भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे १) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ? २) स्त्री अत्यचारांवर रिअॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ? ३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ? ४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप कसे असावे ? * आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ? * माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही. * या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे. * दुसर्या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .
💬 प्रतिसाद
(144)
प
प्राची अश्विनी
Mon, 04/16/2018 - 07:39
नवीन
व्यवस्थित मांडणी असलेला धागा.
- Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद
Mon, 04/16/2018 - 08:03
नवीन
चांगला आणो व्यवस्थित मांडलेला चर्चाविषय.
या ऐवजी स्त्रीकडे माणूस म्हणून पहाण्याचे संस्कार केले जात नाहीत हे या दुखण्याचं मूळ आअहे. कारण तिला मखरात बसवायचं मग ती चुकली की तिचा न्यायनिवाडा करायचा आणि अर्थातच मान सन्मान हा तिला व्यक्ती म्हणून न असता एक देवीरुपिणी म्हणून असतो. यामुळे येणारी बंधनं, इच्छा मारण्याची अदृष्य सक्ती हे तोंड दाबून बुक्कयाचा मार दिल्यासारखं होत. 'तिच्या अमूकतमूक वागण्याने आदर गेला' हे कोणीही गयागुजरा सहज म्हणू शकतो आणि आपल्या परिनं तिला शिक्शाही देऊ शकतो.
वेळेअभावी हे एवढंच. नंतर अजून लिहीन.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 04/16/2018 - 14:45
नवीन
वरील प्रतिसादांतला 'माणूस' म्हणजे काय? इथे 'पुरुष' अभिप्रेत आहे का?
तसेच 'निवाडा' म्हणजे काय? आणि तो केल्यावर बायकांचं काय बिघडतं? समजा काही बिघडलंच तर बायका त्या निवाड्यास फाट्यावर का मारंत नाहीत?
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 04:55
नवीन
@ अंतरा आनंद
तुमच्या कडून अधिक मते जाणून घेणे आवडेल. चर्चेस कदाचित उपयोगी होईल म्हणून एक प्रश्न
नात्यांमध्ये आदराची भावने बद्दलचे संस्कार असे म्हणायचे आहे. आधी बहीणीच्या नात्याची महती अधिक होती आता मैत्रीच्या नात्याची महती वाढते आहे. समस्या नात्यांबद्दलच्या महतीत आहे की शुचिता बद्दलच्या महतीत आहे असे वाटते.
प्रश्ना बद्दल मीही क्लिअर आहे असे नाही . इतराम्नी त्यात सुधारणा सुचवण्याचे स्वागत आहे .
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 08:16
नवीन
हे एक तद्दन हास्यास्पद विधान आहे.
---------------------------------------
माझ्याकडे कोणी भारतीय म्हणून पाहिले तर मी त्याला "माझ्याकडे मनुष्य म्हणून (आणि केवळ तितके आणि तितकेच) पाहा" असे सांगणार काय? स्त्री कडे स्त्री म्हणून पाहण्यात मनुष्य म्हणून पाहणे अंतर्भूत आहेच. पुढे वर्गिकरणच करू नका ही अट विक्षिप्त आहे.
======================================
अगदी सुस्पष्ट राक्षशीणीसारखं वागलं तर कोणताही मार सहन करावा लागणार नाही. स्त्रीयांना देवी म्हणत असले तरी त्यांनी देवींसारखं वागावं अशी मूर्खांचीही अपेक्षा नसते. ती एक म्हणायची पद्धत असते.
-----------------------
हेच विधान ब्राह्मणांबद्दलही खरे नसावे का? त्यांना देखील देव मानतात. मग बंधनं, इच्छा मारणं इ इ आलं.
=================================
आधुनिक संस्कृतीत कोणतेही संस्कार केले जात नाहीत. म्हणून बलात्कार होतात. त्याचं खापर जुन्या संस्कृतीत देवी म्हणून पाहायला शिकवायचे या संस्कारावर फोडायचे कारण नसावे.
- Log in or register to post comments
T
Topi
Mon, 04/16/2018 - 14:24
नवीन
पुरुषांच्या शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती नवीन सामाजिक आर्थिक सरंचनेत होत नसावी
त्यामुळे आपले frustration तुलनेने सॉफ्ट टार्गेट असलेल्या स्त्री मुली यावर काढणे त्याचबरोबर ढासळत चाललेली न्याय व पोलीस यंत्रणा त्याची भीती, न्यायदानात होणारा विलंब, त्यात होणारी फरफट, ह्यामुळे अशी भावना स्त्रियांची होणे स्वाभाविक आहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 05:07
नवीन
अधिक नेमके पणाने मांडता येईल, खासकरुन नवीन संरचना म्हणजे काय अभिप्रेत आहे ? कारण शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती या नाण्याला दुसरी बाजूही असते . हवा तोच जोडीदार मिळण्याची आणि तयार असण्याची शक्यता बहुतांश वेळा नसते तरीही पूर्ण परिपूर्ती न झालेले सर्व जण अपमार्ग वापरत नाही
पॉझीटीव्ह एंगेजमेंट्सच्च्या साधनांची अधिक उपलब्धता जसे कि खेळ परिस्थिती बदलू शकेल का ? कारण परिपूर्ती न होताही कशात तरी गुंतवून घेतलेल्यांची अपमार्गास न जाणार्ञांची संख्या मोठी असते .
- Log in or register to post comments
T
Topi
Mon, 04/16/2018 - 14:46
नवीन
अत्याचार झालेल्या स्त्रिया हया जर विवाहयोग्य म्हणजे17 ते 25 या वयोगटातील असतील तर त्यांना न्यायालयात हेलपाटे घालण्यापेक्षा प्रकरण परस्पर बाहेर मिटविणे जास्त सुकर वाटते
अशा अवस्थेत सामान्य माणसाला हतबलता अनुभवायला मिळून त्याचे मत लेखाचा शीर्ष प्रमाणे होऊ शकते
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 05:09
नवीन
असे आहे का ? असेल तर या मुद्यावर चर्चेस अधिक स्कोप असावा .
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 04/17/2018 - 14:12
नवीन
भारतीयांच्या विचारसरणीतच याचे मूळ आहे. आणि याला केवळ पुरुषच नाही तर स्त्रियासुद्धा जबाबदार आहेत असं मला वाटतं. यौनशुचिता ही पुरुष व स्त्रियांच्या मानत इतकी घट्ट बसलिय तीच मुळात बदलणं गरजेचं आहे. इथे मला एक वेगळाच मुद्दा मांडायचाय. तसेच मी केवळ बलात्कार या मुद्याच्या अनुषंगाने बोलत आहे. देश कुठलाही असो, कायदे नियम सर्वत्र अस्तित्वात असतानाही स्त्रियांवर बलात्कार होतात. सगळेच पुरुष वाईट नसतात तसेच कोणतेच आई-बाप मुलांवर वाईट संस्कार करत नाहीत तरीही या घटना घडतात याचा अर्थ संस्कारांपेक्षाही त्या व्यक्तीची मनावृत्तीच याला कारणीभूत आहे. अशी मनोवृत्ती कोणतेही संस्कार बदलवू शकत नाहीत असं मला वाटतं (कदाचित माझी धारणा चुकीचीही असेल). त्यामुळे स्त्रियांनीच (व शक्य असल्यास पुरुषांनीही) यौनशुचितेबद्दलचे निष्कारण जोखड झुगारुन द्यावे. बलात्कार हा एखाद्या अपघाताइतकाच सामान्य समजला गेला पाहिजे. अपघातामुळए जशा शरीरावर व मनावर झालेल्या जखमा भरुन येतात व काही काळाने का असेना ती व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकते तसे बलात्कारीत व्यक्तीला जगता आले पाहिजे. समाजातल्या सर्व स्त्री व पुरुषांनी अशीच धारणा ठेवली तर कोणत्याही बलात्कात पिडीतेला सर्वसामान्यपणे लग्न करता येऊन सामान्य आयुष्य जगता येईल. अर्थातच हे कठुआ किंवा उन्नाव प्रकरणात लागू होणार नाही याची मला जाणीव आहे. तसेच लहान मुलगी असली तरी आता आईने तीला विश्वासात घेऊन शरीरसंबंधांबद्दल माहिती दिली पाहिजे तसेच लहान मुलिंना स्वसंरक्षणाचे धडे पालकांनी देण्याची सोय करावी. माझे हे विचार परिपूर्ण आहेत असा माझा मुळीच दावा नाही. तरीपण असं असावं असं वाटतं.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 05:20
नवीन
प्रतिसादातील विचारांशी बर्यापैकी सहमत , बहुतेक मिपाकर ह्या मुद्यावर अद्याप खुल्या मनाचे आहेत का कारण पुरेशी चर्चा या मुद्यांच्या ओघाने होताना दिसत नाही.
शुचितेच्या मुद्द्या सोबत स्त्रीलाच दोषी ठरवण्याचा प्रकार जोडलेला असतो तो बाजूस ठेऊन स्त्रीच्या निवड स्वातंत्र्यास महत्व आणि निवड स्वातंत्र्याचा आदर या बाबत सामाजिक जागृतीची गरज असावीच पण सोबत विवीध कथासूत्रांचा narrative समाज मनावर मोठा प्रभाव असतो, स्त्रीच्या निवड स्वातंत्र्यास महत्व आणि निवड स्वातंत्र्याचा आदर निर्माण करणार्या पर्यायी कथा सूत्रांची रचना आणि प्रसारण टिव्ही धारावाहीके आणि चिरपटाच्या माध्यमातून
करणे आणि त्यातील सध्याच्या कथासूत्रांची उपरोक्त मुद्यांच्या आधारे चिकित्साही महत्वाची असावी असे वाटत
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 04/17/2018 - 19:17
नवीन
अलिकडे बलात्कारांच्या संख्येत आणि त्यातील निर्घृणपणात जी वाढ झालेली दिसून येत आहे, त्यामागचे एक महत्वाचे कारण जे असावे असे वाटते, त्याकडे फारसे कुणी लक्ष दिल्याचे दिसत नाही.
हल्ली प्रत्येकाच्या खिशात मोबाईल, त्यात अगदी स्वस्त इंटरनेट आणि त्यामुळे केंव्हाही, कुठेही, कितीही पोर्न बघण्याची झालेली सोय, यामुळे शाळकरी मुलापासून ते तथाकथित थोर आदरणीय स्वामी बापू इ. पर्यंत काही पुरुषांमधील बेछूट सुटलेली कामांधता ... हे एक महत्वाचे कारण असावे. काट्याने काटा निघतो तसे आधुनिक तंत्राज्ञानानेच यावर मात करण्यासाठी सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. भलेही यामुळे तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आल्याची हाकाटी पिटली जावो.
- Log in or register to post comments
व
वीणा३
Tue, 04/17/2018 - 20:00
नवीन
१) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ?
घरातून :
(मुलं = मुलगा आणि मुलगी )
प्रत्येक घरात मुलांना स्वतःचे आणि दुसऱ्याचे हक्क याबाबत सांगितलं गेलं पाहिजे. त्यांनी कधीही वाईट गोष्टींची सुरवात करू नये आणि त्यांच्या बरोबर वाईट गोष्ट होत असेल तर गप्प बसू नये हे सतत सांगितलं गेलं पाहिजे.
बरीच अभ्यासात हुशार असलेली मुलं शारीरिक ताकदीत कमी असतात, तरीही त्यांना समोरच्याला दुखापत पोचवण्याच्या काही ट्रिक्स माहिती पाहिजेत.
मुलीला - "तू मुलगी आहेस म्हणून " ने सुरु होणारी बरीच पारंपरिक वाक्य बोलायचं टाळलं गेलं पाहिजे.
मुलांना घरातून सतत सांगितलं पाहिजे कि तुझी चूक नसेल तर आम्ही तुझी मदत करायचा १००% प्रयत्न करू.
स्वतः आई वडिलांचे एक मेणबरबरच वागणं आदर आणि मैत्रीपूर्ण पाहिजे. "हि बायकांची कामं / हि पुरुषांची कामं" इ बोलणं टाळलं पाहिजे. माझा मुलगा जेव्हा मला विचारतो कि तू स्वयंपाक का करतेस तेव्हा "मला जास्त चांगला जमतो म्हणून मी करते, तुझ्या बाबाला जास्त चांगला जमत असता तर त्याने केला असता" किंवा "घरात ४ काम आहेत थोडी मी थोडी तुझ्या बाबाने वाटून घेतली आहेत " अशा पद्धतीची उत्तर देणे, किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे आलटून पालटून कामं करणे.
खास करून वयात आलेल्या मुलांना (मुलग्यांना ) हे नीट सांगितलं पाहिजे कि, "तुला स्त्री च्या शरीराचं आकर्षण वाटणं साहजिक आहे, पण ते विचित्र पद्धतीने व्यक्त केलंस तर त्या स्त्री ला मानसिक / शारीरिक त्रास होईल, जे अतिशय चुकीचं आहे. आणि इथे जर तू चुकीचा वागलास तर तू आमचा पाठिंबा गमावशील. तुला एखादी मुलगी आवडते तर तिलाही तू आवडावास हे तुला वाटत असेल तरी तसाच होईल असं नाही. जर एखादी मुलगी आवडली तर तू तिला चांगल्या पद्धतीने विचारू शकतोस. जर ती नाही म्हणाली त्याचा अर्थ "नाही" असाच आहे." -
माझा प्लॅन - अमेरिकेत "law and order SVU (special victim unit )" नावाची सिरीज लागते. त्यात न्यू यॉर्क पोलीस वेगवेगळ्या प्रकारचे बलात्कार आणि abuse शी समबंधित गुन्हे हाताळताना दिसतात. मुलगा १३ वर्षाचा झाला कि त्याला त्याचे सगळे भाग बघायला लावणार आहे, तुझ्या बरोबर काय काय होऊ शकत आणि तुझ्या वागण्यामुळे कोणाचं किती वाईट होऊ शकत किंवा पालकांना किती त्रास होऊ शकतो - हे बघून ठेव, मित्र निवडताना नीट विचार कर हे सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं - एकवेळ आनंदाच्या वेळी आम्हाला विसरला तरी चालेल पण प्लिज प्लिज - तू प्रॉब्लेम मध्ये असशील तर पहिल्यांदी आम्हाला सांग - सगळं खरं सांग, आम्ही शक्य ती शक्य तेवढी मदत करायचा प्रयत्न करू.
सामाजिक बदल - हे कसे करायचे माहित नाही पण गरजेचे आहेत असं वाटत.
१. मेणबत्ती मोर्चा फक्त एका रेप साठी काढण्याऐवजी न्यायदान पद्धत प्रचंड वेगवान होण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. फक्त रेप केसेस नाहीत तर एकूणच "आपल्यावर अन्याय होतोय, इथे न्याय मिळणं शक्यच नाही, आपला बदला आपल्यालाच घ्यायला लागेल " हि भावना कमी करण्याची एकूणच अतिशय गरज आहे. समाजातल्या प्रत्यके निर्दोष व्यक्तीला आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास आला पाहिजे. म्हणजे कुठली तरी चीड कुठेतरी काढण्यासाठी बलात्कार करायचा हे तरी कारण राहणार नाही (अर्थात अशा माणसांना कारणांची गरज नसतेच)
२. भारतात मानसोपचार तज्ञ / कॉऊन्सिलर यांची संख्या वाढण्याची खूप गरज आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी (शाळा, पोलीस, सरकारी, खासगी नोकऱ्या ) मानसोपचार तज्ज्ञ / कॉऊन्सिलर पूर्णवेळ उपलब्ध असले पाहिजेत. बरेच त्रास कधीच समोरच येत नाहीत.
३. नाटक / पुस्तक / लेख सिनेमे - या प्रत्येक ठिकाणी स्त्री बरोबर वागण्याची पद्धत नीट दाखवली गेली पाहिजे. छेड काढली तरी पोरगी पटते, किंवा छेड काढणं हा पोरगी पटवण्याचा राजमार्ग आहे किंवा ती पटेपर्यंत छेड काढत राहावी हे दाखवणं बंद झालं पाहिजे. जमल्यास स्त्री वर बलात्कार / छेडछाड होत असताना तिने काही ट्रिक्स वापसून स्वतःची स्वतः सुटका करून घेतली हे दाखवावं (दर वेळेला हिरो येऊन वाचवतोय हे बघून वैताग आलाय). अजूनही जमल्यास नुकताच बलात्कार झालेल्या स्त्री ने बलात्कार करणाऱ्या पुरुषाला "अय्यो हा बलात्कार होता!!!", "काय धड जमत नाही आणि आला म्हणे बलात्कार करायला" अशा टाईप चा डायलॉग / लुक मारावा (भरपूर सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी). थोडक्यात बलात्कार म्हणजे स्त्री चा आयुष्य संपल ह्या गोष्टीचा जो प्रचंड पगडा लोकांवर आहे तो कमी करायला मदत करावी. अजूनही जमल्यास - वडील किंवा भावाचा बदल - त्यांच्यावरच बलात्कार - मारामारी इ इ करून घेतलेला दाखवावा . दोन पुरुषांचं भांडण झालं तर एकमेक्नावर बलात्कार केलेत / सुपारी देऊन करून घेतले - असं दाखवावा . तो माणूस आयुष्यातून उठेल, त्याच्या घरच्यांना लांब ठेवावं. नाटक / सिनेमाचं समाजावर प्रभाव असतो म्हणतात, त्यांनी घरातल्या बाई वर बदला म्हणून बलात्कार केला असं दाखवण्यापेक्षा, पुरुषाने बदला म्हणून त्या पुरुषावर बलात्कार केला /करवून घेतला असं दाखवायला हरकत नाही.
५. बलात्कार हा एखाद्या अपघाताइतकाच सामान्य समजला गेला पाहिजे.
+१००० - जर स्वतःच्या मुलीला एखाद्या अप्रिय (अगदी धक्काबुक्की, छेडछाड ) घटनेला सामोरं जायला लागलं तर, छोट्या ट्रिकस शिकवून ठेवाव्यात.शारीरिक त्रास दिला तर
१. डोळ्यात बोटं घालायचा प्रयत्न कर,
२. कान पिरगाळ,
३. दोन पायाच्या मध्ये जोर लावून गुढग्याने मारायचा प्रयत्न कर,
४. सतत विचार कर कि मी काय केला तर हा माझ्या अंगापासून लांब जायची शक्यता आहे.
५. अगदी ओकारी काढता आली तर काढ. किळस वाटून, घाबरून कशाने का होईना त्याला तुला शारीरिक त्रास देण्यापासून थांबवायचा प्रयत्न कर.
६. आसपास काही त्याला मारता येईल का असं बघ
७. चेहरा घाबरलेला रडका दिसणार नाही असा प्रयत्न कर, कारण ही माणसं विकृत असतात, आपल्यामुळे समोरच्याला त्रास होतोय हे त्यांचं टॉनिक असतं. ८. सगळ्यात महत्वाचं - do not give up .
मी एकुलती एक मुलगी. मी लहान असताना शेजारी एक कुटुंब राहायचं त्यांना २ मुलं २ मुली, खेळायला गेले कि चौघं पण माझ्यावर एकत्र ओरडायचे, माझ्या मागे मारल्यासारखं करत धावायचे, मी घाबरायचे, एकदा वडलांनी बघितला आणि मला सांगितलं कि परत असं केलं ना तर घट्ट हात आवळ जोराने दात ओठ खात चिडून ओरड "ए मला मारू नको नाहीतर मी पण मारेन" - खरोखर शक्यतो मारू नको पण दगड बघून ठेव. मी घबराट असल्याने २-३ वेळा मला सांगायला लागलं, आणि मग मी ते एकदा केलं. त्यानंतर कधीही सगळे एकत्र होऊन माझ्यावर आरडाओरडा केला नाही.
वडिलांनी सांगितलं कि आपण घाबरलो तरी तसं कधीच दाखवायचं नाही उलट जास्त चिडून दखवायचं, समोरचा पण आपल्याला जोखत असतो. घाबरलो असं दिसलं तर जोर चढतो, चिडलोय असं दिसला तर तोच माणूस घाबरायची शक्यता असते. मुंगी सुद्धा चावते हे लक्षात ठेव.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 04/18/2018 - 05:17
नवीन
बऱ्याच अंशी सहमत आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 04/18/2018 - 08:59
नवीन
पालकत्व पार पाडण्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 10:55
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 04/18/2018 - 11:54
नवीन
मच्छिविक्रेत्या कोळीनी, भाजीवाल्या गर्दीच्या ठिकाणी परपुरूषाणे त्यांच्या शरीराला स्पर्श केला तर आकाशपाताळ एक करतात. स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला जागीच शाब्दिक व शारीरिक शिक्षा करतात. हेच नेमकं बहुतांश स्त्रियांना जमत नाही, त्याचा फायदा आंबटशौकीन घेत असतात.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 04/17/2018 - 20:04
नवीन
https://mariawirthblog.wordpress.com/2014/01/27/why-this-focus-on-rapes-in-india-by-world-media/amp/?__twitter_impression=true
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 11:36
नवीन
यातील इतर देशांतील मिडिया रिप्रेझेन्टेशन या धाग्याच्या परिघात येत नसले तरी तिकदच्या धाग्यात बर्यापैकी सहमत होत माझे मत मांडले आहे. मारीयांचे एक विधान मात्र अधिक वस्तुनिष्ठ पणे या धाग्याच्या कक्षेत समजून घ्यावे लागेल.
युद्धा दरम्यान सशस्त्र सन्घर्षा दरम्यान प्राप्त होणार्या स्त्रीयांचे लैन्गिक शोषण (याची सुद्धा निष्पक्शतेला सोडून एकान्गी बातमीदारी वगैरे केली जाते पण तो विषय सध्या येथील चर्चेत अवान्तर ठरेल) ब्लॉग लेखिका म्हणतात तसे हे प्रकरण अगदी धर्माचा आधार घेऊनही केले जाताना दिसते, यात बहुतेक धर्म आणि देश अपवाद नसावेत. पण इस्लामिक ग्रन्थां मध्ये निश्चितपणे यास आधिक आधार दिला गेला आणि अधिक छळ तोही अनरेकॉर्डेड झाला असावा सगळ्यात अलिकडचे प्रकरण याझीदी स्त्रीयांच्या लैंगीक गुलामगिरीकरुन घेण्याचे पण हे परदेशातले झाले. असे प्रकार जपान ने दुसर्या महायुद्धात चीन मध्ये केले . बर्याच देशान्चा बराच इतिहास असावा .
अर्थात ह्या धाग्याचा उद्देश भारत आणि वस्तुनिष्ठता हा नक्कीच आधार आहे. आपल्या देशात मध्ययुगात युद्ध आणि सन्घर्षा दरम्यान लैन्गीक शोषण सती प्रथेपर्यंत स्त्रीला जावे लागले ते वेगळ्या भारता बाहेरच्या धर्मग्रन्थाच्या प्रभावाने अधिक हे खरे. (तरीही अलिकडे एका स्त्री कलाकाराने म्हटले तसे युद्धा दरम्यान शोषण झालेली स्त्री सुद्धा सती अथवा इतर प्रथेस बळी न घालता स्विकारावयास हवी , तिने न केलेल्या चुकिची तिला सजा देणार्या प्रथात हशील नाही. पण या नाण्याला भारतीय साहित्यात तुरळक एखाद दोन पण काही दुर्दैवी पौराणिक उल्लेख आहेत. ( तुम्हाला कल्पना नसली तरी तुमचे धार्मिक विरोधक त्याला बरोबर हाय लाईट करत असतात) जी स्त्री पतिव्रता आहे तिचा पती युद्धात अजिन्क्य असतो अशी पहिली थेअरी , मग त्याला जोडून युद्धात सगळे माफ या इस्लामी पद्धतीने नसेल पण वाईट प्रवृत्तीच्या राक्षसीय प्रवृत्तीचा युद्धात विनाश करण्यासाठी अशा व्यक्तीच्या पत्नीच्या पातिव्रत्याचे भंग हनन झाले तर तो युद्धात सहज हरेल असा बादरायण आणि घृणास्पद तर्क कदाचित प्रक्षिप्त पौराणिक उल्लेखातून दिसतो ; इस्लाम प्रमाणे या तर्कान्चा प्रभाव असलेल्या घटना प्रमाण इतिहासात दिसत नाही , पौराणिक साहित्यातही उल्लेख अपवादान्म्त्मकच आहेत, पण रामाय्णा सारख्या कथेचा जनमानसावर प्रभाव असूनही काही प्रमाणात हरलेल्या राजाचा जनान खाना जिन्कलेला राजा आपल्या जनान खान्याला जोडण्याचे उल्लेख रावनवहो सारख्या प्राकृत साहित्य ते शिंद्यांनी होळकरांच्या स्त्रीस बंदीवासात ठेवणे अशा घटना दिसतात. मुख्य म्हणजे हे उल्लेख असलेल्या पौराणिक साहित्याला स्मृतींचा अथवा वेदांचा आधार नव्हता चुभूदेघेऑ) त्यामुळे असेल कदाचित पण प्रमाण साधनांच्या इतिहासात असे घडल्याचे आधार आतापर्यंत तरी वाचनात आले नाहीत .
ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी एक वृंदेची अशी एक कथा आहे , आणि मग वाल्मिकी रामायणात रावणाच्या शस्त्र प्राप्तीत व्यत्यय आणण्यासाठी अंगदाने मंदोदरीला रावणासमोर आणल्याचा उल्लेख क्रिटीकल एडीशन सोडून इतरत्र वेगळ्या एडीशन मध्ये असावा , पण या उल्लेखास वृंदा कथेचा उल्लेख न करता तसाच आधार देण्याचा प्रयत्न काही भारत बाह्य प्रक्षिप्त रामायण आवृत्तीत काही उल्लेख आंतरजाल आणि इंग्रजी विकिपीडियातील मंदोदरी विषयक लेखातून दिसतात . ( मंदोदरी विषयक उल्लेख एका संस्कृत जाणकार व्यक्तीस तपासण्याची विनंती केली आहे . चुभूदेघे) पौराणिक कथेत पातिव्रत्याची परीक्षा सारख्या आजच्या कालातल्या मापदंंडाने टाळण्या जोग्या कथाही दिसतात पण मुख्य म्हणजे वरच्या एका प्रतिसादात म्हटले गेल्या प्रमाणे दृष्य शुचिता , स्पर्ष शुचिता , योनी शुचिताच्या सन्कल्पनांना अवाजवी महत्व दिल्यामुळे आपल्याकडिल चुकीच्या कल्पना रंगवणार्या पौराणिक कविंचे फावले असावे. जे काही असेल . आपल्या पौराणिक साहित्यातील या मर्यादेस कधी शब्दपुजेचा मान मिळाला नव्हता आणि पुढेही मिळू नये एवढेच नव्हे तर शुचितान्चे अवडंबर बाजूस ठेऊन स्त्रीचा मोकळ्या मनाने आदर करण्याच्या सांस्कृतिक संवर्धनाची गरज असावी असे वाटते.
चुभूदेघे .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 12:13
नवीन
उपरोक्त लिहिताना काही जातक कथांकडे निर्देश करण्याचे राहून गेले . सर्वच जातक कथा सारख्या नाही पण , बोटावर मोजक्या जातक कथात गृहस्थ जिवन व्यक्तीस संसाराचा मोह सोडून संन्यास घेण्याचे पटविण्यासाठी स्त्री चारित्र्याबद्दल संशयी वातावरण निर्मितीचे पयोग आहेत. बघा प्रत्येक स्त्री व्याभिचारी असू शकते त्याने दुख्ख येते त्या पेक्षा संसराचा मोह सोड अशी ती थेअरी . अर्थात रामायण कथासुत्राने स्पर्धा दिल्याने भारतातून मागे पडली पण स्त्रीयांना ती थेअरी सिद्ध करावयास शुचितांवर भर देणारा धार्मिक स्पर्धात्मक प्रभाव पडत गेला असेल ?
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 04/17/2018 - 23:10
नवीन
बलात्कार ह्या विषयावर भारतीय माध्यमे थोडा जास्तच भर देतात आणि त्यांत सुद्धा बलात्काराच्या लैंगिक दृष्टिकोनामुळे जास्त वाचक/दर्शक भेटतील ही त्यांची अपेक्षा असते. बहुतेक वेळा हि गोष्ट मला बलात्कार पेक्षा जास्त किळसवाणी वाटते आणि मी ह्या बातम्या वाचत नाही आणि त्यातील चर्चेत सुद्धा भाग घेत नाही.
अनेक देशांत फिरून मी असे ठाम पाने म्हणू शकते भारतात स्त्रियांचे जास्त उत्पिडन होत आहे अश्यातला प्रकार नाही पण चूल आणि मूळ सोडून महिला घरा बाहेर पडून स्व कतृत्व दाखवायला लागली कि अश्या प्रकारांची रिस्क हि असतेच. (म्हणून घराबाहेर पडू नये असा निष्कर्ष काढू नये).
** मानसकिता बदलायला पाहिजे **
ह्यापेक्षा मूर्खपणाची अपेक्षा असू शकत नाही. समाजाची मानसिकता प्लॅनिंग करून बदलत नाही (नेहरूंना विचारा). ती आपोआप बदलते.
पुरुष आणि स्त्री ह्या मध्ये स्त्री हे जास्त "इन डिमांड" लिंग आहे त्यामुळे टोमणे, नको तिथे हात लावणे, विकृत चाळे कधी कधी बलात्कार ह्या गोष्टींना आधुनिक स्त्रीला सामोरे जावे लागेलच आणि इतर कुणी काही तरी करावे ह्यापेक्षा अश्या गोष्टींना आपल्या प्रमाणे प्रत्येक महिलेने तोंड द्यायला तयार राहायला पाहिजे. त्याला काहीही उपाय नाही.
आता ८ वर्ष्यांच्या मुलीवर वगैरे बलात्कार होतात ते पूर्णपणे विकृती आहे. अश्या विघातक व्यक्तीसाठी कायदा आणि कोर्टानी खरेखोर कंबर कसायाला पाहिजे. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा जर २० वर्षे खटला चालून सुटणार असेल तर इतर सर्व काही व्यर्थ आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 04:19
नवीन
ह्या बातम्या नकळत मेन स्ट्रीम मेडीया मधील सब्टल पॉर्नचे काम करतात का अशी आपल्या प्रमाणे शंका वाटते. अशा बातम्यांसोबत मागच्या एखाद्या केस मधील न्यायालयाने शीक्षा दिलेली बातमी देण्याचा सुद्धा मिडीयाने आवर्जून पाळावयास हवा असे वाटते. कारण काही अपवाद वगळता शीक्षा दिलेल्या बहुतेक बातम्या येत नसाव्यात किंवा आतल्या पानावर जात असाव्यात असे वाटते.
छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना ओप्न जेल टाईप - रस्ते झाडण्यासारख्या किंवा अजून काही छोट्या शीक्षा पण वेगवान शीक्षा देण्याचा आधीकार स्थानिक महिला आयोगांना देण्यास हरकत नसावी असे वाटते. अधिक शीक्षेसाठी खटला पुढे न्यायालयात चालवण्याची सोय असावी.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 04/23/2018 - 17:10
नवीन
ह्यापेक्षा मूर्खपणाची अपेक्षा असू शकत नाही. समाजाची मानसिकता प्लॅनिंग करून बदलत नाही (नेहरूंना विचारा). ती आपोआप बदलते.
आहाहाहा, या वाक्यासाठी तुम्हाला 10000 टाळ्या.. इतकं मुद्देसूद आणि नेमकं मला कधीच लिहिता आलं नसत.
- Log in or register to post comments
T
Topi
Wed, 04/18/2018 - 13:55
नवीन
संस्कार आणि संस्कृती हे घटक लैंगिक अत्याचार होत असताना उतपिडन करणाऱ्या पुरुषास थोपवू शकत नाहीत
अन्य वेळी संस्कारी आणि शांत असणारे पुरुषही आत्याचार करून जातात
नंतर कदाचित पश्चाताप करितही असतील परंतु संधी उपलब्ध आहे तर ती का सोडावी असा विचार मनुष्याचा असतो नरक स्वर्ग कोणी पाहिलाय जो होगा देखा जायेगा
असा तात्कालिक विचार होतो असे वाटते
यापेक्षा स्त्रियांनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी सरंक्षण हा विषय मुख्य मानून वागले पाहिजे
आणि त्या रीतीने आपल्या लहान मूलामुलींना देखील शिकविले पाहिजे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 15:26
नवीन
इतरांना काय वाटते ?
- Log in or register to post comments
T
Topi
Wed, 04/18/2018 - 14:00
नवीन
बलात्काराच्या आरोपीला फाशीची किंवा अधिक कठोरात कठोर शिक्षा सुनावली तरी ,
त्यानंतर होणाऱ्या इतर घटनांमध्ये त्याची भीती वाटून बलात्कार कमी झाले किंवा नाही यासंबंधित काही सर्वे वगैरे झाला आहे का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 04/18/2018 - 15:33
नवीन
बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची सजा असेल तर गुन्हेगार त्या स्त्रीला पुरावा नष्ट करण्यासाठी ठारच मारून टाकेल.
(नाहीतरी बलात्काराला फाशीच आहे आणि खून केला तरी फाशीच)
याचमुळे बहुसंख्य कायदेपंडित बलात्काराला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याच्या विरुद्ध आहेत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 04/18/2018 - 15:08
नवीन
विक्राळ समस्या डोळ्यासमोर दिसते, त्याचे भीषण परिणाम देखील जाणवतात, मुळापासुन काहितरी उपचार हवा हे देखील कळतं... पण उपाय काहि सुचत नाहि :(
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 04/18/2018 - 16:19
नवीन
लोकांची मानसिकता बदलणे हाच एकमेव उपाय सुचतो पण तेही एखाद्यादुसर्या छोट्या समुहाकरता करणे शक्य आहे , कोटीच्या कोटी लोकांची मानसिकता कशी बदलणार ?
खरंच अवघड प्रश्न आहे !
भारत खरंच स्त्रीयांसाठी अवघड देश आहे ! मी न्युयोर्क पहातोय अन आधी रियाध पाहिलं आहे ! ह्या दोन्ही ठिकाणी स्त्रीया मुंबई दिल्लीच्या तुलनेत नक्कीच जास्त सुरक्षित आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे !
( आता लगेच माझ्यावर देशद्रोहाचा आरोप करु नका , मी तर एकदम ओपनली सनातनी हिंदु आहे :P पण जे चुकीचे दिसत आहे ते मान्य करायला हरकत नसावी. यत्र नार्यस्तु पुज्यन्ते वगैरे वगैरे निव्वळ गफ्फा आहे , गेली किमान हजार वर्षे स्त्रीयांना केवळ उपभोग्य वस्तु मानणे ही विचारधारा लोकांच्यासाठी अत्यंत सामान्य झालेली आहे. जोवर काही फंडामेन्टल बदल होणार नाहीत तोवर हि मान्सिकता सुधारणे अशक्य वाटते .)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/18/2018 - 18:58
नवीन
कोणते ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 04/18/2018 - 21:12
नवीन
अनेक लेव्हलला अनेक फंडामेन्टल बदल केले पाहिजेत . आणि बहुतांश सारेच मानसिकतेतील फरक आहेत. उदा.
१) सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही स्त्रीवर होणारा अन्याय हा केवळ एका व्यक्तीवर होणारा अन्याय नसुन आसपासच्या सार्या समाजवर होणारा अन्याय आहे आणि त्याविरुध्द पेटुन उठणे ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे हे मनावर ठामपणे बिंबवले गेले पाहिजे !
( माझा वैयक्तिक अनुभव सांगतो एकः मी एकदा मुंबई लोकलने रात्री उशीरा प्रवास करत होतो, बायको सोबत होती, तेव्हा एका स्टेशनवर २-४ पोरं डब्यात चढली अन त्यात्ला एक जण म्हणाला " औरतोंके लिये अलग डब्बा हो के भी क्याँ चढती है मर्दोंके डिब्बे मे" आणि काहीबाही .... मला ऐकु आलं , आसपासच्याही लोकांना ऐकु आल , मी शांतपणे म्हणालो " काय म्हणालास , परत बोल" तेवढ्यात मागुन दोन चार जण भडकुन म्हणाले , " अरे विचारर्तोस काय , दोन कानाखाली लाऊन दे म्हणजे अक्कल येईल त्याला." पोरगं जागच्या जागी गळपटलं . मी त्या पोरांना म्हणालो " विचार करुन बोलायचं, ही मुंबई आहे. " त्या दिवशी मी जर एकटा पडलो असतो तर कदाचित राडा झाला असता आय डोन्ट नो कि काय झालं असतं. पण जेव्हा लोकं सामुहिकपणे चुक ते चुक म्हणायला लागतात तेव्हा अन्यायला फारसं काही करत येत नाही ! मुंबईत किमान थोड्याफार प्रमाणात तरी लोकांची सतत्सद्विवेक बुध्दी जागृत असल्याचे मला जाणवले आहे , दिल्लीत अन नॉर्थ मध्ये विवेक बिवेक असलं काही नसतंय म्हणुनच तिकडं करा जपुन रहायचं . )
२) तरुण पोरापोरींच्या बाबतीत:
लडकी की ना का मतलब हां होता है, किंव्वा हसी तो फसीं असले भोंगळ विचार लोकांच्या मनतुन काढुन टाकण्यासाठी पोरींनी एकदम स्पष्ट बोलाय्ला सुरुवात करायला हवी . एकदम स्पष्ट सिग्नलिंग मेथड असायला हवी ! तुमचा नकार इतका स्पष्ट आणि फर्म असायला हवा कि समोरच्याच्या डोक्याला झिणझिण्याच आल्या पाहिजेत . नुकत्याच एका ओळखीतल्या स्त्री व्यक्तीने फेसबुक वर तिच्याशी कोणीतरी आक्षेपार्ह भाषा वापरुन लगट करायचा प्रयत्न केला तर सरळ स्क्रीन शॉट घेवुन टॅग करुन नावासकट शेयर केले ! विषयच कट , ५०० १००० फ्रेंडससमोर त्या लगट करणार्या पुरुषाची बिनपाण्याने केली! सदर व्यक्ती आयुष्यात परत फेसबुकवर असले काही करु शकेल असे वाटत नाही ! ती पोस्ट मी घरातल्या सगळ्यांना दाखवली होती . This is the right approach to deal with unwanted approaches. Don't even tolerate once !
तुमचा " नॉट अॅव्हेलेबल" हा सिगन्ल इतका स्पष्ट हवा की कोणाचे डेरिंगच होता कामा नये तुम्हाला अॅप्रोच करायचे ! हां अर्थात तुम्ही अॅव्हेलेबल असाल आणि किणी अनवॉन्टेड तुम्हाला अॅप्रोच करत असेल तर किमान समोरच्याला दोन संधी तरी द्या नकार समजुन घ्यायच्या , तरीही तिसर्यांदा त्याने अॅप्रोच केले तर मग डोक्याल जिणझिण्या येतेल इतका स्पष्ट नकार द्या !
३) ह्या फेमीनाझी लोकांना आवर घातला पाहिजे . असल्या लोकांच्या अतातायीपणामुळे स्त्री पुरुष समानन्ता असावी अशा विचारचीमाणसेही अलिप्त रहातात, एक सोप्पा थंबरुल आहे : जी प्रेगनंट आहे फक्त ती स्पेशल स्त्री आहे असे समजुन तिला स्पेशल प्रिव्हिलेजेस मिळावेत , बाकी सार्यांना पुरुष सम्जुन समान वागणुक मिळावी समान संधी , समान कंपेन्सेशन, समान कपडे घालयचा अधिकार , समान पॅरेंटल लीव्ह , समान पोटगी , समान गुन्ह्यांना समान शिक्षा , समान प्रॉपर्टी राईट्स . ऑल ईक्वल !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/19/2018 - 06:14
नवीन
+१
फक्त एक छोटिशी तांत्रिक दुरुस्ती...
"...बाकी सार्यांना पुरुष सम्जुन समान वागणुक मिळावी... ऐवजी "बाकी सार्यांना एक व्यक्ती समजू समान वागणुक मिळावी".
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/19/2018 - 06:47
नवीन
आणि एक भर...
मुलींना फक्त "हे कर ते कर", "ही सावधगिरी घे ती सावधगिरी घे" असे सांगण्याऐवजी:
१. मुलींना/स्त्रियांना स्वसंरक्षणासंबंधी शारिरीक (उदा: कराटे, इ) व मानसिक (उदा: स्वतःचे मत स्पष्टपणे आणि निर्भिडपणे कसे व्यक्त करावे, इ) मार्गदर्शन करणे जरूर आहे.
२. मुलांना/पुरुषांना आपली मुली/स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी योग्य ठेवण्यासाठी शाळा-कॉलेजातच नाही तर घरातूनही शिक्षण/आग्रह असला पाहिजे. यात घरातल्या स्त्रियांचा सिंहाचा वाटा असेल तर घरातला मुलगा/पुरुष गैरकृत्य करण्यास सहसा धाजावणार नाही. बर्याचदा, "आपला तो बाब्या..." या नियमाने किंवा लाजेकाजेखातर घरातला मुलगा/पुरुष यांचे प्रसंगी खोटे बोलून समर्थन केले जाते अथवा 'मुलाची/पुरुषाची जात' असे म्हणून दुर्लक्ष केले जाते... मुख्य म्हणजे, गैरवर्तनाला असे पाठीला घालण्यात बहुदा घरातल्या स्त्रिया पुढे असतात. या मानसिकतेतून बाहेर येण्याची फार मोठी गरज आहे.
३. संबंधित कायदे तर हवेच पण त्यांचे पालनही कडक असायला हवे. मात्र, कायदे याबाबत तेव्हाच सबळपणे व्यवहारात येतात जेव्हा मार्कस ऑरेलियस यांच्या वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे गैर घटना घडत असता आजूबाजूचे लोक तिच्या विरोधात सक्रियपणे उभे राहतात. जेव्हा आपल्याविरुद्ध आवाज करायलाही लोक घाबरतात अशी खात्री असते तेव्हाच गुंड शिरजोरी करू शकतात. जर आजूबाजूचा जमाव सक्रियपणे विरोधी आहे हे दिसते तेव्हा (कदाचित धोपटून काढले जाईलही या विचाराने) गुंडगिरी गळपाटते. कोणत्याही देशात शासन सर्वकाळ/सर्व जागी उपस्थित राहू शकत नाही, नागरिकांच्या सक्रिय सहभागाच्या अभावी कोणत्याही कायद्याचा पूर्ण फायदा व्यवहारात येऊ शकत नाही.
४. इतर अनेक गोष्टींप्रमाणेच, आपला समाज स्वतःला तोशिश लागेपर्यंत, "आपल्याला काय त्याचे?" याच मनस्थितीत असतो. त्याऐवजी, "समाजाचा सर्वसमावेशक फायदा (common good) असेल त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे" ही सामाजिक मनस्थिती बनणे जरूर आहे. हा प्रवास लहान काळाचा नाही आणि सोपा तर नाहीच नाही... पण त्या मार्गावरून बरेच अंतर घालविल्याशिवाय इतर सर्व प्रयत्न केवळ पुस्तकी अभिप्राय राहतील.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/19/2018 - 07:12
नवीन
+१००
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 08:56
नवीन
समाज सुसंस्कारित असावा.
दररोज संस्कृतीची लाज वाटून घ्या असे शिकवले गेले तर काही उपाय सुचत नाही अशा अनेक बाबी अजून ज्वलंत होणार.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 04/18/2018 - 16:43
नवीन
असणारे खटले, अक्षम्य दिरंगाई आणि पराकोटीचा भ्रष्टाचार (पैश्याने/सत्तेने न्याय विकत घेऊ शकतो हाच माज ) याच्या मुळाशी आहे.
कुणाचीही मुलाहिजा न ठेवता काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आणि या गणंगावर सामाजिक/आर्थिक बहिष्कार टाकला तर नक्कीच आटोक्यात येईल.
परिणामांची दहशत निर्माण झाली पाहीजेच.
सुस्पष्ट नाखु पांढरपेशा
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 04/18/2018 - 20:02
नवीन
मार्कस ऑरेलियस,
मला वाटतं इथलं आकलन वेगळं अभिप्रेत आहे. जिथे बायकांची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो. हे जर-तर विधान आहे. याचा पोकळ गप्पांचा संबंध नाही. जरी असं उदाहरण पाहण्यात नसलं तरी या विधानाची सत्यता किंचितही कमी होत नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/19/2018 - 03:41
नवीन
ह्म्म्म , सहमत आहे ! हे जर-तर विधान आहे हे ही मान्य ! पण ह्याचा अर्थ (बहुतांश आणि सो कॉल्ड) हिंदुंना कळतंय पण वळत नाही असा होतो !
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/19/2018 - 06:04
नवीन
इथे आपण फक्त शहरात राहणाऱ्या बायकांचा दृष्टिकोन गृहीत धरतो आहोत. पण या सगळ्यापासून फार दूरवर ग्रामीण भागातील बायकांना त्यांचे वेगळे प्रश्न भेडसावणारे आहेत. अशिक्षितपणा, बालविवाह, हुंडाबळी, सतत उपासमार व छळ, सरपण व पाणी डोक्यावरून वाहून आणायचा वेळ आणि कष्ट. या सगळ्याची आपल्याला माहिती नसते. तरीही किंवा आयुष्याचा सामना करूनच या बायका निडर होतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यात किती आत्महत्या बायकांच्या असतात? त्या मुलाबाळांना जमेल तसे वाढवत आयुष्याशी झुंजत राहतात. इंग्लंड अमेरिकेच्या आधी भारतात आणि भारतीय उपखंडात महिला पंतप्रधान आणि देशाच्या अध्यक्ष झाल्या हे माझ्या मते पुरेसे बोलके आहे.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/19/2018 - 07:00
नवीन
+१
वर वर पाहता, (शहरी मानसिकतेने विचार केल्यामुळे) विसंगत वाटत असले तरी, खेड्यातल्या स्त्रिया स्वतःवर जास्त निर्भर आणि जास्त निर्भय असतात. वेळप्रसंगी दोन शिव्या देवून आणि दोन दगड मारून आपले संरक्षण करण्यास त्यांना (फुकाचा) संकोच वाटत नाही. केवळ खेड्यातल्याच नव्हे तर शहरातल्या झोपडपट्टीत राहणार्या स्रिया या बाबतीत तुलनेने सधन गटांतील स्त्रियांपेक्षा याबाबतीत अनेक पावले पुढे असतात.
शहरी स्त्रिया, "रस्त्यावर आपण तमाशा केला असे लोक म्हणतील की काय (उर्फ 'जोशी काय म्हणतील' अश्या मनस्थितीमुळे)", या भितीने आजूबाजूला लोक असले तरी आरडाओरडा करण्यास त्यांना संकोच (भिती ?) वाटते. याउलट, "स्त्री स्वतःच विरोध करत नाही तर मग आपण कशाला मध्ये पडावे" या 'सोईस्कर' विचाराने आजूबाजूचे लोकही दुर्लक्ष करतात. पिडीत स्त्रीने पुढाकार घेऊन गुंडाला खडसावले, तर आजूबाजूच्या लोकांपैकी एकदोन जण तरी तिच्या बाजूने पुढे येण्याला धजावतील. असे सतत होत आहे असे दिसून आले तर गुंडगिरीवर आपोआप एक प्रकारे सामाजिक टाच येईल,
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 07:16
नवीन
यात अन्याय काय आहे?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/19/2018 - 07:27
नवीन
हमाली इतकेच शारीरिक कस लागणारे काम आहे. शिवाय तासंतास फुकट जातात ते वेगळेच. १०० मध्ये ९९ वेळा ही कामे बायकाच करतात. त्यावेळी पुरुष चौकात विडया फुकत बसलेले असतात. बरे शहरी बायकांचा यात किती वेळ आणि श्रम फुकट जातात? त्यांना नळ सोडला की पाणी हाताशी असते. गॅस आणि विजेमुळे स्वयंपाक करणेही बरेच सोपे असते.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 07:56
नवीन
मी आणलेलं आहे.
त्यात अन्यायात्मक इ इ काही नसतं.
हे काम बायकाच करतात हा ही जावईशोध आहे.
==============================
कृपया न्यूनगंडी लोकांच्या कादंबर्यांतून ग्रामीण भारत पाहणे सोडून द्या. विहिरी उपसायचं काम मुख्यतः पुरुष करतात. गावांत अत्यंत कष्टाची कामे फक्त पुरुष करतात.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 04/19/2018 - 08:06
नवीन
गावांत अत्यंत कष्टाची कामे फक्त पुरुष करतात.
कष्टाची व्याख्या काय आहे तुमची?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/19/2018 - 08:52
नवीन
मी फक्त ग्रामीण कादंबऱ्या वाचल्यात की जन्मापासून गावात राहिले आहे/राहते आहे याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 10:49
नवीन
मला काही माहीती नाही कोणाची.
================================
सहसा ग्रामदृश्टी कुठून येते याची ही आयडिया आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/19/2018 - 14:24
नवीन
तुम्ही गावात असताना पाणी आणले म्हणालात त्याबद्दल प्रचंड कौतुक! फक्त लहान मुलावर आणि त्याच्या आयाबहिणीवर आतातरी पाणी काढून आणायची वेळ येऊ नये असं वाटतं.
मी आजवर लहान असताना आणि लग्नानंतर नोकरीचा काळ वगळता २ अतिशय दुर्गम खेड्यात रहात आले आहे.
गावातल्या बायका नवऱ्याची मारहाण म्हणजे गंभीर काही समजत नाहीत. परवाच गावच्या मोलकरणीला आणि तिच्या नवऱ्याला पुन्हा हे मारहाणीचे कानावर आले तर पोलिसात देईन म्हणून दम देऊन आले आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 14:34
नवीन
I had a very limited point to make, don't mix hard-work with injustice. देशाच्या, गावाच्या वा घराच्या दैन्यग्रस्त परिस्थितीमुळे काबाडकष्ट करावे लागणे हा अन्याय नव्हे.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/19/2018 - 14:46
नवीन
तशाच आर्थिक परिस्थितीत शहरात राहणाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या गावात मिळत नाहीत हा अन्याय आहे. निर्भर, सुरक्षित बालपण, शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. ज्यांना मिळत नाही त्यांच्यावर तो अन्याय आहे.
कथुवा घटनेत पीडित मुलगी शाळेत जात असती तर या दुर्दैवी घटनेत सापडली नसती अशी एक विफल हळहळ क्षणभर वाटून गेली. तिच्या गुन्हेगाराला फाशी नको त्याहून अमानुष काही शिक्षा असेल तर ती द्यावी.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 15:02
नवीन
असो.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »