चालू घडामोडी : जून २०१९
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे
हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaahमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaahभारतातिल तथाकथित विचारवंत, विचार स्वातंत्र्याचे दावेदार, "सोईस्कर" खुट्ट वाजले (किंवा कधी कधी ना वाजले तरी) भयभित होणारे चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादी सगळ्याचे ढोंग (हायपोक्रसी), परत एकदा, जगजाहीर झाले आहे. खालील दोन्ही बाबतील काही मोजके अपवाद सोडता, खुट्ट वाजल्यावर जग पेटून ऊठले आहे असा गदारोळ करणारी वर्तमानपत्रे आणि इतर राष्ट्रिय माधमे आणि वरचे सगळे ढोंगी जणु काहीच झाले नाही असे मूग गिळून गप्प आहेत.
१. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजयी झालेल्या तृणमूल कॉन्ग्रेसच्या खासदार नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून लोकसभेत शपथ घेतली यावरून त्यांच्यावर कर्मठ मुस्लीम मुल्लांकडून टीका झाली आणि सामाजिक माध्यमांत ट्रोलिंग झाले. याबद्दल त्या खमक्या खासदाराने त्यांना परत सुनावले. मात्र, तृणमूलची स्त्री मुखिया किंवा दुसर्या कोणी महत्वाच्या राजकारण्याने त्यांच्या बाजून बोलल्याचे माध्यमांत दिसत नाही. २. झाईरा वसीम नावाच्या बक्षिसाने गौरविल्या गेलेल्या सिनेमा अभिनेत्रिला, मुस्लिं कट्टरतावादी आणि सामाजिक माध्यमांतील ट्रोलिंगमुळे, आपले सिनेमा करियर सोडून द्यावे लागले. त्या अभिनेत्रिला चित्रपट सृष्टीत घेऊन येणार्या, एका लोकप्रिय टिव्ही कार्यक्रमात नाक वर करत (व कधी नक्राश्रूंनी भरलेले नाक पुसत) इतरांच्या नीतीमत्तेवर टीका करणार्या, भारतात विचारस्वातंत्र्य उरले नाही म्हणून आपली बायको भयभीत झाली आहे व परदेशात स्थालांतर करू असे सांगते आहे असे ठणकाऊन सांगणार्या, एका तथाकथित सुपरस्टारनेही मुका-बहिरा असल्याचा अभिनय करणे योग्य समजले आहे. पुर्वानुभव पाहता, अश्या एखाद्या प्रकारात, इतर धर्माच्या मुलीबद्दल, इतर धर्मगुरूने किंवा राजकिय नेत्याने जरासे अनुद्गार काढले असते तर सगळे आकाश कोसळले असते... व ते एका परीने योग्यच असते. मात्र, आता दातखिळी बसलेल्यांनी तसे करणे ढोंगीपणाची, खोटेपणाची आणि निर्लज्जपणाची परिसीमा ठरते, हे सांगायला नकोच.नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे.हे जगजाहीर आहे.त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील.सद्य कायद्याप्रमाणे, त्यांना साडी नेसणे, कुंकू लावणे आणि मंगळसूत्र घालणे यासाठी, अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारण्याची अजिबात गरज नाही आणि त्यांनी अधिकृतरीत्या हिंदू धर्म न स्विकारता, तसे केले तर त्यावरही आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला नाही. ****** तुम्हाला मूळ मुद्दा समजला नाही असे वाटते. "कोणी काय खावे, काय पेहरावे, त्या आमच्या घटनादत्त विचारस्वातंत्र्यावर कोणीच (सरकारसुद्धा) घाला घालू शकत नाही" असा वेळोवेळी सोईस्कर गळा काढणार्या चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध होणार्या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढू नये, यात त्यांचा सोईस्कर निवडकपणा (उर्फ सिलेक्टिविझम) आणि म्हणूनच निर्लज्ज ढोंगीपणा उघड झाला आहे. या वरच्या गोष्टींत अजून एका गंभीर गोष्टीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द राजधानीतील एका मंदीरावर इतर धर्मियांनी दगडफेक केली आणि आत प्रवेश करून मंदीर भ्रष्ट होईल अश्या कारवाया केल्या. "विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या लिंचींग" बद्दलच्या बातम्या आकांडतांडव करत अनेक महिने चघळत राहणार्या माध्यामांनी त्याबाबत आंधळे-बहिरे होणे स्विकारले आहे. तसेच, काही सन्मामनिय अपवाद सोडता, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्याच कारणांनी होणार्या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. ****** अजून एक... पहलू खान लिंचींग प्रकरण आठवत असेलच. त्या वेळेस, कोणताही पुरावा न देता, पहलू खान "बिचारा निर्दोष" आहे आणि तो एका विशिष्ट धर्माचा असल्यानेच त्याला मारले, असा प्रकरणाला धार्मिक रंग देऊन, वर निर्देशिलेल्या व्यक्ती आणि माध्यमे दुसर्या धर्माला झोडपत होत्या, हे आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सद्य कान्ग्रेस सरकारने त्यासंबंधात दाखल केलेल्या एफआरआय मध्ये पहलू खानच्या नावावर "गाईंची अवैध खरेदीविक्री" करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही गुन्ह्याकरिता कोणत्याही नागरिकावर, कायदेशीररित्या सक्षम (competent) नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेला, प्राणघातक हल्ला करणेच काय, स्वसंरक्षणार्थ आवश्यक असेली कृती सोडून इतर कोणतीही कारवाई करणे, अवैध आणि निषेधार्य आहे. मात्र, त्याचबरोबर, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी त्यावेळी दाखवलेला ढोंगीपणा (परत एकदा) उघड झाला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बिळात लपून राहीले आहेत. ****** तेव्हा, मुख्य मुद्दा ह्या सततच्या निर्लज्ज ढोंगीपणाचा आहे. अवैध कृतीसंबंधी कडक कारवाई व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर, अश्या निर्लज्जपणे हेतुपुरर्सर केल्या जाणार्या ढोंगी कारवाया समाजातील सौहार्दाला गंभीत धोका पोचवतात. काही जणांचा हा व्यवसाय/खेळ झाला आहे, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. म्हणून, त्यांच्यावरही (आवश्यक तर नवीन कायदे करून) कडक कारवाई करणे आवश्यक आहे.