Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !!

अ
अभिजित - १
Wed, 08/15/2018 - 10:28
🗣 80 प्रतिसाद
FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !! आत्ता राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदींना हे विधेयक माघारी घ्यावे लागले. बरीच राज्य जिंकल्या मुळे आता हळूहळू राज्यसभेत भाजपचे बहुमत निर्माण होत आहे. आता प्रश्न आहे फक्त २०१९ चा !! तर आपण सर्वानी भाजप ला प्रचंड मतांनी विजयी करू या. म्हणजे भाजप हे विधेयक पास करू शकेल. आपल्या खिशाला थोडा चुना लागला तरी काय हरकत आहे ? मोदींचे स्वप्न पूर्ण करणे हे आपलेच घरचे कार्य आहे !! अजून एक - आता यापुढे देशात कोणतेही इतर सरकार येणारच नाहीए मुळी !! फक्त भाजप एके भाजप !! त्या मुळे या विधेयकाचा भविष्यात कोणी गैर वापर करेल हि शंकाही मनात बाळगू नका !! थोडी जुनी माहिती वाचा. FRDI + bail in यावर मोदी सरकार ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीपेक्षा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. किंबहुना यामुळे सर्वसामान्य बँक खातेदाराची कधीही नोटाबंदी होऊ शकते. या विधेयकाला केंद्र सरकारने जून २०१७ मध्ये मंजुरी दिली आहे. बुडित खात्यात गेलेल्या बँकांना यामुळे दिलासा मिळेल. मात्र याचा फटका बँकांच्या ग्राहकांना सोसावा लागेल. ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’मुळे अनेकांच्या मनात भीतीची भावना आहे. यामुळे बँक बुडत असल्यास, त्यांच्याकडून ग्राहकांचा पैसा वापरला जाऊ शकतो. सर्वसामान्य बँक खातेदारांचा पैसा परत करण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल. हा कायदा बँकांसाठी तसा नवीन नाही. १९६१ मध्ये संसदेने ‘डिपॉजीट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ कायदा मंजूर केला होता. या कायद्यामुळे बँक बुडित खात्यात गेल्यास, बँक ग्राहकांना जास्तीत जास्त १ लाख रुपये खातेदारांना देणे लागते. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा अधिक रक्कम असल्यास, ती संपूर्ण रक्कम बँक आपल्या ताब्यात घेऊन तिचा वापर करु शकते. मोदी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणल्यास बँकांना जास्त अधिकार मिळतील. यामुळे सरकारी बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ होईल. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसेल. यामुळे बँकांना ‘बेल-इन’चा अधिकार मिळेल. त्यामुळे बुडणाऱ्या बँकांना थेट खातेधारकांचा पैसा वापरता येईल. ‘बेल-इन’मुळे खातेधारकांचे त्यांच्या खात्यावर कोणतेही नियंत्रण राहणार नाही.

प्रतिक्रिया द्या
26561 वाचन

💬 प्रतिसाद (80)
ट
टवाळ कार्टा Wed, 08/15/2018 - 15:23 नवीन
२०१९ मध्ये जर भाजप सरकार जाउन दुसर्या कोणत्याही पक्षाचे सरकार आले तर हे विधेयक कधीही येणार नाही याची खात्री आहे का? ;)
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ गुरुवार, 08/16/2018 - 14:08 नवीन
इतका अगतिक रिप्लाय !! मला वाटलं कि हे विधेयक कसे छान आहे / गोड आहे हे सांगणारे प्रतिसाद इथे कोसळतील. बहुतेक भक्तांना पण आता आपल्या भक्तीतील फोलपणा जाणवु लागला आहे !! ते जाऊ दे. तुझे मत काय आहे या विधेयकावर ते सांग कि . आणि राहिली २०१९ ची बात , तर गदिमा गीत रामायणात ५० वर्षांपूर्वीच सांगून गेले आहेत - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !! आपण हे रोज अनुभवतोच आपल्या जीवनात. त्या मुळे तु म्हणतो तशी खात्री कसलीच देता येत नाही. तरीही आत्ता तरी आपली बँक FD / पैसे, विमा returns आपल्या स्वाधीन आहेत / आपल्या हातात आहेत. मोदी सरकार ते अधिकार काढून घेऊ बघत आहेत. तरीही त्यांनाच परत २०१९ मध्ये आपल्या डोक्य्वर बसवणे हे तुला चांगले वाटत असेल तर जरूर तसे कर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अमर विश्वास गुरुवार, 08/16/2018 - 14:26 नवीन
FRDI बिलाबद्दल बरेच गैरसमज आहेत काही प्रश्न .. १. सध्या सामान्य ठेवीदार सुरक्षित आहेत का? फक्त १,००,०००/- रुपयांच्या ठेवीचा विमा असतो ... त्यापुढच्या ठेवी "unsecured" प्रकारात येतात. FRDI मध्ये यात कोणताही बदल नाही २. FRDI bill proposed to elevate status of deposits above unsecured creditors. या बद्दल आपले काय मत आहे? 3. FRDI bill proposed for any actions, consent of the depositors is mandatory for the banks या बद्दल आपले काय मत आहे? कृपया खालील व्हिडिओ पहावा ... https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/watch-finmin-assuages-concerns-over-frdi-bill/videoshow/61967803.cms
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ गुरुवार, 08/16/2018 - 14:37 नवीन
bail in विषयी मत मांडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास गुरुवार, 08/16/2018 - 14:48 नवीन
आधी वरच्या मुद्यबद्दल तर बोला :)
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 08/16/2018 - 14:50 नवीन
About Bail in clause : The government has clarified that the bail-in clause will not be used for public sector banks (PSBs). It also reiterated its implicit guarantee of PSB solvency. In other words, it said that it “stands ready” to bail-out the PSBs if needed, removing the need for a bail-in. Equally important, the statement said that the cancellation of the liability of a depositor beyond the insured amount cannot take place without his or her prior consent. So, the bail-in clause can only be used in private banks, and that too only if the customers allow it.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ गुरुवार, 08/16/2018 - 15:03 नवीन
धन्यवाद !! वरील माहिती ची वेब लिंक देऊ शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास गुरुवार, 08/16/2018 - 15:08 नवीन
वेब लिंक https://www.thehindu.com/business/Economy/clearing-the-air-on-the-bail-in-clause/article22360662.ece
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 08/17/2018 - 14:03 नवीन
हि हिंदू ची लिंक. माहिती देणारा माणूस जे सांगतोय त्याला आधार काय ? साफ चुकीची वाटते. हे सगळं FRDI बिल मध्ये आहे का ? under which section ? उलट हि लिंक वाचा. त्याच्यात कुठेही PSB चा उल्लेख नाही. https://scroll.in/article/860982/should-indians-be-worried-about-the-safety-of-their-bank-deposits-what-we-know-and-what-we-dont This proposal has a provision for a “bail-in” to ensure that a country’s economy is not destabilised in the event of a big default by a large bank(s). कोणत्या मोठ्या बँक ? icici बुडाली तर तिची आणि तिच्या शेअर होल्डर ची जबादारी आहे. जनतेची किंवा सरकारची नाही. कि इथे SBI / PNB इ इ म्हणायचे आहे ? जे म्हणू शकत नाही खुल्ला , म्हणून फक्त large बॅंक्स म्हटलंय ?? Here is where the concept of the bail-in comes into force through section 52 of the FRDI Bill. A bail-in is opposite of a bail-out and .... ( read link for more details ) The Bill however makes it clear that the bail-in clause will not apply to the insured deposits and several other categories. “The bail-in instrument or scheme under this section shall not affect (a) any liability owed by a specified service provider to the depositors to the extent such deposits are covered by deposit insurance; (b) any liability that the specified service provider has by virtue of holding client assets.“ कुठेही PSB चा उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
स
सुबोध खरे गुरुवार, 08/16/2018 - 15:43 नवीन
आर्थिक बाबींबद्दल मला फारसे कळत नाही परंतु १९६१ साली एक लाख रुपये पर्यंतची मुदत ठेव विम्याने सुरक्षित केलेली आहे या एक लाखाची रक्कम आता चलन फुगवटा पाहता कमीत कमी १० लाख तर असायला हवी. (खरं तर आता चलन फुगवटा पाहता हि रक्कम २५ लाख असायला हवी.) कारण आज मितीस बहुसंख्य वरिष्ठ नागरिक आपली जमा पुंजी वेगवेगळ्या बँकेच्या मुदत ठेवीत ठेवून असतात आणि बऱ्याच जणांचा चरितार्थ त्याच्या व्याजातूनही चाललेला दिसतो.( बँक गाळात चालली आहे अशी बातमी आली तर खात्यातून पैसे काढायला बँकेसमोर असणाऱ्या रांगेत ९० % वरिष्ठ नागरीक असलेले दिसतील)
  • Log in or register to post comments
N
NiluMP गुरुवार, 08/16/2018 - 17:07 नवीन
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
साहना गुरुवार, 08/16/2018 - 20:06 नवीन
+१ खरे तर ह्या मुद्यावर देशांत जास्त चर्चा व्हायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजित - १ Fri, 08/17/2018 - 14:07 नवीन
हे जरूर करू शकले असते सरकार. मग लोकांचा हि इतका विरोध झाला नसता. पण मग त्याचा विमा , त्या बॅंक्स ना दसपट ( किंवा आत्ता पेक्षा खूप जास्त पडेल ) हे नक्की !! म्हणून ते सरकार ला करायचे नाहीए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
N
Nitin Palkar Sat, 08/18/2018 - 16:19 नवीन
+१०००१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Sat, 08/18/2018 - 17:59 नवीन
मी जे काही म्हणतो आहे ते रूपी बँक समोर ठेऊन समजून घेतले तर समजू शकेल. तसेच २०१९ साली कोणतेही सरकार आले तरी माझ्या म्हणण्यात काहीही बदल होणार नाहीये कारण देशाचे आर्थिक प्रश्न सोडवताना कसा विचार केला जातो ते मी मांडत आहे. १० लाख फार होतात. म्हणजे तस झाल तर मला फारच आवडेल. त्यात माझा नक्कीच फायदा होईल. तरीही असे निकष ठरवताना जे कोणत्याही प्रकारची घट सहन करूच शकणार नाहीत असे बाजूला काढायला लागतात. उदा. रूपी बँकेतले ५,७४,३२९ बाजूला काढताना कोणाला त्रास द्यायचा हे ठरवणे यात ३०००० जणांना थोडे फार नुकसान सोसायला लागले तरी चालेल असा विचार असतो. हे उरलेले असे असतात की, अशा त्रासामुळे ते एकदम रस्त्यावर येण्याची शक्यता अजिबात नसते. काही त्याला अपवाद असू शकतील पण त्याला इलाज नसतो. समजा खरे साहेबांची रूपी बँकेतली ठेव १० लाख आहे. त्यातले १० टक्के कापून घेतले तर ते रस्त्यावर येणार नाहीत. मात्र त्यामुळे ५,७४,३२९ लोकांना दिलासा मिळणार आहे. पण जर १० लाख मर्यादा केली तर मात्र १०० माणसे उरतील व त्यांचे सगळेच्या सगळे पैसे काढून घेऊनही प्रश्न सुटण्याएवढे पैसे उभे राहतील असे वाटत नाही. मला वाटते काही थोड्या लोकांकडून सगळेच्या सगळे काढून घेण्याऐवजी अनेकांकडून थोडेसे काढून घेणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश गावडे गुरुवार, 08/16/2018 - 17:15 नवीन
खातेदारांना नेमका काय त्रास होणार आहे हे कळलं नाही. म्हणजे मी एखाद्या बॅंकेत खाते उघडून दहा हजार ठेवले आणि दोन महिन्यांत ती रक्कम काढायला गेलो तर बॅंक असे काही म्हणू शकेल का की आम्ही तुमचे पैसे दुसरीकडे वापरलेत तर सध्या आमच्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, तुम्ही दोन महिन्यांनी या?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/16/2018 - 18:02 नवीन
खरे म्हणजे ह्या सर्व शेवटच्या पायरीवरच्या गोष्टी आहेत. जेव्हा बँक व्यवस्थित चालू असते तेव्हा हे सगळे मुद्दे गैरलागू आहेत. पण जेव्हा एखाद्या बँकेची रूपी सारखी अवस्था व्हायला लागते तेव्हा १. प्रथम आर बी आय त्या बँकेला नवीन कर्ज देण्यास बंदी घालते. २. त्यानंतर त्यांच्या खर्चावर बंधन घालते ३. नवीन लोक नोकरीवर घ्यायला बंदी घालते. तरीसुध्दा बँकेची स्थिती खालावतच गेल्यास ४. बँकेतून एकावेळी किती पैसे काढावयाचे यावर मर्यादा घातली जाते. यानंतर मग या कायद्यात दिलेल्या तरतूदी लागू होणार असतात. यावेळेस बँकेची अशी अवस्था असते की, सगळ्यांचेच पैसे अडकलेले असतात. फक्त कागदोपत्री ते त्यांच्या नावावर असतात. हा कायदा आला म्हणून बोंबाबोंब होणार आहे किंवा हा कायदा आला नाही तर लोकांना पैसे मिळण्याची शक्यता वाढणार आहे असे काहीही नाही. या साठी विचार करताना रूपी बँक डोळ्यासमोर ठेऊन विचार केल्यास या कायद्याची निट कल्पना येईल. मला जेवढे कळले आहे तेवढे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभिजित - १ Fri, 08/17/2018 - 14:12 नवीन
FRDI आले कि सर्व झंझट करावेच लागणार नाहीत. आणि आता इथे SBI घ्या. २ लाख कोटी रु NPA !! सरकार कंटाळले आहे परत परत तिला मदत करून. आता हि बसवा FRDI बेल इन मध्ये. ना कसली बंदी, ना काही त्रास. सरळ depositors च्या खिशात हात घालायचा. काम तमाम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
अ
अमर विश्वास Fri, 08/17/2018 - 14:55 नवीन
अभिजात सर ,,, कृपया माझे आधीचे प्रतिसाद बघा .... तसेच तुम्ही पाठवलेल्या लिंक मधील पहा .... SBI ही पब्लिक सेक्टर बँक आहे ... त्यामुळे सरकार बँकेला मदत करण्यास बांधील आहे ... खाली तुम्ही दिलेल्या लिंक मधले उतारे देत आहेत ... कृपया FRDI मुळे सरळ depositors च्या खिशात हात घालायचा.अशी विधान करण्यापूर्वी थोडा विचार करा हि विनंती खालील उतारे हे तुम्ही दिलेल्या लिंक मधलेच आहेत : To make it clear, from a depositor’s point of view, the risk profile has not changed substantially According to the Bill, the Resolution Corporation, in consultation with the respective regulators (e.g. the Reserve Bank of India for banks, and Insurance Regulatory and Development Authority for insurance companies) will specify criteria for classifying service providers based on their risk of failure. The five categories are “low, moderate, material, imminent and critical”. Out of these five categories, the threat to a depositor’s unsecured deposits only comes in when a institution is categorised as critical. The corporation will undertake its resolution by using options which include: (i) transfer of its assets and liabilities to another person, (ii) merger or acquisition, and (iii) liquidation, among others. Financial Resolution and Deposit Insurance Bill has clearly laid out procedures on how the proceeds from the sale of assets should be distributed. Though unsecured deposits will have to take a haircut if the sale of assets are not enough to meet all categories of claims, the remaining amount will be disbursed proportionately within each class of claims as mentioned above.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 13:44 नवीन
the threat to a depositor’s unsecured deposits only comes in when a institution is categorised as critical. मला तरी हे सगळे वाचुन, PSB बँक बेल इन च्या कक्षेबाहेर आहेत हे कुठेही दिसत नाही. उदा . - SBI, २ लाख कोटी रु NPA . पण तरीही सरकार तीची category क्रिटिकल नाही त्यामुळे ती बेल इन लावणार नाही ??? केवळ प्रेमात अंध झालेला माणूसच असे म्हणू शकतो. अवांतर - काँग्रेसने बेफाम कर्ज वाटली. बँक NPA वाढत गेले. मान्य आहे. अरे पण मग २०१४ मध्ये सगळे काही सुतासारखा सरळ करू, असं बोलणार माणुस , करू तर काहीच शकला नाही. आणि आता सिस्टिम लाईन वर आणण्या करता बँक ग्राहकांच्या खिशात हात घालू बघत आहे. FRDI आणून. आणि तरीही समर्थक शाब्दिक खेळ खेळुन , PSB यात कशा बळी पडणार नाहीत हे सर्वसामान्य जनतेच्या गळी उतरवू बघत आहेत. याचे वाईट वाटते. मागचं २ लाख कोटी रु. चे बँक recap केल्यावर जेटली म्हणाले होते. आता सरकार कडून अधिक मदतीची अपेक्षा करू नका. गेले २ दिवस ती लिंक शोधतोय. TOI किंवा ET ची. मिळत नाहीए. मिळाली तर टाकेन. मिपा कर नी पण शोधून बघावी. हे सगळे जेटली कशाच्या जोरावर बोलत होते ? अर्थात - FRDI बेल इन पस करूच या आत्मविश्वासा वर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
ज
जेम्स वांड Fri, 08/17/2018 - 09:46 नवीन
कारण त्यांनी धाग्याला एक समतोल आणला. एरवी केवळ मोदी/भाजप विरोधी वाटावा असे एकंदरीत लेखन ह्या धाग्यात होते. धागाकर्त्यांच्या राजकीय अवडीनिवडीवर टिप्पणी करण्याची हौस नाहीये पण जेव्हा लोकांच्या पैश्यासंबंधी, किंवा ग्राहक-बँक संबंधी विषयांवर कॉमेंट करणारा लेख लिहिला जातो तेव्हा समतोल लेखन अपेक्षित असते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 08/17/2018 - 22:08 नवीन
तुम्हाला बँका कश्या काम करतात याची कितपत माहिती आहे? तुमचा लेख नुसताच एकतर्फी नाही तर हे बिल म्हणजे फक्त ठेवीदारांच्या ठेवींवर डल्ला मारण्यासाठी आहे अश्या ठाम समजुतीने लिहिलेला आहे. या बिलात bail in हाच एक मुद्दा आहे का? संतुलितपणे लिहायचं असेल तर बिलाचे चांगले आणि वाईट दोन्ही मुद्दे लिहायला पाहिजेत. तुम्हाला हिंदू वृत्तपत्रात लिहिलेलं साफ खोटं वाटतंय पण स्क्रोल या वेबसाईट वर लिहिलेलं मात्र संपूर्ण सत्य वाटतंय यातच सगळं आलं! काही साधे सरळ प्रश्न... आणि तुम्हाला कदाचित माहित नसतील किंवा देताना त्रास होईल म्हणून मीच उत्तरे सुद्धा देतो. १. बँक कर्जवाटपासाठी पैसा कुठून आणते? - बँकेचे स्वतःचे थोडे भागभांडवल असते पण कर्जवाटपासाठी मुख्य स्रोत हा बँकेतील ठेवी हाच असतो. २. बँक त्यांच्याकडील सर्व ठेवींएवढे कर्ज देऊ शकते का? - नाही. सर्वसाधारणपणे ठेवींच्या ७०-७२ टक्के कर्ज देता येते. रोख तरलता ठेवण्यासाठी उर्वरित भागातील रक्कम ठेवायला लागते तसेच सरकारी रोख्यांमध्ये वगैरे काही टक्के गुंतवायला लागतात. त्यामुळेच जर का काही मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढायला गेलात तर ती सहज उपलब्ध होते. एखाद्या अतिशय सुस्थितीतील बँकेत तुमचे १० लाख रुपयांचे ठेव खाते आहे आणि मुदतीपूर्वी तुम्ही ते काढायला गेलात तर बँक तुमच्याकडून १० लाख रुपये रोख द्यायला वेळ मागून घेते. कारण तेवढ्या रोखीची सोय करायला लागते. ३. कर्ज बुडीत कधी आणि कसे होते? - कर्ज देताना बँक त्यांच्या आखून दिलेल्या नियमांनुसार छाननी करते. त्यामुळे आज कर्ज दिलं आणि लगेच ४-६ महिन्यात ते बुडीत निघालं असं सहसा होत नाही. अगदीच बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्ज घेणाऱ्याने संगनमत करून केलं तर शक्य आहे पण मग तो घोटाळा मानला जातो. एखादा हप्ता जरी चुकला तरी बँक खातेदाराच्या मागे लागते. सर्वसाधारणपणे जर ६ महिने हप्तेच भरले नाहीत तर ते खातं NPA मध्ये धरलं जातं. मग त्याच्या कडून कर्जवसुलीचे प्रयत्न चालू होतात. म्हणजे restructuring करून देणे, मुदत वाढवून नवीन हप्ता कमी करून देणे ईई. अगदीच खातेदाराने सहकार्य करायला नकार दिला तर तारण ठेवलेल्या मालमत्ता जप्त करणे, गॅरेंटर कडून वसुली करणे हे सुरु होते. पण ही खाती बुडीत म्हणून निघायला काही वर्षांचा कालावधी लागतो. ४. बँक कश्यामुळे बुडायला लागते? वर भागवत साहेबांनी रुपी बँकेचं उदाहरण दिलंय. काय झालं या बँकेत माहित आहे? सहकारी बँक असल्याने संचालक मंडळाने आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे लागेबांधे असणाऱ्या लोकांना कर्ज दिली. कालांतराने जेव्हा ही कर्जे थकीत होऊ लागली तेव्हा इतर पर्याय शोधून थकीत न दाखवण्याचा प्रयासही करून झाला. पण मग लायकी नसलेल्या आणि ज्यांची कर्ज बुडवण्याचीच वृत्ती होती अश्या लोकांना कर्ज दिल्यामुळे वसुलीला खूप त्रास झाला. यात फेब्रुवारी २००२ मध्ये रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमण्याचे जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी हजारो ठेवीदार ठेवी काढायला आले. एवढे पैसे लगेच रोख स्वरूपात परत करणे रुपीलाच काय कुठल्याही बँकेला शक्य झाले नसते. कर्मचारी सतत आठवडाभर प्रचंड लोंढ्याला तोंड देत होते, लोकांना समजावून सांगत होते. काही लोकांनी ऐकले तर काहींनी नाही. ज्यांना पैसे पाहिजेच होते त्यांना पैसे द्यायला लागलेच. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली. का ढासळली? तर ठेवीदार मागतील तेव्हा ठेव परत करण्याचे बंधन बँकेवर असते. पण हेच कर्जाच्या बाबतीत आहे का? कर्ज घेणारा व्यक्ती असो वा संस्था, पैसे परत देण्याच्या बाबतीत टाळाटाळच करतात. मग जर ५०-६०% ठेवी परत करायला लागत असतील तर बँक पैसे कुठून आणणार? ५. याचा ठेवीदारांवर काय परिणाम झाला? बहुतांशी ठेवीदारांच्या ठेवी अडकून बसल्या. फेब २००२ नंतर काही महिन्यांनी कमी रकमेच्या ठेवी परत मिळू लागल्या. पण कालांतराने ते पण कमी झाले. अगदी तुम्हाला गरज आहे आणि ते तुम्ही सिद्ध करू शकलात तरच तुम्हाला पैसे परत मिळत होते. त्यासाठी सुद्धा मुख्य कचेरीकडून परवानगी मिळाल्यावर मिळतात. आता त्या गोष्टीला १६ वर्ष झाली, पण परिस्थिती काही सुधारली नाही. कारण कर्जवसुली थोड्याफार प्रमाणात झाली पण संपूर्ण वसुली होणे शक्यच नाही. ६. मग यावर उपाय काय? एक तर कर्ज देण्याचे नियम अतिशय कडक असावेत. पण मग त्याचा "त्रास" कर्ज घेणाऱ्या सगळ्यांनाच होतो. जरी अगदी अतिशय चांगली फायद्यात चालणारी कंपनी असली तरी ती जर बाजाराच्या बदलत्या परिस्थितीत टिकली नाही तर ती कर्ज फेड करू शकत नाही. मग अश्या परिस्थितीत काय करणार? यापेक्षा उलट म्हणजे काही लोक/ संस्था पैसे असले तरी परतफेड करायला टाळाटाळ करतात. यांना willful defaulters म्हणतात. या दोन्ही वर्गांतील लोकांसाठी कडक नियम असणे जरुरीचे आहे. तात्पर्य: कुठलेही पैश्याचे व्यवहार करताना धोका असतोच. बँकेत ठेवले म्हणून १००% सुरक्षित आहेत याची काहीच गॅरंटी नसते. DICGC कडून प्रतिव्यक्ती १ लाख ठेवीचा विमा असतो, त्याला या विधेयकात हात लावलेला नव्हता. लोकही आजकाल सज्ञान झाले असल्याने आपल्या ठेवी विभागून ठवण्याची काळजी घेतात. या विधेयकाला एवढा कडाडून विरोध करताय, मग एखादी साप भी मरे और लाठी भी ना टूटे अशी योजना सांगा बघू. नुसता टीका करणारा लेख टाकण्यापेक्षा नक्की काय चुकलंय आणि त्याला कुठले चांगले पर्याय आहेत असा लेख असेल तर त्यावर चर्चा ही चांगली होते. जरी आपल्या चर्चा करण्याने काही होणार नसलं तरी माहितीत तर भर पडते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/18/2018 - 10:52 नवीन
सुंदर समतोल आणि माहितीपूर्ण प्रतिसाद ! खास म्हणजे, या विधेयकाला एवढा कडाडून विरोध करताय, मग एखादी साप भी मरे और लाठी भी ना टूटे अशी योजना सांगा बघू. नुसता टीका करणारा लेख टाकण्यापेक्षा नक्की काय चुकलंय आणि त्याला कुठले चांगले पर्याय आहेत असा लेख असेल तर त्यावर चर्चा ही चांगली होते. जरी आपल्या चर्चा करण्याने काही होणार नसलं तरी माहितीत तर भर पडते. हा तर सगळ्यांनी सगळ्याच वादविवादांत लक्षात घ्यायला हवा असा मुद्दा आहे. ज्याला विरोध करत आहोत, त्याला त्यापेक्षा चांगला पर्याय सुचवता येत नसेल, तर तो विरोध केवळ "विरोधासाठी विरोध" या सदरात गणला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
शाम भागवत Sat, 08/18/2018 - 13:56 नवीन
चांगला प्रतिसाद. हाच विचार जरा पुढे नेऊ या. रूपी बँक डोळ्यासमोर ठेवून विचार करायचा प्रयत्न करूया. कारण अशा परिस्थितीतच ह्या कायद्याचा उपयोग केला जाणार आहे. समजा रूपी बँकेत कित्येक लाखांच्या ठेवी असलेले काही श्रीमंत ठेवीदार आहेत. अशा ठेवी एकत्रीत रित्या समजा १००० कोटी आहेत. पण यांना त्या ठेवी परत मिळत नाहीयेत व व्याजही मिळत नाहीये. या कायद्याच्या तरतूदी अंतर्गत, जर समजा यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या ठेवीच्या १० टक्के पैसे सोडून दिले तर आम्ही तुम्हाला ९०० को टी टप्याटप्याने परत देऊ. तर कितीजण तयार होतील? मला वाटते सगळेच तयार होतील. आता हे उरलेले ९० टक्के टप्याटप्याने परत कसे देता येतील? हा व्यावहारीक मुद्दा कसा सोडवता येईल? तुम्ही जर या बँकेबद्दलच्या बातम्या वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात आले असेल की ह्या बँकेचे विलिनीकरण करण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही (कारण, मिळणारी मालमत्ता व त्याबदल्यात येणार्‍या जबाबदार्‍या यांचे प्रमाण पाहाता हा सर्व व्यवहार आतबट्याचा होऊ शकतो.) मात्र आता ही जबाबदारी या श्रीमंत लोकांमुळे १०० कोटींनी कमी झालेली असल्याने पूर्वीपेक्षा विलिनीकरणाचा असा व्यवहार होण्याची शक्यता वाढीस लागते. बँकेतल्या ठेवीदाराचे नुकसान होऊ नये किंवा कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी बँक विलिनीकरण हा एकमेव पर्याय असतो. (बँकेने दिवाळखोरी जाहीर केल्यास सगळेच जण झोपण्याची शक्यता असते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 14:11 नवीन
रुपी , CKP , अमुक तमुक अर्बन असल्या फालतू बँक मध्ये शहाणे / अर्थसाक्षर लोक पैसे ठेवत नाहीत. ते SBI , UBI इ इ PSB मध्ये ठेवतात. अर्धा / एक टक्का व्याज कमी मिळाले तरी चालेल, मुद्दल , ठेव सुरक्षित असते. निदान आजपर्यंत तरी होती . ( तुमच्या भाषेत - गेली ७० वर्षात !! ) आता त्याच्यावर चाय / सामोसा वाले लोक येऊन डल्ला मारू बघत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Sat, 08/18/2018 - 14:50 नवीन
हा धागा काढल्याबद्दल अभिजित - १ यांचे अभिनंदन. अनेक लोकांना हा अवघड विषय स्पष्ट होण्यास मदत झाली. व्हॉटसअ‍ॅप पेक्षा म्हणूनच मला अशी संकेतस्थळे आवडतात. बरीच उलटसुलट माहिती समोर येते. जे लोक कुढल्याच पक्षाचे नसतात त्यांना दोन्ही बाजू कळल्यामुळे नक्की काय चालले असावे याचा अंदाज येतो. ही जी काठावरची हुषार लोक असतात त्यांचीच मते नेहमी निर्णायक ठरत असतात. असो. आपली लोकशाही प्रगल्भ होवो. नेहमी चांगली माणसे निवडून येवोत. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 14:55 नवीन
धन्यवाद. मी फक्त स्वपक्षाचा - माझा खिसा फक्त माझा आहे हा पक्ष :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Sat, 08/18/2018 - 15:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
श
शाम भागवत Sat, 08/18/2018 - 14:47 नवीन
मी एक लिंक देत आहे. ही लिंक दैनीक सकाळची आहे. दैनीक सकाळ हा मोदी सरकार धार्जिणा नसावा असे वाटते. त्यातील माहितीचा उपयोग मी मांडलेला मुद्दा समजून घेण्यासाठी होतो आहे का ते पहावे. रूपी बँकेचे एक लाख रुपयांपर्यंतचे ठेवीदार - ५,७४,३२९ एकूण रक्कम - ५९६ कोटी रुपये एक लाखापेक्षा जास्त रकमेचे ठेवीदार - ३०,००० एकूण रक्कम - ८१५ कोटी रुपये या श्रीमंत ठेवीदारांनी जर १ टक्का सोडला तर ८.१५ कोटी होतात. बँकेची स्थितीपाहून किती टक्के हे ठरवता येऊ शकते. पण या सगळ्यासाठी तशी तरतूद कायद्यात असली पाहिजे. (नाहीतर वारसा हक्काने सर्व ठेवीदारांचे हक्क त्यांच्या पश्चात, त्यांच्या मुलाबाळांना मिळणार आहेतच. हे वाक्य कृपया हलके घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
अ
अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 14:48 नवीन
PSBs excluded from FRDI Bail In यावर भक्तांचा अपार विश्वास आहे. त्यांची गोष्ट वेगळी. पण सर्वसामान्य जनता , जिला स्वतःच्या पैशाची फिकीर आहे ती मात्र वेगळा विचार करणारच. तेच या लिंक मध्ये दिसतेय. https://www.moneylife.in/article/frdi-bill-if-depositors-move-out-of-psbs-who-will-finance-smes-farmers-and-infrastructure/52425.html FRDI Bill: If depositors move out of PSBs who will finance SMEs, farmers and infrastructure? Debashis Basu 11 December 2017
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sat, 08/18/2018 - 16:03 नवीन
अभिजित सहेब PSBs excluded from FRDI Bail In असे वरील कुठल्याही प्रतिसादात लिहिलेले नाही ... आपला मात्र SBI बुडणार यावर ठाम विश्वास दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
N
Nitin Palkar Sat, 08/18/2018 - 16:36 नवीन
अभिजित - १ यांचे अभिनंदन... कारण त्यांनी हा धागा काढल्यामुळे सुबोध खरे, शाम भागवत, ट्रेड मार्क, डॉ, सुहास म्हात्रे यांचे प्रतिसाद वाचायला मिळाले.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/18/2018 - 17:36 नवीन
आपला मात्र SBI बुडणार यावर ठाम विश्वास दिसतोय भाजपा २०१९ ला परत बाजी मारणार याची धडकी भरलेली आहे !! अगतीक झालेत !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 08/19/2018 - 02:53 नवीन
रुपी , CKP , अमुक तमुक अर्बन असल्या फालतू बँक मध्ये शहाणे / अर्थसाक्षर लोक पैसे ठेवत नाहीत. हा तर्क हास्यास्पद आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या धाग्यात मूळ मुद्दा गरिबांचे पैसे हा होता. गरीब माणूस अर्थसाक्षर आहे का नाही, शहाणा आहे का मूर्ख हा प्रश्न येतो कुठे? दुसरी गोष्ट म्हणजे जर बँक बुडीत निघाली तर पैसे सगळ्यांचेच बुडणार आहेत. रूपाचे उदाहरण क्लासिक आहे, एक मोठी नावाजलेली बँक डबघाईला आल्यावर काय होतं हे प्रत्यक्ष समजतंय. आत्तापुरता अर्बन/ सहकारी का PSB, ठेवीदार अर्थसाक्षर का निरक्षर, शहाणा का मूर्ख हे मुद्दे बाजूला ठेवा. कुठलेही गॉगल, चष्मे असतील तर ते काढून संपूर्ण पणे न्यूट्रल नजरेने मी काय लिहितोय ते वाचा. बेल इनचा नियम लागू नसताना सुद्धा २००२ पासून ठेवीदारांचे पैसे अडकून बसले आहेत. अतिशय गरज असेल तरच यातले थोडे किंवा गरजेइतके पैसे पूर्वपरवानगीने आणि तुमची गरज सिद्ध केल्यावर केल्यावर मिळू शकतात. आता बँक का डबघाईला आली तर कर्ज घेणाऱ्यांनी परतफेड केली नाही म्हणून, पण पैसे कोणाचे अडकले तर ठेवीदारांचे, हो की नाही? तर जर कर्ज घेणाऱ्यांकडून वसुली झाली तर हा तिढा सुटू शकेल की नाही? पण सध्या वसुलीसाठी कोण प्रयत्न करतं? तर फक्त बँक किंवा वसुली एजंट, म्हणजे थोडक्यात गुंड. हे लोक कितपत वसुली करू शकतात असं तुम्हाला वाटतं? गाडीचा हप्ता भरला नाही म्हणून सामान्य माणसाची गाडी ओढून आणण्यापलीकडे हे लोक काय करू शकतात? समजा रुपी बँकेने एका उद्योगाला ४ कोटींचं कर्ज दिलं होतं. हे पैसे आले कुठून तर हजारो लोकांनी छोट्या ठेवी ठेवल्या होत्या त्याचा वापर झाला. सुरुवातील फायद्यात असणारा आणि हप्ते व्यवस्थित भरणारा तो उद्योग काही कारणाने तोट्यात चालायला लागला. हप्ते थकायला लागले. मूळ ४ कोटी असलेले कर्ज वाढीव दराच्या चक्रवाढ व्याजाने ६ कोटींवर गेले. यात बँकेचे अधिकारी किंवा वसुली एजंट काय कारणार आहेत सांगा? रोज त्या कंपनीमध्ये जाऊन वसुलीचा तगादा लावणे? कालांतराने लवादाकडे केस करून प्रॉपर्टी जप्तीची नोटीस मिळवणे? याने प्रश्न सुटतो का? लक्षात घ्या की प्रॉपर्टी जप्तीची नोटीस आणली की कारखाना (चालू असेल तर) बंद होतो. थोडक्यात जे काही उत्पन्न होत असेल थोड्याफार प्रमाणात चालू असण्याने ते पण बंद होते. कालांतराने बँक अश्या प्रॉपर्टीज लिलावात काढते. तसेही बँक लिलाव करते म्हणजे लोक किंमत पाडून मागतात, त्यात चालू नसलेला कारखाना म्हणजे गंजलेल्या मशिन्स, त्यामुळे अजून किंमत कमी होते. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हा धंदा करणारे पण लोक आहेत, जे लिलावात कमी किमतीत प्रॉपर्टीज विकत घेतात आणि नंतर वाढीव किमतीत विकतात. अगदी घर जरी जप्त केले असेल तरी ते सील केले जाते, म्हणजे खरेदीदाराला बहुतांशी वेळेला आतून घर कसे आहे हे बघता येत नाही, त्यामुळे लोक बरीच डागडुजी करायला लागेल हे गृहीत धरून कमी बोली लावतात. २००८ च्या मंदीनंतर जगभरात बऱ्याच देशांमध्ये हा प्रॉब्लेम प्रकर्षाने जाणवला. हा तिढा सोडवण्यासाठी जगातील बऱ्याच देशात त्या त्या सरकारांनी उपाय योजले. भारतात, मल्ल्या किंवा निरव मोदी वगैरे पळून गेल्यावर, तसेच भूषण स्टील सारखी कंपनी सुद्धा डबघाईला आल्यावर सरकारने काही पावले उचलण्याचे ठरवले. याची एक महत्वाची पायरी म्हणजे एक लीगल फ्रेमवर्क तयार केलं. उद्योगांच्या प्रत्येक सेक्टरसाठी एक समिती स्थापन केली जाईल. जर एखादा उद्योग डबघाईला आला असेल तर ती समिती त्यात लक्ष घालून दुसरी एखादी कंपनी या कंपनीला मदत करायला, टेकओव्हर करायला तयार आहे का किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज विकत घेतेय का हे बघणार. जसं भूषण स्टील दिवाळखोरीत निघाल्यावर सरकारच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन टाटा स्टीलने ३२००० कोटी रुपयांना ही कंपनी खरेदी केली. यामुळे काय झालं? भूषण स्टीलवर जवळपास ५६००० कोटींचं कर्ज होतं. यातले ३२००० कोटी तर लगेच वसूल झाले. उर्वरित रक्कम कर्ज नियमित करून घेऊन बँकेच्या एनपीए किंवा बुडीत खात्यातून बाहेर येईल. इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ५६००० कोटींचं कर्ज आता आहे याचा अर्थ बँकांनी कंपनीला ५६००० कोटी दिले होते असा नाही. तर मूळ कर्ज रक्कम समजा ४०००० कोटी आहे, ज्याचा मूळ व्याज दर १२% आहे. जेव्हा कंपनीचे कर्जाचे हप्ते भरणे अनियमित होते तेव्हा त्यावर लेट पेमेंट चार्जेस वगैरे लागतात. एनपीए मध्ये खातं गेल्यावर पेनल्टी म्हणून व्याजदर वाढवला जातो. यातून ही रक्कम फुगत जाते. हे केलं नसतं तर काय झालं असतं? जर कंपनीने नुसतीच दिवाळखोरी जाहीर केली असती तर सगळे पैसे बुडाले असते. ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे त्यांना ही रक्कम बुडीत खात्यात टाकायला लागली असती. कंपनीच्या मशिनरीचा आणि इतर प्रॉपर्टीज जा लिलाव करून जी काही रक्कम मिळेल ती घेऊन बँकांचे वसुलीचे बाकीचे मार्ग बंद झाले असते. फार फार तर मालक, संचालकांच्या मालमत्तेवरही टाच आणली गेली असती. पण याने प्रश्न सुटतोय का? बँका तरी हे बुडालेले पैसे कुठून आणणार? सरकारी बँक असेल तर सरकारकडून अनुदान (बेल इन!) मागणार. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडून जो कर गोळा केला जातो त्यातून सरकार या बँकांना अनुदान देणार. सहकारी बँक असेल तर ठेवीदारांचे पैसे अडकून बसणार किंवा राज्य सरकार कडून मदत मागितली जाणार. हे पैसे कुठून येणार? आता तुम्हाला माहीतीच असेल. भूषण स्टीलच्या मालकांनी काही कर्ज बुडवायचे म्हणून कंपनी चालू केली होती का? मी जवळपास १०-१२ वर्षांपूर्वी भूषण स्टीलचे शेअर्स ट्रेड करत होतो. त्यावेळेला कंपनीची स्थिती उत्तम होती. पुढे काय झालं माहीत नाही, पण काय कर्ज बुडवायचं या उद्देशाने काही संचालकांनी/ मालकांनी मुद्दाम कंपनी डबघाईला आणली नसेल. कंपनी जर बंद झाली तर त्यात नोकरी करणाऱ्या हजारो लोकांचे नुकसान होते. मग हे टाळण्यासाठी वरील उपाय कसा वाटतोय? आता तुमचा बेल इन चा मुद्दा विचारात घेऊ. हा लेख वाचा. यातील The “bail-in” tool will mean the conversion of certain creditors’ (including depositors’) debt into equity. हे वाक्य महत्वाचे आहे. तसेच खालील परिच्छेद पण महत्वाचा आहे. Deposit amounts covered by deposit insurance, pensions, and sums payable to employees have been expressly excluded from the scope of bail-ins. “Bail-in does not imply that this tool can be used at the government’s whim and fancy to arbitrarily use depositors’ money without their consent to save failed banks,” says Chatterjee of Vidhi Centre for Legal Policy. “For any action that RC takes, the law ensures that all creditors, which includes depositors, are not left in a worse position than they would have been had the entity been liquidated.” माझ्यामते मी बऱ्यापैकी सर्व उलगडून सांगितले आहे. त्यातूनही निव्वळ विरोधासाठी विरोध करायचा का सत्य जाणून घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराला सामान्य लोक बळी पडल्याने हे विधेयक सरकारला मागे घ्यायला लागलं असेल. पण माझ्यामते तरी सरकार लोकांना समजावण्यात कमी पडलं. शेवटी पैश्यांचं सोंग कोणीच अनु शकत नाही ना तुम्हीआम्ही, ना बँका, ना सरकार. टॅक्स मधून बेल इन करायचे का दुसरे मार्ग शोधायचे हे पण ठरवा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/19/2018 - 04:03 नवीन
रूपी बँकेच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ३०००० हजार जणांच्या आरडाओरडीमुळे ५७४३२९ लोक घाबरले. त्यामुळे हे विधेयक महाभयंकर आहे असच सर्वांना वाटायला लागले. राजकीय भाषेत, ३०००० मते गेली तरी त्या बदल्यात ५७४३२९ मिळतील अशा अपेक्षेत विधेयक आणले. पण ३०००० लोक ५७४३२९ लोकांच्या मनात भिती उत्पन्न करू शकल्यामुळे ३०००० + ५७४३२९ मते जातील असे वाटायला लागल्यामुळे विधेयक मागे घेतले. संदर्भ : रूपी बँकेचे एक लाख रुपयांपर्यंतचे ठेवीदार - ५,७४,३२९ एकूण रक्कम - ५९६ कोटी रुपये एक लाखापेक्षा जास्त रकमेचे ठेवीदार - ३०,००० एकूण रक्कम - ८१५ कोटी रुपये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/19/2018 - 10:39 नवीन
ट्रेड मार्क : “For any action that RC takes, the law ensures that all creditors, which includes depositors, are not left in a worse position than they would have been had the entity been liquidated.” ही व्यवहारातली वस्तूस्थिती आहे... आणि शाम भागवत : रूपी बँकेच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ३०००० हजार जणांच्या आरडाओरडीमुळे ५७४३२९ लोक घाबरले. त्यामुळे हे विधेयक महाभयंकर आहे असच सर्वांना वाटायला लागले. ही विरोधी राजकारणाने निर्माण केलेली हवा आहे. सद्या राजकारणी हवा तयार करून व्यक्तिगत/पक्षाचा स्वार्थ साधणे महत्वाचे समजले जाते... तसे करताना, देशाचे किंवा सामान्य नागरिकांचे अहित झाले तरी बेहत्तर... ते केवळ कोलॅटर डॅमेज समजून विसरायचे असते. :(
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sun, 08/19/2018 - 18:30 नवीन
चांगली चर्चा.मिपावरील जाणते लोक त्यानिमित्ताने बोलते झाले. प्रतिसादांतून चांगली माहिती मिळते आहे.ट्रेड मार्क यांचा प्रतिसाद विशेष आवडला. ते म्हणतात ना, राजानेच जर लुटले तर सांगणार कोणाला, त्यामुळे एखाद्या राजाला जर जनतेला लुटायचेच आहे, तर जनता फार काही करू शकत नाही. पण माणसातले नैसर्गिक जगण्याचे तत्व त्याला नुकसान दिसत असताना कमीत कमी नुकसान कुठे होऊ शकते हे ओळखून जगणे चालू ठेवायला भाग पाडत असते. त्यामुळे चहा सामोसे विकणाऱ्या राजाला आपल्याला लुटून द्यायचे, का गालावर गोड खळी असलेल्या, अल्लडपणे बागडणाऱ्या स्वयंघोषित युवराजांना गादीवर बसवून लुटायला द्यायचे हा निर्णय आपण जनतेवरच सोपवून देऊ. आता ही एक छोटीशी कथा : एक राजा होता, पाच वर्ष त्याने चांगला कारभार केला, लोक खुश होते. दुसरा व्यवहार्य पर्याय नसल्याने लोकांनी परत पुढच्या पाच वर्षांसाठी अपेक्षेनं त्यालाच निवडून दिलं. पण आता राजकारभारात ढिलाई येऊ लागली होती. हाताखालचे सरदार घोटाळे करून जनतेला लुबाडायला लागले होते.पण राजा नुसता गप्प बसून राहिला.काही बोलेचना. त्याचा वचक राहिला नाही.अनुभव आणि हुशारी लाचारीमागे लपून गेली.हुशारीची चमक असलेले त्याचे डोळे जाड धूसर चष्यामागे लपून राहू लागले.विरोधी पक्षालाच काय त्याच्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांनाही ते डोळे वाचता येईनात. पुढच्या निवडणुकीत ह्या सगळ्याचा फायदा एका चहावाल्याने उचलला.लोकांनी त्याला बहुमताने निवडून राजा केले.काही लोकांना वाटले की त्याने वारेमाप आश्वासने दिली आणि नुसता पोकळ डोलारा उभारला. काही लोकांना वाटले की त्याने परिस्थिती सुधारण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. बऱ्याच लोकांनी त्याच्या प्रयत्नांना साथ दिली. पण त्याचे प्रयत्न काही पुरे पडताना दिसत नव्हते. "बादनारायण संबंध" हा वाक्प्रचार पूर्वी अधूनमधून वापरला जाई, आता तो राजरोसपणे वापरला जाऊ लागला.राजाला आणि राज्यकारभाराला काय वाट्टेल ते बोलून झाल्यावर पुन्हा आम्हाला बोलूनच दिले जात नाही असा कांगावा करण्याचे प्रमाण खूपच वाढले.दांभिकपणा हे वैशिष्ट्य असलेल्या त्या देशातील जनतेला हळूहळू "खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" ही म्हण प्रत्यक्षात वापरायची बुद्धी झाली. त्यामुळे जनतेचा लंबक आता हळूहळू दुसऱ्या टोकाकडे जात आहे की असे वाटण्यासारखी परिस्थिती आली.ह्या राजाने परिस्थिती १००% नियंत्रणात आणून रामराज्य निर्माण केलेच पाहिजे नाहीतर आम्ही परत जुन्या राजालाच निवडून देऊ असे वाटण्यापर्यंत त्यांची विचारशक्ती विकसित झाली.एकच कल्लोळ उठला आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ लागली. ह्याचा फायदा त्या देशाच्या शत्रूंनी उचलला नाही तरच नवल... असो. माझे वैयक्तिक मत म्हणाल तर मोदी आवडत अथवा पटत नसले तरी लोकांना दुसरा सशक्त पर्याय अजून तरी दिसत नाहीये.एवढ्या प्रचंड लोकसंख्येला, जी अनेक जाती धर्मात विभागली गेलेली आहे, एखादा सर्वमान्य तोडगा देणे ही अशक्य गोष्ट आहे.तसंच राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं ते दिसतं असं म्हणतात. त्यामुळे कोणी कितीही आरडाओरडा केला तरी परिस्थिती 180 अंशात वळण घेईल असे मलातरी वाटत नाही. बँकेच्या कार्यप्रणालीमधले मूळ गृहीतक हे आहे की बँकेचे सगळे ग्राहक एकाच वेळी त्यांचे ठेवलेले पैसे काढायला येणार नाहीत. सगळे ग्राहक एकाच वेळी पैसे काढायला लागले तर जगातली कुठलीही बँक बंद पडेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/19/2018 - 19:14 नवीन
गोष्टीबद्दल काही बोलायला पाहिजेच काय ?! त्यामुळे चहा सामोसे विकणाऱ्या राजाला आपल्याला लुटून द्यायचे, का गालावर गोड खळी असलेल्या, अल्लडपणे बागडणाऱ्या स्वयंघोषित युवराजांना गादीवर बसवून लुटायला द्यायचे हा निर्णय आपण जनतेवरच सोपवून देऊ. हे वाक्य खास आवडले. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
स
सुनील Mon, 08/20/2018 - 05:08 नवीन
सशक्त पर्याय असला तरच जनता विद्यमान राज्यकर्ते बदलतात, हे गृहितक चुकिचे आहे. ७७ च्या निवडणूकीत विरोधकांकडे इंदिरा गांधींना कोणता पर्याय होता? तरीही लोकांनी त्यांना घालवलेच. २००४ साली अटलजींना कोणता जाहीर केलेला पर्याय होता? असलाच तर सोनियांचा असेल (तो ही जाहीर न केलेला) पण मनमोहन सिंगतर कुणाच्या ध्यानिमनीदेखिल नव्हते. तरीही अटलजींचे सरकार लोकांनी घालवलेच ना? तेव्हा पर्याय असो वा नसो, लोकांना घालवायचे असेल तर घालवतील किंवा ठेवतील. जनता पर्यायाची फारशी चिंता करीत नसते, असा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
श
शाम भागवत Mon, 08/20/2018 - 08:02 नवीन
चांगला आणि वेगळा मुद्दा मांडलाय. बुजुर्गांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
त
तेजस आठवले Mon, 08/20/2018 - 12:20 नवीन
सुनिलजी, तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे.७७ च्या निवडणुकांच्या वेळी मी नव्हतो त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही.पण ऐकलेल्या चर्चांवरून असे वाटते की इंदिराजी बऱ्याच लोकांना डोईजड झाल्या होत्या. तसेच त्यांनी दाखवलेली धडाडी योग्यच होती पण नंतर तिचे रूपांतर हेकटपणात झाले.त्यामुळे लोकांनी त्यांना घालवले असावे. कदाचित सामोपचाराने आणि आक्रमक स्वभावाला मुरड घालून त्या बरेच काही मिळवू शकल्या असत्या. हे जर तर झाले. २००४ साली भाजप चा प्रभाव ओसरत आला होता. काँग्रेस सरकार बनवणार हे स्पष्ट झाल्यावर सोनियांना बऱ्यापैकी विरोध झाला. तेव्हा मनमोहनसिंगांचे नाव पुढे आले.त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा बघून त्यांना विरोध झाला नाही.पहिल्या कार्यकाळात सगळे व्यवस्थित चालू होते.दुसऱ्या कार्यकाळात मात्र घोटाळे उघडकीस आल्यानंतर ते मौनात गेले. तेव्हाही त्यांनी थोडी धमक दाखवून तोंडदेखली का होईना कारवाई केली असती तरी काँग्रेस ला गड राखता आला असता.मात्र त्यांनी डोळे मिटून घेतले. त्यामुळे मोदी निवडून आले ह्याचे बऱ्यापैकी मोठे कारण यूपीएने गमावलेली विश्वासार्हता होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ट
ट्रेड मार्क Mon, 08/20/2018 - 18:54 नवीन
प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला कुठला तरी एक कळीचा मुद्दा असतो ज्यावर निवडणूक फिरू शकते. जसे ७७च्या निवडणुकीत आणीबाणी हा कळीचा मुद्दा असल्याने विरोधी कोणी सशक्त आहे का नाही हा मुद्दाच पुढे आला नाही. फक्त इंदिरा गांधी नको हाच एक मुद्दा होता. २००४ साली बीजेपी ने इंडिया शायनिंग वर भर दिला होता. बाजपेयींनी किती चांगली कामे केली हे नंतर लोकांना उमजलं असलं तरी त्यावेळेला मात्र विरोधकांचा इंडिया इज नॉट शायनिंग हा मुद्दा उचलला गेला. कदाचित १९९८ मध्ये लोकांच्या अपेक्षा जास्त वाढल्या असाव्यात आणि त्याचा फटका भाजपाला बसला. तसेही भाजपवाले मार्केटिंग मध्ये कमीच पडतात. २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार जाण्यामागे मुख्य मुद्दा भ्रष्टाचार हा होता. त्याला जोड म्हणून मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आले, त्यामुळे भाजपाला बहुमत मिळले असावे. २०१९ च्या निवडणुकीत २००४ ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता मला वाटत आहे. एक तर मोदींनी कुठले फ्री काही देण्याचे निर्णय घेतले नाहीत. त्यात भर म्हणजे नोटबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेतले ज्याचा लोकांना त्या वेळेला तरी काही प्रमाणात त्रास झाला. वर लोकांची प्रत्येकी १५ लाख मिळण्याची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. मल्ल्या, निरव मोदी सारखे लोक पळून गेले, ज्याचा ठपका संबंध नसताना सध्याच्या सरकारवर आला. प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याच भारतीय लोकांना तटस्थपणे कारणमीमांसा करता येत नाही. एखादी घटना कशी आणि का घडली असावी याचे संशोधन करावे हा प्रकार कमीच आहे. कुठून तरी कोणी सांगत असेल, किंवा वाचनात आले, व्हिडीओ बघितला की तेच खरे मानून चालायचे हा आपला शिरस्ता आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बहुतेक मोठ्या शिक्षणसंस्थांवर, कॉलेजेसवर डाव्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यातून शिकून बाहेर पडलेले मुख्यत्वे प्रस्थापित सरकारच्या विरोधी असतात किंवा जे सरकार उद्योगधंद्यांना प्राधान्य देते त्याच्या विरोधी असतात. कष्टकरी आणि अशिक्षित जनता मतदानाच्या वेळी मिळणाऱ्या पैश्यांवर मते फिरवते. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला काँग्रेसचे राज्य असण्याची सवय झाली आहे. त्यामुळे क्वचित दुसऱ्या कोणाला संधी दिली जाते पण ती फार काळ नसते. म्हणून मला तरी वाटतंय की २०१९ मध्ये युवराज पंतप्रधान होऊ शकतील नाहीतर ममता बॅनर्जी व मायावती वगैरे आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
त
तेजस आठवले Tue, 08/21/2018 - 11:33 नवीन
पूर्ण प्रतिसाद पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अभिजित - १ Tue, 08/21/2018 - 14:16 नवीन
मल्ल्या, निरव मोदी सारखे लोक पळून गेले, ज्याचा ठपका संबंध नसताना सध्याच्या सरकारवर आला. >> https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/rajdhaneetun/pnb-fraud-2/ खरे तर नीरव मोदी-मेहुल चौकसीच्या घोटाळ्याची मोदी सरकारला ७ मे २०१५ रोजीच पूर्वसूचना मिळाली होती. गुजरातचे वैभव खुरानिया यांनी पंतप्रधानांचे कार्यालय, कंपनी व्यवहार मंत्रालय, एसएफआयओ, सेबी, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकारकडे या घोटाळ्याची एका पत्राद्वारे तक्रार केली. गुजरातचेच दिग्विजयसिंह जाडेजा यांनी मेहुल चौकसी यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला आणि हा सारा पैसा घेऊन मेहुल चौकसी आणि त्याचे साथीदार विदेशात पळून जातील, असा इशाराही दिला होता. वर्षभरानंतर नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या महाघोटाळ्याकडे बंगळुरुचे एस.व्ही. हरीप्रसाद यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाला २६ जुलै २०१६ रोजी पत्र लिहून पुराव्यांनिशी लक्ष वेधले होते. काँग्रेसच्या जमान्यात म्हणजे २०११ साली सुरू झालेल्या या महाघोटाळ्याविषयी धोक्याची घंटा वाजविल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन मोदी सरकारला संबंधित गुन्हेगारांना लागलीच वठणीवर आणणे शक्य होते. पण खुरानिया, जाडेजा किंवा हरीप्रसाद यांच्या तक्रारींना पोच मिळूनही त्यांची दखल घेतली गेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 08/21/2018 - 18:01 नवीन
तुमचा राग मी समजू शकतो. ही केस नक्की काय आहे याची तुम्हाला किती माहिती आहे? ११४०० कोटींच्या आकड्यावर सगळे नाचत आहेत पण खरंच एवढे पैसे ब्यागेत भरून निरव एका दिवशी पळून गेला का? तर आता हे पण जरा उलगडून सांगतो - निरवला मदत करणारा बँकेतील मुख्य अधिकारी मे २०१७ मध्ये निवृत्त झाला. त्यामुळे कदाचित आपली प्रकरणं बाहेर येतील याची निरवला कुणकुण लागली असणारच त्यामुळे तो जानेवारीमध्येच देशाबाहेर गेला होता. फेब्रुवारी १४, २०१८ रोजी PNB नेच आपल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध CBI कडे तक्रार केली की लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग (LoU) खोटे तयार करून २८० कोटी रुपयांची अफरातफर झाली. यात २८० कोटींचा घोटाळा नक्कीच झालाय. पण सामील कोण आहेत? तर बँकेचे वरिष्ठ अधिकारी कारण हे साध्या कारकुनाचं काम नव्हे. तक्रार मिळाल्यावर लगेच ED ने निरवच्या घरी, दुकानांवर वगैरे रेड टाकली. फेब १५ ला निरवच्या ५१०० कोटींच्या प्रॉपर्टीज जप्त करण्यात आल्या. PNB ने आपल्या तक्रारीत असं पण म्हणलं की निरवने बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने खोटे गॅरंटी दस्तावेज बनवून जवळपास ११००० कोटी रुपये परदेशात पाठवले असावेत असा संशय आहे. तुम्हाला किंवा घोटाळ्याच्या नावाने ओरडणाऱ्यांना बँक गॅरंटी किंवा लेटर ऑफ क्रेडिट किंवा लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग कसं काम करतं माहित आहे का? नसेल तर माहित करून घ्या. त्यापुढे जाऊन जर का खोटे दस्तावेज बँकेतच बनले असतील तर रखवालदारच चोरी करतोय असं म्हणायला लागेल. कोर्टात केस दाखल केल्यावर निरवविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट काढलं. दुसरी गोष्ट म्हणजे निरव कडे बेल्जीयमचे पण नागरिकत्व आहे असं म्हणतात. त्याची बायको अमेरिकन नागरिक असून भाऊ पण बेल्जीयन नागरिक आहे. त्याचे परदेशातही बिझनेस असल्यामुले तो नेहमी प्रवास करत असल्याने तसेही त्याला थांबवणे अवघडच होते. आता ED आणि CBI ने मिळून सगळ्या प्रॉपर्टीज जप्त केल्याने आपण पैसे भरू शकत नाही असं निरवचं म्हणणं आहे. तटस्थपणे विचार करायचा झाला तर तो चुकीचं सांगत नाहीये. चालू असलेली दुकानं सील करून टाकल्यामुळे धंदाच बंद झालाय असं तो म्हणतो. तर भारतातल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून आत्तापर्यंत ५७०० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. पण त्यामुळे आता तो परागंदा असून भारत सरकार त्याच्या मागावर आहे. या सगळ्यात त्याने जरी घोटाळा केला असला तरी आता ५७०० कोटी तर सेक्युअर झालेत, पण त्याची नेटवर्थ १०० मिलियन डॉलर्सवर (~ ६८० कोटी रुपये) आली. आता उर्वरित पैसे कुठून वसूल करणार सांगा बघू? म्हणून दिसला घोटाळा की टाक जेलमध्ये असं करून फारसं काही साध्य होत नाही. कारण आर्थिक घोटाळ्यांमध्ये पैसे रिकव्हर करणे हे व्यक्तीला जेलमध्ये टाकण्यापेक्षा महत्वाचे आहे. आता तुम्ही म्हणताय की पत्र तर आधीच दिलं होतं, पण नुसते एक घोटाळा आहे असे पत्र मिळून उपयोग नसतो. त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी तेवढेच भक्कम पुरावे पण लागतात. जो माणूस एवढी वर्ष बिनबोभाट कुठेही न अडकता एवढ्या पैश्यांचा "घोटाळा" करू शकतो त्याला आपण कुठे अडकू शकतो याची जाण असेलच ना? बँकेने स्वतः तक्रार करून, कागदपत्र उपलब्ध करून देऊन सुद्धा कोर्टाने त्याला जमीनपात्र अटक वॉरंट काढले, आता काय करणार बोला. एखाद्याला पकडण्यासाठी किंवा त्याला देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यासाठी भक्कम पुरावा नसेल तर दिग्गज वकिलांची फौज उभी करून कोर्टाकडून सुटका करून घेणे सहज शक्य आहे. त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या व्यवहारांचे ट्रेल मिटवून टाकेल आणि शक्य तेवढे व्यवहार कागदोपत्री सुरळीत दाखवेल. लक्षात घ्या त्याला बँकेतूनच सपोर्ट होता त्यामुळे पुरावा गोळा करणं पण तेवढंच अवघड होतं. त्यात पैसे नुसते वेडेवाकडे ट्रान्स्फर झालेले नव्हते तर कागदपत्र खोटे बनवण्यात आले होते. आर्थिक घोटाळे हा जरा जड विषय आहे. सर्वसामान्यांना फक्त पैसे गेले एवढंच समजतं पण त्यातील खाचाखोचा समजणे अवघड असते. त्यामुळे कोणीतरी आरोप करतंय म्हणून नुसतं वाहवत न जाता आपण स्वतः माहिती मिळवणे श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Fri, 09/07/2018 - 18:44 नवीन
तो नेहमी प्रवास करत असल्याने तसेही त्याला थांबवणे अवघडच होते. इथे हसावे कि रडावे ट्रेडमार्क ते जरा स्पष्ट करा. PMO गप्प बसले हे इथे स्पष्ट दिसत आहे. पण ट्रेडमार्क याना तसे वाटत नाही. असो !! (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 09/07/2018 - 21:35 नवीन
मी सांगून काय उपयोग, काही झालं तरी तुम्ही रडणारच. तुम्हाला मुद्दा स्पष्ट होणार नाही पण इतर वाचकांसाठी म्हणून स्पष्टीकरण देतोय. निरव १ जानेवारी रोजी भारताबाहेर गेला आणि पीएनबीने २९ जानेवारी ला सीबीआय कडे तक्रार केली. आता कोणी परत म्हणेल की आधीच हरिप्रसाद नावाच्या माणसाने २०१६ मध्ये ED आणि PMO ला निरव मोदी संबंधात पत्र लिहिलं होतं. पण त्या पत्रात त्याने खालील दावा केला होता असं हरिप्रसादने स्वतःच सांगितलंय. He claimed that he had opened a franchise store with Mehul C. the MD of Gitanjali Group, with an investment of Rs 10 crore .. "As per the agreement, he was supposed to give us gold worth Rs 10 crore but he gave us gold worth Rs 5 crore only. We finally filed two FIRs against him," Prasad said. या तक्रारीत आणि पीएनबी बँकेने केलेल्या तक्रारीत काय साम्य आढळतंय? म्हणून अभिजित यांना मी आधीपासून सांगतोय की संशोधन करताना तटस्थ राहून करावे. गूगल वापरत असाल तर तुम्ही केलेल्या सर्चवरून analytics च्या साहाय्याने तुमचे प्रोफाईल बनवले जाते आणि तुम्हाला जसे आवडतात तसेच सर्च रिझल्ट्स दाखवले जातात. तळटीप: मी सांगितल्यावर तुम्हाला या धाग्याची आठवण झालेली दिसतेय आणि म्हणून लगेच प्रतिसाद दिलात. पण मी हे नमूद करू इच्छितो की तुमचा धागा FRDI बद्दल आहे, त्यावर चर्चा अपेक्षित आहे. निरव मोदी ही एक केस झाली आणि सरकार त्यांच्या मार्गाने तो सोडवायचा प्रयत्न करत आहे. परंतु हे विधेयक कोण्या एका डिफॉल्टर साठी नसून सर्वांसाठीच आहे. तेव्हा धाग्याच्या विषयाला धरून विधेयकावर चर्चा करा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ट
ट्रेड मार्क Fri, 09/07/2018 - 22:48 नवीन
तुमच्या या प्रतिसादातील मुद्द्यावर अजून काही सांगू इच्छितो. तुम्ही दिलेल्या लिंक मधील लेखात खालील परिच्छेद आहे - काँग्रेसच्या जमान्यात म्हणजे २०११ साली सुरू झालेल्या या महाघोटाळ्याविषयी धोक्याची घंटा वाजविल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन मोदी सरकारला संबंधित गुन्हेगारांना लागलीच वठणीवर आणणे शक्य होते. पण खुरानिया, जाडेजा किंवा हरीप्रसाद यांच्या तक्रारींना पोच मिळूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. राहुल गांधींची भेट घेणाऱ्या नीरव मोदीच्या गीतांजली जेम्सला १५५० कोटींचे कर्ज देण्यास विरोध केल्याबद्दल काँग्रेसच्या सत्ताकाळात अलाहाबाद बँकेचे तत्कालिन संचालक दिनेश दुबे यांना तेव्हाच्या वित्त सचिवांनी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. त्याची दखल घेऊन नरेंद्र मोदी सरकारला घोटाळेबाज नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांना विदेशात पळून जाण्यापासून रोखता आले असते. आता यात गम्मत बघा. खुरानिया, जडेजा यांनी नक्की काय धोक्याची घंटा वाजवली होती हे सांगितलेलं नाहीये. नंतर हरिप्रसाद यांच्या पत्रांविषयी मी आधीच्या प्रतिसादात लिहिलं आहे. वर लेखक हे सुद्धा मान्य करतोय की घोटाळा काँग्रेसच्या काळात आणि काँग्रेसच्या आशीर्वादाने होत होता. म्हणजे तेव्हा काँग्रेस या घोटाळ्यात सामील होती जी नंतर मोदींवर आरोप करतेय की मोदींनी निरव मोदींवर कारवाई केली नाही. यात तुम्हाला काँग्रेसच्या चोराच्या उलट्या बोंबा वाटत नाहीत? हा लेखक किती सोयीस्करपणे जबाबदारी मोदींवर ढकलतोय हे पण तुम्हाला कळत नाहीये? का समजून घ्यायचं नाहीये? हे पुरोगामित्वाचं अजून एक लक्षण झालं. अजून एक लक्षण म्हणजे, नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये पुराव्यासहित केस चालू असताना आणि बेल वर बाहेर असताना पप्पू वारंवार देशाबाहेर जातोय पण एका पुरोगाम्याने शब्दही काढला नाही. वर मोदी सुडाचं राजकारण करत आहेत असा आरोप होतोय. मग सोनिया आणि पप्पू दोघांनाही देशाच्या बाहेर जाण्यास बंदी करावी असं तुम्हाला वाटतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ट
ट्रेड मार्क Tue, 08/21/2018 - 00:24 नवीन
त्यामुळे चहा सामोसे विकणाऱ्या राजाला आपल्याला लुटून द्यायचे, का गालावर गोड खळी असलेल्या, अल्लडपणे बागडणाऱ्या स्वयंघोषित युवराजांना गादीवर बसवून लुटायला द्यायचे हा निर्णय आपण जनतेवरच सोपवून देऊ. उपमा म्हणून ठीक आहेपण चहावाला राजा लुटतो आहे असं मला तरी वाटत नाही. जी कर्जे आधीपासून एनपीए मध्ये आहेत ती काही एकदम परफॉर्मिंग होणार नाहीयेत हे १००% सत्य आहे. त्यासाठी काहीतरी उपाय योजावे लागणार हे नक्की, अन्यथा जर PSBs डबघाईला आल्या तर देशाची आर्थिक स्थितीच खराब होईल. अशी कर्ज ही दुधारी तलवार आहे. कसे ते सांगतो. कर्जे ही बँकेची ऍसेट्स असतात. म्हणजेच काय तर त्यावर जे व्याज मिळते ते बँकेच्या ताळेबंदात नफ्याच्या बाजूला धरले जाते. तर ठेवी या लायबिलिटीज मध्ये मोडतात कारण त्यावरचे व्याज हे बँकेच्या दृष्टीने ग्राहकाला देणं असते. आता ताळेबंदात "Interest Receivable" आणि "Interest Payable" असे दोन विभाग असतात. सगळी कर्ज काही एकाच प्रकारची नसतात. तर सामान्य माणसाला दिली जाणारी वैयक्तिक कर्जे (फक्त गॅरेंटर असतो), जनरल मॉर्टगेज (कॉलॅटरल सेक्युरिटी व गॅरेंटर), गृहकर्ज, गृह दुरुस्ती कर्ज, शेती कर्ज ईई असतात. तर उद्योगांसाठी रोखरोखपतता (Cash Credit - जे बिझनेसच्या रोजच्या खर्चासाठी असते, ठराविक कालावधी नसतो), मॉर्टगेज (फॅक्टरी उभारण्यासाठी वा अश्या ठळक कारणांसाठी दिले जाते, कर्जाचा कालावधी ठरलेला असतो). तर कर्जाचे व्याज Interest Receivable मध्ये येते, जे बँकेचा प्रॉफिट म्हणून मांडले जाते. आता जसे तुमच्या आमच्या कंपनीला, धंद्याला दर वर्षी वाढ दाखवणे आवश्यक असते तसेच बँकेला नफ्यात वाढ दाखवणे आवश्यक असते. बँकेने चांगला परफॉर्मन्स दाखवला नाही तर तुम्ही अश्या बँकेत खातं काढाल का? इथे फरक लक्षात घ्या Interest Received नसून Interest Receivable आहे. म्हणजे काय? तर हे व्याज मिळेल अश्या हेतूने ते नफ्यात दाखवले आहे. त्याचप्रमाणे Interest Payable आहे म्हणजे बँक हे व्याज देणे आहे. आता यात मेख अशी आहे की ठेवींवरचे व्याज बँकेला द्यावेच लागते. पण कर्जावरचे व्याज मिळेल याची खात्री नसते, किंबहुना मुद्दल सुद्धा मिळेल याची खात्री नसते. म्हणूनच बँकांचा नफा-तोटा हा फक्त कागदोपत्री असतो असं म्हणतात. एक आपल्याला समजेल असं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर समजा मी एका कंपनीचा शेअर १०० रुपयांना खरेदी केला आहे. उद्या तो शेअर ९० रुपयांना गेला तर मी म्हणेन मला १० रुपये तोटा आहे, पण जो पर्यंत मी तो विकत नाही तोपर्यंत तो तोटा खरंच आहे का? माझे १०० रुपये अडकून पडलेत हे मी खात्रीने म्हणू शकतो पण आत्ता जर मी तो विकून टाकला तर मला फक्त ९०च परत मिळतील. हेच अजून तो शेअर पडला आणि ७० ला गेला तर? आता मात्र मी बेकार अडकलोय ना? विकला तर ३० चा तोटा नक्की, मग माझ्याकडे काय पर्याय आहेत? तर एक तर विकून टाकायचा (loss book करणे) आणि ७० रुपये परत घ्यायचे. ते ७० परत चांगल्या ठिकाणी गुंतवून तोटा भरून काढायचा किंवा अजून पैसे उभे करून परत गुंतवणूक करून तोटा भरून काढायचा. Loss booking हे बँकेच्या भाषेत बोलायचे झाले तर कर्ज बुडीत म्हणून सोडून द्यायचे. म्हणजे काय तर write-off करायचे. म्हणजे जे Interest Receivable किंवा bad debts मध्ये दाखवत आहेत त्या पैश्यांवर तुळशीपत्र ठेवायचं. वर सांगितल्याप्रमाणे हे कर्जाऊ दिलेले पैसे कुठून आणलेत? तर ठेवीदारांच्या पैश्यांमधून, बरोबर? त्यांना तर व्याज द्यायलाच लागतंय. मग आता हे पैसे कुठून आणायचे? दुसरीकडे Interest Receivable मधून रक्कम कमी झाल्याने बँकेचा नफा कमी झालेला किंवा तोटा वाढलेला दिसतो. PSB असेल तर त्याचा परिणाम शेअरच्या किमती कोसळण्यावर होतो. बाजारात सगळीकडे बातमी पसरते की बँकेचा नफा घसरला, म्हणजे परिस्थिती काही चांगली दिसत नाहीये. मग ठेवीदारांच्या मनात भीती निर्माण होते आणि ते ठेवी काढायला लागतात. जर हे ठेवी काढणाऱ्यांचं प्रमाण वाढलं तर बँक पैश्यांची व्यवस्था करू शकत नाही, त्यातून मग अजूनच ठेवीदार पॅनिक होतात. आणि मग बँक डबघाईला येते. यात अजून एक गोष्ट अशी होते की कर्ज घेणाऱ्यांना जेव्हा बँकेची परिस्थिती समजते तेव्हा नियमित कर्ज भरणारे पण हप्ते चुकवायला बघतात. म्हणजे आवक कमी होतेय आणि जावक मात्र वाढत चाललीये. महत्वाची गोष्ट ही आहे की ही सगळी प्रोसेस २-४ वर्षांतली नाहीये. मल्ल्याला, निरव मोदीला आणि एनपीए असलेल्या बहुतेक सगळ्या उद्योगांना कर्ज बऱ्याच आधी दिलेलं आहे. ते एनपीए मध्ये पण बऱ्याच आधीपासून आहेत. आता प्रश्न हा होता की हे Interest Receivable मध्ये दाखवून नसलेला वाढीव नफा दाखवत राहायचं का परिस्थिती स्वीकार करून त्यावर काही उपाय योजायचा? मोदी परिस्थिती जैसे थे ठेवायचा सोपा मार्ग निवडू शकले असते. पण त्यांनी loss book करण्याचा पर्याय निवडला. पण म्हणजे कर्ज write-off केलं नाही तर मल्ल्या आणि निरव मोदींच्या मालमत्ता जप्त केल्या आणि त्यातून वसुली केली. बाकी ज्या कंपन्यांमध्ये जरा तरी धुगधुगी आहे अश्या कंपन्यासाठी FRDI मार्गे कर्ज रिकव्हर करायचा प्रयत्न चालू केला. वर भूषण स्टीलचं उदाहरण म्हणूनच दिलं आहे. प्रॉब्लेम हा आहे की सामान्य माणसाला यातलं काही समजत नाही आणि समजून घ्यायचंही नसतं. फक्त माझे पैसे जाणार असं एक काहीतरी वाक्य दिसलं की त्यावरून गदारोळ होतो. माझ्या मते तरी मोदी सरकार लोकांना समजावून सांगायला कमी पडतंय. त्यामुळे समजून उमजून जर लोकांनी मतदान केलं नाही तर गालावर खळी असणाऱ्या युवराजाकडून पुढचे मल्ल्या, निरव मोदी तयार होण्यासाठी तयार रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
स
सुबोध खरे Tue, 08/21/2018 - 05:55 नवीन

समजून घ्यायचंही नसतं. फक्त माझे पैसे जाणार

हा नोटबंदीत ज्यांचे काळे पैसे बुडाले आहेत त्यानि मोठ्या तोंडाने केलेला आक्रोश आहे आणि हा हलकट पत्रकार मंडळींनी त्यावर चढवलेला अपप्रचाराचा मुलामा आहे. सामान्य माणसाला बँक बुडाली किंवा तरली याच्याशी काहीही घेणे देणे नसते. त्याला माझे पैसे दुप्पट कोण करून देईल किंवा मला फुकट कोण काय देईल याच्याशी कर्तव्य असते. तुम्ही एवढ्या कळकळीने हा विषय समजावून देण्याचा प्रयत्न करत आहात तर येथेच असलेल्या सुशिक्षित मंडळींनीच समजावून घेण्याची इच्छा नाहीये मग सामान्य माणसांची काय कथा? मी तर म्हणतो २०१९ मध्ये मोदी पडावेत आणि महाठगबंधनच निवडून यावे. म्हणजे ते पण वर्ष दोन वर्षात लाथाळी होऊन पडेलच आणि मग श्री मोदी पूर्ण बहुमताने निवडून येतील. मुळात पंतप्रधान कोण यावरून पहिल्या दिवसापासूनच लठ्ठा लठ्ठी होईल. मायावती, मुलायम, ममता, राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू पासून सगळे खुर्चीची गाजरे खात आहेत. कोणालाही यात ५० च्या वर जागा मिळणार नाहीत. मग बारा घोड्यांचा रथ आठ दिशांना ओढला जाईल. people get the govt they deserve. ( लोकांना आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा