आणीबाणीतले अनुभव
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत.
पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही).
तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.
तेंव्हा आणीबाणीचे समर्थन करणारा कुणी असेल तर एक तर त्याने आणीबाणी पाहिलेली नाही किंवा तो काँग्रेसचा अंध भक्त आहे असे स्पष्ट आहे
.पावरबाज
होत्या कि वरुणराजावर पण त्यांनी आणीबाणी लावावी? उदो उदो असावा पण म्हणूनउंदराला ऐरावत
म्हणायचं म्हणजे फार झालं. माझ्या आठवणीत मुंबईत पाणी तुंबलं नाही असं गेल्या पन्नास वर्षात एकही वर्ष झालेलं नाही. कारण ज्याला मुंबईची उत्तम माहिती आहे त्याला एवढं मूलभूत ज्ञान आहेच कि भरतीच्या वेळेस तुफान पाऊस झाला कि पाणी तुंबतंच. पौर्णिमा अमावास्येला साधारण दुपारी आणि रात्री बारा वाजता पूर्ण भरती असते. रात्री पाऊस झाला तर कळत नाही पण सकाळ पासून संततधार लागली कि १२ वाजेपर्यंत मुंबईची तुंबई होते आणि भरती संपली कि पाण्याचा निचरा होतो. तुम्ही काय वाटेल ते करा. आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झाले तेंव्हा लोकसंख्य फारच कमी होती आणी "आताची मुंबई महापालिका" नव्हती तरी पाणी तुंबतच असे. आता-- या निचरा होणाऱ्या गटाराच्या व्यवस्थेत आपण बेसुमार प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून त्यात अडथळे आणतो आहोत आणि जेथे तेथे सिमेंटीकरण केल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी थेट गटारात जाते आणि त्या यंत्रणेवर बेसुमार भार पडतो.