Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 01/02/2018 - 14:15
🗣 142 प्रतिसाद
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
42668 वाचन

💬 प्रतिसाद (142)
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/03/2018 - 18:47 नवीन
आपल्या राजकारण्यांचे उपद्व्याप पाहिले की भारताला खाली खेचायला पाकीस्तान आणि चीनची गरज नाही असेच वाटते. सगळा प्रकार शिसारी आणणारा आहे. :( The less said the better. आपण इतिहासातिल अनुभवावरून काहीच शिकू शकत नाही हे गेल्या २,००० वर्षांच्या घटनांवरून सतत दिसत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/03/2018 - 21:09 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुखीमाणूस गुरुवार, 01/04/2018 - 04:46 नवीन
मी कालपासून मला आलेला एक कायप्पा संदेश ईथे डकवण्याचा प्रयत्न करते आहे. ______________________________ भिमा कोरेगांव का घडले ?? प्रत्येक मराठा बांघवांनी त्या ५०० महार वीरांना का वंदन करावं ?? खरा ईतिहास काय आहे ? आपले खरे शत्रू कोन ? खोटा ईतिहास खुप वाचलात आता........ सत्य वाचा अणि विचार करा .. नगर रोड वरील भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर " वढु " गांव आहे....... ____________________________________________________ येथेच "छ.संभाजी महाराज" यांचा कपटनितीने खुन झाला व त्यांच्या देहाचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले गेले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल...... भयानक, थरकाप ऊडवणारी स्मशान शांतता....... आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही """मराठा"""" पुढे आला नाही. पण एका ""पहिलवानाला"" 'ही बातमी समजली आभाळ फाटलं होतं! त्यातही तो धाडस करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंप्याला" हातपाय पडुन ते जोडण्यासाठी तयार करतो, आपला राजा आहे त्यास असं....... नाही सोडू शकत आपण..... तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाचं धाडस पाहुन त्याचे " नातलग " ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात.... आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्निदान स्वत: तो पहिलवान देतो....." त्या पहिलवानाचे नाव होते "'""' गणपत महार """" """" जय भिमवाला """" '''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली. आज ही संभाजी राजेंची "समाधी" ही """ महार वाडयात """ आहे.... ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....." "कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले. इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं. तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!! "आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या """५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले...... तो दिवस होता """१जानेवारी म्हणुन हा "शौर्य दिन म्हणून "" पाळला जातो, साजरा करण्यात येतो.... """आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे... - यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा. ____________________________________________________ हा इतिहास अत्ता का बाहेर आला याआधी का नाही?
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/04/2018 - 08:18 नवीन
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या
पेशव्यांविरुद्ध लढताना बदला घेणं म्हणायला, राजांचा खून पेशव्यांनी केला होता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 10:08 नवीन
ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....." "कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले. त्या काळात म्हणजे १६८० मध्ये महार किंवा इतरांना शिक्षा देण्याचे अधिकार भटांना होते का? संभाजी महाराजांनंतर सन १७०० पर्यंत राजाराम महाराज राजे होते व त्यांच्यानंतर १७०७ पर्यंत म्हणजे औरंग्या मरेपर्यंत भोसले घराण्याचीच सत्ता होती. पेशव्यांना अधिकार मिळाले ते १७०८ मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी. म्हणजे महाराष्ट्रात भट व मोगल सत्तेवर नसताना ते महारांना शिक्षा कोणत्या अधिकाराने देणार? समजा अशी शिक्षा दिली असेल तर राजाराम महाराज व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या ताराबाई व नंतर आलेले शाहू महाराज यांनी ही शिक्षा कशी पुढे सुरू ठेवली? एकंदरीत वरील दावे ही शुद्ध जातीयवादी थापेबाजी आहे. इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं. तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!! "आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद आणि जातीयवादी दावे! शिस्तबद्ध सैन्य व तत्कालीन आधुनिक शस्त्रे हाताशी असलेले इंग्रज एका व्यक्तीशी करार करतात ही शुद्ध थापेबाजी आहे. सन १८०० मध्येच जनरल वेलस्लीने खंडाळ्याच्या घाटात महादजी शिंदेंच्या मोठ्या सैन्याला पराभूत केले होते. असे असताना त्यांना पुण्यात शिरणे शक्य नव्हते यावर फक्त मूर्खच विश्वास ठेवू शकतील. दुसरं म्हणजे संभाजी राजेंच्या खुनाचा बदला पेशव्यांविरूद्ध लढाई करून कसा घेता येईल? संभाजी राजांना औरंग्याने हालहाल करून मारले होते. बदलाच घ्यायचा होता तर एखाद्या मुस्लिम राजाचा घेता आला असता. संभाजी राजेच्या १६९० मधील खुनाचा १७०८ मध्ये जन्माला आलेल्या पेशवाईशी काहीतरी संबंध होता का? संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असा नवा विकृत इतिहास ब्रिगेडींनी लिहिला आहे. आता बहुतेक त्याच धर्तीवर संभाजी राजेंना (त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या) पेशव्यांनी मारले असा नवा इतिहास इतिहासाचार्य प्रकाश आंबेडकर आणि कंपनी लिहिणार असं दिसतंय. """५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले...... २५००० पेशवे? अगदी २०१८ अध्ये सुद्धा सौदी राजघराण्यात सुद्धा २५००० माणसे नाहीत. मग २०० वर्षांपूर्वी २५००० पेशवे कोठून आले? त्याकाळी पुण्याची एकूण लोकसंख्या तरी २५००० असेल का? पेशवे एकच होते व उर्वरीत त्यांची सेना होती आणि त्यांच्या सेनेत सर्व जातींचे सैनिक होते. ५०० जणांनी २५००० जणांना संपविणे म्हणजे प्रत्येकाने किमान ५० जणांना संपविणे. आज भारतात एकच रजनीकांत आहे. परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतंय. """आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे... इतिहासातच रममाण होणे आणि चुकीचा, विकृत आणि जातीयवादी इतिहास शिकणे हीच मुख्य समस्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
साहना Fri, 01/05/2018 - 08:45 नवीन
काही दिवस थांबा कुणी दलिताने युरोप मध्ये जाऊन वास्को द गामा ला भारतांत समतेची गुढी उभारायला बोलावले होते असे ऐकू येईल. (औरंगझेब चे अत्याचार फक्त ब्राह्मणांविरुद्ध असून जातिव्यवस्थेला नष्ट करणे त्याचा उद्देश होता असे मार्क्सिस्ट लोक आधीपासून शिकवत आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
N
NiluMP Fri, 01/05/2018 - 15:42 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 01/04/2018 - 07:00 नवीन
एवढा मोठा विनोद गेल्या हजार वर्षात झाला नसेल. २५,००० म्हणजे किती हे समजण्या इतकी अक्कल हे लिहिणार्‍याला आहे की नाही ? पण ठीक आहे. त्या ठिकाणी खरेच काय झाले याबद्दल आता एकदा लिहावे लागेल. पण नको. हे काम अगोदरच कोणीतरी केलेले आहे. या त्याच्या लिन्क्स. इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग १ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग २ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ३ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ४ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ५ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ६ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ७ वरील लेखांमधे काही त्रुटी आहेत पण त्या एवढ्या महत्वाच्या नाहीत व त्याने मुळ घटनाक्रमाला कुठेही धक्का पोहोचत नाही. मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले. आपले संपत आलेले अस्तित्व टिकविण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. आज प्रकाश आंबेडकरांनी पळ काढलाच. "इतर संघटनांवर माझा ताबा नाही असे म्हणाले. पण मग मेवाणी आणि उमरला कशाला व्यासपिठावर बोलावलेस बाबा ? बर तुम्ही नव्हते बोलवले तर त्या व्यासपिठावरुन निघून जायचे ना ! पण मिळणार्‍या प्रसिद्धीचा लोभ नडला असावा. कालही एका चर्चेत त्यांना हा प्रश्र्न विचारल्यावर त्यांनी चक्क पळ काढला. असो.... या येथे हे असेच चालणार... यांना तरुण पिढीने घरीच बसवले पाहिजे तरच त्यांना येथे सुखाने नांदता येईल. मला सगळ्यात वाईट वाटले ते याचे की टिव्ही वर दिसत होते की लहान लहान मुलेही या मोर्च्यात सामील होती. यांना वेठीला धरताना यांना शरम कशी वाटत नाही?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/04/2018 - 10:55 नवीन
या लेखांचे दुवे इथे दिल्याबद्दल धन्यवाद ! आजपर्यंत, या संबंधात पुरेशी माहिती नसल्याने बोलायचे टाळले होते. "युद्धाशी" आणि "त्यात मृत अथवा जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधल्या गेलेल्या या स्तंभाशी" अधिकृत संबंध असलेल्या व्यक्तींचे लेखी अहवाल व ब्रिटिश संसदेसह इतर सरकारी कागदपत्रांच्या संदर्भांच्या बळावर लिहिलेले हे लेख नक्कीच विश्वासू आणि माहितीपूर्ण आहेत. या संदर्भांत दिसणारे या युद्धाबाबतचे सत्य, त्याबाबत केल्या जाणार्‍या राजकारणाच्या विपरीत आहे, हेच दिसून येत आहे. आपल्याच देशवासियांमध्ये दुही माजवून आपली पोळी भाजण्याच्या कलेत आजचे भारतिय राजकारणी इतके तरबेज आहेत की ते तेव्हाच्या लबाड इंग्रजांना लाजवतील, यात वाद नाही. स्वार्थाने अंध झालेल्या राजकारण्यांना, आपण जनतेत फूट पाडून देशाचे अपरिमित नुकसान करत आहोत, याचे भान रहात नाही... किंबहुना, आपण जनता आणि देश यांचे अपरिमित नुकसान करत आहोत याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे, पण त्यांना त्याची अजिबात फिकिर कराविशी वाटत नाही. :( :( :( हा सगळा प्रकार इतका किळसवाणा आहे की त्याबद्दल काही बोलायचाही तिरस्कार वाटावा !! The less said the better. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 11:12 नवीन
मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले. थोरल्या आंबेडकरांनीच १९२७ मध्ये या युद्धाला ब्राह्मण वि. महार युद्धात महारांचा विजय असे जातीय स्वरूप देऊन विजय साजरा करण्याची परंपरा सुरू केली. प्रकाश आंबेडकर आता फक्त आपल्या आजोबांचा कित्ता गिरवीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
A
arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 13:34 नवीन
थोरल्या आंबेडकरांनी असं काही केलं असेल असं वाटत नाही. https://www.quora.com/What-was-the-contribution-of-B-R-Ambedkar-in-the-Indian-freedom-struggle इथली उत्तरं वाचली तर कळतं की स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता असं म्हणणं चूक आहे. ते त्यांचं कॉज नव्हतं. त्यांचं प्राधान्य नव्हतं. त्यांचं जे प्राधान्य होतं ते असण्यासाठी तशी परिस्थिती पण होती. तो काळ वेगळा होता. -------------------------- आंबेडकरांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला असं काही उदाहरण नाही. ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य हे प्राधान्य नसलेले अनेक सवर्ण नेते पण होते. त्यांची आपापली कॉजेस होती. आणि ते तेव्हाच्या सरकारची बाजू घेत. जेव्हा ही परंपरा चालू झाली तेव्हा ते सत्तेत असलेल्या सरकारच्या बाजूने, आणि त्यांच्या कॉजच्या बाजूने होती. दलितांना सैन्यात घेणे, न घेणे अश्या उलटसुलट पॉलिसिंपासून सुटका मिळावी असा देखिल त्यांचा परंपरेमागे उद्देश असू शकतो. आणि समजा "जातीय स्वरुप" दिलं असं क्षणभर मानायला जावं तरी का दिलं? तेव्हा सर्वणांची सत्ता नव्हती आणि त्यांना स्वतःला आपल्या जातीच्या लोकांच्या बळावर काही सत्ता मिळवायचा स्कोप नव्हता (ते त्यांना स्वातंत्र्यानंतर पण जमलं नाही)! ========================== बाकी आंबेडकरांवर टिका करायला ना नाही, पण आजच्या स्वार्थी नेत्यांशी त्यांची तुलना करणं ही टिका ठरणार नाही, त्यापेक्षा काहीतरी दु:खजन्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 14:38 नवीन
थोरले जोशी पण असणार तेव्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सस्नेह Fri, 01/05/2018 - 09:34 नवीन
दुव्यांबद्दल धनयवाद जयंतकाका ! अतिशय वास्तवदर्शी माहिती ! तिचा विपर्यास करून राजकारण्यांनी केलेला खेळ पाहून वडाची साल पिंपळाला या म्हणीचा प्रत्यय आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ए
एमी Fri, 01/05/2018 - 23:09 नवीन
फारच वास्तवदर्शी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ए
एमी Tue, 01/09/2018 - 03:32 नवीन
https://rightangles.in/2018/01/07/distortion-of-peshwa-history/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 01/11/2018 - 20:26 नवीन
या https://rightangles.in मध्ये एक से एक भारी लेख आहेत. मस्त मनोरंजन झालं. मुद्देसूद प्रतिसाद तुम्हाला फालतू बडबड का वाटते ते आता समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
श्रीगुरुजी Fri, 01/12/2018 - 04:21 नवीन
सहमत दुस-यांची रेघ छोटी करायचा प्रयत्न करून किंवा त्यांच्यावर खार खाऊन आपली रेघ मोठी होत नाही हे अजून ब-याच लोकांना समजलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ए
एमी Fri, 01/12/2018 - 05:52 नवीन
दुस-यांची रेघ छोटी करायचा प्रयत्न करून किंवा त्यांच्यावर खार खाऊन आपली रेघ मोठी होत नाही हे अजून ब-याच लोकांना समजलेले नाही. >> हॉ हॉ हॉ तुमच्याकडून असली वाक्य फेकली जावीत हे फारच विनोदी आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/12/2018 - 06:46 नवीन
उत्तरे नसली की असं केविलवाणं हसू येतंच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 01/12/2018 - 01:50 नवीन
http://www.aisiakshare.com/node/6440
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
श्रीगुरुजी Fri, 01/12/2018 - 04:17 नवीन
लेख वाचून करमणूक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 01/04/2018 - 07:33 नवीन
ही अजून एक लिंक. http://www.opindia.com/2018/01/battle-of-koregaon-lessons-in-unity/ यात एक मजेशीर उल्लेख आहे तो म्हणजे स्वतः महार, मांगांना व इतर खालच्या जातींना अत्यंत वाईट पद्धतीने वागवीत.... :-) हा लेख जरा उजवा वाटतोय पण माहितीसाठी चांगला आहे..
  • Log in or register to post comments
प
पंतश्री गुरुवार, 01/04/2018 - 08:04 नवीन
#भिमाकोरेगाव लेखक :- ग्रांड डफ प्रकाशन :- १८२६ दिनांक ३१ डिसेंबर १८१७ कॅप्टन स्टॉटन ह्या गोऱ्या साहेबाच्या नेतृत्वाखाली एक सैनिकी तुकडी शिरूरच्या सैनिकी तळावरून निघाली, त्यात २४ युरोपिअन्स, सोबत ,मद्रासच्या २५० तोफखान्याच्या सैनिकांची तुकडी व दोन तोफा व ३०० नव्याने उभारलेली घोडदळाची तुकडी …. रात्रभर चालून १ जानेवारी १८१८ ला भीमानदीच्या काठी कोरेगावला पोहचली … पाहतात तर काय ? समोर पेशवांच्या सैन्याचा (२०००० घोडदळ, ८००० पायदळ) प्रचंड तळ पसरला होता … हे सैन्य सरकत होते पुण्याकडे त्याला अटकाव करण्याची जवाबदारी ह्या सैनिकी तुकडी वर होती…. कारण मागून ब्रिगेडियर जनरल स्मिथचे सैन्य त्यांच्या पाठलागावर येणार होते … एवढ्या बलाढ्य सैन्या समोर आपला टिकाव लागणार नाही हे पाहून कोरेगावच्या तटबंदीच्या आत आश्रय घेण्यासाठी हे सैन्य निघाले पण घात झाला पेशव्यांच्या सैन्याने हे पाहिले.… रात्री ८ वाजल्या पासून सकाळी १० वाजे पर्यंत २७ मैल चालून थकल्या होत्या. तोच पेशव्यांच्या लष्करातील अरबांच्या एक-एक हजाराच्या अश्या ३ तुकड्या दोन्ही बाजूने तटबंदीत शिरल्या … तोफा बंदुका निकामी झाल्या… त्या छोट्याश्या जागेत हातघाईची लढाई पेटली … आणि घात झाला तोफखान्याचा प्रमुख लेफ्टनंट चिशोल्म ह्याचे मुंडके कापून पेशव्यांकडे विजयाचे प्रतिक म्हणून पाठवले पण लढाई आजून चालूच होती…. जखमी इंग्रज अधिकाऱ्यांना ज्या धर्मशाळेत ठेवले होते ती पण पेशव्यांच्या सैन्याने ताब्यात घेतली … तेथील असिस्टंट सर्जन मि. वूइंगेट ह्यांना भोसकून ठार केले परंतु सलगीकरून कॅप्टन स्टॉटन ह्याने फिरून ती धर्मशाळा ताब्यात घेतली म्हणून इतर इंग्रज अधिकारी वाचले… अत्यंत अडचणीच्या जागी लढाई असल्याने मराठ्यांच्या सैन्याला इंग्रजांना डांबून ठेवण्या शिवाय बाकी काही करता येणे शक्य नव्हते… शेवटी रात्री ९ वाजता पेशव्यांचे सैन्य माघारी तळावर निघून आले…. व सकाळी ते लोणीकंदच्या दिशेने निघाले… तिथून पुण्याला न जाता वासोट्याच्या किल्ल्यावर इंग्रजांच्या कैदेत असलेल्या सातारच्या छत्रपतींना कैदेतून सोडविले व साताऱ्यात आणले … दिवसभर तहानलेल्या सैनिकी तुकडीने भीमेचे पाणी पिऊन पुन्हा शिरूरच्या मार्गाला लागले … दोन्ही कडची माणसे मारली गेली …. इंग्रजांनी ही लढाई लढली …. पराभव स्पष्ट दिसत असून सुद्धा लढली …. पराभूत झालेल्या इंग्रजांनी त्या लढाईच्या स्मरणार्थ "जयस्तंभ" उभारला …. इंग्रज त्याच्या देशासाठी लढत होते… पेशवे स्वराज्याच्या छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून लढले … पण हे ३०० नवीन भरती केलेले भारतीय वाघ कोणासाठी कोणाच्या बाजूने व कशासाठी लढले …. परंतु, उद्या आपल्यातील अनेक दीड शहाणे त्या "(परा)जयस्तंभाच्या" इथे फुले चढवतील…. आणि समतेची - विद्रोहाची गाणी गातील …. व आनंद मानातल्या मनात "पेशवाई बुडवल्याचा" आनंद मनातील … पण नक्की त्यांनी पेशवाई बुडविली की स्वराज्य ? मला लाज वाटते … स्वराज्यद्रोही स्वकीयांची (वरील सर्व हकीकत स्वत: एका इंग्रजानेच लिहून ठेवले आहे … आता तुम्हीच ठरावा …. जाणार का "भीमा-कोरेगावला") संदर्भ :- "अ हिस्टरी ऑफ मराठाज" - जेम्स ग्रांट डफ खंड ३ (पान क्र. ४३२-४३६) (हा लेखक सातारा येथे छत्रपतींच्या दरबारात रेसिडेन्सी म्हणजेच कंपनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून म्हणून काम पाहत होता.) ह्या लिंक वर पुस्तक वाचावयास मिळेल https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/04/2018 - 08:45 नवीन
कायप्पावरून आलेल्या गोष्टी पुढे न सरकावणेच जास्ती बरे नाहीये का? कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 10:23 नवीन
मला तर माहिती पुढे न सरकारवणेच अनिश्ट वाटते. किमान उलटसुलट माहिती वाचून लोकांची अतितीव्र मते बोथट होतील. समाजविघातक काम करण्यापूर्वी इतिहास अभ्यासण्याचं क्लिष्ट, बोरिंग, विचित्र काम सामान्य रागीट जातीयवादी जनांना दिलंं तर ते कंफ्यूज होऊन जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/04/2018 - 12:41 नवीन
माझा आक्षेप माहिती पुढे सरकावण्यावर नक्कीच नाही. मला असे म्हणायचे आहे कि योग्य रेफेरंस नसलेल्या गोष्टी (जसा वरचा संवादात्मक प्रतिसाद आहे) आधीच कट्टर असलेली मते अजून कट्टर करण्यात हातभारच लावतात. योग्य रेफेरंस असलेल्या गोष्टी जरूर पुढे सरकवाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पंतश्री गुरुवार, 01/04/2018 - 12:21 नवीन
कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.
मला वाटते लिन्क टाकलेली आहे https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/04/2018 - 12:35 नवीन
मी त्याच्या वरच्या प्रतिसादाला उद्देशून म्हणालो, तुमचा रेफेरंस वाचला. आता वर जाऊन पहिले तेव्हा तुमचा प्रतिसाद कायप्पावरचा फॉरवर्ड आहे ते लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंतश्री
ए
एमी गुरुवार, 01/04/2018 - 11:20 नवीन
संघोट्यांचे दांभिक प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 01/04/2018 - 12:24 नवीन
http://www.firstpost.com/india/bhima-koregaon-caste-violence-in-maharashtra-path-to-2019-lok-sabha-election-will-meander-through-social-unrest-4285353.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 18:12 नवीन
दांभिक असतील तर वाचू नका आणि दुर्लक्ष करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
M
mayu4u Fri, 01/05/2018 - 05:43 नवीन
कुणाकडनं आणि कसल्या अपेक्षा करताय? निव्वळ असत्य लिहिणाऱ्या आयडींची पाठराखण करणाऱ्यांना आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना मारा फाट्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ए
एमी Fri, 01/05/2018 - 23:09 नवीन
ट्रोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Tue, 01/09/2018 - 04:26 नवीन
प्रतिवाद करायला काही मुद्दे आहेत का? की नेहमीप्रमाणेच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पुष्करिणी गुरुवार, 01/04/2018 - 12:59 नवीन
खाली दिलेला लेख चांगला आहे http://www.opindia.com/2018/01/battle-of-koregaon-lessons-in-unity/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 13:03 नवीन
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला म्हणून त्याची जयंती साजरी करायची आणि महार इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना अभिवादन करायचे. याला म्हणतात खांग्रेस संस्कृती!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/04/2018 - 14:10 नवीन
पूज्य संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे प्रभावी हिंदुसंघटन करतात. या दोघांना अटक व्हायला पाहिजे पुरावा नसला तरी चालेल असा प्रकाश आंबेडकरांचा हट्ट आहे. अधिक माहिती : https://www.loksatta.com/mumbai-news/peace-unabated-without-action-against-bhide-and-ekbote-says-prakash-ambedkar-1611270/ प्रकाश आंबेडकर या दोघांना आपले शत्रू समजतात. प्रकाश आंबेडकरांची वैयक्तिक खाज भागवी म्हणून शासनाने नैसर्गिक न्याय धाब्यावर बसवू नये. हिदुत्ववाद्यांना अटक करण्यासाठी काहीही पुरावा नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर गुरुवार, 01/04/2018 - 15:04 नवीन
सदर विषयावर ऐसीमध्ये २-३ वर्षांपूर्वी बरीच चर्चा झाली होती. माझ्याच ह्या तेथील धाग्यामध्ये घटनेचा इतिहास आणि तदनुषंगिक अशी बरीच चर्चा घडलेली आहे ती नजरेखालून घालावी असे सुचवितो. मी सुमारे १९९६ च्या पुढेमागे काढलेले स्तंभाचे आणि त्यावरील इंग्रजी-मराठी लेखांचे फोटोहि तेथे दिसतात. (१९९६ सालापर्यंत तरी स्तंभ जवळजवळ दुर्लक्षित होता हे आसपासच्या माजलेल्या गवतावरून आणि चरणार्‍या म्हशींवरून दिसत आहे. स्थानिक लोकांना स्तंभाबद्दल तेव्हातरी काहीहि माहीत नव्हते असे बोलतांना जाणवले..) इंग्रजी लेखाखाली Simpson and Lewelyn SCTs अशी नावे आहेत. हे कोण असा शोध घेतल्यावर ही कलकत्त्यामधील तत्कालीन लेख कोरणार्‍या - Sculptors - कारागिरांची नावे आहेत असे शोधाअंती मिळाले.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 15:26 नवीन
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्‍याकोपर्‍यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे.
असं आपण तिथं लिहिलं आहे नि दोनच वर्षांत इतका राडा. प्रणिपात घ्यावा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
ए
एमी Fri, 01/05/2018 - 01:30 नवीन
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्याकोपर्यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे. >> कोपर्याकोपर्यावर उभ्या केलेल्या मंदिरात जे काही होतं ते चालतं की लोकांना! श्रद्धा वगैरे.....दगडंच असतात ना ती पण जी पुजली जातात! े
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
श
श्रीगुरुजी Fri, 01/05/2018 - 06:54 नवीन
मंदीरात तोडफोड, राडा इ. होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
A
arunjoshi123 Fri, 01/05/2018 - 07:24 नवीन
अ‍ॅमी ने लावलेला श्रद्धेचा संबंध यनावालांनाही मात देणारा आहे. ---------- कोल्हटकरांना त्या स्तंभाशी निगडीत लोकसमूह प्रथम स्थानिक वंशज, स्थानिक संबंधित लोक, मग आजूबाजूचे गावचे लोक, असा असून पुढे त्या जागेचे पोटेंशियल इतके आहे कि राज्यभर सर्वत्र त्या घटनेची आणि स्थळाची दखल घेणे चालू होईल असे वाटले. एक म्हैस चरत असताना देखील पोटेंशियलचा असा अंदाज यावा हे कमालीचे आहे (मला तरी वाटले). कोल्हटकर काका, तुम्ही शेअर कोणते घेतले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे Fri, 01/05/2018 - 07:43 नवीन
कोल्हटकर काका, तुम्ही शेअर कोणते घेतले आहेत?
हा हा हा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ए
एमी Fri, 01/05/2018 - 23:14 नवीन
कोल्हटकरांना त्या स्तंभाशी निगडीत लोकसमूह प्रथम स्थानिक वंशज, स्थानिक संबंधित लोक, मग आजूबाजूचे गावचे लोक, असा असून पुढे त्या जागेचे पोटेंशियल इतके आहे कि राज्यभर सर्वत्र त्या घटनेची आणि स्थळाची दखल घेणे चालू होईल असे वाटले. एक म्हैस चरत असताना देखील पोटेंशियलचा असा अंदाज यावा हे कमालीचे आहे (मला तरी वाटले). >> नीट वाचा ते वाक्य त्यांनी कशाचा प्रतिसाद म्हणून लिहिले आहे ते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मदनबाण गुरुवार, 01/04/2018 - 18:15 नवीन
जे झालं ते वाईट आहे, यात लोकांचे नुकसान / राज्याचे नुकसान / राष्ट्राचे नुकसान झाले असे म्हणावेसे वाटते... :( आपणच जर एकमेकांची टाळकी फोडणार असु तर राष्ट्रास दुसर्‍या शत्रुची गरजच काय ? असो... आज बाळासाहेब ठाकरे असते, तर पूज्य संभाजी भिडे गुरुजी सारख्या व्यक्तिमत्वावर बोट रोखण्याचे देखील धाडस कोणी केले नसते इतके नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जो भी कसमे खायी थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जीवन मे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... :- Raaz
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 01/05/2018 - 08:24 नवीन
घेतला नसेल तर यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये सहभाग घ्या आणि नंतर मत व्यक्त करा असे सुचवू इच्छितो. youtube वरील मुलाखतीमध्ये सगळे गॉड गॉड च असते. ... बाकी प्रत्येक गोष्टीसाठी अजून बाळासाहेबच कशाला हवे आहेत, तुमचे धाडस दाखवा, हिंदुत्ववाद्यांचे (फक्त त्यांच्याच करिता नसेल तर आनंद आहे ) सरकार आहेच मदतीला आणि तोडा रोखली गेलेली बोटे. हाय काय आणि नाय काय...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 01/05/2018 - 10:06 नवीन
घेतला नसेल तर यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये सहभाग घ्या आणि नंतर मत व्यक्त करा असे सुचवू इच्छितो. youtube वरील मुलाखतीमध्ये सगळे गॉड गॉड च असते. देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी अजून बाळासाहेबच कशाला हवे आहेत, तुमचे धाडस दाखवा, हिंदुत्ववाद्यांचे (फक्त त्यांच्याच करिता नसेल तर आनंद आहे ) सरकार आहेच मदतीला आणि तोडा रोखली गेलेली बोटे. हाय काय आणि नाय काय...!! या महाराष्ट्रात एकमेव हिंदू ह्रदय सम्राट झाले ते म्हणजे बाळा साहेब ठाकरे त्यामुळे त्यांची अश्या प्रसंगी आठवण येणारच... इतर दुसरा त्यांच्या सारखा नेता सध्या महाराष्ट्रात आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/05/2018 - 10:39 नवीन
<<<देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.>>> ==>> देशाचे पंतप्रधान बऱ्याच व्यक्तींचे गुणगाण गात असतात. एकदा तर म्हणाले "साहेबांचे बोट पकडून राजकारणात आलो. आता हे पण सगळेच मान्य असणारच तुम्हाला? बाकी पंतप्रधानांनी कोणाकोणाचे आदेश घायचे/पाळायचे याची मार्गदर्शक नियम काय आहेत हे कोणी सांगू शकेल का ? ज्यांना बरेच जण गुरुवर्य समजतात त्यांनी एकदातरी त्यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये भाग घ्यावा आणि मग अनुभव सांगावा. मी सांगितला असता माझा अनुभव पण आता वातावरण गरम आहे आणि गल्लो गल्ली बोटं छाटणारी बसलेले आहेत म्हणून तूर्तास पास. ... <<<त्यामुळे त्यांची अश्या प्रसंगी आठवण येणारच...>> ==>> तोड फोड म्हंटली की मलापण प्रसंगी साहेबांचीच आठवण येते. तुमचे म्हणणे रास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 01/05/2018 - 11:30 नवीन
मी सांगितला असता माझा अनुभव पण आता वातावरण गरम आहे आणि गल्लो गल्ली बोटं छाटणारी बसलेले आहेत म्हणून तूर्तास पास. काय बोलता ! मोगलाईच आहे म्हणजे राज्यात ! तोड फोड म्हंटली की मलापण प्रसंगी साहेबांचीच आठवण येते. तुमचे म्हणणे रास्त आहे. भावना पोहचल्या म्हणायच्या तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Fri, 01/05/2018 - 12:55 नवीन
सांगाच. वाचायला आवडेल.
देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोणत्याही असांविधानिक पदावरील व्यक्तीकडून आदेश घेणं सम्पूर्णपणे चूक आहे. (सल्ला घेणं अजिबात चुकीचं नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा