Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र विधानसभा २०१९, मतदान टक्केवारी

श
शाम भागवत
Tue, 11/19/2019 - 14:58
🗣 176 प्रतिसाद
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल. विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन. मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू. राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे. --------------------------------------------- मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे. १. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे. अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो. २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे. ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले. त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही. थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो. जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही. ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील. भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे. ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे. काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते. ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले. राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे. ८. पण जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते. दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते. या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत. ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो. भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. :) --------------------------------------------------- २०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती १. अक्कलकुवा (1) आघाडी
पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २७.७८
काँग्रेस ३६.७९ ४१.२६
एकूण ६४.५७ ४१.२६
युती
पक्ष २०१४ २०१९
शिवसेना ५.९१ ४०.२१
भाजप १८.६८
एकूण २४.५९
इतर दखलपात्र पक्ष
पक्ष २०१४ २०१९
अपक्ष ४.५१ १२.६९
आप २.०२
एकूण ४.५१ १४.७१
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे. खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ? मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ????? २०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे. निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे? ----------------------------------------------------------------------- २. अहमदनगर शहर (225) आघाडी
पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २९.७९ ४७.३३
काँग्रेस १६.३३
एकूण ४६.१२ ४७.३३
युती
पक्ष २०१४ २०१९
शिवसेना २७.७९ ४१.१९
भाजप २४.०८
एकूण ५१.८७ ४१.१९
इतर पक्ष
पक्ष २०१४ २०१९
aimim ४.०४
वंचित १.६९
बसप ०.३५ १.७२
एकूण ०.३५ ७.४६
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल. मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा. २०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते. याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत. ------------------------------------------------ ३. अकोला पश्चिम (३०) इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते. युती
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
भाजपा ४६.७७ ४३.२३
शिवसेना ७.३९
एकूण ५४.१६ ४३.२३ -१०.९३
आघाडी
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
काँग्रेस ६.४० ४१.७०
राष्ट्रवादी १८.८५
एकूण ५४.१६ ४३.२३ +१६.४१
बीबीएम व वंचित
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
बीबीएम १६.७२
वंचीत १२.२१
एकूण १६.७२ १२.२१ -४.४९
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल. तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती. त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो. ------------------------------------- टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू. लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये. ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना? एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही. एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल. तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला. टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. :)
वर्गीकरण
राजकारण टक्केवारीच्या दृष्टिकोनातून

प्रतिक्रिया द्या
75387 वाचन

💬 प्रतिसाद (176)
श
शाम भागवत Sun, 12/01/2019 - 17:52 नवीन
तुमच्यासारख्यांनी यावं हीच तर खरी इच्छा आहे. :‘
↩ प्रतिसाद: यशोधरा
ज
जॉनविक्क Sun, 12/01/2019 - 17:59 नवीन
नको नको हवं तर मी प्रेमळ विनंती मागे घेऊन कडक शब्दात समज द्यायला मनाविरुद्ध तयार आहे! ;)
↩ प्रतिसाद: यशोधरा
ग
गणेशा Sun, 12/01/2019 - 19:45 नवीन
यशोधरा ताई, तुम्ही बोलत रहा.. राजकारणावर बोलणारे नेहमीच भांडखोर नसतात, उलट राजकीय मत असणे आणि स्पष्ट मांडणे पण चागंलेच. आपली मते वेगवेगळी असू शकतात, पण माणूस म्हणून आपण सगळे चांगलेच आहोत हे प्रत्येक रिप्लाय, लेख वाचल्यावर कळतेच. शाम भागवत तर खूपच संयमित, आणि चांगले वाटतात. बाकी कविता, गाणी लिहिणारा मी आता राजकीय व इतर सोशल लिहाताना आता कळते आहे कि माझ्यात किती बदल होतोय, या राजकीय आणि सोशल लिहिण्याने माझ्या वयक्तिक मतात, वागण्यात कमालीचा बदल होत आहे असे वाटते
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 12/02/2019 - 04:03 नवीन
गणेशा, मला जिथे मत मांडावेसे वाटेल, तिथे मी लिहिणारच. कोणाच्या लिही वा लिहू नको वगैरेंनी फरक पडत नाही. :)
↩ प्रतिसाद: गणेशा
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 10:09 नवीन
शामजी आमचे प्रेमळ क्रेडिट रिटर्न करतो
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शाम भागवत Mon, 12/02/2019 - 10:11 नवीन
:)
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
स
सर टोबी Mon, 12/02/2019 - 08:43 नवीन
शेखर गुप्ता हे कदाचित पत्रकारीमधले वलयांकित नाव असेल. आणि असे नाव कमावण्याची काही किंमत पण ते चुकवितात. जसे मोघम बोलणे, वेळ प्रसंगी चुकीच्या गोष्टींचे, उद्देश चांगला आहे या कारणास्तव समर्थन करणे वगैरे. संघ किंवा भाजप यांचे आम्ही काही कारणास्तव समर्थन करतो असे म्हणणारे आणि शेखर गुप्ता यामध्ये फरक असलाच तर तो वलयांकित असणे आणि नसणे एवढाच आहे. बाय द वे, अलिप्तता, अहिंसा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजवाद यामध्ये कसा शक्तीचा व्यय होतो हे समजले नाही.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ज
जॉनविक्क Sun, 12/01/2019 - 17:33 नवीन
370 मास्टर स्ट्रोक होताच हे विरोधक मान्य करतील तिथे माझा प्रश्नच नाही. मला अजूनही नेमकी गरज काय होती यासाठी मुफ्तीना जवळ करायची हे उमजुन आलेले नाही. ज्यांचा अभ्यास आहे ते स्पष्टीकरण देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत ज्यांचा नाही त्यांना तर ते आवश्यक होते एवढेच लिहण्यापलीकडे काहीच सुचत नाही एकूणच सामान्यजण अजूनही अंधारात
श
शाम भागवत Tue, 12/10/2024 - 18:02 नवीन
हे आज वाचलं. त्यावेळेसही वाचलं होतं. पण हा चेंडू आपल्यासाठी नाही असं समजून सोडून दिला होता. 😀 राजकारणांत नेहमी मोठं होण्याची संधी मिळाल्यास ती साधायची असते. ती मिळेपर्यंत ज्याच्याकडे पेशन्स असतो तो जिंकतो. मिळवलेले टिकवतो. त्याला ते लाभतही. मुफ्तींबरोबर सरकार बनवण्याचा फायदा ३७० वगैरेसाठी भाजपाला नक्की झाला असणार यात वाद नाही. पण सरकार स्थापन करताना असं काही मनांत नक्कीच नसणार. माझ्या समजुतीप्रमाणे तीन तरी कारणे असावीत. १. जर सत्तेत जाता येत असेल तर जावे. कारण सत्तेच्या आश्रयाने एक पाऊल पुढे लवकर जाता येते. काश्मीर खोऱ्यांत नाही तर निदान जम्मूमधेतरी हातपाय पसरायला मदत होणार होती.( हे शरद पवारांचेच तत्व आहे.).🤣 २. राजकीय अस्पृशतेचा १९४८ साली मारलेला शिक्का थोडाबहुत पुसायला मदत होणार होती. (१९७८ मधे शरद पवारांच्या सत्तेत सहभागी होऊन हा शिक्का पुसट झाला होता.) यामुळे लोकांत मिसळायची संधी मिळते. अन्यथा अंगी गुण असूनही ते संधी न मिळाल्याने प्रगटच करता येत नाहीत. हे काश्मीरमधे प्रथमच होणार होतं. ३. नॅशनल कॉन्फरन्स व मुफ्ति यांच्यातली दरी वाढवायला ही खेळी उपयोगी होती. (२०१४ साली हीच खेळी शरद पवारांनी भाजप व शिवसेना यांत वितुष्ट यावं यासाठी वापरली होती.) शरद पवारांचं बोट धरून केलेलं राजकारणच म्हणायचं की हे.🤣 मात्र अब्दुला व मुफ्ति एकत्र येणार असं दिसताच ३७० हटवायची हीच वेळ आहे, अन्यथा ते कधीच शक्य होणार नाही हे लक्षात येऊन प्रथम राष्ट्रपती राजवट लावण्यांत आली. मुफ्तिंनी राजीनामा दिला ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. अन्यथा भाजपा एवढा मोठा डाव खेळू शकला नसता. उद्धवजींनी सुध्दां राजीनामा देण्याचीच चूक केली होती. त्याचा भाजपाने फायदा उठवला. समोरचा मूर्खपणा करत असल्याने त्याचे नुकसान नक्कीच होते, पण त्यातून आपला फायदा साधण्यासाठी अंगी हुशारीच लागते. मुत्सद्दीपणा लागतो. तसेच समोरचा चूक करे पर्यंत वाट पहायला लागते. मात्र इथे शरद पवार थोडे मार्ग बदलतात. ते लॉबिंग करून किंवा ट्रीकी बोलून किंवा कोणत्याही मार्गाने समोरच्याला चूक करायला लावतात. याने यश नक्की मिळते. पण ते जास्त काळ टिकत नाही. किंवा विश्वासार्हता कमी होते. असो. तर ही हुशारी, मुत्सद्दीपणा शरद पवारांकडे व फडणवीसांकडे आहे. म्हणूनच शरदरावांना फडणवीस नको असतात. तर मोदींना शरद पवारांना काबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्रांत फडणवीस पाहिजे असतात.😂
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ग
गणेशा Sun, 12/01/2019 - 19:39 नवीन
मस्त चर्चा चाललेली आहे आवडले.
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 16:24 नवीन
तीन वेळा विचारून झाले मुफ्तीला जवळ करणे 370 साठी का आवश्यक होते कोणी स्पष्ट करेल काय ? जे जाणकार आहेत ते बोलायला धाग्यावर उपस्थित नाहीत ? जे जाणकार नाहीत त्यांना कीबुड उचलून ते आवश्यक होते यापलीकडे अन्य काहीही टाइप करता येत नाही :( एक मोदींचा चाहता, जागरूक मिपाकर व भारताचा नागरिक म्हणून एखाद्याच्या क्षुल्लक विनंतीचा इतका अव्हेर जाणकारांच्या उपस्थितमधे अपेक्षित न्हवता... की हे सुद्धा फडणवीस सरकार 80 तास अजून राहणे का आवश्यक होते सारखे पुडी-सोड प्रकरण राहणार ? कारण जर ती बाब सत्य असती तर फडणवीसानी जनतेचा फार मोठा विश्वासघात केला यावय शिक्कामोर्तब होईल.
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Mon, 12/02/2019 - 17:16 नवीन
भाजपा नेहमीच आपल्या चुकी साठी कुठले तरी काम करायसाठी असे केले असेच बोलतो.. त्यामुळे 370 साठी bjp ने सरकार मेहबुबा मुफ्ती बरोबर सत्ता स्थापन केली ही थापच असे माझे स्पष्ट मत आहे. पण हे कोण मान्य करत नाही.
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 18:01 नवीन
सगळेच तसे करतात अपवाद कोणीही नाही फक्त भाजपा करून सवरून मी न्हाई त्यातली चा सूर दणकून आळवतो. एखाद्या पक्षाला मते मिळतात ती त्यांनी चूकाच केल्या नाहीत म्हणून न्हवे तर सोबतच आवश्यक आशा बरोबर गोष्टीही केल्या म्हणून. काका साहेब हे व्यवस्थित जाणतात व उद्योग अमलात आणतात म्हणून त्यांना जाणते म्हटले जाते. भाजपामधे अजून ती परिपक्वता दिसून येत नाही त्यामुळे अजूनही आम्ही चुकतच नाही चा सूर जरा बिघडला की ते कमालीचे असुरक्षिता प्रकट करतात
↩ प्रतिसाद: गणेशा
आ
आनन्दा Mon, 12/02/2019 - 18:07 नवीन
८० तास सरकार ही नेम्कि काय भानगड आहे याबद्दल आत्ताच काही सांगणे फार कठीण आहे. आणि भविष्यात देखील ते बाहेर येईल असे वाटत नाही. कारण त्यानी खरेच काही केलेले असले तर त्याना पुढचे सरकार हे खणून काढेल याची कल्पना असणारच. त्यामुळे इतकी आततायी खेळी कोणीच सामान्य माणूस देखील करणार नाही. त्यातून काही केलेले असलेच, तर त्यात अजून २-४ तंगडी अडकलेली असणारच. कदाचित हेगडेंनी मुद्दामच ही बाईट दिलेली असू शकते, की पवाराना दाखवण्यासाठी, की त्यांच्या बुडाखाली टाइम बाँब आहे. परंतु ती झाकली मूठच राहणार कायम. आपल्याला कधीच कळणार नाही. आता प्रश्न ३७०. माझ्या परीने उत्तर देतो. कदाचित ज्येष्ठ लोक अधिक चांगले सांगू शकतील. तुम्ही घटनाक्रम पाहिला असेल तर, सार्‍या घटनाक्रमात २ गोष्टी स्पष्ट दिसतात. १. राष्ट्रपती शासन होते म्हणून हे सगळे शक्य झाले. २. फुटीरतावाद्यांना शेवटपर्यंत, म्हणजे किमान स्थानबद्ध करेपर्यंत तरी या गोष्टीचा अंदाज नव्हता. या गोष्टी करण्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक असते १. प्रशासनामध्ये माणसे पेरणे. जे सरकारमध्ये जाऊनच करावे लागते २. लोकांचे लक्ष डायव्हर्ट करणे - सरकारने जर सरळ सरळ राष्ट्रपती शासन लावले असते, तर सगळे सावध झाले असते आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रचंड लॉबींग झाले असते, यांनी किती ऐकले असते हा भाग वेगळा, पण जर हिंसाचार झाला असता, तर ३७० चे प्रकरण बरेच लांबणीवर पडले असते, कारण मग मानवाधिकार वगैरे सगळेच मध्ये पडतात (त्यांना आवडच असते नाक खुपसायची) ३. म्हणजेच, कोनालाही सशय येऊ न देता राष्ट्रपती शासन लावणे ही पहिली गरज होती. त्यासाठी सरकारात जाऊन आपल्याला हवी ती माहिती मिळवणे, आपली माणसे पेरणे, आणि सरकार अस्थिर करणे हा क्रम निवडला गेला. अमित शहा + अजित डोवल भेट, आणि पाठोपाठ भाजप सरकारचा राजीनामा हा योगायोग नक्कीच नव्हता. ४. तेव्हढ्याने राष्त्रपती शासन लावता येते का? महाराष्ट्रात झालेला गदारोळ पहा - पुढे पीडीपी + काँग्रेस + नॅकॉ बरेच दिवस भांडत बसले. महिन्याभराने त्यांचे भांडण मिटले आणि सरकार स्थापन व्हायची चिन्हे दिसू लागली तेव्हा राष्ट्रपती शासन लावले. ५. हा निर्णय न्यायालयात टिकणे देखील आवश्यक होते, त्यामुळे भारत आणि कश्मीर यामध्ये नेमके काय करार झालेत, एखादी भानगड नवीन उपस्थित होउ शकते का वगैरे गोष्टी तिथली गोपनीय कागदपत्रे पाहिल्याशिवाय कळु शकत नाहीत. (कायद्याला अनेक वाटा - पळवाटा असतात. त्यामध्ये बसेल असा निर्णय घेणे, विशेषतः अश्या संवेदनशील बाबतीत - यासाठी प्रचंड होमवर्क लागतो) हे सगळे करायला ५ वर्षे लागली. त्यानंतर निवडणूका झाल्या. योगायोगाने त्यात मोदींना अभूतपूर्व यश मिळाले, त्यानंतर त्यांनी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली... साधारण ४ जुलैच्या आसपास मी बस ने बंगलोर ला गेलो होतो, तेव्हा एक सैनिक भेटला होता मला. त्याने सांगितले होते की केंद्र सरकार एक मोथे ऑपरेशन करत आहे काश्मीर्मध्ये, गोपनीय असल्यामुळे सांगू शकत नाही, पण महिन्याभरात बघायला मिळेल. तसेच झाले. बाकी घटनाक्रम तुम्हाला माहीत आहेच. सचिन जेव्हा बॅटिंग करतो, तेव्हा बॅटिंग फार सोपी वाटते. तसेच अमित शहा जेव्हा आम्ही ३७० रद्द केले असे म्हणले तेव्हा आपल्याला वाटते किती सोपे होते ते. पण त्यासाठी त्यांनी मागची ५ चर्षे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेले कष्ट आपण बघत नाही... असंख्य लोक जेव्हा रात्रंदिवस राबतात तेव्हा असल्या भानगडी साध्य होतात. ( अवांतर - ३७० झाल्यापासून मी मोदींपेक्षा शहांचा जास्त पंखा झालोय, कारण जितका वुचार करत जावा तितकी या प्रकरणातली गुंतागुंत अजुन उलगडत जाते, आणि अत्यंत थंडपणे आणि अक्षरशः पाताळ यंत्री (दुसरा शब्दच नाही) सूत्रे हलवुन काम करणारा खरेच भयंकर राजकारणी असला पाहिजे)
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 18:19 नवीन
केजरीवाल समोर तोंडघशी पडले म्हणून रातोरात मुफ्ती जवळ केल्या गेली , बाकी स्पष्टीकरण वाचून आंनदच आहे.
↩ प्रतिसाद: आनन्दा
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 18:28 नवीन
देखील जागा मिळू शकतात अशी खात्री होती व नंतरच सर्व प्लानिंग झाले असे कोणी म्हणत नाहीये :D xD xD x D =))
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
आ
आनन्दा Mon, 12/02/2019 - 20:51 नवीन
जम्मू मध्ये नेहमीच भाजप येतो. बाकी आनंद कसला आज ते पण समजावून सांगा. दुसऱ्या कोणी करायचे असते तर ते कसे केले असते ते पण सांगा, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडेल.
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 22:14 नवीन
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणुका घेऊन सत्ता काबीज करायची खेळी अंगलट आली, आणि केजरीवालने प्रथमच बिजेपीचा विजयरथ रोखला तेंव्हा राष्ट्रपती राजवटीचा जुगार टाळावा म्हणून ऐनवेळी आघाडी करून सत्तास्थापनेचा निर्णय झाला. दिल्लीत केजरीवाल परत मुख्यमंत्री बनले नसते तर jk मुफ्तीसोबत आघाडीचा प्रश्नच न्हवता.
दुसऱ्या कोणी करायचे असते तर ते कसे केले असते ते पण सांगा, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडेल.
माहीत नाही. कारण तेव्हडा माझा याविषयावर अभ्यास नाही पण बाप दाखव अन्यथा श्राद्ध घाल हा अट्टहास मी टाळतो. इतकं नक्की माहीत आहे भाजपाने राष्ट्रपती राजवट लागू करायच्या हालचाली सुरू केल्या होत्या पण दिल्ली हाताची गेली अन नेतृत्व थोडे ताळ्यावर आले.
बाकी आनंद कसला आज ते पण समजावून सांगा.
आनंद सुखामध्ये असतो, आणि सुख अज्ञानात असते म्हणतात
↩ प्रतिसाद: आनन्दा
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 22:42 नवीन
भाजपाने राष्ट्रपती राजवट लागू करायच्या हालचाली सुरू केल्या होत्या पण दिल्ली हाताची गेली अन नेतृत्व थोडे ताळ्यावर आले.
jk मधे राष्ट्रपती राजवट 2015 जानेवारीत लागू झालीच होती. 2015 फेब्रुवारीच्या मध्यावर दिल्लीत केजरीवाल ने एकहाती सत्ता काबीज केली 70 पैकी 67 जागा जिंकल्या व दिल्लीतिल राष्ट्रपती राजवट संपून आप चे सरकार स्थापन झाले. व पहिल्यांदाच विरोधकांना भाजपाचा रथ रोखला जाऊ शकतो हे उमजुन आले. दिल्ली प्रमाणेच काश्मीर राष्ट्रपती राजवटीमधे लटकवून पुन्हा निवडणूक घेणे अंगलट येईल अशी चिन्हे तिथेच दिसून आली व ताबडतोब फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात PDP सोबत आघाडी घोषित होऊन मार्चमधे सरकार स्थापन झाले. अर्थात मुफ्तीनी भाजपाला तीच वर्तणूक देणे चालू ठेवले जी भाजपा सेनेला इथे देते परिणामी कुचंबणा होऊन व अलायन्सचा परत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ते तोडण्यात आले
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 18:25 नवीन
कदाचित हेगडेंनी मुद्दामच ही बाईट दिलेली असू शकते, की पवाराना दाखवण्यासाठी, की त्यांच्या बुडाखाली टाइम बाँब आहे. परंतु ती झाकली मूठच राहणार कायम. आपल्याला बाईट दिली म्हणजे हमखास हे घडलं नाहीये. मला तरी यादोन दिवसात कोणाचा कोणापासून ससेमीरा 80 तासात चुकला याबाबत कसलीच अधिकृत बाईट वाचनात आली नाही
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 12/02/2019 - 20:53 नवीन
ते कधीच बाहेर येणार नाही. पण जे काही झालंय ते पवार आणि भाजप संगनमताने झालंय हे नक्की. आज पवारांनी मुलाखत पण दिलेय बघा. आता माझा संशय अजून पक्का होत चाललाय.
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Mon, 12/02/2019 - 22:20 नवीन
आपला प्रतिसाद वाचण्यात मलाही आनंदच आहे
↩ प्रतिसाद: आनन्दा
य
यशोधरा Wed, 12/04/2019 - 07:55 नवीन
नवीन राज्य सरकारवर सगळेच दबाव आणायला लागलेत गुन्हे मागे घेण्यासाठी. मराठा आंदोलक, भीमा कोरेगाव, धनगर आंदोलक.. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती होणार का?
ज
जॉनविक्क Wed, 12/04/2019 - 11:09 नवीन
यावर मत मांडणार
↩ प्रतिसाद: यशोधरा
ध
धर्मराजमुटके Fri, 12/06/2019 - 04:27 नवीन
नाही, नव्या सरकारला हे सगळे मत देणार आहेत पुढील निवडणूकीत म्हणून :)
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 12/06/2019 - 07:16 नवीन
कठीण आहे.
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
श
शाम भागवत Tue, 12/10/2019 - 06:59 नवीन
मी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची वाट पाहात होतो. पण कर्नाटकातील पोटनिवडणुका निकालांमुळे वेगळेच जाणवायला लागलंय. पक्षांतरासाठी दोन तृतियांश आमदारांच्या मर्यादा असते. त्या मर्यादेवर मात करण्याची नविन शक्कल राजकारण्यांना गवसली आहे असं दिसतंय. भाजपाचे १०५ + १५ बंडखोर + पोटनिवडणूकीतून २५ आमदार अशा गणिताला भाजप सुरवात करणार असं दिसतंय. भाजपाच्या पाठिंब्यामुळेच निवडून येऊ शकलो, असं ज्या शिवसेना आमदारांना वाटतंय, त्यांना राजीनामा देऊन, मग भाजप प्रवेश करून परत आमदारकी टिकवायची संधी आहे. अन्यथा पुढील निवडणुकीत त्यांच काही खरं नाही. कर्नाटकांत बीजेडीचे ३ व काॅंग्रेसमधून १४ जणांनी अशा एकूण १७ जणांनी राजीनामा देऊन त्यापैकी भाजपाच्या तिकीटावर १२ जणांना पुन्हा निवडून येता येत असेल, तर शिवसेनेचा आमदार भाजपाच्या तिकीटावर नक्कीच निवडून येऊ शकतो. तस होणं कर्नाटकापेक्षा नक्कीच जास्त नैसर्गिक असेल. खातेवाटप आतातर फारच अवघड झालंय अस माझं मत आहे. नाराजी नेहमीच खातेवाटपानंतर वाढत असते. शिवसेनेने जर दरबारी राजकारण करणाऱ्यांना मंत्रीपदे दिली तर मग ही नाराजी शिवसेनेला खूपच त्रास देऊ शकते. मी फक्त काय होऊ शकते तेवढच मांडलंय. फक्त कर्नाटक निवडणूक निकालांची वाट पाहात होतो. राजिनामा दिलेल्यापैकी बऱ्याच आमदारांना २०१८ साली ५० पेक्षा जास्त टक्केवारीने निवडले गेले होते हे विशेष. थोडक्यात ताकदवान आमदार त्यांची स्वत:ची ताकद + भाजपाची व्होटबँक अशापध्दतीनेही नवीन समीकरणे मांडू शकतात. हे भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला लागू होऊ शकते. अजितदादांना तर नवसंजीवनी मिळण्याची संधी आहे. शरदरावांनाही याची जाणीव झाली असेलच.
ग
गणेशा Sun, 12/15/2019 - 08:04 नवीन
थोडक्यात ताकदवान आमदार त्यांची स्वत:ची ताकद + भाजपाची व्होटबँक अशापध्दतीनेही नवीन समीकरणे मांडू शकतात. हे भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला लागू होऊ शकते.
हो हे कोणत्याही पक्षाला लागू होते, पण कोणत्याही पक्षाला विशेष करून विरोधी पक्षाला घोडेबाजार करायला हे वापरता येने या सारखे दुर्भाग्य या लोकशाहीचे नाही.. नाराज म्हणजे काय, सगळ्यांनाच मंत्री पद देता येत नसते.. मग राहिलेले लगेच नाराज? मग दुसऱ्या पक्षातुन निवडून येऊन काय सगळ्यांनाच मंत्रीपदे मिळतात काय? पैसा हेच याचे शेवटी मुळ आहे. असो, या गोष्टीचा निषेध.. मग तो कोणताही पक्ष करुद्या.. आणि भाजपा ने हे केल्यास तर मला आश्चर्य वाटणार नाहीच...
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Sun, 12/15/2019 - 11:25 नवीन
राजकारण हा माझा प्रांत नाही. त्यामुळे कोणी कसं राजकारण कराव याबाबत मी बोलत नाही. ही माणसे खूप हुषार असतात, आपल्यापेक्षा त्यांचे व्यवहार ज्ञान कितीतरी पटीने जास्त असते. माणसे सांभाळायचे कौशल्यही खूप असते. त्यामुळे मी नेहमीच त्यांचा उल्लेख आदराने करतो. त्यामुळे मी फक्त टक्केवारीच्या आधारे काय होऊ शकते याचा अंदाज बांधतो. मिडियाच्या बातम्यांवर किती विसंबून रहावयाचे ते त्यामुळे थोडेफार तरी कळते. थोडेफारच. जास्त नाही. घोडे बाजार, तो कोणी करायचा? कोणी करायचा नाही? यात मला रस नाही. त्यामुळे त्याबाबत माझा पास. :) ₹१ मधले फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात असं राजीव गांधी म्हणाले होते. ते प्रमाण जो वाढवेल, तो निवडून यावा असं मला वाटते. राजकारणातील पैशाचे स्थान पाहता, अख्खा रूपया लाभार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आदर्शवादी अपेक्षा माझी नाही.
↩ प्रतिसाद: गणेशा
श
शाम भागवत Sun, 12/15/2019 - 11:34 नवीन
घोडेबाजार पध्दतीमधील ह्या प्रकारचा घोडेबाजार, इतर प्रकारांच्या अपेक्षेत नक्कीच जास्त चांगला समजला गेला पाहिजे, कारण याप्रकारात परत निवडणुकीला सामोरे जाऊन जनादेश मिळवला जातो. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. असो.
↩ प्रतिसाद: गणेशा
श
शाम भागवत Fri, 03/08/2024 - 11:46 नवीन
अजितदादांना तर नवसंजीवनी मिळण्याची संधी आहे. अजितदादांना नवसंजिवनी मिळाली. शरदरावांनाही याची जाणीव झाली असेलच. हे जरा थोडे उशिराने झाले.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ज
जॉनविक्क Tue, 12/10/2019 - 14:59 नवीन
परंतु, जनता एकूणच एकता च्या सीरिअल पेक्षाही जास्त लांबलेल्या नाट्याला वैतागली आहे. दादांची फडणवीसांसोबत मनमोकळ्या गप्पाटप्पा हा सकृतदर्शनी दबावतंत्राचा भाग वाटतो.
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 12/10/2024 - 15:17 नवीन
'मी राजीनामा द्यायला तयार', मारकडवाडी गावात जावून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य. https://www.tv9marathi.com/maharashtra/congress-leader-nana-patole-said-i-am-ready-for-resignation-and-election-on-ballot-paper-1318439.html #NanaPatole #Congress
म
मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 18:36 नवीन
ते काही राजीनामा देणार नाहीत. आणि दिले राजीनामे तरी काही हरकत नाही. बाय द वे, खास अमरेंद्र बाहुबली यांच्या साठी खालील लिंक... EVM और VVPAT में नहीं थी कोई गड़बड़ी', महाराष्ट्र चुनाव को लेकर विपक्ष के दावे पर चुनाव आयोग ने दिया जवाब https://www.abplive.com/news/india/chief-election-officer-maharashtra-rejecting-the-opposition-allegations-says-no-evm-vvpat-mismatch-2839920 ------- अर्थात्, तुम्ही कदाचित "द्रोणाचार्य यांनी संजीवनी विद्येच्या सहाय्याने लक्ष्मणाला जिवंत केले" , असे मानत असाल तर, आमचा नाईलाज आहे....
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 12/10/2024 - 19:28 नवीन
आयोगाने अशी साक्ष डीने म्हणजे लादेन ने मी ट्विन टॉवर पाडले नाही असे म्हणणे आहे.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 02:59 नवीन
लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेंव्हा मात्र EVM वर विश्वास होता.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
र
रात्रीचे चांदणे Tue, 12/10/2024 - 16:36 नवीन
खरच राजीनामे द्यायला पाहिजेत. पण ऊभाटा सेने प्रमाणे हेही राजीनामे देणार नाहीत. फक्त काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडी असती तर कदाचित त्यांना जास्त जागा मिळाल्या असत्या. पण त्यांनी ऊभाटा सेनेला घेऊन चूक केली. ऊभाटा सेने मुळे दोन्ही काँग्रेसचे नुकसान झाले.
म
मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 18:38 नवीन
सहमत आहे... आत्ता जर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी, राजीनामे दिले तर, आहे ते उमेदवार पण परत निवडून यायची शक्यता कमीच आहे.
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 12/10/2024 - 19:29 नवीन
आता सेटिंग करणाऱ्यांना जास्त लक्ष केंद्रीत करता येईल.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 03:48 नवीन
EVM च्या बाबतीत., विधानसभा निवडणूक निकालानंतर सर्वात मोठी अपडेट; आयोगाने विरोधकांच्या दाव्यातील हवाच काढली (https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/there-was-no-mismatch-found-in-any-of-the-vvpat-slips-matching-with-their-concerned-evm-numbers-says-chief-election-officer-maharashtra/articleshow/116180003.cms) महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आला आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली. ही सर्व प्रक्रिया एका स्वतंत्र खोलीत झाली होती, जेथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. इतक नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्यात आली आहे. हे सर्व रेकॉर्डिंग सुरक्षीत ठेवण्यात आले आहे. @ अमरेंद्र बाहुबली, तुम्ही हे रेकॉर्डिंग बघू शकता....
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 05:27 नवीन
EVM च्या बाबतीत., विधानसभा निवडणूक निकालानंतर सर्वात मोठी अपडेट; आयोगाने विरोधकांच्या दाव्यातील हवाच काढली (https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/there-was-no-mismatch-found-in-any-of-the-vvpat-slips-matching-with-their-concerned-evm-numbers-says-chief-election-officer-maharashtra/articleshow/116180003.cms) महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आला आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली. ही सर्व प्रक्रिया एका स्वतंत्र खोलीत झाली होती, जेथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. इतक नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्यात आली आहे. हे सर्व रेकॉर्डिंग सुरक्षीत ठेवण्यात आले आहे. @ अमरेंद्र बाहुबली, तुम्ही हे रेकॉर्डिंग बघू शकता....
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/11/2024 - 04:06 नवीन
इव्हीएम वर विश्वास नाही, बॅलेट पेपरने मतदान हवे. कोळेवाडी ग्रामपंचायतीचा ठराव! https://www.thehindu.com/news/national/maharashtra/no-trust-on-evm-will-vote-using-only-ballot-paper-maharashtras-kolewadi-gram-sabha/article68970183.ece/amp/ असे उठाव गावोगावी होणे गरजेचे आहे. तरच भारतात लोकशाही टीकेल.
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 05:31 नवीन
लोकसभेच्या वेळी विश्वास आणि विधानसभेच्या वेळी अविश्वास..... एक तो चतुर बोलो , नहीं तो नार बोलो...
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
र
रात्रीचे चांदणे Wed, 12/11/2024 - 04:07 नवीन
आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. पहिले काही फेऱ्या पाठीमागे होते.
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/11/2024 - 04:30 नवीन
इंडिया ब्लॉक सुप्रीम कोर्टात जाणार! कोर्ट तरी देशाला वाचवेल अशी अपेक्षा! https://www.business-standard.com/amp/politics/india-bloc-to-approach-supreme-court-over-evm-issue-ncp-scp-leader-124121100083_1.html
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 05:34 नवीन
लोकसभेच्या वेळी विश्वास आणि विधानसभेच्या वेळी अविश्वास..... बाकी, काँग्रेस जिंकले तर, जनादेश.... आणि हरले तर, EVM दोषी.... एक तो चतुर बोलो , नहीं तो नार बोलो...
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/11/2024 - 05:55 नवीन
स्वागतार्ह निर्णय. आता इंडी आघाडीला सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम मध्ये किंवा मतमोजणी प्रक्रीयेत फेरफार झाले होते याचे पुरावे सादर करावे लागतील. ईव्हीएममध्ये खरोखरच फेरफार झाले असतील तर तो एक खूप म्हणजे खूपच गंभीर प्रकार असेल. तसे प्रकार करणारा कोणीही असू दे- त्याला जन्मठेपेची नव्हे तर फाशीची शिक्षा व्हावी. मात्र असे फेरफार झाले नसतील तर मग दरवेळेस निवडणुक हरल्यावर ईव्हीएम ईव्हीएम करून भोकाड पसरणार्‍यांचे तोंड कायमचे बंद व्हायला हवे आणि असल्या फालतूच्या याचिका घेऊन कोर्टाच्या वेळेचा अपव्यय केल्याबद्दल संबंधित व्यक्तींना नुसता दंडच नव्हे तर ६ वर्षांसाठी निवडणुक लढवायलाच बंदी घालण्यात यावी.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
र
रात्रीचे चांदणे Wed, 12/11/2024 - 06:02 नवीन
तोंड कायमच बंद होणार नाही. कारण सुप्रीम कोर्ट निकाला नंतर काय बोलायचं हे आधीच तयार असणार. आयोगानं सहकार्य केलं नाही, जज भाजपाचेच होते. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. मर्दाची आवलाद, मावळे, महाराज, गुजरात, अदानी, गुजरात दंगल, लोकशाही आणि संविधान खातरे मे.
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 06:11 नवीन
खोके, मिंधे, वाघनखे, कट्यार, तलवार आणि नुकतेच ऍड झालेले "वक्फ बोर्ड"..... आमच्या डोंबिवली मध्ये आमच्या ओळखीत एक जण आहेत. (आम्ही त्यांना, "कोमटराव फुसकांडे" असे टोपणनाव ठेवले आहे.) ते "कोमटराव" पण घडोघडी असेच बरळत असतात ....
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
म
मुक्त विहारि Wed, 12/11/2024 - 06:03 नवीन
अशा लोकांना, नॉर्थ कोरिया मध्ये पाठवावे... ना निवडणुक, ना EVM.. मज्जा नी लाईफ....
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा