बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !
सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.
त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत.
विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे.
शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्या चिनी नागरिकांच्या आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हिताचं आहे.
या अभियानामुळे सर्व जगाचं अर्थकारण बदलू शकेल आणि विकासाच्या संधीचं विकेंद्रिकरण होईल.
या अभियानासाठी करोना ही जगाला लाभलेली उत्तम संधी आहे असं सोनम यांचं म्हणणं आहे.
त्यानिमित्तानं हा विषय इथे मांडला आहे.
💬 प्रतिसाद
(83)
स
सोत्रि
Sat, 06/13/2020 - 02:34
नवीन
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Wed, 06/10/2020 - 10:47
नवीन
हे अभियान काय प्रकरण आहे? मोहीम असा छान शब्द होता त्याला घालवून देऊन हे अभियान आलं! 'शिवाजी महाराज सुरतेच्या अभियानावर गेले' कसं वाटतं ?
आपण नुसतेच बोलघेवडे लोक आहोत. नुसतं मराठी मराठी करायचं, पण आपल्या भाषेची बूज मुळीच राखायची नाही, हाच आपला बाणा आहे. दिल्लीहून 'सर्वशिक्षा अभियान' आलं की आपणही 'चला, सर्वशिक्षा अभियान राबवूया' असं म्हणतो. वर सह्याद्रीचा फालतू गर्व.
हे विषयांतर आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण काय आहे, जर आपल्याला आपल्या मातृभाषेचीही फिकीर नसेल, तर मग आणखी कसली असणार? आणि ती नसेल तर ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत.
जाऊ दे. कोणीही काहीही करणार नाही. माहीत आहे, नुसतं अरण्यरुदन. पण राहावत नाही कधीकधी.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/10/2020 - 11:08
नवीन
तुम्हाला हवा तो शब्द वापरा पण व्यक्तिगत जीवनात त्यासाठी जे काही करता येईल ते करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश जाऊ द्या, ही इच्छा.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/10/2020 - 20:34
नवीन
सहमत.
भाषेबद्दल विचार करणारा, आग्रह धरणारा "uncool" (म्हणजे मुर्ख) समजला जातो. "मुदा समजला ना , मग बास तर.." ही प्रवृत्ती वाढते आहे. असो..
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 06/11/2020 - 14:02
नवीन
हिंदी शब्दांच्या अश्या वाढत्या भेसळीनं महाराष्ट्र हा हिंदी भाषिक प्रदेशच आहे असा भारतीयांचा आणि जगातल्या सर्वांचा समज होत चालला आहे !
मायबोलीच्या र्हासातील आणखी टप्पा !
आपले राजकिय नेतृत्व देशपातळीवर "मराठीच्या" बाबतीत पराभूत मनोवृत्तीनं वावरत आहे हे क्लेशदायक आहे !
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Wed, 06/10/2020 - 14:42
नवीन
सोनम वांगचुक नावाचा किमयागार आपल्या देशासाठी वरदान आहे. लडाख च्या पाणी प्रश्नावर काढलेला हिमस्तुप रुपी तोडगा खुप प्रभावी आहे त्यांचा. या लढ्यात त्यांनी पडायचं कारण त्यांना सिमेवरचा तणाव जवळुन दिसतो आहे. त्यांची I live simply मोहीम सुद्धा खुप गरजेची आहे. खाली दिलेल्या लिंक वर हा माणूस सिंधू च्या थंडगार पाण्यात साध्या राहणीच्या समर्थनार्थ पोहताना दिसतोय https://youtu.be/T5UQyF8xs-k
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/10/2020 - 15:05
नवीन
>आपल्या देशासाठी वरदान आहे !
एकदम बरोब्बर बोललात !
त्याचं हे अभियान लोकसहभागावर अवलंबून आहे.
लोकांनी ते स्पिरीट लक्षात घेऊन काही साध्या गोष्टी जरी जीवनात आणल्या तरी देशाच्या अर्थकारणात मोठा बदल घडू शकेल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/10/2020 - 18:46
नवीन
पण कोणी सांगितले की चिनी वस्त घ्या म्हणून?
मग आता घेऊ नका हा प्रचार कशाला?
आमची दिवाळी, गणपती सजावट स्वस्तात कशी होऊ लागली?
अमचेच मोबाईल घ्या असा आदेश काढला होता? आम्हीच अर्ध्या तासात फ्लेश सेलमध्ये घेत होतो.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/10/2020 - 19:16
नवीन
कुणीही सांगितलं नव्हतं,
पण आता तो विचार करायला हवा यासाठी हा धागा आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/10/2020 - 20:37
नवीन
व्हॉट्स अॅप वर आलेला एक फॉरवर्ड संदेश.. मला आवडला आणि पटलाही
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
गुरुवार, 06/11/2020 - 01:50
नवीन
चायना प्रोडक्ट बॅन करण्याची मोहीम फारशी यशस्वी होईल असे वाटत नाही. याची अनेक करणे आहेत.
१. पहिले म्हणजे आपल्या भारतीयांची स्मरणशक्ती अतिशय थोडाकाळ राहणारी आहे. काही दिवस हे सर्व चालते पुन्हा काही काळ गेला की येरे माझ्या मागल्या. जेथे स्वतःच्या फायद्यासाठी १ जानेवारीला घेतलेला संकल्प फारसा टिकत नाही तिथे फक्त भारतीय मालाचं घेण्याची आणि प्रत्येक वेळी जो माल येईल तो चायना माल नाही हे तपासून पाहण्याची सवय लागणे आपल्या भारतीयांना खूप अवघड आहे. अगदी अल्प काळासाठी कदाचित फायदा होईलही परंतु लॉन्ग टर्म साठी अवघड वाटते. आणि शॉर्ट टर्म साठी होणारे ठोसे नुकसान चायना मधले ट्रेडर्स दुसरीकडून भरून काढू शकतील कारण भारतीयांना होणारी निर्यात ही त्यामाने कमी आहे आणि मलेशियासारखा केवळ भारत निर्यातीवर खूप ट्रेडर्स अवलंबून असतील याची शक्यता कमी आहे.
२. सांगायला दुःख होते पण सत्य आहे ते म्हणजे भारतीयांमध्ये फारसा न रुजलेला राष्ट्रवाद. २०व्या शतकात युद्धाच्या वेळी केवळ एक वेळ जेऊन राहा या आवाहनाला जितक्या भारतीयांनी प्रतिसाद दिला होता तितका आजचा भारतीय सध्या चाललेल्या सॉफ्ट युद्धासाठी देत नाही आहे हे सत्य आहे. आजचा भारतीय राष्ट्रवादाआधी स्वतःच्या फायद्याचा आधी विचार करतो त्यात करोना सारखे संकट त्यामुळे प्रत्येकाचा कल पैसे वाचवण्यावर आणि स्वस्तात खरेदी करण्यावर आहे त्यामुळे अनेक जणांचा पवित्रा चायना मालाबद्दल 'वही वाली क्वालिटी काम दाम मे मिले तो फिर ये क्यों नही' असाच आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली की चायना कंपनीच्या नवीन स्मार्ट वॉचची ऑनलाईन विक्री २ मिनटात १५००० झाली आणि उदंड प्रतिसादामुळे अजून एक राउंड काही दिवसात येणार आहे. हेच अगदी नुकत्याच लाँच झालेल्या प्रसिद्ध चायना कंपनीच्या मोबाईलच्या ब्रॅण्डच्या बाबतीतही खरे ठरण्याची शक्यता खूप जास्त आहे. काही दिवसात आकडे येतीलच बाहेर.
३. भारतात अनेक लोक फसवणूक करायला खोटे बोलायला मागे पुढे बघत नाहीत. छोट्या छोट्या चायना प्रोडक्ट्स नी आपले भारतीय मार्केट असे व्यापले आहे की कळत सुद्धा नाही की विकत घेणारा माल चायनाच्या आहे की नाही. आणि अश्या वस्तूंवर मेड इन चायना वगैरे लिहिण्याची अजिबात गरज नसते (उदा चित्रकलेचा पेपर, आकाशकंदील, माळ, पूजेचे साहित्य आणि बरेच काही). दुकानदार असे प्रोडक्ट्स चायना चे असले तरी स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलून माल गळ्यात मारायला मागेपुढे बघत नाहीत.
४. स्वयंपूर्णतेचा मुद्दा बरोबर आहे पण अडचणी बऱ्याच आहेत. मेक इन इंडिया ला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. कारणे अनेक असतील पण वस्तुस्थिती हीच आहे. दुसरे आणि अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरण ज्याकडे खूप कमी लक्ष वेधले गेले आहे. काही गोष्टी आपल्या देशात तयार करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आत्यंतिक घटक आहेत आणि त्या बाहेरून मागवणेच योग्य ठरते. उदा कच्चा माल म्हणून वापरली जाणारी केमिकल्स. आपल्या कडे आधीच नद्या खूप प्रदूषित आहेत आणि अजून पर्यावरण खराब होणे परवडणारे नाही.
यावर शॉर्ट टर्म उपाय म्हणजे काहीही करून चायनाचा माल आपल्या देशी मालापेक्षा स्वस्त असणार नाही याची काळजी घेणे हाच आहे. मग डम्पिंग वाढवणे असो किंवा क्वालिटीचे कारण देऊन काही प्रकारचा चायना माल भारतात येऊच न देणे असो. चायनाचा माल विकत घेण्याची भारतीयांची सवय मोडायची असेल तर आधी चायना माल इतर मालापेक्षा स्वस्त नाही हे पाहिलेच पाहिजे. त्यावर दुसरा इलाज नाही. फोन घेताना जेंव्हा सॅमसंग आणि वन प्लस च्या किमती आणि फिचर्स एकसमान असतील तेंव्हाच राष्ट्रवाद आठवेल नाहीतर नाही. आणि हे सगळ्यालाच लागू आहे. १३० कोटी जनतेला भावनिक आवाहन करून मिळणारे यश फार मर्यादित आणि अल्प काळासाठी टिकणारे आहे. शक्य असेल तिथे स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न चालू ठेवावेत पण जोवर ते शक्य नाही तोवर चायना माल स्वस्तात विकला जाऊ नये हे पाहणे खूप महत्वाचे आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 07:19
नवीन
फारशी यशस्वी होईल असे वाटत नाही ?
ते बहुतांशी नागरिकांच्या सहभागावर आहे. किमान तीन गोष्टी तर प्रत्येक जण सहज करु शकेल :
१. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं
२. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं.
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं
३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 06/11/2020 - 07:50
नवीन
काही चायनात नोकरी करत असतील, काहींचे चायनाशी व्यावसायिक संबंध असतील , त्यांनी काय करावे ?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/11/2020 - 08:22
नवीन
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे (सरदार पटेलांचा पुतळा ) सुमारे ६० की ७०% भाग हे मेड इन चायना आहेत हे तिथल्या अधिकृत गाईडने (व्युविंग गॅलरीमधली) सांगितले.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 08:59
नवीन
> सुमारे ६० की ७०% भाग हे मेड इन चायना आहेत.
आपण सगळ्या जगापेक्षा भारी आहोत कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा कुठे आहे ?
आणि त्या निर्मितीचे जनक कोण ?
हे सवाल इतिहास विचारेल तेंव्हा एकमेव नांव समोर यायला हवं.
भले सामन्य माणसाला त्याचा शून्य उपयोग असला तरी हरकत नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 06/11/2020 - 15:54
नवीन
आपल्या रोजच्या जगण्यात देखील हज्जारो गोष्टी दिसतील मेड इन चायना. पुढे देखील ते एका दिवसात रिप्लेस होणार नाहि. १००% रिप्लेस तर कधीच होणार नाहि. तसा विचार देखील नाहि.
या व्यापारी घडामोडींमधे आपलं घोडं किती आणि कसं पुढे दामटता येईल, ते टिकवुन कसं ठेवता येईल, वृद्धींगत कसं करता येईल, याचा विचार आता मेनस्ट्रीम व्हावा आणि तो विचार, त्यानुसार कृती भारतीय समाज जीवनाचं अंग बनावं, अशी स्थिती आहे.
बाकी स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचे प्रोस्पेक्ट्स वादातीत आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
गुरुवार, 06/11/2020 - 08:46
नवीन
आंतरराष्ट्रीय व्यापार युध्दाला त्या त्या देशातील सरकार व तेथील उद्योगधंद्यांनी तोंड द्यायचे असते. देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे हे त्या देशातील सरकारचे व उद्योगधंद्यांचे कमकुवतपणाचे लक्षण आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 09:02
नवीन
१. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं
२. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं.
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं
३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं
हे एकदा नागरिकांनी मनावर घेतलं की चीनकडून होणारी बेफाम आयात आपोआप मंदावेल.
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/11/2020 - 10:43
नवीन
किती उच्च प्रतीचा दांभिकपणा करता हो तुम्ही. केवळ तुमचा धागा आहे म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे विधान केलंय तुम्ही.
हेच विधान कुणा दुसर्या सदस्याने केले असते तर गणपतीच्या अस्तित्वापासून ते समई लावून मन प्रसन्न होत नसते इथपर्यंत आपलया अगाध अध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची उधळण करत इतर सदस्यांसोबत किमान दोन दिवस प्रतिसाद प्रतिसाद खेळला असता तुम्ही. किंबहूना तुम्ही ते काही धाग्यांवर नामस्मरण आणि जपाबद्दल आता करतच आहात.
इथे बरी गणपतीसमोर समई लावून मनाला मिळणार्या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुमचा मुद्दा आहे म्हणून. देव गणेशाने तुम्हाला सद्बुद्धी दिली तर :)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 10:58
नवीन
चित्तप्रसन्न होण्यासाठी मला कशाची गरज नाही.
तुम्ही पुन्हा एकदा आपलं नांव सार्थ केलं आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 11:03
नवीन
.
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/11/2020 - 11:30
नवीन
हो का? पण मग ते इथेच कशाला? इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.
तुमचे कसे काय बुवा चित्त प्रसन्न होते? तुम्ही तर चित्ताच्या पलीकडे गेलेले आहात ना? तुमचे चित्त तर निर्भाव असायला हवे ना? की नुसत्याच बोलायच्या बाता?
तेच बरं आहे. लोक सोडून देतात आमच्यासारख्यांना "जान देव भाय त्याचू हय वह" म्हणत. तुमच्या सारख्यांना मात्र लोक "अति शहाणा त्याचा बैल रिकामा" म्हणत फिदीफिदी हसतात. :)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 11:34
नवीन
धागा कशाविषयी आहे ते वाचा.
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/11/2020 - 11:44
नवीन
नावाचं सोडा हो, नावाचं काय घेऊन बसलात. नावात काही नसते हे एका "ज्ञानी" माणसाला सांगावं लागण्याची वेळ यावी ना.
धाग्याचं सोडा, मुद्द्याचं बोला. :)
झाली ना बोलती बंद.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 11:53
नवीन
> बरोब्बर ! पण ते तुम्ही स्वतः घेतलंय ना !
त्यामुळे ते सारखं सार्थ होतंय.
आता पुन्हा एकदा धागा काय आहे ते पाहा : 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट'
तुमच्यासारखे त्याचू लोक धारणा सोडायला तयार नाहीत म्हणून दोन्ही कामं करायला लागतात.
त्यांच्या धारणा निस्सरित करणं, आणि
त्यांना चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/11/2020 - 12:07
नवीन
धाग्याचा हेतू चांगला आहे याबद्दल दुमत नाही. मात्र "आपल्या" विचारांचे समर्थन करताना तुमचा ढोंगीपणा उघड झाला आहे त्यावर बोला ना काही.
यावर तुमची बोलती बंद झाली आहे.
इथला तुमचा विचार स्पृहणीय आहे, ते विजेच्या माळांचे उदाहरणही योग्य आहे. मग इथे जर तुम्ही देवतेचे, तिच्यासमोर समई लावून मनाला मिळणार्या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुम्हाला चुकीच्या वाटणार्या गोष्टीला पर्याय सुचवत आहात तर मग इतर ठिकाणी तुमची बुद्धी का माती खाते? तिथे का श्रद्धेवर, देवता पुजनावर, देवासमोर समई लावण्यांसारख्या साध्या साध्या कृतींवर, नामजपावर काहीही कारण नसताना आगपाखड करत असता? हा विरोधाभास नाही का?
काही डोक्यात शिरलं असेल तर काही चांगला मुद्दा मांडाल. नसेल शिरलं तर माझ्या नावावर अजून एखादी बालिश कमेंट कराल. माणूस स्वतःहून जेव्हा एखादं नाव घेतो तेव्हा त्या नावाने त्यास कुणी हाक मारल्यास त्याला काही फरक पडणार नसतो एव्हढी साधी गोष्टही तुम्हाला कळत नाही. बसलेत माझ्या नावाचा जप करत. :)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 12:16
नवीन
पुन्हा वाचा :
तुमच्यासारखे त्याचू लोक धारणा सोडायला तयार नाहीत म्हणून दोन्ही कामं करायला लागतात.
त्यांच्या धारणा निस्सरित करणं, आणि
त्यांना चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं
________________________________
जेंव्हा धारणा निस्सरित करायचा धागा असेल तेंव्हा तिथे ते काम करतो.
जेंव्हा चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं असतं तेंव्हा ते काम करतो.
थोडक्यात, त्याचू लोकांना विचारांची योग्य दिशा देतो.
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/11/2020 - 12:24
नवीन
बोलती बंद झाल्यावर गोलमाल प्रतिसाद देण्याची कला तुम्ही चांगलीच आत्मसात केली आहे. :)
असो, धागा चांगला आहे, त्यावर अधिक अवांतर नको.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 13:02
नवीन
त्याचू लोकांना विचारांची योग्य दिशा देण्याचं काम सतत करायला लागतं
बर्याच वेळानं का होईना, धागा काय आहे आणि आपण काय विचारतोयं हे तुम्हाला समजलं !
बघा :
धागा चांगला आहे, त्यावर अधिक अवांतर नको
- Log in or register to post comments
J
Jayant Naik
गुरुवार, 06/11/2020 - 10:51
नवीन
एका चांगल्या विचारांना वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अर्जुन
गुरुवार, 06/11/2020 - 11:47
नवीन
आंतरराष्ट्रीय व्यापार युध्दाला त्या त्या देशातील सरकार व तेथील उद्योगधंद्यांनी तोंड द्यायचे असते. देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे हे त्या देशातील सरकारचे व उद्योगधंद्यांचे कमकुवतपणाचे लक्षण आहे.काळ, अर्थातच स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा!!
वरील मत वाचल्यावर, आताच जालावर वाचलेले आठवले, सर्व जबाबदारया सरकारवर लादण्यापेक्षा आपण देशासाठी आपले कर्तव्य पार पाडु या, व सरस्वती राजमणीसारख्या अनेकांच्या श्रमाचे चीज करु या !!!
स्थळ : रंगून, ब्रम्हदेश (आताचे मायनामार)
रंगूनमधील सोन्याच्या खाणींचे एक भारतीय मालक - ब्रम्हदेशातील श्रीमंत भारतीयांपैकी एक! मनात जाज्वल्य देशभक्ती आणि ब्रिटिशांबद्दल आकस!!
नेताजी सुभाषचंद्र बोस त्यावेळेस रंगूनमधून आपली सूत्रे हलवत असत. असेच एकदा त्यांच्या सभेला गेली, त्यांची कन्या - राजमणी…
नेताजींनी सभेत आझाद हिंद फौजेसाठी निधी देण्याचे आवाहन केले. सोळा वर्षीय राजमणी त्यांच्या भाषणाने भारावली…
आपले सर्व दागिने आणि पैसे तिने दान केले!
एक १६ वर्षाची तरुणी इतके दागिने आणि पैसे दान करते हे नेताजींच्या नजरेतून निसटलं नाही. त्यांना ते योग्य न वाटल्याने ते सरस्वती राजमणी ह्यांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना नेताजी दागिने परत करत असताना खुद्द नेताजींना सरस्वती राजामणी ह्यांनी उत्तर दिलं,
'ते दागिने, पैसे माझे आहेत. त्यांच काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी ते तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही'.
एका १६ वर्षाच्या मुलीच्या शब्दांची धार खुद्द नेताजींना निशब्द करून गेली. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी त्यावर तिला सांगितलं,
'लक्ष्मी येईल आणि जाईल. पण सरस्वती तशीच रहाते. तिचा वरदहस्त तुझ्यावर आहे. म्हणून तुझं नाव आजपासून 'सरस्वती'
त्याअगोदर, जवळजवळ ८३ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी १९३७ सालच्या आसपास रंगूनला गेले होते. राजमणीच्या कुटुंबियांच्या घरी ते पाहुणे म्हणून गेले होते. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींचं नाव आणि व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करेल असं होतं. त्यांच्या भेटीसाठी त्या घरात लगबग चालू होती. सगळे त्यांना भेटण्यास आतुर झालेले असताना लक्षात आलं की घरातली लहान मुलगी गायब आहे. तिचा शोध सगळीकडे सुरु झाला. खुद्द महात्मा गांधी ह्या शोधकार्यात जुंपले. थोड्या वेळाने ती मुलगी घराच्या मागच्या बाजूला बंदुकीने आपलं लक्ष्य वेधण्याचा सराव करत असताना आढळली. महात्मा गांधी नी तिला जाऊन सांगितलं की,
'तू इतकी लहान असताना हिंसेच्या रस्त्यावर का जात आहेस? आपण अहिंसेने ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देतं आहोत. तेव्हा बंदुकीची गरज नाही. तू सुद्धा अहिंसेच्या मार्गाने त्यांच्या विरुद्ध लढा दे. '
त्यांच बोलून संपत नाही तोच खुद्द महात्मा गांधी ना त्या १० वर्षाच्या मुली नी उत्तर दिलं,
'आपण चोरांना आणि लूट करणाऱ्या लोकांना मारतो. नाही का? मग ब्रिटिश चोर आहेत, लुटेरे आहेत. त्यांनी भारताला लुटलं आहे. भारतात चोरी केली आहे. मी मोठी झाल्यावर एका तरी ब्रिटिशाचा माझ्या बंदुकीने नक्की वेध घेईन'.
न घाबरता भारताच्या आणि पूर्ण जगाच्या अहिंसेच्या सगळ्यात मोठ्या व्यक्तिमत्वाला अवघ्या १० व्या वर्षी आपल्या शब्दांनी उत्तर देणारी ती मुलगी म्हणजेच भारताची आजपर्यंतची सगळ्यात तरुण गुप्तहेर ज्यांच नाव आहे 'सरस्वती राजमणी'.
त्यांचं कुटुंब मुळचं भारतातल्या त्रिची इथलं. अतिशय श्रीमंत आणि स्वातंत्र्य लढ्याशी निगडित असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र करण्याचं वेड त्यांना होतं. 'लोहा लोहे को काटता हैं' हा बाणा त्यांच्या अंगात लहानपणापासून होता. मोठं झाल्यावर त्यांचा कल ह्याच बाण्याचं नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्याकडे वळला.
सरस्वती राजामणी ह्यांनी नेताजींना त्यांच्या आझाद हिंद सेनेत घेण्याची विनंती केली. अश्या तऱ्हेने त्यांची नियुक्ती आझाद हिंद सेनेच्या गुप्तहेर खात्यात झाली. ह्या खात्याकडे मुख्य जबाबदारी ही ब्रिटिश सेनेतील गुप्त संदेशांना आझाद हिंद सेनेकडे देणं ही होती. सरस्वती राजमणी सोबत अजून ४ सहकारी गुप्तहेर म्हणून रुजू झाल्या. त्या सगळ्यांना आपला पेहराव बदलताना पुरुषी रूप धारण करावं लागलं. सरस्वती राजामणी आता १६ वर्षाचा मिसरूड फुटलेला 'मणी' झाल्या होत्या. मुलगा बनून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात त्यांनी काम करायला सुरवात केली. काम करता करता त्यांच्याकडे संदेश, सैन्याच्या हालचालींची माहिती गुप्तपणे आझाद हिंद सेनेकडे देण्याचं काम होतं. हे काम करताना त्यांच्या एका मैत्रिणीचं बिंग फुटलं आणि ब्रिटिशांनी तिला कैदेत टाकलं. आपल्या साथीदाराला ब्रिटिशांच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. पकडले गेल्यावर आपली काय हालत होईल हे माहित असताना त्यांनी एका नर्तकी चा वेष करून त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दारू पाजून आपल्या साथीदारांसह तिकडून पोबारा केला.
ब्रिटिश सैनिकांना ह्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघींचा ब्रिटिश सेनेने पाठलाग केला. ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात एक गोळी सरस्वती राजामणी ह्यांच्या उजव्या पायाला लागली. गोळी लागलेल्या पायाने धावता येत नसताना ब्रिटिश सैनिकांना चकवा देण्यासाठी ह्या दोघी चक्क झाडावर चढल्या. तब्बल तीन दिवस जोवर ब्रिटिश सैनिकांची शोध मोहीम संपत नाही तोवर झाडावरच बसून होत्या. गोळी लागलेला पाय घेऊन अन्न, पाण्याशिवाय तीन दिवस झाडावर बसून राहणं काय असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. त्या गोळीमुळे आजही त्यांच्या उजव्या पायात बळ नाही. पण सरस्वती राजमणी ह्यांनी त्याचा अभिमान बाळगला.
दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे कुटुंबीय सर्व काही तेथेच सोडून भारतात परतले, मद्रास (चेन्नई) ला स्थलांतरीत झाले. एकेकाळी गडगंज श्रीमंत असणाऱ्या सरस्वती राजमणी जवळपास ७० वर्ष एका छोट्या खोलीत रहात होत्या. शासनांनं त्यांची दखल घ्यायला स्वातंत्र भारताची सात दशकं जावी लागली! तामिळनाडू सरकारने त्यांना घराची व्यवस्था केली. फाटके कपडे जमवून ते शिवून पुन्हा गरीब लोकांना दान करण्याचं काम त्या आयुष्याच्या शेवटा पर्यंत करत होत्या. २००६ सालच्या त्सुनामीच्या प्रकोपात नाममात्र मिळणारं सरकारी पेंशन सुद्धा त्यांनी मदत कार्याला दान केलं होतं. अश्या ह्या सरस्वतीने १३ जानेवारी २०१८ ला शेवटचा श्वास घेतला.
आम्ही भारतीय करंटे आहोत! आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव ना कोणी करून दिली न आम्ही ती करून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय मिळालेले संविधानाचे हक्क, लोकशाही, सार्वभौमत्व हे फक्त आणि फक्त राजकारण आणि स्वतःच्या फायद्यासाठी! मग ते शिक्षण, नोकरी अथवा पैसा किंवा आता सोशल मिडिया सगळ्यांसाठी वापरण्याचा करंटेपणा आजतागायत करत आलेले आहोत. त्याचा आम्हाला माज आहे कारण देशभक्ती काय असते हेच आम्हाला कळलेले नाही.
१५ चित्रपट करणाऱ्याला आम्ही देशाचा हिरो मानतो, १० सामने खेळलेला भारताचा स्टार होतो पण अंगावर गोळी झेलून त्याच्या होणाऱ्या यातनांना आपला अभिमान मानणाऱ्या सरस्वती राजमणी ह्यांच्या कर्तृत्वाचं न आम्हाला काही पडलेलं असते न ते कोणत्या पद्म सन्मानाच्या कक्षेत येते. कारण आमच्या हिरो बनवण्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही इतिहासावर फक्त आणि फक्त नाव ठेवायला तयार असतो इतिहास घडवायला नाही. इतिहास घडवणारी सरस्वती देवींसारखी माणसे वेगळ्याच रक्ताची होती. जरी देशाने त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली नाही तरी देशासाठी रक्त सांडल्याचा आणि त्या इतिहासात सहभाग देण्याचा तसेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी योगदान देण्याचा त्यांना अभिमान होता.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/11/2020 - 13:06
नवीन
इतकं तरी करु शकतो.
१. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं
२. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं.
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं
३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं
हे एकदा नागरिकांनी मनावर घेतलं की चीनकडून होणारी बेफाम आयात आपोआप मंदावेल.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 06/11/2020 - 14:07
नवीन
सरस्वती राजामणीची गोष्ट सर्व काही सांगून जाते !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2