चालू घडामोडी - एप्रिल २०१९
India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE
परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या-- हा तर खूप जुना फंडा झाला. आता ज्या-ज्या पक्षाचा उमेदवार, मतदाराला दाबून पैसे देईल त्या सर्वांकडून पैसे घेऊन शेवटी मतदान ' नोटा' ला करायचे. :))त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगाही जाहिरात आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. एक तर ध्रुव राठी राहतो जर्मनी मध्ये, तिथून फावल्या वेळात हे व्हिडीओ तयार करतो. त्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत आणि हिट्स पण बऱ्यापैकी मिळतात. तूनळीवर जितके हिट्स त्याप्रमाणात पैसे पण मिळतात. जर हे लोक आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात तर एकतर्फी व्हिडीओ का शेअर करतात? यापैकी कोणीही सलग कुठले व्हिडीओ दाखवत नाहीत तर त्यांना सोयीस्कर असेल असे भाग कापून दाखवतात. मध्ये त्यांची मते सांगतात आधीचे आणि नंतरचे प्रसंग सरमिसळ करून त्यांना पाहिजे तसे नॅरेटिव्ह तयार करतात.गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे केरोसीनचा काळाबाजार चालू रहाणार. माझा प्रश्न तर हा आहे की प्रत्येक योजना अशी सेपरेट का बघितली जातेय? सरकारच्या DBT, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक वगैरे योजना आहेत ज्यामुळे बरेच लोक गरिबीरेषेच्या वर आले आहेत, येत आहेत.