Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)

ग
गवि
Tue, 07/09/2019 - 14:02
🗣 133 प्रतिसाद
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय? मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय. पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही. तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे. आत्ता 125/2 34 षटके न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
वर्गीकरण
खेळ

प्रतिक्रिया द्या
72391 वाचन

💬 प्रतिसाद (133)
ग
गवि Tue, 07/09/2019 - 14:06 नवीन
कॅप्टन गॉन?!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Tue, 07/09/2019 - 14:09 नवीन
धागा काढायला उशिर झाला नाहितर आधिच गेला असता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 07/09/2019 - 14:11 नवीन
बसवला टेम्पोत.. खरंच की.. लेकिन देर आये दुरुस्त आये, असं म्हणू. तुमचा काय अंदाज टोटल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
प
प्रशांत Tue, 07/09/2019 - 14:25 नवीन
२२२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
महासंग्राम Wed, 07/10/2019 - 06:18 नवीन
250
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/09/2019 - 14:10 नवीन
गविसेठ, विश्वचषक क्रिकेट चालू आणि मिपावर धागा नाही याचं आश्यर्च वाटलं होतं. पण आपण धागा सुरु केला आभार. तीन बाद १३६ मला वाटतं. न्यूझीलंड २५७ करतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/09/2019 - 14:10 नवीन
आपण जिंकणार, विषय संपला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 07/09/2019 - 14:13 नवीन
ते तर झालंच, पण आत्तापर्यंत झालेल्या विजयांप्रमाणे एकतर्फी आणि विनाचुरस सामना होणार की नखे कुरतडत बघावा लागणार हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 07/09/2019 - 14:28 नवीन
दहाच्या दहा नखे नाही कुरतडावी लागणार बहुधा. तीन- चार बास होतील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/09/2019 - 14:21 नवीन
होणार हे निश्चित, संध्याकाळी नियमित कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी आज टेंशन घेऊ नये. अशी सुचना द्यावी वाटते. १४९/३-३८.४ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/09/2019 - 14:26 नवीन
कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी >> ३८.४ ३.८४ होता, आता ३.८८ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/09/2019 - 14:35 नवीन
धन्स. आता वाटतं २४० होतील. १६३२/४ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्रचेतस Tue, 07/09/2019 - 16:45 नवीन
पाऊस थांबला का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/09/2019 - 16:56 नवीन
*वर्ल्डकप क्रिकेट अपडेट्स* भारत न्युझीलंड उपांत्य सामना सध्या पावसामुळे सामना थांबलेला आहे, जर पाऊस थोड्या वेळात थांबला व न्यूझीलंड पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर, भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5 च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं भारताला 6 च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.  आणि जर पाऊसामुळे आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना आजच्या स्थितीतच उद्या पुढे सुरू होईल. आणि जर उद्याही पाऊसामुळे सामना झालाच नाही तर गुण जास्त असल्यामुळे भारत थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.(चोप्य पस्ते) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गवि Tue, 07/09/2019 - 17:01 नवीन
भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे.
ऑ? 46 ओव्हर्समधे फक्त 211 केल्यात ना त्यांनी? मग भारताला 46 ओव्हर्समधेच 237 टार्गेट कशापायी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Tue, 07/09/2019 - 17:37 नवीन
When overs are lost, setting an adjusted target for the team batting second is not as simple as reducing the run target proportionally to the loss in overs, because a team with ten wickets in hand and 25 overs to bat can play more aggressively than if they had ten wickets and a full 50 overs, for example, and can consequently achieve a higher run rate. The DLS method is an attempt to set a statistically fair target for the second team's innings, which is the same difficulty as the original target. The basic principle is that each team in a limited-overs match has two resources available with which to score runs (overs to play and wickets remaining), and the target is adjusted proportionally to the change in the combination of these two resources
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/09/2019 - 17:50 नवीन
काही नवीन अपडेट्स ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/09/2019 - 18:30 नवीन
मॅच काय सुरू होईल असे दिसत नै, शुरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इ
इरामयी Tue, 07/09/2019 - 18:43 नवीन
थोडंसं पुरुष मंडळींंना जळवण्यासाठी whatsapp वरून चोप्यपस्तेः *आज भारत वि.न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी....* पती १) सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये... पती २) अधुनमधुन पतीदेवांना पाणी व चहा आणुन द्यावा.... पती ३) संघाची स्थिती वाईट असल्यास पतीस धीर द्यावा... पती ४) संघ उत्तम स्थितीत असल्यास पतीच्या आनंदात सहभागी व्हावे... पती ५) पती सातत्याने चिडचिड करु लागल्यास शांतता बाळगावी... पती ६) तुम्ही नेहमी जरी नवऱ्याला रिमोटली कंन्ट्रोल करत असल्यात तरीही टि.व्ही चा रिमोट आज मात्र त्याच्याकडेच द्यावा... पती ७) "भारतच जिंकेल" हे सातत्याने म्हणावे.... हे सगळं करताना तुमची घुसमट झाली तरी काळजी नको. तुम्हाला त्याचा वचपा काढायची एक खूप चांगली संधी वारंवार मिळेल आणि तेसुद्धा आजच. तिचा जरूर लाभ घ्या: पत्नी १) सामना सुरू असताना तुमचा नवरा जेंव्हा केंव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या सुंदर बायकांकडे डोळे भरून पहात असेल तेंव्हा खुशाल टिव्ही आणि त्याच्या मधोमध (त्याला टीव्ही दिसुच शकणार नाही असं) उभं राहून त्याच्या नजरेला नजर भिडवून पण अतिशय प्रेमाने हे सगळे प्रश्न विचारा: स्कोर काय झाला? आत्ता कोण बॅटिंग करतंय? या बॉलरचं नाव काय? किती ओव्हर झाल्या? रन रेट काय आहे? कोण चांगला स्पिनर आहे? विकेट कीपरच नाव काय? मग टिव्हीवरची मॅच कोणीही जिंको... तुम्हाला निर्मळ आनंदाची अनुभूती येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/10/2019 - 06:29 नवीन
पण शेवटचा उतारा नव्हता. छान. अवांतर : आमच्याकडे अजुनही सचिन तेंडुलकर टीम मधे असतो. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी
इ
इरामयी Wed, 07/10/2019 - 11:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
किसन शिंदे Tue, 07/09/2019 - 19:46 नवीन
आजची मॅच उद्यावर गेली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/10/2019 - 06:35 नवीन
ज्या देशात पाऊस असतो तिकडे ठेवतातच कशाला हे सामने. असो, आज काय वेदर रिपोर्ट ? राहिलेल्या चार षटकात ४० धावा जरी आल्या तरी दोनशे एक्कावनच्या पुढे ते जात नै. आणि ते आव्हान आपण लीलया पेलू शकतो. आपल्या संघाचं एक वैशिष्ट्य की आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो म्हणून दोनशे एक्कावनचं टारगेट साठी चार पाच फलंदाज कामी येतील असे वाटते. भारतीय संघाला शुभेच्छा आहेतच. अवांतर : धागा लेखकांनी वरचवर अपडेट टाकले पाहिजे. आग्रह नाही पण धाग्याचा रंगमंचं हलता ठेवला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे (मिपा फलंदाज)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 07:02 नवीन
ते डकवर्थ लुईस नियमानुसार जास्तीचे टार्गेट येणार होते तो मानसिक लोड उतरला. त्या नियमांचं लॉजिक काही पटलं नाही पूर्णपणे. अमुक परिस्थितीत संघ अधिक आक्रमक खेळला असता, तमुक इतकी षटके असती तर तो रिलॅक्स खेळला असता वगैरे इतका तपशीलवार विचार करुन वाढीव टार्गेट ठरवायचं तर मग आणखी बऱ्याच बाजू निसटल्या असं म्हणता येतं. पाऊस पडू शकतो याची जाणीव असतानाही एक संघ तुलनेत स्लो खेळला, तर हे हेतुपुरस्सर असण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर? त्याबद्दल त्यांना पेनल्टी द्यावी की फायदा? असो. बाकी मिपाकर रंगमंच हलता ठेवतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Wed, 07/10/2019 - 07:32 नवीन
डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही सुधारणा करुन २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत वापरात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
महासंग्राम Wed, 07/10/2019 - 08:38 नवीन
Image removed. हेच ते २ महान नग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
इ
इरामयी Wed, 07/10/2019 - 11:17 नवीन
अपराधी!!! ए , हान् रे त्या दोगान्ला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
M
mayu4u Wed, 07/10/2019 - 12:13 नवीन
The Duckworth-Lewis method of resolving rain-affected games has divided the cricketing fraternity into those who do not understand it and those who pretend they do. Rumour has it that it involves calculus, astrology, quantum mechanics and the use of dice. Either way , the teams get screwed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
श्वेता२४ Wed, 07/10/2019 - 07:53 नवीन
तिथूनच पुढे सुरु होणार आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 09:53 नवीन
https://m.maharashtratimes.com/sports/cricket-news/ndia-vs-new-zealand-semi-final-match-will-resume-today-know-about-manchester-weather-forecast/articleshow/70154247.cms अरे देवा..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही हा अर्धवट राहिलेला सामना पूर्ण होईल का याचीही शक्यता धूसर असल्याचेच दिसते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/10/2019 - 10:32 नवीन
काळजी/पर्वा इल्ले ! सामना पूर्ण झाला नाही तर लीग फेजमध्ये अधिक गुण असलेला भारत अंतिम फेरीत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/10/2019 - 10:48 नवीन
अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक. पण पावसाच्या अधेमधे अर्धवट काहीतरी सामना होऊन डकवर्थ लुईस पद्धतीने टार्गेट वाढवून मिळून उगीच पराभवाची भानगड नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/10/2019 - 11:31 नवीन
सामना झालाच पाहिजे! हिट मॅन ची अजून एक सेंच्युरी हुकले ना! दुत्त दुत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/10/2019 - 12:13 नवीन
घ्या गुरुजी. अता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्वेता२४ Wed, 07/10/2019 - 11:22 नवीन
.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 11:33 नवीन
२१७/ ५, ४७, ४.६२
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 11:42 नवीन
एकामागून एक दोन विकेटी तेवढ्यात. अंपायरचे बोट ईश्वराच्या दिशेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 11:43 नवीन
बघ म्हणावे मांजराला, जडेजा खेळतो बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रशांत Wed, 07/10/2019 - 11:42 नवीन
१० विकेट पडतील
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/10/2019 - 11:43 नवीन
दोन विकेटा पडल्या पण पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 11:45 नवीन
भारतीय इनिंगच्या वेळी अँपायरच्या दोन्ही खिशांत फेविकॉल भरुन ठेवावे. हात खिशाबाहेर निघायला नकोत. हवे तर पीडिलाईटची स्पॉन्सरशिप घ्यावी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/10/2019 - 11:45 नवीन
आठवा आऊट.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 11:45 नवीन
ढिंकचिका!!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 07/10/2019 - 11:46 नवीन
दोन यॉर्कर पाहिजेत बास
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 11:48 नवीन
चायला. पुन्हा ईश्वराकडे अङ्गुलीनिर्देश? असू देत. जास्ती विकेटस घेतल्या तर पुढे अडीअडचणीत फायदाच होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 07/10/2019 - 11:54 नवीन
काळजी नका करु बिल देवुन या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/10/2019 - 11:57 नवीन
तुम्ही सायकलची पडलेली चेन बसवून या बघू ब्रेकमध्ये. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
श
शाम भागवत Wed, 07/10/2019 - 11:51 नवीन
५० ओव्हर्स संपली. हुश्श. ८ बाद २३९ डिएलएस चा पराभव. भारताचा विजय पक्का.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 11:58 नवीन
डिएलएस चा पराभव.
तो कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 07/10/2019 - 12:12 नवीन
टार्गेट अजून अवघड करता येणार नाही ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा