अविश्वास ठराव
आज लोकसभेतआणि राज्यसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव मांडला आहे.
लोकसभा निवडणुका एका वर्षानी होणार असताना हा अविश्वास ठराव कशासाठी आणला गेला आहे या बद्दल सर्वसामान्य जनतेला संभ्रम आहे.
या ठरावाचे कारण नक्की काय हे कोणताच पक्ष थेट सांगत नाही.
सत्ताधारी पक्षाला बहुमत असतानाही विरोधी पक्ष कोणत्या बळावर हा ठराव मांडणार आहेत हे समलेले नाही.
शिवसेना काय करणार आहे हे ते तरी सांगू शकतात का हा प्रश्नच आहे
उद्या समजा अविश्वास ठराव पास झाला. ( समजा ....) तर विरोधी पक्ष होणार्या मध्यावधी निवडणूकीत कोणता मुद्दा मांडणार आहेत.
आणि त्या निवडणूकीतही मोदी सरकार पुन्हा निवडले गेले तर त्या मध्यावधी निवडणुकीच्या खर्चाला तसेच मधल्या काळात रेंगळून अधीक खर्चीक बनलेल्या योजनांचा खर्च याला कोण जबाबदार असेल.
विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नसतानाही हा प्रस्ताव आणायचे प्रयोजन समजत नाही.
कदाचित काँग्रेसला राहूल गांधीना प्रोजेक्ट करायचे असेल पण त्यासाठी लोकसभेबाहेरही प्रयत्न करता आले असते.
मिपावरची तज्ञ मंडळी थोडे मार्गदर्शन करतील तर बरे होइल.
सगळ्या नाटकात का तमाशात फ्रान्सच्या सरकारला सुध्दा उतरावे लागले.फ्रान्सच्या अध्यक्ष्यांच्या नावे खोट्या विधानांचा दावा भर संसदेत केला गेल्यावर (संसदेत केलेल्या वक्तव्यांची तथ्य म्हणून कायम नोंद राहते) फ्रान्सची अशी प्रतिक्रिया अपेक्षितच होती. स्वतः खोटे दावे तर करायचेच आणि त्याहीपुढे जावून एका महत्वाच्या मित्रराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याच्या नावाने खोटे दावे करणे... तेही संसदिय कामकाजात !!! आता यापुढे अजून किती खालच्या पायरीवर राजकारण जाणार आहे, त्याचा अंदाज घेणे कठीण आहे. :( लोकसभेबाहेर केलेल्या दाव्यांमुळे राहूल गांधींवर आधीच न्यायालयात खटले चालू आहेतच. पण, लोकसभेतील खोट्या दाव्यांसाठी न्यायालयात खटला दाखल करता येत नाही, याचा फायदा घेऊन, भारतभर प्रक्षेपण होणार्या लोकसभा अविश्वास प्रस्तावाच्या वेळेस काही खोटेनाटे आरोप करून राजकिय खळबळ निर्माण करून काही फायदा होतो का ते पाहू, असा विचार कॉग्रेसच्या विचार गटाने (think tank) केलेला दिसतो. मात्र, ते करताना, सगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून, राहूल गांधींनी, संसदेचा हक्कभंग केल्याचा ठराव स्वतःवर ओढवून घेतला आहे. एकंदरीत आता रागांचे 'खोटे आरोप करणे' आणि तसे केल्यामुळे 'लोकसभेची दिशाभूल केल्याबद्दल मागावी लागणारी माफी', या दोन्हीही गोष्टी त्यांच्यावरील चर्चेसकट संसदेच्या कामकाजाच्या नोंदीत कायमस्वरूपी साठवल्या जाणार आहेत, हे नक्की. खुद्द स्वतः काँग्रेसने पुरवलेल्या या "सिद्ध झालेल्या संसदेतल्या मोठ्या खोटेपणाच्या" दारूगोळ्याचा भाजपला (व इतर काँग्रेसविरोधकांनाही) केवळ २०१९च्या निवडणूकीतच नव्हे तर नंतरची अनेक वर्षे इतर गोष्टीतही उपयोग झाला तर आश्चर्य नाही !नुसतं गुगलवर फेकू असं सर्च केलं की निकाल समोर येतो.गूगल प्रमाण मानायचं तर पप्पू, इटालियन बारबाला, मौनमोहन हे सर्च करून बघा काय येतंय ते. मग हे रिझल्ट्स पण तुम्हाला तितक्याच प्रमाणात मान्य असले पाहिजेत.पहिलीतल्या मुलाला कळेल की लोकसभेत अविश्वास ठराव फेटाळल्या जाणारच होता त्यात काही आश्चर्य नव्हतं, पण किती पक्ष या फेकू नावाच्या व्यवस्थेला विरोध करतात हेही तितकेच महत्वाचं होतं.मग ठराव आणण्याचं एखादं योग्य कारण सांगा बघू. पप्पू कसा जाऊन मोदींना मिठी मारतो हे दाखवणे हाच उद्देश होता काय? ठरावाच्या एक दिवस आधी सोनियामातानी "आमच्याकडे अविश्वास ठराव पास करून घ्यायला संख्याबळ नाही असं कोण म्हणतय?" असा प्रश्न विचारला होता. मुळात किती पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला सपोर्ट केला सांगा बघू.झप्पीच्या वेळी आदरणीय फेकूसेठ इतके टरकलेले दिसले की जसं काही कोणी यांची कायमची खुर्ची खेचून नेणार आहेत की काय अशी भांबावलेली अवस्था दिसली.मुळात असं एखाद्यापाशी जाऊन उठायला सांगणे हेच अशोभनीय आहे. टरकलेले तुम्हाला वाटले असतील पण मला तरी असं वाटतंय की पप्पूला त्याच्या गोटातून सांगण्यात आलं असावं की तू जवळ गेलास की मोदी उठून उभे राहतील मग तू मिठी मार. पण मोदी तर उभेच राहिले नाहीत, त्यामुळे पप्पूने हातवारे करून उठायला सांगितलं पण तरीही मोदी उठले नाहीत. पण आपल्याला मिठी मारायला सांगितली आहे म्हणून ती मारलीच पाहिजे म्हणून पप्पूने झुकून मिठी मारली. सभागृहात मिठी मारणे आणि नंतर जागेवर जाऊन आपल्या सहकाऱ्याला डोळा मारणे यामध्ये तुम्हाला काहीच वावगे वाटत नाही? पप्पूने त्याआधी सभागृहात पुरावे नसलेले दावे केले. राफेल खरेदीवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना पप्पूचा दावा खोडून काढावा लागला. सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे काँग्रेसच्याच सरकारने २००८ साली गुप्ततेचा करार केला होता आणि काँग्रेसचाच अध्यक्ष असा कुठलाही करार नाहीये असं संसदेत सांगतोय. २००८ साली हा गुप्ततेचा करार काँग्रेसने का केला असेल हे अगदी पहिलीतल्या मुलालाही माहित असेल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पप्पूला कोणाला भेटवण्यात आलं काय माहित!बाकी, आता पीएम की प्रतिमा वगैरे विनोदाचा विषय झाला आहे. नुसतं गुगलवर फेकू असं सर्च केलं की निकाल समोर येतो. =))>>> सहज म्हणुन बिरुटे असे गुगल सर्च करुन पाहिले तर एका माकडाला कडेवर घेतलेल्या एका आज्जीबाईंचे फोटो दिसत आहेत ! कसला योगायोग आहे ! लोल !!कॉंग्रेसने स्वत:च्या अब्रुची लक्तरे, स्वत:च वेशीवर टांगलीत. :))--