Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - डिसेंबर २०१८

व
वामन देशमुख
Sat, 12/01/2018 - 07:27
🗣 144 प्रतिसाद
सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय. परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र. a
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
55790 वाचन

💬 प्रतिसाद (144)
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 06:56 नवीन
मोदींजींच्या देशात हे असे लोक अजुन उघड़पणे फिरतातच कसे ? त्यांच्यावर कारवाई न करण्यचा गलथानपणाचा आरोप आपण मोदीजीवर करत आहात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
आ
आनन्दा गुरुवार, 12/06/2018 - 07:05 नवीन
मोदींवर कशाला? कायदाव्यवस्थेवर करतो. हो, जर राज्यसभेत स्पष्ट बहुमत असते तर ही वेळ नक्की आली नसती.. तुम्हाला टीना साठी मुद्दा हवाय ना, हा घ्या लिहून. नुसते बहुमत उपयोगाचे नाही, तर पाशवी बहुमत हवे म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 07:21 नवीन
ओके ओके, महितिगार म्हनताएत त्या अर्बन नक्सल्यान्वर कारवाई, लोकसभेत व राज्यसभेत पाशवी बहुमत आल्यावरच केली जाइल म्हना कीं तुमच्या मते वेरी गुड पॉंईंट ... नोटेड नेक्स्ट पॉंईंट प्लीज़....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
माहितगार गुरुवार, 12/06/2018 - 07:32 नवीन
....त्यांच्यावर कारवाई न करण्यचा गलथानपणाचा आरोप आपण मोदीजीवर करत आहात काय ?...
मुळीच नाही, बहुधा मोदींना त्यांच्या मर्यादांची कल्पना असणार म्हणूनच त्यांनी त्याच्या उद्घोषणेतील पहिले दोन शब्द 'सबका साथ' ठेवले आहेत. गलथानपणाची जबाबदारी 'सब'चा घटक असलेल्या सर्वसामान्य नागरीकावर असते, देशभक्तीची उजवी बाजू लावून धरण्याची जबाबदारी विचारवंतांवर असते, संस्कार घडवण्याची जबाबदारी शिक्षक आणि प्राध्यापकांवर असते, प्राध्यापकांना आदर्श देण्याची जबाबदारी कुलगुरू आणि कुलपतींवर असते. भारत माता शब्दाच्या उपयोगासाठी नुसता आग्रह धरण्यापुर्वी गुटखा खाऊन थुंकण्यचे आणि कचरा टाकण्याचे थांबवा हे मोदी सांगत असतात पण ऐकणारे कानही बर्‍याचदा अनेकविध कारणांनी बधीर झालेले असतात. सोन्याच्या आयातीने भारतातील पैसा बाहेर देशात जातो हे भारतातील प्रत्येक अर्थशास्त्री, अर्थमंत्री ते पंतप्रधानाला माहित असते, एकीकडे आर्थीक स्थितींबद्दल दर घटकेला रडणारा भारतीय निर्लज्जपणे सोन्याच्या दुकानात रांगा लावतो अशा असंख्य वेळी आपले देशप्रेम पातळ असल्याचे प्रात्यक्षीक करून दाखवत असतो. गल्ली गल्लीत घरा घरात मना मनात माणसे देशहीताशी तडजोडी करत असतात त्या सगळ्यांवर खटले दाखल करून अख्खी प्रजा जेल मध्ये कोणत्याही नेतृत्वाला टाकता येऊ शकत नाही. सुज्ञ जनता हा लोकशाहीच्या चार महत्वाच्या आधारस्तंभांपैकी आहे तो कमकुवत असतो तो पर्यंत त्यांचे नेतृत्व कमकुवत असणे सहाजिक असते. एक बोट मोदींकडे असेल तर तीन बोटांची दिशा इतरत्र असते. तीन बोटे देशहिताशी तडजोडकरून स्वतःचे देशप्रेम पातळ करणार्‍यांकडे असतात, पोलीसांचे काम पोलीसांना करु न देणार्‍यांकडे असतात, संबंधीत राज्यसरकार कडे आणि कुलगुरु आणि विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि प्राध्यापकांकडे असतात. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 08:05 नवीन
हुश्श्य.... उपाययोजने बाबत पण लिहा .... तुम्हीं यु ट्यूबच्या लिंका दिल्या.... पुढ़े काय...., तात्पुरते मान्य करु कि ते देशद्रोही ..... तुम्हीं किंवा मी यबाबत काय करु शकतो ? मोदीज़िंच्या मर्यादा अवगत आहेत तशा नागरिकांच्या पण असाव्यात अशी माफ़क आपेक्षा.... असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 12/06/2018 - 10:02 नवीन
.... तुम्हीं किंवा ... यबाबत काय करु शकतो ? ....
उपरोक्त वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम मी या शब्दाने बदलतोय कारण मी स्वतः पुरते अधिक सहज सांगु शकतो. तुमच्या प्रतिसादातील तात्पुरतेपणामुळे तुमचे 'मी' सर्वनाम तात्पुरते वगळले . सर्व प्रथम महात्मा गांधींना त्यांच्या सभेत आपल्या सासर-माहेरच्यांच्या विरोधाची पर्वा न करता देशासाठी अंगावरील दागिने काढून देणार्‍या आज्जीने आमच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तन- मन- धनाने केलेल्या योगदानाशी प्रामाणिक राहू शकतो (तात्पुरते नव्हे नेहमीसाठी). तिच्यासारख्या सामान्य नागरीकांच्या वतीने स्वातंत्र्य लढा लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांशी प्रामाणिक राहू शकतो. 'भारतीय इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर भारतीयांना परत परत परकीय आक्रमणांना तोंड द्यावे लागण्यामागे देशाचे राजकीय एकीकरण नव्हते आणि यापुढे भारतीयांना परकीय दबावास बळी पडण्याच्या शक्यता कमी करुन हव्या असतील तर भारतीय उपखंड राजकीय दृष्ट्या एक असणे गरजेचे आहे हा स्वांतत्र्यसैनिकांचा कॉमन सेन्स समजून घेऊन भारत अखंड असण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी योगदान देऊ शकतो.' आणि हे समजावून देणार्‍या माझ्या शिक्षकांशी ते जवाहरलाल नेहरुंनी मांडलेल्या विवीधता असूनही एकता असलेल्या भारतीय सांस्कृतिक एकात्मतेच्या मला भावलेल्या संकल्पनेशी प्रामाणिक असू शकतो. देशाकडुन काही मागण्या आधी मी देशासठी काय केले हा प्रश्न मी माझा मला विचारायचा आहे ह्या स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक असू शकतो. आणि माझ्या देशाशी असलेली माझा ह्या पवित्र बंधाबाबत प्रामाणिक भावना माझ्या आजूबाजूचे ते कोणतेही नेतृत्व माझ्या पसंतीस उतरले नाही तरी अक्षूण्णपणे कायम राहील हे मी बघू शकतो. अखंड भारताच्या नरेटीव्ह बदलून भारताचे तुकडे करु शकणार्‍या / इच्छिणार्‍या नॅरेटीव्हजना उघडेपाडू शकतो. अखंड भारताच्या नॅरेटीव्हची श्रेष्टता मांडू शकतो आणि एवढी वैचारीक मांडणीची क्षमता दिलेल्या सर्व आदर्श गुरुजन ते भारतीय विदुषी यांचे फुल नाही फुलाची पाकळी ऋण फेडून मला या स्वतंत्र भारतात जे स्वातंत्र्य लाभले ते तसेच माझ्या पुढील पिढ्यांना लाभेल हे स्वप्न अधिक आशादायीपद्धतीने पाहू शकतो. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
आ
आनन्दा गुरुवार, 12/06/2018 - 11:12 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/07/2018 - 16:59 नवीन
उत्तम प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 12/11/2018 - 06:34 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चौथा कोनाडा Wed, 12/05/2018 - 18:07 नवीन
खरंच वासलेकर हुशारेत. मी त्यांच्या लेखांनी सुरुवातीस ज्याम इम्प्रेस व्हायचो, नंतर हा भाबडेपणा आहे लक्षात यायलां लागलं. एक मात्र आहे. ते विषय सोपासाधा करुन टाकतात आणि फार पल्हाळही लावत बसत नाहीत. छोट्या छोट्या मर्यादित समस्यांवरचे त्यांचे लेख प्रभावी आहेत, त्यांच्या सुचवण्या अंगिकारल्या तर खरंच मोठे बदल होऊ शकतील. पण मोठ्या समस्या भारतीय राजकिय परिस्थिती आणि लोकांची मानसिकता यामुळं बदल जवळजवळ अशक्य वाटतात. आणि इथं मि. कुलगायनाइस म्हणतात त्या नुसार ग्रीसचा किंवा ब्रेक्सिटचा , आणि आपला काय संबंध ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कंजूस Sat, 12/08/2018 - 04:24 नवीन
नवीन मतदान भाजपाचे प्रभाव नाकारणारे आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 12/08/2018 - 04:58 नवीन
सध्याच्या मर्यादा अधोरेखीत करणारे म्हणणे अधीक सयुक्तिक असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ट
ट्रेड मार्क Sun, 12/09/2018 - 03:37 नवीन
भारतीय लोकांना काँग्रेसशिवाय त्यातूनही नेहरू गांधी घराण्यातले कोणी पंतप्रधान असल्याशिवाय चैन पडत नाही. मोरारजी देसाई किंवा चंद्रशेखर, व्हीपी सिंग वगैरे यांचे सरकार सोडून द्या. पण नरसिंव्हराव जरी काँग्रेसचे पंप्र असले आणि जरी त्यांच्या काळात त्यांनी देशाला कसे वाईट परिस्थितीतून बाहेर काढले हे सुद्धा देशाने बघितलं आहे. पण त्यांना काय वागणूक दिली गेली हे सुद्धा देशाने बघितलं आहे. तसेच १९९१ च्या रिफॉर्म्स चे सगळे श्रेय केवळ ममोसिंगांना दिले जाते, ते का याचेही कारण सगळ्यांना माहित आहे. वाजपेयींनी कितीही अणुचाचणीसारखे धाडसी निर्णय घेतले असो, सुवर्ण चतुष्कोन, नदी जोड प्रकल्प सारख्या उपयोगी योजना आणूनही २००४ मध्ये त्यांना का परत निवडून दिलं नाही हे जनतेलाच माहित. त्यामुळे आत्तासुद्धा परत मोदी किंवा भाजप जरी बहुमत किंवा सगळ्यात मोठा पक्ष नसला तरी आश्चर्य वाटायला नको. लोकांना जर राहुल गांधी पंप्र म्हणून आवडत असतील तर असू दे. मी आधी पण एका धाग्यावर म्हणलं होतं, २००४ मध्ये वाजपेयी परत पंतप्रधान झाले नाही तर त्यांना काय फरक पडला? नुकसान कोणाचं झालं? २००६ साली पूर्ण होण्याचं टारगेट असलेला सुवर्ण चतुष्कोन प्रोजेक्ट विलंब होत होत २०१२ साली पूर्ण झाला. अतिरिक्त किंमत आणि अपहार यातून किती रुपयांचा बोजा आपल्यावर पडला असेल याची कोणी गणती केली नसेल. नद्याजोड प्रकल्प १९७० सालापासून संशोधनाचा विषय आहे. वाजपेयीनीं निदान त्याला हिरवा कंदील तरी दाखवला होता, पण २००४ नंतर परत तो बासनात गुंडाळला गेला. आता २०१४ नंतर धडाडीने काम करून २०१८ मध्ये मोदी सरकारने निदान देशांतर्गत जलवाहतूक तरी सुरु करून दाखवली. आत २०१९ मध्ये परत काँग्रेस किंवा काँग्रेसप्रणित सरकार आलं की हे सगळे प्रकल्प परत रखडतील. मग एक १०-१५ वर्षांनी परत जनतेला उपरती होऊन मग त्यावेळेला योगी किंवा जे कोणी असेल ते ५ वर्षांसाठी निवडून येतील. आणि हेच चक्र चालू राहील. २००२ मधेच अडकलेल्या लोकांना नंतर गुजराथ मध्ये एकही दंगल झाली नाही हे दिसत नाही. काँगेसच्या काळातली आणीबाणी, अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत येऊन झालेले दहशतवादी हल्ले, विविध भागात झालेल्या हिंसक दंगली चालून जातात पण २०१४ नंतर देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही तसेच एकही मोठी म्हणावी अशी दंगल झाली नाही हे मात्र लक्षात येत नाही. किंबहुना लक्षात आले तरी फक्त २००२ आठवते. दुसरीकडे लोकांना राहुल गांधी ४ वाक्य जरा बरी, थोडा अर्थ लागेल अशी, बोलला तर लोकांना त्याला पंतप्रधान करायची स्वप्न पडायला लागतात. शेवटी तुमचं लायकी असेल तसेच नेतृत्व तुम्हाला लाभते. त्यामुळे २०१९ मध्ये राहुल गांधी तरी पंप्र झाला किंवा मग ५ वर्षात ५ पंप्र बघायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको. गुजराथ, तेथील इतरधर्मीयांसकट, मोदींना मुख्यमंत्री म्हणून सहज स्वीकारेल. नाही स्वीकारलं तरी मोदींना काय फरक पडणार आहे? त्यांना ना आगापिछा ना कुठले बंगले मेंटेन करायचेत. तसेही ६८ वर्षांचे झालेत, त्यांनी निवृत्ती स्वीकारणच बरं, पंप्र झाल्यामुळे पेन्शनची सोया झालीच आहे, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/09/2018 - 09:25 नवीन
+१०० लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीचेच नेते मिळतात... चुकूनमाकून, एखादा परखडपणे व प्रामाणिकपणे काम करून लोकांना प्रगतीच्या मार्गावर नेणारा नेता मिळाला, पण लोकांना त्याचा परखडपणा व प्रामाणिकपणाच खुपू लागला तर, परत त्यांच्या डोक्यावर त्यांच्या लायकीचाच नेता येणार ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सर टोबी Sun, 12/09/2018 - 16:23 नवीन
पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही. आणि अशा तिरस्कार बाळगण्याला देशप्रेमाचे नाव देऊ शकत नाही. या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली. त्याचा जेंव्हा उल्लेख ते करतात तेंव्हा ते सर्वस्वी त्यांचे कर्तृत्व असते. देशाच्या सरकारचे जणू त्यात काहीच योगदान नसते. आणि आता? देशातील सर्व काही चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त मोदी किंवा भाजपामुळे होत आहेत. देशाच्या प्रगतीची तुमची एक ठराविक फुटपट्टी आहे. ठराविक रस्ते, ठराविक योजना. त्या झाल्या नाही तर काहीच प्रगती झाली नाही. तर ते असो. पूर्वीचे दिवस फिरून येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
म
माहितगार Mon, 12/10/2018 - 06:58 नवीन
१)
....या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली. त्याचा जेंव्हा उल्लेख ते करतात तेंव्हा ते सर्वस्वी त्यांचे कर्तृत्व असते. देशाच्या सरकारचे जणू त्यात काहीच योगदान नसते. आणि आता? देशातील सर्व काही चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त मोदी किंवा भाजपामुळे होत आहेत.
२०१९ नंतर भाजपेतर सरकार आले तर वरील वाक्यात तुमच्या भाजपीय मिपामित्रांना खालील प्रमाणे बदलकरून वापरता येइल का? म्हणजे वरील स्टेटमेंटला पूर्णत्व येण्यास मदत होईल.
....या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द अटलजी आणि मोदींच्या राजवटीत गेली. त्याचा जेंव्हा उल्लेख ते करतात तेंव्हा ते सर्वस्वी त्यांचे कर्तृत्व असते. अटलजी आणि मोदींच्या काळातील देशाच्या सरकारचे जणू त्यात काहीच योगदान नसते. आणि आता? देशातील सर्व काही चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त गांधी व अतेज्ञ राजकीय घराणी किंवा काँग्रेस मुळे होत आहेत.
२)
पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही. आणि अशा तिरस्कार बाळगण्याला देशप्रेमाचे नाव देऊ शकत नाही.
वरील वाक्यातील स्टेटमेंट (अनवधानाने?) अपूर्ण राहील्यासारखे वाटते. खालील वाक्य अधिक नेमके करण्यास स्कोप असावा पण तरीही वरच्या आणि खालच्या पैकी कोणते वाक्य आधी आणि कोणते नंतर आल्यास स्टेटमेंटला पूर्णत्व येईल असे वाटते ?
पण काय आहे कि या देशाचे सर्वच अहिंदू नागरीक आणि धर्मनिरपेक्षतावादी, सदोदित हिंदूं संस्कृती (आणि अहिंदूंची धार्मिक-राजकीयता जपून हिंदूत्वा) बद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही. आणि अशा तिरस्कार बाळगण्याला निर्भेसळ-सेक्युलॅरिझमचे नाव देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ट
ट्रेड मार्क Tue, 12/11/2018 - 04:36 नवीन
पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही या विधानाचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध आहे? जर तुम्हाला चर्चा त्या दिशेला न्यायची असेल तर जरा खऱ्या धार्मिक "दंगली" कधी झाल्या आणि त्यावेळेला कोणती सरकारे होती याचा शोध घ्या. सध्या होणाऱ्या जमावाने मारहाण करण्याच्या घटना म्हणजे दंगली नव्हेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात हे वारंवार सिद्ध झालं आहे की हिंदू हे अहिंदूंचा द्वेष करत नाहीत तर अहिंदूंच हिंदूंचा द्वेष करतात. मुस्लिम असो वा ख्रिश्चन विविध मार्गाने हिंदूंना बाटवण्याचे प्रकार कोण करतं? किती हिंदू इतरांना हिंदू बनवण्यासाठी नसत्या उठाठेवी करतात? एवढं होऊनही दुर्दैवाने हिंदूंना अजूनही जाग येत नाही. आपले वर्णन करायला परधार्जिणे हा योग्य शब्द आहे. वर्षानुवर्षे हिंदू इतर धर्मियांचे सण अगदी उत्साहाने साजरे करत आले आहेत. पण मुस्लिम व ख्रिश्चन आपली दसरा दिवाळी किंवा पाडवा साजरा करताना किती दिसतात? कधी दाखवण्यापुरते केले तर लगेच त्याचा उदोउदो होतो. काय बोलणार? जिथे मुस्लिमांच्या आक्रमणाविरुद्ध तेव्हाचे हिंदू राजे एकत्र येऊ शकले नाहीत. निदान एका प्रदेशात मुस्लिम आक्रमण झाल्यावर तिथली आणि तिथल्या लोकांची, विशेषतः स्रियांची, काय अवस्था झाली हे कळूनही इतरांना एकत्र येण्याची उपरती झाली नाही. ते आपल्या डीएनए मध्येच आहे त्यामुळे बदल होणे अवघड आहे. या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली. म्हणूनच तर, ज्यांना तुलना करता येते त्यांनी ती करावी. फक्त अशांतता आणि दंगलींच्या फूटपट्टीवर बघितलं तरी काँग्रेसचा परफॉर्मन्स वाईट आहे. प्रगतीचं म्हणाल तर मी म्हणेन कि देशात यादवी माजू दिली नाही आणि बेअर मिनिमम प्रगती एवढंच काँग्रेसचं श्रेय म्हणता येईल. गरिबी हटाव चा नारा पहिला कधी दिला गेला बघा आणि नंतर ती हटवण्यासाठी काँग्रेसने काय प्रयत्न केला? पायाभूत प्रकल्पांचं महत्व यासाठी आहे कि त्यातूनच रोजगार निर्माण होतात तसेच त्या भागात प्रगती पण होते. सुवर्ण चतुष्कोन साठी वाजपेयी का यायला लागले? नदी जोड प्रकल्प १९७० पासून संशोधन होत असूनही ठोस काही व्हायला परत वाजयेयीच यायला लागले. पुढची १० वर्षे परत प्रकल्प बासनात गेला आणि मग आता मोदी आल्यावर देशांतर्गत जलवाहतूक पण सुरु झाली? मुळात प्रश्न काँग्रेस का भाजप यापेक्षा काँग्रेस म्हणजे राहुल गांधी... त्याच्यात पंप्र होण्याचे काय गुण आहेत? जाऊदे, प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन असतो. काहींची आवड राहुल गांधी असेल तर काय करणार? प्यार मे गधीभी परी लागती है अशी एक म्हण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
क
कंजूस Sun, 12/09/2018 - 05:53 नवीन
दोन मोठ्या राज्यांत त्रिशंकू झाली तर जनतेला कठीण आहे. चानेलवाल्यांचा फायदा.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 12/10/2018 - 10:57 नवीन
पूर्वी भाजप च्या आश्रया ला असलेला अहमदनगर मधील श्रीपाद छिनंदम आता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे . शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या , तड़ीपार असलेल्या छिंदमला सदसद्विवेक बुद्धिला स्मरुन मतदान करणाऱ्या व नकावर टीच्चुन निवडून आणणाऱ्या मतदारानां सलाम !!!!!
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 12/10/2018 - 11:17 नवीन
आधी भाजपमधे असताना मोदीजींच्या मुळे ह्या माकडाला लोकांनी मते दिली ..... ह्यावेळी मात्र ह्याने चपटी व नोटा वाटल्या ... असणार नक्कीच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
विशुमित Mon, 12/10/2018 - 11:45 नवीन
जनमताचा आदर ठेवला पाहिजे असे वाटते. EVM फक्त आपला 100% भरोसा नाही बरका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
ज
जानु Mon, 12/10/2018 - 11:25 नवीन
चपटी आणि नोटा घेउन लोकांनी मतदान केले असेल तर आणि छिंदम निवडुन येत असेल तर मग जय हरी.....
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 12/10/2018 - 12:11 नवीन
मग् काय, या वेळी मोदीजींचे नाव त्याच्या पाठीशी होते का ? ज्यावेळी मोदीजींचे नाव एखाद्याच्या पाठीशी नसते, तरीही तो निवडून येत असेल, तर त्याने चपटी / नोटा वाटपच केलेच , असें असते नां ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
ट
ट्रम्प Mon, 12/10/2018 - 16:08 नवीन
नोटा,चपटी किंवा छिंदम ने जो पराक्रम केला होता त्या बद्दल विशिष्ट समाजा च्या लोकांनी निवडून आणून त्याला बक्षीस दिले असावे , त्याच्या मतदारसंघाचे जातिनिहाय विश्लेषण वाचनात आल्यावर चित्र स्पष्ट होइलच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Mon, 12/10/2018 - 16:31 नवीन
पण आधी मोदीजी यांच्या साथी मत देनारा विशिष्ठ समाजाला , नंतर एकाएकी चपटी पैश्याची गरज पड़ावी ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 12/10/2018 - 17:53 नवीन
नोटा , चपटी हा तुमचा अंदाज आहे हो !! छिंदम ला 100 % विशिष्ट लोकांनी निवडून आणले आहे व त्या साठी त्यांना नोटा चपटी गरज पडली नसणार हे नक्की .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Mon, 12/10/2018 - 18:41 नवीन
छिंदम ला 100 % विशिष्ट लोकांनी निवडून आणले आहे
. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचं विशिष्ठ समाजाने याआधी भाजप उमेदवार असलेल्या छिंदमला निवडून आणले होते, याच्याशी तुम्ही सहमत आहेत तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Tue, 12/11/2018 - 03:12 नवीन
फक्त भाजप चा उमेदवार म्हणून नाही तर मोदिजी च्या करिष्म्या मुळे कचरया सारखे खासदार , आमदार आणि नगरसेवक निवडून आले आहेत ज्यांचे कर्तुत्व शून्य आहे . त्यात हा छिंदम होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Tue, 12/11/2018 - 06:01 नवीन
मोदिजी च्या करिष्म्या मुळे कचरया सारखे खासदार , आमदार आणि नगरसेवक निवडून आले आहेत
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
माहितगार Mon, 12/10/2018 - 18:05 नवीन
४ हजार मतेही पडावीत -तेही तडीपार असताना- हे नक्कीच वैषम्य कारक आहे. छिंदमची भाषा कुणाबद्दलही असेल तरी अवाजवी आणि अयोग्य होती हे ४ हजार लोंकांना पटवून देण्यास छिंदमचे राजकीय प्रतिस्पर्धी कमी पडणे खेद जनक आहे. पण प्रतिस्पर्ध्याची अयोग्यता मतदारां ना समजावून देण्याचे अपयश तसे असंख्य भारतीय निवडणूकातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होताना दिसते. यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला कोणत्याही एका पदावर दोन पेक्षा अधिक वेळा संधी देऊच नये असा बदल भारतीय राज्य घटनेतच करणे गरजेचे असावे. बातमी वाचून अजून एक प्रश्न पडला की, केवळ ४ हजा मतदान खूप कमी झाले की मतदारसंघ अती लहान आहे, महापालिकेचे मतदार संघ एवढे लहान असतात का ? की अजून काही वेगळी समस्या असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
M
mrcoolguynice Mon, 12/10/2018 - 13:01 नवीन
उर्जित पटेलांनी राजीनामा दिलाय म्हणे .... यावरूनच लक्षात यावे की अवार्ड-वापसीची पाळेमुळे ह्या खांग्रेसींनी भारतात खोलवर रुजवलीयेत .... आता तरी उघडपणे लोकांनी उर्जितला देशद्रोही किंवा फारिनचा एजंट म्हणून ओळखावे ...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/10/2018 - 16:41 नवीन
UK court orders extradition of Vijay Mallya to India क्रिस्तियन मायकेलचे प्रत्यावर्तन होऊन त्याला सिबिआय भारतात घेऊन आली. त्या बातमीची धूळ हवेत असतानाच आज ब्रिटिश न्यायालयाने मल्ल्याचे प्रत्यावर्तन करण्यास संमती दिली आहे आणि तो निर्णय प्रशासकिय कारवाईसाठी ब्रिटिश सरकारच्या संमतीसाठी पाठवला आहे. "आर्थिक गुन्हे करून फरार होणार्‍या गुन्हेगारांना पाश्चिमात्य देशांत आश्रय मिळतो व त्यांचे प्रत्यावर्तन करविण्यास असंख्य आडथळे होतात." याबद्दल, नुकत्याच झालेल्या G२० सभेत, पंतप्रधान मोदींनी जोरदार आवाज उठवून, अश्या घटनांमध्ये अंमलात आणण्यासाठी धोरण आणि प्रक्रियासंबंधी (policy and procedure) मूळ मसुदा सभेसमोर मांडला होता. त्याला सर्व उपस्थितांनी तत्वतः मान्यता दिली होती. एका ब्रिटिश नागरिकाचे संयुक्त अमिरातींमधून तडक भारतात प्रत्यावर्तन झाले व त्याला ब्रिटिश सरकारने आक्षेप घेतला नाही. अर्थातच, हे भारत, अमिराती आणि ब्रिटिश सरकारांची अंतर्गत स्तरावर बोलणी होऊन ब्रिटिश सरकारची तत्वतः मान्यता असल्याशिवाय शक्य झाले नसते. आता, खुद्द ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या भारतिय नागरिकाबद्दलचा हा निर्णय सकारात्मक भविष्याची नांदी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, भारतातून (आणि इतर अनेक देशांतूनही) आर्थिक गुन्हे करून पाश्चिमात्य देशांतील कायदे व राजकारणांच्या मागे लपणार्‍या गुन्हेगारांच्या पायाखालची जमीन सरकली असणार. आणि सद्या भारतात असणार्‍या व भविष्यात चोरीच्या मालमत्तेच्या बळावर पाश्चिमात्य देशांत ऐषआरामात राहण्याची स्वप्ने बघणार्‍या गुन्हेगारांनाही घाम फुटला असणारच ! :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 12/11/2018 - 03:47 नवीन
मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यास ब्रिटिश न्यायालयाने संमती दिली असली तरी त्याला हायर कोर्टात अपील करण्यास १४ दिवसाची मुदत दिली आहे. त्याने उच्च न्यायालयात ह्या निर्णयाविरुद्ध अपील केले तर त्याला भारतात आणण्यास आणखी किती वेळ लागू शकतो ? --- २०१९ च्या निवडणुकी पूर्वी मल्ल्याला भारतात परत आणले तर येणार्‍या लोकसभा निवडणुकीत, भाजपाला त्याचा चांगला राजकीय फायदा मिळू शकतो. कारण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे एक चांगले यश म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/11/2018 - 16:57 नवीन
मल्ल्या प्रत्यावर्तन शक्य तेवढे लांबवणार यात अजिबात शंका नाहीच. मात्र, ब्रिटिश कोर्टांना पुढच्या तारखा मागत झुलवत ठेवणे (जसे भारतात केले जाते तसे) तितकेसे शक्य नसते. या वेळेस भारतिय संस्थांनी (सिबिआय, इ) खरोखरच जोर लावला आहे (या अगोदर, काही विशिष्ट कारणांनी, भारताची केस पोकळ होईल अशी खबरदारी घेतली जात असे, असे म्हणतात उदा: अर्जेंटिनामधिल क्वात्रोचीची केस). या वेळेस ही केस अजित दोवाल यांच्या प्रत्यक्ष निरिक्षणाखाली पुढे जात आहे, तेव्हा तसे काही झाले तर आश्चर्य असेल. आताच्या निकालात, प्रत्यावर्तन होऊ नये यासाठी मल्ल्याने मांडलेले तीनही मुद्दे, न्यायाधिशांनी पूर्णपणे अमान्य केले आहेत. तेव्हा उच्च न्यायलयात तेच मत मिळेल असा अंदाज आहे. मात्र, ब्रिटीश कायद्याप्रमाणे, "सद्याचा निकाल --> (मल्ल्याने १४ दिवसांत ठरवले तर ... आणि जे अपेक्षित आहे) उच्च न्यायालय --> ब्रिटिश सरकारची संमती", हा प्रवास अनिर्वाय आहे, हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
क
कंजूस Tue, 12/11/2018 - 02:01 नवीन
आजच्या निकालांसाठी वेगळा धागा नाही ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/11/2018 - 05:51 नवीन
आजकाल निवडणूक निकालाचे स्वताचे विश्लेषण करायला जनता अणि वाचक सक्षम झाले आहेत. हे एक कारण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
विशुमित Tue, 12/11/2018 - 06:56 नवीन
लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात लिलावासाठी आणलेल्या कांद्याला अत्यंत कवडीमोल भाव मिळाला होता. त्यामुळे नैताळे संजय साठे यांनी विक्रीतून आलेली १०६४ रुपयांची रक्कम मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथा समोर आणली होती. .... दरम्यान, संजय साठे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का, याबाबत चौकशी सुरू झाली होती. अधिकाऱ्यांनी परिसरात आणि मित्रपरिवाराकडे याबाबत चौकशी केली होती. यावरून नाराज झालेले शेतकरी मनीऑर्डर कुठल्याही आश्वासनाशिवाय परत आल्याने संतप्त झाले आहेत. ==) हे अजब आहे. हमारा शासन ही हमारा प्रशासन..! https://www.loksatta.com/maharashtra-news/pmo-returns-money-order-to-farmer-who-sent-after-onion-rate-collapsed-1803573/
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 12/11/2018 - 12:00 नवीन
दिल्लीत कर्जमाफी , हमीभाव या मागण्या साठी शेतकऱ्यांनीं काढलेल्या मोर्चावर लाठीचार्ज करण्याचा आदेश भाजप मधील सुपिक डोक असलेल्या कोणत्या नेत्याने दिला होता कोणास ठावुक ? . राजस्थान , मध्यप्रदेश व छत्तीसगढ़ मधील भाजपच्या पानिपत होण्यास लाठीचार्ज है एक कारण होवू शकते . 2019 मध्ये सुद्धा मतदार नाइलाजाने काँग्रेस च्या मंदबुद्धि ला बहुमत देतील . काहीही असो पण भाजप ला एक स्पीडब्रेकर लागणे आवश्यक होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 12/13/2018 - 00:33 नवीन
सरकारकडून तुमची नक्की अपेक्षा काय आहे? भाजप का काँग्रेसचे सरकार हे बाजूला ठेवा. पण कुठल्याही पक्षाच्या सरकारने नक्की काय करावे असे तुमचे म्हणणे आहे? कांद्याचे भाव वाढले तर ग्राहकांना भुर्दंड म्हणून आरडाओरडा होतो. दुसरीकडे म्हणतात भाववाढ झाली तरी शेतकऱ्यांना कमीच भाव मिळतो. दलाल जास्त माल कमावतात म्हणून दलालांना बाजूला काढा म्हणलं किंवा त्यांना चाप लागेल असं काही करायचं म्हणलं तर तुम्ही दलालांच्या बाजूने बोलायला लागता. तुमचा ब्रिलियंट प्लॅन सांगा बघू आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/13/2018 - 06:11 नवीन
व्यापारी अणि दलाल यातील फरक एकदा समजून घ्या. मी दललांनाच्या बाजुने कोठे बोलोलो ते दाखवून द्या. ... माझ्या फुल्ल्प्रूफ प्लान ने सरकार निर्णय घेणार नाही याची कल्पना आहे का तुम्हाला?? ... तुम्ही प्रतिसाद नीट वाचत नाही. तो शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे हे तपासुन पाहण्याची काय गरज होती? आ सो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
व
विशुमित गुरुवार, 12/13/2018 - 06:15 नवीन
दलाल शोधायच काम मला वाटते सरकारचे आहे. सापडले की कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/13/2018 - 07:16 नवीन
माझ्या फुल्ल्प्रूफ प्लान ने सरकार निर्णय घेणार नाही याची कल्पना आहे का तुम्हाला?? जाऊ द्या हो, त्यांना फुलप्रुफ प्लॅन मागायची सवय आहे. नोटाबंदिसाठीही त्यांनी असा प्लॅन मागितला होता. सरकारने १०० % कॅशलेस व्यवहार अनिवार्य करावे असे मी सुचवले होते, ते त्यांना पटले नसावे बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभ्या.. गुरुवार, 12/13/2018 - 10:12 नवीन
त्यांना फुलप्रुफ प्लॅन मागायची सवय आहे. नोटाबंदिसाठीही त्यांनी असा प्लॅन मागितला होता.
अगदी अगदी, असे स्वतःची मनमानी करुन कैतरी करायचे अन फसले की कसे भारी होते म्हणून टिर्‍या बडवायच्या, तेही दाखवून दिले की असे जनतेकडे प्लान मागत बसले की जनता शिस्तीत घरी बसवते हे कळले तरी खूप झाले. इथल्या काही आयडींनी हा धडा घेऊन जरा शांत बसले तरी भाजपावर उपकार होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
mrcoolguynice गुरुवार, 12/13/2018 - 06:20 नवीन
सरकारकडून तुमची नक्की अपेक्षा काय आहे? भाजप का काँग्रेसचे सरकार हे बाजूला ठेवा. पण कुठल्याही पक्षाच्या सरकारने नक्की काय करावे असे तुमचे म्हणणे आहे?. . तुमचा ब्रिलियंट प्लॅन सांगा बघू आम्हाला.
मला वाटतं, ब्रिलियंट प्लॅन, मोदीजींकडेही नसावा ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
व
विशुमित गुरुवार, 12/13/2018 - 06:37 नवीन
कांद्याचे भाव वाढले तर ग्राहकांना भुर्दंड म्हणून आरडाओरडा होतो ==)) ग्राहकाना कसला भुरदंड ? आणि का म्हणून आरडाओरड करायची? कॉस्ट प्लस बिज़नेस/मार्केट रिस्क प्लस मार्जिन, येणारी सेल्लींग प्रायिज देणे कोण्या ही ग्राहकाला भागच असायला पाहिजे नाही? ... बाकी ब्रिल्लआंट वगेरे कुच्के शेरे मारण्याचा अतिशहाणपणा माझ्या बाबतीत कृपया वापरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
स्वधर्म Tue, 12/11/2018 - 07:54 नवीन
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण या सर्व ठिकाणी भाजपला जबरदस्त नुकसान सहन करावे लागेल असे ताज्या कलांवरून दिसत अाहे, तर या सर्व ठिकाणी कॉंग्रेसच्या अाधीच्या जागांत सणसणीत वाढ झाल्याचा कल अाला अाहे. मिझोराम येथे मात्र कॉंग्रेसचे जबर नुकसान झाले अाहे. तथापि, तिथे भाजपाला केवळ एक जागा मिळाली असून स्थानिक पक्षाने सर्वात जास्त जागांवर अाघाडी मिळवली अाहे. नमो हे सर्वोत्तम व रागा हे एवढे प्रभावहीन असल्याच्या प्रचारात, मतदारांनी असे का केले असावे, हे कोडेच अाहे. अजून अंतीम निकाल यायचे अाहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Fri, 12/14/2018 - 11:18 नवीन
आता सगळे परत बिळात जाऊन लपले वाटतं ... साधारण मार्च महिन्यात परत बाहेर येतील .
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 12/14/2018 - 12:32 नवीन
राफेल घोटाळा , हा घोटाळा नाही .... त्याचप्रमाणे तसेच २जी घोटाळा , हा घोटाळा नव्हता ... कोळसा घोटाळा , हा घोटाळा नव्हता ...
  • Log in or register to post comments
म
मामाजी Fri, 12/14/2018 - 13:52 नवीन
खोट बोला पण छातीठोक पणे बोला आपल्याला प्रिय असलेल्या लोकसत्तेतील ही बातमी. अहो अजून दहा दिवस पण पूर्ण नाही झाले ही शिक्षा ठोठावून आणिआपण रेटून सांगत आहात की कोळसा घोटाळा , हा घोटाळा नव्हता ... धन्य आहे तुमची. https://www.loksatta.com/desh-videsh-news/coal-scam-former-coal-secretary-hc-gupta-3-year-imprisonment-vikash-metals-moira-and-madhujore-block-1800422/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
स
सुबोध खरे Fri, 12/14/2018 - 14:01 नवीन
पुरोगामी मोराचा (उसना) भगवा पिसारा गळून पडला आहे त्याचा पार्श्वभाग उघडा पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा