Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अविश्वास ठराव

व
विजुभाऊ
Fri, 07/20/2018 - 13:03
🗣 68 प्रतिसाद
आज लोकसभेतआणि राज्यसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव मांडला आहे. लोकसभा निवडणुका एका वर्षानी होणार असताना हा अविश्वास ठराव कशासाठी आणला गेला आहे या बद्दल सर्वसामान्य जनतेला संभ्रम आहे. या ठरावाचे कारण नक्की काय हे कोणताच पक्ष थेट सांगत नाही. सत्ताधारी पक्षाला बहुमत असतानाही विरोधी पक्ष कोणत्या बळावर हा ठराव मांडणार आहेत हे समलेले नाही. शिवसेना काय करणार आहे हे ते तरी सांगू शकतात का हा प्रश्नच आहे उद्या समजा अविश्वास ठराव पास झाला. ( समजा ....) तर विरोधी पक्ष होणार्‍या मध्यावधी निवडणूकीत कोणता मुद्दा मांडणार आहेत. आणि त्या निवडणूकीतही मोदी सरकार पुन्हा निवडले गेले तर त्या मध्यावधी निवडणुकीच्या खर्चाला तसेच मधल्या काळात रेंगळून अधीक खर्चीक बनलेल्या योजनांचा खर्च याला कोण जबाबदार असेल. विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नसतानाही हा प्रस्ताव आणायचे प्रयोजन समजत नाही. कदाचित काँग्रेसला राहूल गांधीना प्रोजेक्ट करायचे असेल पण त्यासाठी लोकसभेबाहेरही प्रयत्न करता आले असते. मिपावरची तज्ञ मंडळी थोडे मार्गदर्शन करतील तर बरे होइल.

प्रतिक्रिया द्या
23869 वाचन

💬 प्रतिसाद (68)
ग
गामा पैलवान Tue, 07/24/2018 - 21:41 नवीन
मार्मिक गोडसे, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
पंतप्रधान विरोधी पक्ष्याच्या एकाही मुद्याला नीट उत्तर देऊ शकले नाही. सत्तेत येउन चार वर्ष होऊनही स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात का नाही आला ह्यावर पं.प्रधान गप्प.
कारण की सत्तेत आले तेव्हा स्विस बँकेतला काळा पैसा क्यारेबियन बँकांत जाऊन पडला होता. मोदी सत्तेत येत्या क्षणी काय परिस्थिती होती ती इथे बघायला मिळेल : http://www.lokmat.com/manthan/black-money-and-attitude/ हा पैसा स्विस बँकांतून पसार झालेला असल्याने परत आणता आला नाही. तसा तो आणायची गरजही नाही. २०१४ ते २०१६ पर्यंत मोदींनी काळ्या पैशाच्या स्वर्गभूमींशी नेमके करार केले. नंतर २०१६ च्या अखेरीस नोटाबंदी केली. त्यामुळे हा बेहिशोबी पैसा त्यांच्या मालकांना भारतात आणता येणार नाही. काळ्या पैशाला अटकाव करायला माझ्या मते इतकं पुरेसं आहे. २.
नोटबंदी नंतर काश्मीर मधील दगडफेक बंद होईल असा दावा सरकार करत होती , मग ती बंद का झाली नाही असा प्रश्न फारूक अब्दुल्ला ह्यांनी विचारला, पंतप्रधान गप्प.
असा दावा केल्याचं मलातरी आठवंत नाही. ३.
रोजगार निर्मितीचे पंतप्रधानांचे दावे तर अगदी हास्यास्पद होते, काय ते ट्रक, टेम्पो, विक्रीतून रोजगार निर्मिती झाली. जणू काही सरकारनेच ही विक्री केली.
रोजगारनिर्मितीसाठी ट्रकटेंपो विकायची काय गरज? भज्ज्या तळूनही रोजगार निर्माण होतो. माहित नाही वाटतं तुम्हांस? पण तुमची कल्पना एकंदरीत आवडली. अमित शहा उघड्या अंगाने भजी तळायला बसलेत आणि मोदी ऑर्डरी घेऊन पुडे बांधताहेत. मस्त व्यंगचित्र होईल. (बाजूला थारुड्या पप्पूस भजी, फाफडा व जिलबी तळतांना उत्पन्न होणाऱ्या विविध रोजगारांची व्यवच्छेदक लक्षणे समजावून सांगतोय.) ४.
जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान पटकावले हे मोठया गर्वाने पंतप्रधानांनी सांगितले, परंतू सरकारच्या कोणत्या आर्थिक निर्णयामुळे हे साध्य झाले हे पंतप्रधान सांगू शकले नाही.
तुम्हीच सांगा शासनाच्या कोणत्या आर्थिक निर्णयाने हे साध्य झालं ते. ५.
संसदेत भाषण देण्याची सवय नसल्यामुळे पंतप्रधान संसदेत नव्हे,तर एखाद्या प्रचार सभेत भाषण ठोकत आहेत असं वाटत होतं.
मोदींना संसदेत भाषण द्यायची सवय नाही म्हणता? ही त्यांची संसदेतली (मी पूर्णपणे न बघितलेली) काही भाषणे : इ.स. २०१७ : https://www.youtube.com/watch?v=JJ4puFg29oM इ.स. २०१६ : https://www.youtube.com/watch?v=rVTrl_8CCQs इ.स. २०१५ : https://www.youtube.com/watch?v=MF0hhKIe-Tw इ.स. २०१४ : https://www.youtube.com/watch?v=shK1CAivJis पप्पूने कधी उघडलंय का तोंड? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 07/25/2018 - 06:38 नवीन
कारण की सत्तेत आले तेव्हा स्विस बँकेतला काळा पैसा क्यारेबियन बँकांत जाऊन पडला होता आणि आता स्विस बँकेत भारतीयांच्या ठेवीत जी भरघोस वाढ झाली त्यातला सर्व पैसा हा काळा नाही ह्याचा साक्षात्कार सरकारला झाला, इथल्या बँकांमध्ये आपला कष्टाचा पैसा सुरक्षित राहू शकत नाही ह्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे सरकारने. असा दावा केल्याचं मलातरी आठवंत नाही. तुम्हालाच काय पंतप्रधानांनाही आता आठवत नाही, की नोटबंदी नक्की कशासाठी केली होती. तुम्हीच सांगा शासनाच्या कोणत्या आर्थिक निर्णयाने हे साध्य झालं ते. २०१४ ला भाजपला बहुमताने निवडून स्थिर सरकार दिल्यामुळे, परदेशी गुंतवणूकदारांनीं आत्मविश्वासाने येथे गुंतवणूक केली व येथील उद्योगपतींनी भाजपला भरघोस पक्षनिधी देऊन सरकारकडून बरंच काही पदरात पाडून आपला विकास साधला आहे. सरकारने कोणताही क्रांतिकारक आर्थिक बदल घडवून आणलेला नाही, तसं असतं तर ढोल बडवले असते की पंतप्रधानांनी. मोदींना संसदेत भाषण द्यायची सवय नाही म्हणता? ही त्यांची संसदेतली (मी पूर्णपणे न बघितलेली) काही भाषणे : तुम्ही ही भाषणं संपूर्ण ऐका मग ठरवा. पप्पूने कधी उघडलंय का तोंड? मी पप्पू समर्थक नाही, परंतू पप्पूच्या एका कृतीमुळे पंतप्रधान गोंधळले व त्यांच्यातला पप्पू बाहेर आला व त्यांनी संपूर्ण भाषणात दाखवून दिले की आपण पप्पूची मक्तेदारी हिरावून घेऊ शकतो आणि त्यात ते कुठेही कमी पडले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अनुप ढेरे Wed, 07/25/2018 - 12:52 नवीन
आणि आता स्विस बँकेत भारतीयांच्या ठेवीत जी भरघोस वाढ झाली
याला काय आधार. बात्म्या तर याच्या एकदम विरुद्ध सांगत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/25/2018 - 14:33 नवीन
ते म्हणजे गेली दोन तीन वर्षे ' कॉफी पिणे आरोग्यास हानिकारक आहे ' तर कधी ' कॉफी हृदया साठी चांगली असते ' असं झालं . स्विस बॅकं आणि भारतीय सरकार यांचे आकडे कधी टॅली व्हायचे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मार्मिक गोडसे Wed, 07/25/2018 - 16:37 नवीन
याला काय आधार. बात्म्या तर याच्या एकदम विरुद्ध सांगत आहेत. असेलही तसं. मागील तीन वर्ष भारतीयांच्या स्विस बँकेतील ठेवी घटल्या होत्या, गेल्यावर्षीपासून त्यात वाढ झाली. https://www.google.co.in/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/money-deposited-by-indians-in-swiss-banks-rose-to-rs-7-000-crore-in-2017-1272379-2018-06-28
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/26/2018 - 07:32 नवीन
गोडसे बुवा क्रेडिट सुईस किंवा यु बी एस (युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड) मध्ये तुम्ही मुदत ठेव ठेवलीत तर तो आपण ज्याला रूढार्थाने "स्विस बँकेत" ठेवतो तसला बेहिशबी पैसा होत नाही. गेल्या वर्षभरात असा जबाबदार (accountable) पैसे वाढला आहे. बेहिशेबी नाही. हा कोणाकडून आला आणि कसा आला याचा माग ठेवला जाऊ शकतो. समजून घेता येत असेल तर ठीक आहे नाही तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 07/26/2018 - 07:54 नवीन
क्रेडिट सुईस किंवा यु बी एस (युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड) मध्ये तुम्ही मुदत ठेव ठेवलीत तर तो आपण ज्याला रूढार्थाने "स्विस बँकेत" ठेवतो तसला बेहिशबी पैसा होत नाही बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Wed, 07/25/2018 - 07:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 07/25/2018 - 07:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/25/2018 - 14:37 नवीन
डबल बटर डबल चार्ज पडल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विजुभाऊ Wed, 07/25/2018 - 12:29 नवीन
अविश्वास ठराव आला आणि गेला. मधल्यामधे काँग्रेस ने आपली अक्कल काढून घेतली. मोदी , राहुलच्या गळाभेटीच्या काव्याला बळी पडले. जो मुद्दा अगदी किरकोळ होता त्याला अमाप प्रसिद्धी दिली गेली. अर्थात हे आपल्या अक्कल वंत मिडीयामुळे. अविश्वासाच्या ठरवाला काडिची किंमत न देता नंतर लगेचच मोदी रवांडा दौर्‍यावर गेले. दरम्यान भारताने शेसेल्स मधे सैन्य तळ उभा करण्यासाठी करार केला, श्रीलंकेत चीनच्या बंदरा शेजारचाच एक विमानतळ वापरासाठी करार केला. या काही किरकोळ आंतरराष्ट्रीय घडामोडी कोणीच छापल्या नाहीत.......
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/25/2018 - 13:14 नवीन
फ्रान्स ३२ जग्वार विमाने देणार आहे. तेही फुकटात. हे राहिले की हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मार्मिक गोडसे Wed, 07/25/2018 - 16:41 नवीन
जो मुद्दा अगदी किरकोळ होता त्याला अमाप प्रसिद्धी दिली गेली. अर्थात हे आपल्या अक्कल वंत मिडीयामुळे. मिडियापेक्षा पंतप्रधानच ह्याला जास्त जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गामा पैलवान Wed, 07/25/2018 - 14:28 नवीन
मार्मिक गोडसे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
इथल्या बँकांमध्ये आपला कष्टाचा पैसा सुरक्षित राहू शकत नाही ह्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे सरकारने.
इथल्या बँका असुरक्षित असतील तर लोकं इथेच काळा पैसा गुंतवतील ना? परदेशात कशासाठी नेतील? परत आणणं कटकटीचं झालंय. २.
तुम्हालाच काय पंतप्रधानांनाही आता आठवत नाही, की नोटबंदी नक्की कशासाठी केली होती.
नोटाबंदीची उद्दिष्टे (इंग्रजी दुवा) : http://www.sify.com/news/10-long-term-goals-of-demonetization-news-columns-qlykOnahbbgge.html इथे नक्षलवादी व अतिरेक्यांच्या मुसक्या आवळणे हा हेतू दिला आहे, मात्र काश्मीरी दगडफेकीकडे स्पष्ट निर्देश नाही. ३.
सरकारने कोणताही क्रांतिकारक आर्थिक बदल घडवून आणलेला नाही, तसं असतं तर ढोल बडवले असते की पंतप्रधानांनी.
अरे वा, म्हणजे तुम्हांस कळावं म्हणून मोदींनी ढोल वाजवले पाहिजेत की काय! मग ढोल कशाला बडवताय म्हणून टीका करायला तुम्ही मोकळे! चांगली युक्ती आहे. ४.
तुम्ही ही भाषणं संपूर्ण ऐका मग ठरवा.
काही गरज नाही. भाषणं न ऐकताच मी ठरवलंय की मोदींना संसदेत भाषणांचा अनुभव व सवय आहे. ५.
परंतू पप्पूच्या एका कृतीमुळे पंतप्रधान गोंधळले व त्यांच्यातला पप्पू बाहेर आला व त्यांनी संपूर्ण भाषणात दाखवून दिले की आपण पप्पूची मक्तेदारी हिरावून घेऊ शकतो आणि त्यात ते कुठेही कमी पडले नाही.
व्हेरी गुड. पीएचडीच्या प्रबंधात पप्पूला स्पेलिंग मिस्टेक सापडली. त्यावरून त्याने आपण प्रबंधकर्त्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचा दावा केला. तो पप्पूच्या बुद्धीप्रमाणे बरोबर आहे. तस्मात चिंता नसावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 07/25/2018 - 16:43 नवीन
इथल्या बँका असुरक्षित असतील तर लोकं इथेच काळा पैसा गुंतवतील ना? परदेशात कशासाठी नेतील? परत आणणं कटकटीचं झालंय. तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 07/25/2018 - 20:24 नवीन
मा.गो., काळा पैसा परदेशात कशासाठी न्यायचा? तो केव्हाही भारतात परत अंत यावा म्हणून ना? पण तो तसा आणणं जिकिरीचं झालं तर परदेशी नेण्यात काय अर्थ? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 07/25/2018 - 21:37 नवीन
पण तो तसा आणणं जिकिरीचं झालं तर परदेशी नेण्यात काय अर्थ? २००७ पासून p-notes सारखी बिळे हळू हळू बंद केली होती. त्यामुळे तेव्हाही परदेशातून काळा पैसा येथे आणणे कठीण झाले होते की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Wed, 07/25/2018 - 16:23 नवीन
पीएचडीच्या प्रबंधात पप्पूला स्पेलिंग मिस्टेक सापडली. त्यावरून त्याने आपण प्रबंधकर्त्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचा दावा केला. तो पप्पूच्या बुद्धीप्रमाणे बरोबर आहे. तस्मात चिंता नसावी. LLRC
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा