Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाना आणि तनुश्री

फ
फुकनी
Sun, 10/07/2018 - 22:07
🗣 151 प्रतिसाद
आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल. https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s

प्रतिक्रिया द्या
72013 वाचन

💬 प्रतिसाद (151)
अ
अर्धवटराव Wed, 10/10/2018 - 16:17 नवीन
तनुश्री आणि नाना, दोघांपैकी कुणीच बोलत असल्याचं खोटं वाटत मला. (नानाच्या अभिनयाबद्दल तनुश्रीने उद्गार थोडे बाजुला ठेऊया) अवांतरः "मीपण" चे लोण माननीय मोदिजींपर्यंत कधि पोचतेय याची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 10/10/2018 - 16:21 नवीन
मानसी सोनी ह्या नावाने आंतर्जालावर शोध घेतलात तर बरेच काही सापडेल. अमितभाई शहा जिच्यावर पाळत ठेऊन होते ती हीच तरूणी. तू-नळीवर अमित शहा व तत्कालिन गुप्तचर अधिकारी जी.एल.सिण्घल ह्यांचे संभाषण उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 17:06 नवीन
तनुश्रीची अर्णव गोस्वामीला दिलेली अलिकडची मुलाखत , आणि नाना पाटेकरांची २००८ मधली पत्रकार परिषद दोघेही खरेच बोलत आहेत असे गृहीत धरुन दोन दोनदा पुन्हा पहा काय झाले असेल याचा अदमास येण्यास मदत व्हावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 10/10/2018 - 17:12 नवीन
पण वाक्यरचनेकडे थोडं लक्ष्य द्या अर्धवटराव. मिपाकर उदार मनाने अर्थ समजुन घेतात हे त्यांचं मोठेपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 17:16 नवीन
नेमकं कुठे आणि काय बिघडलय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 10/10/2018 - 18:14 नवीन
तनुश्री आणि नाना, दोघांपैकी कुणीच बोलत असल्याचं खोटं वाटत मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/11/2018 - 12:18 नवीन
ज्यांनी फिल्लम लाईन फार जवळून बघीतली आहे, त्यांनीच लिहिलेला खालील लेख, फिल्लम लाईन बद्दल बरेच काही सांगून जाईल. https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/article-about-yeh-hai-mumbai-meri-jaan-2-1725548/
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/11/2018 - 12:45 नवीन
"पण कपूर चांगले आहेत" हे वाक्य वाचले व लेख वाचयचा थांबवला. राज कपूर्/शम्मी कपूर/आपले राजा गोसावी! सध्या हिरो असते तर 'मी टू' मध्ये त्यांच्याविरुद्ध डझनावारी तक्रारी आल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/11/2018 - 12:51 नवीन
माईसाहेब तुमच्या काळात हि या गोश्टी घडत होत्या. ओझरते उल्लेख त्या काळच्या साहित्यात दिसतात म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/11/2018 - 13:15 नवीन
चित्रपटान्,नाटकात काम करयची ईच्छा आहे असे कोणी घरात साण्गितले की घरातले लोक बदडून काढायचे.. ह्याचे कारण हेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
र
रुपी गुरुवार, 10/11/2018 - 19:25 नवीन
विश्वामित्रांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातल्या काहींनी तर माफीसुद्धा मागितली. यातल्या कुणाकुणाला क्लीन चीट देणार आता इथले काही आयडी? तनुश्री दत्ताने सुरुवात केल्यामुळे निदान बर्‍याचजणी पुढे तरी आल्या आहेत. सिनेमा क्षेत्रात हे होणं अनपेक्षित नसले तरी बर्‍याच बातम्या धक्कादायक आहेत. आलोक नाथ आणि विकास बहलबद्दलच्या तर बातम्या वाचून त्या प्रसंगांतून जाणार्‍या स्त्रियांची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो! आणि सगळ्याच जणी आताच, खूप वर्षांनंतर हे आरोप करत आहेत असंही नाहीये. अगदी सोशल मिडिया नसेल वापरलं तरी निदान काहींनी कुणाकडे तक्रार केलीच होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही किंवा त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला गेला. "स्वतःच्या फायद्या साठी काही जणी पुरुषांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात , आणि समस्त स्त्री वर्ग बदनाम होतो .", " देव आणि ऋषींना तो मोह सोडता आला नाही तिथे नाना काय करणार ?" असला डिफेन्स बघून तर काय बोलावे हेच कळत नाही! बायका गप्प राहिल्या तर "इतकी वर्षे गप्प का होत्या?" , आणि बोलल्या तर "आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?" असे प्रश्न! तसे तर विकास बहल बद्दल बॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच माहीत होतं म्हणे, तरी आता या बायका बोलल्यावर इम्रान खान आणि अर्जुन कपूर पुढे आलेतच ना ते कबूल करायला. मुळात सेक्शुअल हॅरॅसमेंटकडे लोक "स्त्री विरुद्ध पुरुष" या अँगलमधूनच बघायचे टाळले तरी बरे होईल. बाकी ते "बॉलीवूड विरुद्ध मराठी चित्रपट सृष्टी" तर कैच्याकैच आहे!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 05:39 नवीन
मिपा सदस्य ट्रम्प यांचा हा प्रतिसाद उपहासात्मक असावा असे प्रथमदर्शनी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 06:54 नवीन
'सिनेमा क्षेत्रात हे होणं अनपेक्षित नसले तरी ...' हे उपरोक्त प्रतिसादातील वाक्य. आणि मिपा आयडी सामान्य नागरिक यांच्या प्रतिसादातील क्रमांक २ चे वाक्य दोन्ही चित्रपट सृष्टीबद्दल पुर्वग्रह दर्शवत नाहीत का ? मिडियातील वृत्तांच्या प्रभावाने तात्कालिककाळाची उबळ व्यक्त करणे ठिक आहे. पण एकुण सामाजिक संस्कृतीत जे असते तेच कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रात असणार नाही का ? मुळात सेक्शुअल हॅरॅसमेंटकडे लोक "स्त्री विरुद्ध पुरुष" या अँगलमधूनच बघायचे टाळले तरी बरे होईल. याच्याशी सहमत. निवड स्वातंत्र्य आणि कंसेंट या बाबत स्त्रीयांच्याही कल्पना अद्यापी पुरेश्या क्लिअर नसतात, कायद्यांचे बारकावे आणि न्यायव्यवस्थे विषयक अज्ञान आणि अनास्था आहे. त्याच वेळी वाढत्या संधींसोबत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत काम करण्यास मिळत आहे. निवड स्वातंत्र्य आणि कंसेंट कायदे याचा अवेरनेसचा अभाव सोबत सामाजिक संस्कार कमी पडलेल्या मुल्ये पायदळी तुडवणार्‍यांशी पाला पडणे याचा रिझल्ट अंशतः असा नकारात्मक वृत्तांनी वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे येत राहील. याचा अर्थ सर्वच लोक सर्वच क्षेत्रे वाईट आहेत असा नसावा. चित्रपट सृष्टीतील अनेक परिवारातील दुसर्‍या पिढीतील स्त्रिया चित्रपट सृष्टीत काम करतच आहेत म्हणजे सगळेच काही परफेक्ट नसले तरी सगळेच वाईटही नसावे. सध्याच्या बातम्यांच्या लगोलग फिल्म फेडरेशनने स्त्री कलाकार सुरक्षेच्या दृस्।तीने काही महत्वपूर्ण पाऊलांची घोषणाही केली आहे.
विश्वामित्रांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातल्या काहींनी तर माफीसुद्धा मागितली. यातल्या कुणाकुणाला क्लीन चीट देणार आता इथले काही आयडी?
विश्वामित्रांची संख्या जी असावयाची तिच असते, ते आता बातम्यात आले आहेत एवढेच. आरोपांची खरी निश्चिती आणि खर्‍या क्लिन चिट या केवळ न्यायसंस्थे कडून येत असाव्यात. प्रबोधनाच्या दृष्टीने तात्कालीक उत्साह ठिक पण व्यक्तिचरीत्रांच्या लिंचींग साठी मिडिया सोशलमिडीयाचा उपयोग आदर्शवतच असेल असेही नसावे.
.."इतकी वर्षे गप्प का होत्या?" , आणि बोलल्या तर "आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?"
हे दोन्ही प्रश्नांचे स्वरुप स्वतंत्र, एकमेकांची पालुपदे नसणारे असू शकावे. ज्या पिडीतांच्या उपयोगासाठी कायदे असतात त्यांना त्याचे ज्ञान आणि आस्थाही नसते, आणि कायद्याम्चा गैरफायदा घेणारे गैर फायदा घेऊन मोकळे होतात तेव्हा आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?" अशा प्रकारची भावना आणि दुसर्‍या दिशेची अनास्था (कि तिरस्कार?) रुजण्याचा धोका असतो. "इतकी वर्षे गप्प का होत्या?" हा प्रश्न पूर्णतः वाजवी नसला तरी, एक पिडितांच्या स्वतःच्याच न्याय्य आधिकारासाठी कमी महत्वाचा नाही. दुसरे पिडितांचे कायदे विषयक स्वतःचे अज्ञान आणि न्यायसंस्थे विषयक अनास्था याचे निदर्शक आहे. बर्‍याच केसेस मध्ये पिडितांचा परिवारातील संवादाचा ते मानसशास्त्रीय समुपदेशनाचा ते सामाजिक जागृतीचा अभावाचे निदर्शक ही असावे. http://indiankanoon.org सारखे संस्थळावरील कोर्ट केसेस चे निकाल शोधले तर एकीकडे अशिक्षीत स्त्रीया कायदा आणि न्याय व्यवस्थेचा लाभ घेताना दिसतात तर दुसरीकडे इन्व्हेटीगेटीव्ह जर्नलीझम , स्टिंग ऑपरेशन हि ज्यांची जबाबदारी त्या स्त्री पत्रकार मुकपणे सहन करताना दिसतात. असे का होत असावे ? एन.डि. तिवारी विरुद्ध स्टिंग ऑपरेशन करुन राज्यपालपाअवरुन घालवता येते. एम.जे. अकबर विरुद्ध एकही स्टिंग ऑपरेशन का नाही झाले ? तो चक्क हॉटेल रुमचे दरवाजे सत्ताड उघडे ठेऊन .. कमाल आहे. एक जर्नलीस्ट गप्प राहीली त्या नंतर दुसरी त्या नंतर तिसरी आता पर्यंतचा मीटू आकडा डझनच्या वरुन गेला आहे म्हणे. पहिल्यातल्याच काही गप्प राहील्या नसत्या स्टींग ऑपरेशन केले असते तर नंतरच्या सुटल्या नसत्या का ? गप्प रहाण्या मागील अडचणी अंशतः समजता येतात , गप्प रहाण्याचे पूर्ण समर्थन अनाकलनीय ठरत नाही ना ? एम.जे. अकबर प्रकरणातील कंसेंट , व्यावसायिक अनैतिकता आणि कायदेशीर काय बे कायदेशीर काय ह्यातील बारकावे समजून घेण्याची गरज असावी. आली ना बातमीत नावे तर सर्व काही सारखेच या भूमिकेने या सोशल मिडिया चर्चांचा कायदे विषयक बारकाव्यां बद्दल जागरुकतेत काय मदत होणार . केवळ नव्या दुसर्‍या गंभीर बातमीने मिडिया भरुन जात नाही तो पर्यंतचेच मीटू मीटू आणि त्या नंतर काय पहिले पाढे पंचाव्वन्न ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
प
पुष्करिणी गुरुवार, 10/11/2018 - 19:53 नवीन
खाली दिलेल्या लिंक वर वाचून प्रकरण बरंच गुंतागुंतीचं वाटतंय https://m.facebook.com/story.php?story_fbid=1861554973897898&id=100001302405622
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 10/12/2018 - 12:35 नवीन
http://www.kractivist.org/tanushree-duttas-fir-against-nana-patekar-what-happened-in-2008/ गाण्या मध्ये नसतानाही नानाची घुसखोरी , ४ थ्या दिवशी गाण्यात बदल. तनुश्री ची exit . तिला दिली धमकी . हे आज लोकसत्ता मध्ये पण आले आहे. पण त्याची लिंक मिळत नाही. कि गायब करण्यात आली , माहित नाही. मिळाली तर देईन . Tanushree says the film shoot began on March 23 and Nana Patekar stayed on the sets during a song shooting even though his part was long over. The alleged harassment took place on the fourth day of the shoot on March 26, she says. “In between the shots, there were around 100 supporting staff including junior artists, dancers and others and Nana Patekar, against my will and consent, started grabbing me by the arms and pushing me around on the pretext of teaching me how to dance, even though he is not the choreographer… he was touching (me) indecently and unnecessary in front of everybody, but nobody objected and all were complicit in this behavior by being silent spectators,” she alleges. Nana Patekar allegedly told the choreographer and other artists to back away so he could teach her steps. नाना डान्स एक्स्पर्ट कधी झाला ? रावडी / कोंबडी डान्स वेगळा. हे सेक्सी आयटम सॉन्ग वेगळं. कि नाना मोठा नट म्हणुन त्याला सगळं येतं असं समजून माफ ? In 2008, Tanushree’s father Tapan Kumar Dutta had filed an FIR when she allegedly underwent the ordeal and her car was attacked while exiting the sets of ‘Horn Ok Pleasss
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 10/12/2018 - 12:56 नवीन
https://www.thenewsminute.com/article/everyone-knew-said-nothing-tanushree-dutta-accuses-nana-patekar-sexual-harassment-89016 Tanushree alleged that Nana Patekar got the makers to add an "intimate step" in what would have been her solo song in 'Horn Ok Pleassss', just so he could touch her. “He had no business being on set, it was my solo sequence. But there he was… pulling me my arms, teaching me the dance,” “His antics started from day one. I complained to director and producer that I was facing a lot of problems because of him and they should tell him to stay away from me. He had no business being on set, it was my solo sequence. But there he was… pulling me with my arms, teaching me the dance,” Then Nana Patekar wanted an “intimate step” to be added to the song Tanushree refused to do the "intimate step" with Nana Patekar. Her parents came on set to pick her up. "My father told them, let's shoot with a calm mind tomorrow, go and think over the solution in the night. My daughter will not do an intimate step with this man (Nana Patekar)
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 10/12/2018 - 13:01 नवीन
https://www.facebook.com/janice.sequeira.9/posts/10156557889786000 I got hold of #NanaPatekar to get a sense of what was happening. All he said was, “Meri beti jaisi hai, mere beti jays hai”, which didn’t really make sense at that point. Eventually, Tanushree’s parents arrived to pick her up. Her car was attacked, the windshield broken. I tried to get in touch with Tanushree to get her version of events. Around midnight, she asked me to come to her place. In tears, she narrated what happened.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 13:37 नवीन
गांधी घराण्याला रिटायर करुन तनुश्रीला काँग्रेसचे आध्यक्ष आणि काँग्रेसची पंतप्रधानपदाची उमेदवार बनवता आले तर बर होईल. कमीत कमी भारतीय लोकशाही वंशपरंपरागतेतून बाहेर पडण्यास मदत होईल आणि काँग्रेसी राजकारणाला जरा नवा चेहरा मिळेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 10/12/2018 - 14:19 नवीन
हे काय आता नविन? नाना मराठी आहे, शेतकर्याना मदत करतो वगैरे सगळे मान्य. पण येथे नाना चुकलाच .. वेड पांघरून पुरावे द्या, कन्सेट वगैरे कशाला ते? ती तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान किंवा नाना कपूर असता तर हीच भूमिका घेतली असती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 14:37 नवीन
...कन्सेट वगैरे कशाला ते?...
याचे उत्तर कुणि तनुश्री समर्थक महिला सांगू शकेल का ?
....ती तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान किंवा नाना कपूर असता तर हीच भूमिका घेतली असती का?...
माई, काही मुलींची स्थिती या मुळे अवघड असते की आया भयंकर जावई शोध लावतात. :) (ह. घ्या.) तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान जोडी साठी आमचे विश्लेषण तसेच राहील बदलणार नाही. आजच या धाग्यात अस्मादिकांनी हिंदूत्व वाद्यांवर टिका केली आहे . प्रश्न एकतर्फी चष्मे लावणार्‍यांचा आहे. तनुश्री खान असली काय देशपांडे असली काय किंवा अजून कुणा जाती धर्माची, तनुश्री गांधी घराण्याला रिटायर करुन तनुश्रीला काँग्रेसचे आध्यक्ष आणि काँग्रेसची पंतप्रधानपदाची उमेदवार झाली पाहिजे यावर सकारात्मक समर्थक भूमिका घेऊन दाखवा. विषय बदलू नका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 15:14 नवीन
आणि ते पुराव्यांचे राहीलेच की, गांधी घराण्याच्या वंशवादाच्या ग्रहणातून भारतीय लोकशाही मुक्त होणार असेल तर आपण म्हणता तसे तनुश्रीला अगदी खान करुन, काँग्रेस अध्यक्ष व पंतप्रधानापदाचे उमेदवार करुन नाना पाटेकरांसोबत न्यायालयीन निकाल आणि पुराव्यांशिवाय समस्त वंशपरंपरागत राजकीय घराण्यांची जेलभरो करण्यास आमची ना नाही. नाना पाटेकरांनीही वंशवादातून भारतीय लोकशाही मुक्त होण्यासाठी त्याग अवश्य करावा. अजून एक महत्वाचे आम्ही हिंदी-मराठी चित्रपट रसिक अथवा नानांचे फ्यानपण नाही हे आपल्या सामान्यज्ञानाच्या मदतीसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
च
चारु राऊत Fri, 10/12/2018 - 15:32 नवीन
कुठे त्या सिनेमावाल्यांच्या नादाला लागून वेळ खर्च करता सगळं पैसे आणि प्रसिद्धी साठी कायपण करतील
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 10/12/2018 - 18:33 नवीन
You tube वर तनुश्री च्या fir च्या कॉपी उपलब्ध आहेत . त्यात ते मीडिया चॅनेल , कॅमेऱ्याची मोडतोड चां उल्लेख आहे असं कळलं . या वादाची सुरवात करताना दोन दिवस मनसे च्या नावाने बोंबलत होती मग तनुश्री ने आता पुन्हा नाना च्या विरोधात तक्रार दिली पण मनसे च्या विरोधात का नाही दिली ? एक नक्की आहे आता जर कलर्स ने तिला बिगबॉस मध्ये घेतलं तर बिगबॉस चा सेट तुटणार आणि #me too चा विश्वास उडणार .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 19:07 नवीन
बीग बॉस बहुतेक मागे पडलय पण गूगल ट्रेंड्स चेक केले तर तनुश्री दत्तांची गुगल शोध प्रीयता या महिन्यात भारतात राहुल गांधीपेक्षा वाढली आहे म्हणून मी तनुश्रीला नेहरु-गांधी घराण्याला रिटायर करायला जमेल म्हणालो. सोबतच आमेरीकेत सुद्धा तिची शोधप्रीयता वाढताना दिसते आहे. आमेरीकेत तिला कुणि ओळखत नव्हते पहाता पहाता आमेरीकेत तिची गिगल शोध प्रियता प्रियांका चोप्रा सोबत मॅच करु लागली आहे. तिला या विवादातील प्रसिद्धीने आमेरीकेतच काम मिळण्याच्या संधी वाढण्याची शक्यता दिसते. भारताच्या वाट्याला नोबेल सुद्धा येऊ शकते तेव्हा तिला राहुल गांधींची जागा घेऊ द्यावे आणि भारताला या निमीत्ताने एखादे नोबेल मिळू द्यावे असे वाटते. तेवढेच परकीय चलन भारताला या निमीत्ताने लाभले तर हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
अ
अर्धवटराव Fri, 10/12/2018 - 19:16 नवीन
आता तर असं वाटतय कि बॉलीवुड (किंवा कुठलंही प्रसिद्धी विश्व म्हणुया) एका ठिणगेचीच वाट बघत होतं. रोज नवीन बातम्या येताहेत राव. यातुन काहितरी चांगलं घडावं हिच अपेक्षा. नाहितर याचाही 'आप' व्हायचा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 20:02 नवीन
मला चित्रपट सृष्टीतील नावे नीटशी माहित नाहीत, पण उदाहरनार्थ एक बातमी विकास बहल नामक व्यक्तिच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने विकास बहल यांची बाजू घेऊन स्टेटमेंट दिलेले दिसते त्यात त्या , विकास बहल जर चांगली व्यक्ती नाही तर त्याच्या सोबत फ्रेंडली संवाद नाचाचे कार्यक्रम इत्यादी कसे चालू रहाते ? असे ९ एक प्रश्न विचारताना दिसतात. र्‍हितीक रोशनच्या बाबतीतही पूर्व पत्नीने त्याची बाजू घेतली होती असे आठवते. अशा पद्धतीने काही फसव्या केसेस जरी पुढे आल्यातर सर्व गाजावाजाची क्रेडीबिलीटी संपुष्टात यावयास लागते. संस्थात्मक पातळीवर फिल्म फेडरेशन, एडीटर्स गिल्ड आणि मनेका गांधीचे खाते काही महत्वपुर्व पाऊले उचलताना दिसते. अशा सकारात्म्क बाबीही होतील नाही असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मुक्त विहारि Sat, 10/13/2018 - 18:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 10/13/2018 - 21:37 नवीन
मोठी स्टार मंडळी आरोपी कलाकार, दिग्दर्शकांसोबत काम न करण्याचा निर्णाय घेताहेत. हे लोक्स आपल्या सहयोग्यांच्या कृष्णकृत्याबद्दल अनभिज्ञ खचीतच नसतील आतापर्यंत. आगोदरच अशा कलंकीत मंडळींसोबत काम न करण्याचं धाडस दाखवलं नाहि यांनी. आता मिडीया ट्रायलला प्रतिसाद देत आपापली कामं थांबवताहेत. नॉन्सेन्स.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 10/14/2018 - 19:49 नवीन
......अनभिज्ञ खचीतच नसतील आतापर्यंत. असेही असू शकेल. कदाचित, "मी मारल्यासारखे करतो, तू रडल्या सारखे कर." असे पण असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अभिजित - १ Tue, 10/16/2018 - 11:15 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan-news/pune-artists-come-together-to-support-nana-patekar-against-me-too-movement-1771905/ आता नाना पाटेकर यांना पुण्यातील कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नानांवर आरोप केले. जर खरंच त्यांच्यावर अन्याय झाला होता तर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांनी न्याय देवतेकडे न्याय मागायला हवा होता. तसं न करता त्यांनी थेट प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडली. म्हणून त्यांनी केलेले आरोप संशयास्पद आहेत,’ असं मत या कलाकारांनी व्यक्त केली. यावेळी निर्माते-दिग्दर्शक शरद गोरे, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर, अभिनेते प्रकाश धिंडले, मारुती चव्हाण, अभिनेत्री माधवी गोडांबे, वनिता सोनवणे, मयुरी भालेराव, रमाकांत सुतार, पंकज भालेराव, महेश शिंदे, कुणाल निंबाळकर, मयुर जोशी, मंगेश घोडके आदी कलाकार उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी नानाच्या समर्थनात घोषणादेखील दिल्या. स्वतःला विकत विकत या इतक्या खालच्या थरावर उतरतात ??
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/16/2018 - 12:43 नवीन
....स्वतःला विकत विकत या इतक्या खालच्या थरावर उतरतात ??...
खालच्या थराला कोण उतरले होते हे कदाचित काळच सांगू शकेल, पण न्यायालयीन प्रक्रीयेसाठी ज्यांना धीर नाही त्यांची वेळच बरेच काही सांगून जाते. काळ आणि वेळेत जरासे अंतर असते ते असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ड
डँबिस००७ Tue, 10/16/2018 - 11:33 नवीन
द वायर नावाच्या डाव्याकडे झुकलेल्या न्युज मिडीया कंपनीत काम करणार्या श्री विनोद दुआ हे काम करत आहेत. ते जन गण मन की बात ह्या नावाने दर रोज आपला व्हीडीयो युट्युब वर उपलब्ध करून देत असतात. युपिएच्या काळात पद्मश्री अवॉर्ड मिळालेले विनोद दुआ हे भारतातले एक सिनियर प्रेस रीपोर्टर आहेत. जन गण मन की बात ह्या त्यांच्या प्रोग्राम मध्ये सध्याच्या सरकारवर खुपच टोकदार टीका करत असतात. कधी कधी त्यांचा तोल सुद्धा जातो. भारतात तनुश्री दत्ता ह्यांनी सुरु केलेल्या प्रकरणानंतर मी टू ट्रेंड सुरु झाला त्यावर गेल्या आठवड्यात श्री विनोद दुआ ह्यांनी एक कार्यक्रम केलेला होता. ह्या कार्यक्रमात श्री विनोद दुआ ह्यांनी बॉलीवुडच्या श्रेष्ठ कलाकारांना दोष दिला, श्री अमिताभ बच्चन यांच नाव न घेता श्री विनोद दुआ पुढे अस म्हणाले की बॉलीवुडच्या एका श्रेष्ठ कलाका र जो आम्हाला स्वच्छतेचे धडे देत असतो त्याने सुद्धा मि टू वर स्टँड घेतला नाही. अश्या प्रकारे सर्वांवर तोंड सुख घेणार्या श्री विनोद दुआ ह्यांनाच आता तोंडघशी पडाव लागलेल आहे. श्री विनोद दुआ ह्यांच्यावर श्रीमती निशीता जैन नावाच्या एका फिल्म मेकरनी सेक्शुअल अ‍ॅसॉल्टचा आरोप लावला आहे. २९ - ३० वर्षांपुर्वी श्री विनोद दुआ ह्यांनी हे चाळे केले होते. श्री विनोद दुआ ह्यां च्या सुपुत्री मलिक्क दुआ ह्यांनी म्हण्टल आहे जर वडीलांवरचे आरोप खरे असतील तर ते अस्विकार्ह, दु खःदायक व खुप क्लेशदायक असेल. ह्या प्रकरणानंतर मात्र जन गण मन की बात ह्या व्हिडीयोखालील लोकांच्या प्रतिक्रीया खुपच बोलक्या होत्या. काही लोकांनी विचारलच की आता मिटु # विनोद दुआ हा प्रोग्राम कधी करणार ? ईतके दिवस प्रधान सेवक, भाजपाच्या सरकार विरुद्ध गरळ ओकणार्या ह्या पत्रकाराने मी टु ट्रेंडवर ही खुप साळसुदपणे प्रोग्राम केलेला होता. जेंव्हा ह्याच पितळ उघड पडल तेंव्हा त्याचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/16/2018 - 12:33 नवीन
आता या केस मध्ये काँग्रेसच्या एन. एस. यु. आय. प्रमुखाचा राजीनामा घेण्यासाठी राहुल गांधींनाही जवळपास चार महिने लागले दिसताहेत. संदर्भ १ संदर्भ २ (बहुधा मी टू चळवळीची आणि एम.जे अकबरांच्या राजीनाम्याची काँग्रेस वाट पहात असणार ) आणि काँग्रेस आय टी सेल मधील तक्रारीकडे खरे तर राहुल गांधींनी पाठच फिरवलेली दिसते (संदर्भ १ संदर्भ २ ) आता राहुल गांधी स्वतःचा राजीनामा कधी देतात हे बघायचे. एकदा पुरावे मागायचे नाही ठरवल्यावर काही काँग्रेस वरीष्ठ कटात सामील होते असे खोटे खोटे गृहीत धरुन त्यांच्यावर आरोप करायला काय हरकत आहे का ? पोलीसी आणि न्यायालयीन करवाई न करता अर्बन नक्षलीझम आणि देशद्रोहाचे आरोप करण्यासही अधिक मोकळीक देण्यास हरकत नाही. न्यायालयाकडे न जाता आरोपबाजीची अनिर्बम्ध चिखलफेक केल्याने विंगेत उभे टाकून तमाशा पहाणार्‍यांचे काहीच जात नाही, तेवढाच औटघटकेचा विरंगुळा असतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/17/2018 - 15:41 नवीन
आपला दुसर्या ओळीतील दुसरा संदर्भ गंडलेला दिसतो. तो केरळ आणि तामिळनाडू मधेय वादळाची सूचना देणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 10/17/2018 - 16:13 नवीन
टाईम्स नाऊ ची वेबसाईट मध्ये काही समस्या असावी असे वाटते. हि गूगलची कॅच्ड व्हर्शन बरोबर दिसते का पाहुया. याची टाईम्स नाऊ वरील परमेनंट प्रॉपर लिंक मिळवून देण्यात कुणि सहकार्य केल्यास आभारी असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Wed, 10/17/2018 - 16:14 नवीन
डॉ. खरे लक्षवेधासाठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Wed, 10/17/2018 - 12:46 नवीन
मिडिया मध्ये सेक्स्च्युअल हरॅसमेंट कोर्ट केसेसची चर्चा करताना पाळावयाच्या पथ्यांचीची सुचवणी एका दिल्ली न्यायालयाने दिली होती त्यानुसार जो अ‍ॅक्युज्ड आहे
media has to play a very balanced role.... all reportage on the matter should carry his or his representative's views as well. "In the event if such views or comments are not given by them, then a statement as to the fact that an effort was made to ascertain their views should also be made in the news, articles or programmes, as the case may be," .... mention in their reports that "the matter is still sub-judice or is still pending in the court or a final decision in the case is still awaited". संदर्भ
उत्तरदायीत्वास नकार लागू
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/17/2018 - 17:14 नवीन
एकदाचे एम. जे अकबरांनी राजीनामा दिल्याचे कन्फर्मड वृत्त आल्याचे दिसते. ( खरेतर कोर्टात टिकणे जरासे अवघड -अशक्य नव्हे- असलेल्या नाना पाटेकरांबद्दलच्या केसची मिडियात चर्चा अधिक झाली तीही त्या केसच्या बारकाव्यांकडे दुर्लक्ष करुन ) प्रत्येक प्रकरण कायद्याच्या दृष्टीने तसे वेगळे असते. त्यातील बारकावेही वेग वेगळे असतात. कायदे विषयक बारकाव्यां बद्दल माहिती करुन घेण्या बाबत अनास्था स्त्रीयांच्या मुख्य उद्दीष्टांना कितपत उपकारक असेल या बद्दल साशंकता वाटते. एम. जे . अकबरां च्या केस बाबतही आकांड तांडव होत आहे आणि कदाचित बारकाव्यांकडे दुर्लक्ष. मी टू च्या वावटळीत एम जे. अकबरांवर एका पाठोपाठ डझनभर तरी स्त्री पत्रकारांनी आरोप केले. दोन स्त्री पत्रकारांनी त्यांच्या सोबतचा अनुभव चांगला राहील्याचेही मिडियातून नोंदवले. ज्यांनी आरोप केले त्यातील मुख्य पॅटर्न एम. जे अकबर विवीध कारणे देऊन फ्रेश तरुण स्त्री पत्रकारांना त्यांच्या हॉटेल मधील रुमवर बोलावत आणि सजेस्टीव्ह बिहेवीअर दाखवत, आणि अगदी थोड्याशा केसेस मध्ये त्यांनी प्रत्यक्ष स्पर्ष केल्याचा दावाही आहे. आणि अर्थात एम. जे अकबरांनी हे सर्व आरोप नाकारलेच नाहीत तर बदनामीचा खटला आरोपकर्त्या पत्रकारांवर भरुन प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. यातील प्रत्यक्ष स्पर्ष केलेले आरोप अधिक गंभिर धरले जातील यात नवल नाही. हॉटेल मधील रुमवर बोलावून इंटरेस्ट दाखवणे - ते वरीष्ठ आधिकारी पत्रकार असल्यामुळे पदाचा अनैतिक वापराचा आक्षेप रहातच होता - अलिकडील स्त्री विषयक कायदे विषयक बदलांनी त्यास कदाचित कायदेशीर धारही दिली असेल. पण समजा एम. जे अकबर वरिष्ठ आधिकारी नाहीत केवळ ओळखतात त्यांनी कुणाला आमंत्रित करणे आणि इंटरेस्ट दाखवणे आणि नकार आल्यास पुढे कायदा न मोडणे याची दक्षता ज्या केसेस मध्ये घेतली असेल तिथे आमंत्रित करुन आणि इंटरेस्ट दाखवणे सध्याच्या कायद्यांमध्ये आणि भारतीय मानसाला पटण्याची शक्यता कमी राहीली तरी त्यातील काही प्रकरणे एम. जे . अकबरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मोडू शकतात. उदाहरणार्थ एम. जे. अकबरांवर झालेल्या पहिल्या आरोपातच पत्रकार म्हणते एम. जे अकबरांनी ड्रिंक ऑफर केले आणि नंतर जवळ बसण्या बद्दल सुचवले पण स्त्री पत्रकाराने त्यांच्या सुचवणीस नकार देऊन निघून गेली , एम. जे. अकबरांनी स्वतः काहीच केले नाही हे ती स्त्री पत्रकार स्वतःच कबूल करते. बॉस म्हणून कामावर असताना कामा करता बोलावलेल्या व्यक्तीस ड्रिंक ऑफर करणे आणि जवळ बसण्यास सुचवणे नैतिकता साशंकीत असलेले असेल. कायद्यातील नव्या बदलांनुसार कदाचित कायद्याचे उल्लंघनही पण समजा ती पत्रकार कामा व्यतरीक्त सर्वसाधारण आमंत्रणाने गेस्ट म्हणून गेली आणि मग ड्रिंक ऑफर करणे आणि जवळ बसण्यास सुचवणे हे एम जे अकबरांच्या अभिव्यक्ती स्वांतंत्र्याच्या कक्षेत येऊ शकते का ? हे एम जे. अकबरांचे समर्थन नव्हे ह्या बाबत आणि अशा डझनभर केसेस पैकी ज्या ज्या कोर्टात उभ्या रहातील त्या बाबत नेमक्या बारकाव्यांवर न्यायालयीन निकाल येत्या काही वर्षात येतील आणि कायद्यांच्या परिघास अधिक निश्चित रुप मिळण्यास मदत होईल असे वाटते. अन्यायाला वाचा फोडण्यात इतर स्त्रीयांना वेळ लागणे समजण्यासारखे असू शकते पण अन्यायाला वाचा फोडण्याची उर्वरीत समाजाला मार्गदर्शन आणि दिशा देण्याची जेवढी जबाबदारी पुरुष पत्रकारांची असते तेवढीच स्त्री पत्रकारांची असते. आणि इथे स्त्री पत्रकार एखाद दुसरी नाही तर डझनांनी कमी पडल्याचे जे चित्र उघड झाले ते अचंबित करणारे आहे. अन्याय झाला असेल तर त्याचे डॉक्युमेंटेशन करणे, स्टिंग ऑपरेशन्स करणे, आपापसात कायदे विषयक माहिती प्रसृत करणे व्यवस्थापनांना वर पर्यंत कल्पना देऊन सातत्याने पाठ पुरावा करणे यात या स्त्री पत्रकार कमी पडल्याका आणि का ? हा त्यांच्या वरील अन्याया बाबत सहानुभूती ठेऊनही प्रश्न उरताना दिसतो. या स्त्री पत्रकार म्हणतात तसे एम जे अकबर प्रकरण काही दशके चालले असेल तर चुप्पी साधून दुर्लक्ष करुन त्यांनी पुढच्या नवोदीत स्त्री पत्रकारांवर अन्याय होऊ दिला असे म्हणावयाचे का ? त्यांच्या लेखी केवळ माध्यमातील पत्रकार असलेली व्यक्ती पुढे परराष्ट्र राज्यमंत्री झाली. या महिला पत्रकार म्हणतात ते खरे असेल तर परराष्ट्र राज्यमंत्री पदावरुन राजीनामा घेणे आलेच कारण त्या पदावरुन परदेशी व्यक्तींशी गैर वर्तन झाले किंवा अशा व्यक्तीचा स्वभाव पाहून परकीय गुप्तचर संस्थांनी हनी ट्रॅप लावले तर देशासाठी किती महाग पडू शकते ? आणि हा परिणाम कशाचा तर तक्रारी वेळेवर केल्या नाहीत व्यक्ती आपल्याला नकोशा राजकीय पक्षाचे मंत्रीपद भूषवत नाही तो पर्यंत वाट पाहिली असे म्हणावयाचे का ? सांगण्याचा मुद्दा तक्रारीत तथ्य असेल तर ती उशीरा करणे देशाच्या हिताच्या दृष्टीने साशंकीत असणारे असेलच असे नाही पण साशंकीत असू ही शकते. बरे काही का असेना एकदाचा मुद्दा चव्हाट्यावर आला तेव्हा सदर व्यक्ती परदेशी डिप्लोमॅटीक दौर्‍यांवर व्यस्त होती, मायदेशी परतून सर्व दौर्‍याचा सर्व लेखा जोखा घेतल्या शिवाय राजीनामे घेणे कोणत्याही सरकारला किती अवघड असू शकते याचा राजीनाम्याची घाई करणार्‍यांपैकी कुणिही विचार केलेला दिसत नाही. त्या माणसाचा राजीनामा घेतल्या नंतर परदेशी त्या माणसाने देशासाठी जे काही सकारात्म्क दोन चार व्यक्तिगत संबंध जुळवले असतील त्यांचेही मधातच तुटणे देशासाठी हितकारक ठरते का ? वर म्हटल्या प्रमाणे परदेशी व्यक्तींशी गैर वर्तन झाले अथवा अशा व्यक्तीचा स्वभाव पाहून परकीय गुप्तचर संस्थांनी हनी ट्रॅप च्या शक्यतांपेक्षा आताही राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशी होऊन जाणे केव्हाही श्रेयस्कर पण तरीही तथ्य असलेल्या तक्रारी करण्यातील दिरंगाई करणे संबंधीत व्यक्तींवर अन्याय आहेच पण देश हिताचेही नव्हे हे कधी लक्षात घेतले जाउ शकेल का ? हि प्रश्न चिन्हे उपस्थित करतानाच एम. जे अकबरांनी हे सर्व आरोप नाकारलेच नाहीत तर बदनामीचा खटला आरोपकर्त्या पत्रकारांवर भरुन प्रकरण तुर्तास न्यायप्रविष्ठ आहे. आणि न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत तो पर्यंत कायद्याच्या दृष्टीने व्यक्ती निर्दोष समजली जाते हे नोंदवणे अनावश्यक चारीत्र्य हनन टळण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असावे असे वाटते. उत्तरदायीत्वास नकार लागू
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/18/2018 - 16:38 नवीन
गूगल ट्रेंड्स : मी टू आणि नाना पाटेकर * देशभराचा मी टू विषयातला रस पाहीला तर अश्चर्य म्हणजे उर्वरीत भारता पेक्षा नॉर्थ ईस्ट मधून या विषयावर अधिक शोध घेतला जात आहे असे दिसते. * महाराष्ट्रात केवळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि काही प्रमाणात पिंपरी चिंचवड भागात , तर पुण्यात थोड्याश्याच प्रमाणात मीटू मुव्हमेंटला शोधप्रीयता असावी असे दिसते. उर्वरीत महाराष्ट्रात गूगल ट्रेंड्सने दखल घेण्या इतपत मी टू ची शोध प्रीयता नसावी असे दिसते. * नाना पाटेकरांची शोध प्रियता डोंबीवली आणि पुण्यात अधिक दिसते तर पिंपरी चिंचवड मधील नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता ची शोधप्रीयता फिफ्टी फिफ्टी दिसते. * अर्थात महाराष्ट्रात ओव्हर ऑल नाना पाटेकरांची शोधप्रीयता १५ सप्टेंबर पर्यंत तनुश्रीच्या १५पट होती, तनुश्रीचे नाव फारसे गिनतीतही नसावे, तोच फरक तनुश्रीची महारास्।ट्रातील शोधप्रीयता आता नाना पाटेकरांच्या अर्ध्यावर पोहोचली आहे पण यातील तनुश्री शोधप्रीयता मुंबई, नवी मुंबई, ठाणे नागपूर येथून तर काही अंशी पिंपरी चिंचवड येथून येत असावी. नाना पाटेकरांना डोंबीवली आणि पुण्यातून अधिक शोधप्रीयता लाभत आहे किंबहूना तनुश्रीच्या तुलनेत बर्‍यापैकी अधिक टिकुन आहे असे दिसते , मुंबई, नवी मुंबई, ठाणे नागपूर भागात हिंदीभाषी वावर अधिक असल्यामुळे असा फरक कदाचित समजता येईल पण पिंपरी चिंचवड वि डोंबीवली पुणे असा दृष्टीकोणात फरक का पडत असावा ? गूगल ट्रेंडचे स्क्रीन मिपावर एंबेड करण्याचे तंत्र अद्याप जमलेले नाही या बद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 10/19/2018 - 02:58 नवीन
चर्चा बरीचशी वाचली. तक्रार करणाऱया सर्व स्त्रियांना पाठिंबा दिलाच पाहिजे. पुरुषांनी खोट्या तक्रारींना तोंड का द्यावं असा प्रश्न विचारणाऱयांना छळ हा प्रकार माहित नाही व तो समजून घेण्याची कुवत नाहीय. निव्वळ खोट्या तक्रारी येतील म्हणून घाबरणारे हे फारच नाजूक पुरूष म्हणायचे. खोट्या तक्रारी आधीपासून होतातच आहेत. न्यायालयात बलात्कारांच्या खटल्यांमधील जवळजवळ ४०% खोट्या तक्रारी असतात. परंतु, स्त्रियांचा छळ होतो ही गोष्टही तितकीच खरी आहे. १०० जणी खोट्या तक्रारी करत असतील तरी खरंच छळ झालेल्या एका स्त्रीला न्याय द्यायला हे सहन केलेच पाहिजे. शिवाय तक्रार केली की लगेच पुरुष आयुष्यातून उठला असं होत नाही; पण लैंगिक छळाचा मानसिक परिणाम आयुष्यभर होतो. त्यामुळे आमची सहानुभूति मीटू वाल्या बायांना.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/19/2018 - 05:13 नवीन
मतांतरावरुन व्यक्तिगत दोषारोपणाच्या निष्कर्षांवर येण्यापुर्वी स्त्रीयांच्या बाजूनेही माझे डझनभर पेक्षा अधिक मिपा धागा लेख यादी आहे यची नोंद घेता आल्यास पहावे हि नम्र विनंती. - निष्पक्षता पाळत सहानुभूती बाळगू इच्छिणारा माहितगार
...त्यामुळे आमची सहानुभूति मीटू वाल्या बायांना.....
या किंवा त्या बाजूला पक्षपाती सहानुभूती ठेवण्याचे अधिकार ज्याचे त्याचे. पण सहानुभूती निष्पक्ष राहुनही ठेवता येत असाव्यात सहानुभूती साठी पक्षपातीपणा हा आवश्यक निकष नसावा किंवा कसे ? तेव्हा पक्षपाती सहानुभूती ज्यांच्या त्यांना लखलाभ.
.....पण लैंगिक छळाचा मानसिक परिणाम आयुष्यभर होतो.....
स्त्री असो वा पुरुष ज्यांचा ज्या बाबतीत छळ खरोखर झाला आहे -मग छळ कोणतेही असोते- त्यांच्या पुरतेच लागू होते. ज्यांच्या ज्या तक्रारीच खोट्या असतील त्यांना खुली सुट म्हणजे, खोट्या गोष्टींचे भांडवल करण्याची मानसिकता फोफावण्यास बळ ! किंवा कसे ?
....शिवाय तक्रार केली की लगेच पुरुष आयुष्यातून उठला असं होत नाही;.....
आपण हे ठाम पणे मांडत आहात ? हे वाक्य वस्तुनिष्ठ आहे की ह्या वाक्यातून दिशाभूल केल्या जाण्याच्याही काही शक्यता असू शकतात ? आपली 'आयुष्य' आणि 'आयुष्यातून उठणे' याच्या नेमक्या व्याख्या काय, यावर बरेच काही अवलंबून असावे किंवा कसे ? आपण मानवी समुहातल्या कोणत्याही एका अर्ध्या लोकसंख्येच्या आयुष्याची किंमत दुसर्‍या अर्ध्या लोकसंख्ये पेक्षा कमी लेखु इच्छित आहात किंवा कसे ? बरे ज्या पुरुषांच्या आयुष्याची किंमत आपण कमी लेखू इच्छिता त्यातील - न होवो - खरेच काही आयुष्यातून उठले तर त्यांच्या आयुष्यावर काही महिलांचे मुलांचे अवलंबित्व असू शकते की ठामपणे नसतेच ?
....१०० जणी खोट्या तक्रारी करत असतील तरी खरंच छळ झालेल्या एका स्त्रीला न्याय द्यायला हे सहन केलेच पाहिजे. ....
ड्यू प्रोसेस, महिला आयोग आणि न्यायालयीन मार्ग खोट्या तक्रारींबाबतही सहन केला जातोच ना ! ड्यू प्रोसेस, महिला आयोग आणि न्यायालयीन मार्गांना कुणि नाकारले आहे ? प्रश्न चिन्हे हि मिडिया ट्रायलच्या माध्यमातून होणार्‍या पब्लिक लिंचिंग बद्दल असावित किंवा कसे ? सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या;, भारतीय घटने च्या अनुच्छेद २१ मध्ये अनुस्युत राईट टू डिग्निटीवर जेवढा आधिकार स्त्रीचा असेल तेवढाच एका पुरुषाचाही असेल कि नाही की निष्कलंक व्यक्तीसही कलंकीत म्हणून माध्यमाच्या बळावर पब्लिक धींड काढण्याचे अनिर्बंध आधिकार स्त्रीयांना पोहोचतात ? वस्तुतः मॉडर्न सिव्हीलाईज्ड सोसायटीतील विधीतत्व मिमांसा (ज्युरीस्प्रुडन्स) मधील तत्व अपण म्हणता त्याच्या अगदी विरुद्ध "justice as a concept where an innocent man is not supposed to be framed, even if it means the guilty get away." अशा स्वरुपाचे आहे. आणि हे तत्व जर मान्य नसेल तर न्यायालयात सिद्ध न झालेल्या कोणत्याही खोट्या आरोपावरुन अथवा केवळ शंकेवरुन कुणालाही जेल मध्ये टाकण्याची सरकारला मुक्त लायसन्स मिळेल. आजच्या संगणक युगात कोणत्याही एका स्त्री कडून अगदी पन्नास कोटी पुरुषी लोकसंख्येचा घटक असलेल्या प्रत्येक पुरुषां विरुद्ध आंतरजालावर आरोप लिहिले जाण्यास काही तासांचा अवधी पुरेसा असावा. पण तेवढेही कशाला सर्व पुरुषांच्या कायम स्वरुपी जेलभरोची आयडीयाही अगदीच वाईट नसावी. स्त्रीयांनी त्यांच्या गरजे पुरते पुरुषांना वापरुन घ्यायचे बाकी बाय डिफॉल्ट जेल मध्ये रवानगी, कशी काय वाटते आयडीया ? :)
...निव्वळ खोट्या तक्रारी येतील म्हणून घाबरणारे हे फारच नाजूक पुरूष म्हणायचे....
शुद्ध स्त्रीवादाच्या दृष्टीने, स्त्री-पुरुष समान म्हणायचे आणि नाजुकतेचा मक्ता केवळ स्त्रीयांना द्यायचा ह्यातही छुपा पुरुषसत्ताकवाद असावा किंवा कसे ? बाकी उर्वरीत खंडण वर आलेच आहे.
....पुरुषांनी खोट्या तक्रारींना तोंड का द्यावं असा प्रश्न विचारणाऱयांना छळ हा प्रकार माहित नाही व तो समजून घेण्याची कुवत नाहीय. ...
अगदी अगदी, छळ म्हणजे काय माहित असणे आणि समजून घेण्याच्या कुवतीचा मक्ता केवळ खोट्या तक्रारी करणार्‍यांकडे आणि पक्षपाती सहानुभूती ठेवणार्‍या लांगुलचालन वाद्यांना तेवढा असतो. टाळ्या :)
...चर्चा बरीचशी वाचली. ...
पंचेद्रीयातील कोणतेही अनुभव अनुभवले म्हणजे समजले जातातच का अधिक गहन तात्विक प्रश्न, वाचला तरी समजावयाचा नाही. सांगण्याचा उद्देश हा की वाचले ते पूर्ण समजले असा आमचा कोणताही दावा नाही. वाचलेले सर्व समजणार्‍यांना, वाचलेले सर्व न समजणार्‍या माहितगारांचा प्रणाम.
....तक्रार करणाऱया सर्व स्त्रियांना पाठिंबा दिलाच पाहिजे....
ड्यू प्रोसेस, महिला आयोग ते न्याय प्रक्रीये वापरुन तक्रारी करणार्‍या सर्व स्त्रीयांना पाठींबा आहेच. उर्वरीतांसाठी वैध साशंकता. कायदे विषयक उत्तरदायीत्वास नकार लागू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मार्मिक गोडसे Fri, 10/19/2018 - 04:32 नवीन
शिवाय तक्रार केली की लगेच पुरुष आयुष्यातून उठला असं होत नाही; पण लैंगिक छळाचा मानसिक परिणाम आयुष्यभर होतो. त्यामुळे आमची सहानुभूति मीटू वाल्या बायांना. +100
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/19/2018 - 05:45 नवीन
संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Me_Too_movement#Criticism १) मी टू मुव्हमेंटच्या सद्य स्थितीतील विवीध मर्यादांवर विवीध स्त्रीवाद्यांनीही तक्रार केली आहे २) सगळ्या पुरुषांविरुद्धच्या सगळ्या प्रकारच्या तक्रारींना एकाच तागडीत मोजले जात असण्या बद्दल साशंकता दिसतात. ३) The hashtag has been criticized for putting the responsibility of publicizing sexual harassment and abuse on those who experienced it, which could be re-traumatizing.[189][190][191] The hashtag has been criticized as inspiring fatigue and outrage, rather than emotionally dense communication. ४) मेट्रोपॉलीटन आहेरे स्त्री वर्गा पुरती मर्यादीत असलेली नॉन मेट्रोपॉलीटन आणि नाहीरे स्त्रीयांच्या मासेस ना अद्याप इनक्लुड न केलेली मुव्हमेंट ५) आरोपांबद्दल वस्तुनिष्ठतेच्या साशंकता आणि पुराव्या अभावी मिडिया ट्रायलने व्यक्तीचरित्रांचे पब्लिक लिंचिंग ६) Overemphasis on specific cases - हाय प्रोफाईल केसेस ना अधिक प्रसिद्धी आणि महत्व मिळते. सर्व सामान्य नियमीत समस्यांची चर्चा बाजूस पडते . वस्तुतः प्रभावी सामाजिक आणि शासकीय निती आणि नियमनासाठी सर्व सामान्य नियमीत समस्यांची चर्चा अधिक महत्वाची असावी. नाहीतर बहुसंख्य स्त्रीयांच्या समस्या बाजूस पडण्याचा धोका संभवतो. संदर्भ इंग्रजी विकिपीडिया लेख Me_Too_movement_(India)#Criticism सिमा मुस्तफा, तवलिन सिंघ, आणि गोविंद कृष्नन यांची टिका. In article "Whoa #MeToo, Hold Your Horses…" journalist Seema Mustafa expresses that while encouragement to share unexpressed feelings is a big achievement of MeToo movement, but it lacks engagement with criticism -- also from those on the same side of the fence -- which would have been helpful in strengthening the women's movement.[127] Where as journalist Tavleen Singh in her column "Fifth column: Why I am not MeToo" in Indian Express criticizes the MeToo movement participants in India as the ‘liberals’ leading the MeToo movement are too illiberal towards even smallest misgivings with their point of view[128] Govind Krishnan V in his Firstpost article "#MeToo: Accusations against men can’t be construed as guilt; calculus of probability should account for innocence" concurs with Seema Mustafa's sentiments saying one limitation of this movement is that MeToo ends up shutting out and disengaging from outside critiques which are intended to strengthen the movement.[129] Govind Krishnan V further says historically, feminism has evolved, precisely because it has shown the ability to be self-reflective. Further says that, Me Too movement needs more nuanced and richer conversations which have space for debate, disagreement and dissent. The movement needs deeper forms of engagement and a collective will to develop a self-critical discourse which can generate essential kind of intellectual spade work. [129] Journalist Seema Mustafa expresses her reservations about tone and tenor of the MeToo movement on the social media. As per Seema Mustafa's opinion it may be a generational gap, or perhaps the trial of both --- the accuser and the accused --- on the social media. This kind of media trial is too unsavory to digest. The next problem Seema Mustafa points out with MeToo movement is its inability to differentiate between the man who is guilty of rape and sexual assault from the man who solicited a woman with a drink, or an unacceptable text message. The movement offers the same ‘punishment’ for all. The same response, and the same reaction. Journalist Govind Krishnan V concurs in his article with Seema Mustafa's this argument saying, there have been too many cases where everything ranging from flirting, opening moves, clumsy passes, sleazy behavior, disrespecting boundaries, married men expressing sexual interest, all have been clumped together under sexual harassment. This remains a challenge of great importance for India’s MeToo, which it has not yet succeeded in overcoming.[129] Seema Mustafa and Tavleen Singh also feel that MeeToo movement as of now is very exclusive, elite and metropolitan in nature and hence fails represent Indian masses inclusion of whom should have been in priority list of the movement.[127][128] Seema Mustafa reminds in her criticism, that old fashioned jurisprudence does warn against collateral damage, and does speak of justice as a concept where an innocent man is not supposed to be framed, even if it means the guilty get away.[127] Seema Mustafa says while most women in Me Too movement may not be lying but still few would name a man for reasons other than harassment may leads to harassment of an innocent and that would be equally unjustifiable. Hence Seema Mustafa rebukes the Me Too movement as too subjective, arbitrary and without due responsibility. [127] Seema Mustafa also strongly criticizes on the point that, MeToo movement has a subjective mob mentality. By doing media trial this mob of Me Too movement denies accused proper chance to defend themselves. Seema Mustafa asks journalists involved in Me Too movement while enquiry and evidence are supposed to be cornerstones of journalistic values, how those basic values are missing in this movement and still on what basis these journalists can be proud of job losses of accused men without due judicial processes.[127] इंग्रजी विकिपीडिया लेख केव्हाही बदलू शकतात उत्तरदायित्वास नकार लागू
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/19/2018 - 10:08 नवीन
आरोप झालेल्या पुरुषांच्या रिअ‍ॅक्शनची दखल घेऊन हलकीशी चिकित्सा करणारा इप्सिता चक्रवर्ती यांचा स्क्रोलवर एक लेख आला आहे, ज्याच्या अधिक चिकित्सेस वाव असावा म्हणून इथे रुमाल टाकून ठेवतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 10/19/2018 - 18:12 नवीन
वाचत आहे...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/20/2018 - 12:48 नवीन
पहिले फर्स्ट पोस्टने नाव अनामिक करुन दिलेले एका जेएनयु तथाकथित चळवळ कर्त्या कन्येचे आत्मकथन आहे. ज्यात बलात्कारा विरुद्ध चळवळीचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तिनेच कसा या जे एन यु कन्येवर अन्याय केला याचे वर्णन आहे. ( बहुधा काही साशंकीत सॉफ्ट कॉर्नरमुळे कन्या अधिकृत तक्रार करु इच्छित नसावी असे लेखावरुन वाटते. ड्यू प्रोसेस आणि न्यायालयासमोर जाणे टाळणे आहे त्यामुळे खरे खोटे देव जाणे ) दुसरे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया : क्विन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांचा डिफामेशन सुट माननीय मुंबई उच्चन्यायालया समोर सुनावणिस आला. आरोप करणार्‍या महिलेची तक्रार विकास बहल यांच्याशी व्यावसायिक संघर्षासाठी वापरुन घेतली जात असल्याचे माननीय न्यायालयालाही जाणवले तेव्हा महिलेच्या खांद्यावरुन इतरांनी (म्हणजे व्यावसायिक संघर्षकर्त्यांनी) बंदुक चालवू नये, अशी स्पष्ट कल्पना माननीय न्यायालयाने संबंधीतांना दिल्याचे दिसते.
"No one can fire from over her shoulder. The whole movement .. The whole movement is not for that. Not for others to write what they want," said Justice SJ Kathawalla, adding, "We need guidelines in these cases, else all this will be misused and abused and we do not know where we will end up... Authorities can lay down guidelines." संदर्भ टाईम्स ऑफ इंडिया
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 10/21/2018 - 06:53 नवीन
https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/kulwant-singh-kohli-article-on-pakiza-1775474/ असो, ..... ....... ............. .................
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/21/2018 - 15:14 नवीन
संपूर्ण चर्चा वाचली चांगली चर्चा चालू आहे, सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 10/21/2018 - 17:34 नवीन
सारांश काय ?
स्त्रीयांच्या अनुमती (कंसेंट) , नकाराधीकार (व्हीटो नो मीन्स नो) आणि निवडस्वांतंत्र्याचा आदर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विशुमित Sun, 10/21/2018 - 17:41 नवीन
समर्पक आणि मोजक्या शब्दात मांडलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा