नीरव मोदी व पी.एन.बी. घोटाळा
गेल्या २५-३० वर्षात बँकांचे बर्याच प्रमाणात संगणकीकरण झाले. त्याने अनेक फायदे झाले. मात्र आर्थिक घोटाळ्याना काही आळा बसतोय असे दिसत नाही. नुकताच उघडकीस आलेला नीरव मोदी-पी.एन.बी. घोटाळा. हिरे/हार दागिने बनवून विकणार्या नीरव मोदी व त्याच्या कंपनीने २०११ पासून एकूण ११,००० कोटी काढले. ह्या बँकेच्या अधिकार्यानी अनेक 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'(LoU) नि.मो. कंपनीला दिली. त्यानुसार नि.मो.कंपनीने पी.एन.बी. व ईतर काही बँकातून तो पैसा काढला. परतफेड होत नाही हे दिसल्यावर घोटाळा उघडकीस आला. काही पडलेले प्रश्नः
१) LoU चा रेकॉर्ड बँकेच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये नाही असे बँकेने म्हंटले आहे. हे कसे शक्य झाले ?
२)swift मेसेजिंग सिस्टिम व नॉस्ट्रो खाते हा काय प्रकार आहे ?
सध्यातरी काही अधिकार्याना अटक झाली आहे. पी.एन.बी. चे संचालक सुनिल मेहता ह्यांनी आमची बँक चोख व्य्वहार ठेवते..आम्ही ह्या प्रकरणातून बाहे येवू असे सांगितले आहे. वरकरणी ते म्हणत असले तरी शेकडो कोटींचे कर्ज काढले जाते पण बँकेच्या सर्वोच्च अधिकार्याना ह्याची कल्पना नसते ह्यावर कसा विश्वास ठेवायचा?
ED(सक्तवसूली सण्चलनालय) व सी.बी.आय. वगैरे वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. विजय मल्ल्यासारखाच नीरव आधी पळाला(म्हणजे पळायला लावले) व यथावकाश सी.बी.आय. ने एफ.आय.आर. नोंदवला. आता अपेक्षेप्रमाणे धाडसत्र चालू आहे व 'आम्हाला नाय बुवा माहीत हा नीरव मोदी' असे सांगण्याचा भाजपा व कॉंग्रेसचा प्रयत्न चालू आहे.
राहता राहिला शेवटचा प्रश्न- अतिधनाढ्यांच्या यादीत नाव पटकावणार्या नीरव मोदीला एवढे कर्ज काढायची( व तेही अशा मार्गाने) गरज काय?(https://retail.franchiseindia.com/interview/retail-people/profiles/Over-the-next-5-years-we-are-looking-at-over-20-new-boutiques-across-the-globe--Nirav-Modi.i1333/ ) ह्या दोन महिन्यापुवीच्या मुलाखतीत तो जगातील विविध शहरात शाखा उघडण्याबद्दल बोलतोय. मग असे दोन महिन्यात काय झाले ?
💬 प्रतिसाद
(122)
स
सर टोबी
Mon, 03/05/2018 - 17:55
नवीन
या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाहीये कारण ज्ञान लालसेपेक्षा त्यात खोडसाळपणाचं आहे. आपण सेवार्थी म्हणून अनेक गोष्टींचा लाभ घेतो पण त्यावर मत व्यक्त करताना आपण त्यातील निष्णात असण्याची गरज नसते. नाही का?
आणि ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने काय केले हे सांगण्याची सध्याच्या सरकारचीच जास्त गरज आहे जशी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस होती.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Mon, 03/05/2018 - 17:55
नवीन
या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाहीये कारण ज्ञान लालसेपेक्षा त्यात खोडसाळपणाचं आहे. आपण सेवार्थी म्हणून अनेक गोष्टींचा लाभ घेतो पण त्यावर मत व्यक्त करताना आपण त्यातील निष्णात असण्याची गरज नसते. नाही का?
आणि ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने काय केले हे सांगण्याची सध्याच्या सरकारचीच जास्त गरज आहे जशी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस होती.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/06/2018 - 05:26
नवीन
असे असताना निरव मोदींच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला ठणकावून सांगण्याची हि चांगली संधी होती. प्रधान सेवक अशा महत्वाच्या वेळेस भलत्याच गोष्टी करीत असतात (उदा. मामुली गोष्टींवर ट्विट करणे).
अमेरिकेला ठणकावून सांगायचं म्हणजे नक्की काय आणि कसं करायचं?
का झाडगाव बद्रुकमधील धुंदुभी वर्तमानपत्रातील उप सह संपादक लिहितात तसं "आम्ही अमेरिकेला सज्जड इशारा देतो कि त्यांनी आपली वागणूक सुधारावी नाही तर आमच्याशी गाठ आहे" असं ट्विट करायचं
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 03/06/2018 - 06:01
नवीन
खांग्रेस सत्तेवर असताना भाजपे सारखे ओरडत होते की किती मुळूमुळू परराष्ट्र धोरण आहे म्हणून. अगदी कणखर धोरण हवे म्हणून.
आता इतराना का विचारत बसले ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/06/2018 - 06:42
नवीन
तुम्ही नका लोड घेऊ.
तुम्हाला विचारलं का? काय काय करायचं आणि कसं कसं करायचं?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 03/03/2018 - 16:51
नवीन
नीरव मोदीचे लफडे कळुनही त्रिपुरा आणी नागालँडवाल्यांना काय अक्कल आली नाही म्हणाय्ची.
सालं शेवटी इव्हीएमच जिंकल ;), :))
जेव्हा जेव्हा विरोधकांच्या हातात काही झुन्झुणा मिळतो, पब्लिक परत काय तरी कांड करुन टाकते. :))
मिपावरच्या काही सन्माननीय सदस्यांच्या संतुलित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत (नरेंद्र मोदी हे बिलकुलच चांगल करत नाहीएत म्हणुन)
साला मला तर मानसिक आदळापट पण इमॅजिन नाय होत त्यांची.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 03/04/2018 - 05:39
नवीन
माईच्या कवतिकाच्या धाग्याची शंभरी झाली. त्याबद्दल माईचा खणानारळाने ओटी भरून, हळदीकुंकू लावून लकडी पुलावर झाईर सत्कार करणेत येत आहे. माईंच्या ह्यांना शालजोडीतले श्रीफळ देऊन त्यांचाही याटिकानी सत्कार करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 03/04/2018 - 11:48
नवीन
इथेच तपासून घेणे,
कारण नवरा मुलगा आणि नारळ नंतर कसा निघेल याची खात्री देता येत नाही (सौजन्य पु पा)
हंगामी बदली सचिव मिपा सत्कार समिती सदस्य
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 03/04/2018 - 18:20
नवीन
https://sanatanprabhat.org/marathi/132097.html
दैनिक सनातन प्रभात Menu
दैनिक सनातन प्रभात > Post Type > बातम्या > अांतरराष्ट्रीय बातम्या > नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून कर्जवसुली करण्यास मनाई – न्यूयॉर्क न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती
नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून कर्जवसुली करण्यास मनाई – न्यूयॉर्क न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती
March 3, 2018
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे प्रकरण
वॉशिंग्टन – पंजाब नॅशनल बँकेत महाघोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून देणेकर्यांना कर्जवसुली करण्यास न्यूयॉर्कमधील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. नीरव मोदी यांच्या वरील आस्थापनाने अनेकांकडून कर्ज घेतले होते; मात्र भारतात त्यांचा घोटाळा उघड झाल्यानंतर देणेकर्यांनी हे पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावून न्यायालयात धाव घेतली होती, तर अमेरिकेतील ‘नादारी कायद्यां’तर्गत संरक्षण मिळावे; म्हणून कंपनीने न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील आदेश दिले.
.....................................
वरची बातमी ही अमेरिकेतील कर्जदारांबद्दल असावी , असे वाटते.
----------------------------------
अ हा माणूस बॅंकेत चोरी करून पळाला.
तो ब कडे गेला. ब ने त्याच्याकडून १००० रु घेतले आणि किराणा माल दिला.
नंतर पोलिस जर ब ला म्हणाले की रिकव्हरीला मदत करा आणि ते हजार रुपये आम्हाला परत करा. तर ब ची नेमकी भूमिका काय असावी ?
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Mon, 03/05/2018 - 04:45
नवीन
पोलिसांना मदत मागायची गरज नाही. कायद्याने त्यांना "तेच" हजार रुपये काढून घेण्याचा अधिकार आहे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 03/05/2018 - 07:22
नवीन
असे कसे ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/05/2018 - 08:01
नवीन
पण कायदा भारत आणि अमेरिकेत वेगळा आहे आणि त्याची भूमिमर्यादा(jurisdiction) सुद्धा वेगळे आहे.
"इकडच्या" न्यायालयाचा वटहुकूम "तिकडे" लागू होत नाही.
आणि प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ "प्राधान्याने" पाहतो.
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Mon, 03/05/2018 - 08:11
नवीन
मी फक्त अ आणि ब च्या बाबतीत बोललो होतो. प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ प्राधान्याने पहातो आणि पहायलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 05/18/2024 - 04:02
नवीन
यात ब ची काहीच चूक नाही असे तो म्हणू शकतो त्यांनी पूर्ण कायदेशीर व्यापार केला
पोलीस/ सरकार कदाचित तो किराणा माल जप्त करू शकतील ( चोरीतुन मिळवलेलया पैशाने घेतलीलाय गोष्टी म्हणून )
अर्थात यात ब कडून वसुली कर्णयातही काही कायदेशीर तरदूत असूही शकेल परत या आणि बी एकाच देशातील कायद्यववयस्थेत आहेत कि नाही हे बघावे लागेल
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 03/05/2018 - 08:52
नवीन
महेश हतोळकर,
हे पैसे रोख रक्कमेच्या स्वरूपात दिलेले असणार हे गृहीत धरतो. अशा प्रसंगी पोलिसांना ते वसूल करता येणार नाहीत असं माझं मत. कारण की रोख पैशाच्या नोटा हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नराने दिलेलं वचन असतं. त्या नोटा धारकाकडून (=बेअररकडून) विना परवाना कोणालाही हस्तगत करता येत नाहीत. शिवाय त्या नोटा त्या दुकानदाराने इतरत्र व्यवहारासाठी वापरलेल्या असू शकतात. त्यामुळे त्या पांगलेल्या नोटा गोळा करायची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याच्या बदल्यात दुकानदारास दंड अभिप्रेत नाही.
लाचप्रतिबंधक अधिकाऱ्यांना देखील काढून घ्यायच्या झाल्या तर ताबडतोब काढून घ्याव्या लागतात. शिवाय त्यावर खास खुणाही असतात.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 03/05/2018 - 09:15
नवीन
सहमत .
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 03/06/2018 - 12:01
नवीन
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपला ३१ बँकांनी ५,२८० कोटी रुपयांची वर्किंग कॅपिटल फॅसिलिटी दिली होती. याआधी एसएफआयओनं पंजाब नॅशनल बँकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता इतर बँकांनाही यासंदर्भात नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. आयसीआयसीआयनं गीतांजली ग्रुपला ४०५ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. अॅक्सिस बँकेनंही या समूहाला मोठ्या रकमेचं कर्ज दिलं होतं. या प्रकरणात कोचर आणि शर्मा यांची चौकशी होऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं गीतांजली समूहाचा उपसंचालक विपुल चितालिया याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
........
गल्लीबोळातल्या लहानसहान ब्यान्का भ्रष्टाचार करतात असे कारण दाखवून त्यांचे व्यवहार ठप्प केले.
जनता नाईलजास्तव मोठ्या ब्यान्कांच्या दारात गेली अन पैसे भरले.
ह्यांचे वर्किंग कॅपिटल वाढवणे हे मोठ्या चोरांच्या फायद्याचे ठरले.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Tue, 03/06/2018 - 12:26
नवीन
अचं जालं व्हय! चॅन चॅन! कर्जे वाटली कधी, नोटबंदी झाली कधी, एनपीए झाले कधी कशाचा कशाला संबंध नाही. पण एकूणच अंधविरोधकांच्या लॉजिकला तोड नसते.
ना बूड ना शेंडा! काहींच्या काही फेकायचं! कोणती जनता कोणत्या मोठ्या बँकांच्या दारात गेली होती? याला काही संदर्भ आहेत का? कि नेहमीप्रमाणेच आपलं अंधविरोधासाठी?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 03/06/2018 - 12:58
नवीन
कर्जे कधी का असेनात , ब्यान्कांना हार्ड कॅश मिळाली ना ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Tue, 03/06/2018 - 13:11
नवीन
छान, कर्जे कधीची का असेनात हे सांगण्यातच सगळं सार आहे! ती कधीची आहेत याच्याशी मुळात घेणेदेणेच नाही. नाहीतर रिकाम्याच पडल्या होत्या बँका, वाटच बघत होत्या कधी एकदा नोटबंदी होते आणि कधी एकदा हार्ड कॅश येते. नसती झाली नोटबंदी तर बँका दिवाळखोरीच घोषित करणार होत्या.
*********************************************
नोटबंदीचा आणि एनपीए करून पळून जाणार्यांचा काय संबंध?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 05/18/2024 - 03:57
नवीन
सरकारी बँकांतील कर्मचारी कर्जे देताना " आपल्या बापाचं काय जातंय " या वृत्तीने धोकादायक कर्जे देतात हा आरोप बरेचदा केला जातो आणि त्यात तथ्य हि आहे असे दिसतंय पण या खालील बँक तर खाजगी होत्या !
आयसीआयसीआयनं गीतांजली ग्रुपला ४०५ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. अॅक्सिस बँकेनंही या समूहाला मोठ्या रकमेचं कर्ज दिलं होतं. या प्रकरणात कोचर आणि शर्मा यांची चौकशी होऊ शकते
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Fri, 05/17/2024 - 16:18
नवीन
माई नीरव मोदी काय करतो आहे हो सध्या? नाही, तुमच्या ह्यांना बरीच माहिती असते म्हणून विचारले
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3