Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...

म
माहितगार
Mon, 04/16/2018 - 06:10
🗣 144 प्रतिसाद
भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.
हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्‍या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे १) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ? २) स्त्री अत्यचारांवर रिअ‍ॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअ‍ॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ? ३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ? ४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्‍या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप कसे असावे ? * आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ? * माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही. * या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे. * दुसर्‍या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .

प्रतिक्रिया द्या
47442 वाचन

💬 प्रतिसाद (144)
प
पुंबा गुरुवार, 04/19/2018 - 08:15 नवीन
+११ वर्षानुवर्षे हे पाणी- सरपण आणण्याचे काम करणार्‍या स्त्रियांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. मणक्याचे दुखणे, केस जाणे(खरोखर माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत), मेंदूसंबंधीत काही प्रश्न, स्त्री- आरोग्यासंबंधी अडचणी इ. मराठवाड्यात काही गावांत चक्क १- १.५ किमि वरून पाणी वाहून आणावे लागते डोक्यावर. लहान मुलींना कित्येक वेळा शाळा बुडवून या कामाला जुंपले जाते. चूलीवर तासंतास स्वयंपाक करणार्‍या स्त्रियांना डोळ्याचे तसेच श्वसनसंबंधी होणारे आजार बहुतेकांस माहित आहेतच. ग्रामिण स्त्रियांच्या समस्या खरोखरच शहरी स्त्रियांच्या समस्यांहून निराळ्या आहेत, बर्‍याच प्रमाणात जास्त गंभीर आहेत(शहरी स्त्रीयांच्या प्रश्नांचे अवमुल्यन करण्याचा हेतू नाही). स्त्री- शेतकर्‍याच्या प्रश्नांविषयी शरद जोशींनी शेतकरी चळवळीमध्ये अतिशय मूलगामी चिंतन केले आहे. तर्कशुद्ध पद्धतीने तरीही करूणेचा धागा न हरवू देता जोशींनी स्त्री- प्रश्न व शेतकर्‍यांच्या प्रश्नाची सांगड घालत उपाय सुचवले आहेत. चांदवडची शिदोरी या पुस्तकात याविषयी जोशींचे चिंतन आहे. त्यामुळे स्त्रीयांच्या समस्यावर तीनही स्तरांवर उपाय करण्याची आवश्यकता आहे. १. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या, ज्यात आरोग्य, शिक्षण, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सक्रिय व जाणता सहभाग, सुरक्षा, शेतीचे प्रश्न, स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी जागृती, जातपंचायतीसारख्या प्रतिगामी संस्थांचे महत्व कमी करणे, आर्थिक स्वावलंबित्व वाढवणे, शौचालय- पाणी- पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे, बचत गट चळवळ, विधवा, परित्यक्त्या महिलांची एम्पॉवरमेंट यांचा समावेश करता येईल. २. शहरी - निमशहरी स्त्रियांचे प्रश्नः मुख्य मुद्दा एकट्या राहणार्‍या वा नोकरी- व्यवसायासाठी बाहेर पडणार्‍या स्त्रियांची सुरक्षा, समान वेतन- मानधनाचा मुद्दा, आर्थिक स्वावलंबन, वृद्ध स्त्रियांचे प्रश्न, सुरक्षीत परिवहन सुविधा, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण थांबवणे, संपतीच्निर्मितीचा प्रश्न, मुस्लिम स्त्रियांच्या संबंधात म्हणायचे झाले तर शिक्षण, तलाक- पॉलिगमी- संपत्तीच्या मालकी हक्क यात समानता, एकल मातांचे प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन यात स्त्रियांचा टक्का वाढणे, ऑनलाईन ट्रोलिंग, डिजिटल जेम्डर रिलेटेड गुन्हे, इनोव्हेशन, स्टार्ट अप यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे, पुरूषांचा घरकाम- अपत्यसंगोपन यातील सहभाग वाढणे, मॅटर्निटी रजेचा, पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गोष्टींचा समावेष शहरी- निमशहरी भागातील स्त्रियांसंबंधी चर्चेत करता येतो. ३. वर प्रतिसादांत उल्लेखलेल्या आणि अतिशय गरजेच्या स्त्री- पुरूष दोहोंच्याही मानसिकता बदलासंबंधी काम करावे लागेल. स्त्रीप्रश्नावर संशोधन, तत्वज्ञान, अर्थशास्त्र यातील संशोधन यासाठी अतिशय आवश्यक आहे. जागरूक, सजग, सुजाण पालकत्व यात मह्त्वाची भुमिका बजावू शकते असे वाटते. वरील तिनही मुद्द्यांवर एकाच वेळी काम करावे लागेल, ठामपणे, कृतीशीलपणे व विवेकी वृत्तीने, वितंडवादाने प्रश्न सुटू शकणार नाहीत असे वाटते. स्त्री-पुरूष समानता हा मानवजातीच्या भल्यासाठी आवश्यक असलेला मुद्दा आहे. स्त्री विरूद्ध पुरूष असा हा लढा नाही. समानतावादी विरूद्ध असमान व्यवस्था टिकवू इच्छिणारे असा हा लढा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 08:42 नवीन
वर्षानुवर्षे हे पाणी- सरपण आणण्याचे काम करणार्‍या स्त्रियांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. मणक्याचे दुखणे, केस जाणे(खरोखर माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत), मेंदूसंबंधीत काही प्रश्न, स्त्री- आरोग्यासंबंधी अडचणी इ. मराठवाड्यात काही गावांत चक्क १- १.५ किमि वरून पाणी वाहून आणावे लागते डोक्यावर.
उगाच काहीही. राजस्थानात बायका हजारो वर्षांपासून कितीतरी किलोमिटर्स वरून डोक्यावरून वाहून पाणी आणतात. आजही आणतात. तिथे काही प्रॉब्लेम आला नाही. मराठवाड्याच्या आणि राजस्थानाच्या बायकांची बायोलॉजी वेगळी आहे का? ---------------------------- या गोष्टींचा आणि पाणी आणण्याचा काय संबंध? ------------------------------ एका विशिष्ट खोलीच्या पलिकडे जाऊन पाणी काढले तर तिथल्या पाण्यातल्या काही तत्त्वांमुळे केस जातात. डोक्यावरून आणल्याने नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 04/19/2018 - 08:52 नवीन
And in many places, water sources are far from homes. In Asia and Africa, women walk an average of 3.7 miles per day collecting water. Carrying such loads over long distances can result in strained backs, shoulders, and necks, and other injuries if women have to walk over uneven and steep terrain or on busy roads. The burden is even heavier for women who are pregnant or are also carrying small children. Moreover, pregnant women worry that transporting these heavy loads will lead to early labor or even miscarriage.
लिंकः https://qz.com/1033799/women-still-carry-most-of-the-worlds-water/ आणखी:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2939590/
http://www.downtoearth.org.in/news/fetching-water-is-a-woman-s-responsibility-in-this-arid-rajasthan-village-57420
माझी आई तसेच इतर ग्रामीण महिलांचे विश्व जवळून अनुभवल्याने त्यांच्या दु:खांशी, समस्यांशी फार गहिरा सम्बंध आलेला आहे माझा. माझ्यासाठी हा अतिशय हळवा कोपरा आहे. आपल्याशी वाद घालण्यापेक्षा या विषयावर अधिक चिंतन करणे मला योग्य वाटेल. त्यामुळे कृपा करून त्यांच्या कष्टांचा, दु:खांचा, समस्यांचा अपमान करू नका अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 09:15 नवीन
माझ्यासाठी हा अतिशय हळवा कोपरा आहे.
This ends all the possibilities of an objective discussion. और आप कहें और हम न मानें, ऐसा कभी हो सकता है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 09:40 नवीन
In Asia and Africa, women walk an average of 3.7 miles per day collecting water.
पावनं कुंकडलं मनायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 08:48 नवीन
चूलीवर तासंतास स्वयंपाक करणार्‍या स्त्रियांना डोळ्याचे तसेच श्वसनसंबंधी होणारे आजार बहुतेकांस माहित आहेतच.
याची अधिक माहीती मिळेल? माझं व्यक्तिगत निरीक्षण असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पैसा गुरुवार, 04/19/2018 - 08:57 नवीन
युयुत्सू यांच्या धाग्यात डॉ खरे यांनी या संदर्भात लिंक दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पुंबा गुरुवार, 04/19/2018 - 09:00 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/Chulha-smoke-choking-Indian-women-kids/articleshow/17605667.cms
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2491593/
https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-india
मोदींच्या उज्ज्वला योजनेला म्हणूनच माझे पूर्णतः समर्थन आहे. या योजनेमुळे लाखो महिलांची सुरक्षीत स्वयंपाकाची सोय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 09:33 नवीन
कोणाच्याही नाजूक भावनांना हात घालण्याची इच्छा न करीत ... ======================= एक काळ होता ज्यावेळी खनिज तेलाच्या विहिरीत निघणार्‍या प्राकृतीक वायूचे काय करावे हे कोणासही कळत नसे. त्यावेळी तो असाच जाळून टाकला जाई. मग हिरव्या लोकांनी सुचवलं कि आपण तो जंगले तोडणार्‍या आदिवासींना, इ फुकट देऊ. .... त्यावेळी हे सग्ळं माहितिपुराण पसरावलं गेलं. आपण वापरतो तो नॅचरल गॅस वा एल पी जी आणि लाकडे यांतून तेच प्रदूषक गॅस उत्पन्न होतात. उलट खनिज पदार्थांचे गॅस अधिक विषारी असतात. (सिगारेट पिणारे चिमूटभर तंबाखू जळल्याने मरत नाहीत तर त्यातील अत्यत्यत्यल्प प्रमाणात असलेल्या, मायक्रोग्रॅम मधल्या, खनिज टारने मरतात.) आधुनिक बायकांच्या चुली बंद किचनमधेच असतात. चिमणी लावायचे प्रमाण खूप कमी आहे. हां, नॅचरल गॅस ने एस पी एम निर्माण होता नाही हा एक फायदा आहे. ==================== असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पैसा गुरुवार, 04/19/2018 - 08:55 नवीन
@पुंबा, बहुतेक गोष्टीत सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अभ्या.. गुरुवार, 04/19/2018 - 10:05 नवीन
१. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या, ज्यात आरोग्य, शिक्षण, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सक्रिय व जाणता सहभाग, सुरक्षा, शेतीचे प्रश्न, स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी जागृती, जातपंचायतीसारख्या प्रतिगामी संस्थांचे महत्व कमी करणे, आर्थिक स्वावलंबित्व वाढवणे, शौचालय- पाणी- पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे, बचत गट चळवळ, विधवा, परित्यक्त्या महिलांची एम्पॉवरमेंट यांचा समावेश करता येईल. २. शहरी - निमशहरी स्त्रियांचे प्रश्नः मुख्य मुद्दा एकट्या राहणार्‍या वा नोकरी- व्यवसायासाठी बाहेर पडणार्‍या स्त्रियांची सुरक्षा, समान वेतन- मानधनाचा मुद्दा, आर्थिक स्वावलंबन, वृद्ध स्त्रियांचे प्रश्न, सुरक्षीत परिवहन सुविधा, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण थांबवणे, संपतीच्निर्मितीचा प्रश्न, मुस्लिम स्त्रियांच्या संबंधात म्हणायचे झाले तर शिक्षण, तलाक- पॉलिगमी- संपत्तीच्या मालकी हक्क यात समानता, एकल मातांचे प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन यात स्त्रियांचा टक्का वाढणे, ऑनलाईन ट्रोलिंग, डिजिटल जेम्डर रिलेटेड गुन्हे, इनोव्हेशन, स्टार्ट अप यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे, पुरूषांचा घरकाम- अपत्यसंगोपन यातील सहभाग वाढणे, मॅटर्निटी रजेचा, पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गोष्टींचा समावेष शहरी- निमशहरी भागातील स्त्रियांसंबंधी चर्चेत करता येतो. ३. वर प्रतिसादांत उल्लेखलेल्या आणि अतिशय गरजेच्या स्त्री- पुरूष दोहोंच्याही मानसिकता बदलासंबंधी काम करावे लागेल. स्त्रीप्रश्नावर संशोधन, तत्वज्ञान, अर्थशास्त्र यातील संशोधन यासाठी अतिशय आवश्यक आहे. जागरूक, सजग, सुजाण पालकत्व यात मह्त्वाची भुमिका बजावू शकते असे वाटते. बापरे... तुम्ही तर व्हीजन ३००० मांडलेत. ब्रावो. स्त्री-पुरूष समानता हा मानवजातीच्या भल्यासाठी आवश्यक असलेला मुद्दा आहे. स्त्री विरूद्ध पुरूष असा हा लढा नाही. समानतावादी विरूद्ध असमान व्यवस्था टिकवू इच्छिणारे असा हा लढा आहे. झाला ना गोंधळ? आता कोण कुठली बाजू कधी घ्यायची? समानतावादी आणि समानताविरोधी म्हणजे पंडूचे पाच ते पांडव अन धृतराष्ट्राचे ते कौरव असा सोपा हिशोब नाहीये ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 07:50 नवीन
भारत बायकांसाठी अवघड देश आहे
आणि
* दुसर्‍या देशांशी तुलना अभिप्रेत नाही ,
याला काही अर्थ आहे का? ====================================== खासकरून अधिकांश उरबडवे, न्यूनगंडी लोक देशात असताना असलं शीर्षक आणि असली अट अयोग्य आहे. ===================================== १. भारताचा रेप रेट १९८० पासून २०१८ पर्यंत घातांकित प्रमाणाने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. २. अमेरिका व सर्व प्रगत देशांचा रेप रेट १९८० पासून आजपावेतो घातांकित प्रमाणाने घटत आहे. हे त्यांच्या यंत्रणांचं यश आहे. ३. तरीही २०१६ च्या आसपास अमेरिकेचा रेप रेट हा भारताच्या १५ पट आहे. अगदी त्यामानानं सुसंस्कारित मानलेल्या युरोपातही प्रत्येक देशात भारतापेक्षा ४-५ पट अधिक बलात्कार होतात. ======================================= आणि तरीही --------- १. प्रगत देशात शिक्षण १००% आहे. २. पाश्चात्य देशांत संभोगमूल्ये भारतासाठी कडक नाहीत. नैसर्गिक भावनांची कोंडी म्हणा वा काही, पश्चिमेत तितकी होत नाही. ३. बलात्कारांच्या गुन्ह्यांत प्रगत देशात कव्हिक्शन रेट ९९% आहे जो भारतात खूप कमी आहे. गुन्हा केला तर जवळजवळ सजा होतेच. भारतात (जवळजवळ सर्वच प्रकारचे) गुन्हे करायला जणू काही मोकळीकच आहे! ४. आर्थिक प्रगतीच्या प्रमाणात गुन्हे कमी असतात असं मानलं जातं आणि भारताचा नॉमिनल पर कॅपिटा जीडीपी अमेरिकेपेक्षा ३० पट कमी आहे. ५. बलात्कारांचं अंडररीपोर्टींग पाशाच्त्य देशांतच जास्त आहे. https://www.quora.com/Is-it-true-the-USA-and-Europe-are-more-unsafe-in-terms-of-rape-for-women-compared-to-India ================================== असं असलं तरी आपल्याकडे तथाकथित प्रगत देशांपेक्षा १५ कमी बलात्कार होतात.... आणि याचं मूळ भारतीय विचारधारा, संस्कृतीत, इत्यादिंत आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/19/2018 - 09:04 नवीन
अगदी बरोबर. यावर सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गवि गुरुवार, 04/19/2018 - 08:04 नवीन
एक जनरल मत मांडतो. अनेकदा कराटे वगैरेचा उल्लेख एक मुख्य उपाय म्हणून केला जातो. दोनपाच गुंडमवाली हल्ला करुन आल्यास कराटे वगैरेने मुकाबला इज फिल्मी डेड्रीमिंग at best आणि बुलशिट at worst.. त्यापेक्षा स्त्रीला फायरआर्म लायसेंस सहज मिळेल असं बघणं बेटर. (स्त्रीच्या नावाखाली पुरुषच ती शस्त्रं वापरतील, स्त्रिया गैरवापर करतील इ. आक्षेप येतीलच.)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/19/2018 - 08:19 नवीन
तुमचे म्हणणे खरे असले तरी... 'प्रतिकार होतो आहे' हा मुद्दा बर्‍याच वेळेस गुन्हा पुढच्या पायरीवर जाण्यास प्रतिबंधक ठरतो. याशिवाय, कराटे किंवा तत्सम शिक्षण प्रतिकार करण्यासाठी लागणारे मानसिक धैर्य वाढवते. काहीच संरक्षण नसण्यापेक्षा, किमान प्रतिबंक उपाय तरी हाती असणे, हे केव्हाही जास्त चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि गुरुवार, 04/19/2018 - 08:22 नवीन
यावर फुरसतीत लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 08:34 नवीन
स्त्री जर अन्यथाही पुरुषांइतकाच समान क्षमतांची असेल तर आपल्या इक्वल्सला हाताळण्याकरिता अ‍ॅडीशनल टूल्सची गरज काय? मुलगी + कराटे = मुलगा असा हिशेब कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/19/2018 - 10:20 नवीन
याशिवाय, कराटे किंवा इतर कोणताही एक उपाय सर्व समस्येवर रामबाण उपाय होऊ शकणार नाही. आजार मोठा आहे, जुनाट आहे आणि मुख्य म्हणजे जनमानसात खोलवर रुजून राहिलेला आहे... त्याच्या विरुद्ध, एकमेकांना पूरक असलेले अनेक प्रकारचे उपाय एकत्रितपणे करावे लागतील... काही सोपे व प्रसंग तारून नेणारे असतील, तर काही समस्येच्या मूळावर दूरगामी उपाय करणारे पण किचकट आणि वेळखाऊ असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 08:25 नवीन
स्त्रिया गैरवापर करतील
अर्थातच करतील. करतात. स्त्रीयांना भारतीय संस्कृतीने देवीत्व दिलेले असले तरी त्यांची क्रिमिनॅलिटि पुरुषांच्यापेक्षा अजिबात कमी नाही. ------------------- एक साधं निरीक्षणः भारतात ज्या ज्या राज्यांत, समाजांत सांपत्तिक अधिकार स्त्रीवंशाला जातात नेमक्या तितक्या राज्यातच, समाजांत जेंडर रेशो स्त्रीयांच्या फेवर मधे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
S
sagarpdy गुरुवार, 04/19/2018 - 08:26 नवीन
फार उपयुक्त होईल असं वाटत नाही. किती स्त्रिया पेपर स्प्रे सारखे प्रकार पर्स मध्ये ठेऊन हिंडतात ? लायसन्स सहज मिळणार असेल तरी किती स्त्रियांना ते परवडेल ? पब्लिक प्लेस मध्ये कायम फायरआर्म घेऊन हिंडणे शक्य आहे का ? बाकी सहज फायरआर्म्स पँडोराज बॉक्स आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि गुरुवार, 04/19/2018 - 09:15 नवीन
नीमूट सहन करणं, प्रतिकार न करणं आणि शारीरिक हानि कमी करणं हा उपाय अत्यंत "नीच प्रकारची सूचना" समजला जात असताना उगीच कराटे वगैरे "दिलके बहेलाने के लिए ए गालिब" टाइप उपायांपेक्षा "किमान शारीरिक अपाय" हा गोल साध्य करणारा फायरआर्म्स हा उपायही मान्य होत नाही यात काहीतरी गोची आहे. वुई डोंट वॉन्ट "सॉल्यूशन" बट जस्ट डिस्कशन, असं म्हणावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 09:21 नवीन
जगात सर्वत्र ही समस्या असेलच. सर्वत्र हाच उपाय केलाय का? यशस्वी झालाय का? अमेरिकेत तरी जबरदस्त फेल्यूअर आहे? अ‍ॅनी मोअर डिस्कशन नॉट नीडेड ऑन आर्म्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
S
sagarpdy गुरुवार, 04/19/2018 - 09:26 नवीन
किती स्त्रिया पेपर स्प्रे सारखे प्रकार पर्स मध्ये ठेऊन हिंडतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 04/19/2018 - 15:24 नवीन
स्टन गन वा टेझर बाळगणे हा पण एक चांगला उपाय आहे. हे वापरून समोरच्याला विजेचा झटका दिला जातो ज्यामुळे ती व्यक्ती काही काळ पॅरालाईझ होते. याने जीवित हानी वा अन्य कायमची शारीरिक हानी होत नाही, थोड्या काळाने ही व्यक्ती पूर्ववत होते. स्टन गन अगदी जवळून वापरता येते तर टेझर हे १२-१५ फूट लांब पर्यंत वापरता येतं. याचा आकार फक्त बंदुकीसारखाच नसून फ्लॅश लाईट, लिप स्टिक, की चेन, मोबाईल केस ई प्रकारात सुद्धा मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला रिचार्जेबल बॅटरी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुबोध खरे Fri, 04/20/2018 - 08:27 नवीन
कुठलेही शस्त्र हे त्याच्या स्वतःच्या शक्तीपेक्षा ते वापरणाऱ्यांच्या मानसिक शक्तीवर जास्त अवलंबून असते. दोन उदाहरणे -- १) दिवस ०६ डिसेंबर १९९२ स्थळ- चितोडगड रेल्वे स्टेशन-- बाबरी मशीद पडल्यामुळे शहरात कर्फ्यू होता- मी( वजन ६५ किलो उंची ५'१०" किडकिडीत शरीर यष्टी) लग्नानंतर २ महिन्यात दुसऱ्या हनिमूनसाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशीची गाडी पाहायला १० पावले पुढे गेलो असताना चार जणांच्या गटातील एका हलकटाने आसपास कोणी नाही हे पाहून माझ्या बायकोची छेड काढली. दोन मिनिटात परत आल्यावर बायकोने हि कहाणी सांगितली. मी ताबडतोब जाऊन त्या हलकटाच्या एक सण सणीत मुस्कटात मारली माझा हात आणि त्याचा गाल लालबुंद झाला. त्याचे तिन्ही साथीदार आवाज करीत पुढे आले. मी त्यांना धमकी दिली कि आर्मीतील कमांडो आहे जास्त शहाणपणा कराल तर हाडांची माळ करून गळ्यात घालीन. अख्ख्या स्टेशन वर आम्ही ६ जण आणि लांबवर फक्त स्टेशन मास्तर. पण माझ्या आवाजातील जोर पाहून चाऱ्हीजण मागे हटले. ( अर्थात हा जोर लष्करामुळे आला हे मान्य) पण असेच अनेक प्रसंग लष्कर सोडल्यावर झाले आहेत. कुलाब्याला जात असताना सी एस टी स्थानकाच्या बाहेर बसमध्ये चढायला गेल्यावर एका हलकटाने माझ्या समोरच्या मुलीला धक्का मारला. मी कुणाचीही वाट न पाह्ता त्याच्या कानाखाली आवाज काढून रांगेतून बाहेर हाकलले. आम्ही बस मध्ये चढलो तो हलकट चढला नाही. दुर्दैवाने ती मुलगी गपचूप बायकांच्या सीटवर जाऊन बसली जसा काही घडलेलंच नाही. २) स्थळ विशाखापट्टनम- १९९८. बायको एकटी बाजारात गेली होती. एका हलकटाने बायकोला मागून धक्का दिला. तिने त्याच्या मागे जाऊन खांद्यावर टकटक केले. त्याने वळून पाहताच एक सणसणीत कानफटात मारली. लाल गाल घेऊन तो काही ना बोलता गर्दीत गायब झाला. मुद्दा -- पुरुष सुद्धा( आणि बायका) अशा वेळेस शेपूट घालतात. जाऊ दे कशाला भांडण, लोक काय म्हणतील? गर्दी जमली आहे. म्हणून गुंडांचे फावते. बाकी -- आयत्या वेळेस हातात येईल ते शस्त्र सर्वात चांगले हि बिरबलाची शिकवण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर १० पैकी ५ स्त्रियांनी प्रतिकार करायला सुरुवात केली आणि त्यांच्या नवऱ्याने बापाने भावाने त्यांना साथ दिली तर बहुसंख्य गुंड गर्दीचा गैरफायदा घेऊ धजणार नाहीत. पण लक्षात कोण घेतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
श्वेता२४ Fri, 04/20/2018 - 09:08 नवीन
तुमचे म्हणणे पटले. मलाही एक प्रसंग नमुद करावासा वाटतोय. मी एकदा सीएसटी वरुन लोकलने (हार्बर)रात्री येत असताना स्त्रीयांच्या डब्यात एक मद्यधुंद तरुण मधेच चढला. तो जोरजोरात हातवारे करत दरवाज्याच्या पॅसेजमधून फिरत होता. डब्यात आम्ही तशा 10-12 स्त्रिया होतो पण कोणीच काही बोलेना. सगळ्याच तशा घाबरल्या होत्या (मीही). अचानकच तो आमतच्या दिशेने आत वळला तशी मी जोरात ओरडले बाहेर हो नाहीतर तुडवून मारीन. तसा तो जरा घाबरुन दरवाज्यात थांबला. मी तात्काळ डब्यात लिहीलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. सुदैवाने फोन उचलला गेला व पुढच्या स्टेशनवर एक-दोन होमगार्ड डब्यात चढले व त्याला ताब्यात घेऊन गेले. परंतु हे सगळं होईप्रयंत एकाही स्त्रीने मला पाठींबा दिला नाही की काही बोलल्यादेखील नाहीत याचं आश्चर्य वाटतं. त्या मानाने वेस्टर्न लोकलमधल्या बायका धाडसी आहेत व त्यांच्यात एकी दिसून येते. काही वावगं झालं की लगेच काही संबंध नसला तरी मधे पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/19/2018 - 08:38 नवीन
बंदूक फार "तीक्ष्ण दुधारी (लक्ष्यार्थाने)" शस्त्र आहे, हे अमेरिकेच्या सद्य परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. शिवाय, तो उपाय एकदा खुला केला की त्याला मागे घेणे शक्य होत नाही, हे पण अमेरिकेच्याच उदाहरणात सिद्ध झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
श्वेता२४ गुरुवार, 04/19/2018 - 08:29 नवीन
यांचे प्रतिसाद अत्यंत मौलिक आहेत असं वाटलं
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 10:15 नवीन
काही लोकांना आपलं नागरिकत्व बदलायचं असतं. यात बराच अपराधबोध असतो. मग स्वतःच्या मनाची समज काढायला, लोकांना आपला थातुर मातुर स्टान्स दाखवायला भारत कसा वाइट आहे याचं थोडं प्रदर्शन करायचं असतं. आणि अलिकडे सोशल मिडीयामुळे "तिकडे" ठोकलेल्या बोंबा इकडे व्यवस्थित ऐकू यायची सोय आहे. नेमक्या अशाच मंडळींना भारत आणि विचारसरणी यांचं सुचतं. यातली बहुतांश मंडली भारतात असताना फुकटे आणि दळिद्र जीवन जगत असते. भारत सरकारच्या सबसिडिवर जगतानाचा आणि उत्पन्न चालू होण्याआधी जीवनाचा जो स्तर असतो तीच त्यांची भारताची प्रतिमा असते. दुसर्‍या देशात प्रतिष्ठित कमावती नोकरी, इ मिळाल्याने व्यक्तिगत जीवनमान उंचावल्याने ते नेहमी समृद्ध विकसित देश नि तेव्हाचा गरीब भारत अशीच तुलना करत असतात. भारतात सायकलवर जातानाचे तरुणपण असुरक्षित आणि विदेशात कारमधे जातानाचे प्रौढपण अतिसुरक्षित असेच यांचे डोके चालते. ============================================ आपला देश अतिशय उत्तम संस्कार असलेल्या लोकांचा देश आहे, रादर आधुनिकता येण्यापूर्वी होता. अतिविकसित मानल्या जाणार्‍या स्कँडेनेवियन देशांत तर ५% लोक (होय ५%) हे म्हणायला घाबरत, लाजत नाहीत कि बालसंभोगाची ते कल्पना करतात. http://www.bbc.com/news/magazine-28526106 ------------------ अमेरिकेतले काही सरकारमान्य बालविवाह? http://www.collective-evolution.com/2017/11/29/pedophilia-in-the-us-more-than-200000-children-married-in-the-last-15-years/ =========================== यांच्यामानाने आपण खूप बरे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 04/19/2018 - 10:23 नवीन
धाग्याचा विषय भारतातील परीस्थिती तुलनेने चांगली की वाईट हा नसून भारत स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय व त्याचे मूळ विचारसरणीत आहे हा आहे. चर्चेचा रोख भरकटत आहे असं वाटतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 10:43 नवीन
भारत स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय व त्याचे मूळ विचारसरणीत आहे हा आहे.
याला अजिबात काही अर्थ नाही. कारण ज्या विचारसरणीला या धाग्यावर जबाबदार धरले जात आहे ती तर केव्हापासून लयाला जात आहे. १८५० पासून इंग्रजांनी नवे शिक्षण आणले आणि १९५० पासून नेहरूंनी अतिनवे शिक्षण आणले तेव्हापासून या शिक्षणाचा वा माध्यमांचा स्पर्श झालेले न झालेले अनंत लोक दिवसेंदिवस भारतीय विचारसरणीपासून दूर चालले आहेत. आणि हा धागेवाला (आणि त्याचे अनेक टाळ्यावाजवी प्रतिसादक) म्हणतो कि वाढत्या बलात्कारांचे मूळ या जुन्या भारतीय विचारसरणीत आहे? पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसत. आणि असले तरी त्या विचारसरणिचा प्रभाव कितीतरी पट कमी झालाय. तिथे उत्तर शोधण्यात काय शहाणपणा? अरे, काही अर्थ आहे का असल्या चर्चेला? धागा जाग्यावर आणायला नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
क
कपिलमुनी गुरुवार, 04/19/2018 - 11:37 नवीन
यावंर एक डिटेल लेख लिहून लोकांचे डोळे उघडून त्यांना भारतीय विचारसरणीची ओळख करून द्यावी ही नम्र विनंती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्वेता२४ गुरुवार, 04/19/2018 - 11:24 नवीन
वाढत्या बलात्कारांचे मूळ या जुन्या भारतीय विचारसरणीत आहे? असं धागाकर्त्याने कुठं म्हणलंय? पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसत हे तर अजिबातच पटत नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 12:22 नवीन
सदर धाग्यावर भारतीय विचारसरणीचा उल्लेख कितीतरी जागी झाला आहे. यात कुठेही एकाही प्रतिसादकाला भारतीय विचारसरणी म्हणजे आजच्या आधुनिक शिक्षणाने, वैज्ञानिक दृश्टीकोनाने प्रदान केलेली विचारसरणी असं अभिप्रेत नाही. शिव्या देताना, दुषणं देताना जिला भारतीय विचारसरणी म्हटलं आहे ती पारंपारिकच आहे. हे सिद्ध करण्यात वेळ घालवायची गरज नाही. भारतीयांना विषाद वैगेरे आपल्या परंपरांचाच होतो, त्यात चर्चा करायचा प्रश्नच येत नाही. =========================
हे तर अजिबातच पटत नाही.
का नाही पटत? अगोदरच्या काळात सगळे तुम्हाला ओळखत, लग्नं वेळेत होत, बेकारी नसे, स्थित्यंतरं अव्वाच्या सव्वा नसत, मोबाइलवर पॉर्न लागत नसे, घरी अत्यंत दृढ धार्मिक संस्कार असत, त्यातूनही एखादा वासनेला बळी पडला तर त्याला (स्त्रीच्याच) तप्त पुतळ्याला अलिंगन असल्या सजा असत. युद्धोत्तर बलात्कार नि लव जिहाद सोडलं तर जवळजवळ सन्नाटा असायचा. ============================ २०१५ मधे नागालँडमधे बलात्काराची (इतिहासातली) पहिली केस झाली. (असं मी ऐकलं आहे.). त्यावेळी १० हजार लोकांनी आरोपीला तुरुंगातून काढून मारून टाकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
श्वेता२४ गुरुवार, 04/19/2018 - 13:18 नवीन
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची इतिहासाची (इतर कोणत्याही विद्यापीठाची किंवा पाठ्यक्रमाची पुस्तके पण हेच सांगतात.)प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक स्त्रीजीवन यावरील पुस्तके वाचा. तुमच्या सगळ्या दाव्यातील फोलपणा कळून येईल. या तीनही काळआतल्या स्त्रियांचे अवेळी लग्न होत असे, त्यांना पळवून नेले जाई तसेच या काळातील विधवांवर सर्रास बलात्कार होत व त्यांना वाळीत टाकले जाई त्यामुळे तर काहीजणी वेश्यव्यवसायात ढकलल्या जात. उगाच नाही महात्मा फुल्यांना बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना करावी लागली. असेच एक गृह पंढरपुरात स्थापन केले गेले होते. यावरुन ही समस्या किती गंभीर होती हे लक्षात येईल. याला तुम्ही अत्यंत दृढ धार्मिक संस्कार म्हणता कि काय? आता तुम्हाला शिकविण्यात येणारी इतिहासाची पुस्तके खोटा इतिहास शिकवितात असे म्हणायचे असेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/19/2018 - 13:46 नवीन
| श्वेता ताई अजोनी दिलेले दाखले जास्त मनावर नाही घायचे. जेवढा मनोरंजक भाग आहे फक्त तेवढ्याचाच आस्वाद घायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
श्वेता२४ गुरुवार, 04/19/2018 - 14:11 नवीन
वेळीच हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी जरा जास्तच गंभारपणे घेतलं. यापुढे घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका गुरुवार, 04/19/2018 - 16:11 नवीन
माझे मत (वेळीच) सांगतो. अजोंनि मांडलेले मुद्दे बऱ्याच अंशी रास्त आहेत ( त्यांचे मुद्दे बहुतांश वेळी डेटा आणि फॅक्टस वर आधारित असतात असे माझे निरीक्षण आहे) काही लोकांचं काशातूनही मनोरंजन होऊ शकतं पण त्याला इलाज नाही. तुमचे आणि त्यांचे या धाग्याशी निगडित मुद्दे मनोरंजनासाठी खचितच वाटले नाहीत. त्यामुळे त्यांचे मुद्दे तुम्हाला पटले नाहीत तर त्याचे विश्लेषण जरूर करा, अमच्यासारख्यांच्या ज्ञानात भर पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 14:29 नवीन
विशुमित, खास तुझ्यासाठी अजून काही मनोरंजन ... ======================================= बलात्कार या क्षेत्रात भारताची जी दैदिप्यमान घोडदौड चालू आहे ती अशीच चालू राहिली तर २०-२५ वर्षांत आपण "वन ऑफ द मोस्ट सेफ नेशन्स फॉर विमेन" पासून एक "मोस्ट अनसेफ नेशन" च्या पदाला पोचू. अर्थातच तुला ठावे असेलच जगात केवळ भारतातच ही समस्या नाही. ती अन्य अनेक देशांत आहे. आणि जिथे जिथे या समस्येला वचक बसला आहे तिथे तिथे त्या त्या सरकारांनी तिथल्या लोकांच्या (या धाग्यावरील प्रकट झालेल्या जुनाट) विचारसरणींवरच आघात करून ही समस्या सोडवली आहे! ============================================== याला उत्तर शोधताना "आपली पारंपारिक विचारसरणी" हे कारण मानून जर उपचार चालू केले तर ही घोडदौड अजून १० वर्षे अगोदर पूर्ण होईल असे म्हणणार्‍या आमचे मनोरंजनमूल्य देशास कायमचे उपयोगाचे राहिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 04/19/2018 - 14:39 नवीन
अरे तुरे वाचलेले पाहून मोठ्या भावाने आपल्याला पत्र लिहलेले प्रतीत झाले. असो.. ==== बरं मग करायचे काय आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 15:04 नवीन
माझ्या ठायी पैलेपासूनच बंधुभाव आहे. ==================
बरं मग करायचे काय आता ?
कोणी काहीही केलं तरी तुमचं मनोरंजनच होणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 04/19/2018 - 16:57 नवीन
अरे भावा आपल्या भाऊकीतल्या भाऊकीत मनोरंजन होईल पण ज्या त्रयस्थाला तुझे मुद्दे पटत आहेत त्यांच्या ज्ञानात भर पडेल ना.. तुला लिहायला काय नॅट कमी पडतय का? तु काही बी लिहलं तरी आपला पाठिंबा पहिल्या पासूनच हाय... पुढे काय करायचं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अभ्या.. गुरुवार, 04/19/2018 - 14:29 नवीन
अजोनी दिलेले दाखले जास्त मनावर नाही घायचे. जेवढा मनोरंजक भाग आहे फक्त तेवढ्याचाच आस्वाद घायचा.
हा ना. नाहीतरी आपल्याला कुठं सोल्युशन काढायचेय? एकतर पार पुराणकालातले दाखले देत बसायचे नाहीतर अस्तित्वात यायला कदाचित १०० वर्षे लागतील अशा युटोपियाचे वर्णन करायचे. सद्यस्थितीत काय उपाय म्हणले की ब्लेमगेम सुरुच. कोर्टातही हेच चालत असेल आणि नुसत्या बालिका/स्त्रियाच नव्हे तर समस्त निर्बल, हताश, कायद्यावर विश्वास ठेवणारे कायदेशीर बलात्कार सहन करत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अर्धवटराव Fri, 04/20/2018 - 14:28 नवीन
फार मागे वळुन बघणे हा आपला एक प्रॉब्लेम आहेच. क्रॉनीक समस्येवर चर्चा करताना, उत्तर शोधताना फार मागे वळुन बघावं लागतं, संस्कृती-समाज रचना वगैरे मुद्दे ध्यानात घ्यावे लागतात, हे मान्य. पण समस्या वर्तमान काळात उग्र झाली आहे आणि भविष्यात ति आणखी त्रास देणार आहे, शिवाय वर्तमानाचे आणि भविष्यकालीन समाजव्यवस्थेचे संदर्भ भूतकाळापेक्षा प्रचंड भिन्न आहेत. त्यामुळे उपाय शोधायचे असतील तर ते पुढे बघुन शोधावे लागतील, मागे वळुन नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 14:03 नवीन
या तीनही काळआतल्या स्त्रियांचे अवेळी लग्न होत असे,
पण सासरी त्या वयात आल्यावर जात.
त्यांना पळवून नेले जाई
कोण?
वेश्यव्यवसायात ढकलल्या जात
आता तर या व्यवसायाला आधुनिक मान्यताच आहे! ================================================= तरीही मला जे म्हणायचं आहे ते प्रमाणाबद्दल म्हणायचं आहे. आणि प्रकाराबद्दलही म्हणायचं आहे. इतकं प्रमाण आणि इतकं विकृतीकरण कधीही नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 14:53 नवीन
https://www.ndtv.com/india-news/4-year-old-girl-allegedly-raped-head-smashed-by-neighbour-in-madhya-pradesh-1788747 प्रक्षोभ केव्हा व्हावा? मिडियाला पाहिजे तेव्हा? स्वप्रताडन करायला जास्तीत जास्त स्कोप मिळेल तेव्हा? कि घटना किती निंदनीय आहे यावरून? ================================ वरील बातमी जम्मूपेक्षा खूप घाण्णेरडी आहे. अलिकडचीच आहे. याच्यावर एकही चर्चा झालेली नाही. बातमीवरही कुणी कमेंट केलेली नाही इतकी ती त्यावेळी निरुपयुक्त असावी!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/19/2018 - 15:41 नवीन
परफेक्ट. आजकाल कुठल्या प्रकरणात जनमानस उठेल न चर्चा होइल त्याचे आडाखे ठरल्यासारखे झालेले आहेत. एखादा क्रियेटिव्ह स्क्रीप्ट रायटर लिहिलेल्यासारख्या प्रतिसादाच्या घटना घडत आहेत. कुठलिही घटना/दुर्घटना घडली की ती अशा पध्दतीने प्रोजेक्ट केली जाते की हमखास टाळ्या शिट्ट्या मिळवणारे बच्चनचे सलीम जावेद कृत डॉयलॉग जणू. बर जनमानसही अगदी चाकोरीतून जात अपेक्षित असे प्रतिसाद देत बसते. त्यातून अपेक्षित कोण काय साध्य करतंय हेही जाणून घ्यायची तसदी कोणी घेत नाही. दिवाळी आहे ना, मग वाजवून घेतला आपला पण फटाका. किंवा पेटलीय ना होळी मग घ्या बोंबलून आपल्याला वाटते त्याच्या नावाने. गेली ती असिफा, माझ्या लेखाला प्रतिसाद मिळाले ना, झाला तो बलात्कार, मी तर आहे ना देशाबाहेर. झाला ना तो खून, मग केलाय ना निषेध, होतीय ना दंगल, तसलेच आहेत ते, दळभद्री जिण्याची फेस्बुकी कहाणी नुसती सार्‍यांची. बजाव ताली, मारो लाइक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/19/2018 - 19:52 नवीन
दळभद्री जिण्याची फेस्बुकी कहाणी नुसती सार्‍यांची. बजाव ताली, मारो लाइक.
या वाक्यास आमचेकडून शंभर टाळ्या आणि हजार लाईक मारले जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा गुरुवार, 04/19/2018 - 15:54 नवीन
पुढच्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत दर महिन्यात काहीतरी धुरळा उडवला जाईल. पिडीतांचे किंवा त्यांच्या घरच्यांचे नंतर काय झाले याचे कोणाला पडलेले नसते. आम्हाला मेणबत्त्या लावून निषेध करायला मिळाला की आम्ही कर्तव्य भावनेने खुश. ही घ्या अजून एक बातमी. https://www.google.co.in/amp/www.dnaindia.com/india/report-cleric-held-for-raping-seven-year-old-student-in-jammu-madrassa-2594328/amp शोधले तर खूप मिळतील. स्त्रियांचे भ्रूण मारून लोकसंख्येचा तोल बिघडला आहे हे कोणाच्या गावी नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/19/2018 - 16:26 नवीन
पुढच्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत दर महिन्यात काहीतरी धुरळा उडवला जाईल. >>> +१ . अत्यंत घाणेरड्या स्तराला पोहचलेले राजकारण पाहुन खेद वाटतो. काँग्रेस , सेक्युलर लोकं कशाचं भांडवल करत आहेत ? बलात्काराच्या घटनेचं ? तेही आठ वर्षांच्या चिमुरड्या पोरीच्या ? आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न? न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे ? अवघड आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा