नाना आणि तनुश्री
आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s
मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा"माई तुम्ही मी टाकलेला व्हिडीओ नीट बघितला का? ही बातमी पण वाचा. नृत्य दिग्दर्शकाने पण तिला बरेच वेळा स्टेप्स दाखवल्या. त्यात तिने Sexual Harassment सारखा गंभीर आरोप लावला आहे. समजा असं समजू की नाना सेट वर गेला आणि तिचा हात धरून तिला नाच शिकवू लागला. हे एकवेळ अशिष्ट वर्तन म्हणता येईल. नानाने काही अश्लील चाळे केले किंवा अश्लील बोलला असं काही दिसत नाही किंवा तनुश्री सुद्धा तसं काही म्हणत नाहीये. इथे मी शहाणा चा प्रश्नच येत नाहीये कारण नृत्य दिग्दर्शक, सिनेमा दिग्दर्शक आणि इतर सहाय्यकांनी पण तिला स्टेप्स दाखवायचा तसेच चेहऱ्यावर हावभाव आणावे म्हणून प्रयत्न केला. मी कोणाची बाजू घेतोय असं नाही पण प्रश्न हा आहे की १० वर्षांपूर्वीची गोष्ट सिद्ध कशी करणार? सहकलाकाराचा हात धरून नाचणे हा #मीटू इतका गंभीर गुन्हा कधीपासून झाला? तिने जरी १० वर्षांपूर्वी पण तक्रार केली होती तरी त्यातून काही सिद्ध झालं होतं का? त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे तक्रार केली म्हणजे समोरचा दोषीच असणार हा दृष्टिकोन का? तुम्ही एखादा व्यवसाय स्वीकारता तेव्हा त्यातील लिखित व अलिखित नियम तुम्हाला माहित पाहिजेत. सिनेमा क्षेत्रात असूनही अंगप्रदर्शन करणार नाही किंवा उत्तेजक दृश्य करणार नाही असे सांगून निभावणाऱ्या पण नट्या आहेतच.