविष्यात कोणाशीही युती करणार नाही असे त्यांनी उच्चरवाने सांगितले होते. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणजे रालोआ ऑफिशिअली फुटायला सुरूवात झाली असं म्हणायचं असेल तर हे एक वर्षापूर्वीच झालं आहे. अर्थात भाजप असल्या फुसक्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही. आम्ही पाठिंबा काढणार या शिवसेनेच्या धमकीचे आता शतक व्हायला आले. अजूनही पाठिंबा सुरूच आहे. आम्ही भविष्यात कोणाशीही युती करणार नाही (जानेवारी २०१७), आमचे राजीनामे खिशात आहेत (फेब्रु २०१७), शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिलमधील अधिवेशन चालू देणार नाही (मार्च २०१७), एप्रिलमध्ये भूकंप होणार (मार्च २०१७), आम्ही आता निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत (सप्टेंबर २०१७) . . . अशा अनेक फुसक्या धमक्या आल्या आणि विरून गेल्या. कालची नवीन धमकीसुद्धा तशीच विरून जाणार आहे. मुळात भाजप-सेना युती सप्टेंबर २०१४ मध्येच तुटली आहे. विधानसभा व नंतर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाही कारण भाजपचा जनाधार सेनेच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाल्याने भाजप सेनेला फारश्या जागा देणार नाही व आपणच मोठा भाऊ या भ्रमात सेना अजूनही असल्याने सेना तसे जागावाटप मान्य करणार नाही. भविष्यात युती होणार नाही हे भाजपला पक्के माहित असल्याने ते सेनेच्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. शिवसेना बर्‍याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि. काहीही. सेनेचा मूर्खपणा अजिबात कमी झालेला नाही. आपला जनाधार भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे ही वस्तुस्थिती मान्य करून युती केली तरच सेनेला फायदा होऊ शकेल. ताकद नसताना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सेनेने केला, तर सेनेचा अंत अटळ आहे. विधानसभेत स्वबळावर सेना जेमतेम ६३ जागांपर्यंत पोहोचली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे व काही प्रमाणात मुंबईचा अपवाद वगळला तर स्वबळावर लढणार्‍या सेनेची बहुतेक ठिकाणी वाट लागली. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सेनेचा जनाधार विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कमी होणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/25/2018 - 02:56 नवीन
कधीपासून झालं हे?
शेट्टी आणि सेना बाहेर पडलेत. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातली हि खीडारे क्षुल्लक म्हणावी काय ? भाजपा किती सामर्थ्यवान आहे आणि सेना कशी बुळी आहे याचं चर्वीतचर्वण करण्यात काय हाशील? भाजप, काँग्रेस+राष्ट्रवादी, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली भाजपाकरता फार काहि शुभ परिणाम होतील असं मला तरी वाटत नाहि. सेना अजीबात भूईसपाट होईल असं जरी गृहीत धरलं (तसं अजीबात होणार नाहि हे नक्की) तरी भाजपावर व्हायचा तो परिणाम कसा टळेल ? जाऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तेजस आठवले Wed, 01/24/2018 - 10:36 नवीन
तुमचा प्रतिसाद कळला नाही अर्धवटराव, कृपया समजावून सांगता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/25/2018 - 03:10 नवीन
:ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
स
सुबोध खरे Wed, 01/24/2018 - 15:00 नवीन
केंद्रात काँग्रेस जर १०० खासदार आणु शकला तर तिसर्‍या आघाडीचे पं.प्र. उमेदवार पवारसाहेब असतील. अख्ख्या लोकसभेत सहा आणि राज्यसभेत ५ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचे (६/५) श्री. शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हि अतिशयोक्तीचीही परिसीमा झाली. काँग्रेसचे १०० खासदार झाले तरी विळ्याभोपळ्याची मोट बांधून २७२ पर्यंत पोहोचणारे फार कठीण आहे. त्यातून ममता बॅनर्जी किंवा नवीन पटनाईक किंवा अमरिंदर सिंह सारखे ज्यांच्या कडे भरपूर खासदार आहेत ते सोडून शरद पवार पंतप्रधान होतील हे म्हणणे हास्यास्पद आहे. अण्णाद्रमुक ३७/१३ तृणमूल (२३/१२) बिजू जनता दल (२०/८) राष्ट्रवादीचे (६/५) अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/24/2018 - 15:48 नवीन
अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते. + २० लाख पवारांची इनिंग केव्हाच संपली आहे. दुर्दैवाने ते अजूनही पॅड बांधून, ग्लोव्हज घालून, बॅट हातात घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही वाटतंय की ते पुन्हा एकदा खेळपट्टीवर येऊन चौकार-षटकारांची आतषबाजी करतील. ते खेळपट्टीवर असतानाही कुथत खेळत होते. आता तर ते बाद होऊन तंबूत परतले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Wed, 01/24/2018 - 18:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/24/2018 - 18:18 नवीन
ओरिसातील केंद्रपाडाचे लोकसभा खासदार आणि बिजदचे ज्येष्ठ नेते जय पांडा यांची पक्षाध्यक्ष नवीन पटनायक यांनी पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून हकालपट्टी केली आहे. विविध चॅनेलवर पक्षाची भूमिका मांडताना त्यांना अनेकदा बघितले आहे.इतर नेतेमंडळी आक्रस्ताळेपणा करत असले तरी आपला मुद्दा शांतपणे आणि तितक्याच ठामपणे मांडायची त्यांची हातोटी आहे. ते भाजपच्या मार्गावर आहेत अशी वदंता आहे. आसामात सरबानंद सोनोवाल यांच्या रूपात एक चांगला चेहरा पक्षाला मिळाला.तसा जय पांडांच्या रूपात ओरिसात मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा