Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 05:14
🗣 208 प्रतिसाद
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे. * कितीसा पुरोगामी आहेस ? * Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे. * मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे. * पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे. * ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत ** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? ** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान ** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश *** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त *** *** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न *** या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्‍यापैकी संभव असतो. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही. ** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्‍या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही. * या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्‍यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्‍या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही. * भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अ‍ॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही. * पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्‍या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच. खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही. चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे (आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे. बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य. दुसरे असे की दुसर्‍या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्‍या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे. *** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories *** *** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा *** * आत्ते-मामे भावंडे

प्रतिक्रिया द्या
318269 वाचन

💬 प्रतिसाद (208)
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 05:55 नवीन
...प्रॉब्लेमच मुळातून सोडवायचा प्रयत्न करा ना!
पूर्ण सहमत मी आपल्या प्रतिसादांची उत्तरे क्रमवार देतोय तीती देईनच पण माझा ही प्रयत्न विज्ञाननिष्ठता नाकारून शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य मानण्यामुळे ज्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात ते विज्ञाननिष्ठ नसलेले शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारून समस्येच्या एका बाजूचा प्रॉब्लेम मूळातून सोडवण्याचाच आहे. (बरे मी नास्तिकांप्रमाणे समस्या नसलेल्या श्रद्धाही सरसकट नाकारत नाही , पण जिथे समस्या आहेत त्या (अंध) श्रद्धा नाकारतो त्या अंधश्रद्धा नाकारणे सोपे जावे म्हणून शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो. तुम्ही एकाच धर्माचे शब्द ग्रंथ प्रामाण्य नाकारता का म्हणून येऊ नका मी सर्वच ग्रंथ प्रामाण्य नाकारतो. मनुस्मृतीतील जन्माधारीत विषमते चे समर्थन मी मिपावर वेळोवेळी नाकारलेले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 14:32 नवीन
१) (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती व्याधीग्रस्त जन्मू शकण्याची मोठी शक्यता असते. २) या विषयावर जनजागृती झाली पाहीजे ३) डॉ मंगु आणि त्यांच्या समर्थ गटानुसार (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह केवळ रूढीमुळे होतात (त्यास धर्म ग्रंथाचा संबंध नाही अप्रत्येक्ष अर्थ) हे त्यांचे म्हणणे तात्पुरते गृहीत धरुन चालू म्हणजे काही कायदे करायचे झाल्यास धर्मांध लोकांचा त्रास होणार नाही याची निश्चिंती ४) (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह झाला त्यातून जनुकीय कारणांमुळे व्याधीग्रस्त संतती जन्मली , आणि असा विवाह घारातील मोठ्यांनी /इतराम्नी भरीस पाडल्यामुळे झाला असला तर अशा लोकांना १ शिक्षेची तरतूद असावी २) व्याधीग्रस्त संततीसाठी अशा लोकां कडून दंड वसूल करून आर्थी भविष्याची तरतूद करावी ५) क्रमांक ४ चे समर्थन न झाले किंवा असा कायदा अस्तीत्वात नाही आला तर अशा कायद्यास विरोध करणार्‍यां वर नैतिक आण आर्थिक जबाबदारी निश्चित करून व्याधीग्रस्त संतती साठीच्या भविष्यातील आर्थीक तरतूदी साठी मोठा / अनलिमीटेड टेक्स लावून त्यातून अशा जन्मतः व्याधीग्रस्त लोकांचे खर्च चालवावेत
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 17:17 नवीन
नंबर 5 .... नेमके कसे implement करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एमी Sat, 06/23/2018 - 03:09 नवीन
५) क्रमांक ४ चे समर्थन न झाले किंवा असा कायदा अस्तीत्वात नाही आला तर अशा कायद्यास विरोध करणार्यां वर नैतिक आण आर्थिक जबाबदारी निश्चित करून व्याधीग्रस्त संतती साठीच्या भविष्यातील आर्थीक तरतूदी साठी मोठा / अनलिमीटेड टेक्स लावून त्यातून अशा जन्मतः व्याधीग्रस्त लोकांचे खर्च चालवावेत >> कृपया मला या आर्थिक भरातून वगळा आणि तो भार RTL कायद्याच्या समर्थकांच्या डोंबलावर टाकून द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
य
यशवंत पाटील Fri, 06/22/2018 - 14:48 नवीन
लई म्हणजे लईच लिहिता राव तुम्ही. एखाद्याला काय चर्चा चालु हाये ते न समजता बी कटाळा यायची एकदम ग्यारंटी असतीया तुमचे लंबेचौडे प्रतिसाद. आखिर कहना क्या चाहते हो चच्चा?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 14:56 नवीन
तुम्ही उशीरा पोहोचले आता फकस्त आता पर्यंतच्या चर्चेवरून किमान सहमतीचा प्रस्ताव चर्चायचा बाकी आहे आणि तो आज्याबात लंबाचवडा नाहीए.
लंबेचौडे
मालक, एखादी गोष्त मुद्देवार अभ्यासून सांगोपांग लिवलीतर लांबी वाढू शकते नव्ह का ? तस चर्चेचा मुख्य गोषवारासोप्या शब्दात नंतर ल्येखाअ जोडीन म्हणतो. म्हणजे ज्यांचे वाचन झाले नाही त्यांना पुन्हा अभ्यासता येईल की. मनमोकळ्या सहभागासाठी आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 15:00 नवीन
मंगुशेठना जे समजवण्यासाठी मी आधीच्या धाग्यावर लांब प्रतिसाद लिवले ते केवळ दोन मराठी म्हणी 'कामा पुरता मामा' आणि 'घरच पदल थोड, व्याह्याच फिरवल घोड ; या दोन वाक्यात संपवता आला असता. उत्साहाच्या भरात चांगल्या म्हणी लगेच आठवतील अस होत नाही आमच्या बातीत दुर्दैवाने. काही एखाद वाक्यच्या म्हणी सुचल्यातर लेखात लिहून लांबी कमी करू नक्की,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील
C
charming atheist Fri, 06/22/2018 - 17:00 नवीन
धागा धार्मिक विषयावर काढून पुन्हा जनुकीय माहीती हवी आहे असे लिहल्याने या धाग्याचा विषय भरकटला आहे. असो ,बहुतांश जनुकीय दोष हे autosomal recessive असल्याने जवळच्या नात्यात लग्न केल्याने हे दोष पुढच्या पिढीत येऊ शकतात.यासाठी मुस्लिमांकडे बोट दाखवायची गरजच नव्हती.आपल्या हिंदू धर्मात अनेक जातींची जातांतर्गत लोकसंख्या कमी आहे.थोडक्यात अनेक जातींचा gene pool मर्यादीत आहे.तीच ती bad mutation's/SNPs/ जनुकं पिढ्यांपिढ्या अनेक जातीत फिरत आहेत.त्यामुळे संख्येने कमी असलेले जातसमुह रोगट व निकृष्ट होत आहेत.कारण जनुकीय भांडार हे प्रत्येक जातीचं मर्यादीत स्वरुपाचं आहे व राहील अशी व्यवस्था "लावली" गेली आहे. हिंदू जातव्यवस्था म्हणजे deliberate population bottleneck आहे.population segregation हे मानव समुहाला फायद्याचे नाही.त्यामुळे जात पात धर्म यातून बाहेर येऊन विवाह केल्यास सुदृढ आणि निरोगी समाज निर्माण करता येईल.इथे हिंदू मुस्लिम प्रकरण आणायचे व मुस्लिमांवर ताशेरे ओढून पुन्हा समाज अभ्यासकाच्या थाटात जनुकीय माहीतीच्या गप्पा करायची काही गरज नव्हती. अधिक माहीतीसाठी autosomal recessive inheritance population bottleneck germline mutations हे गुगलून बघावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/22/2018 - 17:22 नवीन
population bottleneck नक्की कोणत्या हिंदू जातीत आहे हे सांगता येईल का? कोणत्या जातींचा gene pool मर्यादित आहे हे हि जरा सांगाल तर बरं होईल. त्यांचा Germline mutation शी काय संबंध आहे हेही जरा स्पष्ट कराल तर बरे होईल. माझ्या मर्यदित ज्ञाना प्रमाणे मर्यादित जीन पूल हा पारशी जमातीत आहे असे म्हणता येईल ज्यांची संख्या जगात केवळ ७०००० च्या आसपास आहे. मूळ भारतीय जाती पेक्षा आदिम जमातीत हा जीन पूल मर्यादित आहे असे कदाचित म्हणता येईल. उदा अंदमान मधील जारवा जमात यांची अंदाजे फक्त २५० ते ५०० माणसे जिवंत आहेत. त्यामुळे हि जमात नष्ट होण्याच्या कड्यावर उभी आहे असे म्हणता येईल. https://en.wikipedia.org/wiki/Jarawas_(Andaman_Islands) प्राण्यांमध्ये गीरच्या सिंहांची जात नष्टप्राय होण्याच्या मार्गावरून परत आली असली( मागच्या शतकाच्या सुरुवातीला काही डझन संख्या असलेले सिंह आता ६५० च्या आसपास पोहोचले आहेत) तरी एखादा विषाणूजन्य आजार किंवा जंगलाला लागलेला वणवा ती जात नष्ट करू शकेल अशी भीती प्राणिशास्त्रज्ञांना वाटत आली आहे. https://en.wikipedia.org/wiki/Asiatic_lion एकंदर आपण तीन वाईड बॉल टाकले आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: charming atheist
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 19:08 नवीन
...इथे हिंदू मुस्लिम प्रकरण आणायचे व मुस्लिमांवर ताशेरे ओढून पुन्हा समाज अभ्यासकाच्या थाटात जनुकीय माहीतीच्या गप्पा करायची काही गरज नव्हती.
एक मिनीट पहिली गोष्ट पहिले, धागा विषयाची चर्चा करण्याची गरज नसल्याचे निश्चित करणारे आपण कोण ? उणीवांचे टिका कठोर पणे परिक्षण करत असेल पण ती पूर्णपणे सभ्यतेच्या मर्यादेत आहे. एखाद्या विषयाची वैज्ञानीक पद्धतीने चिकित्सा न होऊ देणे हा ग्रंथ प्रामाण्याचा भाग असतो. आपण ग्रंथ प्रामाण्याचा हवाला दिला नाही पण केवळ रूढी आहे अशी मखलाशी करुन निभावून नेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ग्रंथ प्रामाण्यावर आधारीत नसाल तर किमान सहमती मध्ये कायदे करण्याचे अ‍ॅमी प्रमाणे समर्थन करून दाखवा. डॉ सरजी, खरे म्हणजे एकेरीवर आलायसा त्या अर्थी, बाण वर्मावर लागला दिसतोय. तुमच्या या प्रतिसादातल्या सर्व आक्षेपांची उत्तरे अ‍ॅमी आणि इतरांना देऊन झाली आहेत. आपण अभ्यासली असती तर पुर्नुल्लेखाचा वेळ वाचला असता पण जशी आपली इच्छा. १) धाग्याचा विषय मुस्लीम धर्मीयातील (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाहाची संतती आरोग्याच्या दृष्टीने जनुकीय दृष्टीने योग्यायोग्यता आणि ग्रंथ प्रामाण्याचा संबंध असा सरळ सरळ आहे असा आहे. ईतर धर्मीयांची चर्चा करुन आपणच विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे. २) मुस्लीम धर्मीयांवरील ग्रंथ प्रामाण्याचा प्रभाव गूगल ट्रेंड्सचे संदर्भ देऊन दाखवून दिलेला आहे. (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह आणि मुस्लिम धर्मीयांचे ग्रंथ प्रामाण्याच्या संबंधाचे पुरेसे संदर्भ गा.पै यांच्या दुव्यातून आणि मी दिलेल्या संशोधन प्रबंध दुव्यातून पुरेशा प्रमाणात अधोरेखीत झालेले आहेत. ३) ग्रंथ प्रामाण्य हे एकमेव कारण आहे असेही म्हटलेले नाही, घटस्फोटीतांची मुले परिवारात सांभाळली जाण्याची गरज आणि प्रॉपर्टी डिव्हीजन टाळणे हि असल्याचे नमुद केले आहे. प्रॉपर्टी डिव्हीजन टाळणे हे कारण असल्याचे संदर्भ इतर अनेक अभ्यासकांच्या अभ्यासातून नमुद असल्याचे दिसते. आणि प्रॉपर्टी डिव्हीजन टाळणे हा घरातील वरीष्ठ आणि इतर मंडळींचा इंटरेस्ट असतो त्यामुळे असे विवाह पूर्णतः फ्री चॉईसने होत असल्याचे म्हणणे दाट साशंकतेस जागा देणारे आहे. ४) (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह माध्यमातून व्याधीग्रस्त संतती होऊ नये याबाबत काळजी घ्यायची असेल तर फ्री चॉईसने होत नसलेल्या विवाह लावून देऊन व्याधी ग्रस्त संततीस कारणी भूत होणार्‍यांवर कायद्याच्या वचकाची गरज असु शकते . (आणि या मुद्दावर आपली भूमिक कातडी बचावू असल्याचे जाणवत आहे) ४.२) असा काही कायदा झाल्यास सर्व धर्मीयांना सारखा लागू व्हावा असे अ‍ॅमीने सुचवले आणि मी त्यास सहमत झालो म्हणजे एका धर्माला एक कायदा दुसर्‍याला दुसरा असा दृष्टीकोन असा आपल्या प्रमाणे छुपा दुटप्पी दृष्टीकोण ठेवलेला नाही ५) व्याधीग्रस्त संतती होणार नसेल तर (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाहास हरकत आहे का असा अ‍ॅमींनी प्रश्न विचारला त्याच्या उत्तरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहे त्याच वेळी त्यांच्या प्रश्नातील (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण नात्यात शारिरीक आकर्षण असू शकते का या बद्दल साशंकता व्यक्त केली आहे. समजा माझी साशंकता चुकीची असेल तर आपण डॉ. आहात संशोधन निबंधांचे संदर्भ देऊन माझे म्हणणे खोडून काढावे. ६) हिंदू धर्मीय भाऊ बहीण विवाहा पेक्षा मुस्लीम धर्मीय भाऊ बहीण विवाहाचे प्रमाण अधिक आहे , कारणे आणि प्रभावाचे स्वरुपही वेगळे आहे -याचे पुरेसे संदर्भ आणि व्यवस्थीत मांडणी केली आहे ( अ‍ॅमींंना दिलेल्या प्रतिसादा संदर्भ नोंदवले आहेत)- त्यामुळे अयोग्य गोष्टींबद्दलची समाज सुधारकांना वेगवेगळ्या पद्धतीने डिल करावे लागणार तेव्हा मुस्लीम समजातील (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह हा विषय वेगळ्या विशेष धागा चर्चेने हाताळण्यात काहीच चुकीचे नाही . * हिंदू धर्मीय भाऊ बहीण विवाहा बद्दल आपल्याला वेगळा धागा काढता आला असता किंवा आपण म्हणतात्से डॉक्टर असल्यामुळे या समस्ये बाबत आपल्याला पुर्वी पासून कल्पना आहे तर आपण मागेच स्वतःच लेखन का केलेले नाही ? * एकाची कमतरता दाखवल्यावर दुसर्‍याच्या कमतरता दाखवण्याने पहिल्याची कमतरता कमी होत नाही हे साधे तत्व आहे, पण पहिल्याची कमतरता दडवण्याच्या अट्टाहासात घरच्या घोड्यच्या दहा कमतरता दाखवल्याने आपण फिरवत असलेल्या व्याह्याच्या तबेल्यातल्या दहा कमतरता कशा कमी होतील ? जर दोन्ही समूह वेगवेगळे विश्वास बाळगत असतील तर दोन्ही कडे करावे लागणारे समाज सुधारणा ंचे उपाय वेगवेगळे असू शकतात की नाही मग वेगवेगळ्या चर्चेत वावगे काय आहे ? * बरे व्याह्यंची घोडे फिरवणार्‍यांच्या फौजेची पण कमी नाही , टिकेस उत्तर देण्याची क्षमता आहे तर टिका झाल्यास एवढ्या बेचैनीचे कारण (रहस्य) काय ?
...अनेक जातींची जातांतर्गत लोकसंख्या कमी आहे.थोडक्यात अनेक जातींचा gene pool मर्यादीत आहे
याचे उत्तर तज्ञ या नात्याने डॉ खरेंनी दिलेच आहे पण माझ्या सारख्या तज्ञ नसलेल्या व्यक्तीसही खालिल हिशेब सहज कळतो आणि परिवारांतर्गत विवाह आणि जाती अंतर्गत विवाह हि तुलना फसवी असल्याचे सहज लक्षात येते हे बघा (चुलत/मावस/मामे/आते) भावाशी लग्न केल्यास ती समजा २५ ते ५० टक्के शक्यता असेल; समजा ननात्यातील विवाहात अगदी छोट्या जाती अंतर्गत केले आणि हजार विवाहोत्सूक मुले असतील तर शक्यता १/१००० एवढी कमी होते ना ! कुठे २५ ते ५० % आणि कुठे १/१००० काही तूलना आहे का ? नाही लक्षात आले ? मग अजून जरा डिटेल मध्ये खासकरून कमी लोकसंख्या असलेल्या जातींत विवाहासाठी (भाऊ नसलेले) १००० मुले उपलब्ध आहेत, अशा जातीतल्या जातीत विवाह केला तर एकसारखे जनुकीय असण्याची शक्यता १/१००० ईतकी पण कमी होऊ शकेल. आणि तेच उपलब्ध विवाह उमेदवार ६ चुलत भाऊ आहेत, ६ आत्येभाऊ आहेत ६ मावस भाऊ आहेत, ६ मामे भाऊ आहेत ( त्यातील अर्धी प्रोबॅबिलीटी चुलतभावाने त्याचे जीन्स काकू कडून घेतले म्हणून कमी होईल आत्येभावाने आत्तोबा कडून घेतली म्हणून कमी होईल मामे भावाने मामीचे जीन्स घेतले म्हणून कमी होईल असेच मावसोबामुळे अर्धी प्रोबॅबीलीटी कमी होईल ) म्हणजे जनुकीय चाचणी केलेली नसेल तर १२ जनूकीय दृष्ट्या योग्यही असू शकतील तर १२ जनूकीय दृष्ट्या अयोग्यही असू शकतील आता इथे जनुकीय अयोग्यतेची प्रोबॅबीलीटी ५० टक्के होते आणि कुटूंबा बाहेर पण जातीतल्या जातीत जरी भावेतर विवाह केला तर प्रॉबॅबिली टी अत्यंत छोट्या जातीतही १/१००० एवढी कमी होईल. तुम्ही म्हटता तसे टक्केवारी शास्त्रीय पद्धतीने अभ्यसलीतरी थोडी फार तफावत पडेल पण परिवारातल्या भावाशी लग्न करण्या पेक्षा परिवारेतर पण जातीत लग्न केल्यास रिस्क फॅक्टर खूपच कमी असेल हे साधे तोंडी गणित आहे , अर्थात जातीची लोकसंख्या जेवही मोठी अथवा जात धर्म वंश फॅक्टर टाळले तेवढीप्रिस्क फॅक्टर कमी होत जाईल हे नक्की. आता हे अ‍ॅमींनाही लिहून झाले होते आपण वाचनाची तसदी घेतली नाही हे नक्की .
धागा धार्मिक विषयावर काढून .....बोट दाखवायची गरजच नव्हती...ताशेरे ओढून ....गप्पा करायची काही गरज नव्हती.
कम ऑन डॉक्टर इथे मिपावर आणि बाकी आंजावर आणि बाकी माध्यम समुहात रोज पायलीच्या पसा भर (म्हणजे असंख्य ) अशा चर्चा होतात , इतर धर्मीय चालीरितींवर टिका झालेल्या आहेत तर मुस्लीम धर्मीय चाली रितींचीही चिकित्सा झाली तर बिघडले कुठे ? किंवा अगदी समान असलेल्या (जे की नाही हे संदर्भवार दाखवले आहे) चालीम्चीही स्वतंत्र चिकित्सा झाली तर आकाश कोसळते की काय ? जर कायदा करण्या इतके चाली रितीत आपल्याला काही वावगे वाटत नाही , उत्तर देण्यास आपण आणि आपली व्याह्याची घोडा मिरवू फौज तयार आहे तर एका चर्चेने आपल्या नाकाला एवढी मिरची झोंबण्यचे कारणच काय ? हि सारी फौज व्याह्याच्या घोड्यंची मिंधी होते हे कळले की लोक चर्चा करणारच, सापक्ष होऊन मिंधे व्हायचे कि ग्लानी न येणारी निरपेक्षता जपायची हे ज्याचे त्याने ठरवावे हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: charming atheist
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 19:49 नवीन
अहो कुणाच्या comment अन कुणाला काय विचारताय ? धागा धार्मिक विषयावर काढून .....बोट दाखवायची गरजच नव्हती...ताशेरे ओढून ....गप्पा करायची काही गरज नव्हती. कम ऑन डॉक्टर हे मी लिहिलेले नाही आहे , मग याच्याखाली कम ऑन डॉक्टर , हे नेमके कुणाला लिहिलेले आहे ? नात्यातली लग्ने केल्यास संतती रोगट होऊ शकते , हे सर्व जातीधर्माना लागू आहे हे अनेकदा लिहून झालेले आहे . पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा माझे नाव लिहून कमेंट का लिहीत आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 21:11 नवीन
माणसाच्या धार्मिक श्रद्धा अन त्या धर्माच्या पुस्तकांचा इतिहास या दोन भिन्न बाबी आहेत, हिंदू धर्मातील पाच वर्षाच्या मुलाची हिंदू देवावर श्रद्धा असते , त्याला काही श्लोक पाठ असतात , काही सोप्या चालीरीती त्याला ठाऊक असतात , याचा अर्थ हिंदू धर्मातील सगळ्या पुस्तकातील कोणत्या ओळीत काय आहे , हे त्याला ठाऊक असते का ? बाहुबली शंकराच्या पिंडीची उपासना करताना दिसतो , याचा अर्थ शिवलीलामृतातील कुठल्या पानावर काय लिहिले आहे , हे त्याला तोंडपाठ आहे , असे मानायचे का ? आणि तसे assume करून उठसुठ रोज 2-4 प्रश्न त्याला विचारत बसायचे का ? हा अभ्यास प्रत्येक मनुषय कालांतराने करतो ना ? कधीकधी करणारदेखील नाही त्याचप्रमाणे कधीतरी मी इस्लाम धर्माबद्दल बोललो , मुस्लिम लीगने कुणाला तरी दान दिल्याचे मला आवडले , औरंगजेब 88 वर्ष जगला , याबद्दल कुतूहल व्यक्त केले की मिसळपावरचा प्रत्येकजण मलालापासून हलालापर्यंत सगळे मला कसे काय विचारत बसतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 23:12 नवीन
हिंदू धर्मात , धार्मिक पुस्तकांचा अभ्यास असणाऱ्या व्यक्ती असतात , उदा - शंकराचार्य , दशग्रंथी ब्राह्मण , वर्षानुवर्ष पौरोहित्य करणारे इ इ इ इ , जर काही शंका असतील , तर त्या त्यांना विचारणार की 100 कोटी हिंदूतल्या दिसेल त्याला विचारत सुटणार ? आणि मग त्याने उत्तर दिले नाही की जितम मया म्हणून ढोल बडवायचा ? धार्मिक ज्ञानाबरोबरच संबंधित ऐतिहासिक ज्ञान हवे असेल तर त्यात MA , Phd असलेल्या व्यक्तीही असू शकतील , त्यांनाही शंका विचाराव्या लागतील . तसे इस्लाम धर्माबाबतही कुराण मुखोद्गत असलेल्याला हाफीस म्हणतात , अजून इतरही expert असतील , इतिहासाचा अभ्यास असणारे , PhD केलेले वगैरे असतील , तर तुमच्या शम्का त्यांना विचारायच्या . की , मला रोज 2-4 प्रश्न विचारून ढोल बडवत बसणार ? मिसळपाव अन मायबोलीवर मला सुधारायची भाषा करणारे पूर्वीही बरेच आयडी होते , मिपावर जयंत पाठक की फाटक , अन मायबोलीवर JP ,( हे दोघे एकच का हे माहीत नाही ,) पण मी त्याना ओपनली माझा mobile नंबर दिला , अन मग त्यांचे संवाद बंदच पडले . हे 'कम ऑनही' असेच दिसत आहे , नुसती बडबड , मोबाईल नंबर दिला की गायब . ( मुळात जे कोट करून त्यांनी मला कम ऑन लिहिले , ते माझे नाहीच , हा दुसरा गमतीचा भाग )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Sat, 06/23/2018 - 06:23 नवीन
एका नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. १० ते १ उलटे आकडे मनात मोजा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडून द्या. बिलेटेड हॅप्पी योग डे..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
C
charming atheist Fri, 06/22/2018 - 17:49 नवीन
जातव्यवस्था सुरु झाली तेव्हा जे जातसमुह आकाराने लहान होते त्यांच्यात आता उत्क्रांती होऊन नवीन जनुके आलेली नाहीत.जुना सेटच रेप्लिकेट होत आहे.जेव्हा जातव्यवस्था तयार केली गेली तेव्हा आकाराने छोटे जातसमुह या population bottleneck परीणामाला बळी पडले. आताच्या ७०००० पारश्यांचे दोनशे वर्षात ७०००००० झाले तरी त्यांच्यातले जनुकीय दोष जाणार नाहीत,त्यासाठी जातबाह्य धर्मबाह्य प्रांतबाह्य विवाह हा एकच उपाय त्यांच्यासमोर आहे व अनेक हिंदू जमाती त्यांच्या जवळपास आहेत व जात पात धर्म प्रांत ह्यांची बंधनं झुगारली नाहीत तर अवघड आहे. निकृष्ठ समाजातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 19:38 नवीन
होय, आंतरजातीय विवाह या विषयावर मिसळपाव वर वेगळ्या धागा चर्चेतून चर्चा झालेली आहे आणि तया विषयावर सर्वसधारण सहमतीही आहे. या धागा चर्चेच्या विषयासाठी तो विषय तसा य धागा चर्चेच्या कक्षेच्या बाहेरच म्हणून अवांतर ठरतो तरीही मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: charming atheist
स
सुबोध खरे Fri, 06/22/2018 - 19:46 नवीन
आपल्या विधानांना काही ठोस पुरावा आहे का वाईड बॉल नंतर परत वाईड बॉलच टाकताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: charming atheist
C
charming atheist Fri, 06/22/2018 - 20:37 नवीन
@सुबोध खरे,ncbi चे स्ट्डीज वाचा.कळेल बरंच. फुकट आहे ते ऑनलाईन सेंटर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 06/23/2018 - 06:03 नवीन
@charming atheist मी जालावर खोदून मला तुम्ही म्हणताय असे काहीही हाताला लागले नाही उलट तुमच्या एकही मताची पुष्टीच नव्हे तर त्याला विरोधी असे साहित्य भरपूर मिळाले. यास्तवच मी तुम्हाला हि विनंती केली आहे? बाकी निकृष्ठ समाजातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो. यात

"निकृष्ठ समाज"

म्हणजे नक्की कोणता आणि त्यातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो हे दाखवणारा एक तरी दुवा आपण देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: charming atheist
ग
गामा पैलवान Fri, 06/22/2018 - 19:28 नवीन
अॅमी,
तेदेखील फक्त वडलांचेच विचारात घेतात. त्यामुळे आईच्या 50% जनुकांच काय? पूर्ण निरुपयोगी पद्धत!
तुमच्या गृहीतकात प्रचंड खोट आहे. आईचे व वडिलांचे दोघांचे गुणसूत्र विचारात घ्यायचे असतात, बरोबर? म्हणूनंच नेमक्या याच कारणासाठी फक्त वडिलांचं गोत्र विचारात घेतात. कसं ते अवैज्ञानिक म्हणजे साध्या शब्दांत सांगतो. अपत्य मुलगा असेल तर बापाकडून य आणि आईकडून क्ष गुणसूत्र येतात. मुलगी असेल तर दोघांकडून क्ष गुणसूत्र येतात. य गुणसूत्र जात्याच दुर्बल असतं. त्याच्याकडे जनुकीय मालमत्ता निसर्गत:च कमी असते. त्यामुळे य गुणसूत्र रोगट जनुकं बाळगण्याचं प्रमाण क्ष पेक्षा बरंच जास्तं असतं. पुरुष अपत्याचं व्यवस्थित जनुकीय पोषण व्हावं म्हणून त्याच्या आईमार्गे येणाऱ्या क्ष गुणसूत्राकडून जास्तीत जास्त योगदान अपेक्षित आहे. हे पोषण देखील वाट्टेल त्या जनुकीय सामुग्रीने होत नाही. आईच्या बापाकडून म्हणजे मातामहाकडून आलेल्या य सामुग्रीनेच अपत्याच्या य गुणसूत्राचं पोषण होऊ शकतं. पुरुष अपत्याच्या य च्या त्रुटी कमी करण्यासाठी पित्याचं य आणि मातामहाचं य या दोहोंचा संकर लक्षात घेतला पाहिजे. आता गोत्र म्हणजे विशिष्ट त्रुटी असलेलं य गुणसूत्र असतं. म्हणून पिता व मातामह दोन्ही वेगवेगळ्या गोत्रांचे लागतात. सगोत्र विवाहांत पुरुष संतती दुर्बल निपजण्याचा धोका अधिक असतो. पिढ्यानुपिढ्या सगोत्रविवाह केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करते. ही समस्या स्त्री अपत्याच्या बाबतीत उद्भवत नाही. पण तिच्यामार्गे पुढील पिढीत संक्रमित होते. मी या विषयातला तत्ज्ञ नाही. या प्रतिसादात काही त्रुटी असू शकतात. असतील तर मिपावरच्या जाणकारांनी कृपया नजरेस आणाव्यात. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै. तळटीप : माहितीचा स्रोत : http://www.hitxp.com/articles/veda/science-genetics-vedic-hindu-gotra-y-chromosome-male-lineage-extinction/
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/22/2018 - 19:44 नवीन
गोत्र पद्धती चुलत भाऊ विवाह इफेक्टीव्ह ली थांबवते पण मावस आते-मामे भाऊ विवाहावर तांत्रिक दृष्ट्या तसा फार कंट्रोल रहात नाही पण पत्रिका पहाण्याची अंधश्रद्धा पाळली गेल्यास मावस आते-मामे भाऊ नात्यातील विवाहांची संख्या कमी होते . आणि जिथे भाऊ बहीण ह्या नात्याचे मुल्य आणि निकोप संबंध आहेत तिथे अशा विवाहांचे प्रमाण सहाजिक पणे आपोआप कमी होईल. अर्थात गोत्र पद्धती अवाजवी रित्या स्ट्रीक्ट होते आणि पत्रिका पद्धतीचे आधारही विज्ञानानुसार साशंकीत आहेत त्यामुळे त्यांचे समर्थन करायचे आहे असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 06/22/2018 - 20:40 नवीन
माहितगार, माझ्या माहितीप्रमाणे गोत्र पद्धतीत आतेभाऊ-मामेबहीण हे विवाहही निषिद्ध आहेत. यांत पुरुष संततीस कमी समस्या आल्या तरी स्त्री संतती दुर्बल निपजू शकते. हिंदूंमध्ये प्रचलित स्वरूपात जे असे विवाह आहेत ते रूढीनुसार आहेत. त्यांना धर्मशास्त्राचा आधार नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 22:52 नवीन
पत्रिका पहाण्याची अंधश्रद्धा पाळली गेल्यास मावस आते-मामे भाऊ नात्यातील विवाहांची संख्या कमी होते . हे कसे म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 20:00 नवीन
पुरुषात xy क्रोमुसोम असतात , स्त्रीत xx , हे फक्त सेक्स क्रोमुसोबद्दल झाले याशिवाय अजून 22 जोड्या असतात , त्यांचे random selection होऊन अपत्यास क्रोमोसोमस मिळतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 06/22/2018 - 20:45 नवीन
मंगूश्री, बाकी २२ ठीक आहेत हो. त्यांच्यातल्या प्रत्येकाला जोडीदार मिळतो. कुचंबणा फक्त २३ य ची होते. त्याला बिचाऱ्याला कोणी जोडीदार मिळंत नाही. सगळा दुरुस्तीचा भार स्वत:वरंच पडतो. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून गोत्र पद्धती निर्माण झालेली दिसतेय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 20:57 नवीन
अनुवांशिक रोग फक्त त्या y शीच संबंधित असतात , असे नाही. इतर 22 जोड्याही माणसाचे वजन , उंची , आवायवातील दोष , त्वचेचा रंग , चयापचय , रोग प्रतिकार शक्ती अशा हजारो functions मध्ये भाग घेत असतात , ते डिफेकटीव्ह असतील , तर रोग निर्माण होऊ शकतो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 21:27 नवीन
आईच्या बापाकडून म्हणजे मातामहाकडून आलेल्या य सामुग्रीनेच अपत्याच्या य गुणसूत्राचं पोषण होऊ शकतं. गामा काय लिहिले आहे हे ? आईकडे दोन x आहेत , एक तिच्या बापाचा अन एक आईचा. आईच्या बापाचा y आईला येईलच कसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 21:27 नवीन
आईच्या बापाकडून म्हणजे मातामहाकडून आलेल्या य सामुग्रीनेच अपत्याच्या य गुणसूत्राचं पोषण होऊ शकतं. गामा काय लिहिले आहे हे ? आईकडे दोन x आहेत , एक तिच्या बापाचा अन एक आईचा. आईच्या बापाचा y आईला येईलच कसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 06/22/2018 - 22:06 नवीन
मंगूश्री, २३-य चा लहानसा भाग म्हणजे सुमारे ५% २३-क्ष शी जुळतो. निदान ५% दुरुस्ती तरी २३-क्ष कडून होऊ शकते. जर २३-क्ष सुद्धा सगोत्र असेल तर १००% दुरुस्तीची जबाबदारी २३-य ला स्वत:ला उचलावी लागते. असं निदान या स्रोतात तरी लिहिलंय : http://www.hitxp.com/articles/veda/science-genetics-vedic-hindu-gotra-y-chromosome-male-lineage-extinction/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 06/22/2018 - 22:47 नवीन
पुरुषात एकच x आहे ना , मग तो जर डिफेकटिव्ह आहे , तर तो डिफेक्ट express होतोच , कारण त्याला जोडीदार नाही याउलट , स्त्रीयाममध्ये दोन xx असतात , म्हणजे काही काही बाबतीत दोष न दिसायला एकच नॉर्मल असला तरी चालतो , तर तिथे फायदा होतो. बापाचा y मुलीत जाणारच नाही , त्यामुळे तिच्या मुलात तो y जाणारच नाही , त्यामुळे मातामहाचा y त्याच्या नातवात जातच नाही , त्या नातवाचा y , हा पूर्णपणे त्याच्या बापाचाच असतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 06/23/2018 - 22:30 नवीन
मंगूश्री, मातामहाचा य नाही क्ष म्हणायचं होतं. जर मातामह आणि बाप दोघंही एकाच गोत्राचे असतील तर दोघांचेही क्ष व य सारख्याच एकजनुकीय त्रुटीने ग्रस्त असतील. मग मुलाच्या य ला दुरुस्त कोण करणार? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
पिलीयन रायडर Sat, 06/23/2018 - 04:56 नवीन
हा धागा एकाच आयडी आणि एकच धर्माला टारगेट करून लिहिलाय असं फक्त मलाच वाटतंय का? चुलत मावस भांवंडाशी लग्न व्हावे की होऊ नये हा विषय ठीक आहे पण धागाप्रस्ताव सरळ टारगेट करतोय असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/23/2018 - 06:09 नवीन
काय लिहिलेत हे ? आता तुम्हालाही टार्गेट करून इथे काही लोक लिहू लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Sat, 06/23/2018 - 13:35 नवीन
हू केअर्स! मुळात चुकीच्या हेतूने काढलेल्या आणि वैयक्तिक होणाऱ्या धाग्याला तुम्ही फाट्यावर मारायला हवं. पण असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Sat, 06/23/2018 - 07:33 नवीन
प्रा डाँना सविस्तर उत्तर दिले आहे, आपल्यासारखी काही भली मंडळी खालील चर्चा सविस्तर न वाचताच आक्षेप नोंदवताहेत. पण ग्रंथप्रामाण्याची अंधश्रद्धा एकाच धर्मात असेल आणि त्या बद्दल अनभिज्ञता अथवा जाणीवपूर्वक कानाडोळा करुन शत्रुचा शत्रु आपला मित्र हि भूमिका पार पाडायची असेल तर नाईलाज आहे. आता धागा लेख जरा अद्ययावत करायचा प्रयत्न केलाय , चर्चा संपल्या नंतर आठवड्या भराने आणखी अद्ययावत करेन असा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Sat, 06/23/2018 - 13:30 नवीन
धा गा प्र स्ता व तुम्ही त्यात जे लिहिणार त्यावर तुमची भूमिका ठरणार. पुढे तुमचे मैल मैल लांब स्पष्टीकरण कुणी का वाचावं? तर धागा सरळ सरळ टारगेट करणारा होता. आता तुम्ही माझे शत्रू असवात इतकं महत्व मी तुम्हाला देत नाही हे आधी लक्षात घ्या. आपलं "शत्रुत्व" व्हावं इतकं कधी काही घडल्याचे मला आठवत नाही ,तेव्हा उगाच स्वतःच्या मनाची समजून घालायला बाष्कळ मुद्दे काढू नकात. नसेल मान्य करण्याची इच्छा किंवा मनाचा मोठेपणा तर राहू द्या. आग्रह नाहीये काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 06/23/2018 - 14:54 नवीन
नसेल मान्य करण्याची इच्छा किंवा मनाचा मोठेपणा तर राहू द्या. आग्रह नाहीये काही.
__/|__ अग्रह नसण्या बद्दल आभारी आहे पण भाषेतन आग्रह जाणवतोय पण असूद्यात तुमच्यातही नसेल मान्य करण्याची इच्छा किंवा मनाचा मोठेपणा तर राहू द्या. आंमंचां पंणं आग्रह नाहीयेंच मुळीं. :)
आता तुम्ही माझे शत्रू असवात इतकं महत्व मी तुम्हाला देत नाही हे आधी लक्षात घ्या. आपलं "शत्रुत्व" व्हावं इतकं कधी काही घडल्याचे मला आठवत नाही ,तेव्हा उगाच स्वतःच्या मनाची समजून घालायला बाष्कळ मुद्दे काढू नकात.
आपण व्यक्तिगत शत्रूत्व पार पाडताय असे म्हटले नाहीए हो. आपण स्वतः पुरोगामी , हो की नाही ? हिंडू परंपरावादी म्हणजे हिंदू पुरोगाम्याम्चे शत्रू बरोबर की नाही , परंपरावादी मुस्लीम परंपरावादी हिंदूंचे शत्रू म्हणजे मरंपरावादी मुस्लीम हिंदू पुरोगाम्यांचे मित्र झाले की नाही ? तर एकुवैआपल्या वैचारीक शत्रुत्वाचे स्वरुप स्पष्ट करण्याचा प्रय्तन केलाय. आता याच न्यायाने सच्च्या पुरोगामी मुस्लीमांबद्दल आम्हाला पूर्ण ममत्व आहे.
तर धागा सरळ सरळ टारगेट करणारा होता.
वैचारीक शत्रुत्व अंगवळणी पडलेले काय पाहीजे ते अर्थ काढतील सूतावरूनस्वर्ग गाठतील. लेखकाचे टार्गेट लेखकाला कळते कि तुम्हाला जगातल्या समस्त लेखकांच्या मनातले कळण्यास दैवी विद्या प्राप्त आहेत का काय ? धागा प्रस्ताव व्यवस्थीत सभ्यतेच्या मर्यादेत आहे , जो पर्यंत सभ्य आहे टिकाकरण्याचे टिकाकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. तसा मी हिंदू धर्म प्रचारक नाही पण एका अर्थाने माझ्या विचारातील धर्माचा प्रसारक आहे, मला धर्म प्रसारक असण्याचे स्वातंत्र्य आहे, समजा की धर्म प्रसारक आहे तर मला केवळ एक तर्फी टिका करण्याचा ही घटनादत्त आधिकार आहे.
...तुम्ही त्यात जे लिहिणार त्यावर तुमची भूमिका ठरणार. पुढे तुमचे मैल मैल लांब स्पष्टीकरण कुणी का वाचावं?
एक मैल लिहायचे कि दहा हजार मैल लिहायचे हा आमच्या लेखन स्वातंत्र्याचा भाग आहे. पूर्ण वाचन झाल्या शिवाय काढलेले निष्कर्ष चुकीचे असू शकतात तसे तुमचे निष्कर्ष उणीवग्रस्त आहेत एवढेच सांगू इच्छितो दर एक सेकंदाला भूमिका बदलण्याचे किंवा भूमिका अद्ययावत करण्याचे किंवा भूमिका कायम स्वरुपी बाळगण्याचे , किंवा अर्धी भूमिका धागा लेखात मांडून जसे प्रश्न येतील तसे भूमिका स्पष्ट करण्याचेही आमचे स्वातंत्र्य आहे. आपल्याला न समजलेल्या किंवा न समजावून घेतलेल्या सर्व भूमिका चुकीच्या असतात या भ्रमात रहाण्याचे आपले स्वातंत्र्य आहे, बाहेर याल तेवढे बरे पण आग्रह नाही कारण अश्या गोष्टी अवघड असतात. एखादी भूमिका पूर्ण समजून न घेतलेली भूमिका अवास्तव असते हे सबम्ध धागा चर्चेतून ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यावरुन समजून जातील. आपण तथाकथित पुरोगामी मंडळी रचनात्मक भर तर काही घात नाही. कुराण मधील चांगल्या गोष्टी बद्दलचा धागा ते धर्म ससंक्र्तीतील अल्लात अशा असंख्य समन्वयवादी धागा चर्चात तर कधी काडीचे योगदान नसते , हिंदू परंपरावाद्यांबद्द्लही माझी टिकेची लांबी अधिक भरते की तुमच्या टिकेची लांबी -आणि मुल्यही अधिक भरते हे मोजून पहा एकदा. ना अभ्यास ना ज्ञान, येतात टार्गेट टार्गेट करत कुठले. मनमोकळ्या चर्चा सहभागाबद्दल अनेक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
माहितगार Sat, 06/23/2018 - 14:56 नवीन
* परंपरावादी मुस्लीम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पिलीयन रायडर Sat, 06/23/2018 - 15:25 नवीन
मी हिंदू पुरोगामी? आणि म्हणून तुमची वैचारिक शत्रू?!!! गडबडा लोळायची स्मायली आणा राव! पुढचा मैलभर प्रतिसाद वाचायची गरजच उरली नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! लवकर मोठे व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 06/23/2018 - 15:29 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
राही Sat, 06/23/2018 - 20:30 नवीन
संपूर्ण सहमत. केवळ याच नव्हे तर आणखीही काही धाग्यांवर असेच टार्गेटिंग सुरू असते. Mangu@ ह्या आय्डीचे गेल्या काही महिन्यांपासूनचे प्रतिसाद स्पष्ट, सभ्य आणि मुद्देसूद असून पटणारेही असतात. पण त्यांना टार्गेट केले जात असते. उगीचच आव्हाने चालू असतात. अर्थात एकदा प्रतिसादाचा आणि प्रतिसादकाचा रोख कळला की तो न वाचण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. तरीही या वेळी तरी काही चांगले वाचयला मिळेल या आशेने प्रतिसाद उघडले जातात आणि निराशा पदरात पडते. पिरा, कोणीतरी याला वाचा फोडली हे बरे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
माहितगार Sun, 06/24/2018 - 06:42 नवीन
=)) ट्विटर आकाराची उत्तरे हवी असतील तर पुढे वाचू नये.
...तरीही या वेळी तरी काही चांगले वाचयला मिळेल या आशेने प्रतिसाद उघडले जातात आणि निराशा पदरात पडते.
* बेसिकली आधीच निष्कर्षावर पोहोचलेले असणे आणि निष्कर्ष घाई मुळे असे होते, आणि आधीच निष्कर्षावर पोहोचलेले असणे आणि निष्कर्ष घाई होते आहे की नाही हे पहाण्याची जबाबदारी निष्कर्ष काढणार्‍याची नसते किंवा कसे ? * काय वाचायचे आहे तेच वाचायचे नक्की असेल आणि इतर विचारांसाठी मनाची कवाडे उघडी नसतील तर ईतर कुणाला आधी विचारून मग वाचावे किंवा निराशेसही तयार असावे. मिपा आणि आंतरजाल सोडून द्या तुमच्या आजूबाजूच्या दहा माणसांचे विचार जुळण्याची गॅरंटी घेऊन संवाद साधत असता किंवा कसे ? * विचार पटत नसतील तर संवाद न करणे किंवा परिपुर्ण संवाद साधणे आणि चालू ठेवणे दोन्ही मार्ग आहेत. संवाद न करणे श्रेयस्कर असेल तर मिपासारख्या मंचाची गरज नाही. * समाजात विवीध योग्य अयोग्य मतेमोठ्याम, मिपासारख्या मोठ्या मंचावर समज गैर समज चर्चेस आलेच नाहीत तर गैर समज वाढीस लागण्याची शक्यता असते. मी माझे समज गैरसमज जे काही आहे ते मांडतो आहे . इतरांच्या समज गैरसमजांचा शहानिशा करतो आहे. पण यात कोणाच्याही मांडणीवर टिका केली तरी जज करणे नाही त्यामुळे मी आणि मंगू व्यक्त होत बदलत राहू शकतो. * अमूक एक गोष्ट टार्गेटींग आहे असली अर्धीमुर्धी विधाने चर्चा आणि चर्चा कर्त्यांना जज करतात आणि पुढची पायरी चर्चा थांबवण्याचे प्रयत्न करण्याची संवादाचे माध्यम बाधीत करणारी सेंसॉरींगची येते. * इथे मी डॉ मंगु च्या मांडणीवर टिका केली तर त्यांना उत्तरे देण्याचे स्वातंत्र्यही आहे . ते सभ्य आहेत तसा मी ही सभ्य आहे. कुठे सभ्यता नसलेली जागा असेल तर आम्ही दोघे आधी एकमेकांना लक्षात आणून देऊ , वगळून घेण्याची गरज वाटली तर संपादकांशी संपर्क करू. * पिराताईंना ट्विटरच्या आकाराची उत्तरे हवीत म्हणून त्यांच्याशी संवाद थांबवला -त्या बरोबर आहेत म्हणून नव्हे , कारण विषयाची सांगोपांग चर्चा करण्यासाठी मला अधिक संख्या आणि लांबी लागते. लागते तर लागते -त्या साठीच ट्वीटर न वापरता मिपाचा मंच वापरतो कारण इथे सविस्तर चर्चा करता येते. एखाद्या लेखनाच्या लांबी आणि संख्येवरून वरुन ते तर्कपूर्ण आहे की नाही हे कसे ठरू शकते ? आपल्यालाही ट्विटरोत्तरे लागत असतील तर पुढे वाचू ही नका आणि संख्या जास्त आहे आणि लांब आहे अशी कारणेही देऊ नका. ** माझ्या लेखनाची संख्या लांबी शैली माहित नसण्यासाठी ना पिराताई नव्या आहेत ना आपण , पूर्ण सर्वकाही न वाचता सर्व गोष्टी विचारात न घेता निष्कर्ष घाई करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहेच. १) डॉ. मंगुच्या सर्व धाग्यावरील सर्व प्रतिसादांचा आपल्याला साकल्याने विचार करता येतो, माहितगारचे सर्व धागे आणि सर्व प्रतिसाद लेखन साकल्याने का विचारात घेता येत नाही ? २) डॉ. मंगुशी इतरांचे वाद आणि माझी चर्चा एकाच मापाने कशी तोलता येते ? जे लोक पुर्ण निरपेक्ष असतात त्यांच्याशी माझा सहसा वाद होत नाही , पण जिथे मला निरपेक्षतेबद्दल साशंकता असते त्या बद्दल मी शंका उपस्थीत करणे यात गैर काय आहे ? ते बरोबर असतील तर त्यांची बाजू मांडतील, आणि त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताहेत . ३) सरते शेवटी मुस्लीम लीग एक धर्मांध पक्ष आहे ( आता दुसर्‍या राजकीय पक्षांच्या धर्मांधतेने यांच्या धर्मांधतेचे समर्थन करायचे असेल तर भाग वेगळा) त्यांनी केलेली एक विशीष्ट आर्थीक मदत कामा पूरता मामा स्वरुपाची आहे, मुस्लीम लीगला मदत देण्यासाठी घरचे सरत नाही, व्याह्यचा घोडा आणून मिरवावे तसे अबकडला मिरवतात . मिरवेनात का धार्मीक राजकीय पक्षांनी त्यांचे राजकारण करत रहावे ज्यांना समर्थन करायचे त्यांनी करावे तरच त्यातील उणीवांवर माझ्यासारख्या टिकाकारांना बोट ठेवण्यास जागा मिळते. मुस्लिम लिग लपून करण्या पेक्षा उघड पणे करते डो. मंगु त्याचे उघड (कि पडद्या आडून ?) समर्थन करतात आणि सुडो सेक्युलर डॉ, मंगुचे समर्थन करतात अती उत्तम जे चालू आहे ते इतरांना दिसते आणि प्रत्येक जण आपापले निष्कर्ष काढतो. आता या सगळ्या सुडोसेक्युलर सायकल मध्ये ज्या उणीवा आहेत त्यावर बोट ठेवण्याचे अभिव्यक्ती स्वांतंत्र्य आहे की नाही आहे ? ४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी सॉफ्ट कॉर्नर ठेवतात त्यांच्या ज्ञानाच्या निमीत्ताने मुस्लीम धर्मातील एक अंधश्रद्धा कमी होण्यास काही हातभार लागला तर बिघडले कुठे ? ५) ग्रंथ प्रामाण्य (ग्रंथ प्रामाण्य म्हणजे समजते का ? या धाग्यावरील सुडोपुरोगामींच्या प्रतिक्रीया पहाता ग्रंथ प्रामाण्य म्हणजे काय आणि त्यातून निर्मित अंधश्रद्धा यांचे साटेलोटे त्यांना समजत नसावे कि दुर्लक्षीत करायचे आहे ते कळत नाही) आधारीत अंधश्रद्धेवर टिका करताना भावना नये म्हणून धागा प्रस्तावात हात आखडता ठेवला, बाकी मांडणी प्रतिसादातून विखुरली तर त्याचे कुठचे कुठे नेऊन ठेवणे चालू आहे. - आणि तेही हा झालेला वाद सोडता माझे बहुतांश लेखन समन्वय वादी असताना . आता काही मतांतरे आली की लगेच निष्कर्ष घाई आणि जज करण्याचे कौतुक वाटते. * अबकड हा आदेशग्रंथ पाठवणार्‍या दयाळू परमेश्वारास सर्व कळते म्हणजे विज्ञानही कळत असले पाहीजे . (चुलत/मामे/आत्ये/मावस) भाऊ-बहीण विवाहाने होणार्‍या संततीत व्याधीग्रस्ततेच्या संभाव्यता होऊ शकतात हे वस्तुनिष्ठ सत्य असेल तर सर्व काही करू शकणार्‍या परमेश्वराने हि उणीव राहूच द्यावयास नको होती किंवा किमान अशी उणीव शक्य आहे तर (चुलत/मामे/आत्ये/मावस) भाऊ-बहीण विवाह सुद्धा सख्ख्या भाऊ बहीण विवाहा प्रमाणे टाळण्याचे किंवा अशी संभाव्यता असते हे स्पष्टपणे अबकड ग्रंथातून सांगितले जावयास हवे ( दयाळू परमेश्वर स्पष्ट सांगण्यास घाबरत नसतो - हे माझे नव्हे अबकड ग्रंथाचे म्हणणे आहे ) . ह्या ठिकाणी अबकड ग्रंथाची विज्ञानसंपन्नता पुढे प्रश्नचिन्ह लागते ज्याने ग्रंथ प्रामाण्याची अंधश्रद्धा कमी करता येण्यास हातभार लावता येतो. आता इथे अबकड ग्रंथाचे प्रचारक डॉक्टर असतील तर गोंधळतात ह्याची त्यांना कल्पना असते. आपल्यातल्या नास्तिक आणि सुडोपुरोगाम्यां ना त्याची कल्पना नसते. * अबकड ग्रथांच्या ग्रंथ प्रामाण्याने निर्माण होणार्‍या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अशा तर्कनिष्ठ विज्ञान निष्ठ अ‍ॅनालॉजीच वापराव्या लागतात . त्यात पुन्हा चिकित्सा केल्यास शांततेची भिती असते ती वेगळी म्हणून शांततामयी म्हणून गौरव करत रहाण्या पलिकडे पर्याय नसतो. इथे प्रश्न अबकड बद्दल फोबीआ निर्माण करण्याचा नाही रास्त टिका करण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. सुडोपुरोगामीना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काहीही न करता पदरात पडलेले असते त्यामुळे जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वानवा आहे त्या बद्दल चिकित्सा होणे केली जाणे हकनाक गैर वाटत रहात असावे . पण रास्त टिका करण्याचे आपण मार्ग बंदकरून नवी सेंसॉरशीप लादतो आहोत याचे भान नसण्याचा खेद वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Sun, 06/24/2018 - 06:59 नवीन
...त्यांनी केलेली एक विशीष्ट आर्थीक मदत कामा पूरता मामा स्वरुपाची आहे,
हि अशी मदतही टार्गेटेड असते आणि यातही दुसर्‍या पक्षास टार्गेट करणे हाच उद्देश असतो. आता ते टार्गेटेड आहे ह्यास उघडे पाडले. आणि असे पितळ उघडे पडणे सोडोसेक्युलरांना अस्वस्थ करेल तर नवल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Sun, 06/24/2018 - 07:28 नवीन
४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी सॉफ्ट कॉर्नर ठेवतात ---------------------- मी इस्लाम का स्वीकारला , हे सगळ्यांना सांगितलेले आहे , तेही खुलेआम , उगाचच soft corner वगैरे शब्द वापरून माझ्या खुलेपणाचा अपमान करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 06/24/2018 - 08:14 नवीन
४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी सॉफ्ट कॉर्नर ठेवतात ---------------------- मी इस्लाम का स्वीकारला , हे सगळ्यांना सांगितलेले आहे , तेही खुलेआम , उगाचच soft corner वगैरे शब्द वापरून माझ्या खुलेपणाचा अपमान करू नका.
* अरेव्वा हे माहित नव्हते, इस्लाम मधले आपले किती वाढदिवस झालेत ? वाढदिवसांसाठी विवीध (रचनात्मक) उपक्रम सुचवत जाईन म्हणतो . तुम्ही अनेक मुद्दे एकदम मांडले तर सर्वांची उत्तरे देत नाही म्हणून काळाच्या ओघात देईन चालेल का ? तुम्ही चालेल म्हटले म्हणजे ईतर लोक टार्गेट टार्गेट म्हणून रडणार नाहीत. १) एखाद्या धर्माचा असणे आणि सॉफ्ट कॉर्नर असणे याचा संबंध असतोच असे नाही. - बहुतेकांचा असेलही पण संगळ्यांचा असलाच पाहिजे आणि प्रत्येक बाबतीत असला पाहीजे असे पूर्वग्रह मी ठेवत नाही- इथले सुडोपुरोगाम्यांपैकी बर्‍याच जणांना हिंदूधर्मातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे असते पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो असे नाही. भिन्न भिन्न गोष्टी आहेत. २) एनी वे आपण जे काही केलेत त्याने त्या समाजातील या धाग्याची विषय असलेली अंधश्रद्धा / रुढी दूर होण्यास फुल नाही फुलाची पाकळी हातभारच लागेल. म्हणजे धाग्याचा उद्देश्य बरोबरच निघाला. या विषयावर शुभेच्छा. ३) इतर लोक टार्गेट म्हणून रडले तरी, डि व्हिटॅमीन आणि पडदा पद्धतीबद्दल आपले काय मत आहे ते मोकळेपनाने न लपवता सांगूनच टाका. आपण पडद्दा पद्धती वाल्या मुस्लीम समाजातील पडदा पद्धती योग्य आहे काय ? धाग्यावर ही उत्तरे देऊ शकता अथवा इथेही पण आपल्या उत्तराची आठवणीने प्रतिक्षा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 06/24/2018 - 08:26 नवीन
अरेव्वा हे माहित नव्हते गम्मतच करताय , जे सर्वाना ठाऊक आहे , ते माहितगारास माहीत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 06/24/2018 - 10:37 नवीन
विषय भरकटवणार्‍या कलेचे कौतुक वाटते. ''सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व' या साध्या सुध्या विषयातही आमचे मित्र राही या प्रतिसादात जरासे विषय भरकटताना दिसतात. पण ते अनवधानाने असेल. आपले कौशल्य अधिक वाटते. Burqa-clad women prone to vitamin D deficiency: Doctors या बातमीवर वाचल्यावर मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीवर एक डॉक्टर म्हणून काय मत आहे आपले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 06/24/2018 - 11:04 नवीन
तुम्हाला इंग्रजी समजते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पिलीयन रायडर Sun, 06/24/2018 - 11:33 नवीन
इथे राजकीय धाग्यांवर शेकड्याने प्रतिसाद असतात, त्यामुळे ते वाचून होत नाहीत. पण मी जितकं चाळून पहाते त्यात मंगु ह्या आयडी कडून नेहमी संयमित प्रतिसाद पाहिले आहेत. अर्थात ते इथे अनेकांना पटत नसलेल्या विचारसरणीचे असतात. पण शेवटी ते त्यांचे मत आहे. मताचे खंडन व्हावे, पण कुणाला वैयक्तिक रित्या टार्गेट केल्या जाऊ नये. माझ्या मते मंगु हे पूर्वाश्रमीचे हिंदू आणि आता मुसलमान आहेत. मला स्वतःला मुस्लिम समाजाच्या अनेक गोष्टी पटत नसल्या तरी म्हणून मी त्या समाजाच्या एका माणसाला पकडून प्रश्न विचारू शकत नाही. ते ही हिंदू बहुल फोरम वर. मी जनरल प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा घडवून आणू शकते. पण मी एका माणसाचे नाव आणि विचार पॉईंट आउट करून जाहीररित्या अशी चर्चा करू शकत नाही, किंवा तशी मी ती करू नये. मी असते तर एव्हाना संपादकमंडळा कडे तक्रार केली असती. मंगु फारच सभ्यपणे हा मूर्खपणा सहन करत आहेत. त्यांची मतं अगदी काहीही असली तरी ते इथे कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाहीत. कुणालाही इथे इतरांना हिंदू आहोत की मुस्लिम, पुरोगामी आहोत की प्रतिगामी हे विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही. अजूनही संपादक मंडळ हे कसे चालवून घेते ह्याचे सखेद आश्चर्य वाटले. शिवाय त्यांना सपोर्ट करणाऱ्यांसाठी धाग्यात वापरलेली भाषा सुद्धा सभ्य नाही. काही तरी व्याही आणि घोडे लिहिलंय. वाचून इथे काही सकस विचार असू शकतील ही शक्यताच मेल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Sun, 06/24/2018 - 18:01 नवीन
मॅडम आपल्याला आपले पाय जरा जमिनीवर ठेवता येतील का ? आपल्याला ट्विटरोत्तर म्हणून भावनिक मारल्याने आपण बरोबर ठरत नाही. तथ्यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची सवय हवी. ताज्या घडामोडी धाग्यावर मी नेहमी नसतो क्वचितच फिरकतो . माझे आणि डॉ. मंगुच्या वादांची संख्या फार मोठी नाही (बहुधा त्यांच्या जुन्या सदस्य नावाम्सहीत -त्यांची जुनी सदस्य नावे मला माहित नाहीत त्यांनी ती स्वतः सांगितल्यास आपल्या समाधानर्थ मी आहे तेव्हा पासूनचे रेकॉर्ड शोधून दाखवेन) . या जून महिन्यात १) माझ्या त्यांच्याशी चर्चा म्हणता येणार नाही शिक्षण विभागाने काढले परिपत्रक (GR)_ पत्रक म्हणून त्यांनी फोटो टाकला ते GR प्रकारात मोडत नाही हे निदर्शनास आणले . त्यात काही वावगे नसावे. २) १६ जूनला मी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पुजार्‍यांच्या नेमणूकी बाबत बातमी दुवा दिला तो जातीवादा दूर करण्यासंबंधाने माझी तिथे चर्चा आहे म्हणजे मी जाती वादी नाही असे तुम्हाला समजता येईल का ? या चर्चेत गापै परंपरावादी भूमिका घेऊन आले , माझी पुरोगामी भूमिका पुर्वी काही धाग्यातून मांडून झाली असल्यामुळे बाजू लावून धरली तरी वाद केला नाही पण माझ्या भूमिका या महिन्यातही प्रागतिकच होत्या - जन्माधारीत विषमतेचा मुद्दा येओ तेव्हा तेव्हा स्वधर्मीयांवरही टिका केलेली आहे करत असतो हे कळावे म्हणून फक्त परधर्मीय आला आणि लाग त्याच्या मागे असे या भूमिकेचे स्वरुप नाहीए. समजून घेता येते का बघा कारण पुढच्या मुद्याशी संबंध आहे. माझा आणि डॉ. मंगुचा वाद झाला त्याचा संबंध माझ्या जातीयवादी आणि एकाच धर्माची बाजू न घेण्याशी आहे. मी अबकड भाजपाई अथवा संघाचा नाही हे स्पष्ट करतो आणि मिपावरील बहुते भाजपाईंना ते व्यवस्थित माहित आहे आणि बहुधा डॉ.मंगुनांही माहित आहे. २) ताज्या घडामोडीवर झालेल्या वादात (वाद साधारणतः १९ जूनला सुरु झाला) मी काँग्रेस भाजपा दोन्हीवर टिका केली डॉ, मंगुनी काँग्रेस भाजपा दोन्हीची बाजू घेतली . माझ्या आणि डॉ. मंगुच्या वादात आमचे व्यक्तिगत धर्म तुम्ही घुसडताय आम्ही दोघांनीही आणलेले नाहीत. मी त्यांच्या डोक्टर असण्यावरून , आणि चर्चा विषयवरुन धागा चालू केला त्यांच्या व्यक्तिगत धर्माला पकडून नव्हे. आपले चरण जमिनीवर ठेवा आणि सर्वांना नमस्कार करु द्या कारण आपल्यापुढे सगळेच वाढदिवस साजरे करणारे बालक आहेत. आपण ह्या विश्वाच्या निर्मात्या शक्ती आहात. ३) आपल्या सारख्या समदृष्टी वैश्विक शक्तीला २० जूनच्य चालू घडामोडी धाग्यावरच वेगळ्या चर्चेत्तील माझे खालील प्रतिसाद बघा - मी सुडोपुरोगाम्यां प्रमाणे लांगूलचालन वाद करतो असे नाही पण एकिकडे डॉ मंगुशी दुसरा वाद चालू असताना माझी खालील पोस्ट पहाव्यात हा धागा लेख चालू करण्याच्या ४० मिनिटे आधीच्या आहेत.
मला कळत नाही हिंदुत्ववादी मंडळी त्यांच्याही नकळत पाकिस्तानला ऊपयूक्त भूमिका कशा मांडतात ? भारतच्या सांस्कृतिक जडणघडणीत काश्मिरचे मोठे योगदान राहीले आहे तसे काश्मिरच्या सांस्कृतिक जडणघडणीत उर्वरीत भारताचे मोठे योगदान राहीले आहे. सांस्कृतिक दृष्ट्या काश्मिरी जनता भारतीय नसती तर भारतीय संस्कृती आकारास आलीच नसती, काश्मिरी जनतेची नाळ भारता सोबत जोडलेली नसती तर भारतीयांना काश्मिर आपला का वाटला असता ? भारताने काश्मिर आपले असल्याचा कशाला हकनाक दावा केला असता ? काश्मिर मधला दहशतवाद हा १९८४ नंतरची मुख्यत्वे १९९० नंतरची देण आहे आणि तीही पाकीस्तानी गुप्तचर संस्थांनी तेथील तरुणांच्या डोक्यांवर बंदूका ठेवल्या मुळे त्यांच्यातील सुफी संस्कृती पुसून धर्मांधता भरल्यामुळे. त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम असूनही पाकीस्तानी अतिरेक्यांनी डोक्यावर बंदूका ठेवल्यावर ते व्यक्त कसे करू शकतील ? त्यामुळे तिथला दहशतवाद निपटला कि ते भारताबद्दलचे देशप्रेम मनमोकळेपणाने व्यक्त करु शकतील . त्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणाम्नी अधिक सक्रीय होऊन दहशतवाद संपवण्यास आपल्या जवानांना मदत केली पाहीजे.
सहमत आहे, मुस्लीम समाजही गुण्या गोविंदाने किंवा यशस्वीपणे नांदवल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदुत्ववाद्यांमधील असुरक्षीततेची भावना -ती दोन्ही समुदायात आहे- आणि कल्पकतेचा अभाव त्यांना संकुचिततेकडे घेऊन जातो. मुख्य म्हणजे आपले मुद्दे तार्कीक पणे पटवण्या एवजी -आणि तार्कीकपणे पुढे ठेवणे शक्य असूनही- भावनिक गोंधळ जास्त घातला जातो -अनुभवातून शिकतील नाही असे नाही. वास्तविक पहाता जगातल्या सर्व धर्म पंथांना काखेत घेऊन संसार करण्याची हिंदू धर्मात व्यवस्थीत क्षमता आहे आणि भारत देशातही, फक्त स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक कल्पकता हवी. भारतातल्या अनेक राज्यातील अतीरेकी चळवळी आटोक्यात येऊन ती राज्ये मार्गी लागली तसे काश्मिरही एक दिवस मार्गी लागेल .
तरीही आपण मी बाई एवढ्या लांब पोस्ट वाचत नाही , म्हणण्यास मोकळ्या आहात. आपण एकदम जास्त वाचू शकत नाही, नाहीतर हे समदृष्टीच्या वैश्विक शक्ती डॉ. मंगु सोबतच्या सर्व वादांचे सविस्तर विश्लेषण सादर करतो. केवळ आपले चरण जमिनीवर असो द्यावे . __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा