रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम?
एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते.
उदाहरणार्थ -
ठिकाण - पाऊस - माप
जैसलमेर - २० सेंटिमिटर्स
पुणे - ४० सेंटिमिटर्स
बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स
चेन्नई - १०० सेंटिमिटर्स
कोलकाता - १५० सेंटिमिटर्स
तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स
मुंबई - २०० सेंटिमिटर्स
गोवा - २०० सेंटिमिटर्स
कोची - ३५० सेंटिमिटर्स
((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स
मेघालय - १२०० सेंटिमिटर्स))
एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते.
एका प्लॉटवर एक छोटे घर
एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल.
घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल.
वापर
एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल.
साठवण
८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील.
प्लॉट जमिनीचा आकार
७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल.
मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज
तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच.
गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत.
तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.
जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.धोका !!! हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोक्याचे आहे. भारतात (अ) पावसाचे पाणी, (आ) घरातले संडासासकट सर्व सांडपाणी, इ वाहून नेण्यास वेगवेगळ्या व्यवस्था नाहीत. असे मिश्र पाणी जमीनीत जिरवल्यास जमीनीतील सर्वच जल दूषीत होईल... अर्थातच, यामुळे, 'सांसर्गिक रोगांच्या साथींना' आणि 'पाण्यांत विषारी रसायनांचा स्तर वाढल्यामुळे होणार्या रोगांना', आमंत्रण दिल्यासारखे होईल. भारतात, बहुतेक/बर्याच ठिकाणी अश्या मिश्र पाण्याचे शुद्धीकरण न करता, ते जवळच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले जाते. हे सुद्धा गैरच आहे व त्यानेही भूमीतील जलसाठ्यांचे काही प्रमाणात प्रदूषण होतेच आहे. यासंबंधीचे दुष्परिणाम आपण सतत माध्यमांत ऐकत असतोच. उदा : नुकतेच पुण्याशेजारच्या नदीत हजारोंच्या संखेने मरून तरंगणारे मासे. गटारांना शोषखड्डे बनवण्यामुळे, गाव/शहरभर प्रदूषित पाणी भूजलसाठ्यात मिसळून, त्या प्रदूषणाला आपण स्वतःहून घरापर्यंत येण्यासाठी मार्ग मिळवून दिल्यासारखे होईल.इथे मी जे गटार बोलत आहे ते पक्के बांधलेले असावे व रहिवासी भागात असावे.गटार कोठेही बांधलेले असले तरी त्यातले पाणी जमीनीत मुरल्यावर ते सर्व भूजलात मिसळून त्याला दुषित करेल, नाही का ? शिवाय पाणी जमिनीत मुरेल असे गटार वरून पक्के असले तरी भूजलात मुरणार्या पाण्याबाबत त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा, मुख्य प्रश्न आपण कोणत्या प्रकारचे पाणी जमीनीत जमीनीत मुरवायचे आहे, हा आहे. जेथे, दुषित (मलमुत्र किंवा इतर रोग निर्माण करू शकणरे पदार्थ मिसळलेले) आणि इतर प्रकारचे पाणी यांची व्यवस्था वेगळी आहे, तेथे (अ) दुषीत नसलेले आणि (आ) प्रक्रिया करून (ट्रिटेड) निर्धोक पाणी, या दोन्हीही प्रकारचे पाणी जमिनीत मुरवायला हरकत नाही. जेथे अशी व्यवस्था नाही (जे भारतात बहुतेक भागात आहे) तेथे "मिश्र" पाणी जमिनीत मुरविल्यास सर्व पाणी दुषित होऊन धोकादायक बनते. केवळ दुषित पाण्याच्या पिण्यानेच आजार होतात असे नाही तर, त्याच्या प्रक्रिया न केलेल्या (विशेषतः मलमुत्र किंवा रसायनांमुळे) दुषित पाण्याच्या वापरानेही (उदा : बागेसाठी वापर, इ) आजार अथवा इतर प्रकारचे धोके उदभवू शकतात... हे सुद्धा या बाबतीत ध्यानात घ्यायला हवे. बाकी, मंदीर-मशिद बांधण्यासाठीचा खर्च वगैरे मुद्दे फार वेगळे आहेत आणि त्याबाबत तत्वतः सहमती आहे.