ताज्या घडामोडी - भाग २४
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!
💬 प्रतिसाद
(156)
ब
बिटाकाका
Sat, 03/03/2018 - 11:09
नवीन
हो, ईव्हीएमला शिव्या देण्यापेक्षा हे बरे आहे.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 03/03/2018 - 16:07
नवीन
इव्हीएम मशीन पुन्हा जिंकल त र ;), :))
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 03/03/2018 - 10:59
नवीन
बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५ वर्षे अबाधित असलेला अजून एक गड कोसळला !!
२५ वर्षे पुर्ण नॉर्थ ईस्ट ला एक कॉरेंटाईन भारत करुन ठेवलेला होता. आता तो भाग कोशातुन बाहेर येउन मेन स्ट्रीम भारताबरोबर प्रगतशील होईल.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मुक्त भारता कडे यशस्वी वाटचाल !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 03/03/2018 - 11:01
नवीन
आता ख्रिस्चनांची मज्जाच मज्जा होणार म्हणुन व्हिवळताहेत !!
अरेरे !!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/03/2018 - 16:29
नवीन
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 03/03/2018 - 16:57
नवीन
नीरव मोदीचे लफडे कळुनही त्रिपुरा आणी नागालँडवाल्यांना काय अक्कल आली नाही म्हणाय्ची.
सालं शेवटी इव्हीएमच जिंकल ;), :))
जेव्हा जेव्हा विरोधकांच्या हातात काही झुन्झुणा मिळतो, पब्लिक परत काय तरी कांड करुन टाकते. :))
मिपावरच्या काही सन्माननीय सदस्यांच्या संतुलित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत (नरेंद्र मोदी हे बिलकुलच चांगल करत नाहीएत म्हणुन)
साला मला तर मानसिक आदळापट पण इमॅजिन नाय होत त्यांची.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/03/2018 - 17:02
नवीन
सकाळ पासून टिव्ही चॅनल्सवर ईशान्येतील निवडणूका चर्चील्या जाताहेत, पण एखाद अपवाद सोडला तर या चर्चात इशान्येच्या माणसांना चा सहभाग घेण्या बद्दल टिव्ही चॅनल वाले विसरले आहेत का असा प्रश्न पडला (कदाचित मी सर्व चॅनल चेक केले नसतील चुभूदेघे)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/03/2018 - 18:33
नवीन
+१००
केवळ इशान्य भारतातिल निवडणूका असूनही, चुकून एखादा अपवाद वगळता, तिथल्या स्थानिक पक्ष/नेते/वार्ताहर/तज्ज्ञ यांची अनुपस्थिती नक्कीच खटकली !
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/04/2018 - 08:31
नवीन
तावातावाने उच्चरवात बोलता येणे हे तेथील लोकांच्या स्वभावात नसते असा ह्यांचा अनुभव.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 03/04/2018 - 15:27
नवीन
आता स्पेशल लोक तिथे गेलेत म्हणे. आता शिकतील हळूहळू
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 03/05/2018 - 05:43
नवीन
लहेज्यात
"अग्गोबाई ते काय काम करत आहेत हे कधीच वाचनात आले नाही का असलं वाचवत नाही हे खरं"
संघाचा द्वेष करताना संघाचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन गेले आहेत हे बरोबर विसरलात.
चालायचंच, चोराची नजर सतत ऐवजावर तशी अवस्था झाली आहे असे माई सांगत होत्या तुमच्या हितेश ला!!
मतदार नाखु
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 03/04/2018 - 03:21
नवीन
नागालॅंडमध्ये ndpp + bjp 29 आहेत म्हणे. Ndpp चे किती अन bjp चे किती ?
Ndpp च्याच जागा जास्त आहेत , म्हणून separate figure देत नाही आहेत का ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 03/04/2018 - 06:52
नवीन
तुम्हीच ठरवा कोण जिंकलं ते.
भाजप १२, एनडीपीपी १६. भाजपने २० जागा लढवल्या होत्या व एनडीपीपी ने ४०. मागच्या निवडणुकीत भाजप ला एक जागा तर काँग्रेस ला ८ जागा होत्या ही अवांतर माहिती.
*****************************
जिंकले कोण ते जाऊद्या, हारले कोण ते ठरवता आलं का? लोकशाही, ईव्हीएम की अजून कोण?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 03/04/2018 - 15:17
नवीन
देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर आणून देशाची धुरा त्यांच्याकडे सोपवली. मात्र, आता आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकले आहे, अशा शब्दात ज्येष्ठ विधीज्ञ व खासदार अॅड. राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुढील निवडणुकीनंतर मोदी केवळ पायउतारच होणार नाहीत, तर कदाचित देशाबाहेरही निघून जातील, असे भाकितही त्यांनी वर्तविले.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/made-mistake-to-make-narendra-modi-as-prime-minister-says-ram-jethmalani/articleshow/63158705.cms
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/04/2018 - 16:49
नवीन
>>> आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकले आहे,
LLRC
>>> पुढील निवडणुकीनंतर मोदी केवळ पायउतारच होणार नाहीत, तर कदाचित देशाबाहेरही निघून जातील,
LLRC
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/05/2018 - 08:03
नवीन
देशाबाहेर ते का निघून जातील..ह्याचे कारण हे वकील साहेब देत नाहीत. निवडणूका जिंकणे/हरणे हे चालूच असते.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 03/06/2018 - 17:20
नवीन
जेठमलानींच्या मते रागा पंप्र होतीलच आणि नोटा बंदी बद्दल शिक्षाही ठोठावली तर वाचण्यासाठी ते परदेशी जातील ना!!!
आत्तापर्यंत त्यांनी तिथलं आधारकार्ड काढलं सुद्धा असेल
जिकडे पाहावे तिकडे मोदी या संघाच्या मुखपत्रातून साभार
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sun, 03/04/2018 - 17:22
नवीन
फारुख अब्दुल्ला यांनी पं नेहरुंनाच देशाच्या फाळणीसाठी जवाबदार धरलेल आहे.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sun, 03/04/2018 - 17:26
नवीन
तीनही राज्यांत भाजप चा समावेश असलेले सरकार येणार आहे.मिझोरम मध्ये सुद्धा काँग्रेस नाही.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sun, 03/04/2018 - 17:27
नवीन
टंकनचूक : मिझोरम नाही मेघालय.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/07/2018 - 12:39
नवीन
गरीबांसाठी 10 कोटींचा आरोग्यविमा
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 03/07/2018 - 20:26
नवीन
चंद्राबाबुंनी सिवसेनेसारखं फार तळ्यात-मळ्यात न करता निर्णय घेतलाच. युपीएमधे सामील होणार काय टीडीपी ? आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलय राहुलबाबाने.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/07/2018 - 20:52
नवीन
आंध्र मध्ये त्यांचा बहुमत आहे , भाजप सोबत नसेल तर फार फरक पडत नाही. भाजप आंध्र मध्ये कोणा सोबत जाणार हा मुद्दा आहे. पवन कल्याण ची पार्टी आहे, त्यांना आश्वासन देऊन सोबत घेता येईल. YSR ची इमेज भ्रष्ट आहे , केसेस चालू आहेत. 2019 चा पेपर सोपा नसणार हे नक्की
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 03/08/2018 - 04:29
नवीन
२०१९ वर फार फरक दिसत नाही. सरळ सरळ भाजपची कॅल्क्युलेटेड रिस्क दिसतेय. सध्या भाजपचे आंध्रमधून फक्त २ खासदार आहेत तर टिडीपीचे १५. टिडीपीची विशेष राज्याच्या दर्जाची मागणी भाजपला फार काही मिळवून देईल असे नाही, उलट टिडीपीलाच फायदा. याशिवाय, आंध्रला विशेष दर्जा देऊन बिहारला नाराज करणे बीजेपीला अजिबात परवडण्यासारखे नाही. भाजप आणि नितीश एकत्र आल्यामुळे बिहारमधला एनडीएचा आकडा २५ वरून ३५ वर जाण्याची संधी आहे. भाजप २-४ जागा वाढवूहि शकेल.
*********************************
इतर छोट्या पार्ट्या एनडीएला येऊन मिळण्याची शक्यता आहेच. असे दबावाखाली ठेवू पाहणारे रिजनल पक्ष भाजपने दूर ठेवलेलेच बरे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 03/08/2018 - 07:13
नवीन
आमच्या आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात कायम आजारी राज्याना BiMARU राज्ये अशा एका गटात टाकले आहे.
बिहार
मध्य
आंध्र
राजस्तान
युपी
विषेश् राज्य म्हणजे काय फायदे मिळतात ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 03/08/2018 - 07:30
नवीन
अजून काय असणार, करात सवलती, केंद्राकडून जास्तीचा फंड, केंद्राच्या योजनांना ७०(केंद्र):३०(राज्य) च्या ऐवजी ९०:१० फंडिंग. याशिवाय अजून काही राज्याच्या योजना पुढे सरकावण्यासाठीचे सोपे मार्ग वगैरे असतील.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/08/2018 - 07:41
नवीन
राज्य सरकारने एखादी योजना जाहीर केली व ती मंजूर झाली की त्याचा ९०% खर्च केंद्राने उचलायचा. उत्तर-पूर्वेकडील काही राज्ये,हिमाचल्,झारखन्ड ही राज्ये विशेष राज्य आहेत. आंध्रप्रदेशचे विभाजन होताना तत्कालिन काँग्रेस सरकारने आंध्रला विशेष दर्जा देऊ म्हणून आश्वासन दिले होते. नंतर भाजपानेही ते दिले.पण तेवढा पैसा आता नाही असे अरूण जेटली म्हणत आहेत. असो.
खंजीर्,तलवार,भवानी..भाषा वापरून पदांवर चिकटून रहायचे व रास्त मागणी अमान्य झाल्यावर सरकारमधून ताबडतोब बाहेर पडायचे.. शिवसेना व तेलुगु देसम..दोन्ही पक्षात अधिक स्वाभिमानी कोण ते कळले.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 03/08/2018 - 08:05
नवीन
एनडीएतून इतर पक्षही बाहेर पडतील: शिवसेना
---
वी दिल्ली: तेलुगू देसम पार्टी आणि भाजप दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर शरसंधान साधलं आहे. 'एनडीएतील घटकपक्षांचे भाजपबरोबर सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. हळूहळू इतर पक्षही तक्रारी करू लागतील आणि एक एक करून सर्व पक्ष एनडीएतून बाहेर पडतील,' असा दावा शिवसेनेने केला आहे.
--
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/tdp-break-from-central-government-shiv-sena-had-expected-this/articleshow/63213969.cms
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 03/08/2018 - 08:12
नवीन
मुळात टिडीपीच एनडीएमधून बाहेर पडली आहे का? त्यांनी तसे काही सांगितल्याचे वाचण्यात आले नाही. ते फक्त सरकारमधून बाहेर पडले आहेत असेच बहुतेक माध्यमे सांगत आहेत.
============================
या बातमीनंतरही शिवसेना परत राजिनामा-धमकी देण्याचा कसा काय विचार करते काय माहित? ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी दिला, याना प्रॉब्लेम आहेत असे मागचे तीन वर्षे सांगत आहात मग बाहेर पाडण्यासाठी एवढा कसला विचार चालू आहे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/08/2018 - 18:23
नवीन
नायडूंच्या दबावाखाली न झुकण्याचा योग्य निर्णय मोदींनी घेतला आहे. मोदी हे वाजपेयी नाहीत हे जसे उद्धटला समजले नाही, तसेच ते नायडूनाही समजलेले नाही.
>>> शिवसेना सत्तेला कधीही लाथ मारुन बाहेर पडू शकते.
LLRC
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 03/08/2018 - 12:27
नवीन
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन एनडीएतून बाहेर पडले, असा दावा शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
गेली 4 वर्ष आम्ही भूमिका घेतोय. आता त्यांनी त्यांच्या राज्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला आहे. आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.
शिवसेना बाहेर पडणार का?
शिवसेना टीडीपीप्रमाणे सरकारमधून बाहेर का पडत नाही, असं विचारलं असता, राऊत म्हणाले, टीडीपी आणि शिवसेनेमध्ये फरक आहे. टीडीपी हा एनडीएमध्ये कायमस्वरुपी राहणारा पक्ष नाही. ते जाऊन येऊन असतात ना, लॉजवर जसं रुम घेतली, सोडली, तसा पक्ष टीडीपी आहे. ते कधी यूपीएमध्ये, कधी तिसऱ्या आघाडीत असतात. 2014 मध्ये मोदींची हवा होती. त्यामुळे ते एनडीएत गेले. जर ती हवा नसती तर देशात वेगळं राजकीय चित्र दिसलं असतं.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/08/2018 - 14:42
नवीन
'आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन एनडीएतून बाहेर पडले,"
नक्की कसली प्रेरणा?. ते (व ईतर पक्ष) ह्यांना हिंग लावूनही विचारत नाहीत. टी.व्ही.वर सेनेचे नेते फक्त तिरकस प्रतिक्रिया द्यायला येतात. स्वतः पुढाकार घेऊन ईतर पक्षांना विश्वासात घेऊन शिवसेनेने कधी मुद्दा उचलून धरला असे कधी दिसले नाही.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 03/08/2018 - 15:14
नवीन
२०१९ साली देशव्यापी विक्रमी बहुमत मिळवून शिवसेनेचा प्रधानमंत्री निवडून आल्यावर तेलगू देसमशी चर्चा करण्याबद्दल संजय राऊत काहीच म्हणाले नाहीत ?
बातमी अर्धवट प्रकाशित झालेली दिसते.
खुद्द शिवाजी महाराजांनी शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापले हे एवढे आता ऐकायचे बाकी राहिले आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/08/2018 - 16:46
नवीन
>>> खुद्द शिवाजी महाराजांनी शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापले हे एवढे आता ऐकायचे बाकी राहिले आहे.
LLRC
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 03/08/2018 - 15:15
नवीन
खुद्द शिवाजी महाराजांनी शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापले हे एवढे आता ऐकायचे बाकी राहिले आहे.
LLRC
))--((
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 03/08/2018 - 18:08
नवीन
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bsf-jawan-forgets-shri-before-pm-loses-pay/articleshow/63199382.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=pm070318
मा. पंतप्रधान मोदीजी याना श्री म्हटले नाही म्हणून जवानाचा पगार कापला.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 03/08/2018 - 18:21
नवीन
फेकू असा उल्लेख केला म्हणून १५ लाखातले ७.५ लाख कापले , उद्या असेही होईल .
- Log in or register to post comments
म
मामाजी
गुरुवार, 03/08/2018 - 19:52
नवीन
मंगूजी आपण दोन दिवसांपूर्वीची शिळी बातमी दिलीत. या लिंकवर कालच्या टाईम्स वरची बातमी वाचा. https://timesofindia.indiatimes.com/india/pm-orders-bsf-to-revoke-pay-cut-order-against-jawan-who-did-not-refer-to-him-as-shri/articleshow/63200830.cms
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Fri, 03/09/2018 - 06:00
नवीन
नकारात्मक प्रचारासाठी फुसके बार टाकण्याची परंपरा राखल्याबद्दल अभिनंदन!!!
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/09/2018 - 07:00
नवीन
खरे कारण वेगळे असणार असे ह्यांचे मत. जवान व त्याचा वरिष्ठ ह्यांच्यात आधीपासून काहीतरी बिनसले असावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/09/2018 - 10:40
नवीन
http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Farooq-Takla-Paasport-Renue-In-2011-During-UPA-Govt/m/
संपुआच्या काळात, दाऊदचा साथीदार असलेल्या, फरारी असलेल्या व रेड कॉर्नर नोटिस असलेल्या फारूक टकल्याच्या पारपत्राचे नूतनीकरण केवळ २४ तासात झाले.
"खांग्रेस का हाथ, इस्लामी दहशतवादियोंके साथ"
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/09/2018 - 10:44
नवीन
मोदीनी पद्मभूषण देऊन ज्यांना गौरवले.. त्यांच्या कृपेने हे झाले असावे असा आमचा अंदाज.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 03/09/2018 - 13:23
नवीन
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला हिंदू युवा सेनेचा संस्थापक के. टी. नवीनकुमार याला आज बेंगळुरू येथील महान्यायदंडाधिकारी कोर्टात हजर करण्यात आले असता ५ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवीनकुमार उर्फ होटे मांजा हा कर्नाटकातील मद्दूर येथील राहणारा असून गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला १८ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १८ राऊंड जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर २ मार्च रोजी विशेष तपास पथकाने (एसआयटी) नवीनला ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीत गौरी यांच्या हत्येमागे नवीनकुमार हाच मुख्य सूत्रधार असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
नवीन कुमारने केलेल्या जामीन अर्जावर आज महान्यायदंडाधिकारी कोर्टात सुनावणी झाली असता एसआयटीच्यावतीने सरकारी वकिलांनी जामीन देण्यास जोरदार विरोध केला. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीनकुमार हा मुख्य आरोपी असून त्याच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा आहे, अशी मागणी वकिलांनी केली. ही मागणी मान्य करत कोर्टाने नवीनकुमारला आणखी ५ दिवसांची एसआयटी कोठडी दिली आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/gauri-lankesh-murder-accused-sent-to-sit-custody-for-5-days/articleshow/63234173.cms
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/09/2018 - 18:50
नवीन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन...
पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.
पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय
पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले.
दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली.
1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले.
1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.
राजकीय कारकीर्द
1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला.
जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
मे 1992 ते 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
नोव्हेंबर 2004 पासून पुढे - सहकार्य, पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग
19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/09/2018 - 19:08
नवीन
>>> 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.
20 व्या वर्षी?
>>> 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
१९९५ मध्ये पडले होते.
गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये. परंतु विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी उकळलेल्या बेकायदेशीर देणग्या, धनकनडीतील बळकावलेली जमीन व बळजबरीने बंद केलेला रस्ता इ. गोष्टी सुद्धा लिहिल्या जाव्यात.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/09/2018 - 20:09
नवीन
मला मेसेज आला तो पेस्टवला , शिवाय abp majha वर पण हेच लिहिले आहे. त्यांनी खोटे लिहिले असेल बहुधा .
>>गेलेल्याबद्दल वाईट बोलू नय असे लिहिता आणि नंतर वाईट पण बोलता ?
वाईट कामाबद्दल वाईटच बोलावे जिवंत असो की मृत ! कर्म तर तेच असते.
मी मूळचा सांगलीचा आहे आणि मी भारती मध्ये 3 वर्षे शिकलो. माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे. सांगली मध्ये चांगले काम आहे. शिक्षण संस्था , साखर कारखाना अतिशय उत्तम चालू आहे. शिवाय वन प्रशिक्षण अकॅडमी आहे.
कदमांनी तिथल्या एका पिढीला नोकरीस लावले आणि सुधारले. एस टी महामंडळावर असताना त्यांनी प. महाराष्ट्रातील खूप लोकांना एसटी मध्ये भरती होण्यास प्रोत्साहन दिले.
भारती मध्ये गावाकडची खूप मुले विना फी शिकवली. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलांना शिक्षण मोफत होते. सांगली जिल्ह्यातील त्यांचे काम मोठे होते. संगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करायचे असतील तर गरीब रुग्णांना कायम आधार वाटतो.
एका सामान्य कुटुंबातील मुलाने एवढी मोठी झेप घेणे नक्कीच कौतुकास्पद आहे.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 03/10/2018 - 08:00
नवीन
म्हणजे एबीपी माझाने पण चुकीचं लिहिलं आहे तर! पतंगराव कदम संपतराव देशमुखांकडून हरल्याचं वाचलेलं आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 03/10/2018 - 08:04
नवीन
सलग सात वेळा चुकीचे आहे , ते संपतराव देशमुख कडून हरले होते हे बरोबर आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/09/2018 - 20:10
नवीन
abp majha
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 03/10/2018 - 09:26
नवीन
खोटेनाटे आरोप लावून सनातन संस्थेवर बंदी घालायचं कारस्थानं चालू होती. त्या वेळेस (२०१० च्या आसपास) सनातनच्या साधकांना पतंगरावांनी भेट कबूल केली होती. त्यावेळचा साधकांचा अनुभव निराशाजनक होता.
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »