Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.

य
यनावाला
Wed, 01/17/2018 - 16:14
🗣 79 प्रतिसाद
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।....यनावाला ............................................................................................................. भगवद्गीतेतील 4 थ्या अध्यायात पुढील दोन श्लोक आहेत : 1) श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तीं अचिरेणाधिगच्छति ॥39॥ अन्वय:- संयतेन्द्रिय: , तत्पर: , श्रद्धावान् ज्ञानं लभते । ज्ञानं लब्ध्वा (स:) अचिरेण (एव) परां शान्तिं अधिगच्छति । अर्थ : -- जितेंद्रिय आणि साधनपरायण अशा श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान मिळाल्यावर लौकरच त्या श्रद्धाळूला परम शांतीचा लाभ होतो. 2) अज्ञश्च अश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोSस्ति न परो न सुखं संशयात्मन:॥40॥ अन्वय :- अज्ञ: च अश्रद्दधान: च संशयात्मा विनश्यति । संशयात्मन: न अयं लोक: अस्ति, न पर: (लोक: अस्ति) न च सुखं (अस्ति)। अर्थ :-- श्रद्धारहित असलेला माणूस अज्ञानी आणि शंकेखोर असतो. तो नाश पावतो. ज्याच्या मनात (धर्मग्रंथातील वचनांच्या सत्यतेविषयी ) शंका येतात तो इहलोकाला तसेच परलोकालाही मुकतो. त्याला कधी सुख लाभत नाही. गीतेच्या चौथ्या अध्यायातील या दोन श्लोकांचा मथितार्थ असा की, गीतेतील वचने खरी आहेत यावर जो पूर्ण श्रद्धा ठेवतो तो ज्ञानी होतो. त्याला विनाविलंब परमशांती लाभते. जो शंकेखोर असतो तो अज्ञानी आणि अश्रद्ध होय. त्याचा नाश होतो. या वचनांच्या सत्यतेविषयी ज्याच्या मनात शंका उद्भवते त्याला ना अरत्र ना परत्र असे होते. त्याला कधीच सुख लाभत नाही. यावरून गीतेत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे, श्रद्धेचे उदात्तीकरण केले आहे हे स्पष्ट होते. गीतेतील ही वचने "श्रीभगवान् उवाच " म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून आली आहेत. म्हणून ती सत्य असलीच पाहिजेत असा समज निर्माण केला आहे. (गीतेत "धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच " असे म्हटले आहे. मात्र "श्रीकृष्ण उवाच" असे लिहिले नाही. "श्रीभगवानुवाच" असे म्हटले आहे. महाभारतात श्रीकृष्णाला श्रीभगवान असे केवळ गीतेतच म्हटले असावे. इतरत्र कुठे नसावे. हे इथे लक्षात घ्यावे.) वरील दोनांतील पहिल्या श्लोकात श्रद्धाळूला ज्ञान आणि परमशांती यांच्या लाभाची आशा दाखवली आहे. तर दुसर्‍या श्लोकात अश्रद्धाला भीती घातली आहे की त्याचा विनाश होतो. तो इहलोक आणि परलोक या दोघांनाही मुकतो. प्रत्येक धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. एकदा हे कळले की धार्मिकांची श्रद्धा उडून जाईल. मग धर्मग्रंथांना, धार्मिक कर्मकांडांना, धर्मगुरूंना आणि धर्माला कोण मानणार ? श्रद्धाळूच नसले तर मंदिरांपुढे रांगा कोण लावतील ? मग देवापुढच्या दानपेट्या तुडुंब कशा भरतील ? देवस्थानांची उत्पन्ने कोटीच्या कोटी उड्डाणे कशी घेतील ? देवाला सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू कोण वाहतील ? सोने मोठ्या प्रमाणात जमले नाही तर लंपास कसे करता येईल ? श्रद्धांचे विसर्जन झाले तर होम-हवने, अभिषेक-अनुष्ठाने, एकादष्णी-लघुरुद्र अशी निरर्थक कर्मकांडे कोण करतील ? मग पुरोहित-पुजार्‍यांना फुकाफुकी लक्षावधी रुपये कसे मिळतील ? स्वबुद्धीने विचार केला की श्रद्धा संपते. मग दहावे-अकरावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध अशी अन्त्यविधी कर्मकांडांची लांबच लांब माळ कोण कशाला करून घेतील ? म्हणून धार्मिकांची श्रद्धा दृढ राहायला हवी. ती मुळीच ढळूं देता नये. समाजसुधारक प्रबोधन करू लागले तर प्रखर विरोध करायला हवा. तात्त्विक विरोध करता आला नाही तर त्यांना धमक्या द्यायला हव्या. त्यालाही बळी पडले नाहीत तर त्यांचे खून पाडायला हवेत. पण काही करून श्रद्धा टिकवायलाच हवी. नाहीतर आपले अस्तित्वच टिकणार नाही. असे धर्ममार्तंडांना वाटणे साहजिक आहे. यासाठी धार्मिकांनी धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील वचनांविषयी शंका उपस्थित करायची नाही. संशय घ्यायचा नाही. केवळ श्रद्धा ! ती ढळू द्यायची नाही. श्रद्धेचे बळ मोठे असते. असे हितसंबंधी धूर्तांनी श्रद्धाळूंच्या मनावर सतत बिंबविले आहे. सत्य शोधनाची नावड निर्माण केली आहे. त्यामुळे ,"श्रद्धा म्हणजे अज्ञानात गुरफटून राहण्याची आवड आणि सत्यशोधनाची तीव्र नावड " अशी समर्पक व्याख्या करता येते. अर्थात श्रद्धाळूंना लुबाडण्याचे हे प्रकार गेल्या पाच-सहाशे वर्षांत ऊर्जितावस्थेला आले. तत्पूर्वी अशी लुबाडणूक नसावी. मात्र श्रद्धेच्या आधारे जनसामान्यांवर नियंत्रण ठेवलेले असे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा सर्वाधिकार जनता विनाअट मान्य करील याची दक्षता घेतलेली असे. या सत्ता अबाधित राखण्यासाठी जनसामान्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग केला होता. तर्कशुद्ध युक्तिवादाला, सुसंगत विचारसरणीला , डोक्यात उद्भवलेल्या शंका उपस्थित करण्याला धर्माच्या क्षेत्रात स्थानच नसते. तिथे अपेक्षित असते संपूर्ण शरणागती आणि असीम श्रद्धा. जो श्रद्धेचे विसर्जन करतो, गतानुगतिक होत नाही , स्वबुद्धी वापरतो, परंपरांची चिकित्सा करतो, आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरतो त्याचीच बौद्धिक प्रगती होऊ शकते. श्रद्धावंत जन्मभर अज्ञानीच राहतो. तसा सुखी असतो. कारण तो त्या अज्ञानातच सुख मानतो. "श्रद्धावान् लभते ज्ञानम्।" हे गीता वचन न पटणारे आहे. माणसाने अज्ञानी राहावे, धर्माला शरण जावे, धर्मगुरूंना पूज्य मानावे. म्हणून अशी वचने सर्व धर्मग्रंथांत असतात. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन असूच शकत नाही. श्रद्धा हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. श्रद्धाळू माणसे अज्ञानालाच ज्ञान समजतात. अतूट श्रद्धेविषयी कोणी काही म्हणो, श्रद्धेची कितीही वाखाणणी करो, गोडवे गावो, मला तर श्रद्धा ही माणसासाठी लाजिरवाणी भावना आहे असेच वाटते. श्रद्धावंत हा त्या श्रद्धाविषयाचा दास बनतो. तो श्रद्धेची चिकित्सा करूच शकत नाही. तसेच श्रद्धा ही अतिशय घातक असू शकते. निष्पाप, निरागस बालकांच्या संस्कारक्षम, संवेदनशील मेंदूत श्रद्धेचे संस्कार बिंबविणे हा मोठा अपराध आहे. बहुसंख्य माता-पिता शिक्षक हा अपराध करतात. श्रद्धा आणि भक्ती यांमुळे माणसाला मानसिक आधार मिळत असेल. मानसिक समाधान लाभत असेल. पण ते केवळ मानीव असते. श्रद्धा आणि भक्ती यांच्या योगे ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. अगदी वेदकाळापासून आपल्या पूर्वजांची सूर्यावर श्रद्धा होती. त्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्यामुळे प्रकाश मिळतो, उष्णता मिळते एवढे अनुभवाने समजत होते. ते प्रतिदिनी सूर्याला अर्घ्य देत असत. त्याची स्तुतिगीते गात असत. संध्या करताना म्हणायचा गायत्री मंत्र हा सूर्याच्या तेजाविषयी आहे. ते त्रिकाल संध्या करीत. (सकाळ-दुपार -संधाकाळ) . या श्रद्धेने, भक्तीने, स्तुतीने त्यांच्या मनाला बरे वाटत होते एवढेच. ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही. सूर्यदेवाने दिले नाही. वैज्ञानिकांनी शोधून काढले. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे हेही त्यांना श्रद्धेने समजले नाही. भूमातेचीसुद्धा ते स्तुती, भक्ती करीत. "समुद्रवसने देवि, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।" असे म्हणत. पण पृथ्वीविषयी सत्यज्ञान त्यांना झाले नाही. ते ज्ञान "संशयात्मा" असणार्‍या वैज्ञानिकांना झाले. श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होत नाही हे यावरून दिसून येते. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही. श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते. माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते. दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणूस रानटी अवस्थेत होता. गुहेत राहात होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे हे त्याच्या उपजीविकेचे मार्ग होते. त्याकाळी त्याची तर्कबुद्धी विकसित झाली नव्हती. प्राथमिक अवस्थेत होती. विचार करायला वेळच नव्हता. अन्न शोधार्थ सबंध दिवस जात होता. हींस्र श्वापदांची , साप-विंचू अशा विषारी प्राण्यांची सतत भीती होती. त्याकाळीं त्याला श्रद्धेचा आधार वाटला असेल. श्रद्धेमुळे जगणे सुसह्य झाले असेल. पण आतां गतानुगतिक श्रद्धा , धार्मिक कर्मकांडे , इत्यादि सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. परंपरेच्या नावाखाली आता त्यांना कवटाळून राहणे योग्य नाही. त्यात मानव समाजाचे हित नाही. म्हणून असल्या गोष्टींचा त्याग करायला हवा. त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे. जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे." *****************************************************************************************
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
46177 वाचन

💬 प्रतिसाद (79)
अ
अरविंद कोल्हटकर Wed, 01/17/2018 - 18:36 नवीन
यनावाला, आपल्या व्यासंगाविषयी आणि प्रखर बुद्धिवादाविषयी आदर दाखवून पुढचे लिहीत आहे. तुमचे लेखन वाचून मला अनेकदा असे वाटत आले आहे की आपल्या लेखाला सामुग्री मिळावी म्हणून तुम्ही (वेड घेऊन पेडगावला गेल्यासारखे करून) कुशंकांची भुते उभी करता आणि नंतर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा बहाणा बनवता जिथे खड्डयाची मुळातच गरज नव्हती तेथे एक खड्डा खणून नंतर तो बुजवायला तुम्ही बाहेर पडता. हे थोडेसे tilting at the windmills सारखे वाटते. तुमच्या वरील लेखातील दोन उदाहरणे घेऊन हे स्पष्ट करतो. तुमचा आक्षेप गीतेतील ’श्रद्धावॉंल्लभते ज्ञानम्’ ह्या विधानाला आहे आणि श्रद्ध कशी ज्ञानप्राप्तीला अपुरी आहे ह्याचे विवरण पुढील सर्व लेखात आहे. ग्रह सूर्याभोवती फिरतात असल्या प्रकारचे ज्ञान श्रद्धेने मिळत नाही हे तुमचे प्रमुख प्रतिपादन आहे. 'ग्रह सूर्याभोवती फिरतात असल्या प्रकारचे ज्ञान श्रद्धेने मिळत नाही' हे समजण्यासाठी इतक्या खटाटोपाची काय आवश्यकता होती? असले ज्ञान श्रद्धेने मिळते हे गीतेलाहि म्हणायचे नाही पण गीतेची तशी शिकवण आहे अशी स्वतःची सोयीस्कर समजूत करून घेऊन तुम्ही ती पवनचक्की पाडायला सरसावलेले आहात. गीता (आणि अन्य प्राचीन ग्रंथांमध्ये) जेव्हा 'ज्ञान' ही संकल्पना वापरली जाते तेव्हा संदर्भावरून लक्षात येते - यायला हवे - की ते ब्रह्मज्ञान असते. 'चूल कशी पेटवावी आणि चहा कसा करावा' असले भौतिक ज्ञान ते नसते. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः' हे ते ज्ञान असते आणि गीतेला तेच प्रतिपादन करावयाचे आहे. हेच दर्शविण्यासाठी आदिशंकराचार्यांनी गीताभाष्य हे प्रस्थानत्रयीमधील एक भाष्य लिहिले आहे. हे ज्ञान अर्थातच बुद्धिगम्य नाही, ज्याला पटेल त्याच्यासाठी ते आहे, इतरांसाठी ते नाही अशा अर्थाने ’श्रद्धावॉंल्लभते ज्ञानम्’ हे शब्द समजावून घेतले पाहिजेत. गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या वचनांना 'श्रीभगवानुवाच' ह्याचे अनाठायी वजन प्राप्त झाले आहे हा तुमचे असलेच एक विधान. तुमच्यासारख्या बुद्धिवाद्याला विचार केल्यास लगेच जाणवेल की भगवद्गीता ही काही युद्धभूमीवर जे काही झाले अथवा बोलले गेले त्याचे शब्दशः reportage नाही आहे. ही घटना घडून गेल्यानंतर काही हजार अथवा शे वर्षे गेल्यानंतर कोणीतरी - वेदव्यास अथवा कोणी अन्य अज्ञात रचयिता - ही रचना गीतेमध्ये घातली आहे. त्याला ही माहिती परंपरेने कळली होती किंवा त्याने संपूर्ण कपोलकल्पित स्वतःची रचना येथे घुसडली हेहि आजच्या घडीला आपणाला माहीत नाही. मात्र हे सहज शक्य दिसते की भारतीय युद्ध आणि गीतेची रचना ह्यांच्यातील दोन अडीच हजार वर्षांच्या काळामध्ये श्रीकृष्णाला देवत्व प्राप्त झाले होते आणि रचयित्याची श्रीकृष्णापायी अशी पूज्यबुद्धि निर्माण झाली होती. परिणामतः रचयित्याने श्रीकृष्णाचा उल्लेख 'भगवान' असा केला. ह्यात तुम्हाआम्हाला न समजण्याजोगे अथवा आक्षेपार्ह काय आहे? तरी पण त्या आक्षेपाची एक नवी पवनचक्की उभी करून तुम्ही ती पाडण्यासाठी सरसावलेले आहात. हा अव्यापारेषू व्यापार कशाला?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 01/17/2018 - 19:54 नवीन
आयला तुम्ही पण, अजून वॉशिंग्टनाची कुऱ्हाड यायचीच आहे. अवांतर हा यनावाला यांचा दोष नाही.. त्यांनी डोळ्यावर अश्रद्धेचा चष्मा लावला असण्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये श्रद्धाच दिसते.. आता वरच्या श्लोकात जितेंद्रिय नावाचा एक शब्द आहे, त्याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलंय.. प्रत्यक्षात संप्रज्ञात किंवा असंप्रतज्ञात समाधी असो, काही अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की समाधी अवस्थेमध्ये मेंदूचे काही भाग अधिक उत्तेजित होतात, आणि त्यामुळे अल्फा (बहुधा) लहरी वाढतात, म्हणजेच ते जे काही सांगितले होते तेव्हा ते अगदीच कुचकामी नव्हते, देवाच्या साक्षात्काराबद्दल माहीत नाही, पण भावातीत ध्यानाचा अभ्यास भौतिक जगात नक्कीच फायदेशीर ठरतोय आणि हा एक अभ्यासाचा विषय देखील आहे. जेव्हा अध्यात्मात श्रद्धा हा शब्द वापरला जातो तेव्हा बऱ्याच वेळेस त्याचा अर्थ विश्वास ठेऊन प्रयत्न करून प्रत्यंतर घ्या असाच असतो, फक्त मी म्हणतो म्हणून मान्य करा असे नसते, आपण अभ्यास करून प्रत्यंतर घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण मात्र श्रद्धा श्रद्धा म्हणून सरसकट सगळ्यांना झोडपात बसतो. असो, इति लेखनासीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/18/2018 - 04:12 नवीन
श्रद्धा ही यनावालांची पंचिंग बॅग आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. तुम्ही आता यनावालांना नवीन लेखाचा विषय दिलात. ज्ञान कशाला म्हणावे? बाकी आपले विवेचन पटण्यासारखे आहे. गीतेत प्रक्षिप्त भाग असू शकतो तसेच त्याचे अन्वयार्थ हे वेगवेगळ्या विद्वानांनी आपापल्या आकलनानुसार लावले असल्याने सामान्यांचा जरा जास्तच गोंधळ वाढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 07:53 नवीन
हा एक इंटरेस्टींग युट्यूब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यनावाला गुरुवार, 01/18/2018 - 16:58 नवीन
श्री. अरविंद कोल्हटकर यांचे संस्कृत भाषेचे, विशेषत: व्याकरणाचे, ज्ञान उच्चप्रतीचे आहे. लेखातील दोन श्लोक ,त्यांचा अन्वय आणि मराठी अर्थ यांत काही त्रुटी असती तर ती त्यांनी निदर्शनाला आणून दिलीच असती. पूर्ण अन्वय दिला आहे. तसेच त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थही दिला आहे. एकही शब्द अनवधानाने अथवा हेतुत: गाळलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/19/2018 - 09:29 नवीन
यनावालासाहेब, नेहमीप्रमाणेच क्वचितच एखादा प्रतिसाद देण्याचा रिवाज पाळलात आणि ते करतानाही तुम्ही चलाखीने गोलपोस्ट बदलली आहे !!! :) :) :) कोल्हटकरसाहेबांना "त्यांचे संस्कृत भाषेचे व विशेषत: व्याकरणाचे ज्ञान कसे आहे" यासंबंधीचे सर्टिफिकेट तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. हे तुम्हालाही पूर्णपणे माहित असणारच... कारण, ते तुम्हाला कळले नाही असे म्हणणे म्हणजे तुमच्या बुद्धीमत्तेचा अपमान होईल, जो मी करू इच्छित नाही ! :) मात्र, कोल्हटकरसाहेबांच्या प्रतिसादातील मूळ मुद्द्याला तुम्ही चलाखीने बगल दिलीत असे तुम्हाला वाटत असल्यास, तो तुमचा भ्रम असेल... कारण, (तसे कोणी स्पष्ट लिहिले, न लिहिले तरी) अशी चलाखी ओळखण्यात मिपाकर लै हुश्शार आहेत असा पूर्वानुभव आहे ! =)) तरीही, तुम्हाला संशयाचा फायदा देऊन, कोल्हटकरसाहेबांचा तो मूळ मुद्दा खाली परत देत आहे... तुमचे लेखन वाचून मला अनेकदा असे वाटत आले आहे की आपल्या लेखाला सामुग्री मिळावी म्हणून तुम्ही (वेड घेऊन पेडगावला गेल्यासारखे करून) कुशंकांची भुते उभी करता आणि नंतर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा बहाणा बनवता जिथे खड्डयाची मुळातच गरज नव्हती तेथे एक खड्डा खणून नंतर तो बुजवायला तुम्ही बाहेर पडता. हे थोडेसे tilting at the windmills सारखे वाटते. याबाबत तुमचे अमुल्य मत काय आहे ? मलाही तुमचे मत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ग
गामा पैलवान Wed, 01/17/2018 - 19:42 नवीन
यनावाला, श्रत् म्हणजे ऐकलेलं धा म्हणजे धारण करायची शक्ती. म्हणूनंच श्रद्धा म्हणजे ऐकलेलं धारण करायची मनाची क्षमता. इथे चिकित्सा नाकारण्याचा प्रश्नंच आला कुठे? उगीच काहीतरी विपरीत अर्थ काढीत बसू नका. श्रद्धा ठेवणे म्हणजे चिकित्सक बुद्धीस फाटा देणे नव्हे. तुम्ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञान वैज्ञानिकांनी प्राप्त करवून दिलं म्हणता. पण ही कल्पना अगोदर कोपर्निकसच्या मनांत यायला हवी. मग त्याने ती श्रद्धापूर्वक जोपासायला हवी. मग त्यातून त्याला निरीक्षणे काय करावीत हे ताडता आलं. अशी निरीक्षणे करून वा जुन्या निरीक्षणांचा आधार घेऊन त्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे गृहीतक मांडलं. मुळात श्रद्धा नसती तर गृहीतक मांडता आलं असतं का? आ.न., -गा.पै. जाताजाता : भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हाला? ज्याच्याकडे भग असतो तो भगवान. भग = यश + श्री + ऐश्वर्य + वीर्य +ज्ञान + वैराग्य या सहांचा संगम.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 01/17/2018 - 19:58 नवीन
अध्याय 6 आइका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य। हे साही गुणवर्य, वसती जेथ ॥ ३७ ॥ म्हणोनि तो भगवंतु, जो निःसंगाचा सांगातु। तो म्हणे पार्था दत्तचित्तु, होई आतां ॥ ३८ ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
राही गुरुवार, 01/18/2018 - 18:32 नवीन
श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र दिलेला दिसला. पी आय ई मूळ असलेल्या शब्दावरून क्रेडो (लॅटिन), क्रेडन्स, इन्क्रेडिबल असे शब्द आले आहेत. 'C' चा उच्चार स (श) आणि क असा भाषेच्या दोन शाखांमध्ये बदलला आहे हे अनेकांना माहीतच असेल. भगवान विष्णु , भगवान शंकर असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला ईश्वर हाच अर्थ अभिप्रेत असतो. बाकी ठीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 08:13 नवीन
श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र...
तांत्रिक दृष्ट्या विश्वास आणि श्रद्धा यात अंशतः फरक आहे, सहसा विश्वास ही श्रद्धेची पहिली पायरी असावी, एखाद्या गोष्टीवर / व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो म्हणजे श्रद्धे पर्यंत पोहोचलो आहे असे निश्चित सांगता येत नाही. श्रद्धेच्या पायरीला पोहोचलो नसेन तर परिस्थितीनुरुप विश्वास बदलू शकतात, श्रद्धा परिस्थितीनुरूप बदलणे अशक्य नाही पण अवघड असते. विश्वास शब्दाचे श्रद्धेत परिवर्तन होणासाठी निष्ष्ठा, कर्तव्य , भक्तीभाव या तीन पैकी एखादा तरी अ‍ॅट्रीब्यूट कमी अधीक प्रमाणात जरूर असावी. कर्तव्य भाव निष्ठा अथवा श्रद्धा न बदलताही बदलता येऊ शकत असावा. पण मला वाटते निष्ठा सुद्धा परिस्थिती आणि स्वभावानुरुप बदलू शकतात, पण निष्ठा बदलल्या शिवाय श्रद्धा बदलणे कठीण असावे त्यामुळे प्रबोधनकारंनी श्रद्धे विरुद्ध जोर लावण्यावर लक्ष केंद्रीत करण्या पेक्षा बदललेल्या परिस्थितीनुरुप विश्वास आणि कर्तव्य बदलांवर लक्ष केंद्रीत केल्यास त्यांच्या शक्ती आणि वेळेचा अपव्यय कमी व्हावा असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 08:15 नवीन
Difference between Believe and Faith आंतरजालीय माहिती पैकी हा लेख दुवा बरा वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
र
राही Fri, 01/19/2018 - 11:51 नवीन
तेच तर यनावाला सांगताहेत. विश्वास बदला असे तार्किकदृष्ट्या म्हणता येत नाही. कारण विश्वास हा एक भाव आहे. (शब्द भाववाचक आहे.) त्यामुळे विश्वास राखण्याची ठिकाणे बदला असे म्हणता येईल. उदा. आनंद बदला असे म्हणता येत नाही, आनंदमिळवण्याची साधने, ठिकाणे बदला असे म्हणता येते. तद्वत्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 12:20 नवीन
Difference between Believe and Faith हा दुवा वर दिला आहेच. व्यक्ती आणि समुहाचे विश्वास आणि श्रद्धा काळाच्या ओघात बदलतात. अगदी काही पिढ्यांपुर्वी पिण्याच्या पाण्याची खरेदी विक्री अयोग्य मानली जात होती लोकांचा हा विश्वास काळानुरुप बदलला. मेसाई नावाची देवी महारास्।ट्राची लोक देवता होती हे आज कुणाला सांगून खरे वाटणार नाही एवड्।ई ती देवता विस्मरणात गेली . मार्केटींगचे लोक अभ्यास करुन बिहेवीअरल चेंज करुन घेण्यात अधीक यशस्वी होतात , अ‍ॅडव्होकसी मध्ये गाजावाजा अधिक होतो किमान ती पिढी भूमिका सहसा बदलत नाही पुढच्या पिड्।ई पर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे सोशल अ‍ॅडव्होकसी पेक्षा सोशल मार्केटींग ची तंत्रे मला व्यक्तीशः अधिक प्रभावी वाटतात. How Can You Change Somebody's Opinion? हा यूट्ञू आधीच्या प्रतिसादातून शेअर केला होता त्याचा पुन्हा एकदा दुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सतिश गावडे गुरुवार, 01/18/2018 - 06:20 नवीन
श्रद्धेचे अर्थकारण हा अतिशय रोचक विषय आहे. जाहीरात क्षेत्रातील दिग्गज अंबि परमेश्वरन यांनी लिहीलेले For God's Sake हे पुस्तक वाचण्याजोगे आहे.
  • Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB गुरुवार, 01/18/2018 - 08:01 नवीन
1) या श्लोकांतिल "श्रद्धा" कोणत्या गोष्टिप्रति आहे? म्हणजे हे श्रद्धापुराण कोणत्या सन्दर्भात वापरले आहे? 2) ही देवाप्रति किंवा धर्माप्रति श्रद्धा असावी असे दिसत नाही. तर ज्ञान मिळविण्याच्या मार्गावरिल श्रद्धेसाठि हे श्लोक रचलेत अस मला वाटत. लेखकाचे मत काय? अशुद्धलेखनाबद्धल क्षमस्व
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 08:45 नवीन
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते.
इथे मुलतः म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणावयाचे आहे का ? धागा लेखक म्हणतात तसे बाय डिफॉल्ट माणूस तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) असता तर आता पर्यंत मनुष्य प्राणी कुठल्या कुठे पोहोचला असता नाही का ? तर्कसुसंगत असतातच असे नव्हे, पण तरीही श्रद्धावंतही तर्कशास्त्राचा पुरेपूर वापर करताना दिसतात
श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते.श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही.
मला वाटते श्रद्धावंतांकडे यासाठी माझ्यापेक्षा चांगली उत्तरे असावित ती त्यांनीच द्यावीत , इथे मी फक्त निर्देश करत आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 09:06 नवीन
जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे."
आपला तर्क स्विकारला जात नाही म्हणून एखाद्या व्यक्तीस अथवा समुहास आजारी ठरवणे, हा समुहलक्ष्य तर्कदोष आहे ? आस्तिकही नास्तिकांना आजारी ठरवू शकतात ? किंबहूना त्यांना सैतानग्रस्त ठरवले जातेच, आस्तिकांना त्यांच्याच अर्ग्यूमेंटने हरवण्याचा प्रयत्न , अर्ग्यूमेंट जिंकत नाही केवळ परस्पर न संपणारा संघर्ष चालू ठेवतो
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 09:09 नवीन
...त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे.
श्रद्धा आणि परंपरांच्या जे चांगल्या बाजू पहातात त्यांना त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित दिसत असेल तर आश्चर्य नाही ना ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 09:18 नवीन
केवळ वर्तमानता अथवा कालबाह्यता ऑन इटस ओन योग्यायोग्यतेचे निकष होउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 10:43 नवीन
टिका करताना सुद्धा यनावाल श्रद्धेच्या काही उजव्या बाजू कबूल करतात असे दिसते. १) श्रद्धेमुळे मनाला बरे वाटते. २) श्रद्धेने मानसिक आधार मिळतो
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/18/2018 - 10:53 नवीन
श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त एकच पहिला दोन अक्शरी आहे व दुसरा चार अक्षरी आहे अंधश्रद्धेमुळे मनाला बरे वाटते अंधश्रद्धेने मानसिक आधार मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/18/2018 - 10:55 नवीन
हे यनावालांनी एका लेखात लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 12:25 नवीन
श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त एकच पहिला दोन अक्शरी आहे व दुसरा चार अक्षरी आहे
हेच लॉजिक यनावाला आणि अंधयनावाला या दोन शब्दांना लागू पडतं का? का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 11:20 नवीन
मनाला बरे वाटते , मानसिक आधार मिळतो. ह्या वस्तूस्थिती बाकी विशेषण आणि प्रवचना पेक्षा अधिक महत्वाच्या वाटतात. विशेषणे सब्जेक्टीव्ह असतात किंवा कसे. भारतातील वैचारीक बहुविधता जपण्यास नेमके कोण कारणी भूत ठरले ? तर्क शास्त्री कि तर्कांना गुंडाळून ठेवणारे कथित अंधश्रद्ध असाही प्रश्न पडतो. आणि बहुविधते साठी मला नुकसानकारक नसलेल्या श्रद्धा अंधश्रद्धाही जोपासाव्या वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 गुरुवार, 01/18/2018 - 10:58 नवीन
प्रथेप्रमाणे आता यनावाला वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याइतकी बुद्धी मला नाही असं सोपं उत्तर देतील. ------------------------- ते अजून दोन ओळी टाईप करू शकले तर "सहमतांचे आभार" हे देखील लिहितील. -------------------------- तुम्ही लोक त्यांचे लेखन वाचून मग प्रतिसाद लिहित असाल तर आईवडीलांनी लिहायवाचायला शिकवलं ते वाया गेलं असं म्हणेन.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 11:12 नवीन
....धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. ....
जसे श्रद्धेच्या काही सकारात्मक बाजू आहेत, तसे काही मर्यादा असू शकतात . शंकेचे चिमूटभर मीठ आरोग्यकारक असते . आपापल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पाहण्यात आणि अयोग्य भाग दूर ठेवण्यात साशंकता आणि सतर्कता साहाय्यक ठरतात . अयोग्य भाग दूर केल्याने श्रद्धेस बळकटी प्राप्त होण्यास मदत होते म्हणून नास्तिकांना दंडित करण्या पेक्षा ते माझ्या शेजारी असतात ते बरे वाटते म्हणून मी तरी इतर विविध विचारांप्रमाणे यनावालां आणि यनावाला भक्तांचे विचार हि वाचत असतो.
  • Log in or register to post comments
य
यनावाला गुरुवार, 01/18/2018 - 16:53 नवीन
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे. ( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .) तो हेतू साध्य झाला हे "गीतामाहात्म्या" तील पुढील दोन ओळींवरून दिसून येते: ...."या (गीता) स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनि:सृता । ...ॐपार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम् ।
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/18/2018 - 19:36 नवीन
अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजस तुच आहेस रे यनावाला ! तु इतरंना तसं बोललस कि चालत पण इतरंनी तुला तसं म्हणलं की व्यक्तिगत टीका म्हणुन त्याचे प्रतिसाद संपादित केले जातात !! आता बघु हा प्रतिसादही संपादित होतो का ते !!
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही
." बाकी श्रध्दाळु भाविकानी भगवद्गीता स्वतः पहावी , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य ही पहावे. बरेचसे साहित्य अ‍ॅनड्रॉईड अ‍ॅप्प्स वर उपलब्ध्द आहे ! स्वःहुन अभ्यास केल्यास कोणाचाही लक्शात येईल की खुद्द अर्जुनानेच कित्येक वेळा चिकित्सा करणारे प्रश्न विचारले आहेत गीतेत. आचार्यांनी , लोकमान्यांनी चिकित्सा केलेली आहे , किंबहुना दोघेही जवळपास विरिध अर्थी निष्कर्शांप्रत पोहचले आहेत ! आचार्यांनंतरच्या इतर चार प्रमुख आचार्यांनी गीतेवर अन्वयार्थ करणारी भाष्ये लिहिली आहेत ! चिकित्सा हवीच ! मग कोणतेही क्शेत्र असो ! जशी विज्ञानात चिकित्सा अहे तशीच अध्यात्मातही आहे ! दासबोधातही कैकवेळा कल्याणास्वामींनी चिकित्सा करणारे प्रश्न विचारले आहेत ! अध्यात्मात तीन प्रकारच्या प्रचीते सांगितल्या अहेत : ग्रंथ प्रचिती , गुरु प्रचीती आणि आत्मप्रचीती ! जे ग्रंथात सांगितले आहे तेच गुरु सांगत आहेत का , आणि तेच स्वतःला नुभवता येत आहे का ही चिकित्सा केलेच पाहिजे ! त्रिविधा प्रचीतीने झालेले ज्ञानच खर्‍या अर्थाने झाले असे म्हणता येईल ! यनावालाचे धागे वंध्यामत्सरासारखे आहेत ! स्वतःला समजत नाही म्हणुन इतरांनाही समजले नाही असा खोलवर गाढ समज घेवुन ते जगत आहेत, त्यांनी स्वतः संपुरण गीता वाचली आहे का नाही ह्या विशयीच शंका अहे ! ज्या प्रमाणे वंध्या स्त्री पुत्रवती स्त्रीचा मत्सर करते तसेच काहीसे ! असो. केवळ एकांगी टिप्पण्णी करणारे , तेही अर्धवट वाचनातुन आलेले लेखन , तेही एका विशिष्ठ समुहाला बावळट ठरवणारे, संपादित होत नाही हे पाहुन हा सारा काही तरी अजेंड्याच्या भाग वाटतो .... म्हणुन इकडे न फिरकलेलेच बरे !! भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥ || पांडुरंग | पांडुरंग ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 06:59 नवीन
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
यनावालांच्या मांडणी पद्धतीत उणीवा असतील -त्या जरूर निर्दर्शनास आणाव्यात- , पण मूळ उद्देश चांगला आहे त्यामुळे खलत्वाची बाधा असल्याचा आक्षेप अवाजवी वाटतो आणि म्हणून त्यांना अगदीच दुर्जनांच्या पंगतीत बसवणे श्रेयस्कर वाटत नाही.
केवळ एकांगी टिप्पण्णी करणारे , तेही अर्धवट वाचनातुन आलेले लेखन , तेही एका विशिष्ठ समुहाला बावळट ठरवणारे, संपादित होत नाही हे पाहुन हा सारा काही तरी अजेंड्याच्या भाग वाटतो .... म्हणुन इकडे न फिरकलेलेच बरे !!
अजेंडा असेल अथवा नसेल , त्यांच्या लेखनात उणीवा असतात पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि मिपा धोरणांच्या कक्षे बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्यांचे लेखन संपादीत करण्याची अपेक्षा रास्त नसावी. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा सभ्यता बाळगून कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य आणि प्रतिवाद इतर अनेक जण करतच आहेत . आपल्या उपरोक्त विचारातून केवळ यनावालांच्या लेखना बद्दल साशंकता व्यक्त होत नाही , इतर सश्रद्ध जे त्यांचा मुद्देसूद प्रतिवाद करताहेत तो यशस्वी होत असल्या बद्दल आपण अविश्वास दाखवल्या सारखे होते किंवा कसे.
तुच आहेस रे ...! तु .... तसं बोललस .....तुला
आपली अध्यात्मावर श्रद्धा असेल आणि आपल्या मनाचा समतोल बिघडत असेल तर त्याने आपण प्राप्त अध्यात्म शिक्षणास अपुरे पणा येतो आणि अध्यात्मा चे अप्रत्यक्ष अपयश सिद्ध होते. त्यामुळे आदरार्थी बहुवचनांचा वापर टाळून एकेरीवर येणे आणि पुढे प्रतिसाद संपादित होतो का पाहू म्हणणे हे अहंकारा कडे नेणारे नाही ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 08:42 नवीन
पण मूळ उद्देश चांगला आहे
दुसरे महायुद्ध करण्यात, ज्यू मारण्यात हिटलरचा मूळ उद्देश चांगलाच होता. बिचार्‍याने पलंगावर लोळत, जनानखाने भरत, चेस खेळत अवधच्या नवाबांसारखे जीवन कुठे जगला? ---------------- मूर्ख लोकांना आपले उद्देश चांगलेच वाटतात. असे असले तरी त्यांना जगाच्या भाषेत त्यांची लायकी सांगणे आवश्यक असते. -------------- मागच्या ३-४ धाग्यांवर या माणसाला मी अतिशय प्रेमळ* शब्दांत साधे प्रश्न विचारलेले. याला साधी द्रखल घ्यावीशी वाटली नाही. -------------------- मी स्वतः श्रद्धावान आहे, माझी बायको आहे, आई वडील आहेत, अनेक मित्र नि स्नेही आहेत. या माणसाने कोणताही अपवाद न ठेवता सरसकट सर्व श्रद्धावान निर्बुद्ध, डोके नसले, डोके सडलेले, नॉन्सेन्स, इ इ असतात असे म्हटले. --------------------------- आत्ता इथे जे संवादाची मर्यादा लोकांना शिकवत आहेत, त्यांनी तिथे अगोदर त्या विशेषणांवर आपत्ती घ्यायला पाहिजे होती. असा अचानक एका बाजूचा पुळका टिपिकल पुरोगामी दांभिकता आहे. -------------------------------- एकेरी बोलणं हे "तुझा मेंदू निष्क्रिय आहे" यापेक्षा फार सन्मान्य आहे. यनावाला अर्धेरी वा पावेरी बोलायच्या पात्रतेचे आहेत का प्रश्न आहे. ----------------- मी सध्याला सर्वसाधारणपणे उजव्या बाजूचा विचार करतो. इथे अनेक लोक कडवट डावे आहेत. पण शेवटी ते संवाद करतात. बाजू मांडतात. दखल घेतात. यनावाला हा एकमेव आयडि अत्यंत विक्षिप्त वागतो. अर्थात तो हे सगळं संस्थळाच्या मर्यादांतच करतो, पण संस्थळाच्या मर्यादा हेच सगळं का? स्वतःच्याही काही मर्यादा हव्यात ना?आणि कोल्हटकर बोलले मंजे मला आलेली चीड एवढी अस्थानी नाही. आमच्या जालीय लहानपणापासूनचा अनुभव आहे कि ते विपरित भूमिका आरामात ऐकून घेतात. इथे त्यांनी हेत्वारोप केला आहे हे लक्षणीय आहे. ----------- आणि हाईट मंजे यनावालांनी त्यांना पण मुद्द्याचं काही उत्तर दिलेलं नाही. =================== * पहिल्या २-३ मधे तरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 09:06 नवीन
.....असा अचानक एका बाजूचा पुळका .... ????
आपण माझे सगळे प्रतिसाद नक्की वाचले आहेत का ? मी तर माझी सुरवात यनावालांच्या मांडणीच्या मर्यादा दाखवतच केली आहे आणि त्यांच्या विशेषण वापरावर आधी त्यांचे लक्ष वेधले आहे. आणि नंतर सश्रद्धांना त्यांच्या अध्यात्माची आठवण दिली आहे. त्यामुळे माझ्या लेखनात एकाच बाजूचा पुळका असल्या बद्दल आपल्या साशंकते बाबत आश्चर्य वाटते. एवढेच नाही माझे काही धागे श्रद्धावंतांच्या बाजूने काही पुरोगाम्यांची बाजू समजून घेणारे असतात. त्यामुळे कोणत्याही एका बाजूने एका बाजूचा पुळका असा आक्षेप विस्मयाचा वाटतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 09:39 नवीन
तुम्हाला उद्देशून नाहीत सर्व वाक्ये वा फ्रेजेस. तुमची भूमिका योग्य आहे, आपापल्या ठिकाणि योग्य आहे, भाषा सयंत आहे. ज्याला अप्लिकेबल आहेच त्यालाच ते उद्दिशिलेलं अभिप्रेत आहे. उतार्‍याच्या संपूर्णतेसाठी ते एकत्र लिहिलं आहे. ==================== त्यांच्या मागच्या ५-६ धाग्यांवर "यनावाला तुम्ही लिहित रहा. असल्या लोकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका" असं म्हणणारी एक पुळका लॉबी तयार झाली आहे. या लॉबी मुळे हा मनुष्य "सहमतांचे आभार" मानत धाग्यांचे रतीब टाकत आहे. यामुळं पुरोगामी या टायटलखाली चित्रविचित्र विक्षिप्तपणा खपवून दिला जात आहे. उदा. श्रद्धा न बाळगणं, देव/धर्म न मानणं हे तुमचं संवैधानिक कर्तव्य आहे. आपलं मिसळपाव अशा विचित्र गोष्टी पसरवण्यासाठी नाही. म्हणून पुळका लॉबीला लागू असलेली काही वाक्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
र
राही Fri, 01/19/2018 - 12:18 नवीन
काय हरकत आहे? यनावालांची बाजू घेण्यास काय हरकत आहे? त्यात एव्हढे वाईट वाटण्यासारखे (राग येण्यासाराखे) काय आहे? पुळका या शब्दाला सध्याच्या मराठीमध्ये भौतिक हितसंबंधांतून घेतली गेलेली बाजू असा काहीसा अर्थ माझ्या समजुतीप्रमाणे प्राप्त झाला आहे. तेव्हा यनांची बाजू घेण्यात तसे काही इंटरेस्ट्स नाहीत, निव्वळ वैचारिक सहमती आहे इतकेच. आणि कोणीही त्यांची बाजू घेतली नसती तरी ते लेख लिहीतच राहिले असते हे आपल्या ध्यानात आले नाही काय? रतीबच म्हणायचे तर अनेक जण प्रतिसादांचे रतीब टाकतच असतात. कुणावर व्यक्तिगत हल्ले होत नाहीत, आक्रस्ताळेपणा होत नाही आणि असंसदीय शब्द वापरले जात नाहीत तोवर ठीकच आहे की. शिवाय इथे फारच थोडे जण त्यांच्या बाजूने लिहित असतात. इतक्या थोड्या सपोर्टर्समुळे त्यांना बळ येते किंवा येईल असे वाटत नाही. हां, आता त्यांना एकही सपोर्टर मिळू नये अशी तुमची इच्छा असू शकते. ती तुमची इच्छा. त्याला नाइलाज. आणि मिसळपाव हे नुसतं 'आपलं' नाही, तर 'आपल्या सर्वांचं' आहे. एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते. पण 'तुम्ही लिहीत राहा' असे मीच मागील एका लेखात लिहिले होते. तेव्हा रोख माझ्याकडे आहे असे रास्तरीत्या समजून प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 13:02 नवीन
राही, यनावालांची वा कोणाचीही बाजू घ्यायला माझं काही म्हणणं नाही. पण "जे लोक तुमचे विरोधक आहेत त्यांना इग्नोरून आपले जिवितकार्य असेच चालू द्या" असे (मंजे अशा अर्थाचे) प्रतिसाद होते मागच्या ३-४ धाग्यांवर. आमची काय वैयक्तिक दुश्मनी आहे का त्यांचेशी? तुमची वैचारिक सहमती तसा काहींचा वैचारिक विरोध! (स्वतः मी तर विरोध पण करत नाही. फक्त प्रश्न विचारतो. निट उत्तर दिलं तर आमचीही सहमती होते. (बरेच विरोधक वाकड्यात जातात. नीट भाषा वापरत नाहीत. अनेक जण अशांना इग्नोरतात. यनावाला ग्रॉसली "असहमतांना" इग्नोरतात. प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. मागच्या धाग्यावर त्यांनी कोणाकोणाचे आभार मानले ते पहा.)). =============================== राही, मी अधिकारांबद्दल बोलत नाहीये. यनावाला कोणाला उत्तर द्यायला बांधिल नाहीत वा कोणी कोणाची बाजू घ्यावी यावर कोणाची बंधनं नाहीत. प्रश्न औचित्याचा आहे. केवळ मांडलेले विचार पुरोगामी आहेत इज नॉट रिजन इनफ फॉर जस्टिफिकेशन.
शिवाय इथे फारच थोडे जण त्यांच्या बाजूने लिहित असतात.
मागच्या ३-४ धाग्यांवर एकदम विपरित अनुभव आहे. त्यांचं इतकं मोराल बुस्टिंग झालंय कि आता ते कितीही धागे पाडू शकतात. या धाग्यावर सीन पलटला आहे हे मान्य.
एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते. पण 'तुम्ही लिहीत राहा' असे मीच मागील एका लेखात लिहिले होते. तेव्हा रोख माझ्याकडे आहे असे रास्तरीत्या समजून प्रतिसाद दिला आहे.
रोख तुमच्यावर तर आहेच पण मूलतः अनेक अन्य मान्यवर आहेत त्यांच्यावर जास्त आहे. लिहित रहा म्हणणं वेगळं, पण "यांना इग्नोरुन" आपला रथ दौडावत राहा असं सुस्पष्ट म्हणणारे माझं खरं लक्ष्य आहे. त्यात गोची अशी आहे कि उत्तरे द्याच असं मी म्हणू शकत नाही, मला उत्तरे द्याच असं म्हणू शकत नाही. त्यामुळे यनावाला फार शहाणे आणि आम्ही अदखलपात्र मूर्ख असा सीन झाला होता. म्हटलं आपण खरोखरच मूर्ख असू, वा आपले मुद्दे अस्थानी असतील, वा त्यांच्या क्षेत्रातले नसतील वा आपली भाषा फार उसकावणारी असेल, तेव्हा जे संयमित/ सयंत भाषेत प्रतिवाद इ करताहेत त्यांना लिहा म्हटलं, तर ते ही नाही. असं १-२ धाग्यावर झाल्यावर मला असं जाणवलं कि पुळका लॉबीचा समाचार घेणं आवश्यक आहे. =================== त्यांनी कितीही रॅडिकल विचार मांडावेत, कितिही टिका करावी. मात्र माझ्यासारख्या निष्पाप, निरागस, सच्च्या, इ इ "श्रद्धावंत लोकांचा" थेट अपमान करू नये. केला तर किमान आमची लायकी तीच कशी होती हे नीट समजावून सांगावे. बुद्धाप्रमाणे गप्प बसू नये.
एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते.
तुमचं ओरियंटेशन काही का असेना, तुम्ही जब्बाबदार सदस्य म्हणून इच्छा नसताना देखील मला लिहिलंत. तेच यनावालांनी करावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 01/19/2018 - 13:33 नवीन
विरोधाला तोंड देऊन, नच जमल्यास दुर्लक्ष्य करून आपल्या (विवेकाने ठरवलेल्या) ईप्सिताकडे जावे हेच तर जीवनाचे साध्य असते ना? शिवाय अगदी'इग्नोअर' असेच काही नाही, 'एन्ड्युअर' सुद्धा असते. 'If you can not resist then endure' हे तर सुप्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/19/2018 - 20:07 नवीन
नमस्कार माहीतगार ! आपण चिकित्सा करीत आहात म्हणुन प्रतिसाद देत आहे, इरव्ही यनाच्या धाग्तावर वेळ घाल्वण्यात अर्थ नस्तो हे फार पुर्वीच लक्शात आले आहे !
पण मूळ उद्देश चांगला आहे
चांगला उद्देश ? आर यु किडिंग मी ? यनाच्या लेखांचा एकमेव उद्देश म्हणजे इतरंवर टीका करणे बस्स !! ते ही स्वतःच्या अर्धवट अभ्यासातुन आलेल्या अर्धवट समजाच्या आधारावर !! यना अभ्यासपुर्वक चिकित्सा करत असते तर भारीच वाटले असते ! पण मुळ उद्देशच इतरांवर टीका करणे हा असल्याने अभ्यास नसला तरी चालते , नुसत हेका पुरेसा असतो ! हे आधीही कैकवेळा लक्शात आल्याने त्यांच्या लेखनावर बोलणेच बंद केले आहे ! इथेहे बोलणार नव्हतो पण आधी संपादकांनी वैयक्तिक टीका म्हणुन माझे प्रतिसाद संपादित केले होते , आज खुद्द महामहीम यना च च इतरांना असंजस असमजुतदार अन काय काय अशी विशेशणे वापरत असल्याने प्रतिसाद द्याय्चहा मोह आवरला नाही ! यना ला म्हणावं उगाचच अर्धवट संदर्भ देण्या आधी गीता नीट वाचुन ये , तुझे मुद्दे नीट संदर्भासकट मांड , मग पुढे बोलु !
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
परत तेच ते ! हा मुद्दा आधी कैकवेळा चर्चिला गेला अहे , यना ला कोणी सक्ती केली आहे का सश्रध्द होण्याची ? व्हायचे असल्यास हो , नसेल व्हायचे नको होवु ! आम्हाल काय फरक पडतो ! आता अम्ही कैकदा मंदिरात जातो तेव्हा आमचे नास्तिक मित्र बाहेर उभे नास्तिक, राहु दे बापडे , आम्ही त्यांना अग्रहाने ओढुन मंदिरात नेणार नाही , आणि मंदिरात जातो म्हणुन ते आम्हाल हिणवत नाहीत ! ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात ! उगाचच मंदिरात जातो म्हणुन ते हिणवायला लागले तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाहीत त्याल आतातायी पणा म्हणतात ! आम्ही मटणभाकरी फॅन आहोत , पण आम्चहे मित्र शुध्द शाकाहारी आहेत ! आम्ही त्यांना हिणवत नाही अन ते आम्हाल हिणव्त नाहीत ! ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात ! एकदा जोरदार वाद विवाद झाल्यावर ते शाकाहारी मित्र म्हणाले की असेलही शरीराला प्रोटीनची गरज पण मी नॉनव्हेज खाणार नाही म्हणजे नाहीच ! त्यानंतर त्यांना कोणी परत नॉनव्हेज चे महत्व पटवुन द्यायचा प्रयत्नही केलेला आठवत नाही. ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्रय म्हणतात !
आदरार्थी बहुवचन
आदर नसेलच तर खोटा आदर का दाखवावा ?
पुढे प्रतिसाद संपादित होतो का पाहू म्हणणे हे अहंकारा कडे नेणारे नाही ना ?
प्रतिसाद संपादित होत नाहीये हे पाहुन आश्चर्यच वाटले ! अजुनही वाटतच आहे ! मधे तर सगळा सावळा गोंधळच चालु होता , यना ने यावे टपली मारुन जावे असे चालले होते , अन यना ला टपली मारली की प्रतिसाद संपादित ! ह्या असल्या वन साईडेड गेम ला काय अर्थय ? ! मिपा पुर्वपदावर आले असेल तर परत अ‍ॅक्टीव्ह व्हायला हवे :) असो. सोडा ! यना वर वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही ! ह्या निमित्ताने आठवले काही अभंग टाईप करतो आणि ईथुन काढता पाय घेतो ! आपण आपला अभ्यास करु ! उध्दरेत आत्मना आत्मानम ! बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥ आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही || रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न | तोंडासी कारण चवी नाही | तुका म्हणे शुध्द नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे || छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥ तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 01/20/2018 - 07:13 नवीन
नमस्कार, प्राजंळपणे सांगायचे तर पहिल्या वाचनात आपला प्रतिसाद आवडला. सोबतच प्रसंगी मीही आपल्या किंवा इतर कुणी सर्वसाधारण प्रमाणे व्यक्त होतो तसा व्यक्त होतो तेव्हा मला इतर कुणाला काही सांगण्याचा नैतिक अधिकार पोहचतो का असा प्रश्न हि पडून गेला . पण मग आपणच एकमेकांना सावरण्यास मदत करणार नाही तर कोण करणार , नाही का ?
आदर नसेलच तर खोटा आदर का दाखवावा ?
आपला हा दृष्टिकोन प्रथम दर्शनी पटतो. पण पब्लिक डिस्कोर्स मध्ये काही अडचणी येतात. पहिले व्यक्ती/ समूह आणि विचार किंवा वागणे या दोनची गल्लत होता राहाते . आदर व्यक्तीस दाखवायचा असतो विचार किंवा कृतीला नव्हे . युद्धात अर्जुन भीष्म किंवा द्रोणाचार्यास नमस्कार करतो नंतर युद्धही करतो . समोरच्या व्यक्तीनेही गल्लत केली असेल तर तसेच प्रत्युत्तर देण्याचा मोह होतो - इथे दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात समोरचा घसरला म्हणून आपणही घसरण्यात शहाणपण नसते (-हे सांगणे सोपे तेवढे मलाही वळणे अवघड हे मान्यच- पण मुख्य मुद्दा एकूण चर्चा रुळावरून घसरल्याने प्रतिपक्षाचा मूळ मुद्दा खोडण्याचे राहून जाते. ) उलटपक्षी आपण ना घसरता समोरचा घसरला हे दाखवून देण्याने पॉइंट अधिक व्यवस्थित स्कोअर होतो. दुसरे एकेरी उल्लेखाने आपल्याही नकळत एका पाठोपाठ अपशब्दांचा लांबण वाढण्याची शक्यता असते ती आदरार्थी बहुवचनाने टळते . प्रतिपक्षातील व्यक्तीत आपल्याला अद्याप माहीत नसलेले काही चांगले गूण असू शकतात असा विचार केला कि आदरार्थी बहू वचन वापरण्यात आपले मन अडथळा आणत नाही. ज्या गोष्टी पटल्या नाही त्यावर टीका करण्यास आपण मुक्त असतोच . यनांच्या सर्व चुका मान्य केल्या तरी त्यांना (दुर्जनतेची व्याख्या सब्जेक्टिव्ह आहे हे मान्य करूनही ) दुर्जनांच्या पंक्तीत कितपत बसवता येते या बद्दल साशंकता अद्यापही वाटते . मांडणी पद्धती आणि दुराग्रह वर आधीच्या धाग्यातील प्रतिसादातून मीही वेळोवेळी टीका केली आहेच नाही असे नाही . पण समाजातील अहितकारक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात प्रबोधन व्हावे या मूळ हेतुत काही गैर नाही . म्हणून मूळ उद्देश चांगला आहे असे म्हटले आहे. प्रतिपक्षां च्या स्ट्रेंथ आपण आपल्याकडे करून घेतल्या कि प्रति पक्षाचे एडव्हान्टेज कमी होते हे इथे लक्षात घ्यावे . यना ने यावे टपली मारुन जावे असे चालले होते असे काही होत नाही, त्यांच्या लेखनाने असुरक्षित वाटण्यासारखे काही नसावे . मिपावर आणि मिपा बाहेर बहुमत श्रद्धावंतांचे आहे. सोशल एडव्होकसी आणि सोशल मार्केटिंग मधला फरक मी या धागा चर्चेत इतरत्र दिला आहे . यना सोशल एडव्होकसी वाले आहेत, सोशल एडव्होकसीवाल्यांचा गाजावाजा असतो तेवढा प्रभाव पडत नसतो. यनांनी किती हातपाय मारले तरी आणि नजीकाच्य काळात काय मोठा फरक ते पाडू शकणार नाहीत श्रद्धासोबत माणसाच्या निष्ठा जोडलेल्या असतात आणि निष्ठा बदलून घेणे हातचा खेळ नसतो, सर्वसाधारणपणे निष्ठा बदलण्या पूर्वी लोक फार गोष्टी तपासतात त्यामुळेच यनांच्या लेखावर सगळे मिळून एवढा किस पाडतात. संत तुकारामांच्या बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही || रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न | तोंडासी कारण चवी नाही | तुका म्हणे शुध्द नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे || या ओळी आवडल्या अर्थात नेमके काय लटिकें आहे हा केस टू केस अभ्यासाचा विषय आहे. छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ हे ठीक आहे -पण छळ असेल तरच सर्वच टीका छळ असतात असेही म्हणता येत नाही. कुणाच्या मतीला भ्रष्ट म्हणण्यासही अभ्यासूनी तेवढी हरकत नसावी . संत महोदयाबद्दल आदर करूनही “नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥” हे मात्र पटले नाही. एखाद्या वक्तीस हरिकथा न आवडण्याचे खापर त्याच्या मातेच्या सेक्स्च्युअल चॉईस वर का फोडावे ? स्त्री पुरुषांच्या सेक्स्च्युअल चॉईस वरुन तसेही का हिणवावे ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयक आपल्या मतां बद्दल अगदीच छिद्रान्वेषण केल्यास अंशतः: काही वेगळे मत देता येऊ शकेल पण हा धागा मुळात त्या बद्दल नाही, तरीही छिद्रान्वेषण सोडल्यास बहुतांशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दलच्या आपल्या मताचा आदर वाटला. मनमोकळ्या चर्चेसाठी आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
राही Fri, 01/19/2018 - 08:07 नवीन
प्रतिसाद आवडला नाही. सुरुवातीच्या एकेरी संबोधनातून जो तुच्छतेचा टोन दिसतोय तोही आवडला नाही. अर्थात खुद्द यनावालांना काहीच फरक पडणार नाही म्हणा. त्यांना सवय आहे. इथे या अशा तर्‍हेच्या (विज्ञान-अध्यात्म-श्रद्धा वगैरेवर चर्चा असणार्‍या) धाग्यांवर प्रतिसाद देणार्‍या बहुतेकांना गीता, ज्ञानेश्वरी, गीतारहस्य वगैरे माहीत असते आणि बहुतेकांनी ते वाचलेलेही असते. आणि या लेखातील प्रतिपादनाच्या विरुद्ध मते असणारे श्रद्धाळू तर हे सर्व वाचीतच असणार असा अंदाज. तेव्हा हे सर्व वाचा असे या धाग्यावरील श्रद्धाळू आणि अश्रद्धाळू या दोघांनाही सांगणे म्हणजे 'वृथा दीपो दिवाsपि च' असे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 09:04 नवीन
राही, संवाद करायचा अधिकार फक्त सर्वपठित लोकांनाचा आहे का? आम्ही ज्ञानेश्वरी वाचली नसली तरी पसायदान वाचलं आहे, त्यांचे अभंग आणि गाणि ऐकलीत, स्टोर्‍या ऐकल्यात आणि एवढं मोप झालं. इथे श्रद्धेच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या यनावालांना विज्ञानाचं व देखील माहित नाही. ----------------------- मिसळपाव वाचकांच्या आवडत्या विषयांवरील चर्च्चांसाठी आहे. सहमतांचे आभार नि चिकित्सकांच्या बुद्धीची हेटाळणी करायची जागा नाही. मिसळपाव मी असं पाहिलं आहे लेखकाच्या निष्ठांची, अभ्यासाची, बुद्धीची, लॉजिकची, व्याकरणाची, आशयाची, इ इ प्रतिसादक व्यवस्थित, कडक हजेरी घेतात, मजा उडवतात. मग या यनावालाचा फार बाऊ करण्यात अर्थ नाही. हा पुरोगामी मते मांडतो पण आहे टोटली गंडलेला (जिवन मोहिते कथा वा मोकलाया टाइप). ------------------------- हा मनुष्य वाईट दर्जाची वैयक्तिक टिका करतो म्हणून फार सन्मानाच्या पात्र वाटत नाही. फक्त भूमिका पुरोगामी आहे म्हणून आपण त्याच्या बाजूने उतरू नकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 09:25 नवीन
तु इतरंना तसं बोललस कि चालत पण इतरंनी तुला तसं म्हणलं की व्यक्तिगत टीका म्हणुन त्याचे प्रतिसाद संपादित केले जातात !!
एकतर सर्वच एकेरी संबोधने असावीत वा सर्वच सन्मानजनक असावीत. फक्त काही सदस्यांना एकेरी संबोधू नये असं का? निर्बुद्धपणे पुरोगामी भूमिका मांडली तर माणूस सन्मान्य थोडाच होतो? ======================= लक्षात घ्या, कि अनुभवाने मी या धाग्यावर विषयावर काही बोलतच नाहीये. कारण त्याचा काही फायदाच नाही. कोल्हटकरांनी विषयाला धरून प्रश्न केलेले आहेत, अर्थ काढलेत, प्रतिसाद दिला, मुद्दे काढले. उत्तर काय - मी म्हणतो ते बरोबर आहे. अरे, याला काही अर्थ? ============================ पुरोगामी लोकांना बुद्धिमंत मानायची प्रथा असली तरी ते बर्‍यापैकी बिनडोक असतात असा माझा अनुभव आहे. अर्थातच हा बिनडोकपणा ९९% वेळेस हार्मलेस असतो, शुद्ध भावनेने असतो आणि काही काही लोकांना तो क्यूटपणे* शोभतो. पण यांच्या केसमधे हार्मलेस शब्द लागू नाही कारण हे श्रद्धावान लोकांचा अपमान करत असतात. वास्तविक यांनी प्रबोधन करून आम्हाला अश्रद्ध बनवले तर हरकत नाही. पण आज आम्ही ज्या प्रकारचे लोक त्यांचा आज अपमान करणे मंजे आमचाच अपमान आहे. ------------------------- * काही व्यक्ति रागावल्यावर अधिक चांगल्या दिसतात, इ तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 12:17 नवीन
चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे.
हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही त्या लेखकाच्या मनात काय होतं हे इतकं खात्रीपूर्वक कसं सांगू शकता? ======================== आता आम्ही जेव्हा फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, पुस्तके, पेपर, इंटरनेट, इ इ वाचतो तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला असे आईन्स्टाईनने सांगीतले आहे म्हणून काही भंकस आणि भिकार वाक्ये सांगीतली जातात. https://www.brainyquote.com/authors/albert_einstein यातली अनेक अत्यंत मेडिऑकर आणि भिकारचोट आहेतच, पण सांगणारास आईंस्टाननं सांगीतलंय, चिकित्सा करू नका असं अभिप्रेत होतं हे मला तुमच्यासारख्या खात्रीनं म्हणता येणार नाही. ========================= तुमच्या वाक्यांची आम्ही इतकी चिकित्सा करतो तेव्हा तुम्ही आमची चिकित्सा हेतुपुरस्सर आहे इ इ मानता. अर्थात यानं तुमचा चष्मा (शब्दसौजन्य - अंतरा आनंद) कसला आहे हे स्पष्ट कळतं. ============================= आपण स्वतः चिकित्सेच्या पलिकडचे आहात असा अनुभव आहे. पण आपल्यासारखे विचार "थेट" कोणी आपणावू नयेत म्हणून हा विरोधाचा शब्दप्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला गुरुवार, 01/18/2018 - 17:08 नवीन
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे. ( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .) तो हेतू साध्य झाला हे "गीतामाहात्म्या" तील पुढील दोन ओळींवरून दिसून येते: ...."या (गीता) स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनि:सृता । ...ॐपार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम् ।
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 18:05 नवीन
( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .)
कुणालाही अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे ठरवण्याची घाई का असावी ( तसे गा. पै . नी नुसता प्रश्न केला नाही त्यांना पटणारा तर्क त्यांनी दिला आहे त्याचे खंडन करण्याची जबाबदारी यनावालाजी आपली बनते.) त्या एवजी आपण अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे या शेलक्या विशेषणांचा आधार घेऊन आपण व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाचा आधार घेत आहात. याच तर्क दोषांचा आधार घेऊन सश्रद्ध नास्तिकांना अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे अशीच शेलकी विशेषणे वापरत असतातच . त्यांच्यात आणि तुमच्यात मग फरक तो काय राहीला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
र
राही Fri, 01/19/2018 - 10:22 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 01/18/2018 - 17:54 नवीन
इतके टोकाचे अश्रद्ध असूनही तुम्ही गीता आणि इतर ग्रंथ वाचून वेळ वाया घालवत आहात. जाताजाता हे मात्र नमूद करू इच्छितो की कुठल्याही पुस्तकाचे आकलन हे वाचणाऱ्याच्या बुद्धीवर, ज्ञानावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. एकच पुस्तक वेगवेगळ्या वेळी वाचले तर त्यातला अर्थ/ विचार यांचे वेगळे आकलन होते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/18/2018 - 21:57 नवीन
यनावाला,
इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .
छे छे! हा प्रश्न मी विचारला तो भगवान या शब्दाची चिकित्सा तुम्ही केलीये का हे विचारण्याच्या हेतूने. तुम्ही ती केलेली दिसंत नाही. पण काही हरकत नाही. पूर्वी काही जणांनी केलीये. विष्णुपुराणानुमते भगवान म्हणजे यश + श्री + ऐश्वर्य + वीर्य +ज्ञान + वैराग्य या सहांचा संगम. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/19/2018 - 02:12 नवीन
ते सगळे ठीक आहे हो यनावाला.. पण गीतेचा प्रमुख विवेचनविषय असलेला योग्य, अर्थात भावातीत ध्यानाच्या भौतिक फायद्याबद्दल आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/19/2018 - 08:24 नवीन
यनावालांचा मार्ग शाम मानव/श्रीराम लागूंप्रमाणे आहे (श्रद्धेवर थेट प्रहार करणारा), त्यांनी दाभोलकरांसारखा मध्यममार्ग स्वीकारला तर त्यांचे समर्थन करणारे जास्त सदस्य येथे दिसावेत. मिपावर मात्र सश्रद्ध आस्तिक खूपच जास्त संख्येने असल्याने यनावाल्यांच्या कडव्या विचारांना त्यापेक्षाही अधिक कडवा प्रतिवाद होताना दिसतोय. ह्या धाग्यावरील अरविंद कोल्हटकर, माहितगार, राही ह्यांचे संतुलित प्रतिसाद अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 08:55 नवीन
श्रीराम लागू , श्याम मानव (लागूंना वृत्तमाध्यमातून तर श्याम मानवांना महाविद्यालयत प्रत्यक्ष बोलताना पाहिले आहे) आणि यनावाला (इथे मिपावर ) दाभोळकरां ची प्रसिद्धी वृत्तमाध्यमांमुळे माहिती झाली पण बाकी त्यांच्या साहित्य आणि भाषणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा फारसा योग आला नाही. या तिघांमध्ये श्रीराम लागू आपल्याच घरातला एखादा व्यक्ती कुटूंब सदस्य 'मी इश्वराला मानत नाही ' असे निक्षून सांगतो तसा अनुभव येतो. आपण घरातल्या / परिचयातल्या नास्तिकांना विनासायास सामावून घेत असतो. यनावाला टाईप नास्तिक्यापेक्षा आपल्या आचरणातून श्रद्धा अभ्यासावयास लावणार्‍या आपल्या ओळखीच्या व्यक्ती जास्त इफेक्टीव असाव्यात असे वाटते. या चर्चेवरुन माझे एक शिक्षक आठवले. भानामतीवर विश्वास असलेल्या काळात हे शिक्षक महोदय सकाळी प्रभात फेरीस निघत वापस येताना, भानामतीसाठी रस्त्यावर जागोजागी पसरलेले नारळ लिंबू मिरची ( रस्ता स्वच्छ करुन ठेवलेले असत) हे शिक्षक महोदय वेचून आणून घरी छानशी चटणी करत असा त्यांचा वर्षोंवर्षांचा नित्य क्रम त्यांचे विद्यार्थी जवळून पहात ऐकत आणि अंधश्रद्धा निर्मूलन विषयक वेगळे लेक्चर देण्याची गरज रहात्त नसे. श्याम मानवांच्या कार्यक्रमांना नेमक्या अंधश्रद्धा , विज्ञानाच्या प्रयोगशाळेत प्रयोग केल्या प्रमाणे विशीष्ट प्रयोग करुन कशा चुकीच्या आहेत हे दाखवणार्‍या प्रयोगांची जोड होती. का कोणजाणे , यनावाला अश्रद्धांच्या वेगळ्या कँपात बसून वैचारीक वार करतात ज्यात केवळ वैचारीक पोलरायझेशन होते जो तो आपापल्या विचारांना अधिक चिटकतो असे वाटत रहाते हे माझे व्यक्तीगत मत इतराम्चें वेगळे असू शकते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
य
यनावाला Fri, 01/19/2018 - 09:19 नवीन
राही लिहितात,
"श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र दिलेला दिसला."
नेहमीच्या बोलण्यात आपण विश्वास-श्रद्धा-निष्ठा हे तीन शब्द सर्वसाधारणपणे समानार्थी वापरतो. पण या तीन शब्दांचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. एखाद्या विषयावर चर्चा करताना प्रत्येक शब्द त्याच्या विशिष्ट् अर्थाने वापरणे आवश्यक असते. जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे, हे बुद्धीला कळते पण भावनेला ती सोडवत नाही. अशी गोष्ट भावनेच्या प्रभावामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही ती गोष्ट पूर्वग्रहांमुळे,शब्दप्रामाण्यामुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. "देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. विश्वासाचा संबंध बुद्धीशी आहे. तर श्रद्धेचा संबंध मनोभावनेशी आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा