मुलाचा हट्टीपणा
माझा मुलगा वय ११ वर्षे 6th Standard. शाळेत जायला रोज त्रास देतो, बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. आम्ही विचारून झालं, त्याच्या शाळेच्या Principal Madem नी व क्लास टीचर नी पण विचारल कोणालाही काहीच सांगत नाही.
आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. परीक्षेत मार्क कमीच आहेत. आठवी पर्यंत पास होत जाईल, पण पुढे त्याचे नुकसान होईल.
आता त्याला कोणती treatment द्यावी ते समजत नाही.
रोजच्या त्याच्या त्रासामुळे आमचा पेशन्स कमी होत चालला आहे.प्रत्येक वेळी माझ्या मिसेस ची पैश्यावरुन कटकट.जी कांही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू आहे / यापूर्वी सुरू होती यावर तुमचे दोघांचे एकमत आहे ना..?म्ही मदत मागताय हे उत्तम करताय, पण मिसेस ना पण समुपदेशनाची गरज आहेमाफ करा पण एकंदरीतच तुमच्या घरात टिव्ही, मोबाईल नको तितका जास्त वापरला जातोय असं वाटतं. दिवसातले 3-4 तास वेबसिरीज किंवा मालिका पाहण्यासाठी मिळू शकतात आणि त्याचं मुलाच्या नावावर तिकीट फाडून समर्थन केलं जातंय हे अजिबात पटणार नाहीय. मला वाटतंय एकूणच मुलाला वाढवताना जे पोषक वातावरण लागतं त्याचा काही प्रमाणात का होईना अभाव दिसतोय. उशिरा का होईना पण तुम्हाला याची जाणीव झाली आहे हे उत्तम आहे. पण एकूणच यापुढे संपूर्ण कुटुंबालाच काही नियम व नियंत्रण स्वतासाठी घालून घ्यावे लागतील असं वाटतंय. तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच समुपदेशनाची गरज आहे व त्यातूनच पुढचा कृती आराखडा आखावा असं सूचवेन. मी नववीत असल्यापासून घरात टिव्ही बघत नाही. (त्याआधीही घरात केवळ दूरदर्शन वाहिनी असल्यामुळे ठराविक वेळेला ठराविक कार्यक्रम पाहिलेत) त्यावेळी आमच्या गल्लीतले बरेचजण बसून आमच्या घरात टिव्ही पाहत. त्याचा इतका त्रास होई की मी व माझी बहीण लवकर 9 वाजता झोपून रात्री 3 वाजता उठायचो. व अभ्यास करुन 6.30 ला पहाटे पुन्हा झोपायचो व अगदी शिकवणीच्या वेळेआधी अर्धा तास उठून आवरुन पळायचो. त्या त्रासामुळे जेव्हा घर विभक्त झाले तेव्हा अजिबात टिव्ही घ्यायचा नाही असं घरात निक्षून सांगितलं. आजही माझ्या किंवा बहिणीच्या घरी टिव्ही नाहीय . याचे फायदे - 1) शांत वातावरणामुळे अभ्यासात लक्ष लागायचे 2) घरात एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा 3) आताही जो काही थओडाफार वेळ मिळतो तो आम्ही (मी, नवरा, मुलगा)एकमेकांसोबत घालवतो. 4) वाचनाची आवड निर्माण झाली. 5) अगदीच मोकळा वेळ असेल तेव्हा फोनवर मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना फोन करुन विचारपूस करते.(या निमित्ताने सर्व बंध जपले जातात कारण आताशा कुणाकडे प्रत्यक्ष जाणे जमतेच असे नाही.) मुलालाही फोनवर माझ्या मित्रमैत्रिणी व त्यांच्या मुलांशी बोलायला लावते त्यामुळे नकळत तोदेखील आमच्या ग्रुपसोबत जोडला गेला आहे. असो. सगळ्यांचे सर्व अनुभव व अभिप्राय लक्षात घेऊन तुम्ही यातून मार्ग काढाल व तुमचा प्रश्न सुटो याकरीता खूप मनापासून शुभेच्छा