Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - मार्च २०१९

व
वामन देशमुख
Fri, 03/01/2019 - 18:44
🗣 180 प्रतिसाद
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत. २०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं. १. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल - अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे आ. सर्जिकल स्ट्राइक ३.० इ. अजून असंच काहीतरी २. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. - महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील. ३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील. ४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
वर्गीकरण
राजकारण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
94263 वाचन

💬 प्रतिसाद (180)
ब
बाप्पू Tue, 03/05/2019 - 18:18 नवीन
बाय द वे.. पाकड्यांच्या व्हिडिओ वरून आठवले.. CCTV चे फुटेज हा न्यायालयीन पुरावा होऊ शकतो का? इतर माध्यमातून शूट केलेला विडिओ हा न्यायालयीन पुरावा होऊ शकतो का??
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 03/10/2019 - 08:43 नवीन
एवढा मोठा मेसेज मराठीत अनुवाद करण्यापेक्षा आहे तसाच चीकटवला , आणि यातील बरीचशी मते मला तरी पटतात !!!! Hindustan Unilever हिन्दुविरोधी है #सर्फ़_एक्सेल...कपड़ों को नहीं #हिंदुओं को धो रहा है,, त्योहारों पर विशेष विज्ञापन बनाने वाले सर्फ एक्सेल ने... होली पर एक नया विज्ञापन लॉन्च किया हैं... जिसमें हिन्दुओ की पवित्र आस्थाओं को बड़ी चालाकी के साथ... दूषित करने का प्रयास किया गया हैं... विज्ञापन एक साथ कई निशाने साध रहा हैं.. विज्ञापन के अनुसार:- एक हिंदू लड़की होली के दिन सायकल लेकर... गली मे निकलती हैं.... जहाँ छतों पर बच्चे बाल्टियों में रँगों से भरकर बलून रखें हुए है। लड़की... पूछती हैं .. रँग फेंकना हैं... फेंको... सभी बच्चे उस पर कलर बलून फेंकने लगते हैं... बच्ची गली में सायकल घुमा घुमाकर... रंगों से सरोबार हो जाती हैं। जब बच्ची पर रँग पड़ना बन्द हो जाते है... वो साइकिल रोककर छत पर खड़े बच्चों से पूछती हैं... हो गये रँग खत्म या औऱ हैं...? बच्चों के मना करते ही... एक घर मे से सफ़ेद झक कुर्ता पजामा पहने मुस्लिम बच्चा... बाहर निकलता हैं... जिसे हिन्दू लड़की अपने सायकल के पीछे बैठाकर #मस्जिद छोड़ने जाती हैं... लड़का कहता हैं #नमाज ? पढ़कर आता हूँ। और उसी दौरान विज्ञापन में शबाना आजमी की आवाज सुनाई देती हैं--अपनो की मदद करने मे #दाग लगे तो "दाग" अच्छे हैं.... एक प्रकार से नमाज की पवित्रता औऱ आवश्यकता होली के त्यौहार से अधिक महत्वपूर्ण बताने का... चतुराई पूर्वक कुत्सित प्रयास किया गया हैं। अगर आपके मन मे विज्ञापन देखकर एक बार भी... गंगा जमुनी तहजीब... भाईचारे... बच्चों की मासूमियत... का खयाल आता हैं... तो आप बौध्दिक #पिशाचों के पाश मे जकड़ चुके है। दूसरा #लव जिहाद... यहाँ जानबूझकर हिन्दू लड़की चुनी गई... हिन्दू लड़का भी चुना जा सकता था... लेकिन बचपन से मदद,मानवता के नाम पर हिन्दू बच्चियों... और माँ बाप के अंदर.लव जिहाद के बीज बो देना... यही बौद्धिक आतंकवाद हैं... बच्चों के नाम पर अपना नैरेटिव सैट करना... जिसमें खुद आप उनकी मदद करे। यहाँ एक औऱ बात ध्यान देने योग्य हैं... विज्ञापन के अंत मे आवाज शबाना आजमी की हैं... जिनका #एनजीओ #धर्मांतरण औऱ हिन्दू विरोधी गतिविधियों के लिये कुख्यात हैं। सर्फ़ एक्सेल से एक सवाल पूछिए... क्या सर्फ एक्सेल #मोहहरम पर ऐसा विज्ञापन बना सकता हैं ??... जहाँ मुस्लिम बच्ची ... हिन्दू बच्चे को #कुर्बानी के खून के छींटों से बचाते हुए... अपने कपड़ों पर लेते हुए. #मन्दिर ले जाये... #आरती के लिये... तब #शबाना आजमी कहे... अपनो की मदद के लिये... दाग लगे तो दाग अच्छे है। है हिम्मत सर्फ एक्सेल में ??... या #ईद पर जब चारों तरफ जानवर काटे जा रहे हों,, गलियों में खून बह रहा हो तब कोई #मुस्लिम लड़की उस खून में अपने पैर और कपड़े गंदे करते हुए किसी हिन्दू लड़के को #मन्दिर में पूजा के लिए लेकर जाए,, और पीछे से शबाना आज़मी की मधुर आवाज आए--अपनों की मदद के लिए #दाग लगें तो दाग अच्छे हैं,, है ऐसा विज्ञापन बनाने की हिम्मत सर्फ एक्सेल में?? या सिर्फ हिंदुओं ने ही अपने आपको इतना सस्ता कर लिया है कि मिलार्ड,, केजरी,, ममता,, बुद्धिजीवी,, कोंग्रेस,, मीडिया,,जेहादी,, टुकड़े टुकड़े गैंग,, वामपंथी,सेक्युलर कीड़े,, या जिसका भी दिल करे वही करो छेड़छाड़ इनकी परम्पराओं,,धार्मिक मान्यताओं से,, ये कुछ नहीं करेंगे,, मरी हुई कौम है,, सर्फ एक्सेल का बहिष्कार कीजिए... अपनी बहुसंख्यक #आर्थिक ताकत से इसे झुकाइये... ताकि सर्फ एक्सेल ये विज्ञापन वापिस ले... औऱ भविष्य में दोबारा ऐसा दुःसाहस न करे... और खूब होली खेलिए,,, खुशियों के रंग,, अपने त्योहारों के संग .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 03/10/2019 - 16:08 नवीन
ह्या विषयावर काय करता येईल ? ह्यावर विचार मंथन होणे गरजेच आहे ! मुळात लोकांना ह्या मध्ये चुकीच आहे हेच कळत नाही !! लोक इतके मुर्ख असतात ना, रामदेव बाबाच्या पतंजलीने जीन्स विकायला घेतली तर ह्यांच्या पोटात कालवा कालव होते. पण अमेझॉनने ग्रोसरी सुरु केली तर हेच लोक अमेझॉन मधुन ग्रोसरी घेण्यात मोठेपणा मानतात ! रामदेव बाबाच्या दंतकांतीने तर सर्व टुथ पेस्ट बनवणार्या कंपन्यांना रस्त्यावर आणलय हे त्यांच्या बदललेल्या जाहिराती दाखवतात !! अलिकडे सर्व टुथपेस्ट आयुर्वेदचा सहारा घ्यायला लागलेत ! सर्फ ही हिंदुस्तान लिव्हरच प्रोडक्ट आहे. त्या सर्फला हिंदु लोकांनी सार्वजनीक वाळित टाकल तरच हे लोक सरळ होतील !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
वामन देशमुख Mon, 03/11/2019 - 11:50 नवीन
ट्विटर वर #BoycottSurfExcel आणि #BoycottHindustanUniliver जोरात चालू आहे. मुख्य माध्यमातदेखील याची चर्चा सुरु आहे. तथापि जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्याची निरनिराळ्या कंपन्यांची हि पहिलीच वेळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
च
चिगो Tue, 03/12/2019 - 10:41 नवीन
लड़का कहता हैं #नमाज ? पढ़कर आता हूँ।
ह्यानंतर 'बाद में रंग पडेगा..' असं म्हणते ती मुलगी. ते सोयिस्करपणे विसरले वाटतं पोस्टलेखक.. मुसलमानांसोबतदेखील रंग/ होळी खेळलेला एक सेक्युलर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प गुरुवार, 03/14/2019 - 03:38 नवीन
खुप छान !!! सर्वधर्म समभाव वाढलाच पाहिजे !!! आक्षेप त्या कंपनी च्या जहिराती च्या सादरिकरणावर आहे . हिंदू मुलगा आणि नमाज ला जाणारी मुस्लिम मुलगी का नाही दाखवली ? असले प्रश्न तुम्हाला बालिश वाटतील कारण सेक्युलर आहात !!!! पण अशा प्रकारे दुर्लक्ष केल्या मुळे हिंदू समाजाची झालेली हानी पाहण्यासाठी ज्यास्त दिवस लागणार नाहीत , अजुन पाच दहा वर्ष खुप झाले . मला नेहमी प्रश्न पडतो मुस्लिम धर्मात सेक्युलर का नसतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
म
मोहन गुरुवार, 03/14/2019 - 06:34 नवीन
<<मला नेहमी प्रश्न पडतो मुस्लिम धर्मात सेक्युलर का नसतात ?>> +१०० प्रचंड सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ब
बाप्पू गुरुवार, 03/14/2019 - 07:21 नवीन
मुस्लिम धर्मात सेक्युलर का नसतात ?
जो सेकुलर आहे तो सच्चा मुस्लिम नाही. हे मुलतत्व व्हय आहे शांततावादी धर्माचे. आणि काही नाईलाजास्तव सेकुलर पण असतात ना.. फक्त तोपर्यंत च जोपर्यंत त्यांची संख्या 3-4% पर्यंत असतें.. जसे जसे लोकसंख्या वाढू लागते तसें तसें त्यांच्यातील खरे रूप बाहेर येऊ लागते. कॅन्सर च्या पेशी पण अश्याच असतात ना?? जोपर्यंत फार कमी असतात तोपर्यंत अगदी शहाण्यासारख्या बाकीच्या पेशींना सर्व पेशी समभाव या नात्याने समजून घेतात आणि एकत्र राहतात. पण नंतर हळू हळू काय होते ते आपल्याला माहिती आहेच... !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
माहितगार गुरुवार, 03/14/2019 - 11:00 नवीन
मला नेहमी प्रश्न पडतो मुस्लिम धर्मात सेक्युलर का नसतात ?
@ ट्र्म्प युरोमेरीकाट्रालीयात एक्स मुस्लिम हि चळवळ बर्‍यापैकी मूळ धरू लागली आहे हे आंजा आणि विशेषतः युट्यूब आणि ट्विटरादी सोशल मिडियावर #ExMuslim असा शोध दिला असता दिसून येते. ह्या मंडंळींनी गेल्या आठ दहा वर्षात बर्‍यापैकी पुस्तक लेखन ही केले आहे मोठ्या प्रमाणावर युट्यूब काढल्या आहेत शिवाय सोशल मिडियावरून पुर्वाश्रमीच्या स्वबांधवांशी जोरदार वादही करताना दिसतात. याचा अर्थ युरोमेरीकेत अथवा सोशल मिडियावर त्यांची स्थिती राजकीय दृश्ट्या बळकट आहे असे मुळीच नाही. तिकडचे डावे ही आपल्या डाव्यांप्रमाणे मतपेटी लांगुलचालनासाठी धर्मांधांचीच री ओढताना दिसतात. इतपत कि त्यांना मेन स्ट्रीम मिडियाच नाही सोशल मिडियावर बॅन करण्यात आमेरीकी संसदीय आवारात वावरू देण्यात धर्मांधाना यश यावे इतपत तिथे मजल पुढे गेलेली आहे. अर्थात एक्स मुस्लिमांनी साधलेली प्रगती युरोमेरीकाट्रालीया पुरती मर्यादीत आहे त्याच वेळी त्यांच्या प्रभावाने मुस्लिम देशातील काही तरुणाई किमान देश सोडून पळण्याचा विचार करते आहे. यातील बहुतेक एक्स मुस्लिम नास्तिक असल्यामुळे आपल्याकडच्यांना त्यांच्या शी जमवून घेणे जड जात असावे. पण ख्रिस्चन आस्तिक मुस्लिम नास्तिकांशी व्यवस्थित जुळवून घेताना दिसताता. आपल्याक्डे धर्मातील चुकीच्या गोष्टीवर टिका करण्यापेक्षा समुह टिकेवर भर दिला गेल्यामुळे आणि शांततेच्या धर्माच्या बाबत सुविहीत अभ्यासपूर्णतेच्या अभावामुळे भारतातही जे काही सेक्युलर असतील ते पुढे येण्यास कचरत असणार असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
च
चिगो Mon, 03/18/2019 - 11:34 नवीन
पण अशा प्रकारे दुर्लक्ष केल्या मुळे हिंदू समाजाची झालेली हानी पाहण्यासाठी ज्यास्त दिवस लागणार नाहीत , अजुन पाच दहा वर्ष खुप झाले .
आयला.. लैच कमी टाईम दिला हो तुम्ही. किमान ७० वर्षं झालीत 'धर्म संकट में' असल्याची हाळी उठवून, नाही? डोळे उघडे ठेऊन बघितले, तर भरपूर सेक्युलर सापडतील मुस्लिम धर्मियांत देखील. असो, अपना अपना नजरीया..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 03/10/2019 - 16:19 नवीन
कपिल शर्मा , टाटा स्काई, ऐमज़ॉन , फ्लिपकार्ट यांना झटके बसले आहेत , आता हिंदुस्तान यूनिलीवर चा नं आहे इतकेच . आज दिवसभर एकदाहि जाहिरात दिसली नाही हे विशेष !!!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 03/10/2019 - 16:38 नवीन
पूर्वी एका जाहिराती मध्ये एक विवाहित तरुणी हातात पुजेचे ताट घेवून चाललेली असताना डिओच्या येणाऱ्या सुंगंधाच्या दिशेने ती हातातील ताट भिरकावून पळत सुटते आणि त्या तरूणा ला बिलगते , असे काहीतरी पाहिल्याचे आठावतयं !!!! एक मात्र नक्की कुठल्याच कंपनी मध्ये मुस्लिम / ख्रिश्चन धर्मावर विडंबनात्मक किंवा उपहासात्मक जाहिरात करण्याची हिम्मत नाही . हिंदू धर्म सगळ्या बाबतीत सॉफ्ट टार्गेट आहे , आपल्याला क़ाय करायचे ? ही वृत्ति हिंदू धर्मात खुप प्रमाणात फोफावली आहे .
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 03/10/2019 - 17:12 नवीन
अहो त्या शांततावादी धर्मात फक्त कार्टून काढले तरी गळ्यावरून सूरी फिरवली जाते.. (संदर्भ चार्ली हेब्दो प्रकरण) आणि तरीही xxxx हा मानवतावादी आणि शांततेचा धर्म आहे असे बोंबलतात. I am xxxxx and I am not terrorist असा प्रचार केला जातो... आणि याउलट आपल्या इथे खुशाल 3-3 तासाचे चित्रपट निघतात आणि षंढ हिंदू समाज मस्त पोपकोर्न खात बघत बसतो. आणि एवढे होऊन देखील भगवा आतंकवाद, इंटॉलरंन्स करणारा समाज इ इ विभूषणे लावून घेतो. हे असच चालू राहिले तर पुढच्या काही दशकात भारताचे अजुन काही तुकडे होऊन त्या तुकड्यात हिरवे हिरवे गार गालिचे दिसतील. याला कारणीभूत फक्त 2 गोष्टी - अतिसहिष्णूपणा ग्लोबलायझेशन आणि आधुनिकतेच्या नादात आपल्या संस्कृती पासून दूर जाणारे उच्च आणि मध्यम वर्गीय लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Mon, 03/11/2019 - 03:47 नवीन
पुलवामाचा स्फोट करणारा फिदाईन तरुणाला पुर्वी सैन्याने दगडफेक करताना पकडले होते ! त्यावेळेला सैन्याने त्याला मामुली शिक्षा केली होती ! त्या शिक्षेमुळे म्हणे तो अतिरेकी झाला! काश्मिर मधुन तिन चार लाख काश्मिरी पंडीतांना देशोधडीला लावल, त्यांच्या हजारो माता बहिणीचा बलात्कार केला. कोणी विरोध केला त्यांचा खुले आम खुन केला गेला ! पण ह्या लाखो काश्मिरी पंडीत लोकांमध्ये एकही अतिरेकी पैदा झाला नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
व
विजुभाऊ Mon, 03/11/2019 - 08:11 नवीन
काश्मीर सीमेवर आणि राजस्थान्सीमेवर चकमकी / गोळीबार चालुच आहे. याच्या बातम्या कुठेही येत नाहिय्येत. (एका अर्थाने हे बरे आहे. नाहीतर हिंदी चॅनेलसेना डंके की चोट पर दिवसभर बरळत बसेल) पण हे चिंताजनक आहे
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 03/11/2019 - 08:12 नवीन
महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 03/11/2019 - 13:57 नवीन
या काळात रमजान महीना येत असल्यामुळे काही राजकीय पक्षानी निवडणुकावर आक्षेप घेतला आहे , त्यात तृणमूल आघाडिवर आहे, गमतीची गोष्ट अशी की या गोष्टिसाठी ओवैसीने राजकारण करणाऱ्या पक्षाना फटकारले आहे. हायला हे धर्माचे ऐसे राजकारण करतात तर सर्वधर्मसमभाव कुठे सोडून येतील?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 03/11/2019 - 14:03 नवीन
आमचे पंतप्रधानपद इकछुक उमेदवार लढाईआधीच तलवार म्यान करून बसले आहेत, माढामधून क़ाय कुठूनही निवडणूक लढवणार नाही म्हणतात! म्हणे देशभर प्रचाराला वेळ देनार म्हणतात! यांना महाराष्ट्राच्या बाहेर कुणी ओळखतं तरी का कुणी?
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sat, 03/16/2019 - 09:28 नवीन
बरोबर विधान: यांना पश्चिम महाराष्र्टाच्या बाहेर कोणीही ओळखत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ड
डँबिस००७ Mon, 03/11/2019 - 18:17 नवीन
देशाचे भावी पं प्रधान युवराज राहुल गांधीजींनी उत्कट भावनांच्या भरात मसुद अझहर नावाच्या कुविख्यात अतिरेक्याला मसुद अझहरजी म्हणुन संबोधले !! मिडीयाला गदारोळ करायला तेव्हडाच चांस मिळाला !!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 03/11/2019 - 21:39 नवीन
ही पण एक राजकीय खेळी आहे. आपण चर्चा करू व विसरून जाऊ, पण असे नाही आहे. मागे एकदा मुशर्रफ एका जाहिर मुलाखतीत म्हणाला होता कि सारे जग ज्यांना अतिरेकी म्हणते ते पाकिस्तानात हीरो आहेत. दाऊद, ओसामा, अल बगदादी, अल जवाहिरी इत्यादि. कारण ते इस्लामच्या झेंड्याखाली लढत आहेत. भारतात पण नेमका हाच प्रोब्लेम आहे. येथील बहुतांश मुस्लिम पाकिस्तानला इस्लामचा रखवाला मानतो. मग जर याचा फायदा उठवायचा असेल तर अशी विधाने येणे स्वाभाविक आहे . दिग्गीला जेव्हा विचारले की तुम्ही ओसामाला जी का पुकारले ? तेव्हा मनोरंजक उत्तर मिळाले की मेल्यानंतर सर्व दुश्मनी संपुन जाते. आपल्याला इतिहासात दाखवला गेलेला अतिरेकी अफझलखां आता अफझलबाबा बनून दर्ग्यात विसावला आहे. तीस वर्षापूर्वी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा काही बुरखादारी स्त्रियां त्याच्या कबरिवर चादर चढवून दुवा मागत होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विजुभाऊ Tue, 03/12/2019 - 07:49 नवीन
अफझल खान हा कट्टर इस्लाम चा पाईक होता. इतकेच काय पण औरंगजेब हा देखील त्या अर्थाने मोठा होता. भारतातील सर्वात मोठा भू भाग त्याने एका राजवटी खाली आणला. राज्याचा खजीना रीता करणार्‍या बापाला त्याने सत्तेवरून हाकलले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ब
बाप्पू Tue, 03/12/2019 - 07:09 नवीन
शेवटी कितीही झाकले तरी खांग्रेस चा चेहरा वेळोवेळी उघडा पडतोच. मसुद अजहर सारख्या आतंकवाद्याला आदरार्थी संबोधन वापरून त्यांनी दाखवून दिले कि फक्त xxxx मतांसाठी हे कोणत्या थराला जातील. आणि बहुतांश xxxx समाज देखील अश्या आतंकवाद्याबद्दल एकतर सहानभूती बाळगून आहे किंवा तटस्थ आहे. फार कमी लोक यांच्याबद्दल नेगेटिव्ह मत बाळगतात. त्यामुळेच तर अश्या xxxx घटकाला खुश ठेवण्यासाठी वेळोवेळी अशी विधाने खांग्रेस कडून केली जातात. याआधी सुद्धा हाफिज सैद चा आदरार्थी उल्लेख झालेला आहे. त्याचबरोबर झाकीर नाईक सारख्या जहाल माणसाला देखील खांग्रेस शासनात वेळोवेळी मोठे केले गेले होते हि गोष्ट स्वतः ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना कधीच समजली नाही. पण जेव्हा समजेल तेव्हा परत लढण्यासाठी जितकि ताकद लागेल तितकी ते कदाचित उभारू शकणार नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रम्प Tue, 03/12/2019 - 12:04 नवीन
1983 ला मुंबई मध्ये 12 बॉम्बस्फोट झालेले होते . पण मुस्लिम वस्त्या टार्गेट होवू नयेत म्हणून 13 वा स्फोट मुस्लिमवस्तीत झाल्याचा दावा करून दूरदृष्टि दाखवणारे तेव्हांचे मुख्यमंत्री पवार साहेब यांनी टाइगर मेमन सह इतर आरोपीच्या सूटकेसाठी कोर्टात केस लढणाऱ्या माजिद मेमन ला राकॉ तर्फे राज्यसभेचे सदस्यपद बहाल केले . त्या ' 13 ' व्या खोट्या स्फोटा बद्दल ना खंत ना खेद पण माजिद ला सदस्य करून मुस्लिम समाजात राकॉ चा टक्का वाढविण्याचा व्यवाहरिक प्रयत्न केला . अशाप्रकारे लांगुलचालन करण्याचे प्रयोग आज पर्यंत चालूच आहे .त्या समाजातील वादग्रस्त लोकांना अशी बक्षीशी देणारे नेते हिंदूच असतात .
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/12/2019 - 13:26 नवीन
ते जाणते राजे आहेत. महाराष्ट्राची त्यानी किती किती आणि कुठे कुठे वाट लावून ठेवली आहे ते त्यांच्या नंतर पन्नस वर्षात ही समजणार नाही लोकांना. सम्रक्षण मंत्री अस्ताना त्यानी जे जे हॉस्पिटल हल्ल्यातील आरोपीना स्वतःच्या चार्टर विमानात लिफ्ट दिली होती. हे त्यानीच कबूल केले आहे. किरकोळ चौकशी होऊन पुढे ते प्रकरण बंद झाले ते कायमचेच
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 03/12/2019 - 13:36 नवीन
शहीद इशरतजहां एम्बुलेंस सर्विस विसरलात!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 03/12/2019 - 15:53 नवीन
हि गोष्ट स्वतः ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना कधीच समजली नाही. पण जेव्हा समजेल तेव्हा परत लढण्यासाठी जितकि ताकद लागेल तितकी ते कदाचित उभारू शकणार नाहीत.. हे एकदम बरोबर बोललात !! हिंदु एकत्र कधीच नव्हते ! एकत्र होऊ शकत नाहीत !! कारण त्यांना त्यांच्या जातीत विभागायच काम शास्त्रशुद्ध पद्धतीने गेल्या २०० वर्षांपासुन करण्यात आलेल आहे. त्या अगोदरही छोट्या लालसे पोटी, खोट्या आत्मविश्वासा पोटी विश्वासघात करण्याच काम लोकांनी वेळोवेळी केलेल आहे. त्याची बरीच उदाहरण ईतीहासात सापडतील !! शरद पवार , सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील सारखे हिंदु द्वेष्टे नेते शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लाभावेत ह्या सारख दु:ख नाही. जेंव्हा मुसलमान लोक काफिर विरोध करायला लागतील तेंव्हा ते कोणत्याही जाती, पोट जाती, पोट धर्मांचा मुलाहीजा ठेवणार नाहीत त्यांच्यासाठी सगळेच काफिर , सगळेच हिंदु !! हा एकच मार्ग आहे हिंदुंना एकत्र करण्याचा !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 03/12/2019 - 16:32 नवीन
" शरद पवार , सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील सारखे हिंदु द्वेष्टे नेते शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लाभावेत ह्या सारख दु:ख नाही. "
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/14/2019 - 05:15 नवीन
चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद अझहर प्रकरणात युनो मधे पाचर मारली आहे. या मुळे चीन चे पाकिस्तान प्रेम ( सीपेक च्या सुरक्षिततेसाठी असेल कदाचित ) लपून राहिलेले नाही. चीन ने सीपेक च्या रस्त्यासाठी स्वतःची फौज तैनात केली आहे. पाकिस्तान ची काहिही वात लागू देत चीन सीपेक आणि ग्वादर बंदराबाबत फारच संवेदनाशील आहे जैश चे लोक चीन मधील मुस्लीमांवरच्या अत्याचारांबद्दल का कधीच बोलत नाहीत?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 03/14/2019 - 07:26 नवीन
चीन मध्ये रोजा पाळण्यावर देखील बंधने आहेत.. बुरखा आणि दाढीवर देखील बंदी आहे. हे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करतात आणि भारतात मुस्लिमांवर खूप खूप अन्याय होतात अश्या बोंबा मारणाऱ्या pakistan ला लाज कशी वाटत नाही?? लाज वाटणार तरी कशी म्हणा.. पूर्ण देश हा xxxx धर्माच्या च्या कॅन्सर ने ग्रस्त आहे. त्यामुळे विवेकबुद्धीने आणि अक्कल वापरून विचार करण्याची शक्ती ते केव्हाच गमावून बसलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
भ
भंकस बाबा गुरुवार, 03/14/2019 - 12:44 नवीन
काही बोलल्यावर लाथच बसण्याची शक्यता जास्त आहे. रशिया, चीन , जपान व इज्राइल या देशाना मुस्लिमाबाबत सल्ले देण्याच्या भानगडित कोणी पड़त नाहीत , कोण जाणो , है लोक दोन रट्टे अजुन ठेवून देतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ब
बाप्पू गुरुवार, 03/14/2019 - 14:44 नवीन
त्यांना खरं काय ते समजलंय.. जास्त मानवतावादी झालो तर अजुन काही शे वर्षांनी सर्व जाऊन हिरवे हिरवे गार गालिचे दिसतील हे माहितेय.. जपानने तर अघोषित वाळीतच टाकलेय यांना.. भारतात खूप लाड पुरवले जातात एकदा ठोकर खाऊन पण आजून जिरली नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सुबोध खरे गुरुवार, 03/14/2019 - 14:49 नवीन
चीन ला पाकिस्तान किंवा इस्लाम बद्दल यत्किंचितही प्रेम नाही. त्यांना प्रेम आहे ते फक्त "चीन बद्दल". ते पाकिस्तानचा उपयोग करतात तो फक्त भारतावर दबाव ठेवण्यासाठी आणि आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्यासाठी. चीनचा बहुतांश व्यापार मलाक्काच्या सामुद्रधुनीतून चालतो. हा अतिशय चिंचोळा समुद्रमार्ग भारताने तेथील देशांशी मैत्री साधून बंद केला तर आपला व्यापार आणि आर्थिक हितसंबंध सुरळीत राहण्यासाठी पाकिस्तानातून थेट अरबी समुद्रात उतरण्यासाठी मार्ग मोकळा हवा म्हणून पाकिस्तानशी केलेली मैत्री आहे. त्यात चीनचा भरपूर फायदा होतो आहे आणि पाकिस्तान अधिकच कर्जबाजारी होतो आहे. हे तिथल्या मूर्ख लोकांना कळत नाही. पाकिस्तान म्हणजे १ % राज्यकर्ते (ज्यात उद्योजक, लष्करशहा आणि राजकारणी येतात) पाकिस्तानचा सर्व पैसा साधन संपत्ती हि या १ % लोकांकडे आहे आणि बाकी)९९ % जनता अडाणी आणी दरिद्री आहे.पाकिस्तान खड्ड्यात गेला तरी चालेल आमच्या हितसंबंधाना धक्का लागु नये अशीच इच्छा असलेला हा १ % वर्ग आहे.( भारतात सुद्धा असा वर्ग आहेच) त्यामुळे पाकिस्तान कर्जबाजारी तर आहेच पण दिवाळखोरीत निघाला तरी त्यांना काहीही घेणे देणे नाही. याचा चीन पुरेपूर उपयोग करून घेत आहे. त्यामुळे या वर्गाचा फायदा होईल असे धोरण ठेवून चीन पाकिस्तानला लूटत आहे. हा वर्ग पाकिस्तानी जनतेला धर्माच्या अफूच्या गोळीने गुंगवून आपला कार्यभाग साधून घेत आहे. जर काश्मीरवर मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून तेथील जिहादी काम करत आहेत तर त्याहूनही अनन्वित अत्याचार चीन शिंजियांग या प्रांतात करीत आहे परंतु तेथे जिहादींना पाठवण्याची हिम्मत पाकिस्तानी राज्यकर्ते करू शकत नाहीत. https://www.bbc.com/news/world-asia-china-45474279 शिंजियांग या प्रांतात १ कोटी १० लाख मुसलमान आहेत तर अक्ख्या जम्मू काश्मीर मध्ये ८० लाख मुसलमान आहेत. त्या पैकी ६७ लाख काश्मीर खोऱ्यात आहेत. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी मसूद अझर, हाफिज सैद सारखे मूर्ख पिसाळलेले कुत्रे पळून ठेवलेले आहेत. त्यांना इस्लामच्या नावाखाली भारतात किंवा अफगाणिस्तानात छू केले जाते. अफगाणिस्तानात जोवर अशांतता राहील तोवर तेथे अमेरिकेची सैन्य असेल आणि त्या सैन्याला रसद पुरवणे यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था,रसद पुरवठा या सर्वांची कंत्राटे या राजकारणी आणि लष्करशहांना मिळत राहतील. शिवाय तेथून येणारी अफू यावरचा मलिदा ही निःसंगपणे मिळत राहील अशी हि व्यवस्था आहे. यात अमेरिकेतील उद्योगपती यांची दुकानेसुद्धा चालत आहेत. यात फक्त पाकिस्तानमधील गरीब कोवळे तरुण धर्माच्या नावाखाली (जिहाद, ७२ हूर, जन्नत) उगाचच बळी पडत आहेत. त्याचे कुणालाही काहीही घेणे देणे नाही. यामुळेच अमेरिका काय, चीनच काय, रशिया सुद्धा पाकिस्तानविरुद्ध ठोस कार्यवाही करू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बाप्पू गुरुवार, 03/14/2019 - 19:51 नवीन
प्रतिसाद आवडला. पण एक प्रश्न आहे. चीन आणि पाकिस्तान च्या 1% लोकांचा फायदा समजला पण अमेरिका आणि रशिया यांचा फायदा नेमका काय तो समजला नाही !! हत्यारांची बाजारपेठ हे एकमेव कारण असावे का? पण हत्यारे विकून किती पैसा मिळत असेल? आणि कितीतरी अमेरिकन सैनिक अफगाणिस्तान मध्ये विनाकारण मारले जातात त्यांच्या जीवाची काही किंमत नाही का?? म्हणजे अमेरिका आपल्या नागरिकांच्या आणि सैनिकांच्या सुरक्षितेबद्दल इतकी निष्काळजी आहे का? आणि पाकिस्तान आपल्याला उल्लू बनवतोय हे त्यांच्या लक्षात न येण्याजोगे उल्लू ते नक्कीच नाहीत तरीही पाकिस्तान ला इतकी मोठी आर्थिक मदत देण्याचे कारण काय? आणि अफगाणिस्तान मध्ये विनाकारण आपल्या सैनिकांना मारण्यासाठी पाठवण्याचे पण कारण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Fri, 03/15/2019 - 04:31 नवीन
त्याचे कारण अर्थातच आहे पाकिस्तानचे आणि अफगाणिस्थानचे भूराजकीय स्थान.. चीन, भारत, रशिया आणि मध्यपुर्व या सगळ्या ठिकाणांपासून किंवा सगळीकडे लक्श्य ठेवण्यासाठी पाकिथानच्या भूमीचा उपयोग होतो.. त्यामुळे पाकिस्तानला कायमच अ‍ॅड्व्हाण्टेज आहे.. आणि ते पण या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतायत. त्यामुळेच मी इथेच कुठेतरी लिहिले होते, की पाकिस्तान पडणे कोणाला परवडणारे नाही. पण डोईजड होणे देखील परवडणारे नाही. भारत पाकिस्तान, म्हणजेच पर्यायाने काश्मीर प्रश्न धुमसत राहणे यातच या सगळ्या महासत्तांचे हित सामावले आहे. आणि अर्थातच भारताच्या राज्यकर्त्यांना पण हे माहीत आहे. पाकिस्तान विरुद्ध या सगळ्या देशांपैकी कोणीही ठाम भूमिका घेणे म्हणजे ही समीकरणे बदलणे, आणि के तेव्हाच शक्य होइल जेव्हा भारत कोणत्यातरी एका बाजुला झुकेल. सध्या हा बदल दिसतोय याचे कारण देखील हेच आहे. बदलत्या परिस्थितीत जर भारत आपल्या बाजूने ठामपणे उभा राहिला तर पाकिस्तानची लोकाना असलेली गरज कमी होईल.. भारत हा पुर्वीपासुन तसा बेभरवशी म्हणून ओळखला जातो.. म्हणजे नैतिकदृष्ट्या आपण असू देखील भरवशाचे, पण जेव्हा मैत्री निभावायची वेळ येते तेव्हा नैतिकता मध्ये आणायची नसते. महत्वाचे म्हणजे तुम्ही सदासर्वकाळ कुंपणावर बसुन राहू शकत नाही हे कळले पाहिजे. (वटवाघुळांची गोष्ट माहीत असेलच) दुर्दैवाने या गोष्टी राज्यकर्त्याना इतके दिवस कळत नव्हत्या. सध्याच्या राज्यकर्त्याना हे माहितेय, आणि आपल्या वागण्यातून ते हे दाखवून पण देतायत. त्याचाच परिणाम पाकिस्तानबद्दलच्या बदलत्या धोरणात दिसतोय. पण आपले धोरण खरेच बदलले आहे हे आपल्या नवीन मित्रांना पटवून देणे देखील तितकेच आवश्यक आहे, तसे झाले नाही तर त्यांना विश्वास वाटणार नाही.. आणि त्यामुळे दृश्य परिणाम नीट दिसायला अजून ३-४ वर्षे तरी जातील. तेदेखील जर हेच सरकार पुन्हा आले तर. नाहीतर कठीण आहे. पण आहे हेच सरकार आणि तेच धोरण परत आले तर मात्र पाकिस्थान प्रश्न पुढच्या ४-५ वर्षात मिटेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/14/2019 - 15:33 नवीन
जैश चे लोक चीन मधील मुस्लीमांवरच्या अत्याचारांबद्दल का कधीच बोलत नाहीत? क्रिस्टीयन फेअर नावाच्या अमेरिकन लेखिकेच्या नुसार : पाकिस्तानात वेगवेगळ्या दशहतवादाचे विचार गट आहेत. लश्कर तैय्यबा हा त्यातला पहीला गट. ह्या गटाच्या विचारसरणी नुसार पाकिस्तान मधल्या हिंदुंची हत्या करण त्यांना मान्य नाही. पण भारतातल्या मुसलमानांची हत्या कोणत्याही घातपाताच्या वेळेला कोलॅटरल डॅमेज म्हणुन झालेली चालते ! जैशचे लोक कोंणालाही कुठेही मारु शकतात त्यांच्या विचारसरणीत तत्व वैगेरे नाहीत. ते लोक भारता विरुद्ध तसेच अफघाणीस्तान विरुद्ध ही घातपात करत असतात. क्रिस्टीयन फेअर ने विपुल लेखन केलेले आहे. छान पैकी उर्दु बोलणारी अमेरिकन महीला क्रिस्टीयन फेअर ही पाकिस्तान मध्ये काही वर्षे राहुन वेगवेगळ्या दशहतवादी संघटनेवर संशोधन कार्य करत होती. तिने स्प ष्ट लिहीलेल होत की पाकिस्तान अमेरि केला मामा बनवत आहे. अमेरिकेचा पैसा घेऊन अफघानीस्तान मध्ये अमेरिकन सैन्याविरुद्ध तालिबानलाच मदत करत आहे . हे सर्व स्पष्ट असताना अमेरिकन सरकार ने काहीही केले नाही त्यामुळे कित्येक अमेरिकन सैनिक मारले गेले व तालिबान वरचढ ठरले. ईतक लिहील्या नंतर शेवटी तिला पाकिस्तानातुन हाकलुन दिलेले होते. आता ती अमेरिकेत आहे. https://en.wikipedia.org/wiki/C._Christine_Fair पाकिस्तान मध्ये हिंदु द्वेष हा लहान पणा पासुन शिकवला जातो, संस्काराचाच तो एक भाग आहे. ईथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तान निर्माण कोणी केला ? पाकिस्तान निर्माण केला मुस्लिम लिगच्या लोकांनी . जेंव्हा १९४६ -४७ साली निवडणुका झाल्या त्यावेळेला दोन पक्ष होते. काँग्रेस व दुसरा मुस्लिम लीग . मुस्लिम लीगला सपोर्ट करणारे जास्तीत जास्त लोक हे उत्तर प्रदेश, बिहार मधले नवाब व त्यांचे नोकरदार लोक होते. त्यांना देशावर रा ज्य कराय चे डोहाळे लागलेले होते. भारतावर सुशिक्षीत हिदु राज्य करणार आणी अश्या काफिर हिंदुच्या हाताखाली रहायच पचनी पडत नव्हत म्हणुन त्यांनी वेगळ्या देशाची मागणी केली व देशाची फाळणी झाली. मुळात पाकिस्तान बनला सिंध, पंजाब व बलुचीस्तानच्या भाग घेऊन. ह्या बलुचीस्तान हा वेगळा देश होता. सिंधु प्रदेश व पंजा ब मध्ये मुस्लिम जन संख्या विषेश नव्हती व मुस्लिम लीगला जनाधार नव्हता. सिंध मध्ये सिधी तर पंजाब मध्ये पंजाबी बोलली जायची. उर्दुला त्यावेळच्या समाजात स्थान नव्हत. जेंव्हा पाकिस्तान बनला तेंव्हा ईथले उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहार मधले मुसलमान भारत देश सोडुन पाकिस्तानात जाऊन राहीले. मुळात पाकिस्तानच्या हिंदु द्वेषाच मुळ ईथे आहे. ह्या स्थलांतरीत लोकांनी पाकिस्तानात प्रवेशच सरकार स्थापन करायच्या महत्वाकांक्षेने केलेला असल्याने भराभर ह्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहारच्या उर्दु भाषीक लोकांनी सरकारातल्या महत्वाच्या जागा भरल्या व महत्च्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानची राज्य भाषा ही उर्दु का झाली हे त्याच महत्वाच कारण आहे. पण पंजाब मधल्या दणकट लोकांचे मनोधर्य खचण्यासाठी पंजाबी व सिंधी भाषेला बँन करण्यात आले. पंजाबी व सिंधी लोकांनी त्याच्या मायबोलीत बोलण मुश्किल झाल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 03/15/2019 - 05:38 नवीन
इथेही उत्तर भारतीय मनोवृत्ती दाखवली त्यानी. मुंबैतही हिंदी भाषेच्यासाठी मराठी न बोलण्याची वेळ आणवतात सर्वांवर. चिन ने मसूदच्या बंदीवर आडकाठी केली. त्यामुळे सुषमा स्वराज यानी जे वक्तव्य केले ते कितपत खरे करतील? शून्य टक्के शक्यता आहे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/15/2019 - 08:10 नवीन
न्यूझिलंडमधे मशिदीवर हल्ला झालाय. त्यामुळे, मुस्लिम जगत ढवळून निघतंय असही सांगितल जातंय.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 03/15/2019 - 13:46 नवीन
म्हणजे नक्की क़ाय होतय? जरा स्पष्ट कराल क़ाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ट
ट्रम्प Fri, 03/15/2019 - 17:04 नवीन
मुस्लिम समाज इतका ढवळून निघाला आहे की त्या न्यूझीलंड हल्ल्या बद्दल संवेदना व्यक्त करताना " कश्मीरी मुस्लिम वर भारतीय लश्कर अत्यचार करत आहे " ट्विटर वर टेप लावत आहेत . कश्मीर मधून हिंदू पंडितनां निर्वासित केले गेले आणि पंडिता वरील अत्याचार या वरुन वाद चालला आहे . शेवटी क़ाय तुम्ही आम्ही कितीही दुःख व्यक्त केले तरी ' त्यांचे ' शेपुट कधीच सरळ होणार नाही .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 03/15/2019 - 18:03 नवीन
न्युझीलँड मध्ये ४९ जीव घेणार्या माणसाला तिथली, युरोपातील मिडिया अतिरेकी संबोधायच कटाक्षाने टाळत आहे ! अतिरेक्या ऐवजी व्हाईट सुप्रेमिस्ट सारखे नविन शब्द योजत आहे ! गोर्या माथेफिरुने असा नर संहार करण्याचे कमी उदाहरण आहे ! कदाचीत अमेरिकेत वर्षा दोन वर्षांत असे प्रकार होत असतात पण जगातील कोणतीही मिडीया गोर्या माणसाला "अतिरेकी" कधीही म्हणत नाही, ह्याच्या विरुद्ध एकही नर संहार न करताही हिंदु लोकांवर देशातल्याच हिंदु नेत्यांनी व मिडीयाने अतिरेकी ठरवलय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ब
बाप्पू Sat, 03/16/2019 - 06:13 नवीन
लौ ऑफ कर्मा.. अश्या घटना वाढतच जातील.. स्पेशली युरोप मध्ये. "त्यांनी" जे पेरले तेच उगवणार. बाकी त्याला आतंकवादी न म्हणता माथेफिरू म्हणणे योग्य ठरेलं. त्याने कोणत्याही धर्म कार्यासाठी आणि कोणतेही पुस्तक वाचून प्रेरित होऊन मुस्लिमांना मारले नाहीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ग
गामा पैलवान Sat, 03/16/2019 - 14:36 नवीन
बाप्पू, कर्मसिद्धांत कितीही खरा असला तरीही निरपराध्यांच्या हत्यांचा नेहमी निषेधच करावा. चोर सोडून संन्याशाला सुळी चढवलं जातंय. त्याचा निषेध केलाच पाहिजे. त्यामुळे मी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करीत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ब
बाप्पू Sat, 03/16/2019 - 18:28 नवीन
हो.. निरपराध सामान्य मुस्लिम लोक हकनाक मेले, या हत्येचा तीव्र निषेध.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
ट्रेड मार्क Sat, 03/16/2019 - 01:04 नवीन
भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक ३.० केला. सगळ्या जगाचे लक्ष पुलवामा हल्ला आणि बालाकोट मधले ऑपरेशन याकडे लागले असताना आपल्या आर्मीने म्यानमार सैन्याच्या सोबत फेब्रुवारी १७ ते मार्च २ एवढे प्रदीर्घ ऑपरेशन केले. यात आराकान आर्मी तसेच नागा मिलिटन्टसचे कॅम्पस उध्वस्त करण्यात आले. आराकान आर्मीला चीनचा पाठिंबा होता आणि त्या लोकांना चीनने प्रशिक्षणही दिले होते. जवळपास ३००० मिलिटन्टस या आराकान आर्मीत आहेत असे म्हणतात. भारत आणि म्यानमारला जोडणाऱ्या मल्टीमोडल ट्रान्सीट Kaladan Project उध्वस्त करण्याचा यांचा प्लॅन होता आणि त्याला काउंटर स्ट्राईक म्हणून आपल्या सैन्याने हे ऑपरेशन केले. सर्व सैनिकांचे आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. भारतीय सैन्य आता मोकळेपणाने कारवाया करत आहे हे अतिशय चांगले आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 03/16/2019 - 06:14 नवीन
भारतीय सैन्याचे अभिनंदन... !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ग
गामा पैलवान Sat, 03/16/2019 - 14:34 नवीन
ट्रेड मार्क, माहितीबद्दल धन्यवाद! भारतीय सैन्याचं दणदणीत अभिनंदन. दणदणीत अशासाठी की एकाच वेळेस दोन युद्धं लढायची क्षमता भारत बाळगू पहात आहे. पहिला टप्पा म्हणजे एकाच वेळेस दोन ठिकाणी आत्मविश्वासपूर्ण कारवाई करणे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डँबिस००७ Sat, 03/16/2019 - 16:35 नवीन
जबरदस्त बातमी ! भारतीय सैन्याला मोकळीक देताच नक्षलवादी , अतिरेकी कारवाया करणारे त्यांचे बोलवते धनी सगळेच गायब झालेले आहे. नक्षलवाद्याचे खरे मालक अर्बन नक्षलवादी सुद्धा आता जेर बंद होत आहेत. अच्छे दिन खरच यायला लागलेत !! २०१९ च्या नंतर सुद्धा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर अश्या कणखर नेतृत्वाची देशाता अत्यंत खरी गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रम्प Sat, 03/16/2019 - 11:37 नवीन
एक मात्र नक्की पुढील निवडणूकी नंतर मोदी पंतप्रधान पदी पुन्हा येतील यात शंका नाही . येणाऱ्या निवडणूकी च्या धामधुमित अतेरिकी , नक्षलवादी , सक्रिय होवून हिंसाचार घडवीन्या च्या शक्यते ला मोदी आणि आपली फौज लगाम लावत आहे . अशा प्रकारचा दूरदृष्टिपणा, निर्णयक्षमता असलेला पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपले आणि तमाम विरोधकांचे भाग्य आहे . नाहीतर ते पूर्वीच्या मिळमिळीत ममो च्या काळात सकाळी कामावर गेलेली व्यक्ति लोकल , बस च्या बॉम्बस्फोटात स्वर्गवासी होण्याची शक्यता होती . मिपावरिल काही पुरोगम्या नां हे विधान नक्कीच अतिरंजित वाटेल!!!!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 03/16/2019 - 14:20 नवीन
मिपावर आताशी फुरोगामी राहिलेच कुठे? तुम्ही आम्ही टोचुन टोचुन घालवले बहुतेक सगळे! बाकी एयरस्ट्राईकनंतर काही फूदफुदत होते पण जेव्हा एयरस्ट्राइक झाला व त्यात अतिरेकी अल्लाघरी गेले हे स्पष्ट झाल्यावर उरलेसुरले स्वर्गवासी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा