Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आणीबाणीतले अनुभव

म
मराठी कथालेखक
Wed, 06/27/2018 - 15:52
🗣 128 प्रतिसाद
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत. पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही). तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.
वर्गीकरण
आणीबाणी
राजकीय

प्रतिक्रिया द्या
41615 वाचन

💬 प्रतिसाद (128)
म
मराठी कथालेखक Mon, 07/02/2018 - 14:45 नवीन
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार.. . कोणतीही गोष्ट..खासकरून इतक्या गुंतागुंतीच्या घटनेचे फक्त 'चांगली वा वाईट' असे वर्गीकरण करणे कदाचित कठीण असेल.. प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन वेगळा पण अनुभवांची देवाण घेवाण झाली हे महत्वाचे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/02/2018 - 17:15 नवीन
आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी अतिशयोक्ती होत आहे असे वाटते. रेलवे चा संप हा माझ्या स्मरणात आहे. तासाभरात एखादी लोकल जात असे. रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण पडला होता हि वस्तुस्थिती. ट्रक टेम्पो खाजगी वाहनांना लोकांना नेण्याची सरकारने परवानगी दिली होती. मी स्वतः दादर ते घाटकोपर खाजगी बसने नंतर घाटकोपर ते भांडुप ट्रकच्या मागे बसून आणि पुढे मुलुंड पर्यंत टॅक्सीने प्रवास केल्याचे आठवत आहे. लोकांचे फार हाल झाले हि वस्तुस्थिती आहे हे कोणीच नाकारत नाही. पण संप का झाला आणि कशा तर्हेने अत्यंत कठोरपणे तो दडपला गेला होता हेही वाचून घ्या. The strike lasted from 8 to 27 May 1974.[1] The 20 day strike by 1.7 million (17 lakh) workers is the largest recorded industrial action in the world. The strike was held to demand an eight hour working day for locomotive staff by All India Loco Running Staff Association and a raise in pay scale, which had remained stagnant over many years, in spite of the fact that pay scales of other government owned entities had risen over the years.[6] Furthermore, since British times the Railways termed the work of the locomotive staff as "continuous", implying that workers would have to remain at work as long as the train ran on its trip, often for several days at a stretch. The independence of India did not change this. The eight hour work day had not been implemented in Indian railways by the Railway Board, a quasi government bureaucracy despite having become a free country in 1947, this had led to dissatisfaction among labour, especially locomotive Pilots.[7] Traditional railway union leaders too were starting to get distant from worker demands and closer instead to politicians, thus leading to further discordThe spread of diesel engines and the consequent intensification of work in the Indian Railways since the 1960s resulted in continuous working hours being extended by days, creating much resentment among the workers.[9] The Railways, although government-owned, remained an organization in which the accepted worldwide standard of an eight-hour working day was violated with impunity.[10] When the crafts unions raised the issue, they demanded a 12-hour working day for loco running staff. This led to railway strikes by rail workers across the country in 1967, 1968, 1970 and 1973, finally leading to the 1974 strike which was participated in by 70% of the permanent work force of railways https://en.wikipedia.org/wiki/1974_railway_strike_in_India INDIA: Strangulating Strike http://content.time.com/time/magazine/article/0,9171,944832,00.html या संपामुळे आणीबाणी पुकारली गेली हे म्हणणे हास्यास्पद आहे. २७ मे १९७४ ला हा संप संपला आणि पुढे एक वर्षाने म्हणजे २६ जून १९७५ रोजी आणीबाणी पुकारली गेली. आणीबाणीत ज्यांची धरपकड झाली आणि विनाचौकशी तुरुंगात टाकले त्यांचे हाल काय झाले हे त्या लोकांनाच माहिती आहे. रा स्व संघाचा द्वेष करणाऱ्या लोकांना आता द्वेषापोटी आणीबाणीचे समर्थन करताना पाहिले तर अतिशय आश्चर्य वाटते. कारण कम्युनिस्ट आणि समाजवादी हे दोन्ही जनसंघ आणि रा स्व संघाचा द्वेष करणारे पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात जनसंघाबरोबर एकदाच एकत्र आले होते. इंदिराजींचे नेत्या म्हणून आपले गुण आहेत पण त्यामुळे आणीबाणी चे समर्थन करता येत नाही. कोणत्याही कायद्याच्या अभ्यासकाला विचारा स्वातंत्र्य समता सारख्या अत्यंत मूलभूत लोकशाही मूल्यांची अक्षरशः पायमल्ली झाली होती. सामान्य माणसाला १९९१ च्या उदारीकरणाच्या शष्प फरक पडला नव्हता म्हणून ते उदारीकरण सपशेल फसले याचा उलट युक्तिवाद आपण करता आहात असेच खेदाने म्हणावे लागेल. बाकी आणीबाणी चे समर्थन करणारे कोणतेही दावे स्पष्टपणे खोटे ठरले होते. आता लोकांच्या विस्मरणामुळे बऱ्याच गोष्टी धुतल्या जात आहेत एवढेच म्हणेन.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 07/02/2018 - 19:43 नवीन
१९७१च्या डिसेंबरमध्ये पाकवर निर्णायक आणि खणखणीत विजय मिळवल्यामुळे समाजात इंदिरा गांधी आणि इंदिरा कॉंग्रेसविषयी जनतेत आत्यंतिक प्रेम आणि आदर निर्माण झाला होता. अमेरिकेच्या दबावाला आणि रोषाला न जुमानल्यामुळे इंदिरा गांधींचा आंतरराष्ट्रीय दबदबाही वाढला होता. पण विजयी युद्धानंतर युद्धाच्या खर्चाचा बोजा १९७२ मध्ये समाजावर पडला. महागाई वाढू लागली. त्यातच १९७२च्या भीषण दुष्काळाने अन्नधान्य परिस्थिती फार बिकट झाली. मग पार्ट्या किंवा लग्नमुंजीच्या जेवणावळींवर निर्बंध घालावे लागले. जास्तीत जास्त पन्नास माणसांनाच जेवण वाढण्याचा नियम केला गेला. शिवाय तांदुळाच्या पदार्थाला मनाई होती. मग काही लोकांनी वरईचा भात वाढला. पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण शिजले आहे अशी शंका आली तरी ते जप्त करून नेले जाई. हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे इतके दुर्भिक्ष्य आले होते. मात्र लोकांनी हे निर्बंध पाळले पण राजकीय पक्षांनी असंतोष फुलवला. क्रमशः
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 07/02/2018 - 23:43 नवीन
तुम्ही सांगताय ते सगळं आणीबाणीच्या लागू करायच्या बऱ्याच आधी घडलेलं आहे. जरी या सर्व घटनांची थोडीफार पार्श्वभूमी आणीबाणीच्या निर्णयाला असेल असं म्हणलं तरी मुख्य कारण मात्र कोर्टाने इंदिरा गांधींवरचे निवडणुकीत गडबड केल्याचे आरोप ग्राह्य मानले हेच असणार. सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नाकारली म्हणल्यावर पुढील धोके नक्कीच त्यांच्या लक्षात आले असणार आणि त्यात परत इगो सुद्धा दुखावला असणार. म्हणून लगेच दुसऱ्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली गेली. इतकी टोकाची कृती केल्यावर त्याला सपोर्ट मिळायला म्हणून या सगळ्या आधीच्या घटनांचा पद्धतशीरपणे उपयोग करून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची संधी साधली गेली असावी. तसेच वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि त्यावेळेला जी कुठली माध्यमे असतील त्यातून सक्तीने आणीबाणी कशी योग्य आहे हेच पसरवायला लावलं असणार. कारण विरोधात बोलायची सोयच नव्हती. बाकी लोकांनी ऑफिसला वेळेत जाणं, कामं व्यवस्थित करणं हे आणीबाणीमुळे झालेले समांतर फायदे (collateral benefits) म्हणता येतील. पण त्यामुळे आणीबाणी लावण्याचा निर्णय योग्य होता किंवा त्यामुळे समस्त लोकांचा फायदा झाला असं कसं म्हणता येईल? सरकारला तेवढ्यापुरती अनिर्बंध सत्ता मिळाली तसेच जे सरकारसमर्थक होते त्यांना बराच फायदा मिळाला असावा. जे सामान्य लोक कधीच कशात नव्हते त्यांना फारसा फरक पडला नसावा किंबहुना collateral benefits मिळाले असावेत. पण जे सरकार विरोधक होते त्यांचे मात्र हाल झाले. आता यात फक्त विरोधी नेते आणि राजकारणीच नव्हते तर सरकारच्या धोरणांवर टीका करणारी माध्यमे किंवा राजकीयदृष्ट्या ऍक्टिव्ह (पण राजकारणात नसलेले) लोक पण होते. उदा. द्यायचं झालं तर त्याकाळात मिपा असतं तर श्रीगुरुजींना आणि अजून २-४ जणांना नक्कीच अटक झाली असती. किंवा सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना पण कारवाईला सामोरं जावं लागलं. त्यामुळे तुम्ही कुठल्या भूमिकेतून आणिबाणीकडे बघताय त्याप्रमाणे ती घटना दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 07/03/2018 - 12:24 नवीन
माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही. उलट अनेक क्लृप्त्या वापरून मूक निषेध आणि विरोध प्रगट केला गेला. सरकारी बातम्या आणि जाहिराती असत पण त्या आजच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात होत्या. टाईम्स ग्रूप सहसा सरकारच्या विरोधात नसतो तसा तो तेव्हाही नव्हता. पण भलामण मात्र नव्हती. माध्यमे मध्यम डावी समाजवादी होती. त्यांचा कॉंग्रेस सरकारला आधीपासूनच विरोध होता. शिवसेना आणि काही कम्यूनिस्ट गट आणीबाणीच्याबाजूने होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सुबोध खरे Tue, 07/03/2018 - 15:43 नवीन
माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही काय सांगताय? २० कलमी कार्यक्रम आणि विविध गाणी यांची मांदियाळी होती मला आजही आठवतंय मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम असे पालुपद असणारे गाणे सगळ्या शाळा सरकारी कार्यक्रमात वाजवले जात असे. राष्ट्रसंत विनोबा भावे यांचे दूरदर्शन, त्यांचा उपा,, मौनव्रत आणि मौनव्रतातून बाहेर आल्यावर बाबा आनंदला म्हणून स्वतःच टाळ्या पिटणे पासून आणीबाणीला अनुशासन पर्व पर्यंत सर्व गोष्टींचा भरपूर उदो उदो झाला होता. लांगूल चालनाची पातळी इतकी खाली गेली होती कि ९१ वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी जाहीर सभेत

India is Indira, and Indira is India

असे म्हणून दाखवले. हजारो वर्षांच्या दैदिप्य्मन संस्कृती आणि इतिहास असणाऱ्या देशाला एका नेत्याच्या दावणीस बांधण्याचा अत्यंत हीन प्रयत्न पाहून आजही अंगाचा तिळपापड होतो. It was the culture of sycophancy that reduced men of achievement and stature to grovelling caricatures. No better example exists to this day than Dev Kant Barooah, Congress president, declaring at the height of the Emergency in 1976 that "India is Indira, and Indira is India". His oily obsequiousness would be matched by another President-of the country, no less. राष्ट्रपती असेलल्या ज्ञानी झैलसिंह यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासाठी मी जमीन झाडायला तयार आहे असेही म्हटले होते. राष्टपती पदाला काळिमा फासणारी वक्तव्ये करताना या लोकांना जराही लाज वाटल्या नाहीत? आजही संताप होतो आणि इथे लोक आणीबाणीचे गुणगान गात आहेत. Zail Singh, eternally grateful to his leader for giving him the occupancy of Rashtrapati Bhavan, announced that he would gladly "sweep the ground" that Indiraji walked upon. It was a case of crawling when being asked to bend. There would be more crawlers emerging from the woodwork when Sanjay Gandhi and later, brother Rajiv, made their political debut. https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20051226-india-is-indira-and-indira-is-india.-who-lives-if-indira-dies-786326-2005-12-26 बाकी विरोध करणारे पत्रकार पासून सर्वच विनाचौकशी तुरुंगातच होते. ज्या वेळेस निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेस सर्व राजकीय नेत्यांची सुटका झाली यानंतर या विरोधाला उधाण आले आणि त्यात इंदिराजी आणि त्यांची काँग्रेस वाहून गेले. मी वर म्हटलं आहे ना कि लोक बऱ्याच गोष्टी विसरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मराठी_माणूस Tue, 07/03/2018 - 16:16 नवीन
बरोबर. तुमच्या स्मरणशक्तीचे कौतुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नितिन थत्ते गुरुवार, 07/05/2018 - 03:14 नवीन
माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही काय सांगताय? २० कलमी कार्यक्रम आणि विविध गाणी यांची मांदियाळी होती मला आजही आठवतंय मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम असे पालुपद असणारे गाणे सगळ्या शाळा सरकारी कार्यक्रमात वाजवले जात असे. मी तेव्हा आठवीत-नववीत होतो. ७७ च्या निवडणुकीच्या वेळेस नववीत होतो. वर तुम्ही म्हणालात तशी गाणी वगैरे प्रकार सरकारी पातळीवर होते. त्यावेळी माध्यमे म्हणजे रेडिओ टीव्ही* आणि वृत्तपत्रे-साप्ताहिके इतकीच होती. सरकारी माध्यमांत आणि काही सरकारच्या सहानुभूतीदार वर्तमानपत्रात आणीबाणीची भलामण चाले. आमच्या घरी तेव्हा नवशक्ति येत असे. तो सामान्यपणे काँग्रेसी पेपर होता. (मुंबईत मिळणार्‍या वर्तमानपत्रांपैकी) लोकसत्ता हा काँग्रेसविरोधी पेपर होता. सेन्सरशिप असूनही त्यात आणीबाणीची भलामण असलेला काहीही मजकूर येत नसे. तसाच पुण्यात सकाळ तरूण भारत हे विरोधी पेपर होते. त्यात कधी भलामण झाली नसणार. *दूरदर्शन हे सरकारी माध्यम आहे त्यामुळे ते सरकारचा "प्रचार" करते असा आरोप लोक पूर्वी करत असत. पण त्यातल्या अनेकांना दूरदर्शन हीच एक संतुलित वाहिनी असल्याचा साक्षात्कार २०१४ नंतर झाला हा भाग अलाहिदा !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 06:43 नवीन
आपले महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांबद्द्ल विस्मरण झाले आहे असे दिसते. शिवाय सर्व सिनेमा थिएटर मध्ये दाखवले जाणारे "भारतीय समाचार वृत्त" यात भारत कसा जगाच्या पुढे आहे हे सिनेमाच्या अगोदर दाखवले जात असे. आपल्याला त्यांच्या प्रचाराच्या आणि लांगूलचालनाच्या चित्रफिती पाहायच्या असतील तर खालील दुवा उघडून पहा. https://scroll.in/article/668111/watch-indira-gandhis-emergency-era-propaganda-films-here रेडिओ वर रोज दर तासाला श्रीमती इंदिरा गांधी काय म्हणाल्या यांनी कुठल्या भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या उपक्रमाचे उदघाटन केले आणि माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री विद्याचरण शुक्ल यांनी श्रीमती इंदिराजी या जगाचे नेतृत्व करायला कशा लायक आहेत हेच रोज सांगत असत. He was Minister of State under Prime Minister Indira Gandhi from 1967 to 1977 including as Minister of State with Independent Charge of Information and Broadcasting. Despite a versatile career, Shukla’s role as Information and Broadcasting Minister during the Emergency period had got him some odium as propagandist for Indira Gandhi’s government. His ministry attracted adverse attention for the media censor policy during that period when Freedom of speech was under attack. The Justice Shah Commission of Inquiry which went into the Emergency excesses,was stunned when V. C. Shukla owned entire responsibility for the functioning of his ministry. As minister for information and broadcasting, Shukla not only cut power supply to printing presses but also used to monitor almost each and every story printed. When Indira Gandhi became prime minister in 1966, she chose him as a minister in her Cabinet. Shukla was also very close to Sanjay Gandhi. It was said, that following poor coverage of Indira Gandhi's rally at Boat Club on 20 June 1975, Sanjay Gandhi removed Inder Kumar Gujral and appointed Shukla as minister of I&B. He had banned Kishore Kumar’s songs on All India Radio because Kishore Kumar had refused to sing at an Indira Gandhi rally. He was known for his iron-fist handling of the media during the Emergency. गाण्याच्या दोन तीन ओली आठवत आहेत त्या अशा मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम बेकारोंको काम मिले और सस्ती हो कुछ रोटी मजदूरो को सम्मान मिले और मिले बराबर हिस्सा काँग्रेसचा हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात "काळा कुट्ट" कालावधी होता याची सध्याच्या कालावधीशी तुलना करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे होईल याबद्दल तिळमात्रहि शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 07/05/2018 - 07:47 नवीन
रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच माध्यमे होती त्यातून सरकारचा प्रचार होणार यात काही संशय नाही. तीच गोष्ट वृत्त चित्राची. जी माध्यमे सरकारच्या ताब्यात नव्हती वृत्तपत्रे, साप्ताहिके वगैरे त्यातल्या कोणी आणीबाणीची भलामण केली नाही. (त्यात पुन्हा जी वृत्तपत्रे काँग्रेसजनांच्या मालकीची होती त्यात आणीबाणीचा प्रचार होणारच होता). महाराष्ट्र टाइम्स हे तेव्हा तरी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र होते असे वाटत नाही. मुंबईतील सर्वाधिक खपाचे लोकसत्ता आणि पुण्यातील सकाळ हे तर आणीबाणी विरोधीच होते. तरीही आणीबाणीचा हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात "काळा कुट्ट" कालावधी होता हे मान्य आहे. >>याची सध्याच्या कालावधीशी तुलना करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे होईल याबद्दल तिळमात्रहि शंका नाही. सध्या तेव्हासारखी रेडिओ आणि टीव्ही केवळ सरकारीच माध्यमे आणि थोडीच वृत्तपत्रे असती तर "अच्छे दिन" २७ मे २०१४ रोजीच आलेले असते. तर ते सोडाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित गुरुवार, 07/05/2018 - 07:55 नवीन
<<"अच्छे दिन" २७ मे २०१४ रोजीच आलेले असते. तर ते सोडाच.>> ==>> हाहाहा...!! ==== बाकी आणीबाणी बाबत मान्यवरांकडून रोचक माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 08:30 नवीन
म्हणजे आता अच्छे दिन येणार नाहीत हे तुम्ही मान्य केलंय ना? मग झालं तर. आता आम्हाला अच्छे दिन केंव्हा येणार याचे उत्तर द्यायला लागणार नाही. पण मग उगाच

"आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता".

हे विधान धादांत असत्य आहे एवढं मान्य केलं कि झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
राही गुरुवार, 07/05/2018 - 13:25 नवीन
मान्य नाहीच. कारण प्रत्यक्ष्यानुभव. त्या काळाइतकी लोकांमधली शिस्त आणि समाजातली सुव्यवस्था आजतागायत कधीही अनुभवलेली नाही. राष्ट्रीयीकरणानंतर बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपांना ऊत आला होता आणि १९७५पर्यंत तो कळसाला पिचला होता. आणीबाणीमध्ये हे सगळे ताबडतोब थांबले. वक्तशीरपणा ९९% वाढला. गोदींमध्ये चोऱ्यामाऱ्या , दिरंगाई या सगळ्याला ऊत आला होता. व्यापारी जहाजाला बर्थ मिळणे, मालाची चढ उतार होणे यात महिना महिना जाई. डेमरेज वाढे. आणीबाणीत तीन चार दिवसांत जहाजे मोकळी झालेली आहेत. ही सांगोवांगीची गोष्ट नाही. घरातली माणसे व्यापारी आणि भारतीय नौदलात होती. त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत. ही शिस्त आणि सुव्यवस्था नव्हे का? असं बरंच काही लिहिता येईल. वरती श्री प्रकाश देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही शिस्तपालनात स्वातंत्र्याचा संकोच होतच असतो. तेव्हा आणीबाणीत लोकांमध्ये शिस्त आणि समाजामध्ये सुव्यवस्था होती या विधानाविषयी मी ठाम आहे. अर्थात अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवून सुव्यवस्था आणता आली असती तर ते सोन्याहून पिवळे झाले असते. तसे त्या काळी का करता आले नाही याचे अनेक अंदाज करता येतील. तो खूप मोठा विषय आहे . असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 15:31 नवीन
DELUSION --FALSE BUT UNSHAKABLE BELIEF
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही गुरुवार, 07/05/2018 - 16:45 नवीन
प्रत्यक्ष अनुभवाला मी बिलीफ म्हणू शकत नाही आणि false तर नक्कीच नाही. आमचे कुटुंब आणि गोतावळा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरुक होता. घरी कडाक्याच्या चर्चा चालत. मीटिंगा असत, शेजारपाजारी, नातेवाईक जमत. अनुभवांची देवाणघेवाण होई. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने मला ते ऐकायला, त्यात भाग घ्यायला , स्वत:ची मते मांडायला आवडे. घरी खूप मोकळे वातावरण असे. तेव्हा सगळे अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कडाडून बोलत. पण आता इतक्या वर्षांनी बराच ऊहापोह झाल्यावर आणीबाणीच्या चांगल्या बाजू आणीबाणीनंतरच्या पार्श्वभूमीवर अधिकच ठळकपणे जाणवतात. काही वैयक्तिक गोष्टी नाइलाजाने लिहाव्या लागल्या. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 16:58 नवीन
हे म्हणजे एक महिला मला सांगत होती कि सगळ्या मुलींना १६ व्या वर्षी पाळी सुरु होते असे आहे. कारण तिला १६ व्या वर्षी पाळी आली होती.तसे आहे मी लिहिले आहे त्यातील एकतरी मुद्दा तुम्हाला खोडता आला आहे का? जेवढे सगळे लिहिलेले आहे ते सगळे सार्वजनिक न्यासावर कुणालाही उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बबन ताम्बे गुरुवार, 07/05/2018 - 10:49 नवीन
त्यावेळी एक नावाजलेला तमाशा (लोकनाट्य) होता. गावोगावी त्यांचे जत्रेच्या काळात खेळ चालत. त्यांच्या वगनाट्यातील एका गाण्याच्या ओळी मला अजून आठवतात. त्या काहिश्या अशा होत्या... एक लाजरा न साजरा मुखडाच्या चालिवर गाणे होते. "गेले काळे धंदे पाण्यात जिव माझा भुलला गं ! शेतकर्‍या भिऊ नका, इंदिराच्या ऐका हाका का ?? कायदा !! गेले काळे धंदे पाण्यात जिव माझा भुलला गं !! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शब्दबम्बाळ Mon, 07/09/2018 - 09:49 नवीन
काय गम्मत ना!!
रेडिओ वर रोज दर तासाला श्रीमती इंदिरा गांधी काय म्हणाल्या यांनी कुठल्या भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या उपक्रमाचे उदघाटन केले आणि माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री विद्याचरण शुक्ल यांनी श्रीमती इंदिराजी या जगाचे नेतृत्व करायला कशा लायक आहेत हेच रोज सांगत असत.
आजकाल देखील असेच आपले चमचे घेऊन स्वतःलाच चान चान विशेषणे लावून घ्यायची फ्याशन आली आहे म्हणे! पण अर्थातच त्यात मात्र केवळ सत्य असणार आहे कारण देशात केवळ एकच माणूस निःस्वार्थी आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 07/09/2018 - 15:23 नवीन
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन. पुढे कदाचित लिहीन इथेच. माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही "आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता". लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. या सर्व विधानांचा परामर्श घेताना लिहिलेली ती विधाने आहेत. विषय आणीबाणीचा चालू आहे. मोदींचा विषय कुठे तरी आला आहे का? त्याचा मोदी यांच्या प्रचार तंत्राशी काय संबंध आहे? आणि मार्मिक गोडसे यांनी दोन वेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडली असल्यास देता का? आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का? समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला? बाकी -- सध्या आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे म्हणणार्यांना एकच विचारणे आहे कि किती लोक विनाचौकशी तुरुंगात आहेत याची काही सांख्यिकी मिळेल का? अंधद्वेष असु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/05/2018 - 16:59 नवीन
https://askopinion.com/was-press-censorship-justified-during-the-emergency
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 09:10 नवीन
त्यातच १९७२च्या भीषण दुष्काळाने अन्नधान्य परिस्थिती फार बिकट झाली. मग पार्ट्या किंवा लग्नमुंजीच्या जेवणावळींवर निर्बंध घालावे लागले. जास्तीत जास्त पन्नास माणसांनाच जेवण वाढण्याचा नियम केला गेला. शिवाय तांदुळाच्या पदार्थाला मनाई होती. मग काही लोकांनी वरईचा भात वाढला. पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण शिजले आहे अशी शंका आली तरी ते जप्त करून नेले जाई. हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे इतके दुर्भिक्ष्य आले होते. हि वस्तुस्थिती होती. कोणताही जिन्नस धान्य इ याला जिल्हा बंदी होती. कोकणात स्वतःच्या शेतात पिकणारा तांदूळ सुद्धा लोकांना मुंबईत घरी आणता येत नव्हता. यावरच शाहीर साबळे यांचे विडंबन होते. पोलीस हवालदार एस टी डेपो मध्ये कोपऱ्यात उभ्या असलेल्या माणसाला म्हणतोय चूप चूप खडे हो जरूर कोई बात है पायलीभर भात है ये पायलीभर भात है मात्र लोकांनी हे निर्बंध पाळले पण राजकीय पक्षांनी असंतोष फुलवला. म्हणून आणीबाणी आली हे म्हणणे अतिशयोक्तीच आहे १९७२ चा दुष्काळ आणि तीन वर्षांनी जाहीर केलेली (२६ जून १९७५) आणीबाणी यांचा संबंध फार तर बादरायण म्हणता येईल असा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही गुरुवार, 07/05/2018 - 15:30 नवीन
हे एकच कारण होते असे नव्हे. पुढच्या तीन वर्षात सुव्यवस्थेची घडी अधिकच विसकटत गेली. ती सर्व कारणे वर्णन करायचा कंटाळा आला आहे. लोहिया यांचा पक्का कॉंग्रेसद्वेष, (कॉंग्रेसमुक्त भारत वगैरे, पण तशी घोषणा नव्हती) जयप्रकाशजींचे तीव्र आंदोलन, बहुतांशी डाव्या अशा माध्यमांनी केलेली खंबीर पाठराखण, जॉर्जच्या रेल्वे संपामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था, मुख्यत: अन्नधान्य, इंधन, खाद्यतेले यांची ठप्प झालेली वाहतूक आणि त्यामुळे झालेली टंचाई, बॅंक कर्मचाऱ्यांची सततची आंदोलने अशा अनेक कारणांनी सरकारला जेरीस आणले गेले. लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 16:07 नवीन

लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.

लोकांचे माहित नाही परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांनी कायदा पाळणे सोडून दिले इतकेच नव्हे तर पाहिजे तसा कायदा वळवून घेतला. वरिष्ठ तीन न्यायाधीशांना डावलून पाहिजे त्या (अजित नाथ रे) न्यायाधीशांना पदोन्नती देऊन भारताचे सरन्यायाधीश केले. आणि हि आणीबाणीतील गोष्ट नसून १९७३ मधील गोष्ट आहे. This judiciary–executive battle would continue in the landmark Kesavananda Bharati case, where the 24th Amendment was called into question. With a wafer-thin majority of 7 to 6, the bench of the Supreme Court restricted Parliament's amendment power by stating it could not be used to alter the "basic structure" of the Constitution. Subsequently, Prime Minister Gandhi made A. N. Ray—the senior most judge amongst those in the minority in Kesavananda Bharati—Chief Justice of Indiain April 1973. Ray superseded three judges more senior to him—J. M. Shelat, K.S. Hegde and Grover—all members of the majority in Kesavananda Bharati. Indira Gandhi's tendency to control the judiciary met with severe criticism, both from the press and political opponents This appointment superseded three senior judges of the Supreme Court, Jaishanker Manilal Shelat, AN Grover and K. S. Hegde, and was viewed as an attack on the independence of the Judiciary. This was unprecedented in Indian legal history, and has been called the "blackest day in Indian democracy" कशाला आपण लोकशाहीच्या बाता करत आहात On 12 June 1975, Justice Jagmohanlal Sinha of the Allahabad High Court found the prime minister guilty on the charge of misuse of government machinery for her election campaign. The court declared her election null and void and unseated her from her seat in the Lok Sabha. The court also banned her from contesting any election for an additional six years. she was held responsible for misusing government machinery, and found guilty on charges such as using the state police to build a dais, availing herself of the services of a government officer, Yashpal Kapoor, during the elections before he had resigned from his position, and use of electricity from the state electricity department. The persistent efforts of Narain were praised worldwide as it took over four years for Justice Sinha to pass judgement against the prime minister. Indira Gandhi challenged the High Court's decision in the Supreme Court. Justice V. R. Krishna Iyer, on 24 June 1975, upheld the High Court judgement and ordered all privileges Gandhi received as an MP be stopped, and that she be debarred from voting. However, she was allowed to continue as Prime Minister pending the resolution of her appeal. Later that day, Indira Gandhi requested a compliant President Fakhruddin Ali Ahmed to issue a proclamation of a state of emergency. Within three hours, the electricity to all major newspapers was cut and the political opposition arrested. The proposal was sent without discussion with the Union Cabinet, who only learnt of it and ratified it the next morning. Invoking article 352 of the Indian Constitution, Gandhi granted herself extraordinary powers and launched a massive crackdown on civil liberties and political opposition. वा रे अनुशासन पर्व The Government used police forces across the country to place thousands of protestors and strike leaders under preventive detention. In Tamil Nadu, the M. Karunanidhi government was dissolved and the leaders of the DMK were incarcerated. In particular, Karunanidhi's son M. K. Stalin, was arrested under the Maintenance of Internal Security Act. At least nine High Courts pronounced that even after the declaration of an emergency, a person could challenge his detention. The Supreme Court, now under the Indira Gandhi-appointed Chief Justice A. N. Ray, overruled all of them, upholding the state's plea for power to detain a person without the necessity of informing him of the grounds for his arrest, or to suspend his personal liberties, or to deprive him of his right to life, in an absolute manner (the habeas corpus case')राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश आपल्या ताटाखालचे मांजर नियुक्त केले आणि कायद्याचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावला. आणि आपण म्हणताय लोक कायद्याला जुमानेनासे झाले? बढिया है Habeas Corpus case Justice M.H. Beg was also involved in the Habeas Corpus case. This landmark case in Indian democracy, Additional District Magistrate of Jabalpur v. Shiv Kant Shukla, came up in 1975 during the Indian Emergency. The legal question hinged on the citizen's right to judicial scrutiny for arrests under emergency. The five senior most judges of the Supreme court heard the case, and four aligned with the government view that even the right to life stood suspended during emergency (only dissent was H. R. Khanna). In his April 1976 decision, Justice Beg appeared to bend backwards even, when he observed: We understand that the care and concern bestowed by the state authorities upon the welfare of detenues who are well housed, well fed and well treated, is almost maternal.ज्यांना प्रतिबंधात्मक कोठडीत( कोणताही आरोप नसताना) ठेवले आहे त्यांना उत्तम निवास उत्तम खाणे पिणे देऊन त्यांची आईसारखी उत्तम काळजी घेतली गेली आहे A few months later, in January 1977, M.H. Beg, who was junior to H. R. Khanna, was appointed Chief Justice of India by the Indira Gandhi government. This was against legal tradition. हम करेसो कायदा याचे दुसरे उदाहरण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मिळणार नाही आपली अंध भक्ती किती आहे हे आपण आपल्याच डोळ्याने वाचून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
च
चिर्कुट Mon, 07/09/2018 - 11:15 नवीन
लोकशाहीच्या बाता, ताटाखालचे मांजर, हम करेसो कायदा, पाहिजे तसा कायदा वळवून घेणे आणि शेवटी कहर म्हणजे अंधभक्ती वाला सल्ला... याच गोष्टी सध्याच्या प्रधानसेवकांबद्दल म्हणल्या जातात आणि त्याचा विरोध कोण, कसा करतं हे विसरलात वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 07/09/2018 - 15:22 नवीन
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन. पुढे कदाचित लिहीन इथेच. माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही "आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता". लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. या सर्व विधानांचा परामर्श घेताना लिहिलेली ती विधाने आहेत. विषय आणीबाणीचा चालू आहे. मोदींचा विषय कुठे तरी आला आहे का? त्याचा मोदी यांच्या प्रचार तंत्राशी काय संबंध आहे? आणि मार्मिक गोडसे यांनी दोन वेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडली असल्यास देता का? आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का? समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला? बाकी -- सध्या आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे म्हणणार्यांना एकच विचारणे आहे कि किती लोक विनाचौकशी तुरुंगात आहेत याची काही सांख्यिकी मिळेल का? अंधद्वेष असु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
अ
अर्धवटराव Tue, 07/03/2018 - 10:03 नवीन
आणिबाणी समर्थक आणि विरोधकांचे आर्ग्युमेण्ट्स वाचुन असं वाटतय कि पिक्चर पहिले रिलीज झाला, ट्रेलर मागाहुन आलं :) तेच कोलॅटरल बेनीफीट्स, तेच बाण मारुन त्या भोवती वर्तुळ बनवणं, तेच मागचे-पुढचे संदर्भ मिक्स करणं, तेच व्यक्ती-विषेशाच्या अहंपणा वि. नि:स्वार्थ भाव वगैरेच्या चर्चा. एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 07/03/2018 - 10:13 नवीन
एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.
"आईसक्रीमवाले गंदे अंकल"ची सर्वाधिक तीव्र शोकांतिका. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ट
ट्रेड मार्क Tue, 07/03/2018 - 23:44 नवीन
माझ्यामते तुम्ही करताय ती तुलना होऊ शकत नाही. तुमची तयारी असल्यास तटस्थपणे चर्चा करू. एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास. हे काही कळलं नाही. कृपया विस्तारून सांगावे. गवि म्हणले तसं आईस्क्रीमवाले गंदे अंकल बद्दल असेल तर तसे लोक्स जागोजागी पूर्वीपार आहेत. आता कदाचित माध्यमे भरपूर झाल्याने बातम्या सहज आणि वेगाने पसरतात, त्यामुळे कदाचित प्रकार वाढले असं वाटत असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 07/04/2018 - 07:50 नवीन
पण इंदीराजींच्या आणिबाणीबाबत आम्हि केवळ श्रवणभक्ती करु शकतो... त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हाला. आईस्क्रीमवाले गंदे अंकल पुर्वीही होते याबद्दल वाद नाहि. लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 07/05/2018 - 00:59 नवीन
त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हाला म्हणूनच "सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो" असं म्हणताय. हिंदुबहुल देशात हिंदू देवतांची खिल्ली उडवणारे चित्रपट निघतात आणि असे चित्रपट शेकडो कोटींचा गल्ला जमवतात. पूर्वी तर देवतांची नग्न चित्र पण काढली गेली आहेत पण चित्रकार सुखरूप राहून वर ती चित्रे कोट्यवधींना विकली सुद्धा गेली आहेत. यांचे निर्माते कोण होते ते वेगळं सांगायची गरज नाही. यातल्या कोणाला काय धोका झाला? जर सरकारवरील किंवा पंतप्रधानांवरील टिकेबद्दल म्हणाल तर अतिशय हीन पातळीवरची टीका होऊनही त्या टीकाकारांवर सरकारने कारवाई केल्याची उदाहरणे नाहीत. जसे विरोधक टीका करतात तसेच समर्थक त्या विरोधकांना प्रत्युत्तर करतात. अर्थात टीका खालच्या पातळीवर घसरत जाते तसेच प्रत्युत्तर सुद्धा त्याच पातळीवर जाते. मग टीकाकार अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि गळचेपी होतीये म्हणून ओरडतात. परिस्थिती अशी आहे की पंतप्रधान काही बोलले नाही तरी प्रॉब्लेम असतो आणि बोलले तरी प्रॉब्लेम असतो. याचे कारण म्हणजे विरोधकांना फक्त आरडाओरडाच करायचा असतो. सरकारने सामान्य जनतेला सोडून द्या पण राजकीय विरोधकांना मुद्दाम त्रास दिल्याचे किंवा खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकल्याचे उदाहरण आहे का? मग कुठली आणीबाणी चालू आहे? लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे. लोकशाहीत लोकांना, म्हणजेच जनतेला, अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडील जनता खरंच मॅच्युअर होतेय का हे सांगा. साधं कचरा व्यवस्थापन लोक वैयक्तिक पातळीवर करू शकत नाहीत. मग कुठे तरी जबरदस्ती, म्हणजे कडक कायदे आणि शिक्षा, करायला लागणारच ना? गुन्ह्यात अडकलेल्या अभिनेत्यांचे फॅन फॉलोइंग बघा. त्यांचे चित्रपट १०० कोटींचा गल्ला सहज पार करतात ते कोणामुळे? पण परिस्थितीमुळे साधा पाव चोरणाऱ्या लहान मुलाला मात्र हेच लोक मारहाण करतात. असो. परत तेच पुराण नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sun, 07/15/2018 - 07:17 नवीन
सरकारबद्दल काहिच म्हणणं नाहि. सायलेण्ट आणिबाणी पब्लीकच्या बाबतीत आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
म
मराठी_माणूस Tue, 07/03/2018 - 14:40 नवीन
मल्याळम सिनेमा Piravi बद्दल वाचा , चित्रपट पहा. एक अतिशय सुन्न करणारा अनुभव.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 07/05/2018 - 08:40 नवीन
मोदींच्या कार्यशैलीवर फिदा असणारांना इंदिरा गांधींची कार्यशैली खटकावी, हे भलतेच रोचक आहे!!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 07/09/2018 - 05:03 नवीन
विषय आणीबाणीचा आहे. मोदींची कुठली कार्यशैली इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेस असलेल्या कार्यशैली सारखी वाटतीये ते तुलना करून सांगा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
र
रंगीला रतन गुरुवार, 07/05/2018 - 11:59 नवीन
ज्या कोणाला सध्या अघोषित, सायलेंट टाईप ची आणीबाणी चालू आहे असले भास होत असतील त्यांनी भाऊ तोरसेकारांचा हा लेख वाचावा. ह्या असाध्य रोगावर इलाज उपलब्ध नाहीये , तरी अशा रोगाने बाधित झालेल्या रुग्णांशी कसे वागावे हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचावा. टीप: बाधित रुग्णांवर हे लेख वाचून काही परिणाम होण्याची शक्यता ०% आहे.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 07/05/2018 - 12:03 नवीन
अघोषित अगोचर आणिबाणी शिझोफ़्रेनिया, अर्थात भ्रमिष्टावस्था
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन
र
राही गुरुवार, 07/05/2018 - 20:05 नवीन
माझ्या एका प्रतिसादावरचा श्री सुबोध खरे यांचा प्रतिसाद खूपच तिरका झाला आहे तो इथे लोकांच्या सोयीसाठी समोर पृष्ठमध्यावर नकलला आहे. हे म्हणजे एक महिला मला सांगत होती कि सगळ्या मुलींना १६ व्या वर्षी पाळी सुरु होते असे आहे. कारण तिला १६ व्या वर्षी पाळी आली होती.तसे आहे हे सर्व ठळक बोल्ड टाइपमध्ये आहे. यावर मी काहीच भाष्य करू इच्छित नाही. भद्रं ते... (कल्याण असो)
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 07/09/2018 - 02:51 नवीन
बाई, तुम्ही बाई आहात. गप्प बसा. नाहीतर गप्प बसवण्यात येईल. बघे बघत राहतील. बाकी सांप्रत मिपावर बिकांचा एक फुल्याफुल्यांचा धागा नुकताच वर आलाय. त्यात शेवटी लिहिल्याप्रमाणे दुर्लक्ष हा सर्वोत्तम मार्ग असावा हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ट
ट्रेड मार्क Mon, 07/09/2018 - 05:08 नवीन
तुम्ही राही यांना व्यक्तिशः ओळखता का? नसेल तर राही हा आयडी असलेली व्यक्ती स्त्री आहे हे कशावरून ठरवलंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Mon, 07/09/2018 - 18:16 नवीन
तुम्ही राहीताईंना ओळखत नाही? मराठी आंतरजालावर नवे दिसताय. असो.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
य
यशोधरा Tue, 07/10/2018 - 16:15 नवीन
मी आंतरजालावर नवीन नाही पण तुम्ही म्हणताय त्या आयडी मागील व्यक्तीस मीही ओळखत नाही, इतकेच काय तुम्ही आय डी मागे कोण व्यक्ती आहात हेही मला ठाऊक नाही. त्याने काही फरक पडतो? एखाद्या व्यक्तीस ओळखत नसल्यास फार मोठा गुन्हा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 07/10/2018 - 17:39 नवीन
तंतोतंत हेच म्हणायचे आहे. आभासी विश्वात एखाद्या सदस्यनामाच्या आभासी अस्तित्त्वाच्या मागील खऱ्याखुऱ्या व्यक्तीचा आंतरजालावरील मतप्रदर्शनाशी संबंध का जोडायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 07/10/2018 - 17:44 नवीन
एसभाऊ, तसे काही झालेय असे वाटत नाही. प्रथम तुमचीच पोस्ट आहे ना, की बाई आहात तुम्ही, गप्प बसा, अशी? त्यावरून तो प्रश्न आलाय की तुम्ही त्यांना व्यक्तिशः ओळखता का, अशी. असे आपले मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 07/10/2018 - 20:38 नवीन
:-) यशोताई, नाही हो. ट्रेडमार्कराव मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत. हा आंतरजालावरील फार जुना फ़ंडा आहे. त्याला मी भीक घालणार नाही. अर्थात, मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच. @ट्रेडमार्क, 'भद्रम् ते'! :-) :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ट
ट्रेड मार्क Tue, 07/10/2018 - 21:13 नवीन
मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत. ही समजूत तुमची तुम्हीच करून घेतलीत. त्यामुळे परत हा प्रश्न उभा राहतोय, 'तुम्ही हे म्हणताय त्याला काही आधार आहे का?'. मला राहींच्या एकूण (फक्त या धाग्यांवरील नव्हे) प्रतिसादांवरून ते स्त्री आहेत असं वाटलं नव्हतं. तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं. मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच. मला जिथे चुकीचं वाटतं तिथे मी बोलतोच, मग ते कुठल्या व्यक्तीला (आयडीला) आहे याचा काही संबंध नाही. मग त्या व्यक्तीला शिंगावर घेतोय असं वाटू दे नाहीतर दुसरं काही वाटू दे. पण मला याची गम्मत वाटतीये की तुमची स्वतःबद्दल काय समजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 07/11/2018 - 08:16 नवीन
तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं.
तो अतिशय उद्वेगाने लिहिलेला उपहास आहे. हे जर का तुमच्या किंवा इतर कोणाच्या लक्षात आले नसेल तर मग गैरसमज होण्याची चांगलीच शक्यता आहे. (बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला.कदाचित माझी मांडणी चुकली असावी. पुढील प्रतिसादांपासून अशा वेळी कंसात स्पष्टपणे 'उपहास', 'विनोद', 'खंत' असे लिहीत जाईन.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
य
यशोधरा Wed, 07/11/2018 - 10:18 नवीन
नाही, उपहास माझ्या तेव्हाच लक्षात आला एसभाऊ, उलट म्हणूनच तुमच्या ह्या भूमिकेचे मला फार फार वाईट वाटले आहे. इतके जजमेंट पूर्ण, इलाईटी पवित्रा घेऊन लिहिणाऱ्या मिपाकरांपैकी तुम्ही नव्हता, असे मला वाटत होते. परवा परवा एका धाग्यावर सत्य कळल्यावर तुम्ही तसे मोकळेपणे लिहिलेले पाहून तुमच्याबद्दल आदरच वाटला होता, पण हे खटकले. असो. आता ह्यावर अधिक लिहिणार नाही. तुमचेही काही कारण असेलच. मिपा मला अनोळखी होत चालले आहे, हेच खरे असावे बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ट
ट्रेड मार्क Wed, 07/11/2018 - 19:46 नवीन
गप्प बसा म्हणणे उपहास होता हे जरी समजलं असेल तरी बाई आहात हे म्हणणे हा पण उपहास होता का? मला अगदी मूलभूत प्रश्न पडला होता की ज्यांना तुम्ही बाई म्हणून संबोधताय त्या खरंच बाई आहेत का. म्हणून तसा प्रश्न विचारला. आता दुसऱ्या मुद्द्याकडे... जर बाई आहेत म्हणून त्यांना उपहासाने गप्प बसायचा सल्ला देताय ते कशासाठी? मिपावर कधी कोणाला स्त्री आहे म्हणून कोणी प्रतिसाद देऊ नका किंवा तत्सम काही केले आहे का? जर असे एखाद्या आयडीने केले असेलच तर समस्त (पुरुष) मिपाकर, मिपावरील सगळ्या स्त्री असलेल्या आयडींशी असेच वागतात असं तुमच्या उपहासगर्भ प्रतिसादातून वाटतंय. बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला. तुम्ही विचार कुठल्या दिशेने करताय याला महत्व आहे ना? नुसता बराच विचार करून होणार! पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
य
यशोधरा Wed, 07/11/2018 - 07:35 नवीन
एसभाऊ, सिरीयसली? तुम्ही असे काही लिहाल असे वाटले नव्हते. माफ करा, पण सखेदाश्चर्य वाटून राहिले आहे, खरंच! ..असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
राही गुरुवार, 07/12/2018 - 12:26 नवीन
एस भाऊ, आपल्या भावना पोचल्या. धन्यवाद. प्रतिसाद देत राहिले की अधिकाधिक लचके तोडले जातील आणि इतर लोकांना फुकटची मजा बघायला मिळेल म्हणून एखाद्या स्त्री आयडीने वाद वाढवत नेऊ नये या म्हणण्यामागची कळकळ आणि स्त्रीत्वाची मानमर्यादा व आदर राखण्याचा सद्भाव समजला. उद्वेगही समजला. ज्या प्रतिसादावर आपण वरील प्रतिसाद लिहिला तो मूळ प्रतिसाद खोडसाळच होता. पण दुसऱ्यावर चिखलफेक करणाऱ्याचे हात आधीच चिखलात बरबटलेले असतात हे जाणून त्यातल्या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष केले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा