Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !!

अ
अभिजित - १
Wed, 08/15/2018 - 10:28
🗣 80 प्रतिसाद
FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !! आत्ता राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदींना हे विधेयक माघारी घ्यावे लागले. बरीच राज्य जिंकल्या मुळे आता हळूहळू राज्यसभेत भाजपचे बहुमत निर्माण होत आहे. आता प्रश्न आहे फक्त २०१९ चा !! तर आपण सर्वानी भाजप ला प्रचंड मतांनी विजयी करू या. म्हणजे भाजप हे विधेयक पास करू शकेल. आपल्या खिशाला थोडा चुना लागला तरी काय हरकत आहे ? मोदींचे स्वप्न पूर्ण करणे हे आपलेच घरचे कार्य आहे !! अजून एक - आता यापुढे देशात कोणतेही इतर सरकार येणारच नाहीए मुळी !! फक्त भाजप एके भाजप !! त्या मुळे या विधेयकाचा भविष्यात कोणी गैर वापर करेल हि शंकाही मनात बाळगू नका !! थोडी जुनी माहिती वाचा. FRDI + bail in यावर मोदी सरकार ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीपेक्षा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. किंबहुना यामुळे सर्वसामान्य बँक खातेदाराची कधीही नोटाबंदी होऊ शकते. या विधेयकाला केंद्र सरकारने जून २०१७ मध्ये मंजुरी दिली आहे. बुडित खात्यात गेलेल्या बँकांना यामुळे दिलासा मिळेल. मात्र याचा फटका बँकांच्या ग्राहकांना सोसावा लागेल. ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’मुळे अनेकांच्या मनात भीतीची भावना आहे. यामुळे बँक बुडत असल्यास, त्यांच्याकडून ग्राहकांचा पैसा वापरला जाऊ शकतो. सर्वसामान्य बँक खातेदारांचा पैसा परत करण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल. हा कायदा बँकांसाठी तसा नवीन नाही. १९६१ मध्ये संसदेने ‘डिपॉजीट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ कायदा मंजूर केला होता. या कायद्यामुळे बँक बुडित खात्यात गेल्यास, बँक ग्राहकांना जास्तीत जास्त १ लाख रुपये खातेदारांना देणे लागते. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा अधिक रक्कम असल्यास, ती संपूर्ण रक्कम बँक आपल्या ताब्यात घेऊन तिचा वापर करु शकते. मोदी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणल्यास बँकांना जास्त अधिकार मिळतील. यामुळे सरकारी बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ होईल. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसेल. यामुळे बँकांना ‘बेल-इन’चा अधिकार मिळेल. त्यामुळे बुडणाऱ्या बँकांना थेट खातेधारकांचा पैसा वापरता येईल. ‘बेल-इन’मुळे खातेधारकांचे त्यांच्या खात्यावर कोणतेही नियंत्रण राहणार नाही.

प्रतिक्रिया द्या
26561 वाचन

💬 प्रतिसाद (80)
श
शाम भागवत Tue, 08/21/2018 - 07:14 नवीन
२०१४ नंतर सामान्य लोकांची लायकी व हुषारी खूप वाढली आहे असे मला वाटतेय. २०१४ च्या लोकसभा निवडणूकांनंतर मोदी सतत पक्षासाठी मत मागत आहेत व सामान्य लोक त्यांना फार निराश करत नाहीयेत. २०१९ साली मोदी स्वतःसाठी मते मागायला येणार आहेत. तेव्हा मात्र सामान्य लोक त्यांना निराश करतील असे खरोखरच तुम्हाला वाटते? मला वाटते की, २०१४ च्या व त्या नंतर झालेल्या बहुतांश निवडणूकीत सुशिक्षित मंडळींपेक्षा सामान्य माणसांनीच मोदींना साथ दिलीय. पण या सुशिक्षीत माणसांना धडा शिकवण्यासाठी सामान्य माणसांनी त्यांचा हा कल बदलून, मोदींच्या विरोधात मत देऊन मोदींना पाडावे असे तुम्हाला वाटत असेल तर मी काय बोलणार? हम्म् जे काय होयचे असेल तर ते होऊ दे. पण सुडाचे समाधन मला नकोरे बाप्पा. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Tue, 08/21/2018 - 08:47 नवीन
हा नोटबंदीत ज्यांचे काळे पैसे बुडाले आहेत त्यानि मोठ्या तोंडाने केलेला आक्रोश आहे असे किती काळे पैसे बुडाले? सरकार तो आकडा जाहीर का करत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/21/2018 - 15:36 नवीन
असे किती काळे पैसे बुडाले? सरकार तो आकडा जाहीर का करत नाही? गोडसे बुवा आपल्या प्रतिसादावरून आपल्याला काळ्या पैशाचे मूलभूत यमक माहिती नाही असं दिसतंय. जे उत्पन्न कर चुकवलेलं किंवा सरकारच्या हिशेबाच्या/ नोंदीच्या बाहेर आहे त्याला काळा पैसा म्हणतात. हा जर मुळात सरकारच्या चोपडीत आलाच नाही तर सरकार तो जाहीर कसा करणार? तुम्ही एखाद्या एजंटला आपली मोटार दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी पैसे दिलेत आणि त्यातील काही हिस्सा त्याने आर टी ओ अधिकाऱ्याला दिला तर त्याची नोंद सरकार दरबारी होणारच नाही.मग सरकार हे पैसे किती आणि कसे जाहीर करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 08/21/2018 - 15:55 नवीन
आपल्या प्रतिसादावरून आपल्याला काळ्या पैशाचे मूलभूत यमक माहिती नाही असं दिसतंय. पंतप्रधानांना तर नक्कीच माहीत असणार, कारण नोटबंदी करतेवेळी अमूक इतके काळे धन आपोआप बाद होईल असं पंतप्रधान म्हणाले होते.नक्की कीती काळे धन बाद झाले हे त्यांना नक्कीच माहीती असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजित - १ Tue, 08/21/2018 - 16:21 नवीन
मोदी ने कहा-लोगों के पास 30 दिसंबर तक का ही समय है 30 दिसंबर तक लोगों के पास समय है। तब तक कोई मुश्किल नहीं होगी। उनका हक मिल जाएगा। कुछ लोग सोचते होंगे कि 30 दिसंबर के बाद कुछ हो जाएगा। मैं ऐलान कर दूं कि 30 दिसंबर के बाद आपको ठिकाने लगाने के कुछ नहीं आएगा, इसकी गारंटी नहीं है। किसी को बख्शा नहीं जाएगा अगर किसी ने कालाधन बैंक में यह सोचकर जमा किया तो देखा जाएगा तो, उसे छोड़ा नहीं जाएगा। जो मुझे जानते हैं, वह समझदार हैं। ऐसे लोग अब सोचते हैं कि गंगाजी में बहाना बेहतर है। पैसे मिले न मिले, पुण्य तो मिल जाएगा। ईमानदार लोगों के लिए मेरी सरकार सबकुछ करेगी, बेईमान का हिसाब बराबर किया जाएगा। https://www.thehindu.com/business/Economy/only-12-of-demonetised-1000-notes-did-not-return-rbi/article19590311.ece 99% of demonetised notes returned, says RBI report काळा पैशावाल्यानी आपल्याला वेडा बनवला हे कळल्यावर जेटली फिरला. UTURN !! Confiscation of money was never the objective of the exercise: Arun Jaitley
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
त
तेजस आठवले Tue, 08/21/2018 - 11:46 नवीन
सुरेख प्रतिसाद. मोदी लुटत आहेत असे मला म्हणायचे नव्हते, माझा मुख्य रोख हा लोकांच्या खोलात न जाण्याच्या मानसिकतेचा आणि पटकन दुसरे टोक गाठण्याच्या विचारसरणीचा होता. म्हणजे रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या माणसाला चौरस जेवण वाढावे आणि भातावर तूप नसल्याने चिडून जाऊन त्याने परत शिळेपाके जवळ करावे असे काहीतरी. काँग्रेसच्या राजवटीची सवय झाली आहे हा मुद्दा पण मान्य आहे.काँग्रेस/भाजप दोघेही मला लुटणारच आहेत मग जो बऱ्याच वर्षांपासून लुटतो आहे त्यालाच लुटायला देऊया, असा विचार काही लोक करू शकतात.लुटीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अभ्या.. Tue, 08/21/2018 - 14:30 नवीन
पलसरेटने पैसे घेणाऱ्या बिसेनेल ला खाजगी मोबाईल कंपन्यांनी बाजूला सारले. एकेका जीबीला 499 रुपये मोजणाऱ्या कंपन्या 150 रुपयात एक जीबी देऊ लागल्या. जिओ येताच दिवसाला दीड जीबी 5 रुपयात देतात. अगदीच आहे त्या सोंगट्या उलट पालटून फिरवण्यापेक्षा नवा पर्याय येणे हाच उपाय वाटतो. सगळेच सर्व्हिस देतात आणि त्यांना वाटेल तसे लुटतात ह्यापेक्षा त्या सर्व्हीसची योग्य किंमत दोन्ही बाजू पारदर्शकपणे समजून घेतील असे होऊ शकणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
च
चौथा कोनाडा Mon, 08/20/2018 - 14:05 नवीन
माहितीपुर्ण चर्चा ! प्रतिसादांवरून बर्‍याच गोष्टींचा बोध झाला.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/09/2018 - 12:59 नवीन
अवांतर : ट्रेड मार्क, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. नीरव मोदीच्या बाबतीत पंप्र कार्यालय अगदीच अनभिज्ञ होतं असं म्हणता येत नाही. थोडा दोष पंतप्रधानांकडे जातोच. पण तुम्ही म्हणता तो ११४०० कोटींचा आकडा संप्प्र्ण घोटाळ्याचा आहे. बुडलेले पैसे बरेच कमी असावेत. ही रक्कम वर्षानुवर्षे चढलेल्या अतिरिक्त व्याजांमुळे फुगलेली दिसते आहे. बहुतेक नीरव मोदीला याची जाणीव होती. यातनं सुटण्यासाठी त्यानं सिंगापुरात धंदा खोलायचं ठरवलं होतं. जागतिक व्यवसायमुद्रा (ग्लोबल ब्रांड) ठरवलाही होता. पण कुठंतरी माशी शिंकली आणि त्याची पंन्याब्यातली अतिरिक्त कर्जं उघड झाली. ती जर उघडी पडली नसती तर ठरल्याप्रमाणे जुलै २०१८ मध्ये त्याचा धंदा सुरू झाला असता व त्याने एकेक करून पंन्याब्याची फुगलेली कर्जं फेडली असती. निदान त्याचा बेत तरी तसा असावा असा संशयाचा फायदा देऊन म्हणता येतं. बहुधा म्हणूनंच नरेंद्र मोदीही शांत राहिले असावेत. 'तुम्ही केलेल्या बदनामीमुळे माझा धंदा बसला आहे' हा नीरव मोदीने केलेला युक्तिवाद खरा असू शकतो. मात्र तसा असला तरी तो ग्राह्य धरावा की नाही याबद्दल मतमतांतरे असू शकतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sun, 09/09/2018 - 18:10 नवीन
अजून बऱ्याच बँक ना चुना लावला आहे. एकूण ३० हजार कोटी रु चा झोल आहे. हि घ्या एक बातमी. बाकी अजून तुम्ही शोधा !! https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/cbi-probing-another-rs-5280-crore-loan-taken-by-mehul-choksi-and-his-companies/articleshow/63719029.cms CBI probing another Rs 5,280 crore loan taken by Mehul Choksi and his companies बाकी केवळ मोदींच्या जवळ असल्या मुले नीरव कसा साफ / शुद्ध चरित्राचा असून लोन फेडण्याचा त्याचा पूर्ण विचार होता हे ऐकून ज्याम हसू आले. त्याने किती लोकांना २/३ हजार चे हिरे लाखोंचे आहेत असे सांगून चुना लावलाय त्याचा पण शोध घ्या गुगल वर .. http://zeenews.india.com/hindi/business/nirav-modi-and-mehul-choksi-used-to-sell-fake-diamond-in-lakhs/375210 नीरव-मेहुल की जोड़ी का 'काला खेल', ऐसे 50 लाख में बेचते थे 2000 रुपए का हीरा! पीएनबी घोटाले के दो अहम किरदार, न सिर्फ बैंक का पैसा लेकर भागे, बल्कि लोगों को भी खूब ठगा. इन दोनों की जोड़ी हेराफेरी में माहिर है. इन्हें ठगी का उस्ताद कहा जाए तो गलत नहीं होगा. हिमेश रेशमिया को भी ठगा संतोष श्रीवास्तव ने कहा कि संगीतकार हिमेश रेशमिया को एक टीवी विज्ञापन करने के एवज में 50 लाख के हीरे देने का वादा किया गया था और विज्ञापन हो जाने पर रेशमिया को हीरे दे दिए गए. लेकिन रेशमिया ने जब इन्हें दूसरी जगह जांचा तो पता चला कि हीरों की कीमत तो बेहद कम थी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
ट्रेड मार्क Sun, 09/09/2018 - 20:58 नवीन
अभिजित पहिले तुम्हाला मुद्दा खरंच समजत नाही का समजून घ्यायचा नाहीये. माझा किंबहुना गापै यांचा मुद्दा काय आहे तर ११४०० कोटींचा घोटाळा आहे असं म्हणतात पण त्यातला खरा बँकेकडून गेलेला पैसा किती हे नक्की माहित आहे का? मी जे एनपीए झालेल्या कर्जाबद्दल सांगितलं होतं की खातेदाराला दिले गेलेले पैसे ही रक्कम आणि मग ती न भरल्याने त्यावर वाढीव दराच्या चक्रवाढ व्याजाने वाढलेली रक्कम यात गल्लत केली जाते. कृपया गुगलून बघावे किंवा माझे याच धाग्यातील प्रतिसाद परत नीट वाचावे. ५२८० कोटींच्या बद्दल बातमी आहे त्यात स्पष्ट म्हणलं आहे की याचा आणि पीएनबीच्या Foreign Letters of Credit आणि लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंगच्या घोटाळ्यात काही संबंध नाही. ५२८० कोटींच्या प्रकरणात ३१ बँकांनी मिळून गीतांजली ग्रुपला हे वर्किंग कॅपिटल म्हणून कर्ज दिलं. CBI यात फक्त काही गडबड नाही ना याचा तपास करत आहे. जरा बातमी नीट वाचा हो. बाकी केवळ मोदींच्या जवळ असल्या मुले अहो तो स्वतःच स्वतःच्या जवळ असणारच ना? निरव मोदी हा नरेंद्र मोदींच्या जवळचा आहे असं तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या या प्रतिसादात दिलेल्या या लिंकमधील लेख तुम्हीच नीट वाचलेला दिसत नाहीये. या लेखात असं स्पष्ट म्हणलंय की, "राहुल गांधींची भेट घेणाऱ्या नीरव मोदीच्या गीतांजली जेम्सला १५५० कोटींचे कर्ज देण्यास विरोध केल्याबद्दल काँग्रेसच्या सत्ताकाळात अलाहाबाद बँकेचे तत्कालिन संचालक दिनेश दुबे यांना तेव्हाच्या वित्त सचिवांनी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते". आता सांगा बघू कोण कोणाच्या जवळ होते आणि आहे? नीरव कसा साफ / शुद्ध चरित्राचा असून लोन फेडण्याचा त्याचा पूर्ण विचार होता हे ऐकून ज्याम हसू आले. त्याने किती लोकांना २/३ हजार चे हिरे लाखोंचे आहेत असे सांगून चुना लावलाय त्याचा पण शोध घ्या गुगल वर निरव मोदीला कोणीच सोवळ्यातला म्हणत नाहीये. बाकी सगळेच हिरे, "मौल्यवान" खड्यांचा धंदा करणारे आणि सोनार सुद्धा सामान्य लोकांना कमी अधिक प्रमाणात फसवत असतातच. तुमच्या माहितीतील कोणी हिऱ्यांचा व्यापारी आणि सोनार अगदी सचोटीने व्यवहार करणारा असेल तर इथे त्याचे नाव पत्ता जाहीर करावे. समस्त मिपाकरांना फायदा होईल. सध्याच्या जगात फक्त जो सापडतो तो चोर आणि ज्याच्या नावाने न्यूज चॅनेल जास्त आरडाओरडा करतात तो मोठा चोर असं समजलं जातं. त्यामुळे निरव मोदीबद्दल मला तरी कळवळा नाही, तो पकडला गेलाच पाहिजे आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने बुडवलेले पैसे वसूल व्हायला पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Mon, 09/10/2018 - 18:02 नवीन
किंबहुना गापै यांचा मुद्दा काय आहे तर ११४०० कोटींचा घोटाळा आहे असं म्हणतात पण त्यातला खरा बँकेकडून गेलेला पैसा किती हे नक्की माहित आहे का? म्हणजे व्याज बुडाले, याचा अर्थ बँक चे पैसे बुडाले असा तुमच्या ( आणि गामा पै पण ) मते तरी होत नाहीए तर. ?? चालू द्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ग
गामा पैलवान Mon, 09/10/2018 - 18:12 नवीन
अभिजित - १, व्याज बुडणे व मुद्दल बुडणे यांतला फरक तुम्हांस ठाऊक असेल अशी आशा आहे. सावकार अशिक्षित वनवासींना पिळून काढतांना भरमसाट व्याज लावतात. जेणेकरून मुद्दलाची परतफेड शक्च होऊ नये. तसा काहीसा प्रकार झालेला तर नाही ना? खातरजमा करून घ्यायला हवी. शिवाय पंजाब न्याशनल बँकेला नीरवनानांसाठी नवीन हमीपत्र प्रसृत करतांना घसघशीत फी मिळायची. म्हणजे या आतबट्ट्याच्या व्यवहारात बँकेचा पण हात आहे. पूर्ण सत्य बाहेर यायला हवंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Mon, 09/10/2018 - 18:27 नवीन
सावकार अशिक्षित वनवासींना पिळून काढतांना भरमसाट व्याज लावतात. जेणेकरून मुद्दलाची परतफेड शक्च होऊ नये. तसा काहीसा प्रकार झालेला तर नाही ना? खातरजमा करून घ्यायला हवी. हो हो अडाणी / गरीब आदिवासींना जसे फसवलं तसंच बिचाऱ्या नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल भाई याना फसवलं आपल्या PSU बँक नि !! तुम्ही लोक कोणती पातळी गाठाल ?? मोदी च्या डिफेन्स मध्ये ?? इतकी भक्ती कधी बघितली नव्हती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
ट्रेड मार्क Mon, 09/10/2018 - 23:40 नवीन
हे सामान्य ज्ञान आहे हो. मुद्दल आणि व्याज याची गणितं आपल्याला शाळेपासून आहेत, त्यामुळे दोन्ही संज्ञा आपल्याला कानावरून गेल्या असतील. याच धाग्यात माझ्या प्रतिसादांमध्ये मी थोडं उलगडून सांगितलं आहे अजून माहिती हवी असेल तर "How banks charge interest on loans" असं गूगलमध्ये टाईप केलंत तर पुढील माहिती मिळेल. जर नाहीच काही समजलं तर तुमच्या ओळखीत कोणी बँकेत काम करणारा असेल (ICICI/ HDFC/ Axis वगैरे मधले sales वाले नको) तर त्यांना फक्त मुद्दल आणि व्याज बँक कसं मोजते, ते ताळेबंदात कसं मांडलं जातं, कर्जखाती एनपीए कशी होतात आणि त्याचं व्याज नंतर कश्या पद्धतीने आकारलं जातं, त्यातलं नक्की काय बुडतं, या खात्यांची सेटलमेंट कशी करतात, तेव्हा त्यातील काय write-off केलं जातं हे केवळ माहिती म्हणून विचारा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे निरव मोदीला (या ११४०० कोटींच्या घोटाळ्यात) लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट दिलं होतं. तुम्हाला जर का साधं कर्ज आणि त्यावरचे व्याज यातील नक्की काय बुडते आणि त्यामुळे बँकेचे नक्की नुकसान किती होते हे समजायला कष्ट पडत असतील तर LoU आणि FLC समजणे अवघडच आहे. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेतल्या अधिकाऱ्यांनी संगनमताने खोटी LoU आणि FLC तयार केली होती, त्यामुळे हा सरळसरळ फ्रॉड आहे. दर वर्षी बँकांची इंटर्नल, एक्सटर्नल आणि (बहुतेक) दर ३ वर्षांनी आरबीआय अशी ऑडिट्स असतात. या एकाही ऑडिटमध्ये हा घोटाळा सापडला नाही म्हणजे बघा. एवढ्या संख्येनं आणि मोठ्या रकमेच्या LoU आणि FLC इश्श्यु झाल्या होत्या म्हणजे अगदी सहज नजरेत यायला पाहिजे होत्या. पण मुद्दामून नजरेआड केल्या असाव्यात का? मोदी च्या डिफेन्स मध्ये ?? यात कुठल्या मोदींचा डिफेन्स मी किंवा गापै करत आहोत? निरव मोदी चोर आहे हे सगळ्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. त्याने बँकेतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गंडा घातला हे जगजाहीर झालं आहे. तुमचं म्हणणं जर नरेंद्र मोदींबद्दल असेल तर तुमचे लाडके रघुराम राजनच आता बँकांच्या या परिस्थितीला आणि एनपीएला UPA ला जबाबदार धरत आहेत. त्यामुळे आमच्या डिफेन्सपेक्षा जोरदार डिफेन्स कुठून आलाय बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
सुबोध खरे Tue, 09/11/2018 - 06:30 नवीन
ट्रेंड मार्क साहेब तुम्ही कशाला बधिर माणसांना भगवद्गीतेचा अर्थ समजावून सांगताय? मुळात ऐकूच येत नाही तर समजणार काय आणि त्यावर मनन चिंतन काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अभिजित - १ Tue, 09/11/2018 - 07:48 नवीन
गामा पैलवान, नीरव मोदी बाबत - सावकार अशिक्षित वनवासींना पिळून काढतांना भरमसाट व्याज लावतात. जेणेकरून मुद्दलाची परतफेड शक्च होऊ नये. तसा काहीसा प्रकार झालेला तर नाही ना? खातरजमा करून घ्यायला हवी. तुम्हाला यात काहीच वावगे वाटत नाही , यातच दिसून येते. कोण बधिर आहे ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 09/11/2018 - 08:37 नवीन
तो प्रतिसाद तुम्हाला नव्हता ट्रेंड मार्क साहेबाना होता. तुम्ही टेन्शन घेऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
प
प्रसाद_१९८२ Tue, 09/11/2018 - 08:41 नवीन
म्ही कशाला बधिर माणसांना भगवद्गीतेचा अर्थ समजावून सांगताय? -------------- सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रेड मार्क Mon, 09/10/2018 - 21:12 नवीन
बँकांच्या वाढलेल्या एनपीए संदर्भात संसदीय समितीला उत्तर देताना रघुराम राजन यांनी युपीए सरकारच्या घोटाळ्यांना आणि अकार्यक्षमतेला दोष दिला आहे. अभिजित-१, थत्तेचाचा वगैरेना ही बातमी एकतर दिसलीच नसेल किंवा आता रघुराम राजन यांना पण मोदींनी भुलवलं असं वाटत असेल. इथे तर ५ दिवसांपूर्वीच बातमी आली आहे आणि आज रिपब्लिकने दिली आहे. परंतु बाकी कोणत्या पुरोगामी वृत्तपत्राला ही बातमी फारशी महत्वाची वाटली नसावी. राजन यांचा कार्यकाळ संपला तेव्हा, नोटबंदीच्या वेळेला राजन कसे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम आरबीआय गव्हर्नर होते यावर दिवसेंदिवस हायलाईट होत होतं. आता एक छोटीशी बातमी द्यावीशी पण वाटत नाहीये? रघुराम राजन यांना पण आरएसएसने कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं होतं काय? राजन कसे वाईट गव्हर्नर होते अश्या धाग्याची वाट बघतो. कदाचित अशी अजून एक दोन विधानं केल्यावर येतीलच. मला एका गोष्टीचं कायम आश्चर्य वाटत आलं आहे की मोदींना मानणाऱ्यांना मोदीभक्त म्हणून हिणवताना ते स्वतः राहुल किंवा सोनिया गांधींची भक्ती करतात याचं काहीच वाटत नाही? असो, असते आवड एकेकाची!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/11/2018 - 08:41 नवीन
अभिजित - १,
तुम्ही लोक कोणती पातळी गाठाल ?? मोदी च्या डिफेन्स मध्ये ?? इतकी भक्ती कधी बघितली नव्हती !!
बँकेचे भ्रष्ट अधिकारी मेहुलमामा आणि नीरवनाना यांच्या आड लपून तर राहिले नाहीयेत ना? या दोघांना शिक्षा झाली तरी हे भ्रष्ट अधिकारी परत दुसरा घोटाळा करू शकतात. त्यांनासुद्धा कायद्याच्या जाळ्यात पकडायला हवं ना? समजंत असेल तर समजावून घ्या, नाहीतर सोडून द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Tue, 09/11/2018 - 09:38 नवीन
५६ इंच छाती गप्प का आहे मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डँबिस००७ Tue, 09/11/2018 - 16:29 नवीन
एनपीएला तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार: रघुराम राजन यु पि ए चे गढे मुर्दे अब बहार आ रहे है ! आता ५६ इंच छाती जास्तच फुगणार !! भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वाढत्या थकीत कर्जाला (एनपीए) तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात त्यांनी यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. घोटाळे आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे सरकारची निर्णय घेण्याची गती मंदावली होती. त्यामुळे एनपीए वाढत गेला, असे त्यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटले आहे. भाजपाचे ज्येष्ठ खासदार मुरलीमनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. आपल्या उत्तरात राजन म्हणाले की, बँकांकडून मोठ्या कर्जांवर उचित कारवाई करण्यात आली नाही आणि २००६ नंतर विकासाचा वेग कमी झाल्याने बँकांच्या वृद्धीची आकडेवारी ही अवास्तविक झाली. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी एनपीएच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राजन यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. एनपीएला योग्यरितीने ओळखण्याचे श्रेय राजन यांना जाते. देशातील एनपीएची समस्या इतकी गंभीर का झाली हे त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ट
ट्रेड मार्क Tue, 09/11/2018 - 18:21 नवीन
थोडं डोळे उघडे ठेऊन आणि तटस्थ राहून संशोधन केलं की गोष्टी सापडतात. केस दाखल झाल्या झाल्या लगेच निरव आणि मेहूलच्या प्रॉपर्टीज जप्त केल्या गेल्या. पीएनबीच्या अधिकाऱ्यांना अटक केली गेली. तसेच भारतीय सरकारने निरव आणि मेहुल यांच्या अटकेसाठी इंटरपोलची मदत मागितली आहे. कालच इंटरपोलने निरवच्या बहिणीसाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. या आधी कुठल्या सरकारच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली होती हे उदाहरणासहित दाखवून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
U
Ujjwal Wed, 09/12/2018 - 17:26 नवीन
तद्दन काँग्रेसी प्रोपगँडा (राजीव त्यागी, पवन खेडा, प्रियंका चतुर्वेदी, रत्नाकर महाजन छाप) मुद्दे न सापडल्यास मूळ विषयाला बगल देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ट
ट्रेड मार्क Tue, 09/11/2018 - 22:39 नवीन
ब्लॉग लिहिणार्याचे नाव आणि वरचा इशारा वाचून मोदीत्रस्त लोक कदाचित या ब्लॉग वर फिरकणार नाहीत. पण जर "मी तटस्थ आहे" असं स्वतःबद्दल वाटत असेल तर जरूर वाचावे. भाग १ भाग २
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/11/2018 - 23:08 नवीन
अभिजित - १,
५६ इंच छाती गप्प का आहे मग ?
५६ इंची छाती घसा फोडून बोंबलत होती की आळशी कर्जं ८० लाख कोटी रुपये झालीत. ८० लाख कोटी म्हणजे ८० वर १२ शून्यं बरंका! त्यावेळेस तुमच्या काँग्रेसची कुठलीशी बाई शूर्पणखेसारखी हसंत होती. कुणाला कसलं गांभीर्य आहे ते कळतं नाहीका यातनं! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Wed, 09/12/2018 - 15:38 नवीन
"Sent High-Profile Fraud List To PM's Office": Raghuram Rajan's Bombshell "Why didn't the PM take action against these known defaulters? When we demitted office the NPA was 2.83 lakh crore. How much is bad loans today- it's Rs. 12 lakh crore," said Congress leader Randeep Surjewala. आपण हा धागा फक्त FRDI पुरताच मर्यादित ठेवू या का ? ट्रेडमार्क तुम्ही नवीन धागा उघडा - मोदींचे अर्थशास्त्र किंवा तत्सम ..
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/13/2018 - 15:48 नवीन
गंमतच आहे, विषय तुम्ही भरकटवला. माझे प्रतिसाद व्यवस्थित मुद्द्याला धरून मोदीना कुठेही मध्ये न आणता बँक कशी चालते आणि कशी अडचणीत येते हे सांगणारे आहेत. मोदी, त्यांचे भक्त, निरव वगैरेंना तुम्ही मध्ये आणलं आहे त्यामुळे धागा भरकटवण्याचं श्रेय तुम्हालाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला मोदींचे अर्थशास्त्र वगैरे धागे काढण्याची गरज नाही. तुम्ही असे "अभ्यासपूर्ण" धागे काढत आहातच, ज्यावर मी माझं मत मांडतो आणि एखाद्या निर्णय घेण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करतो. जरा नीट बघितलेत तर मी किंवा इतर कोणीही जे मुद्देसूद प्रतिसाद दिले आहेत त्यावर तुम्ही एकतर प्रतिसादच दिले नाहीयेत किंवा जे दिले ते मुद्द्याला धरून नाहीयेत. कुठलया तरी रँडम बातमीचा दुवा आणि त्यातला एक पॅरा चिकटवला म्हणजे प्रतिसाद किंबहुना धागा पण होत नाही. त्यामुळे खरंच तुम्हाला अभ्यास वाढवला पाहिजे, तटस्थपणे एखाद्या घटनेकडे कसं बघावं हे शिकलं पाहिजे. यातली पहिली पायरी म्हणजे तुमच्या ब्राऊझरची cache, from beginning of the time क्लिअर करा. असो. मी सांगण्याचं काम केलं आहे, सुधारायचं का नाही हे तुम्ही ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ड
डँबिस००७ Wed, 09/12/2018 - 19:12 नवीन
तुमच्या काँग्रेसची कुठलीशी बाई शूर्पणखेसारखी हसंत होती. कुणाला कसलं गांभीर्य आहे ते कळतं नाहीका यातनं! कॉम्ग्रेसच्या स्कॅम मुळेच कर्जं ८० लाख कोटी रुपये झालीत. नॅशनल हेराल्ड केस मध्ये पुर्ण दोषी ठरण्याच्या मार्गावर असताना काँग्रेसवाले फक्त जनतेला मुर्ख ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदीजींनी आता बाकीच्या केसेस मध्ये वेगाने तपास कार्य करुन दोषी नेत्यांना गजाआड केल पाहीजे त्याने लोकांमध्ये एक सुरक्षीततेची जाणीव येईल. २०१९ मध्ये मार्ग प्रशस्त होईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा