Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी- भाग ३४

ख
खेडूत
Mon, 05/21/2018 - 11:48
🗣 119 प्रतिसाद
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे पुन्हा एक नवा धागा काढत आहे! आधीच्या धाग्यावर कर्नाटक निवडणूक याच एकमेव विषयावर मुख्यत्वे चर्चा झाली. त्यासाठी वेगळा धागा आला नाही याचा परिणाम झाला. असो!

प्रतिक्रिया द्या
33929 वाचन

💬 प्रतिसाद (119)
म
माहितगार गुरुवार, 05/24/2018 - 16:42 नवीन
सारंग दर्शने यांनी काही गोष्टी व्यवस्थीत टिपल्या आहेत. अर्थात काही उरते .
दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांनी भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी जारी केलेल्या निवेदनाचे प्रथमदर्शनी कौतुकच करायला हवे. कोणत्याही भारतीय नागरिकाला भारतीय लोकशाहीची, इथल्या सेक्युलर राजव्यवस्थेची आणि जातीजातींमधील सौहार्दाची काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यासाठी त्याने आपल्या अधिकारात चार पावले टाकली तर त्याचेही स्वागत करायला हवे.
उर्वरीत लेख ठिक पण इथे महत्वपूर्ण बाजू निसटते. मी आधीच्या प्रतिसादात लिहिले ते इथे कॉपीपेस्ट मारतो. व्यक्तिगत राजकीय मत असणे आणि ते राजकिय व्यासपिठावरुन व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्थेत, राजकीय मत प्रसारासाठी धार्मिक व्यासपिठाचा उपयोग हा धर्मसंस्थेचा राजकारणातील हस्तक्षेप साशंकीत करणारा असतोच. त्या शिवाय कॅथॉलीक आणि प्रोटेस्टंट हे दोन पंथांचे प्रमूख त्या त्या परकीय देशांचे राजकिय प्रतिनिधी असतात या दृष्टीने टेक्निकली परराष्ट्राचा भारतीय राजकारणात अप्रत्यक्ष हस्तक्षेपाच्या जवळ हे प्रकरण पोहोचते. सगळ्यात महत्वाचे स्वतः धर्मनिरपेक्षता तत्वाचे उल्लंघन करायचे आणि दुसर्‍यांकडुन धर्म निरपेक्षतेची अपेक्षा करायची हा विरोधाभास आहे. आणि या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या चुकीच्या कृतींना असे पाठीशी घालणार्‍या दुटप्पीपणामुळे विरोधी म्हणजे भाजपायी दृष्त्टीकोणास बळकटी मिळते . म्हणजे स्वतःस समज नसलेल्या क्षेत्रात राजकीय बयाणबाजी धड स्वार्थही साधत नाही केवळ शेख चिल्ली (आताच्या काळात मणिशंकर ) कृती असते . पण बाकी सारंग दर्शनेनी परफेक्ट प्रश्न अगदी माझ्या मनातल्या सारखे उपस्थित केले आहेत
उगाच देशाच्या सेक्युलर चौकटीविषयी कशासाठी गळे काढले जात आहेत? आर्चबिशप ज्या व्हॅटिकनचे प्रतिनिधी आहेत, त्या व्हॅटिकनची राजवट कशी असते? तिथले राष्ट्रप्रमुख जे की पोप हे कसे निवडले जातात? ती लोकशाही पद्धत आहे का? तेथे धर्मप्रमुख आणि राष्ट्रप्रमुख हे एकच कसे? मग तेथे धर्म आणि आधुनिक सेक्युलर राज्यव्यवस्था यांची सांगड घालताना कोणती व कशी निवडणूक होते? व्हॅटिकन हे अगदीच चिमुकले व प्रतीकात्मक राष्ट्र असले तरी तेथे खरीखुरी लोकशाही का नांदू नये?
व्हेरी परफेक्ट, व्हेटीकम सेक्युलर जाहीर करुन तिथे हिंदू मंदिरे काढू द्यावीत आणि हिंदूंनाही तिथे नागरीकत्व देऊन समान नागरी आधीकार द्यावेत . एवढे मागणे आर्च बिशपना मागणे कठीण वाटले तर किमान पोप ना तात्काळ राजीनाम द्यायला सांगून युरोपीय गोर्‍या नसलेल्या पोप ला अद्याप संधी मिळालेली नाही त्या पदावर स्वतःचा दावा सांगून पहावा.
आर्चबिशप अनिल यांनी खरेतर आपली सारी नैतिक ताकद वापरून साऱ्या जगातील कॅथलिकांचे नेते पोप यांना या [इटालियन] माफियांचे मन वळवून पत्रकारांचे प्राण वाचविण्याची गळ घालावी.
अगदी अगदी, स्वतःही इटलीत जाऊन त्यासाठी सक्रीय प्रयत्न आणि पत्रकारीता करुन दाखवावी
...भारतासाठी नॅशनल चर्च स्थापन करण्याच्या प्रस्तावाला नेमका कुणाचा आणि का विरोध आहे?
प्रश्न अगदी परफेक्ट आहे . मुदलात काही चांगले घेतायेईल अशा तत्वज्ञानास महत्व असावे धर्मांच्या नावाच्या लेबलांना महत्व नसावे. अर्थात परदेशातील चर्च पेक्षा भारतीय तत्वज्ञानातून घेता येण्यासारखे घेऊन भारतीय राष्ट्रीय चर्च स्थापना चांगली कल्पना असू शकेल .
भारतातील प्रतिगामी ख्रिस्ती आणि इस्लामी संस्था, संघटना आणि पुढारी भारतीय सेक्युलरांना सहजी रंगांधळे करून आरामात कनवटीला लावून कशामुळे फिरू शकतात? ही फार मोठी ऐतिहासिक गफलत भारतात नेमकी का व कधीपासून झाली आहे?
फुरोगामी मंडळी ह्या प्रश्नाचे उत्तर देणे लागतात पण बगल नाही देणार ते फुरोगामी कसले . ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
manguu@mail.com गुरुवार, 05/24/2018 - 19:20 नवीन
भारतातले मुस्लिम ख्रिशचन हे भारतीयच आहेत. उगाच उठसुठ त्यांनी काही बोलले की सौदीत असे होते का अन व्हेटिकनला तसे होते का , हे विचारणे इष्ट वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/24/2018 - 22:03 नवीन
भारतातले मुस्लिम जर भारतीयच आहेत तर मग पाकिस्तान वेगळा कशाला काढला? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Fri, 05/25/2018 - 05:27 नवीन
@ manguu च्या निसटत्या बाजू १ :) माझी आणि सारंग दर्शनेंच्या पोस्ट पुन्हा एकदा वाचाव्यात १) या पोस्ट मधील केवळ ख्रिश्चन (खरेतर केवळ चर्च धर्मगुरु ) पर्यंत मर्यादीत आहे. चर्चेचा मुस्लीमांशी संबंध नाही . आपल्याला ती चर्चा नंतर स्वतंत्रपणे करता येईल कारण त्यांच्या धर्मसंस्थेचे स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने काम करते आणि ख्रिश्चन धर्मसंस्थेचे काम वेगळ्या पद्धतीने काम करते २) मुदलात सर्वसामान्य ख्रिश्चन व्यक्तीच्या राजकीय मताची चर्चा होत नाहीए . किंवा अगदी ख्रिश्नन धर्मगुरुने , स्वतःचे धर्मगुरुपण विसरुन सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे राजकीय व्यासपीठावरुन केलेल्या मता बद्दल सुद्धा चर्चा होत नाहीए . त्यामुळे सर्वसामान्य भारतीय ख्रिश्चनाच्या नागरीकत्वा बाबतही कुठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाहीए .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Fri, 05/25/2018 - 07:12 नवीन
निसटत्या बाजू २ एखाद्या शंकराचार्याने राजकीय भाष्य धार्मिक पिठाधिपती या नात्याने केले भारतातल्या सर्व पुरोहितांना अमुक राजकीय भूमिका घेण्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सूचित केले तर ती धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड असते जी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेस पोषक असणार नाही . आणि हाच दृष्टिकोन दुसर्या कोणत्याही धर्मगुरूंबद्दलही लागू पडेल आणि या चर्चेत संबंधीत ख्रिस्ती धर्मगुरुस लागू पडतो आहे. भारतीय ख्रिश्चनांस राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे असे नाही . - जॉर्ज फर्नांडीस (ज्यांच्यावर काँग्रेसच्या इंदीरागांधी विश्वास ठेवत नव्हत्या) त्यांना अटल बिहारींच्या काळात संरक्षण मंत्रिपद होते. केरळ बंगाल पूर्वोत्तर भारत पुरेसे ख्रिश्चन राजकीय नेतृत्व देत आला आहे . २१व्या शतकात एखाद्या धर्ममार्तंडाने राजकीय भूमिका वठवण्यास प्रथम दर्शनी सयुक्तिक कारण शिल्लक राहात नाही मग त्यांचे धर्म कोणतेही असोत . पुरोगामी धर्मनिरपेक्षतावाद्यानी एकदा एका धर्माचा राजकारणातील धार्मिक हस्तक्षेप नाकारायचा असेल तर त्याच न्यायाने इतर सर्व धर्माचे धार्मिक हस्तक्षेप नाकारणे क्रम प्राप्त ठरते . पण ते आपल्या प्रमाणे जेव्हा जेव्हा सर्वाना एक सारखा नियम लावण्यास कमी पडतात तेव्हा तेव्हा निरपेक्ष या ऐवजी सापेक्ष हा शब्द प्रयोग त्यांच्या वर्तनास लागू होउन त्यांचे पितळ उघडे पडते हे त्या फुरोगामी लोकांच्या लक्षातच येत नाही . त्यांना मांजरी प्रमाणे आपण डॉळे मिटून दुध पिले तर कुणाला कळणार नाही असे वाटते. पण प्रत्यक्षात त्यांचे पुरोगामीत्व आणि धर्मनिरपेक्षता साशंकित होते आणि सुडो / तथाकथित / सिक्युलर फुरोगामी अशा प्रकारची विशेषणे वस्तुनिष्ठ आणि रास्त ठरू लागतात आणि सर्वसामान्य जनता त्यांचे तथाकथित पुरोगामित्व नाकारु लागते यास ते स्वतःच जबाबदार असतात. इथे दिल्लीच्या संबंधित दिल्लीचे आर्चबिशप ने व्यक्तिगत अथवा सर्व साधारण राजकीय व्यासपीठ ना वापरता आपल्या धार्मिक प्रमुखपदाचा केलेला वापर साशंकित स्वरूपाचा स्पृहणीय नसलेला ठरतोय . आपण फुरोगामी लोक हे कबूल करता नाही म्हणानाच सारंग दर्शने खालील प्रश्न विचारतात
भारतातील प्रतिगामी ख्रिस्ती आणि इस्लामी संस्था, संघटना आणि पुढारी भारतीय सेक्युलरांना सहजी रंगांधळे करून आरामात कनवटीला लावून कशामुळे फिरू शकतात? ही फार मोठी ऐतिहासिक गफलत भारतात नेमकी का व कधीपासून झाली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Fri, 05/25/2018 - 07:15 नवीन
उपरोक्त दोन निसटत्या बाजूंना @ manguu ंचे उत्तर आल्या नंतर व्हेटीकन बाबतच्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 07:41 नवीन
वरील सर्व बाबी हिंदू धर्मगुरूंनाही लागु होतात, उदा. काँग्रेस गोहtyaa थांबवत नाही , म्हणून कांगावा करून झाला , आता भाजपशासित गोव्यासारख्या राज्यातच गोमाम्स allowed आहे , तर कुणाचीच तक्रार नाही मंत्रिमंडळमध्ये हिंदूंनाही पुरेसे स्थान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गामा पैलवान Fri, 05/25/2018 - 08:37 नवीन
पंतमंगूश्री, हिंदूराष्ट्र आवश्यक आहेच. ख्रिस्तीराष्ट्र आवश्यक नाही. ख्रिस्त्यांसाठी २५ राष्ट्रं आहेत. तिथं जाऊन राहावं. नायतर व्ह्याटिकणमध्ये जावं. उगीच भारतात राहून अनावश्यक विषयांत तडमडू नये. हिंदूराष्ट्रात ख्रिस्त्यांवर अन्याय होणार नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 18:45 नवीन
हा भारत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Fri, 05/25/2018 - 08:42 नवीन
@ manguu ( तुमची चर्चा अबकड भाजपा समर्थकाशी नव्हे माहितगारशी चालू आहे ) मी माझ्या वरच्या प्रतिसादाची सुरवातच
एखाद्या शंकराचार्याने राजकीय भाष्य धार्मिक पिठाधिपती या नात्याने केले भारतातल्या सर्व पुरोहितांना अमुक राजकीय भूमिका घेण्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सूचित केले तर ती धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड असते जी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेस पोषक असणार नाही .
अशी केली आहे .
....आणि हाच दृष्टिकोन दुसर्या कोणत्याही धर्मगुरूंबद्दलही लागू पडेल
हे म्हटलय आणि नंतर
....आणि या चर्चेत संबंधीत ख्रिस्ती धर्मगुरुस लागू पडतो आहे.
यात वैचारीक सातत्य आहे -आणि सुस्पष्ट कबुलीही - जे हिंदू धर्मगुरुंना आणि इतर धर्मीय धर्मगुरुंनाही लागू केले, हे लक्षात येतय का तुम्हाला ? आता वळसा न घालता 'धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड' तत्वतः नाकारणार का ? आणि या नाकरण्यात ख्रिश्च्न धर्मगुरुंचाही आणि इतर धर्मगुरुम्चाही तुम्ही तुम्ही समावेश करण्यास तयार आहात या भूमिकेत वैचारीक सातत्य आणून ख्रिश्च्न धर्मगुरुंचा धार्मीक व्यासपीठाचा राजकीय उपयोग योग्य नसल्याची सुस्पष्ट कबुली आपण देण्यास तयार आहात का ? मी माझ्या कडून दिली आहे आता गोल पोस्ट चेंज न करता सुस्पष्ट कबुली देण्याची तुमची जबाबदारी आहे , ती तुम्ही पार पाडली तर पुढे बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
शशिकांत ओक गुरुवार, 05/24/2018 - 15:42 नवीन
http://www.thehindu.com/news/international/china-wants-pakistan-to-relocate-hafiz-saeed-to-a-west-asian-country/article23972788.ece/amp/ सल्ला पाकिस्तानात मानवला नाही तर चीनला नाराज करणे त्यांना महागात पडेल. चीनच्या या मागणीला पाठिंबा दिला तर कोणते राष्ट्र हाफीज़ मियांना राहायला परवानगी देईल? तशी दिली तरी हाफीज़ बर्‍या बोलाने जाईल? वगैरे प्रश्न पाकिस्तानात प्रचंड वैताग मात्र निर्माण करतील!
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 05/24/2018 - 18:03 नवीन
अजिबात नाही, खोटा रिपोर्ट आहे तो. चीनने असे काहीही पाकिस्तानला सांगितलेले नाही. चीनने तसे स्पष्ट केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक गुरुवार, 05/24/2018 - 20:43 नवीन
फारच छान....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com गुरुवार, 05/24/2018 - 16:14 नवीन
मध्य प्रदेशच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन काँग्रेसने कमल नाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची धुरा संभाळतील. मध्य प्रदेशमध्ये ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मागच्या पंधरावर्षापासून मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. २००४ साली भाजपाने मध्य प्रदेश जिंकले तेव्हापासून आजपर्यंत भाजपाचीच सत्ता आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याच मुद्यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारला घेरण्याची काँग्रेसची रणनिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या हातून हे राज्य गेल्यास मोदी सरकारसाठी तो मोठा झटका असेल. २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत मागच्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक १६५ आमदार निवडून आले. काँग्रेसला ५८ आणि बसपाला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-madhya-pradesh-assembly-election-congress-will-gain-bjp-will-lost-1685593/
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 05/24/2018 - 16:15 नवीन
15 वर्ष भाजप ? मग एव्हाना मध्य प्रदेशाचा क्यालिफोर्निया झाला असेल ना ? विकासच विकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 05/24/2018 - 16:57 नवीन
मध्य प्रदेश सरकारने शेतमाल भावांतर योजना वाजतगाजत सुरू केली आणि कोणाला कळायच्या आत गुपचूप मागेही घेतली. नोटाबंदी असो वा GST असो,ह्यांचा अभ्यास नेहमीच कमी पडतो. भावांतरही त्याला अपवाद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका गुरुवार, 05/24/2018 - 18:00 नवीन
नाही झाला, तसं करण्याचा दावाही केला नाही कुणी (सिंगपूरसारखा)! मग आता कुणाला आणायचं म.प्र. मध्ये कॅलिफोर्निया करायला, सिंगापूरवाल्यांना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 05/24/2018 - 19:15 नवीन
मोदीना चारच वर्ष झालीत म्हणून भाजप रडत असतात. पण गुजरातेत मोदींची 20 , एमपीत भाजपाची 15 , वाजपेयींची 5 ... तसे भरपूर काळ हेही खुर्ची उबवत आहेतच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 06:27 नवीन
मंगुसाहेब, असं चितभी मेरी पट भी मेरी नाही चालणार हो. नेमका मुद्दा काय ते सांगा. २० वर्षे मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान नेतृत्व करत आहेत. त्याआधी काही वर्षे दिग्विजय होते. शिवाय केंद्रात शिवराजसिंग चौहान (चार वर्षे) नाहीयेत त्यामुळे तुलना करायची असेल तर शिवराज आणि दिग्विजय यांची करा ना. उगाच काहीच्या काही तुलना कशाला? ----------------------------------------- जर त्या तुलनेत आधीच्या सरकारांनी म. प्रदेशात चांगली कामे केली असतील तर जनतेने हे सरकार घालवणे इष्ट. ----------------------------------------- भाजपद्वेष हा अजेंडा बाजूला ठेवून विचार करणे अवघड असले तरी गरजेचे आहे. भाजपद्वेष किंवा मोदीद्वेष हि विचारधारा असेल तर मग आमचं काय बी म्हणणं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड गुरुवार, 05/24/2018 - 19:44 नवीन
मध्यप्रदेशातले रस्ते हे अमेरिकेपेक्षाही उत्तम आहेत हे साक्षात शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश, ह्यांनी खुद्द अमेरिकेत (गुंतवणूक गोळा करायला गेल्यावर) केलेलं वक्तव्य, दावा ठरेल की नाही? थोडक्यात काय, आमचे रस्ते अमेरिकेतल्या रस्त्यांपेक्षा भारी अन चांगले आहेत, हे खुद्द अमेरिकेत जाऊन बोलणे 'विकासाचा दावा' ठरावा की नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 06:35 नवीन
हे ऐकले नव्हते. मी म. प्रदेशात कधी गेलेलो नाही पण साधारण भारतीय रस्त्यांचा अंदाज घेतला तर अत्यंत फोल वक्तव्य आहे त्यांचे. ---------------------------------- रस्त्यांची तुलना आणि कॅलिफोर्निया करतो म्हणणे हे वेगळे मुद्दे आहेत साधारणपणे असे माझे मत आहे. म्हणजे मुंबईचे शांघाय करतो, अमेठीचे सिंगापूर करतो असे म्हणणे म्हणजे तिथल्यासारखे रस्ते करतो असे अपेक्षित होते का? मी समजत होतो कि एकूण सर्वांगीण विकास या अर्थाने असेल. ---------------------------------- मी गांधीनगर आणि टेक्सासला गेलेलो आहे. वरील अर्थाने गांधीनगरचे ह्यूस्टन झालेले आहे असे गृहीत धरायला हरकत नसावी. ---------------------------------- वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, जर भाजपचे म. प्र. मधले विकासाचे दावे फोल असतील आणि आधीच्या सरकारांनी चांगली कामे केली असतील तर येत्या निवडणुकीत जनतेने हे सरकार घालवणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ख
खेडूत Fri, 05/25/2018 - 06:51 नवीन
अमेठीचं सिंगापूर सोडा, मुंबई झाली तरी परप्रांतीय आणि बांगलादेशी घुसखोर तिथे जाऊन वाट लावतील. त्यामुळे अशी स्वप्ने न पहाणे चांगले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
अ
अर्जुन गुरुवार, 05/24/2018 - 19:14 नवीन
महाराट्र टाईम्स : NDAच्या जागा घटणार पण, २०१९मध्ये पुन्हा मोदी सरकार! लोकसत्ता : आज निवडणुका झाल्यास नरेंद्र मोदी स्वबळावर सरकार नाही बनवू शकणार
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 05/24/2018 - 19:46 नवीन
मोदीमय पेपर - मटा मोदी पाहता पोटशूळ उठणारा पेपर - लोकसत्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 06:38 नवीन
मोदीमय पेपर - मटा
याच्याशी पूर्णपणे असहमत. अत्यंत बेजबाबदारपणे सतत नकारात्मक बातम्या देण्याची उदाहरणे सतत दिसतात तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 12:29 नवीन
दोन्ही वाक्ये तेच सांगत आहेत की! मोदी स्वबळावर येणार नाहीत म्हणजे भाजप बहुमतात नाही असे म्हणायचे असेल! एनडीए बहुमतात असेल टाइम्स नाऊचा पण सर्वे सांगतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 00:06 नवीन
The Varanasi Police on Tuesday arrested a Bharatiya Janata Party leader for allegedly raping a woman at a lodge, the Hindustan Times reported. In her complaint, the woman claimed that Kanhaiya Lal Mishra had called her to the lodge with the promise to coordinate a meeting with a woman government officer who would offer her a job. https://scroll.in/latest/879960/varanasi-bjp-leader-arrested-for-allegedly-raping-a-woman-in-a-lodge मंदिर वही बनायएंगे चळवळीतील ते एक अग्रगण्य नेते आहेत
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 11:14 नवीन
कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्यापही संपलेलं नाहीये. बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बहुमत चाचणी होण्यापुर्वी झालेली ही निवड जेडीएस-काँग्रेससाठी मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 12:17 नवीन
अरेरेरे! सत्तालास काय लपून नाय बगा. कालपरवा व्यासपीठावर दिसलीच ती! या न्यायाने आता काल विधानपरिषदेला हरणारे सगळे जण सत्तालालसेपोटीच उभे राहिले होते. वास्तविक ती निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती. द्वेषापायी लॉजिकला रामराम! -------------------------------- बाकी लै नैतिक विजय अजून येणे बाकी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 12:19 नवीन
*सत्तालालस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 12:25 नवीन
काँग्रेसच्या 'भक्कम' पाठिंब्यावर जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी, कर्नाटकच्या राजकीय रंगमंचावरील नाट्यावर अद्याप पडदा पडलेला नाही. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं या नाट्याचा पुढचा 'प्रयोग' सुरू झाला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींना ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी समर्थन देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं सांगून परमेश्वर यांनी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ------------------------------------ हि सत्तालालसा गणली जात नाही हे वेगळे सांगणे न लगे!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 13:32 नवीन
कर्नाटकात भाजपला जनतेचा कौल नव्हताच, असं सांगत कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज कर्नाटक विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांच्या बाजूने ११७ सदस्यांनी मतदान केले. मात्र मतदान होण्यापूर्वीच भाजपने सभात्याग करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून कर्नाटक बंदची हाक दिली आहे. ----- सभात्याग , राज्यबन्दीची हाक ... वा वा छान छान . किती ही विधायक कृती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Fri, 05/25/2018 - 14:42 नवीन
भाजपचे आमदार शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार ?? इथे मिपावर काथ्या कुटून पार त्याचा चोथा झाला होता. जिओ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 18:37 नवीन
राज्यराज्यानुसार याबाबतीत धोरण असेल असे भाजपने आधीच सांगितले आहे. उतर प्रदेशात सत्तेत येताच दिली होती ना. शिवाय मिपावर भाजपचे आमदार असतील असे वाटत नाही. ------------------ कर्जमाफी हा संपूर्ण राजकारणाशी निगडित विषय असून त्याचा शेतकऱ्यांशी काही संबंध नाही असे मत (दुर्दैवाने) झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 18:34 नवीन
हाहाहा, लैच मज्जा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Fri, 05/25/2018 - 14:44 नवीन
अधिकृत निर्णय घेतला गेला नसेल त्यापूर्वीच तो जाहीर करणे उचित वाटले नसेल कदाचित. मीडियावाले पराचा कावळा बनवण्यात वाकबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 16:10 नवीन
तरुणीसोबत हॉटेलमध्ये जाण्याच्या घटनेमुळे वादात सापडलेले मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात लष्कराने शुक्रवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून काय समोर येते त्यावर पुढची कारवाई अवलंबून असेल असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. शेवटी हा वाद चिघळला आणि प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी गोगोई, ती तरुणी आणि एका तरुणाला पोलीस ठाण्यात नेले.चौकशीनंतर त्या तिघांचीही सुटका करण्यात आली. ती तरुणी सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोगोई ज्या तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेलेले त्या तरुणीच्या आईने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत गोगोईंवर गंभीर आरोप केले. गोगोई यांनी यापूर्वीही दोन वेळा रात्री उशिरा आमच्या घरात आले होते. या छाप्याबाबत बाहेर भाष्य करु नका, असे गोगोईंनी आम्हाला सांगितले होते, असे मुलीच्या आईने म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 05/25/2018 - 17:47 नवीन
महाराष्ट्रातील जैवविविधता, पिकांचे दुर्मिळ वाण, वनस्पती, लोकसहभाग इत्यादींची माहिती देणारा महाराष्ट्र जनुक कोश हा प्रकल्प आणि संपूर्ण माहिती www.gotul.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. अवश्य भेट द्या.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 05/25/2018 - 18:33 नवीन
मस्त माहिती आणि सुंदर वेबसाईट, आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
M
manguu@mail.com Fri, 05/25/2018 - 19:26 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मार्मिक गोडसे Fri, 05/25/2018 - 19:17 नवीन
छानच आहे वेबसाईट.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 05/26/2018 - 22:23 नवीन
काँग्रेसची 60 वर्ष झाली म्हणे, मोदीजींची चारच . मग वाजपेयींची 5 कुणाच्या हिशोबात धरायची ? नेपाळच्या ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 05/27/2018 - 00:58 नवीन
गडबड केलीत की... मोदीजींची खरंच ४ वर्ष झाली आहेत. तुम्हाला भाजपाची किती वर्ष झाली असं म्हणायचं असेल तर ठीक आहे. तरीही ६० वर्ष विरुद्ध ९ वर्ष असं होईल, वरचे १३ दिवसही धरायचे असतील तर धरून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 05/27/2018 - 01:19 नवीन
राहूल गांधींना उद्देशून तुमच्या काँग्रेसने 60 वर्ष असे मोदीजी बोलतात ना ? मग स्वतःचे वय असे का चोरायचे अन चारच सांगायचे ? वाजपेयींची ५ वर्षही भाजपाच्या / अप्रत्यक्सारीत्या मोदींच्या मागेही जमा करावे लागतील ना ? भाजपाची आता 10 वर्षांची होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बिटाकाका Sun, 05/27/2018 - 05:30 नवीन
लॉजिक गंडलंय!! ----------------------- १. भाजप जसं मोदींचे चार साल म्हणतं तसं काँग्रेस यूपीए के दस साल असंच म्हणतं. अर्थात बरोबर आहे म्हणा त्यांचं. हमारे साठ साल म्हणणं पथ्यावर नाही पडणार. २. आता मोदी जसे काँग्रेसवर टीका करताना ६० साल म्हणतात तसं काँग्रेसने टीका भाजपके ९ साल असं म्हणायला हवं ना? पण ते स्वतःच मोदीके ४ साल म्हणून ओरडतात आणि तुम्ही भाजपलाच ९ साल म्हणा म्हणताय. अवघडंय!! तुमचा मेसेज काँग्रेसपर्यंत कसा पोहोचवता येईल हे बघायला हवे ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 05/27/2018 - 04:31 नवीन
बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित कोणतीही पुस्तके किंवा मजकूर प्रकाशित करण्यापूर्वी आता प्रकाशकांना बालभारतीची परवानगी घेऊन लाखो रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. परवानगी न घेता मार्गदर्शक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थांविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे बालभारतीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात ‘बालभारती परवानाधारक गाईड्स’ किंवा ‘बालभारती मान्यताप्राप्त’ गाईड्स उपलब्ध होतील. तर परवाना नसलेल्या प्रकाशकांना आपली गाईड्स विक्री बंद करावी लागेल. असे आहे धोरण.. बालभारतीने जाहीर केलेल्या धोरणानुसार पुस्तके छापील स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी प्रत्येक इयत्तेच्या, प्रत्येक माध्यमाच्या प्रत्येक पुस्तकासाठी दरवर्षी ६३ हजार रुपये शुल्क प्रकाशकांना द्यावे लागेल. प्रश्नावली प्रकाशित करण्यासाठी हे शुल्क दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी ३१ हजार रुपये असेल तर डिजिटल साहित्यासाठी हे मूल्य दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी ३५ हजार रुपये असेल. https://www.loksatta.com/mumbai-news/balbharati-book-crises-1686640/
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/28/2018 - 14:47 नवीन
१) वार्षिक उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रकाशकांना शुल्क भरावे लागणार नाही बातमीत वरील वाक्याकडे दुर्लक्ष होत आहे का ? अर्थात ही टेक्स कलेक्शन मध्ये सवलत स्टाईल सरकारी बाबूगिरीतून आलेली पॉलीसी वळसा घालण्यास सोपी ठरेल असे वाटते. २) प्रथितयश प्रकाशकाच्या एका छापिल गाईडच्या ३० रुपायाच्या दराने २५००० प्रति विकल्या गेल्या तर किमान ७,५०,०००/- उलाढाल होते. त्याच्या दहा टक्क्या पेक्षा कमी असलेली लायसन्स फीस बालभारतीस देण्यास हरकत नाही. तो बाल भारबालभारतआधिकार असू शकतो. अर्थात भाषा विषयाच्या पुसकात वापरलेल्या छोट्या मोठ्या लेखकांना बालभारती ने अधिक मानधन देणे सुरु करावयास हरकत नसावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 05/28/2018 - 18:00 नवीन
वार्षिक उलाढाल २० लाख असेल आणि त्याने त्याच्या आणि बायकोच्या नावाने बिझनेस स्प्लिट केला तर पर हेड दहा लाखच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Mon, 05/28/2018 - 09:10 नवीन
रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) 'शून्य शिल्लक, शून्य शुल्क' खाती उघडण्यासाठी जोरदार प्रचार आणि प्रसार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शून्य शिल्लक राशी असलेल्या जन-धन खात्यांचा आणि त्या योजनेला मिळालेल्या प्रतिसादाचा अनेकदा आपल्या भाषणांत उल्लेख केला. मात्र, या जन-धन खात्यांशी संबंधित एक धक्कादायक माहिती मुंबई आयआयटीच्या अहवालातून समोर आली आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खात्यांचा समावेश असलेली कोट्यवधी मूलभूत बचत बँक ठेव खाती बँकांमार्फत गोठवण्यात येण्याची शक्यता आहे. या खात्यांमधून महिनाभरात चार व्यवहार विनाशुल्क करण्यात येतात. त्यावर बँकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, त्यानंतरच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाते. मात्र, आता चार व्यवहार पूर्ण झाल्यास अशी खाती बँकांकडून गोठवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे एचडीएफसी, सिटीसारख्या बँका चार व्यवहारांनंतर संबंधित खाती नियमित खात्यांमध्ये रुपांतरित करतात. परिणामी, त्या खात्यांमध्ये किमान जमा राशी शिल्लक नसल्यास इतर ग्राहकांप्रमाणे या खातेधारकांनाही दंड आकारला जातो.  इतकेच नाही तर बँकांनी या व्यवहारांमध्ये एटीएममधून पैसे काढण्याशिवाय आरटीजीएस, एनईएफटी, ईएमआय, बँक शाखेतून पैसै काढणे आदींचाही समावेश केला आहे. तर खाते गोठवल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत या खात्यातून चार व्यवहार पूर्ण झाले असल्यास या खात्यातून उर्वरित पैसे काढायचे असतील तर संबंधित खातेधारकाला पुढच्या महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 05/28/2018 - 10:08 नवीन
लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या १० जागांसाठी मतदान सुरु; अनेक ठिकाणी इव्हीएमच्या तक्रारी... ७० वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना निवडणूक आयोग एवढे घाळ काम का खपून घेतंय ? एक तर उन्हाचा पारा चढत आहे, लोक मतदान केंद्रावर येऊन ताटकळत असतील किंवा परत माघारी जात असतील. (मी तर एकदाच चक्कर टाकली असती केंद्रावर, चालू असते तर मतदान केले असते बंद असते तर 'मन की बात' से मतदान केले असते) === अवघड आहे..! http://www.thehindu.com/news/national/voting-on-for-bypolls-in-10-assembly-4-lok-sabha-seats/article24010065.ece?homepage=true
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा