Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)

ग
गवि
Tue, 07/09/2019 - 14:02
🗣 133 प्रतिसाद
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय? मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय. पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही. तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे. आत्ता 125/2 34 षटके न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
वर्गीकरण
खेळ

प्रतिक्रिया द्या
72391 वाचन

💬 प्रतिसाद (133)
ग
गवि Wed, 07/10/2019 - 13:52 नवीन
गेला पंत... :-(
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 13:59 नवीन
आज प्रात्यक्षिक दिसतंय... सुरुवातीचे 3 खेळाडूच काय ते पाया रचतात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ज
जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 14:04 नवीन
पण ते किल्ला लढवत राहिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ग
गवि Wed, 07/10/2019 - 14:14 नवीन
१२५ चेंडूंत १५५ रन्स हव्यात. अधिकाधिक कठीण बनत चाललं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/10/2019 - 14:15 नवीन
फेडरर निशीकोरी मॅच बघत बसावी आता.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 14:19 नवीन
बोंबला.. शुभरात्री.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 15:03 नवीन
धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद. स्थिर वाटतंय आता. सिक्स फोर वगैरे अधेमध्ये चालू. चौदा एक्स्ट्रा रन्स. थिंक पॉझिटिव्ह.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/10/2019 - 15:19 नवीन
लोड कमी झाला असेल थोडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खिलजि Wed, 07/10/2019 - 15:16 नवीन
अरे मी इथे मंत्रपाठ करतोय म्हणून चांगली दशा सुरु झाली आहे .. मला तुमचेही पाठबळ हवे आहे .. त्या जडेजाला मी मंत्र फुंकुनच मैदानावर उतरवले आहे आता तुम्ही त्या धोनीला पाठबळ द्या
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 07/10/2019 - 15:36 नवीन
उत्कंठावर्धक सामना ... जडेजाने मन जिंकलंय.. निकाल काहीही असू देत
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/10/2019 - 15:41 नवीन
अपेक्षांना अंत नाही ! पाकीस्तान बरोबर खेळताना चषक नाही जिंकला चालेल पण पाकीस्तानला हरवावे असे वाटते. आज इथपर्यंत आलोय तर जिंकूनच यावे असे वाटते. भारत जिंकणार ! टेंशन नक्को !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/10/2019 - 15:51 नवीन
शब्द गिळायची वेळ आली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ग
गवि Wed, 07/10/2019 - 15:46 नवीन
जडेजा चुकीच्या वेळी गेला. हुरहूर.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/10/2019 - 15:55 नवीन
शब्द गिळायची वेळ आली !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 15:55 नवीन
थोडक्यात गेली की. :( पण जडेजा आणि धोनी छान खेळले.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 07/10/2019 - 16:06 नवीन
भुवनेश्वर कुमार व चहल पूर्ण ५० ओव्हर्स देखील खेळले नाही . अशावेळी मी जे किलिंग इन्स्टिन्क्त आपल्या ७ नंतरच्या खेळाडूंच्या अंगात नाही असे म्हणालो ते किती उचित आहे ते पहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 16:18 नवीन
चौरा काका, पुढच्या वेळी तुम्ही फक्त positive बोला हां काय. मग आपण हरणार नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Wed, 07/10/2019 - 16:33 नवीन
२०२३ मध्ये मी सत्तरी ओलांडून जाईन . मग तर माझे कुणीच ऐकणार नाही ! माझा मुद्दा एवढाच टीम चान्गली खेळली पण १९८३ इतके टीमवर्क नव्हते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 16:39 नवीन
१९८३ इतके टीमवर्क नव्हते >> मान्य. पण तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेट किती बदलले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ध
धर्मराजमुटके Wed, 07/10/2019 - 15:57 नवीन
आता नेटकरी अनुष्काची ऑनलाईन धुलाई करतील बहुतेक !
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 07/10/2019 - 15:58 नवीन
निकाल काहीही असू दे खालील बाबी सिद्ध आहेत. १) जर धोनीने निवृत्त होऊन पंत मधला पोरकट पणा काढला तर पंत एक उत्तम खेळाडू होऊ शकतो. २) हार्दिक पंड्या हा खेळाडू फक्त आय पी एल च्या लायकीचा खेळाडू आहे . त्याला इतर भवितव्य नाही. ३) रवींद्र जडेजा व अश्विन हे अजूनही पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत . ४) २०१६ पासून धोनीच्या फटाक्यातला दणका हरवला आहे त्याने निवृत्त होणे उचित . ५) विजय शंकर चा अशोक मंकड ( फक्त इंडिया हिरो ) होण्याची शक्यता अधिक .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/10/2019 - 16:10 नवीन
जाऊ दे ना वं ! आज इथे कोणी चिरफाड च्या मुड मधे असेल असं वाटत नाहीये !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ज
जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 16:21 नवीन
ज्या पाकिस्तानने किवींचा पराभव केला त्या किविंना आपण हरवू शकलो नाही. असो वेल प्लेड इंडिया.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/10/2019 - 18:53 नवीन
क्रिकेट हा सांघिक खेळ असला त्यात सुरुवातीचे फलंदाज जवाबदार असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी शतकं ठोकली पाहिजेत. मग हा महातारा धोनी टुचुटुचु खेळून आपला बीपी वाढवतो या xx ला अगोदर बलजबरीने निवृत्त करा. बस दुसरं काही नको. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (जडेजाबरोबर टुचुटुचु खेळल्यामुळे म्हाता-या धोनीवर संतापलेला)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 19:04 नवीन
ओ काका, त्यानं एक बाजू लावून धरली म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/10/2019 - 19:48 नवीन
स्क्यूज् मी काकु, आयपीएलला हा म्हातारा धोनी जीवावर उदार होऊन खेळतो. आजच्या सामन्यात त्याने जड़ेजाबरोबर एक बाजू लावून धरली पण चेंडू किती खाल्लेत. कसलं टुचु टुचु खेळतो. अरे प्रसंग काय, तू काय खेळतो काय ? वय किती, खेळतो किती ? च्यायला, मला त्याचं तोंड बघायची इच्छा नै. काकू तुम्ही त्याची बाजू घेऊन माझं ब्लडप्रेशर वाढवू नका. अगोदरच मला खुप कामाचा लोड आहे. बस आपल्याला त्याला रिटायर करायचंय. या गोष्टीसाठी,आपल्याला मिपावर एक ह्याशटॅग सुरु करायचंय. #''धोनीने निवृत्त व्हायलाच पाहिजे'' # धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शिवहरि Wed, 07/10/2019 - 19:47 नवीन
सेमिफायनलमधे match during चालले नाही.
  • Log in or register to post comments
श
शिवहरि Wed, 07/10/2019 - 19:49 नवीन
सेमिफायनलमधे match fixing चालले नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/15/2019 - 03:40 नवीन
न्यूझीलंड आणि इंग्लण्ड या दोन्ही संघांनी विश्वचषक क्रिकेट अंतिम फेरीत धड़क मारली आणि कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इंग्लण्ड जिंकेल तर छुपा न्यूझीलंड बाजी मारेल असे वाटले. नाणेफेक ( टॉस) जिंकून न्यूझीलंडने पहिली बाजी मारली असे वाटले पण ठराविक धावसंखेच्या आणि ठराविक अंतराने बाद होणा-या संघाने फार मोठी धावसंख्या उभारली नव्हती. २४१ हे आव्हान समोर ठेवून उतरलेल्या रॉय रुट च्या बळावर इंग्लण्ड सहज जिंकेल असे वाटले होते पण चार फलंदाज बाद झाल्यानंतर सामना न्यूझीलंडकड़े फिरला होता. परंतु सामना शेवटच्या षटकापर्यन्त जाऊन टाय झाला. सुपर ओव्हर मधेही सामना टाय झाला. सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी या मुर्ख नियमामुळे इंगलंडला विश्वविजेता ठरविण्यात आले. एका रोमहर्षक सामन्याचा असा शेवट पाहुन न्यूझीलंडचा समर्थक म्हणून आम्ही हळहळन्याशिवाय काय करू शकणार होतो. इंग्लण्डचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Mon, 07/15/2019 - 05:45 नवीन
सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी सुपर ओव्हरमध्ये बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/15/2019 - 09:14 नवीन
पूर्ण कालच्या सामन्यात आणि सुपर ओव्हर्स मधे इंग्लडने एकूण २४ चौकार ठोकले तर न्यूझीलंडने १६ चौकार ठोकले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुटूवाला
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/15/2019 - 06:12 नवीन
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्‍याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/15/2019 - 06:19 नवीन
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्‍याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा