ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष
"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे.
ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल.
त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत...
१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.
२. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपले हितसंबंध राखण्यासाठी जमा झालेल्या स्वार्थी कोंडाळ्याने जबरदस्तीने बोहोल्यावर उभे केलेले आणि त्यांच्या पढवणूकीप्रमाणे नाचणारे बाहुले बनण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यावर, हे आपले काम नाही हे त्यांना समजले असावे. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदाचा खरोखरचा कंटाळा आला असणे शक्य आहे. उगा पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा फास सतत गळ्याभोवती ठेवण्याऐवजी; स्वच्छंद, जगभ्रमंतीचे, राजकारणतापहीन पण त्याचबरोबर पक्षामुळे मिळणारे फायदे ओरपण्याचे; सुखासिन पूर्वायुष्य त्यांना खुणावत असल्यास आश्चर्य वाटायला नको.
पण तरीही, कॉन्ग्रेस पक्षामुळे मिळणार्या मोठेपणा, सत्ता व अर्थकारणाची चावी दुसर्यांच्या हाती पूर्णपणे सुपुर्द करण्याइतके ते खुळे नाहीत... आणि त्यांनी तसे करावे म्हटले तरी, त्यांच्या 'मासाहेब' त्यांना तसे करू देणार नाहीत. याशिवाय, ज्यांना स्वबळावर महापालिकेची निवडणूकही जिंकणे शक्य नाही व ज्यांचे सर्वस्व गांधी घराण्याच्या चाकरीवरच अवलंबून आहे असे, 'मासाहेबांचे+युवराचांचे जवळचे शिलेदार', त्यांनी तसे करू नये यासाठी जिवाची बाजी लावतील, हे सांगायलाच हवे काय?
तर मग, युवराज नाही तर पक्षाध्यक्ष कोण होईल? याचे दोन पर्याय होऊ शकतात...
... २.अ) रागांना मनविण्याचे सर्व उपाय थकल्यावर, खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल.
* या पर्यायाला रागांचा किंवा जवळच्या शिलेदारांचा विरोध असण्याचा संभवच नाही (काय हिंमत आहे शिलेदारांपैकी कोणी विरोध करण्याची?!). पक्षाध्यक्षपद खुद्द आईच्या हाती असल्यावर, पूर्वीप्रमाणेच दाराआडून पक्षाच्या सत्ता आणि अर्थकारणामध्ये रागांची पाचही बोटे बुडालेली असतीलच !
... २.आ) मासाहेबही थकल्या असल्यास, शिलेदारांपैकी जो सर्वात इमानी, सर्वात नम्र आणि सर्वात मुका (आणि आई-बेटा सोडून इतरांसाठी बहिरासुद्धा) असेल असा एकजण निवडून, त्याला बोहोल्यावर चढवून, रिमोटकंट्रोलने चालवला जाईल. यासाठी, सचीन पायलट, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे, शीला दिक्षित, मीरा कुमार, ए के अॅथनी, इत्यादी अनेक नावे चर्चेत आहेत (पहिल्या वाक्यात दिलेल्या अटी पूर्ण करणार्यांची कमी कॉन्ग्रेसला कधीच भासलेली नाही ;) ) यापैकी, ए के अँथनी, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे हे तिघेही, अनेक कारणांमुळे, गांधी घराण्याशी (खुद्द गांधी परिवारपेक्षा जास्त) इमानी आहेत. त्यांच्यापैकी एक (त्याक्रमाने) निवडला जाईल अशी माझी अटकळ आहे. :)
* या पर्यायालाही मासाहेबांचा किंवा रागांचा विरोध असण्याचा संभव नाही (इतर शिलेदरांच्या विरोधाला विचारतोय कोण?). पक्षाध्यक्षपद रिमोट कंट्रोलने चालणार्या बाहुल्याच्या हाती असल्यावर, युपिए१+२ प्रमाणेच दाराआडून, पक्षाची सत्ता आणि अर्थकारण मायलेकांच्याच ताब्यात असेल ! शिवाय, "यश तेवढे आपले आणि अपयश मात्र दुसर्याचे" या नेहमीच्याच यशस्वी कॉन्ग्रेसी नाटकाचे प्रयोग, भविष्यातही यशस्वीपणे चालवता येतील, हा फार मोठा फायदा नजरेआड करून चालणार नाही. :)
======
अजून काहीसा चर्चेत असलेला तिसरा पर्याय म्हणजे, प्रियांका गांधी-वाद्रा.
* प्रियांकाशी निष्ठा वाहीलेल्या गटाचे जोरदार प्रयत्न चालू असले तरी, त्यांची ताकद फार कमी आहे आणि त्यांची डाळ शिजणार नाही. याशिवाय, त्या नावाला कॉन्ग्रेसमध्ये महत्व देण्यास खुद्द रागांचा विरोध असल्याचे मागील काही वर्षांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, जावयाच्या विक्रमी उपक्रमांमुळे वाद्रा या नावामागे असलेली वादग्रस्तता आड येईल, हेवेसांन. तसेच, गांधी नाव मागे पडून वाद्रा नाव पुढे येण्याची आणि पुढेमागे गांधी मायलेकांचीच गच्छंती होण्याची शक्यता, मायलेकांना (आणि त्यांच्या हुजर्यांनाही), परवडणारी नाही. तेव्हा माझ्या मते हा पर्याय सुरुवातीलाच बाद आहे.
(कोणत्याही) घराणेशाहीत एवढी भावनिक गुंतवणूक कशी होते ?एखादा माणसाच्या मताला इतके पोलराईज्ड करण्याचा हा आपला अश्लाघ्य प्रयत्न आहे, खासकरुन त्या प्रतिसादाआधीच उपेक्षितरावांचा प्रतिसाद आला असताना. अगदी भांडणे चालू असताना एखादा जखमी होऊन हार पत्करता झाला तर प्रतिस्पर्धी किंवा त्याचे पाठिराखे त्याच्यावर परत हल्ला करत नसतात. किंवा त्या जखमी पराभुताबद्दल जे कुणी बोलतात, बाजू घेतात ती त्याखेळाडूबद्दल गुंतवणूक नसते. एक साधा माणुसकीचा प्रकार असतो. आणि मी, उपेक्षितराव तेच म्हणताहोत. मेलेल्याना मारणे आहे हा धागा म्हणजे. किंबहुना असे जे कुणी करणार नाहीत ते एका घराण्यालाच निष्ठा वाहिलेले आहेत असे मत व्यक्त करणे म्हणजे सरळ सरळ आरोप आहे. त्याशिवाय का असा प्रश्न येतो? बाकी आपल्या त्या दोन उपरोल्लेखित धाग्यामध्ये माझे मत चार पाच प्रतिसादात आहेच. ते परत वाचल्यास आपणास माझ्या मताचा अंदाज येईल आणि पुनरावृत्ती टाळली जाईल. अजुन एक गोष्ट नमूद करु इच्छितो, त्या दोन्ही धाग्यात आपण म्हणता तसे "संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी" ह्या एका मुद्द्यावरच काही निष्पन्न झालेले तथ्य असेल तर कृपया ते थोडक्यात इथेच विषद करावे ही नम्र विनंती. . . अवांतर टाळण्याबद्दल, लिंका न देण्याबाबत, गोल गोल फिरुन मुख्य उत्तर टाळण्याबद्दल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादातून माझा राजकीय कल न ठरवण्याबद्दल अग्रिम धन्यवाद.३४ वर्षात काँग्रेसचे अध्यक्ष पद केवळ इंदिरा गांधी आणि त्यांचे वंशज यांच्यातच आहे.
आणि हे म्हणे काँग्रेसमध्ये घराणेशाही नाहीच तरी बरं ज्या काँग्रेसचा वारसा हे लोक सांगतात ती काही यांच्या "बापाने" स्थापन केलेली नाही. ( निदान हा वारसा तरी सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील) १३५ कोटी भारतीयांत गांधी परिवार सोडला तर नेते नाहीतच का?लांगुलचालन आणि वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा आहे
दुसऱ्यांच्या माहितीबद्दल इतके छातीठोक पणे कसे बोलता येते?कारण जी माहिती मला आहे त्याबद्दलच छातीठोकपणे बोलतो, आणि लिहिलेले खोटे ठरवायचे काम संबधिताने केलेलेही नाही त्यामुळे तो पक्का असणारच. जगातल्या सगळ्या गोष्टींची माहीती मला आहे असा माझा समज बिल्कुल नाही, तो करुन घ्यायची इच्छाही नाही.इतकी जळजळ का होते आहे?टिपिकल निरर्थक शेरा आहे हा. इतक्या वर्षात असे शेरे कधी येतात ते चांगलेच कळलेले आहे, सो...नमस्कार.'अवजड उद्योग मंत्रालय'हेच खाते का दिले जाते, हा एक प्रश्नच आहे. . . . . . . -- . -- [खातच अस दिलेय, की काईच खाता येत नाही.] इती : मक्या अनासपूरे.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajan