शब्दखेळ : विरंगुळा
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली आदरणीय, तर अन्य एक हीन दर्जाची. >>>>>>इथे ‘एकापेक्षा अधिक’ म्हणजे कितीही आकडा असू शकतो ! फक्त ‘तीच’ पंचरंगी भूमिका डोक्यात ठेऊ नका.मात्र याचा इफेक्ट उलटा झाला. अचानक दहाबारा कुत्री कुठून आली कळले नाही. "साल्यांनो दिवसा या, दाखवतोच तुम्हाला" मनात विचार आला. फार आक्रमक पद्धतीनं ती कुत्री अंगावर यायच्या बेतात होती. अगदी फुटभर अंतरावरुन जोरजोरात भुंकत होती. मला आता भिती वाटायला लागली होती. सावधगिरी म्हणून मी पाठीवरची सॅक हातात घेतली. माझी सॅक हेच माझे हत्यार. पुढे मागे बघत आपण त्या गावचेच नाही असा विचार करत चालू लागलो. पाळीव कुत्रीही फाटकाच्या आतून भुंकू लागली. मला वाटले एखादा वाचमन वगैरे काठी घेऊन येईल आणि माझी सुटका करेल. पण तसे काही झाले नाही.
...................................................................................................................................................................................... ३. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच. झूलन गोस्वामी, एकता बिश्त, दिप्ती शर्मा, हरमीत कौर, पूनम यादव, मानसी जोशी आणि शिखा पांडे ह्यांची गोलंदाजी पण बर्यापैकी होत आहे. .............................................................................. ४. याच जिममधला एक जबर हसवलेला पण काहीसा डेंजर किस्सा. हेवी बेंचप्रेस करत होतो. त्या दिवशी एकही इन्स्ट्रक्टर नव्हता, दुपारची वेळ होती. तीन चारच जण जिममधे होतो त्यामुळे मी आणि माझा मित्र एकमेकांना स्पॉट करत होतो, सपोर्टला उभे होतो. माझा मित्र बेंचप्रेस करत होता, पन्नास किलो. त्यावेळी रिसेप्शन वर कोण बया होती ठाऊक नाही पण जुनी हिंदी गाणी लावत होती. 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए' हे गाणं लावलं होतं. या गाण्यात '...तो बात बन जाए.........' या ओळीनंतर एक 'टू.....' असा आवाज आहे. जिमच्या त्या (गाण्याव्यतिरिक्त) शांततेत बेंचप्रेस मारत असताना हा 'टू..........' आवाज आला .............................................................................. ५.इथं मला अनेकदा भारतातली खेडी आठवतात. स्त्रिया कमी शिकतात; घरकाम ही त्यांचीच जबाबदारी वगैरे अनेक गोष्टी इथंही दिसतात. इकडे मुलीच्या वडिलांना मुलाकडून पैसे मिळतात; त्यामुळे पैशाच्या लोभाने मुलींना फार लवकर लग्नात अडकवलं जातं. कौटुंबिक अत्याचार आणि आरोग्य असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. अर्थार्जनाची आधुनिक कौशल्य कमी असल्याने बरेचदा स्त्रिया ‘स्वस्तातल्या कामगार’ असतात. संसदेत आणि विधानसभांमध्ये स्त्रियांची संख्या चांगली आहे (सुमारे ४०%), पण त्या कितपत सक्रीय आहेत ते माहिती नाही. बँका, सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी स्त्रिया दिसतात आणि सहजतेने वावरतात. चारचाकी चालवणा-या खूप स्त्रिया दिसतात – पण हे फक्त शहरांत.
......................................................................................................................................................... ६. ते बुट होते भारतीय राजकारणाचे , ते बुट होते भारतीय समाजमनाचे . ती एकमात्र निशाणी मागे ठेवून तो लोकनायक परलोकवासी निघाला होता . पुढील काही दशके तरी या नेत्याची , या राष्ट्राला गरज भासणार होती . त्याच्या अशा अकाली जाण्याने राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण होणार होती . या घडी नंतर संपूर्ण देश दु:खाच्या खाईत लोटला जाणार होता . या घटनेचा मोहनवर इतका गंभीर परिणाम झाला की , त्या दिवसापासून त्याची वाचा गेली . तो कुणालाही प्रतिसाद देत नाही . त्याचे नैसर्गिक विधींवर पण नियंत्रण राहिले नाही . एकूणच त्याचा संपूर्ण शरीरावरचा ताबा सुटला आहे . नियंत्रणात आहेत ते फक्त डोळे , त्यांना खुप काही सांगायचंय ……………………………………………………………………… ७. स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं. या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन. ………………………………………………………………………………