चालू घडामोडी : जूलै २०१९
१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात.
उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते.
अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ?
बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी
२. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का ?
सोनभद्र येथिल दुर्दैवी व निषेधार्ह हत्याकांड
या दुर्दैवी आणि निषेधार्ह हत्याकांडातील पिडित लोकांना मदत व्हावी असे काही करण्याऐवजी या प्रसंगाचे राजकारण करण्याचाच जास्त प्रयत्न केला जात आहे... त्यात, उत्तर प्रदेशच्या कॉन्ग्रेस प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी सर्वात पुढे आहेत, आणि इतर पक्ष व स्वतःच्या राज्यातल्या अराजकाकडे सतत दुर्लक्ष करणार्या ममता बॅनर्जीही फार मागे नाहीत. :( १. Explained: What happened in Sonbhadra, what's happening now | All you need to know २. गुगल विचारणा करून मिळू शकणारे अजून काही दुवे या प्रकरणाची त्रोटक पार्श्वभूमी : (अ) सन १९५५ साली, तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, जमिन हडप करण्यासाठी, अवैधरित्या एक सोसायटी स्थापन करण्यात आली व तिच्याकडे जमिनीची मालकी देण्यात आली. (आ) नंतर, सन १९८९ मध्ये तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, ती जमीन सोसायटीकडून एका व्यक्तीकडे अवैधरित्या हस्तांतरीत करण्यात आली. (आ) त्यासंबंधीचा खटला कोर्टात दीर्घकाळ आजपर्यंत प्रलंबित आहे आणि म्हणून सद्य सरकार या बाबतीत कारवाई करू शकत नाही. (इ) त्यामधील दोन बाजूत असलेले दीर्घकालचे वैर अचानक चिघळून हिंसा केली गेली. अश्या पार्श्वभूमीवर, योगी सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊन आणि १४४ कलमाचा भंग करत गुन्ह्याच्या जागेवर जाण्याचा आग्रह धरून, प्रियंका गांधींनी टेलिव्हिजनच्या झगमगाटात राजकिय भाकरी भाजून घेण्यापलिकडे काय साध्य केले आहे? लोक हुशार झाले आहेत आणि आता अश्या नौटंकी त्यांना मोहवत नाहीत, हे समजून घेण्यात कॉन्ग्रेस अजूनही कमी पडत आहे. किंबहुना, "राजकारण्यांनी यामध्ये पडून या गुन्ह्याला राजकिय रंग देवू नये" असे स्थानिक लोकांनी म्हटल्याचे माध्यमात पाहिले असेलच. यावरून तरी राजकारण्यांनी बोध घ्यायला हवा. सततची नकारात्मकता टाळून, काहीतरी सकारात्मक कार्य आणि योजना राबविल्याशिवाय, लोकांना कॉन्ग्रेसबद्दल ममत्व वाटणार नाही, ही बाळबोध जाण हुशार, मातब्बर आणि जुन्या-जाणत्या कॉन्ग्रेसी नेत्यांना अजूनही येत नाही, हे अनाकलनिय आहे. सरकार पक्षाला ओढूनताणून विरोध करणे आणि आंतरराष्ट्रिय मुद्द्यांवर पाकिस्तानची तळी उचलणे (पक्षी : आपलेच नाक कापून सरकारला अपशकून होईल अश्या समजात राहणे) यापुढे त्यांची बुद्धी जात नाही असेच दिसत आहे. एक वेळ प्रियंका राजकारणात नवीन असल्यान त्यांना हे समजत नसेल. पण, दुर्दैवाने, "कौन बनेगा पक्षाध्यक्ष?" या वैयक्तिक राजकिय चढाओढीच्या नाटकाचे अनेक उलटसुलट प्रयोग करण्यात गुंतलेल्या कॉन्ग्रेसच्या नेत्यांनाही, प्रियंका गांधींना यावेळीही योग्य सल्ला देण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही. असेच होत राहिले तर, दुर्दैवाने, भारतात सबळ विरोधी पक्ष असण्याचे मनोरथ, केवळ दिवास्वप्नच राहतील. :(