Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 01/02/2018 - 14:15
🗣 142 प्रतिसाद
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
42668 वाचन

💬 प्रतिसाद (142)
स
सुज्ञ गुरुवार, 01/04/2018 - 19:09 नवीन
मला कळत नाही हे मोर्चे असे आरामात कसे होत राहिले ? प्रकाश आंबेडकर ची " लोकशाही" ताकद किती ? किती सीट तो निवडून आणू शकेल आत्ता निवडणूक झाल्या तरी ? तरीही असला कोणी नेता सांगतो आणि दंगेखोर धुडगूस घालतात ? कदाचित सरकार ला मग आपल्या "कविमित्रा " ला दुखवायचे नसेल , किंवा यांचे आंदोलन हे किती मूर्खपणाचे आणि विध्वंसक असते हे लोकांना दाखवून द्यायचे असेल . असो नुकसान सामान्य लोकांचे झाले . आता बंद पुकारणऱ्या लोकांनी भरपाई का करू नये ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 01/05/2018 - 08:59 नवीन

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

===== परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. http://abpmajha.abplive.in/india/koregaon-bhima-violence-mp-udayan-raje-supports-bhide-guruji-498978
  • Log in or register to post comments
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 13:53 नवीन
१ जानेवारीला दगडफेक झाली , तुम्ही त्याच समर्थन करता का?
  • Log in or register to post comments
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 13:58 नवीन
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला म्हणून त्याची जयंती साजरी करायची आणि महार इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना अभिवादन करायचे. आम्ही परत मडक आणी झाडु घ्यायचा का? गुरुजी सांगा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/05/2018 - 14:41 नवीन
अतुल २०१५, महारांच्या गळ्यात मडकं आणि कंबरेला झाडू लटकावले जायचे ही शुद्ध थापेबाजी आहे. कोण्या सोन्या महारास भटांच्या आज्ञेवरून पुण्यांतील बोळांतून गळ्यात मडकं आणि कंबरेस झाडू बांधून फिरवल्याचं एकतरी अस्सल चिटोरं आहे का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतूल २०१५
आ
आनन्दा Fri, 01/05/2018 - 18:07 नवीन
जौ द्या हो, ते कुठले तरी भलते स्कोर सेटल करायला आलेत... त्यंच्या डोक्यात किती विखार भरलाय ते त्यंच्या प्रितिक्रयांवरून दिसतेय. आणि वरची सगळी चर्चा वाचून सुद्धा त्यांना सत्य इतिहास अजून कळला नाहीये यातच काय ते समजून जा. अश्या लोकांना टीआरपी मिळू न देणे हाच एकमेव उपाय अहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 01/05/2018 - 18:50 नवीन
प्रितिक्रिया ? ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sat, 01/06/2018 - 16:07 नवीन
हायला खरच की.. ह ह पु वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Fri, 01/05/2018 - 17:07 नवीन
गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल स्पॅरो नामक पात्र आहे.... अतिशय साधी राहणी, फाटके वाटावे असे कपडे, पायात पादत्राणे कधीच नाही....धार्मिक गुरुच जणू.... सरसेई कडून राजकीय पाठबळ मिळताच, धार्मिक अतिरेक सुरु करतो.... 'फेथ अँड क्राऊन, डॉकटरिंन द्वारे राज्यांवर सत्ता मिळवतो... जिने स्वार्थासाठी त्याला पाठबळ दिले, तिचीच गावासमोर नागडी धिंड काढतो.... सावधान... एक लिटिल स्पॅरो या धर्तीवर हळू हळू बस्तान बसवतोय.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/05/2018 - 19:16 नवीन
मला असा एक माणूस माहिती आहे. तो मळलेला, चुरगळलेला पायजमा आणि पांढरा जाड्याभरड्या कापडाचा सदरा परिधान करतो. त्यांच्या गळ्यात कधी जानवे असते, तर कधी मस्तकावर फरटोपी असते. तो कधी मंदिरात जाऊन प्रसाद घेतो, तर कधी इफ्तार पार्टीत मटण चेपतो. राजकीय पाठबळ असल्याने तो पोरकटपणाचा अतिरेक करतो. जो अधिकृत पंतप्रधान आहे त्यालाच तो आदेश देऊन शरमिंदा करतो. एका विशिष्ट आडनावामुळे आपण या देशाचे अनभिषिक्त सम्राट आहेत या भ्रमात वावरतो. स्वार्थासाठी परकीयांशी आणि फितुरांशी हातमिळवणी करतो. सत्तेसाठी जनतेत फूट पाडून जनतेला भडकावतो. तो आणि त्याची टोळीतले मनसोक्त भ्रष्टाचार करतात. एक लिटिल स्पॅरो या धर्तीवर हळू हळू बस्तान बसवतोय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
आ
आनंदयात्री Fri, 01/05/2018 - 19:30 नवीन
तुम्हाला हाय स्पॅरो म्हणायचेय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 02:18 नवीन
हाय स्पॅरो.... बरोब्बर.... ज्या राजघराण्यातील व्यक्ती वैयक्तीक स्वार्थासाठी या हाय स्पॅरोला आज मदत करतील, उद्या त्यांची गाव धिंड निघू शकते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सुखीमाणूस Sat, 01/06/2018 - 03:18 नवीन
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत. आता कळल कोणाबद्दल बोलताय ते. भिडे गुरुजी एवढे भितीदायक वाटतात लोकाना!! का ते समजत नाही मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 04:56 नवीन
एका लोटांगणाची गोष्ट आज दिवसभर आपल्या पेड मि़डीयाने आपली कामगिरी चोख बजावली. भिडेंची मुलाखत लागोपाठ सगळ्या चॅनेलवर दाखविण्यात आली. त्याच्यावर शूरवीर भिडेंनी दिलेली कबुली ही बरेच काही सांगून जाते. उदयभाऊ निरगुडकरांनी त्यांना विचारले... मी असे ऐकले आहे कि, तुम्ही कधी-कधी बीजेपी वर देखील टिका केली आहे. स्वभावाप्रमाणे सडेतोड आणि चोख उत्तर देणारे भिडे म्हणाले कि, माझ्या आयुष्यात मी बीजेपीवर कधीच टिका केलेली नाही. उदयभाऊ निरगु़डकरांनी पुढचा प्रश्न विचारला मोदी तुमच्याशी खुप आत्मियतेने वागतात. त्यावरती भिडे म्हणाले.. कि, मोदी हा देवाने भारताला दिलेला आशीर्वाद आहे... एवढी दैवी शक्ती असलेला माणूस भारताला पंतप्रधान म्हणून मिळणे हे या देशाचे भाग्य आहे. दुपारी बीजेपी माझाने त्यांची मुलाखत घेतली. आणि तिथून जणूकाही लाईनच लागली. पण, मात्र खमक्या भिडेंनी टिव्ही 9 वर दिलेल्या मुलाखतीमध्ये माईक अँकरच्या तोंडावरच फेकून दिला. उदयभाऊ निरगुडकरांनी भिडेंना विचारले कि, जे बहुजन विचारसरणी मानतात त्या शाहू, फुले, आंबेडकरांवर तुमचा विश्वास आहे का ? त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा.... त्यानंतर टिव्ही 9 ने परमपुज्य भि़डे गुरुजींना धरले. कारण एबीपी माझाने मुलाखत घेतल्यानंतर सगळ्यांनी मुलाखत घेणं आणि या-ना-त्या प्रकाराने उभ्या महाराष्ट्राला ते किती प्रामाणिक आहेत याची जाणीव करुन देणं हे आता टिव्ही चॅनेलवाल्यांचे परम कर्तव्य झाले आहे. नंतर टिव्ही 9 च्या पत्रकाराने विचारले वढू ॥बु॥ येथे गोविंद गायकवाड अर्थात गोविंद महार यांच्या समाधीची नासधूस करणे योग्य होते का ? त्यावरती सर्वज्ञानी भिडे म्हणाले... कोण गोविंद गायकवाड ? कुठली समाधी ? मला फक्त संभाजी महाराज यांचीच समाधी माहिती आहे. मग दुसरा प्रश्न आला... मराठा आरक्षणा विषयी तुमचे काय मत आहे ? आपल्या समंजस व सर्वांना बरोबर घेऊन जाणा-या भिडे गुरुजींनी आपल्या स्वभावाप्रमाणे सांगितले कि, ह्या प्रश्नाचा काय संबंध. विद्यार्थ्यासारखा बसलेला पत्रकार नंतर विचारतो... तुमच्यावर दंगल भडकविण्याचा आरोप होतोय गुरुजी... त्यावरती संत भिडे म्हणाले असे आरोप तर देव देवतांवर झालेत, कृष्णावरही झालेत... नंतरचा प्रश्न मग ह्या सरकारविषयी तुमचे काय मत आहे ? तर त्यावर भिडे गुरुजी म्हणाले... नरेंद्र मोदींच्या रुपाने देवत्वांचे अंश असलेले सरकार 70 वर्षांनी आले आहे हे आपले भाग्य आहे आणि या देशाची दैववभूमी तेच करतील असा मला विश्वास आहे. पत्रकाराला रहावले नाही. त्याच्यामधला पत्रकार जागा झाला. आणि त्याने त्वरीत विचारले कोरेगाव भिमा येथे जे घडले ते ? त्यावरती संतापलेले कृष्णरुपी भिडे म्हणाले तुम्ही काहीही प्रश्न विचारता. आणि माईक तोडून ते निघून गेले. धन्य ! धन्य !! धन्य !!! त्याच्या आधी सकाळी शिवछत्रपतींचे वंशज उदयनराजे यांची भल्या पहाटे एबीपी माझाने मुलाखत घेतली. उदयनराजेंनी भलतीच माहिती महाराष्ट्रासमोर आणली. उदयनराजे म्हणाले... माझे गुरुजी भिडे गुरुजी हे पी.एच.डी. इन मॅथेमॅटीक्स आहेत, कालपर्यंत महाराष्ट्राला ते एम.एस.सी. अ‍ॅस्ट्रोफिजीक्स आहेत, असे सांगितले जात होते. त्याच्या अगोदर कुणीतरी त्यांची न्युक्लीअर फिजीक्स मध्ये डीग्री आहे असे सांगितले होते. पण, त्यांनी डिग्री कुठल्या महाविद्यालयातून घेतली याचा थांगपत्ता कुणालाही नाही. जसे ह्या दंगलीची सरकारने न्यायालयीन चौकशी होणार आहे असे सांगितले आहे. त्याप्रमाणे परमपुज्य भिडे गुरुजींच्या डिग्रीबाबत देखील सरकारने असा शोध घ्यावा असे सांगावे लागेल. पण, यामध्ये साम्य एवढेच दिसत आहे कि सगळ्यांशी नाते असलेली ही माणसे म्हणजे नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, भिडे गुरुजी यांच्या डिग्र्या शोधण्यातच भारताची पुढील 2 वर्षे वाया जातील. “चकवा देण्यात यकदम भारी लोक आहेत ही”. प्रश्न विचारणारे जणू काही आपल्यासमोर आपल्याला लहानपणी शिकवणारे शिक्षकच बसले आहेत इतक्या आदबीने प्रश्न विचारत होते. आणि आपण जर चुकलो तर आपल्याला शिक्षक ओरडतील इतके भय त्यांच्या चेह –यावर दिसत होते. ह्या तिनही मुलाखती बघितल्यानंतर एका भित्र्या इसमाला वाचविण्यासाठी सगळ्यांची कशी धावपळ सुरु आहे असेच दिसते. अचानक अख्ख्या दिवसभरात Plan केल्याप्रमाणे सकाळपासून रात्रभर भिडेच दिसत होते. जणूकाही भारतामध्ये दुसरा काही विषयच राहिलेला नाही. भिडे मूळचे कुठले ? त्यांनी केले काय ? याबद्दल आता कुणीच बोलायला तयार नाही. भिडे कुठल्या गावातून आले ? त्यांचा संघाशी काय संबंध होता ? त्यांनी संघात किती वर्ष काम केले ? ते कुठे प्रचारक होते ? याबद्दल कुणी आता अवाक्षरही बोलायला तयार नाही. जणू काही भिडेंचा आणि आपला संबंध दाखवला तर आपण Expose होऊ या भितीने आता सगळेच लांब पळत आहेत. आणि भिडे हे कसे आता या महाराष्ट्राला मिळालेला आशीर्वाद आहे हे पटवून देण्यासाठी संतश्रेष्ठ राजीव खांडेकर, लोकप्रिय उदयभाऊ निरगु़डकर आणि टिव्ही 9 चे केविलवाणे पत्रकार यांच्यात स्पर्धाच लागली होती. हेच जर दुस-या बरोबर झाले असते तर त्याचा पूर्व इतिहास, त्याचे चारीत्र्य ह्याच एबीपी माझा, टिव्ही 9, आयबीएन लोकमत या चॅनेलवाल्यांनी खरडून काढले असते. पण, महाराष्ट्राला संभ्रमात ठेऊन आपले लाडके माननीय संभाजीराव भिडे यांना वाचवता कसे येईल यासाठी काटोकाट प्रयत्न ते दिवसभर करीत होते. अर्थात त्यांना यश मिळेल याबाबत कोणालाही शंक असण्याचे कारण नाही. कारण, जे मोदी बोलतायेत... तेच भिडे बोलत आहेत. 70 वर्षात या देशाला दिले काय ? ते अजाणतेपणाने आपली निष्ठा कोणाच्या चरणी आहे हे ही सांगून टाकतात. मी बीजेपी वर कधीच टिका केलेली नाही. राष्ट्रप्रेमासाठी, हिंदुत्वासाठीच माझे जीवन आहे. आणि मी जे काही करीन ते फक्त बीजेपी साठीच, इथल्या समाजामध्ये दुफळी माजविण्यासाठीच हेच त्यांच्या प्रत्येक वाक्यातून अधोरेखीत होत होते. अरे बहुजनांनो जागे व्हा... हे जर खोट वाटत असेल तर त्यांनी दिलेल्या तिनही मुलाखती व्यवस्थितपणे बघा. मराठा आरक्षणाविषयी माझा काय संबंध... हेच म्हणणारे भिडे गुरुजी. शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल विचारल्यावर त्या प्रश्नाला बगल देऊन त्यांचे तोंडात नावही न-घेणारे भिडे गुरुजी... मोदी हा भारताने देवाला दिलेला आशीर्वाद आहे असे म्हणणारे भिडे गुरुजी... बीजेपी वर मी कधीही आयुष्यात टिका केली नाही असे म्हणणारे भिडे गुरुजी... गोविंद महाराची समाधी कुठे आहे ? कोण गोविंद महार ? असे विचारणारे भिडे गुरुजी. स्वत:ची तुलना कृष्णाशी करणारे भिडे गुरुजी. आणि कोरेगाव भिमा बद्दल विचारल्यावर चिडणारे भिडे गुरुजी... कारण, सत्य लपविणे आणि असत्य सांगणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा... कारण तुम्ही जो महाराष्ट्र घडवला जो या भिडेंनी बिघडवला... अर्थात, इतकी चर्चा करण्याएवढे ते महानही नाहीत. पण, एका वढू ॥बु.॥ ला कोरेगाव भिमा ला त्यांच्या कटकारस्थानामुळे उभा महाराष्ट्र द्वेषाच्या राजकारणाचे दाह सोसतोय. या त्यांनी केलेल्या पापाची आठवण महाराष्ट्राला अनेक वर्षे असेल. कोणिही किती ही म्हटले तरी झालेल्या जखमा भरुन यायला खुप वेळ लागेल. यात महाराष्ट्राचे झालेले अपरिमित नुकसान कधीच भरुन येणार नाही. त्यांच्या चरणी निष्ठा वाहिलेल्यांना ते कधी कळणार नाही. धन्य आहे एबीपी माझा ! धन्य आहे आयबीएन लोकमत ! आणि मात्र टिव्ही 9 ची किव येते. *Received WhatsApp
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ए
एमी Sat, 01/06/2018 - 06:42 नवीन
Like! आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. >> केवळ आणि केवळ येडा बनाके पेडा खाणे चालुय. हिंदू हिंदु करत ५ (कि ३.५) % चे अजेंडे राबवायचे. बाकीचे ९५% सगळी 'विषवल्ली' च आहे! आणि त्यांच्या हातात हे मराठ्याचे अगदी अलगद सापडतायत. मुस्लिम, दलित विरोधात यांना अगदी व्यवस्थित वापरून घेतलं जातं पण त्यांच्याच काही मागण्या आल्या (मराठा मोर्चा किंवा शेतकरी संप) कि यांचा थयथयाट बघण्यासारखा असतो. फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रचेतस Sat, 01/06/2018 - 07:08 नवीन
तुमच्याकडून समतोल विचारांची अपेक्षा असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
स
सुबोध खरे Sat, 01/06/2018 - 07:24 नवीन
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. ब्रिलियंट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अख्ख आयुष्य आणि श्री संभाजी महाराजांचं बलिदान फुकटच गेलं म्हणायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sat, 01/06/2018 - 09:02 नवीन
फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष उपयोग काय व्हायचा होता तेवढा. आता नसेल उपयोग होत तर द्या सोडून! आणि आता जे 'हिंदू'च्या नावाखाली चालुय ते सांगितलेलं का शिवाजी संभाजीनी? Whatever.... मला इतिहासात रुची नाही आणि त्याचा वर्तमानकाळात एकमेकांची टाळकी फोडायला वापर होत असेल तर तर अजिब्बातच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 09:48 नवीन
२०० वर्षांपूर्वी झालेल्या एका लढाईचा उपयोग एकमेकांची टाळ्की फोडायलाच होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 09:51 नवीन
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय.... तुमच्यापासून सुरूवात करा. नवा धर्म स्थापन करा किंवा मग गेलाबाजार शिवधर्म आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
भ
भंकस बाबा Sun, 01/07/2018 - 11:37 नवीन
केरला किरिस्ताव लगीन करायला केरलीच शोधतो, आनि वर किलो किलो सोन्यात हुंड़ा बी घेतोय , काय सुधरना जाहलि वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 09:58 नवीन
त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा.... "पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या पुस्तकात पुणेकरांचे वर्णन करताना खालील वाक्ये आहेत. "सार्वजनिक भाषणात वक्त्याने जर तिसर्‍या वाक्याला हशा मिळवला नाही तर पुणेकर तो फाऊल धरतात." त्याच धर्तीवर, "तीन मिनिटांच्या उत्तरात जर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले नाही तर निआपुवि तो फाऊल धरतात.".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 01/06/2018 - 20:18 नवीन
नुस्त आंबेडकरांचच नाव घेतल! गम्मत म्हणजे, हे तीनही महात्मे ज्या महाराजांचे पाईक, त्यांच महाराजांन भिडे गुर्जी मानतात! हे मात्र विसरायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 10:06 नवीन
महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा... महाराज परत जन्माला आले तर किती राष्ट्रवादी, खांग्रेसी आणि बिग्रेडींची शिरे धडावेगळी होतील याची कल्पनाही करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अंतरा आनंद Sat, 01/06/2018 - 11:41 नवीन
अरे बहुजनांनो जागे व्हा... हे जर खोट वाटत असेल तर त्यांनी दिलेल्या तिनही मुलाखती व्यवस्थितपणे बघा. मराठा आरक्षणाविषयी माझा काय संबंध... हेच म्हणणारे भिडे गुरुजी. शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल विचारल्यावर त्या प्रश्नाला बगल देऊन त्यांचे तोंडात नावही न-घेणारे भिडे गुरुजी... मोदी हा भारताने देवाला दिलेला आशीर्वाद आहे असे म्हणणारे भिडे गुरुजी... बीजेपी वर मी कधीही आयुष्यात टिका केली नाही असे म्हणणारे भिडे गुरुजी... गोविंद महाराची समाधी कुठे आहे ? कोण गोविंद महार ? असे विचारणारे भिडे गुरुजी. स्वत:ची तुलना कृष्णाशी करणारे भिडे गुरुजी. आणि कोरेगाव भिमा बद्दल विचारल्यावर चिडणारे भिडे गुरुजी... कारण, सत्य लपविणे आणि असत्य सांगणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. >> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 01/06/2018 - 19:59 नवीन
https://www.youtube.com/watch?v=p0gbye1SDYA !! ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 08:43 नवीन
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत. मला तर वाटलं ते यडपट पप्पूबद्दल बोलताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
आ
आनंदयात्री Sat, 01/06/2018 - 16:40 नवीन
>>हाय स्पॅरो.... बरोब्बर.... अच्छा. अभ्यास वाढवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एमी Fri, 01/05/2018 - 23:26 नवीन
http://www.bigul.co.in/bigul/2004/sec/11/febugiri0501
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/06/2018 - 07:35 नवीन
हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanam
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 10:03 नवीन
हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर "भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपयांची मदत द्यावी" अशी मागणी याच आंबेडकरांनी व मुलायमने केली होती.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/06/2018 - 10:52 नवीन
अॅमी, १. जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय.... मग नवबौद्धांना आरक्षण कशासाठी पाहिजे? २. फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष उपयोग काय व्हायचा होता तेवढा. आता नसेल उपयोग होत तर द्या सोडून! आमच्या धर्माचा आम्ही पाहिजे तसा उपयोग करू. आणि नसेल होत तर भिका नाही मागणार. धर्म असा सोडता येतो होय! धर्म म्हणजे कुठलासा चवचाल वाळवंटी पंथ नव्हे. तुमच्या तर्कटानुसार आईबाप हे उपयुक्त पशू आहेत. ३. आणि आता जे 'हिंदू'च्या नावाखाली चालुय ते सांगितलेलं का शिवाजी संभाजीनी? शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी जे काही केलं ते (त्यांचे वडील व आजोबा वगळता) त्यांच्या अगोदर ३५० वर्षांत कुणीच केलं नव्हतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/07/2018 - 17:54 नवीन
It is unfortunate that in the year 2018, India is witnessing caste clashes which, if unchecked, could blow into a major civil war. We are seeing Media and “Youth” politicians like Jignesh Mevani and Rahul Gandhi adding to the conflagration of caste politics . . . http://www.opindia.com/2018/01/battle-of-koregaon-lessons-in-unity/
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 03:33 नवीन
ढोराचं कातडं कमावून उदरनिर्वाह करणाऱ्या दलितांवर अमानुष मारहाण व हिंसेचे अत्याचार करणारे "अनचेक्ड गौरक्षक" , यांच्याविरुद्ध च्या अहिंसक लोकमोहिमेतून कायदापदवीधर-जिग्नेश चे नेतृत्व पुढे आलं.... या अश्या युवामुळे आता देशाचे तुकडे पडणार, असं मनुवादी, काहीही बरळतील.... पण अनौरस "अनचेक्ड गौरक्षक" बाबत शेपूट घालतील .... "पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... .. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष शहा, उ प्र मुख्यमंत्री आदित्यनाथ, देशातील इ अनेक बीजेपी मुख्यमंत्री खासदार प्रचारात खुद्द येऊनही, जिग्नेश निवडून आला... मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... कारण "Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/08/2018 - 06:41 नवीन
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ??? "Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Mon, 01/08/2018 - 06:43 नवीन
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ??? "Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Mon, 01/08/2018 - 06:55 नवीन
मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... उमर खलिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडीला लावून बसणारा देशद्रोहीच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 05:14 नवीन
पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? निवडणूका अजून जाहीरही झाल्या नाहीत. म्हणजे तीन महिने कुठेच गेले नाहीत. बाकी १ जानेवारीचे रणकंदन आणि जिग्नेशजींची भेट या "योगायोग" असू शकेल. द्वेषाने आपण इतके आंधळे झाले असाल असे वाटले नव्हते. असो
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 01/08/2018 - 06:53 नवीन
ते जिग्नेशचे समर्थक दिसतात. अनुयायी देखील नसतील कशावरून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद_१९८२ Mon, 01/08/2018 - 06:57 नवीन
आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? << मेंढरांना तेवढी अक्कल असती, तर महाराष्ट्रात करोडो रुपयाची सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Mon, 01/08/2018 - 09:06 नवीन
ट्रेड मार्क,
मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते ....
यालाच नक्षली पद्धत म्हणतात. हे देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. नक्षल्यांना मिळणारा ग्रामीण पाठींबा रोडावत चालल्यामुळे त्यांनी शहरी भागात दंगली माजवायला सुरू केल्या आहेत. प्रकाश आंबेडकर आणि जिग्नेश मेवाणी हे नक्षल्यांचे हस्तक आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एमी Mon, 01/08/2018 - 11:46 नवीन
ही एक जुनी बातमी मिळाली. Published on: July 9, 2017 2:05 am https://www.loksatta.com/mumbai-news/the-battle-of-bhima-koregaon-1508050//lite/ === पुण्याजवळ कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर दरवर्षीप्रमाणे अभिवादनासाठी गेलेल्या समुदायावर सोमवारी झालेल्या हल्ल्याचे पडसाद सोशल मीडियावर कसे उमटले याची ही झलक http://www.bigul.co.in/bigul/1996/sec/11/koregaon%20bheema%20incident
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा