Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : जानेवारी २०२०

व
वामन देशमुख
Wed, 01/01/2020 - 16:42
🗣 124 प्रतिसाद
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का? आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने - १. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची (२०१९) अंमलबजावणी २. देशातील नागरिकांची नोंदवही (NRC) ३. लोकसंख्या नियंत्रण कायदा ४. पाकव्याप्त काश्मीरवर ताबा इ. यावर्षातील दिल्ली आणि बिहारच्या निवडणूका जिंकणे मोदी-शहांना शक्य होईल का? ई. अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय. ता. क. - मिपावरील पूर्वीच्या जाणत्या लेखकांनी नवीन वर्षात तरी पुन्हा लिहितं व्हावं ही मनापासून विनंती.
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
61293 वाचन

💬 प्रतिसाद (124)
स
समीर स. पावडे Sat, 01/11/2020 - 08:18 नवीन
ट्रम्प यांनी दिलेल्या ८ उदाहरणांमध्ये जर कोणाला हिंदूंची मुस्कटदाबी दिसत नसेल तर तो पाहणारा नक्कीच तटस्थ नाही (गॉगलधारी आहे) असे म्हणता येईल. खरंतर हि मोजकीच उदाहरणे झाली, ठरवलंच तर हजारोंनि लिहिता येतील. पण एक प्रश्न अनुत्तरीतच आहे - जर जे.एन.यु. मध्ये आणि देशभरात कोठेही देश विरोधी लोक आहेत आणि देशद्रोह्यांचा नायनाट करण्याचा शासनाला पूर्ण अधिकार आहे तरीही तेथील पाळेमुळे खणून दोषींवर कारवाई का होत नाही?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 06:28 नवीन
अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय.
सेक्युलर सोबत ही sneer का बरं ? सेक्युलर म्हणजे सर्व धर्म समान मानणे, तर सेक्युलर असण्याबद्दल नावड का ? अगदीच बेसिक विचारला, प्लिज सांभाळून घ्या :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 01/12/2020 - 06:37 नवीन
राग सेक्युलर वरती नाही, छद्मसेक्युलर वरती आहे. तुम्ही समान नागरी कायद्याचा पुरस्कार करता का? केव्हढा विरोधाभास आहे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात आणि निरपेक्ष म्हणवणारे विरोध!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 07:23 नवीन
मी समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतो. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे स.ना. का. चे समर्थन करतात, हा खरच फार मोठा विरोधाभास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 07:38 नवीन
हिंदू तर तुम्ही, मी, राहुल गांधी, कन्हैया कुमार,नरेंद्र मोदी सगळेच आहोत. तर मग हिंदुत्ववादी असणे म्हणजे तुमच्या दृष्टीने काय ? आपल्या डोक्यांमध्ये हिंदुत्ववादाची वेगवेगळी चित्रं दिसतात, म्हणून विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 01/12/2020 - 08:59 नवीन
आज ज्याला हिंदुत्ववाद म्हणून हिनवले जाते, ते खरे तर अल्पसंख्याकवाद नको असे आहे. हिंदू हे सामान्यपणे सर्वधर्मसमभाव मानणारेच असतात. त्यादृष्टीने भाजपाची राजकीय भूमिका मला अधिक सेक्युलर वाटते, पण प्रत्यक्षात त्यांना बहुसंख्याकवादी म्हणून हिणवले जाते. शिवसेना खरी हिंदुत्ववादी होती, काही प्रमाणात, पण आता ते तर पुरोगामी झालेत. तुम्हाला राजदीप, राजू परुळेकर आणि बरखा सेक्युलर वाटत असतील तर मग तुमची व्याख्या आमच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे. मला ते सेक्युलर वाटत नाहीत. दावे स्वतःला सेक्युलर म्हणवतात, मला ते तसे वाटत नाहीत. म्हणजे पोथीनुसार ते आहेत, पण व्यवहारात नाहीत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 09:20 नवीन
तुम्हाला राजदीप, राजू परुळेकर आणि बरखा सेक्युलर वाटत असतील तर मग तुमची व्याख्या आमच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे.
मी स्वतःला सेक्युलर का म्हणीन आणि हिंदुत्ववादी का नाही म्हणणार इतकेच सांगू शकतो. बाकी शिवसेना आता पुरोगामी झाली आणि पूर्वी हिंदुत्ववादी होती असं मी मानत नाही. शिवसेना पूर्वी संधिसाधू होती आणि आताही आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 01/12/2020 - 09:38 नवीन
नाही, मी राजकीय भूमिकेबद्दल म्हणतोय. राजकीय पक्ष मुळातव्ह संधीसाधू असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 10:13 नवीन
राजकीय भूमिका भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्यांनीच overnight बदलल्या. त्यामुळे कुठलं हिंदुत्व आणि कुठलं सेक्युलॅरिझम. आपापले नैतिक विश्वास सर्वसमावेशक ठेवणं इतकंच काय आपल्या हातात राहतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 01/12/2020 - 12:02 नवीन
राजकारणात कुणीच कोणाचा काय्म शत्रु नसतो हे वाक्य अनेक पक्षाच्या पुढार्यानी बोलले आहे. हल्लि तर अडवाणीनादेखील सेक्युलर म्हण्णारे लोक आहेत. सरकार अडचणीत आले की हे नेते ईतिहासात जातात व "मुस्लिम कसे वाईट्ट होते" हे वॉत्स- अ‍ॅप विद्यपीठातून सांगण्याचा प्रयत्न करतात. गेले २/३ दिवस वॉट्स-अ‍ॅपवर अफगाणीस्तान/कझाकिस्तान्/पाकिस्तान येथे कसे 'राष्ट्रिय ओळख पत्र' आहे हे ठसवण्याचा प्रयत्न चालु आहे. काहि महिन्यांपुर्वी संबित पात्रा "पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांवर कसे अत्यचार होत आहे" हे घसा फोडुन एका चॅनेलवर सांगत होते. तो व्हिडियो आता गायब झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 12:52 नवीन
राजकारण्यांनी जनतेची अगदी नस पकडली आहे. इमोशनच्या नादाखाली अगदी नाचवतायत. आतापर्यंत संयत असलेली जनता अगदी पोलराईझ झालीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 01/12/2020 - 15:46 नवीन
बरोब्बर बोललास. "मुसलमानाना हाकलून द्या . वाट लागली आहे त्यांच्यामुळे" काही विशिष्ट ठिकाणी ऐकु येणारी ही कुजबुज आता उघडपणे सगळीकडे बोलले जाउ लागले आहे. अमित शहा हे गृहमंत्री की चिथावणीखोर हिंदुत्ववादी नेता? नक्की कोण कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Sun, 01/12/2020 - 16:20 नवीन
भाजपाचे गिरीराज सिंह आणि इतर काही नेते पॉप्युलेशन कंट्रोल च्या नावाखाली मुसलमानांच्या लोकसंख्या विस्फोटाची (खोटी) माहिती समोर ठेवतात. हिच माहिती लोकं पोटतिडीकीने फॉरवर्ड करतात. काय खोटं आणि आणि काय खरं यातला फरक समजावून घेण्याची इच्छाच मेल्यासारखी परिस्थिती झालीये. जे आपल्या मताला अनुसरुन तेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ग
गणेशा Sun, 01/12/2020 - 19:13 नवीन
तुम्ही समान नागरी कायद्याचा पुरस्कार करता का? केव्हढा विरोधाभास आहे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात आणि निरपेक्ष म्हणवणारे विरोध
!! हो, मी हिंदू आहे आणि मी सर्वधर्म समभाव आणि अहिंसा मानतो. आणि त्याच बरोबरीने मी समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतो.. (या एकाच अश्या त्यावेळेस च्या जाहीर नाम्यातील मुद्द्या मुळे मी अटलबिहारी वाजपेयी या साठी भाजपा ला ही त्यावेळेस वोट केले होते ) आता देशात जी हिंसा चालू आहे ते मला आवडत नाही. 370 आणि ट्रिपल तलाख मला मोदींचे निर्णय आवडले आहेत. त्यांची परराष्ट्र नीती ही चांगली आहेच. परंतु नोटबंदी, अर्थकारण, जाहिरात बाजी, कृषी, दिल्लीतील पोलिस हाताशी असतानाही तेथील हिंसा थांबवण्यास असमर्थता.. आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे मला आवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ट
ट्रम्प Mon, 01/13/2020 - 11:43 नवीन
तमाम सहिष्णू मिपाकरांना सादर प्रणाम !!! आजच शाहीनबाग दिल्ली मधील नवीन विडिओ आला आहे . त्यात देवतांचे फोटो जाळणारे , ला ईलाही इल्लल्ला ( अल्ला शिवाय दुसरा देव नाहीच ) अशा घोषणा देणारे शांतधर्मीय " जय श्रीराम !! बोले सो निहाल की !! " घोषणा देत आहेत . हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे . शेवटी काय मोदी है तो सब मुमकीन है : ) : )
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Mon, 01/13/2020 - 19:04 नवीन
शांतधर्मीय ह्या शब्दाचा पायंडा पाडलाय कुणास ठाऊक ,, चुकीचं वाटत असलं तरी खरंय ,

प्रतिसाद संपादित

  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 01/14/2020 - 06:59 नवीन
तुम्ही पाकिस्तान मध्ये इस्लाम वर टिका करू शकत नाही कारण तेथे मुस्लिम बहुसंख्य आहेत , तुम्ही भारता मध्ये इस्लाम वर टिका करू शकत नाही कारण भारतात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत . पण भारतात हिंदू बहुसंख्य आणि पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक असून देखील तुम्ही हिंदू वर टिका करू शकता कारण हिंदू जन्मजात उदारमतवादी आहे !!!!!!!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/14/2020 - 07:22 नवीन
नेहमी पाकिस्तानचे उदाहरण डोळ्यासमोर का ?आंबेडकरानी जातीयवादाविरुद्ध टीका केली .. ती चुकीची होती ? सावरकरानी हिण्दू धर्मातील काही प्रथांवर प्रहार केले.. ते पण चुकीचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Tue, 01/14/2020 - 11:43 नवीन
प्रश्न बाबासाहेब आणि सारकरांचा नाही तर सतत हिंदूंना भाषण देणाऱ्या लिब्रू लोकांचा आहे भारतात मुस्लिम धर्मावर टिका केली तर काहीच होत नाही पण पाकिस्तान मध्ये इशनिंदा चा आरोप लावून फासावर लटकवतात आणि भारता मध्ये हिंदू धर्मावर टिका करणार्यांना आंतरराष्ट्रीय अवॉर्डस आणि भिकेरूपी लाखो रुपये भेटतात म्हणून पाकिस्तान चे नाव घेतले . आणि बाबासाहेबांना का मध्ये ओढता ? त्यांनी गोरगरीब दलितांना सन्मान मिळवून दिला पण त्याच्या बदल्यात त्यांनी सर्वात जास्त त्रास काँगी कडूनच भोगला आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/14/2020 - 07:26 नवीन
अभाविपच्या गुन्डानी जो हिण्साचार केला त्याबद्दल इन्डिया टूडेने स्टीण्ग ऑपरेशन केले.. https://www.youtube.com/watch?v=dnppOnvBz1k दिल्लि पोलिस व गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नव्हते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/14/2020 - 07:59 नवीन
अभाविपच्या गुन्डानी जो हिण्साचार केला त्याबद्दल इन्डिया टूडेने स्टीण्ग ऑपरेशन केले.. --- अभाविपचे गुंड! मग सर्वररुम मधे तोडफोड करुन, नविन फॉर्म भरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण करणारे मास्कधारी डावे कोण, क्रांतीकारी ? --
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/14/2020 - 10:11 नवीन
मास्कधारी अभविपचे होते हे सिद्ध झाले. मास्कधारी डावे असते तर पोलिसानी तुडवुन मारले असते व पुरावेही दाखवले असते टी.व्हिवर. पोलिसानी बघ्याची भुमिका घेणे, कुलगुरूनी काहीही न करता बसणे.. भक्त मंडळीना मूर्ख बनवणे सोपे आहे पण सर्वाना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ट
ट्रम्प Tue, 01/14/2020 - 13:10 नवीन
कसल्या जुन्या बातम्या घेऊन बस्ताय !! स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या इंडिया टी व्ही च्या राहुल कंवल ने सुद्धा चूक मान्य केली की तो कार्यकर्ता abvp चा नाही . ते जाऊ द्या लिब्रेल्स चा आवडता पत्रकार राजदीप सरदेसाई ने पी एस आई त्रिवेदी ची लिखित स्वरूपात कोर्टात माफी मागितली हे वाचले का ? https://zeenews.india.com/hindi/india/sohrabuddin-case-rajdeep-sardesai-apologizes-unconditionally-for-false-reporting/623880
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
आ
आनन्दा Tue, 01/14/2020 - 13:58 नवीन
लॉजिक आवडले. पुनरागमनाच्या शुभेच्छा आणि स्वागत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्रसाद_१९८२ Sat, 01/25/2020 - 15:20 नवीन
माईसाहेब, तुम्ही ज्या लोकांचे समर्थन इथे करत आहात त्याच लोकांनी तुम्हाला तोंडावर पाडले. --------------------- https://www.facebook.com/apkaharkara/videos/816782515450288/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
वामन देशमुख Tue, 01/14/2020 - 08:32 नवीन
तेलंगणात हिंसाचार, दगडफेक, घरे-वाहनांंची जाळपोळ, डझनभर जखमी इ. बातमी - https://hindi.opindia.com/national/bhainsa-nirmal-telangana-hindu-muslim-clash-vehicles-torched-aimim-trs-bjp/ विडिओ - https://youtu.be/04Yxr083Olo
  • Log in or register to post comments
स
समीर स. पावडे Wed, 01/15/2020 - 06:02 नवीन
सी.पी.आय. (मार्क्स) पॉलिट ब्युरो चे नेते म्हणत आहेत कि ज.ने.यु. मध्ये सन १९८१ साली होती त्यापेक्षाहि वाईट परिस्थिती सध्या आहे. त्यातच सुब्रह्मण्यम स्वामींच्या मते विद्यापीठाला दोन वर्षे बंद ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव द्यावे. ज.ने.यु. त सन १९८१ मध्ये इंदिरा गांधींनी केल्या प्रमाणे कारवाई केली जाऊ शकते का?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 01/15/2020 - 18:11 नवीन
अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक बंधू कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा एक व्हडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कप्तान मलिक चक्क एका मराठी मुलाला मारहाण आणि आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. ही बातमी
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 01/16/2020 - 07:41 नवीन
मुघल औरंग्याचे जुलमी सैनिक गरीब जनतेवर अत्याचार करत आहेत आणि औरंग्या ( उठा ) टोप्या विणत बसलाय !!!!!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 01/17/2020 - 15:06 नवीन
श्रीनगर मध्ये डि एस पी देवेंद्र सिंग दोन अतेरिक्या बरोबर प्रवास करताना पकडला गेला , याच देवेंद्र चे पुलावामा हत्याकांड मध्ये हात आहे असे म्हणतात . याला पूर्वी राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आलेले असून सध्या विमानतळ वर विमान अपहरण विरोधी पथक मध्ये कार्यरत होता . काँग्रेस वाले भाजप वर नारळ फोडत आहेत तर भाजप वाले मिठाची गूळणी धरून गप्प बसले आहेत . आज अशी माहिती बाहेर आली आहे की डि आय जी स्वतः देवेंद्र ला अटक करत ' असताना तुम गेम बिघाड रहे हो ' असे देवेन्द्र ने डि आय जी ला सुनावले . नक्की काय चाललंय कोणास ठाऊक ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 01/18/2020 - 08:20 नवीन
सब साला झोल है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 01/19/2020 - 08:07 नवीन
आणी ह्या शीख लोकाण्चे 'देशप्रेमी' मंडळीना भारी कवतिक असते. शीख लोक म्हणजे कमालीचे देशप्रेमी, सच्चे नागरिक असे गैरसमज आपल्या समाजात असतात. ह्याच दविण्दर सिंग ऐवजी कोणी 'दिलेर खान' असता तर देशप्रेमी मंडळीनी "बघा, आम्ही सांगतच होतो.." म्हणत वॉट्स अ‍ॅपवर हजारोवर सुरस कथा पसरवल्या असत्या. व त्याच्या अटकेला "हा अमित शहांचा मास्टर स्ट्रोक" म्हणत डोक्यावर घेतले असते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/20/2020 - 03:47 नवीन
शेवटी काय कर्तृत्व , देशावरील प्रेम महत्त्वाचे ! जात पात गौण ठरते . राहिला शांतधर्मीय बद्दल , त्यांनी आपल्याच देशातील काश्मीर पंडितना हकलण्या बद्दल मौन बाळगणे पण CAA ला विरोध करणे या दुटप्पीपणा मुळेच सतत निशाण्यावर राहणारच .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/20/2020 - 04:44 नवीन
https://www.indiatoday.in/india/story/i-am-an-indian-will-remain-one-army-officer-sanaullah-1545234-2019-06-09 कारगिलमध्ये कामगिरी बजावणार्या निव्रुत्त लष्करी अधिकार्याला Detention camp मध्ये ठेवले जाते.. ह्यचा अर्थ काय ? https://www.youtube.com/watch?v=Kc3h_owvOoM बी एस एफच्या जवानाला व त्याच्या पत्नीला परदेशी ठरवले जाते. कशासाठी हा रिकाम्टेकडा उद्योग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
आ
आनन्दा Tue, 01/21/2020 - 10:47 नवीन
मला काही कळले नाही. देशासाठी युद्धात लढले तरी जर घुसखोरी केली असेल तर केली आहेच ना! त्यांना सरकारने दुसऱ्या कोणत्यातरी नियमानुसार नागरिकत्व द्यावी अशी मागणी करू शकतो. पण खोटी कागदपत्रे मिळवून देशासाठी लढले म्हणून ते नागरिकच आहेत असे म्हणणे मला मान्य नाही. अजून एक - आसाम NRC मध्ये बरेच बांग्लादेशी हिंदू विस्थापित पण अनधिकृत सिद्ध झाले आहेत असे ऐकून आहे. कारण आसाम NRC हे वेगळ्या कायद्यानुसार होत आहे. त्या लोकांना वेगळ्या कायद्यान्वये नागरिकत्व द्यावे, पण NRC मधून वगळणे म्हणजे लगेच अन्याय म्हणून ओरडण्याची गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/22/2020 - 06:09 नवीन
पण पाकिस्तानातून आलेल्या हिंदूना(हिंदू पाकडे? ) नागरिकत्व मिळणार पण ३० वर्षे भारतिय सैन्यात घालवलेल्या अधिकार्याला मात्र देशाबाहेर जावे लागणार. कोणता न्याय हा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
भ
भंकस बाबा Wed, 01/22/2020 - 05:59 नवीन
कारगिल युद्धात लढले वा बीएसएफमधे शामिल झाले म्हणजे देशद्रोही नाही हे कोण ठरवनार ? पगार नाही घेत का हे देशप्रेमी? असा दावा जर न्यायालयात केला तर पहिल्या सुनावणीला रफादफा करण्यात येईल. स्वांतत्रसैनिक झाले म्हणून एकदोन खून माफ असा पैरामीटर लावत नाही कोर्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/22/2020 - 06:12 नवीन
मग हिंदू/जैन्/बौद्ध पाकड्याना भारतिय नागरिकत्व मिळणार आहे ते लोक कशावरुन देशद्रोही नाहीत ? ते तर खरे पाकिस्तानीच ना ? हिंदू झाले तरी पाकडेच ना ? ह्यात आय एस आय्चे हस्तकही असतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ट
ट्रम्प Wed, 01/22/2020 - 10:33 नवीन
प्रश्नात दम आहे ! उगीचच अकबरुद्दीन ओवेसी उठसुठ हिंदूना ढोस देत नाही !!! NBT: अकबरुद्दीन ओवैसी के विवादित बोल,'कागज मांगें तो कहो, चारमीनार मेरे बाप ने बनवाया है तेरे बाप ने नहीं' http://nbt.in/eRL6va?baa via आता जरी भाजप राज्य करीत असली तरी भाजप आणि तमाम हिंदूंनी लक्षात ठेवावे ओवेसी म्हणतोय ती आठशे वर्ष भारतात सहिष्णु मुस्लिमांच्या अधिपत्याखाली तमाम हिंदूंनी सुख उपभोगल आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
भ
भंकस बाबा Wed, 01/22/2020 - 19:48 नवीन
तुमच्या बेसिकमधेच काही गडबड आहे. ही भाषा एनआरसी व सीएएला विरोध करणारे शांतिप्रिय समाजाचे लोक करत आहेत, आणि काही सेकुलर कीडे आपला कण्ड शमवण्याकरता करीत आहेत. तुम्ही कायदा वाचला आहे का नक्की? शांतिप्रिय समाजाचे लोक कधी नव्हे तर आता भारतप्रेम दाखवत आहेत, संविधानाचा दाखला देत आहेत. संविधानाला साक्षी मानून दिलेला निकाल शाहबानो खटल्यात फिरवला तेव्हा व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अवेळी वाजणारे अजानचे भोंगे याने मात्र संविधान रक्षण केले जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/23/2020 - 14:47 नवीन
तिकडच्या हिंदूला आपले म्हणायचे व इकडच्या हिंदू/मुस्लिमाला कागद्पत्रे नाहीत म्हणून देशाबाहेर चालते व्हा म्हणायचे ... हेच पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ग
गामा पैलवान Fri, 01/24/2020 - 11:02 नवीन
माईसाहेब, येडा बडून पेढा खाताय? तुम्ही ज्याला 'तिकडचा' प्रांत म्हणता तो वास्तविक इकडचाच होता. तिथले अत्याचारग्रस्त हिंदूही इकडचेच आहेत. तुम्ही ज्याला इकडचे मुस्लिम म्हणता त्यांना कोणीही बाहेर काढीत नाहीये. हां घुसखोर मुस्लिमांना मात्र बाहेर काढलंच पाहिजे. एखादी गोष्ट पटंत नसेल तर पटवून घ्यायला शिका. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/24/2020 - 15:20 नवीन
"तुम्ही ज्याला 'तिकडचा' प्रांत म्हणता तो वास्तविक इकडचाच होता. तिथले अत्याचारग्रस्त हिंदूही इकडचेच आहेत." अरे मग अहमदिया मुस्लिम, ज्याण्च्यावर तिकडे अत्याचार होतात , अशानाही घ्या ना. ते ही एकेकाळचे हिंदुस्तानीच ना ? सेलेकटिव्ह मानवतावादी कशासाठी ? काही महिन्यापुर्वी संबित पात्रा टी.व्ही चॅनेल्वर अहमदिया/खोजा मुस्लिमांवर कसे अत्याचार होतात हे घसा फोडुन सांगत होते. आता तो व्हिडियो गायब झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 01/24/2020 - 19:26 नवीन
माईसाहेब, तुमचा मुद्दा बिनतोड आहे. म्हणूनंच शीख, ख्रिस्ती वगैरे बिगर हिंदूंनाही नासुका मध्ये समाविष्ट केलं आहे. त्यातूनही खोजांनी जर प्रतिज्ञापत्र भरलं की ते मुस्लिम नाहीत, तर सहानुभूतीने विचार केला जाऊ शकतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ट
ट्रम्प Tue, 01/21/2020 - 17:59 नवीन
महेश भट्ट ची बायको आणि ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सोनी राजदान या लिबरल्स बाई ने अफझल गुरू बद्दल संवेदना व्यक्त करून अफझल वर अन्याय झाल्याची खंत आज व्यक्त केली . म्हणजे संसद हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेले दहा बारा सुरक्षा रक्षक हे विनाकारण मेले !! महेश भट च्या मुलागा राहुल भट निर्दोष आणि त्याचा मित्र डेव्हिड हेडली पण निर्दोष होता !!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/22/2020 - 10:48 नवीन
संजय राऊत नक्की काय करीत आहेत हे त्याना तरी समजते का? तसेही ते उठा ना कधीच समजणार नाही .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/22/2020 - 13:01 नवीन
पुर्वी सामना वाचायचो आम्ही. संजय राउत तेव्हा क्लिंटन्, टोनी ब्लेयर, वाजपेयीना सल्ले द्यायचे 'सामना'मधून. सद्दाम हुसेन ह्याना संपादकीयातून राउत ह्यानी सावध केले होते तेही आठवते. नंतर जपानच्या पंतप्रधानापासुन ते नाशिकचा महापौर.. अशा सर्वाना राउतानी सल्ले दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/23/2020 - 05:06 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/23/2020 - 09:28 नवीन
बकबकुद्दीन औवेश्या बकबकतो की :
हमारे पूर्वजों ने 800 साल तक देश पर राज किया संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1057080#comment-1057080
च्यायला, चार पिढ्यांपूर्वी हा हिंदू होता. आणि बाता मारतो आठशे वर्षांच्या. अशा वांझोट्या वल्गनांनी आपलं मन कसं प्रसन्न होतं, नाहीका? बके राहो बकबकभाई. -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 01/23/2020 - 13:09 नवीन
हि सकाळ मधली बातमी. सकाळ नेहमीच काँग्रेसधार्जिणं राहिलेलं आहे. सकाळ सोडून हि बातमी कुठेही आली नाही. आणि आली जरी तरी सरकारने अजिबात असल्या गोष्टींची काळजी करू नये. हि कॉंग्रेसने पोसलेली परदेशी पिलावळ असलीच ओरड करणार. खरोखर आपल्या देशासाठी हि शरमेची बाब आहे कि विश्व नेतृत्व करण्याची लायक असलेले पंतप्रधान आपल्याला लाभले असूनही आपल्यातील काहींना ते खुपतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा