Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार
Sun, 05/24/2020 - 12:15
💬 523 प्रतिसाद
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

प्रतिक्रिया द्या
148937 वाचन

💬 प्रतिसाद (523)
प
पलाश Tue, 06/02/2020 - 16:00 नवीन
6. अरूण साधू ? (खात्री नाही पण वाक्य वाचल्यापासून हेच नाव मनात येते आहे.) साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त हे वर्णन अरूण साधू यांचे आहे का? लेखकांच्या माहितीतील शेवटचे लेखक अनिल अवचट असावेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/02/2020 - 17:36 नवीन
लेखकांच्या माहितीतील शेवटचे लेखक अनिल अवचट असावेत.>>> होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश
ह
हेमंतकुमार Tue, 06/02/2020 - 16:00 नवीन
3 च त्यांच्या टाईप ची होती वाक्य.. >>> नाहीच ! मज्जा येतेच आहे.....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 06/02/2020 - 18:31 नवीन
नाही नाही मला म्हणायचं होत की त्यांच्या type ची तीनच वाक्य होती, आता 2 झाले , तिसरे मला कळलेलं आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 06/02/2020 - 16:02 नवीन
अरूण साधू ? >>> इथे नाहीतच . * साहित्यातील अत्युच्च पुरस्कार >>> यावर शांतपणे विचार करा ! छान प्रयत्न
  • Log in or register to post comments
प
पलाश Tue, 06/02/2020 - 17:00 नवीन
साहित्यातील अत्युच्च पुरस्कार - ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कारप्राप्त साहित्यिक :१. वि. स. खांडेकर, २.वि. वा. शिरवाडकर ३.विंदा करंदीकर ४. भालचंद्र नेमाडे ( हे गूगल केल्यावर मिळालं. ) हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. व. पु. काळे असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 06/02/2020 - 17:11 नवीन
हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. व. पु. काळे असावेत. >>> +११. ..आता त्या ४ पैकी एक निवडा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/03/2020 - 10:08 नवीन
कोडे सोपे करून देतो. आता लेखकांची वैशिष्ट्ये वाक्यांच्या क्रमानुसार आहेत. १. हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. २. सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित ३. यांची विचारधारा कामगारधार्जिणी. ४. स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द ५. खूप जंगलप्रेमी. ६. साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त. ७. कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले.
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 06/03/2020 - 12:52 नवीन
वाक्ये: १. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. : व. पु. काळे २. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. ३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. : विजय तेंडूलकर. ४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. : अनिल अवचट. ५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. : व्यंकटेश माडगूळकर. ६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. : विंदा करंदीकर. ७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 06/03/2020 - 13:14 नवीन
१, ४ व ५ बरोबर. बाकी नाही.
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 06/03/2020 - 18:37 नवीन
छान यातील काहीच माहिती नाहीये त्यामुळे पास म्हणींची उत्तरे मिळाली नाहीयेत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/04/2020 - 06:00 नवीन
२,३, ६ व ७ उरलेत. त्यात एक लेखिका आहे.
  • Log in or register to post comments
प
पलाश गुरुवार, 06/04/2020 - 06:35 नवीन
यात एक लेखिका असेल तर २. सुनिता देशपांडे (सुनिताबाई)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/04/2020 - 07:03 नवीन
२. सुनिता देशपांडे (सुनिताबाई) अगदी बरोबर ! छान
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 06/05/2020 - 08:08 नवीन
आता कोणी हे उरलेले कोडे सोडवत नसावे. थोड्या वेळाने सर्व उत्तरे लिहितो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 06/05/2020 - 08:57 नवीन
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. वपु २. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. सुनीता देशपांडे ३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. अनिल बर्वे ४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. अ अवचट ५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. व्यं. माडगूळकर ६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. कुसुमाग्रज ७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे. विजय तेंडूलकर
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/05/2020 - 13:48 नवीन
__^__ एव्हडे वाचन झालेच नाही आमचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
P
Prajakta२१ Fri, 06/05/2020 - 21:41 नवीन
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/06/2020 - 04:24 नवीन
धन्यवाद ! आता सहभागींपैकीही कोणीतरी कोडी जरूर द्या. स्वतः कोडी तयार करण्याची मजा काही औरच असते.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/06/2020 - 05:08 नवीन
असले तुमच्या कडे तर द्या.. मला तर उत्तरे शोधण्यात मज्जा आली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चांदणे संदीप Sat, 06/06/2020 - 08:51 नवीन
म्हणजे, आजूबाजूला काहीतरी एखादा शब्द वाचायचा आणि तो दुसर्‍याला शोधायला सांगायचा. एसटी, एखाद्या मोठ्या गावात बराच वेळ उभी असेल तर किंवा रेल्वे, स्टेशनात उभी असेल तेव्हा हे खेळ निघायचे. अजून एक, गावाच्या नावाच्या भेंड्या. पान-फूल-फळ हा तीन चार जणांनी वही पेन घेऊन खेळायचा खेळ. वेळ कसा जायचा कळायचं नाही. थोडे अजून मोठे झालो की पेप्रातली शब्दकोडी सोडवायला मज्जा येऊ लागली. पुणे रेल्वे स्टेशनला पहिल्यांदा जेव्हा फक्त शब्दकोड्यांचा पेपर पाहिला होता तेव्हा अलिबाबाला गुहेत खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता. नंतर सुडोकूने डोके खाल्ले. आजकाल व्हाट्सअ‍ॅपवर येतात कोडी पण त्यात तोचतोचपणा असतो. इथल्या ह्या कोड्यांनी मजा आणली. धन्यवाद, कुमार१! ___/\__ मी जमले तर एखादे कोडे देतो. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/06/2020 - 09:15 नवीन
जरूर द्या !
आजकाल व्हाट्सअ‍ॅपवर येतात कोडी पण त्यात तोचतोचपणा असतो.
म्हणूनच स्वतः तयार करूयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ह
हेमंतकुमार Sun, 06/07/2020 - 07:20 नवीन
या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्याच बरोबर त्या गाण्याशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे. गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. ही सगळी गाणी प्रसिद्ध आणि तुमच्या आमच्या ओठांवर असलेली आहेत. चला तर मग पटकन ओळखू या….. १. ते, घर, असेल : याच्या गायिका प्रख्यात असून त्यांच्या नावाने चित्रपट संगीतातील पार्श्वगायकासाठी एक पुरस्कार आहे. २. हरी, पण, माझ्या : याचे गीतकार दीड महिन्यापूर्वी निवर्तले. त्यांनी सुमारे चार हजार कविता, गाणी लिहिली. ३. चंद्रमा, मनी, भावना : याचे संगीतकार या गाण्याचे सहगायकही आहेत. ४. झाल्या, आता, येशील : याचे गीतकार हरहुन्नरी. त्यांचा ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत आणि नाट्य दिग्दर्शन यांतही संचार. ५. सावळा, ही, शोधिता : याच्या गायिका एकेकाळच्या आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या गायिका. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त. ६. फुलांनी, आली, ओल्या : याचे गीतकार हे नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध. ७. आलं, गालात : याचे संगीतकार एका ग्रामीण काव्यप्रकारचे गायक म्हणूनही गाजले. .............................................................................................................
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:04 नवीन
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे आनंदाची अन्‌ तृप्तीची, शांत सावली इथे मिळे जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे.. जुळलेले नाते अतुट,घड़े जन्म जन्माची भेट घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण जुळलेले नाते अतुट, घड़े जन्मजन्माची भेट ला ला ला ला घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे …
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/07/2020 - 08:08 नवीन
१ चे उत्तर चूक. शोधशब्द नीट पाहा. .... गाणे ओळखल्यावर फक्त त्याचे ध्रुवपद लिहावे, पूर्ण गाणे नको.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:25 नवीन
तुमच्या धाग्यावर सर्वात चुकणारा मी च असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:24 नवीन
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली तारे निळ्या नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धुंद होती स्वप्नात दंगलेली ( किती दिवसांनी आठवले गाणे.. वा.. मज्जा आली.. Love this song.. जुन्या आठवणी )
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/07/2020 - 08:31 नवीन
वा ! ६ अगदी बरोबर हो. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे चुकण्यातच खरी मजा आहे ! छान प्रयत्न.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:45 नवीन
पहिल्यादा बरोबर आलो मी :-)) :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:45 नवीन
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी! दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी अननुभूत माधुरी आज गीत गायने -- आधी तोच आहे चंद्रमा वाटलेले :-))
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:51 नवीन
कुन्या गावाचं आलं पाखरू? अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू? बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात हे आपल्याला लहान पणा पासून येते रंजना ♥️
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/07/2020 - 08:51 नवीन
गणेशराव, ३ पण अगदी बरोबर ! आता तुम्ही अन्य इच्छुक खेळाडूंसाठी बहुतेक काही बाकी ठेवणार नाही वाटतं.......
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/07/2020 - 08:57 नवीन
थांबतो... बाकीच्यांना पण. मजा येऊदे.. गाणी मला म्हणता येत नाही सुरात.. पण ऐकायला मज्जा येते.. आधी घरी रेडिओ असल्याने जुनी marathi गाणी खुप ऐकली जात होती.. कुण्या गावाचं तेंव्हाच... आता हि मागे रेडिओ आणलाय मी घरी.. बाकीची गाणी इतरां साठी सोडतो.. शोधल्यावर सापडतील.. आणि मी 6 वे गाणे ऐकत.. शब्द मोती वर एक जुनी आठवण लिहितो वेगळी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sun, 06/07/2020 - 09:15 नवीन
लागोपाठ तीन गाणी ओळखून गणेशा यांनी हॅटट्रिक केली आहे. अभिनंदन ! आता ते मैदानावरून विश्रांती घेत आहेत याबद्दलही आभार. ...... आठवण जरूर लिहाच
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 06/07/2020 - 10:14 नवीन
१. ते माझे घर ते माझे घर असेल सुंदर. आशा भोसले २. हात धरि रे हरि पहा पण करात माझ्या वजे कंकण : मधुकर जोशी ३. नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी: सुधीर फडके ४. सखी मंद झाल्या तारका , आता तरी येशील का : सुधीर मोघे
  • Log in or register to post comments
प
पलाश Sun, 06/07/2020 - 14:10 नवीन
५ निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात।
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 06/07/2020 - 14:33 नवीन
५. निळा सावळा नाथ तशीही निळीसावळी रात , कोडे पडते तुला शोधीता कृष्णा अंधारात : कुंदा बोकील
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/07/2020 - 18:05 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/10/2020 - 08:01 नवीन
आतापर्यंतच्या कोड्यात असे दिसले की गाण्यांचे कोडे पटकन सोडवून होते. आता पुन्हा एक गाण्यांचेच देतो आहे पण जरा अवघड केले आहे. बघा कसे वाटतंय……. नवा खेळ : मराठी गाणी ओळखा. या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्यानंतर या गाण्यांशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती गाण्यांच्या अनुक्रमानुसार नाही. मात्र एका गाण्याची जोडी फक्त एकाच वैशिष्ट्याशी जुळली पाहिजे. गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. चला तर मग पटकन ओळखू या….. ध्रुवपदातील शब्द : १. घर, नुसत्या, प्रेम २. हिच्या, लहरी ३. हाक, नाव ४. जीवनी, पाऊली ५. तू, सांग, जळी ६. नित, मिसळती ७. माझ्या, केल्या ……………………………………… कलाकाराची विशेष माहिती (अनुक्रमानुसार नाही). • याचे गायक व संगीतकार एकच आहेत. • याचे संगीतकार जोडीने दोन व्यक्ती आहेत. • याच्या गायिका अभिनेत्री पण आहेत. • याच्या गीतकारांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी या प्रकारची गीते लिहिली आहेत. • याचे गीतकार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते. • याचे गायक जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत • याचे संगीतकार पद्म पुरस्कार विजेते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/10/2020 - 08:10 नवीन
कुमार सर, दुपार नंतर बघतो वेळ काढून.. जाता जाता.. तुमच्या ह्या गाण्यांमुळेच.. काल एक विडंबन लिहिले गेले.. मज्जा आली. :-) दुपार नंतर येतो..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/10/2020 - 08:32 नवीन
दुपार नंतर येतो.
. >>> जरूर ! पण... तोपर्यंत दर्दी मंडळी काही बाकी ठेवतात का ते बघू ! :-)
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 06/10/2020 - 09:12 नवीन
१ घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती २ रम्य ही स्वर्गाहुनी लंका, हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका ??? ७ अखेरचे येतिल माझ्या, हेच शब्द ओठी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/10/2020 - 09:51 नवीन
१, २, ७ बरोबर. छान ! हॅटट्रिक !!
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 06/10/2020 - 10:36 नवीन
६. सजल नयन नित धार बरसती, भावगंध त्या जळी मिसळती
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/10/2020 - 10:40 नवीन
६ बरोबर.... स्वागत ! आता बहुतेक उरलेले तुम्ही संपवाल ....
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 06/10/2020 - 10:45 नवीन
४. रजनीगंधा जीवनी या बहरुनि आली, मनमीत आला तिच्या पाउली
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/10/2020 - 10:55 नवीन
४ बरोबर !
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 06/10/2020 - 11:55 नवीन
3 नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा, आज नाव रे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/10/2020 - 11:57 नवीन
३ बरोबर
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/10/2020 - 12:35 नवीन
मी येई पर्यंत हे solved झाले.. वाचायला पण छान vatale पण बरे झाले.. मला जमले नसते असेच वाटत आहे.. :-))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा