Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 05:14
🗣 208 प्रतिसाद
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे. * कितीसा पुरोगामी आहेस ? * Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे. * मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे. * पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे. * ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत ** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? ** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान ** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश *** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त *** *** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न *** या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्‍यापैकी संभव असतो. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही. ** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्‍या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही. * या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्‍यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्‍या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही. * भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अ‍ॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही. * पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्‍या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच. खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही. चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे (आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे. बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य. दुसरे असे की दुसर्‍या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्‍या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे. *** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories *** *** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा *** * आत्ते-मामे भावंडे

प्रतिक्रिया द्या
318269 वाचन

💬 प्रतिसाद (208)
ए
एमी Sat, 06/23/2018 - 02:45 नवीन
या शोध निबंधाचे पृष्ठ ९४ वरील तेबल क्रमांक २ मधील आकडेवारी १९९२ -९३ मध्ये भाऊ बहीण विवाहाचे मुस्लीमाम्चे प्रमाण हिम्दूंच्या दुप्पट असावे या कडे निर्देश करते. http://www.njcmindia.org वरील विदर्भातील अलिकडील एक शोध निबंध या आकडेवारीस दुजोरा दिसताना दिसतो. त्यांना त्यांच्या विदर्भातील अभ्यासात मात्र हिंदूंअध्ये हे प्रमाण १५.८८ टक्के तर मुस्लीमां मध्ये २३.७६ टक्के आढळले म्हणजे दुप्पट नाही तरीही मुस्लीमतील हे प्रमाण विदर्भात अदमासे ८ टक्क्यांनी अधिकच आहे. *अर्तात या पहाणीचा सँपल साईज लहान आहे >> ठीक आहे. सॅम्पल साईझ कमी असला, एकाच भागातील विदा असला तरी तो ग्राह्य मानू. भारताची लोकसंख्या १२० कोटी. मुस्लिम १४% म्हणजे १७ कोटी. हिंदू ८०% म्हणजे ९६ कोटी. सगळ्याच वयोगटातील लोक लग्न केलं/करणार आहेत यासे समजल्यास १७ कोटी मुस्लिमपैकी २५% म्हणजे ४ कोटी नात्यात लग्न करणारे. ९६ कोटी हिंदूंपैकी १६% म्हणजे १५ कोटी नात्यात लग्न करणारे!!! बाब्बो येतंय का काही लक्षात? े
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 11:44 नवीन
...त्या विरुद्ध शांततेच्या धर्मात अद्याप ग्रंथ प्रामाण्याचे प्राबल्य अधिक असल्यामुळे तिकडे चुलत पारिवारीक विवाहांचे प्रमाण बरेच मोठे आहे. >> भारतातल्या मुस्लिममध्ये हे कितपत होत याचा नीट विदा जमवावा लागेल.
आंतरजालीय उपलब्ध विदा बघीतला तर १९९२ च्या आसपास मुस्लिमांतील हे प्रमाण साधारणपणे हिंदूंच्या दुप्पट होते असे दिसते. पण तत्पुर्वी आपण जातीचा प्रश्न विचारलात तर ह्या साठी शोध घेताना अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील संशोधकांचा एक निबंध (पिडीएफ) दिसला. त्याचे पान १९ वरील निष्कर्ष पहाता अश्रफ म्हणजे भारता बाहेरून आलेल आक्रमणकर्ते मुस्लीम आणि अज्लफ म्हणजे भारतातील स्थानीक धर्मांतरीत मुस्लीम यांच्यातील जनुकीय अंतर अद्यापही कायम आहे. (बाहेरून आलेले आश्रफ वंशीय स्थानीक धर्मांतरीत अजलफांना अजूनही कसे बरोबरीने वागवत नाहीत या बद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेखात उल्लेखही दिसतो. पण तो या धागा चर्चेचा मुख्य मुद्दा नाही) त्यांच्यात तांत्रिक दृष्ट्या मुस्लीमधर्मांतर्गत आंतरजातीय विवाह प्रतिबंधीत नाहीत तरीही अशा पद्धतीने जनुकीय अंतर अद्याप शिल्लक रहाण्याचे एक कारण चुलत भाऊ बहीण विवाहावरील भर राहिले असू शकेल का ? (आणि हे कारण नसेल तर आश्रफ मंडळी जाणीव पूर्वक वैवाहीक उच्चता पाळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात पुन्हा हे कारण या धाग्यच्या मुख्य चर्चेचा भाग असणार नाही ) आता हा (मुस्लीम जनुकीय शोधतज्ञांचा) शोध निबंध स्पेसिफीकली मुस्लीम मुलांचा अभ्यास करण्या मागे खालील कारण देताना दिसतो. शोध निबंधाचे निष्कर्ष डोळे उघडणारे ठरावेत ते वाचून घ्यावेत.
....firstly, consanguineous marriages are favored among Muslim families, while the Hindu and Sikh religions avoid marriages among close relatives;...
PDF | Endogamy, consanguinity and community genetics. Available from: https://www.researchgate.net/publication/7404668_Endogamy_consanguinity_and_community_genetics [accessed Jun 22 2018]. मधील काही नोंदी पहा
...Thus, for Muslims, cousin marriage could be interpreted as following the sunnah, i.e. the deeds of the Prophet. While consanguineous unions were repor-ted in all religions, at national level the highest rates were observed in the Muslim and Buddhist communities and the lowest among Sikhs and Jains. In the Muslim population of India there has been no evidence of a reduction in consan-guineous marriage during the last 40 years (Hussain and Bittles 2000).
या शोध निबंधाचे पृष्ठ ९४ वरील तेबल क्रमांक २ मधील आकडेवारी १९९२ -९३ मध्ये भाऊ बहीण विवाहाचे मुस्लीमाम्चे प्रमाण हिम्दूंच्या दुप्पट असावे या कडे निर्देश करते. http://www.njcmindia.org वरील विदर्भातील अलिकडील एक शोध निबंध या आकडेवारीस दुजोरा दिसताना दिसतो. त्यांना त्यांच्या विदर्भातील अभ्यासात मात्र हिंदूंअध्ये हे प्रमाण १५.८८ टक्के तर मुस्लीमां मध्ये २३.७६ टक्के आढळले म्हणजे दुप्पट नाही तरीही मुस्लीमतील हे प्रमाण विदर्भात अदमासे ८ टक्क्यांनी अधिकच आहे. *अर्तात या पहाणीचा सँपल साईज लहान आहे * An analysis of consanguineous marriage in the Muslim population of India at regional and state levels. इसवी २००० काय म्हणते पहा
The NFHS was a nationally-representative survey of ever-married women aged 13-49 years, conducted across 25 states of India. Of the initial 9845 respondents, 8436 were included in the final weighted analysis sample. Overall, 22.0% of marriages were found to be contracted between spouses related as second cousins or closer, ranging from 15.9% in the eastern states to 32.9% in the western states of India. In all parts of the country first cousin marriages were the preferred form of consanguineous union, and in four of the five regions paternal first cousin marriages predominated. Despite predictions to the contrary, there was no evidence of a significant change in the prevalence of consanguineous unions over the course of the study period, which extended from the late 1950s to the early 1990s.
* Trends of consanguineous marriages in a Sunni Muslim population of West Bengal, India. ईस्वी २००७ ह्या निबंधा नुसार पश्चिम बंगाल मधील मुस्लीमातील भाऊ बहीण विवाहाचे प्रमाण कमी होत चालल्याची म्हणजे अदमासे ८ टक्क्या पर्यंत असल्याची नोंद दिसते, अर्थात पुर्व भारतातील हे प्रमाण आधी पासूनच कमी व्हावयास लागले असावे. हा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाच्या संशोधकाम्चा संशोधन निबंध खालील प्रमाणे मत नोंदवताना दिसतो
...Pre-marital and pre-conception counselling of consanguineous populations should be an integral part of health policy to train people and make people aware of its harmful consequences.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 12:32 नवीन
...गोत्र पद्धती फक्त उत्तरेकडील काही राज्यात वापरली जाते. मामे बहिण आणि आत्ये भाऊ असे काही विवाह होतात पण जन्म पत्रिकेतील गुण जुळवण्याच्या अंधश्रद्धीय खटपटी मुळे त्यांचे प्रमाणही कमी होते . >> तेलगू, तमिळ भागात या विवाहांच प्रमाण भरपूर आहे आणि तिकडच्या सिनेमात याच उदात्तीकरण करतात असे वर कुठल्यातरी प्रतिसादात आलेल्या एका दुव्यात वाचले. महाराष्ट्रातदेखील हे प्रमाण अगदी कमी नसावे (अंदाज)
सहमत अर्थात मी मनुस्मृती आणि कुराण चे प्रभावाचे विश्लेषण आपण अभ्यासले आणि उत्तर आणि दक्षिण भागातला फरक पाहीला तर दक्षिण भारता तील हिंदूंमध्ये बहीण भाऊ विवाह स्थानिक रुढीं मुळे होतात . गोत्र पद्धती फक्त उत्तरेकडील काही राज्यात वापरली जाते. हा शोध आपण कसा लावलात माहित नाही. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ब्राह्मणेतर चळवळी आणि अम्धश्रद्धा निर्मुलन चळवळींच्या प्रभावाने गोत्र-पत्रिका इत्यादीचा प्रभाव कमी झाला असेल पण संपला आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे वाटते.महाराष्ट्र आणि दक्षिणेत गोत्र पद्धती पाळली न गेल्यास हरीयाणसारख्या खाप पंचायती बसत नाहीत माझे स्वतःचे काही नातेवाईक दक्षिण भारतात आहेत आणि ती मंडळी उलट महाराष्ट्रीयांपेक्षा अशा बबतीत बर्‍याचदा कट्टर वाटतात. तामीळनाडू तील बातम्या बारकाईने अभ्यासल्यास तेथील बर्‍याच भागातला जातीयवाद पद्धती अद्याप संपूस्।टात आलेल्या नाहीत हे लक्षात यावे. त्या शिवाय मी आधी नोंदवल्या प्रमाणे हिंदूमध्ये बहिणीची मुलगी करून घेण्याचे बहिणीच्या सासुरवाडी तील परिस्थिती पासून सांभाळून घेणे असा मुख्य उद्देश असतो तेव्हाही पत्रिका पाहणे टाळले जाऊ शकते हे ही मान्य पण गोत्र-आणि पत्रिका पद्धती अशास्त्रीय आणि इतर दुष्परीणाम यूक्त असली तरी मुस्लिमांच्या चुलत भाऊ विवाह तुलनेत किमान चुलत भाऊ विवाह तरी टाळत होती हे किमान स्तरावर स्विकारावे लागते मुख्य म्हणजे ग्रंथ प्रामाण्य हा त्याचा आधार नसल्याने अशा रुढी बदलणे कमी अवघड असावे असे माझे व्यक्तीगत मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sat, 06/23/2018 - 02:57 नवीन
तुम्हीच वर दिलेल्या माहितीनुसार २००० साली Overall, 22.0% of marriages were found to be contracted between spouses related as second cousins or closer, ranging from 15.9% in the eastern states to 32.9% in the western states of India. २००७ साली पश्चिम बंगाल मधील मुस्लीमातील भाऊ बहीण विवाहाचे प्रमाण कमी होत चालल्याची म्हणजे अदमासे ८ टक्क्या पर्यंत असल्याची नोंद दिसते, अर्थात पुर्व भारतातील हे प्रमाण आधी पासूनच कमी व्हावयास लागले असावे. म्हणजे प्रांत आणि काळा नुसार 'त्यांच्यात'देखील बदल होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 12:00 नवीन
मुस्लिम लीगने वेमुलाच्या आईला मदत केल्याचे , मला आवडले , इतकेच लिहिले ना ? त्यात मी चुकीचे काय लिहिले ? तुम्ही दान दिले असते , तर तुमचे कौतुक केले असते. त्यासाठी इतके भाराभर प्रश्न विचारून पोटदुखी जाहीर करायची काय गरज होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 06/20/2018 - 12:27 नवीन
डोक्टर सेठ आपण पण विरोधाभास दाखवण्यात मागे असता ? की आपल्याला मुस्लिमलिगचे विरोधाभास दाखवून दिले कि हळहळण्यास झाले. - तुमच्या कौतुकातली. 'ह्याला विरोधकरण्यासाठी म्हणून त्याला डोक्यावर घेण्याची नी- जर्क फट आम्हाला दिसली ती तयार करण्याचे काम आपले आणि मुस्लिम लीगचे त्यावर आम्ही प्रकाश झोत टाकण्याचे काम केले कारण त्यात निरपेक्षतेचा अभाव होता . तसेही सर्वच धर्माधारीत राजकिय पक्ष एकमेकांच्या क्रिया प्रतिक्रीयेवर जगतात, वस्तुतः खर्‍या धर्म निरपेक्ष देशात या कुणालाच जागा असण्याचे काही कारण नाही. तुम्ही एकाच दिशेनी बॅटींग करता , मी चौफेर करतो हा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Wed, 06/20/2018 - 12:34 नवीन
"स्वतःच्या घरच थोडं, म्हणून का व्याह्याच्या घरचं फिरवल घोडं ?"
उगाचच एवढ लिहित बसलो, हि म्हण आधीच आठवली असती तर सगळ्यांचे श्रम वाचले असते, पण या निमीत्ताने एक चांगली चर्चाही झाली. त्यात आपण मनमोकळा सहभाग घेतला त्यासाठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 06/20/2018 - 18:26 नवीन
कामापुरता मामा हि म्हण सुद्धा रिलेट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गामा पैलवान Wed, 06/20/2018 - 09:09 नवीन
सतिश गावडे,
लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या इच्छेपेक्षा शेरेबाजी करण्याची ईच्छा जास्त प्रबळ वाटते.
लेखकाचं माहित नाही, पण मला मात्र शेरेबाजी करायची तीव्र इच्छा होते आहे. :-) इथे इंग्लंडात पाकिस्तानी वंशांच्या मुस्लिमांच्यात आप्तविवाहामुळे किडकी प्रजा उत्पन्न होते आहे. काही दुवे : १. खायला काळ अन भुईला भार : Inbreeding Within the UK’s Pakistani Community; It’s Costing the NHS Billions : https://www.defendevropa.org/2017/migrants/inbreeding-pakistani-costing-billions/ २. ब्रॅडफर्डची व्यथा : Bradford study finds higher birth defect risk in married cousins : https://www.bbc.co.uk/news/uk-england-leeds-23183102 ३. ब्रॅडफर्डची नंबर १ कशात बरं ? : 'Bradford is very inbred': Muslim outrage as professor warns first-cousin marriages increase risk of birth defects : http://www.dailymail.co.uk/news/article-1392217/Muslim-outrage-professor-Steve-Jones-warns-inbreeding-risks.html ४. एका पाकिस्तानी वंशाच्या बाईकडून हा घरचाच आहेर : Brave woman who dares to shatter a toxic taboo: British Pakistanis are THIRTEEN times more likely to have disabled children because of intermarriage : http://www.dailymail.co.uk/femail/article-3162989/The-brave-woman-dares-shatter-toxic-taboo.html वरचे लांबलचक लेख वाचून कंटाळा आला असेल, नाही? इथे छानछान चलचित्रं आहेत. अर्थात, उत्तरदायित्वास होकार लागू. १. https://www.youtube.com/watch?v=hsrE-aNlSw0 २. https://www.youtube.com/watch?v=oDnRYNq-WU4 ३. https://www.youtube.com/watch?v=JV0S07EakCs : हे आपले झाकीरजी नाईकजी काय म्हणतात बघा. ४. https://www.youtube.com/watch?v=V1HeapNFwws सांगायचा मुद्दा काये की प्रेषितांनी केलं अगदी तस्संच आप्तगमन आजचा मुसलमान करतो. आ.न., -गा.पै. उत्तरदायित्वास होकार लागू : प्रेषितांचं उदाहरण मोमीन पाळंत असल्याने कुणाच्या भावनाबिवना दुखावल्या तर त्याने/तिने आपापले विश्वास तपासून बघावेत.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 09:45 नवीन
नात्यातली लग्ने असली की प्रश्न निर्माण होतात . http://www.thehindu.com/seta/2004/04/29/stories/2004042900161600.htm https://en.m.wikipedia.org/wiki/Cousin_marriage
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Wed, 06/20/2018 - 10:42 नवीन
डॉ. मंगु कुठे तरी सहमत झाले बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 12:01 नवीन
कशास सहमत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 06/20/2018 - 12:36 नवीन
नात्यातली लग्ने असली की प्रश्न निर्माण होतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 12:43 नवीन
हे मला वैद्यकीय अभ्यासक्रमात समजले आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सोमनाथ खांदवे Wed, 06/20/2018 - 11:19 नवीन
त्ये प्रेषितांचे काय उदाहरण हाये जरा नीट समजावून सांगा ना ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 06/20/2018 - 18:16 नवीन
https://wikiislam.net/wiki/Cousin_Marriage_in_Islam#Scripture -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
स
सोमनाथ खांदवे Wed, 06/20/2018 - 19:13 नवीन
मला थोडस माईत व्हत !!!! पण सर्वज्ञानी मंगूशेठ आजून त्या विषयावर भर टाकतील आस वाटल व्हत , पण त्यांनी कल्टी मारली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 12:48 नवीन
मुस्लिम राष्ट्रे , नात्यातील लग्न यावर एक सुंदर article मिळाले. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3419292/#!po=8.08824 मुस्लिम राष्ट्रात यावर बराच रिसर्रच सुरू आहे , स्त्रिया तरुण वयात याबाबत जागरूक होत आहेत. पूर्ण आर्टिकल अनेक महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श करते , की कुणा मन्गु , बंगुची कुणासही गरज पडू नये. ( बहुतांश आकडेवारी मुस्लिम राष्ट्रातील आहे )
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 12:51 नवीन
Conclusion Consanguinity is a deeply rooted social trend with one billion people currently living in countries where consanguineous marriages are customary, and among them, one in every three marriages is between cousins. The rising public awareness on possible preventive measures for congenital disorders has led to an augmentation in the number of couples seeking preconception and premarital counseling on consanguinity. Consanguineous marriages are associated with an increased risk for congenital malformations and autosomal recessive diseases, with some resultant increased postnatal mortality in the offspring of first cousin couples, but demographic and socioeconomic confounders need to be well controlled. No major adverse associations with reproductive parameters such as miscarriages and fertility have been documented. Associations with quantitative traits and complex adult-onset diseases are vague and inconsistent, suggesting the importance of implementing future research in this area. To standardize genetic services, guidelines for screening consanguineous couples and their offspring are needed. Consideration could be given to screening based on common autosomal recessive conditions in the populations and communities. In both high and low income countries, there is a capacity to provide health education for consanguinity at individual, family and community levels delivered by primary health care personnel with preconception and premarital genetic counseling, and diagnosis. Rather than discouraging consanguineous marriages in populations with long-held such tradition, ensuring access to preconception and premarital counseling services is the logical way to proceed and more likely both to receive community acceptance and be successful in maintaining and improving health (Alwan and Modell 1997; Bittles 2009). Increasing public literacy on consanguinity could be achieved by providing proper education and training to primary health care workers on all health and social issues related to consanguinity.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 12:58 नवीन
Young Arabs contemplating marriage are nowadays seeking a scientifically sound answer to their questions: "Will our children be physically or mentally abnormal if I marry my cousin?" "How can we prevent having abnormal children?" Research on inbreeding is considered a priority in societies with high consanguinity rates to help understand and prevent the deleterious impact of consanguinity on health, and to provide standardized and evidence-based guidelines for health care providers to assist them in counseling for consanguinity. ईव्हीडन्स बेस्ड गाईडलाईन्स फॉलो करण्यात young Arbs ना जास्ती interest आहे . https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2765422/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Wed, 06/20/2018 - 13:08 नवीन
<<<ईव्हीडन्स बेस्ड गाईडलाईन्स फॉलो करण्यात young Arbs ना जास्ती interest आहे >>> ==>> बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. पण प्रत्येक्षात व्यावहारिक आणि वैयिचारिक दृष्ट्या सुधारायला आपल्याला आणखी खूप वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सुबोध खरे गुरुवार, 06/21/2018 - 06:38 नवीन
आपण हा दुवा

नीट

वाचला का? बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. केवळ मंगुला साथ देण्यात वस्तुस्थिती पासून दूर जात नाही आहोत हे पाहून घ्या जरा. त्यांनी अख्ख्या लेखातील त्यांना समर्थन करण्यासाठी सोयीचं वाक्य उचलून येथे दिला आहे. त्या लेखाच्या गोषवार्यात सुरुवातीलाच काय लिहिला आहे हे जरी नीट पाहिलं असतंत तरी बरं झालं असतं. Abstract Consanguineous marriages have been practiced since the early existence of modern humans. Until now consanguinity is widely practiced in several global communities with variable rates depending on religion, culture, and geography. Arab populations have a long tradition of consanguinity due to socio-cultural factors.

Many Arab countries display some of the highest rates of consanguineous marriages in the world, and specifically first cousin marriages which may reach 25-30% of all marriages. In some countries like Qatar, Yemen, and UAE, consanguinity rates are increasing in the current generation.

Research among Arabs and worldwide has indicated that consanguinity could have an effect on some reproductive health parameters such as postnatal mortality and rates of congenital malformations. The association of consanguinity with other reproductive health parameters, such as fertility and fetal wastage, is controversial. The main impact of consanguinity, however, is an increase in the rate of homozygotes for autosomal recessive genetic disorders. Worldwide, known dominant disorders are more numerous than known recessive disorders. However, data on genetic disorders in Arab populations as extracted from the Catalogue of Transmission Genetics in Arabs (CTGA) database indicate a relative abundance of recessive disorders in the region that is clearly associated with the practice of consanguinity.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com गुरुवार, 06/21/2018 - 07:17 नवीन
अरब / मुस्लिमात consanguinous marriages जास्त प्रमाणात आढळतात , हे कुणीही नाकारलेले नाही , किंबहुना या धाग्याचा मुख्य विषयच तो आहे , असे धागा ओनरचे म्हणणे आहे. पण त्यासाठी स्त्रीयाममध्ये जागृती करणे , डेता गोळा करणे व त्यातील निषकर्ष unbiased प्रकारे मांडणे आवडल्याने त्या दोन लिंक दिल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/21/2018 - 08:12 नवीन
हो का ? मग संयुक्त अमिराती येमेन आणि कतार सारख्या देशात नातेवाईकांच्यात अंतर्विवाह (consanguinity) वाढत आहेत हे लपवायची गरज काय होती? कशाला उगाच मुसलमान धर्मातील लोक सुधारत आहेत म्हणून पुंगी वाजवताय आणि unbiased (पूर्वग्रह दोष विरहित) मांडणी केल्याचा आभास निर्माण करताय? तरी बरं मी काही दुसरा दुवा दिलेला तुमच्याच दुव्यातील तुम्ही हेतुपुरस्सर गाळलेला भाग दाखवलाय. डॉक्टर म्हणून लोक तुमचे मत जास्त खात्रीचे म्हणून ग्राह्य धरतात याची तरी चाड बाळगा. अशी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करणं सोडून द्या. किती वेळा सांगितलंय कि इकडची थुंकी तिकडे केली तरी ती आपल्याच बोटावर राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 06/21/2018 - 08:36 नवीन
लिंक पूर्ण दिली आहे मी त्यात काटछाट केलेली नाही , प्रतिसादात दोन चार ओळीच copy paste होणार ना ? तो समुदाय , तो देश याबाबतीत मागास आहे , असा तुमचा निशकर्ष असेल तर तुम्ही तसा तो लिहू शकता , तुमच्या विकारशक्तीवर , लेखणीवर मी बंधने घातलेली नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/21/2018 - 09:43 नवीन
ब्वॉर्र गिरे तो भी टांग उपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित गुरुवार, 06/21/2018 - 11:42 नवीन
<<<केवळ मंगुला साथ देण्यात वस्तुस्थिती पासून दूर जात नाही आहोत हे पाहून घ्या जरा.>>> ==>> तुम्ही मर्यादा क्रॉस करताय. तुम्ही असे कसे दोषारोप करू शकता. मी कोणाला साथ देईल नाही तर विरोध करेल. त्याची संपूर्ण जवाबदारी माझी आहे. माझा प्रतिसाद तुम्हाला वावगा वाटला असेल तर त्यातले दोष मला दाखवा. मला वाटले तर मी माझ्या विचारात सुधारणा करील. माझा प्रतिसाद पण त्याच धर्तीवर होता. खाली मंगू नी त्याचे बऱ्यापैकी स्पष्टीकरण दिले आहे. ते तुम्हाला मान्य नसेल त्यावर अधिक प्रकाश टाकावा. === आणि ते "नीट" वगैरे हायलाईट करून उगाच धमकावण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याशी चर्चा "नीट " करायची असेल तर करत जावा. नसेल जमत तर नाही केलीत तरी चालेल. ===
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/21/2018 - 15:04 नवीन
तुमच्याशी चर्चा करण्यात मला अजिबात रस नाहीये कारण तुम्ही एक अजेंडा घेऊन येथे वाद घालत आहात हे उघड आहे. परंतु आपण तो दुवा नीट आणि पूर्णपणे वाचलेला नाही हे हि सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. तो पूर्ण वाचल्यानंतर टिप्पणी करा आणि मग चर्चा करा. अन्यथा बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. अशी टिप्पणी आपण केली नसती. हायलाईट करणे याचा अर्थ आपण धमकावणे समजत असाल तर धन्य आहे. उगाच धमकावणे मर्यादा क्रॉस करणे इ शब्द वापरून तुम्हीच जास्त गरम होताय. मंगू यांनी पार उलट अर्थ (स्वतःचे म्हणणे पुढे रेटण्यासाठी) लावला आहे. त्यांचे पितळ उघडे पडले तरी त्यांना काहीही लाज वाटत नाही. तुम्ही वस्तुस्थिती जाणून न घेता त्यांची री ओढता आहात हे आश्चर्य आहे प्रथम वस्तुस्थिती पूर्णपणे जाणून घ्या. "रक्ताच्या नात्यातील संबंध आणि जनूकीय दोष" यावर सविस्तर चर्चा आपण नंतर करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com गुरुवार, 06/21/2018 - 15:50 नवीन
माझे पितळ आहे, तर तुमचे सोनेरी निष्कर्ष स्वतंत्रपणे का मांडले नाही ? दोन विद्यार्थी स्वतंत्रपणे पेपर लिहितात ना ? की मागच्याने केवळ पुढच्याने काय चुकले हे लिहिले आणि शेरेबाजी केली की झाले ? माझ्या प्रत्येक पोस्टखाली तुम्ही केवळ माझे कसे चुकले , हे लिहिता , मग त्यात धर्म, अफझलखान हे सगळे आणून बसवता आणि शेवटी मला लाज नाही , असे काहीतरी लिहिता , तुमच्या मताबद्दल आदर आहे, तरी आता हा तुमचा हा एक प्रोटोटाइप होऊन बसला आहे, हे तुमच्या तरी लक्शात आले आहे का ? मी दोन्ही लिंका पूर्णपणे दिलेल्या आहेत, जशा आहेत तशा , त्यातून तुम्हाला दुसरे काही हाय्लाइट करायचे असेल तर लिहा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/21/2018 - 19:19 नवीन
कुठला धर्म आणि अफझलखान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मराठी कथालेखक Wed, 06/20/2018 - 13:15 नवीन
हिंदू विवाह कायद्याने चुलत (वा इतर नात्यातील) विवाहांना परवानगी नाही असे काहीसे काही प्रतिसादात दिसले. हे कलम नक्की काय आहे ? आणि परवानगी नाही म्हणजे काय असे लग्न करणार्‍यांना अटक , शिक्षा होवू शकते का ? मला असे वाटते की कायद्याने अशी काही आडकाठी करु नये. एकंदरीतच समाजात 'अशी लग्न होवू नये' असे मार्गदर्शक तत्व असायला हवे पण त्यावर जोरजबरदस्तीने बंधने घालू नये. शिवाय अशा लग्नांचा जोडप्याला होणार्‍या अपत्यावर विपरीत जनुकीय परिणाम होवू शकतो , जर हा विपरीत परिणाम फक्त अपत्यापुरताच मर्यादित आहे तर ज्यांना अपत्य नको आहे (एकूणातच पालकत्व नको किंवा स्वतःचे अपत्य नको- दत्तक घ्यायचे आहे) अशा जोडप्याच्या बाबत तर हा परिणामही लागू होत नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 13:34 नवीन
वकिलांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
उ
उपयोजक Wed, 06/20/2018 - 13:28 नवीन
म्हणजे खाप पंचायत जो एकगोत्र विवाहाला विरोध करते तो योग्यच म्हणायचा काय?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 06/20/2018 - 13:47 नवीन
Theroticaly बरोबर आहे.. पण गोत्राची व्याख्या 21 पिढ्या आहे, बाकी हिंदू धर्मात नात्यात विवाह करण्याबाबत आपत्कालीन पळवाट आहे. सरसकट नियम नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
सुबोध खरे गुरुवार, 06/21/2018 - 06:48 नवीन
कोणत्याही जवळच्या नात्यातील विवाह हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने हानिकारक आहेत. मग ते चुलत भावंडात असोत किंवा आतेमामे भावंडात. धर्म, जात किंवा प्रादेशिक अस्मिता "शास्त्राच्या संवादात" आणणे हि गोष्ट मुळात चूक आहे. "खाप पंचायत" सगोत्र विवाहाला मान्यता देत नाही. सगोत्र माणसांत जनुकीय साम्य किंवा साधर्म्य आढळलेले नाही त्यामुळे अशा विवाहामुळे होणाऱ्या संततीला जनुकीय आजार होतात याला कोणताही पुरावा मी तरी पाहिलेला नाही . केवळ एखादी पद्धत रूढी किंवा परंपरा आहे म्हणून चालू ठेवायची कि नाही हा वैद्यकीय प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. एकाच गोत्रात/ कुळात शिकणारे विद्यार्थी यांनी आपसात विवाह करून शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून केलेल्या या नियमाला( हे वाचलेले आहे सत्य किंवा असत्य माहित नाही) आजच्या जगात कोणताही जनुकीय शास्त्रीय आधार नाही. खाप पंचायती या टाईप रायटर सारख्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. चार माणसे केवळ वयाने वाढली म्हणजे त्यांना शहाणपणा येईलच असे नाही.
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 06/22/2018 - 02:08 नवीन
+१ गोत्र पद्धतीला काहीही जनुकीय शास्त्रीय आधार नाहीय. + तेदेखील फक्त वडलांचेच विचारात घेतात. त्यामुळे आईच्या 50% जनुकांच काय? पूर्ण निरुपयोगी पद्धत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार गुरुवार, 06/21/2018 - 18:59 नवीन
ज्यांनी माझे या पुर्वीचे वेळोवेळचे धागा लेख आणि चर्चा सहभाग पाहीले नाहीत त्यांच्यासाठी म्हणून मी सर्वच धर्मीय शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य आणि अनेक प्रकारच्या पूजा एकाच वेळी नाकारताना नास्तिकांप्रमाणे सरसकट न नाकारता तमूक ग्रंथातील अमूक धर्म पंथात काय चांगले घेता येईल याचे चर्चा धागे या पुर्वीच करून झालेले आहेत आणि त्या नंतरच मी टिकेकडे आलो आहे. त्यामुळे अमुकलाच किंवा तमूकलाच लक्ष्य करताय अशा प्रकारचे तर्क वस्तुनिष्ठतेवर टिकणारे असणार नाहीत -असे ग्रह करून घेणे टाळावे - याचे पुनश्च स्मरण देतो. मी उल्लेखलेली तमुक ग्रंथाची शांततामयता आणि विज्ञान संपन्नतेची प्रमाणपत्रे मी वाटलेली नाहीत, तर त्यांचेच गेल्या काही वर्षातील प्रचारक डॉ. झा.ना. (महात्मा झाकीर नाईक) यांची आहेत. -त्यातील विज्ञान संपन्नतेचा गौरव आपण या चिकित्सेतून अभ्यासणार आहोत. आणि या महात्मा डॉ. झा.ना. यांची गूगल प्रीयता गूगल ट्रेंडवरून जिज्ञासूंना अभ्यासता येऊ शकते. माननीय महात्मा महोदयांचे बरेच प्रचार व्हिडीओ युट्यूबर उपलब्ध आहेत. महात्मा महोदयांच्या काही शाकाहार-मांसाहार विषयक शंका निरसन करताना तमुक ग्रंथ मांशासनास परवानगी देतो कारण माणसाला ब-१२ हे व्हिटॅमीन माम्साहारातूनच व्यवस्थीत मिळू शकते हे ह्या ग्रंथ कर्त्यास माहित होते कारण तमुक हा ग्रंथ विज्ञान संपन्न आहे अशी काहीही मांडणी महोदय करताना दिसतात. ब-१२ व्हिटॅमीनचे वैज्ञानीक महत्व मान्यकरूनही तमुक ग्रंथाचा आणि तमुक ग्रंथाच्या कर्त्यांचा आदर करुनही आमचा कर्ता करविता आणि सर्वकाही करू शकणारा दयाळू परमेशवर ब-१२ व्हिटॅमीनची निर्मितीची क्षमता मानवाच्या शरिरातच का देत नाही ? महात्मा महोदयांचा दुसरा मुद्दा तमुक ग्रंथ ८० % विज्ञान तत्वांशी जुळतो बाकी २० टक्क्याचे जे संशोधन बाकी आहे ते ८० % जुळले म्हणजे उरलेले २० टक्के जुळेलच यातील पहिला ८० % चा आकडा ते कसा आणतात त्यांचे त्यांना माहित पण एखदी गोष्ट ८० टक्के जुळली जरी तरी त्यावरून उरलेले २० टक्केही जुळेलच असा दावा तार्कीक उणिवेचा असतो. उपरोक्त सर्व विवेचन विषय निघालाच आहे तर चर्चा करून घ्यावी म्हणून असाच काहीसा प्रकार ते CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहा बद्दलच्या शंकांबद्दल करताना ते दिसतात, वर सदस्य गापै यांनी त्या युट्यूब व्हीडीओची लिंक दिली आहे. आय विल नॉट बीट अराऊंड द बूश म्हणत ते केवळ अराऊंड द बूश बीटच करताना दिसतात कारण , तमूक ग्रंथ CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहाचे विज्ञानात न बसणारे समर्थन करतो. इथेच मिपावरी ल पुरोगामी मंडळी त्यातील डॉक्टर सुद्धा CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहा चे समर्थन करताना दिसत नाहीत. पण ते महात्मा महोदय मात्र शंका विचारनार्‍यास तुम्ही डॉक्टर नाहीए CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहांचा अनीष्ठ परीणाम न सांगणारे रिपोर्ट सुद्धा त्यांच्या कडे असल्याची दुहाई देण्याचा प्रयत्न करताना दिसतात . अशी दुहाई ज्यांना देणे शक्य असते त्यांना आय विल नॉट बीट अराऊंड द बूश म्हणण्याची पाळी येण्याचे कारण नाही तरीही ते करतात यातच सर्व काही आले. एकुण या चर्चेत डॉक्टर मंडळींनी दिलेली माहिती पाहिली असता CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहात भावी संतती व्याधी ग्रस्ततेची शक्यता असते तेव्हा विज्ञान संपन्न म्हणवता येत नाही. तेव्हा वर गापै म्हणतात तसे तमुक ग्रंथाचे ग्रंथ प्रामाण्य विज्ञानाच्या भरोशावर स्विकारणे सदसद विवेक बुद्धीला कठीण जाते. ज्या गोष्टीच्या विज्ञान संपन्नते बद्दल सांशकता आहे त्या बद्दल खास करून गंभीर आरोग्य विषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याव्र निर्देश करावा कि करू नये. सरते शेवटी हे धागा लेख चर्चा चर्चेत कोण यशस्वी अयशस्वी झाले या पेक्षा व्यक्ती आणि समुदायाचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे की नाही. मग त्या दिशेने समाज सुधारणांना पुरोगामी मंडळी सापेक्षता झटकून समर्थन देणार की नाही ? चुभूदेघे. मन मोकळ्या चर्चा सहभागासाठी सर्वाम्चे पुनश्च आभार.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 06/21/2018 - 20:10 नवीन
1. निव्वळ आकडेवारीवरून दोन्ही पक्षाचे लोक आपलेच म्हणणे खरे असल्याचे सांगू शकतात. उदा. समजा , ननात्यातील विवाहात समजा एखाद्या रोगाचे प्रमाण 5 % आहे , याचाच अर्थ , रोग न होण्याचे प्रमाण 95 % आहे नात्यातील विवाहात रिस्क जास्त असल्याने रोगाचे प्रमाण 20 % आढळते . आता एक पक्ष असे बोलेल की 5 चे 20 होते , हे खूप आहे दुसरा पक्ष म्हणेल की 80 % बालके हेलदी आहेतच की. त्यामुळे निववल आकडेवारीवरून मुद्दे अन गुद्दे सिद्ध होत नाहीत. कोर्टात इन्शुरन्सच्या क्लेममध्ये असे प्रसमग वारंवार येतात , पेशनत बोलतो डायबेटीस असूनही हार्ट अटक न आलेली ढीगभर माणसे आहेत. मग माझा डायबेटीस अन हार्ट हे का जोडता ? इन्शुरणस्वाले बोलतात ,डायबेटीस नसलेले लोक हार्ट attck ला कमी बळी पडतात , शेवटी कोर्ट काहीतरी मध्यस्थी करते ( हिंदू विरोधी 4 धागे आहेत अन मुसलमांविरोधी माझा 1 च आहे , म्हणून मी लई चाम्गला , हाही याच प्रकारातला युक्तिवाद , असो) 2. नुसत्या आकडेवारीवरून damage किती हे कळत नाही , म्हणजे , नात्यात लग्न केले की पाच ऐवजी 20 च तर मुले रोगट निघतात , म्हणजे फक्त 15 च जास्त की पण , त्या 15 बालकांमुळे त्याचे पालक सफर होतात , त्यांचे उत्पन्न त्या मुलावर खरच होते , त्यामुळे इतर निरोगी भावंडांचे शिक्षण , लग्न तुटते , सरकारला विशेष शाळा उघडाव्या लागतात ,इतका त्रास भोगूनही या व्यक्ती चाळिशीतच मेल्या , तर सगळेच शून्य , त्या आकडेवारीच्या टेबलात हे सगळे दिसू शकत नाही, त्यामुळे नुसत्या आकडेवारीवरून बोलणार्याना बोलू द्यावे , जनतेने आपले निर्णय चौफेर माहिती घेऊनच घ्यायचे असतात. 3. शिवाय , नात्यातली लग्ने हाoption असतो , compulsion नाही , त्यामुळे कुणि काहीही बोलले, तरी नाकारणारा नाकारू शकतोच ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एमी Fri, 06/22/2018 - 02:02 नवीन
प्रतिसाद आवडला मंगु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Fri, 06/22/2018 - 08:43 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सुबोध खरे Fri, 06/22/2018 - 09:15 नवीन
नुसत्या आकडेवारीवरून damage किती हे कळत नाही , म्हणजे , नात्यात लग्न केले की पाच ऐवजी 20 च तर मुले रोगट निघतात , म्हणजे फक्त 15 च जास्त की. हा सर्वसामान्य लोकांचा विचार आहे भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. यात ३० कोटी जोडपी प्रजननक्षम वयातील आहेत. यापैकी १० % नातेसंबंधातील लग्न केलेली आहेत म्हणजे ३० लाख यात आपण अगदी २ टक्के मुले जरी आंतर संबंधामुळे जन्मजात जनुकीय व्यंग घेऊन जन्माला आली तरी हि संख्या ६०००० होते. जेंव्हा आपण पूर्ण लोकसंख्येत एखादा प्रश्न पाहतो तेंव्हाच त्याचे विक्राळ स्वरूप लक्षात येते. त्यामुळे जवळच्या नाते संबंधातील विवाह करू नये असे वैद्यकीय शास्त्र सांगते. मला तर असे काही वेळेस असे वाटते कि त्याला कायद्याने बंदी घालायला हवी.राजकीय गणिते काय आहेत याचा त्याच्याशी संबंध असू नये. ( कदाचित हि टोकाची भूमिका आहे) परंतु माणूस अपघाताने अकाली मरण्याची शक्यता फार तर हजारात एक असते तरी लोक विमा उतरवतात ना? हे तसेच आहे. कारण व्यंग असणारे मूल हा केवळ आईबापच नव्हे तर त्यांच्या नंतर त्या मुलाच्या भावंडांवर आणि एकंदर राष्ट्रवर पडणारा भार आहे, तेंव्हा अशा मुलांचा गर्भपात करण्या पेक्षा (ती जन्मालाच येऊ नयेत) निरोगी मुलेच जन्माला येतील हा विचार करणे आवश्यक आहे. या प्रश्नाला सामाजिक, धार्मिक अंगे आहेत हेही मला माहित आहे. परंतु एक तांत्रिक विशषज्ञ(TECHNICAL EXPERT) म्हणून माझी बाजू मी मांडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 12:56 नवीन
डॉ. मंगुंनी हा प्रतिसाद 'तमुक ग्रंथाच्या विज्ञान संपन्नतेच्या विशेषणाला बगल देण्यासाठी विषय बदलण्यासाठी लिहिला आहे का माहीत नाही पण त्यांच्या प्रतिसादात तमुक ग्रंथाच्या विज्ञान संपन्नते ' बद्दल मलातरी काही भाष्य आढळले नाही. पण त्यांची जी काही मांडणी आहे ती पाहूया
3. शिवाय , नात्यातली लग्ने हाoption असतो , compulsion नाही , त्यामुळे कुणि काहीही बोलले, तरी नाकारणारा नाकारू शकतोच ,
हा युक्तीवाद कसा फसवा आहे याचे मी अ‍ॅमी यांना उत्तरे देताना सविस्तर विवेचन केलेले आहे. त्रोटक पुन्ह एकदा १) पडदा पद्धती मुळे स्वतःच्या चुलत भाऊ बहिणी शिवाय कुणी पहायलाच मिळाले नाही आणि म्हणून शारिरीक आकर्षण वाटले तर हा फ्रिली एक्सरसाईज्ड ऑप्शन कसा म्हणवला जाऊ शकेल ते लॉजीक कळलेले नाही. २) भावा बहिणीत नैसर्गीक स्थितीत शारिरीक आकर्षण सहसा टळत असेल तरीही असे विवाह कुटूंबाती प्रॉपर्टी कुटूंबात रहावी म्हणून मोठी मंडळी भरीस पाडत असतील तर हा फ्रिली एक्सरसाईज्ड ऑप्शन कसा होऊ शकतो ईन एनी केस अगदी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे जनुकशास्त्र संशोधकांचे संशोधन भाऊ बहीण विवाहातील संतती आरोग्य दृष्ट्या जोखीमीची आहे हे दाखवत असताना -संदर्भ अ‍ॅमिंना प्रतिसादात दिले आहेत- ही स्वतः डो. असूनही डो. मंगुरावांना अनुचित गोष्टीचे समर्थन करावे वाटते या मागचे नेमके गौड बंगाल काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 16:23 नवीन
स्वतः डो. असूनही डो. मंगुरावांना अनुचित गोष्टीचे समर्थन करावे वाटते या मागचे नेमके गौड बंगाल काय आहे ? नात्यातले विवाह केल्याने व्यंग मुले जन्मू शकतात , मग ते हिंदू असो वा मुस्लिम असो , हेच मी लिहिले , तुला मी माझा फोन नंबर दिलेला आहे , काय शंका असतील तर फोन कर .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 19:32 नवीन
कातडी बचाव मोहीम केली की, काही तरी लपवले जात आहे असे वाटणारच ना ! आणि जी काही चर्चा चालू आहे ती सार्वजनिक समये बद्दल समस्त जनतेच्या माहितीत भर पडावी या उद्देश्याने आहे. प्रत्येकाने आपली बाजू मांडायची शेवटी कोणती बाजू उजवी याचा विवेक वाचकाकडे असतो त्यावर सोडून देणे श्रेयस्कर. जी चर्चा सर्वांसाठी आहे त्यात व्यक्तीगत संपर्काचा प्रश्नच कुठे येतो . मला ज्या शंका वाटतात त्या इथे विचारणार त्यावर आपणास उत्तर देणे प्रशस्त वाटल्यास द्यावे अन्यथा देऊ नये , कणतीही जबरदस्ती नाही. व्यक्तीगत समस्यां आणि शंका निरसनासाठी माझे आणि इतर प्रत्येकाचे आपापले डोक्टर आहेत आपल्या संपर्क क्रमांक संपर्क माहिती मी मागितलेली नाही - दिलेली वाचली सुद्धा नाही - न मागितलेली खासगी माहिती जाहिरात प्रकारात मोडू शकते म्हणून संपादकांना वगळण्याची विनंती केलेली आहे. मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 13:05 नवीन
अ‍ॅमींचे ठिक आहे एखादा जीव ईकडे तिकडे त्यांना फरक पडत नाही, कदाचित +१ करणार्‍या विशुमीत रावांनाही एक जीव इकडे काय तिकडे काय काही फरक पडत नाही ! डॉ , मंगु आपण डोक्टरच आहात ना ? आणि प्रत्येक जीवाची किंमत महत्वाची आहे ह्या शपथेची आपणास आठवण आहे ना ? असेल तर आपले १५ नेच तर व्याधीग्रस्त जीव वाढलेचे समर्थन आपल्या प्रोफेशन मध्ये नेमके कसे होते ? बाकी हि केवळ १५ ने वाटणारी आकडेवारी प्रत्यक्षात हरारो लाखो जीवांशी संबंधीत कशी असू शकते हे डॉ, खरेंनी त्यांच्या विश्लेषणातून दाखवून दिल्लेच आहे त्याची पुर्नावृत्ती करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 16:25 नवीन
बाकी हि केवळ १५ ने वाटणारी आकडेवारी प्रत्यक्षात हरारो लाखो जीवांशी संबंधीत कशी असू शकते हे डॉ, खरेंनी त्यांच्या विश्लेषणातून दाखवून दिल्लेच आहे त्याची पुर्नावृत्ती करत नाही. 15 नेच वाढला तरी damage कितीतरी अधिक असतो , हेच मि लिहिले आहे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 14:19 नवीन
( हिंदू विरोधी 4 धागे आहेत अन मुसलमांविरोधी माझा 1 च आहे , म्हणून मी लई चाम्गला , हाही याच प्रकारातला युक्तिवाद , असो)
१) काही ग्रंथ पंथ आणि त्यांचे लांगूलचालक यांचे कथनी आणि वर्तनी जमत नसेल तरी विज्ञान संपन्न शांततामयी अशी गोड गोड बिरुदे लावून घेतातच ना !, शब्दशः मी चांगला असा कोणाथी युक्तीवाद केला नव्हता तरीही , पण मी आपलेच आदर्श घेतले तर मी चांगला म्हणण्या पासून मला कुणि कसे आडवू शकेल बरे ;) ? * तसे बिरुटे सर आणि आपण काढलेला आक्षेप व्यक्तीलक्ष्य तर्क दोषात मोडतो , पण ते असो. २) आपले उपरोक्त वाक्य तार्कीक दृष्ट्या बरोबरच आहे आपण आपला बरोबरच असलेला तर्क आता शांततामय ग्रंथाला लावू , त्यात भिन्नधर्मीय लोकांना आणि स्त्रीयांना नामोहरम करण्याचे आदेश आपण सांगितलेल्या न्यायानेच शांततामयी होतात नाही का ? या धागा चर्चेचा विषय मर्यादीत असल्याने विस्तृत विवेचन टाळतो आहे. ३ .१) म. अली जीनांनी गांधींना स्वतः सांगून पाहिले की सुडो सेक्युलरीझमच्या गफ्फा न हाकता एक हिंदू म्हणून भेटा आणि बोला पण गांधींनी नाही ऐकले. कोणतीच टिका न करता ज्यांनी केवळ लांगूलचालन केले त्या गांधी नेहरुंच्या हाती महात्मा म. जीना यांनी त्यांच्या शब्दांवर कोणताही विश्वास न ठेवता काय ठेवले हे जग जाहीर आहे. आपण आपले एकत्रफी सापेक्ष लांगूलचालन चालू ठेवा . आम्ही निरपेक्ष टिकाही करतो आणि म्हणून आपल्यापेक्षा कदाचित अधिक सच्चे असतो. (आता आमचे आम्हाला म्हणून घेण्याचा आधिकार आहे नाही का :) ) ३.२) काही गोष्टी विज्ञानात बसत नाही म्हणून आपण त्यांना रूधी म्हणून ठरवून भलावण करतो यावर आधारीत किमान सहमती कार्यक्रम मी पुढच्या प्रतिसादात आपल्या हाती ठेवतो मग बघू कुणाची धाव कुठे पर्यंत :) ४) या धाग्यावरील चर्चेतील एकही तथाकथीत धर्म निरपेक्षता वादी आमच्या कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? धाग्यावर येऊन एक शब्दाची भर घालू शकलेला नाही. यांचा न धड ईकडचा अभ्यास असतो ना धड तिकदचा तरी लांगुलचालीत पुरोगामी बनुन बघण्याची घाई मात्र नक्की असते. ५) आमचा लक्ष्यार्थ आम्ही रचनात्मक गोष्टींची कोणत्याही धर्मात असेल तरी सकारात्मक दखल घेतो. आणि जिथे उणीवा आहेत त्यावरही बोटचेपेपणा न करता सुस्पष्ट भूमिका घेतो . . खोट्या स्तुती पाठकांपेक्षा एक सच्चा टिकाकार चांगला हे उशीरा का होईना प्रत्येकास कळते आमच्या मुस्लिम बांधवांनाही कळेल. आता किमान सहमतीचे मुद्दे पुढच्या प्रतिसादातून बघू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/22/2018 - 03:07 नवीन
नात्यात च लग्न केल्या मूळ इतिहासात डोकावून पाहता या समाजात क्रूरपणा जास्त च आढळून येतोय का ? जगात बहुसंख्य असून प्रत्येक देशात यांच्यामुळेच अशांतता असणं . इतिहासात एखादा राजा शरण आलेला असताना देखील त्याचे सर कलम करणे . भारतीय सैनिकांचे दोन तीन वेळा पाकिस्तानींनी डोके कापून घेऊन गेले होते . ज्या ज्या देशात राहतात त्या त्या देशातील कुठलेही नियम न पाळता आकांडतांडव करून शांतता नष्ट करणे . नात्यातच लग्न झाल्यावर आशा घटना वाढू शकतात का ? .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 14:46 नवीन
आपण किंचीत अधिक ताणलय पण मी वर संदर्भ दिलेल्या ए .एम. युच्या जनुकशास्त्रीय अभ्यासकांनी केलेल्या सर्वे आणि अभ्यासानुसार भाऊ-बहीण विवाहातून झालेल्या संततीच्या कॉग्नीटीव्ह अ‍ॅबिलीटीज आकलन क्षमता योग्य पद्धतीने विकसीत होण्यातही अडथळे येतात . ह्या जोडीला मी वर पहिल्या अनुषंगिक अवांतरात म्हटल्या प्रमाणे भरीव पोटगी शिवाय तलाक प्रकरण फार सुलभ केले तर, मुले सांभाळली जावीत म्हणून समाज नात्यातच (चु लत/आत्ये/मामे/मावस) भाऊ बहीण विवाह करण्यावर भर देतो. , त्यातून व्याधीग्रस्त संतती जन्मास येण्याचा धोका वाढतो. आई-वडील तर पुर्नविवाह होऊन अजून वेगळीकडे चालले जातात, मुलांचा परिवारात जेमतेम सांभाळ होतो पण शिक्षणाचा आर्थिकभार पूर्ण उचलला जात नाही , त्यात वर म्हटल्या प्रमाणे आकलन क्षमता योग्यशी विकसीत झाली नाही तर उनाडपणा ते आपण म्हणतात त्या नाही पण तशाच काही गंभीरही गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात तुम्ही कितीही पुरावे दिले तरी काही मंडळींना हे पटणे अवघड जाऊ शकते हे ओघाने आलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
ए
एमी Fri, 06/22/2018 - 05:15 नवीन
प्रॉब्लेम नक्की काय आहे • सव्यंग मुलं जन्मताय्त हा? की • जवळच्या नातेवाईकात शरीरसंबंध ठेवले जातायत हा? की • शांतताप्रिय धर्मात चुलत भावंडात शरीरसंबंध ठेवले जातायत हा? माझ्या मते 'सव्यंग मुलं जन्मताय्त' हा मूळ प्रॉब्लेम आहे. आणि तो नात्यात लग्न केले काय, किंवा जातीत लग्न केले काय, किंवा धर्मात/ वंशात लग्न केले काय, किंवा अगदी आंतरधर्म&वंश लग्न केले काय तरीही उद्भवण्याची 'शक्यता' आहेच! मग तो प्रॉब्लेमच मुळातून सोडवायचा प्रयत्न करा ना! बाकी सगळे वरवरचे उपाय आहेत; केवळ 'शक्यता' कमीजास्त करणारे....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा