ताज्या घडामोडी- भाग ३४
रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे पुन्हा एक नवा धागा काढत आहे!
आधीच्या धाग्यावर कर्नाटक निवडणूक याच एकमेव विषयावर मुख्यत्वे चर्चा झाली. त्यासाठी वेगळा धागा आला नाही याचा परिणाम झाला. असो!
💬 प्रतिसाद
(119)
M
manguu@mail.com
Mon, 05/28/2018 - 11:20
नवीन
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 05/28/2018 - 11:51
नवीन
मुंबई मध्ये पूर्वी सेनेचे पदाधिकारी संभावित विरोधी मतदान करणाऱ्या लोकांना मतदानासाठी घरातूनच बाहेर पडून देत नसायचे. सातत्याने मुंबई काबीज करण्याचे हेच रहस्य असायचे असे तोंडी ऐकून आहे.
===
जर इथे राजकारणी आणि निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत असतील अशी पुसटशी शंका जरी असेल तर खरंच अवघड आहे.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Mon, 05/28/2018 - 15:10
नवीन
लोकसत्तामध्ये आज आलेली ही बातमी सकारात्मक आहे.
माजी राष्ट्रपती काय बोलतात पहावे लागेल!
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ६०० स्वयंसेवकांशी नागपूरमध्ये संवाद साधणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सात जून रोजी हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मुखर्जी यांच्या कार्यालयानं याबाबत अद्याप काही सांगितलेले नाही.
भारताच्या माजी राष्ट्रपतींना आम्ही नागपूरमध्ये संघ स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यांना मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. “माजी राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारणं म्हणजे महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद साधण्याचा देशाला दिलेला संदेश आहे. आणि मतं विरोधी असणं म्हणजे शत्रू असणं असं नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांना हे निमंत्रण स्वीकारणं हे उत्तर आहे,” असं मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 05/28/2018 - 19:59
नवीन



मुखपृष्ठ »देश-विदेश
टेलिकॉम क्षेत्रात पतंजलीचा प्रवेश; समृद्धी सिमकार्ड बाजारात दाखल
हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण
लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 28, 2018 7:39 PM

NEXT

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे. विविध बिस्कीटपासून मॅगीपर्यंत अनेक खाद्यपदार्थ, किराणा मालातील पदार्थ, औषधी उत्पादने यानंतर आता पतंजलीने आपली सिमकार्ड बाजारात आणली आहेत. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलशी करार केला आहे. आज हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण करण्यात आले. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असे नाव देण्यात आले आहे.
आता सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणार आहे. त्यानंतर हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यातील आणखी एक खास बाब म्हणजे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या इतर उत्पादनांवर १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. या सिमकार्डसाठी आकर्षक प्लॅनही तयार करण्यात आला आहे. १४४ रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. याशिवाय १०० मेसेज मोफत मिळू शकतील. पतंजलीकडून आपल्या युजर्सना आरोग्य, अपघात आणि जीवन विमा मिळणार आहे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 05/29/2018 - 03:11
नवीन
निवडणुका ही भ्रष्टाचाराची गंगोत्री. ती साफ करायची तर राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीस वळण लावले पाहिजे, त्यात पारदर्शकता असली पाहिजे. त्या धनविधेयकात निवडणूक रोख्यांच्या योजनेचा समावेश करून आपण हेच करीत असल्याचे त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले होते. त्याच वेळी त्यांनी आणखीही काही बदल केले होते. त्यातील एक म्हणजे यापूर्वी कोणत्याही उद्योगांना त्यांच्या गेल्या तीन वर्षांच्या निव्वळ नफ्याच्या साडेसात टक्के एवढीच रक्कम राजकीय पक्षांना देणगीदाखल देता येत होती. जेटली यांनी ती मर्यादा हटवली. केवळ एवढेच नाही, तर देणगी कोणत्या राजकीय पक्षाला दिली हे जाहीर करण्याची आवश्यकताही त्यांनी दूर केली. यामुळे कोणत्याही उद्योगांना हवी तेवढी देणगी राजकीय पक्षांना देण्याचा मार्ग खुला झाला. निवडणूक रोख्यांमुळे कंपन्यांना वा व्यक्तींना परदेशातून निधी पाठवणे सोपे झाले. कारण गोपनीयता आणि अनामिकता ही या रोखे पद्धतीची वैशिष्टय़े. अर्थात ही गोपनीयता फक्त लोकांपुरतीच. सरकारला मात्र ही माहिती उपलब्ध होणारच आहे. या सर्वात एक अडचण होती ती विदेशी देणगी नियंत्रण कायद्याची. हा मूळचा कायदा १९७६ मधला. २०१० मध्ये तो रद्द करून त्याजागी नवा कायदा आणण्यात आला. त्यानुसार २६ सप्टेंबर २०१६ पूर्वी राजकीय पक्षांना विदेशातून मिळालेल्या निधीची चौकशी करणे शक्य होते. धनविधेयकाने या कायद्यात एक छोटासा बदल केला. २६ सप्टेंबर २०१६ ही तारीख बदलून तेथे ५ ऑगस्ट १९७६ ही तारीख घातली. यामुळे झाले काय? तर १९७६ पासून राजकीय पक्षांना विदेशातून मिळालेला निधी चौकशीच्या फेऱ्यातून मुक्त झाला.
https://www.loksatta.com/agralekh-news/political-party-right-to-information-election-commission-1687386/
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 05/29/2018 - 07:12
नवीन
https://m.maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/sambhaji-bhide-slashes-hindus-on-patriotism/articleshow/64364059.cms
जळगावः
राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावर श्री शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी हिंदू धर्मातील स्त्री-पुरुषांवर जळजळीत टीका केली. हिंदू स्त्री-पुरुष हे राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक असल्याचं धक्कादायक वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्या जळगाव आणि नंदुरबारमध्ये धर्मसभा झाल्या. या सभांमध्ये भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीर समर्थन केले.
पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रू देशांविरोधात एकजुटीने उभं राहण्याची आवश्यकता आहे. पण तसं होत नाही. पाकिस्तानच्या गोळीबारत एकीकडे भारतीय जवान शहीद होत असताना दुसरीकडे आपण पाकशी क्रिकेट सामने खेळतो. त्यांना सणासुदीला मिठाई देतो, हे चुकीचं आहे, असं भिडे म्हणाले. चीनने आपल्यावर ६२ मध्ये युद्ध लादले. त्यात हजारो जवान शहीद झाले. असं असतानाही आताची तरुण पिढी चायनीज फूड चवीने खाते? असा सवाल करत भिडे यांनी संताप व्यक्त केला.
मनूनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनूच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही, असं म्हणत भिडे गुरूजी यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलं. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची टीका संभाजी भिडे यांनी केली. नंदुरबारमधील धर्मसभेत ते बोलत होते. अवघ्या ब्रह्मांडाला ताब्यात घेण्याची शक्ती हिंदू धर्मात आहे, असं भिडे गुरुजी म्हणाले.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 05/29/2018 - 09:17
नवीन
मनुस्मृती तर आंबेडकरांनी गौरवलेली आहे.
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 05/29/2018 - 10:28
नवीन
@ manguu@mail.com
केवळ चार दिवसा पुर्वीच्या याच धाग्यावरील चर्चेत, धार्मीक व्यासपीठाचे राजकीय उपयोग योग्य नसल्याची सुस्पष्ट भूमिका घेण्याचे आपणास खणखणीत आव्हान "आता वळसा न घालता 'धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड' तत्वतः नाकारणार का ? " या शब्दात केले. त्यास आपले अद्याप उत्तर आलेले नाही. हे केवळ आपल्या बद्दल म्हणून नव्हे, आपल्यासारख्या सर्वच तथाकथित धर्म निरपेक्षतावाद्यांबद्दल एकाच समुहगटास धर्मनिरपेक्षता सोईने सांगणार्यां दांभिकते बद्दल आहे ! संभाजी भिडे असोत वा गापै असोत त्यांच्या कडे बोट दाखवण्यासाठी नैतीकता असण्यासाठी आपल्याकडे (तथाकथित धर्म-निरपेक्षता वाद्यांकडे) 'निरपेक्षता' असावी की नको ? आपल्याच दृष्टीकोणांच्या आधारांना सापेक्ष /एकेरी आणि म्हणून ढिसाळ भूमिका बाळगू शकण्याचे कौतुक वाटते.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 05/29/2018 - 13:35
नवीन
दांभिकता सर्वत्र असते. राजकारणी , धर्मपीठे, उद्योजक , भुमिगतवाले ... सर्वांचे साटेलोटे त्यांच्या स्वार्थासाठी असतात.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 05/29/2018 - 14:28
नवीन
मंगूश्री,
साधारणत: सहमत आहे. फक्त तुम्ही आणि मी अपवाद आहोत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 05/29/2018 - 15:24
नवीन
:))
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 05/29/2018 - 15:35
नवीन
तीन बोटे! दुसरी कडे बोट दाखवताना तीन बोटांची दिशा आपल्याकडे असते असे आपण कधी ऐकले आहे का ;)
मी प्रश्न 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांबद्दल केला आहे ! आणि आपण आपले बोट इतरत्र सर्वत्र दाखवत आहात पण इतर एकाच्या किंवा इतर अनेकांच्या चुकांनी आपल्यातल्या ( 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या) चुकांचे समर्थन होत नसावे.
एकाच धर्माच्या लोकांकडे नाव घेऊन बोट दाखवणे आणि जिथे दांभिकता सुस्प्ष्टपणे समोर आणली तरी नाव घेऊन 'अयोग्य' हा शब्द वापरण्याचे टाळून गावाला वळसा घालणे, हे नेमके कसे जमते ?
तुर्तास असो , 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या निरपेक्षतेस जेव्हा जेव्हा ग्लानी येईल आणि दांभिक होईल तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीमागे लागण्यासाठी आम्ही आहोतच :)
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 05/29/2018 - 18:36
नवीन
आम्ही वळसे फेरे घालत नाही
जे अयोग्य आहे , ते अयोग्यच असते
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 05/29/2018 - 18:33
नवीन
भारत-पाक सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये मंगळवारी फोनवरुन संध्याकाळी तातडीची महत्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत दोन्हींकडील सैन्याद्वारे २००३ च्या शस्त्रसंधी सहमती कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे यापुढे सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही तसेच यात आपले जवान शहीद होणार नाहीत अशी आशा आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/dgmos-of-india-and-pakistan-have-agreed-to-ensure-that-ceasefire-will-not-be-violated-by-both-sides-1687944/
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/30/2018 - 11:16
नवीन
सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणाचे गूढ लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हैसूरू येथील प्रा. के एस भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असून हे चौघेही एका हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येते. दि. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.
हे चारही संशयित हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. या सर्वांचे के टी नवीन कुमार (वय ३७) या हिंदू युवा सेनेच्या कार्यकर्त्याशी संबंध असल्याचा संशय एसआयटीला आहे. या सर्वांच्या पूर्वी अनेकवेळा बैठका झालेल्या आहेत. नवीन कुमारला गौरी लंकेश हत्येप्रकरणी मार्च २०१८ मध्ये अटक करण्यात आली आहे.
हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय ३९, महाराष्ट्र), सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमित देगवेकर उर्फ प्रदीप (वय ३९, गावा) कर्नाटकातील विजयपूर येथील मनोहर इडवे (वय २८), हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा कार्यकर्ता सुजीत कुमार उर्फ प्रवीण (वय ३७, मंगळुरू) या चौघांना प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सुरूवातीला सुजीत कुमारला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला एक जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुजीत कुमारकडे केलेल्या चौकशीनुसार एसआयटीने रात्रीतूनच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ८ ठिकाणी धाडी घातल्या. यात अनेक महत्वाचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागले आहेत.
देगवेकर हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता मलगोंडा पाटील याच्याबरोबर राहत होता. वर्ष २००९ मध्ये मडगाव येथील स्फोटात मलगोंडा पाटलाचा मृत्यू झाला होता. बॉम्ब लावण्याचा प्रयत्न करताना असताना झालेल्या स्फोटात मलगोंडा मृत्यूमुखी पडला होता. मडगाव स्फोटाप्रकरणी गोवा पोलिसांनी देगवेकरला ताब्यात घेतले होते. पण चौकशी करून नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. अमोल काळे हा पुणे येथे हिंदू जनजागृती समितीत काही वर्षांपूर्वी कार्यरत होता.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gauri-lankesh-murder-case-cops-close-in-four-held-in-plot-to-kill-writer-1688324/
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 06/03/2018 - 07:01
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/national-orchid-garden-of-singapore-narendra-modi-1690588/
ऑर्किड म्हणजे बांडगुळ ना ? नुसतेच दिसते चांगले पण अनननिर्मिती करू शकत नाही, तेच ना ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/03/2018 - 10:21
नवीन
ऑर्किड्स या दुसर्या झाडांवर वाढणार्या (Epiphytes) वनस्पती आहेत. त्या फक्त झाडांचा आधार घेतात, त्यांचे अन्न चोरत नाहीत व त्यांना इतर कोणताही धोका उत्पन्न करत नाहीत (non-parasitic). तसेच त्यांचे त्या झाडांशी परस्परपूरक (symbiotic) संबंधही असत नाहीत.
बांडगूळ इतर झाडांवर वाढणारी parasitic वनस्पती असते.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sun, 06/03/2018 - 10:12
नवीन
ऑर्किड म्हणजे बांडगुळ ना ? नुसतेच दिसते चांगले पण अनननिर्मिती करू शकत नाही, तेच ना ?
हो, शोषण करून चमकोगीरी करतं.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/03/2018 - 10:25
नवीन
नाही.
इथे पहा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3